देवस्थाने आणि भटजी....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
23 Jan 2015 - 1:15 am

मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.

मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.

आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)

आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.

लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्‍यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्‍यांसाठी टांकसाळ?"

असो,

पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.

भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."

मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."

गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."

जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.

एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.

गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्‍यात गेलो.

जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.

दक्षिणा विचारली.

भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"

मी,"हो."

भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."

योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.

डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मुवि,तुमच्यासारखेच सत्यनारायण मलाही आवडतात घालायला!तेच खरे!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2015 - 9:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुहागरला आमची कुलदेवी आहे दुर्गा व्याडेशवरी. मंदिरात गेल्यावर छान प्रसन्न वाटतं. ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. :)

माझ्या धाग्याची जाहिरात करुन घेतो... फ्लेक्स चे पैसे वाचवण्याची संधी दिल्या बद्धल धन्यवाद ! ;)

चित्रमय कोकण दर्शन (भाग २) श्री व्याडेश्वर मंदिर
चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी

जाता जाता :- तुळजाभवानी मंदिराची 'लूट'!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

सतिश गावडे's picture

23 Jan 2015 - 10:18 am | सतिश गावडे

जाता जाता :- तुळजाभवानी मंदिराची 'लूट'!

खुप वाईट वाटलं ही बातमी वाचली तेव्हा.

मंदिरांकडे जमा होणारी संपत्ती ही भाविकांनी श्रद्धेपोटी "देवाने आपल्याला भरभरुन दिलं. तेव्हा आपणही फुल ना फुलाची पाकळी देवाला द्यायला हवी" या भावनेने दानपेटीत टाकलेले पैसे, सोने वगैरे असते.

या पैशाचे पुढे काय होते याच्याशी दान पेटीत पैसा टाकणार्यांना भाविकांना काही घेणे देणे नसते त्यामुळे अशा घटना घडतात. देवस्थाने जमा होणार्या संपत्तीच्या पाच दहा टक्के संपत्ती समोर दाखवण्यापुरती "समाजोपयोगी" कार्यात वापरतात. उरलेल्या संपत्तीचे काय होते हे कोणालाच माहिती नसते.

पैशाचा पूर वाहणारे एक देवस्थान मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्याचे पाच दहा रुपये घेण्याची चिंधीगिरी करते.

देशातील बहुतांश जनता देवभोळी असल्यामुळे देवस्थाने सॉरी "मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी भांडवलात प्रचंड परतावा देणारा व्यवसाय बनला आहे.

"मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी भांडवलात प्रचंड परतावा देणारा व्यवसाय बनला आहे.
सहमत ! तरी काही अपवाद अजुन शिलक्क आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

वरचा दुर्गादेवी लेख वाचला. उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?व्याडेश्वर ,उफराट्यापेक्षा हेच आवडले होते.

उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?
ज्या देवळात मी गेलो तेच दुर्गा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे, अजुन दुसरे कुठले असल्यास ठावूक नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2015 - 11:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हो तेचं मंदिर हे. बागेतली देवी म्हणतात स्थानिक लोकं तिला,

उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?

नाही.
ते मंदिर गुहागरचे ग्रामदैवत श्री व्याघ्राम्बरी देवीचे आहे. :)

आणि दुर्गादेवीचे मंदिर खूप लांब आहे.
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सांगितले ते बरोबर आहे दुर्गादेवी म्हणजेच बागेतली देवी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2015 - 11:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुहागर एसटी स्टँडकडुन दुर्गादेवीच्या देवळाकडे येताना मधे एक शाळा लागते त्याच्या जवळचं मंदिर का?

कारण दुर्गा व्याडेश्वरी माझं कुलदैवत असल्यानी दरवर्षी एकदा नं चुकता जाणं होतं. माझ्या माहितीप्रमाणे कोरीव खांब असलेलं मंदिर ते हेचं.

व्याघ्रांबरी देवीच्या खांबाचा फोटो असेल तर टाकाल का?

के.पी.'s picture

24 Jan 2015 - 9:07 pm | के.पी.

गुहागर एसटी स्टँडकडुन दुर्गादेवीच्या देवळाकडे येताना मधे एक शाळा लागते त्याच्या जवळचं मंदिर का?

होय तिथे २ मंदिरे आहेत. त्यातील शाळेला लागून मंदिर आहे ते उफराटा गणपती मंदिर आहे. आणि तिथुन जर्रास्स पुढे व्याघ्रांबरी देवीचे मंदिर आहे.

व्याघ्रांबरी देवीच्या खांबाचा फोटो असेल तर टाकाल का?

माफ करा,सध्यातरी माझ्याकडे फोटो नाहिये. तिकडे जाण झाल तर नक्की क्लिक करुन टाकेन :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2015 - 11:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

आमच्या प्रतिसादावर आपल्या धाग्याची झैरात करायला बंदी आहे =))

तस्मात दंड म्हणुन अजुन चार कोकणातले धागे टाकायची शिक्षा कोर्ट तुम्हाला देत आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2015 - 9:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भरपुर मंदिरात जाणं झालयं आजपर्यंत पण एवढं शांत आणि समाधानी फक्त दुर्गाव्याडेश्वरीच्या, कोल्हापुरच्या अंबाबाईच्या आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिरातचं वाटतं.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2015 - 10:44 am | टवाळ कार्टा

आम्च्या गुर्जींचा धंदा बशीवणार तुम्ही सग्ळे

मुक्त विहारि's picture

23 Jan 2015 - 10:51 am | मुक्त विहारि

तसे काही होणार नाही......

माणसांना देवाची गरज जास्त आहे आणि मग त्या बरोबर येणार्‍या रुढी आणि परंपरेची देखील.

अनुप ढेरे's picture

23 Jan 2015 - 10:57 am | अनुप ढेरे

८०० प्रतिसाद पुरले नाहित काय मुवि?

मुक्त विहारि's picture

23 Jan 2015 - 11:33 am | मुक्त विहारि

मना मध्ये अज्जुन बर्‍याच शंका आहेत आणि खेळी-मेळीच्या वातावरणात शंका-निरसन, फक्त मिपावरच होते असा स्वानुभव आहे.

सविता००१'s picture

23 Jan 2015 - 11:14 am | सविता००१

हा एक उच्च कारभार आहे. बोलायलाच नको. त्या भवानीला डोळे भरून पहाण्यासाठीच तिकडे जायचं. फार फार सुरेख आहे ती. मागे मी देवीला नेसवण्यासाठी चांगली उत्तम साडी इकडून (मुंबई) घेऊन गेले होते. तर तिथला पुजारी म्हणाला की देवीला कशाला एवढी भारी साडी? माझ्या मुलीच या महिन्यात लग्न आहे तर तिच्यासाठी मी ही ठेवतो. (विचारलं नाही.. सांगितलं) आणि मी बाहेरून एक साधीशी साडी आणतो म्हणे. आईशप्पत असलं भांडण झालं होतं तेव्हा माझ्या नवर्‍याचं आणि त्याचं की बास. तरीपण त्याला आपण चुकतोय असं वाटतच नव्हतं. पण यात फायदा एवढा मस्त झाला की नवर्‍याने चढवलेला एकूण आवाज ऐकुन तिथल्याच इतर पुजार्‍यांनी मध्यस्ती करून आम्हाला मस्त पूजाही करू दिली. आणि आमचीच साडी आमच्यासमोरच त्या देवीला नेसवली. नाहीतर तुळजापूर हे देवस्थान म्हणून भिक्कारच आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2015 - 11:23 am | टवाळ कार्टा

तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे काय होणार ते तुम्हाला समजत नाही का?

मुक्त विहारि's picture

23 Jan 2015 - 11:30 am | मुक्त विहारि

योग्य बोललास....

सविता००१'s picture

23 Jan 2015 - 11:48 am | सविता००१

ते नव्हतं लक्षात घेतलं. कारण माहित असलं तरीही इतकं समोरासमोर कुणी सांगत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे. आपण समोर नसताना हे चालतच हे माहिती आहेच. त्या पुजार्‍याने सरळ विचारलं त्याची चीड आली. निदान आम्हाला. आम्ही त्याच्या मुलीच्या लग्नाचा आहेर म्हणून नव्हती नेली हो साडी. ती तशीही त्या लोकांनी लाटलीच असती नंतर.

मुक्त विहारि's picture

23 Jan 2015 - 11:57 am | मुक्त विहारि

नवरात्राच्या सुमारास गोव्याला जा.

तिथे बर्‍याच मंदिरात साड्यांचा लिलाव होतो.

मी २ वर्षांपुर्वी तिथूनच साड्या आणि पीतांबर आणले.

पहिला फायदा १०-१२ हजाराची पैठणी ७-८ हजारात मिळून जाते आणि गोवा बघणे होते, हा दुसरा फायदा.

तिसरा फायदा, पैसा ताईंची भेट पण होते.

चौथा फायदा, ह्या साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस असतो.विशेषतः लिलावाच्या वेळेला.

पाचवा फायदा, ह्या सगळ्या साड्या देवीचा प्रसाद म्हणून असल्याने, सासू जास्त बोंबलत नाही.

सविता००१'s picture

23 Jan 2015 - 12:02 pm | सविता००१

यातलं पैसा ताईशी भेट हे सोडल्यास सगळं झालं.
सासूचा बोंबलण्याचा प्रश्न आला नाही कारण त्यांनाच पहिली घेउन दिली. ;)

कपिलमुनी's picture

23 Jan 2015 - 5:51 pm | कपिलमुनी

गोव्याला जाउन साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस ??

*mosking* *JOKINGLY* 8P 8p

गोव्याला जाउन साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस ??

तेच की!! ताकाला जाऊन भांडं लपवायचं !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2015 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्या सगळ्या साड्या देवीचा प्रसाद म्हणून असल्याने,सासू जास्त बोंबलत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/hearty-laugh.gif

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2015 - 10:32 am | टवाळ कार्टा

माहित असलं तरीही इतकं समोरासमोर कुणी सांगत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे. आपण समोर नसताना हे चालतच हे माहिती आहेच

हे समजत असतानासुद्धा तुम्ही साडी दिलीत...सुशिक्षित असूनही तुम्ही असे करता तर मग अशिक्षित देवभोळे लोक याच्यावर आणखी करतात यात काहिच आश्चर्य नाही...इथेच तर घोडे पेंड खाते आणि मग देवळे पैशाचा बाजार बनतात

यसवायजी's picture

23 Jan 2015 - 12:10 pm | यसवायजी

देवीला आलेले नारळ/साड्या वगैरे बाहेरच्या विक्रेत्यांना होलसेलमधे विकण्यात येतातच. पण बाहेर स्वतात वि़कण्यापेक्षा, आता नविन ऐड्या वापरतात. भाविकाने (पक्षी गिर्‍हायकाने) १०० ची नोट टेकवली तर प्रसादाचा नारळ! ५०० ला नारळ + हार + पेढे !! आणी ग्र्याण्ड प्रसाद म्हणून १००० च्या नोटेला या सगळ्यासहित (देविला याआधी नेसवलेली) साडी !!!
४-५ रुपयाला बाहेर विक्रेत्याला नारळ विकल्यापे़क्षा हे परवडतेच्च.

जेपी यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे.

क्लिंटन's picture

23 Jan 2015 - 12:58 pm | क्लिंटन

लेख आवडला.एकेकाळी या विषयावरील लेखांमध्ये मी अगदी हिरीरीने भाग घेत असे.

सध्या दिल्ली विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत फेसबुकवर आआपला झोडपण्यात व्यस्त आहे.त्यामुळे इस्पिक एक्का साहेबांच्या आणि माझ्या जिव्हाळ्याच्या चर्चेतही पाहिजे तितका भाग घेता आलेला नाही.मुवि काकांचा धागा असल्यामुळे १० फेब्रुवारीनंतरही हा धागा प्रतिसाद घेत राहिलच.त्यामुळे डिटेल्ड प्रतिसाद त्यावेळी :)

तूर्तास लेख आवडला ही पोच.

(आआप जिंकल्यास फेसबुकवरील दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा सर्वात प्रबळ दावेदार) क्लिंटन

कपिलमुनी's picture

23 Jan 2015 - 5:52 pm | कपिलमुनी

फेसबुकवर आआपला झोडपण्यात व्यस्त आहे

आम्ही पण झाडू हाती घेउ

दादा पेंगट's picture

23 Jan 2015 - 2:12 pm | दादा पेंगट

अजमेरला ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींना भेटावसं वाटलं म्हणून गेलो. तिथे तुम्ही प्रांगणात शिरलात की लगेच एक पोरगा तुम्हाला ओढत कोणा एका मौलवी/खादिमापाशी बसवतो. पैसे उकळतो, तुमच्यासाठी दुवा मागतो. हा पैसा गोरगरीबांच्या जेवणासाठी वापरतो असे म्हणतात, खरे खोटे अल्ला जाणे. अमुकच रुपडे द्या असा आग्रह नसतो ही जमेची बाजू. पण तुम्ही जास्त पैसे द्यावेत असा प्रयत्न ते करतात. प्रत्यक्ष दर्ग्यात चादर घेऊन ४-५ खादिम कबरीपाशी उभे असतात. दोघे-तिघे मोरपीसांचा झाडू घेऊन उभे असतात. तुमच्या डोक्यावर चादर टाकली की टाका १०-२०रुपये. झाडू मारला की टाका १०-२० रुपये. एका चादरीखाली गेलात तरी दुसरा चादरवाला तुम्हाला आपल्यापाशी खेचत असतो. माझ्या मनात सूफी संतांविषयी आणि चिश्ती सिलसिल्याबद्दल फार आदर आहे. ह्या गोळा केलेल्या पैशाचा योग्य विनियोग होत असेल तर ह्या प्रकाराला फार विरोध नाही. पण हे खादिमांच्या घशात जात असेल तर ह्यांनींसुद्धा सूफी संतांच्या शिकवणीला तिलांजली दिली आणि हिंदू तीर्थक्षेत्रांचा 'गुण घेतला' असेच म्हणावे लागेल.

असाच नुभव फतेहपूर सीक्रीला आला होता. रस्त्यातच २ पोरे गाडीला लोंबकळली. टॅक्सीड्रायव्हर पण घाबरून गप होता. ते दोघे आम्ही गाईड आहोत म्हणाले. मग ते सांगतील तिथे ती काय चादर वगैरे विकत घ्यायलाच पाहिजे. पैसे टाका म्हटले की टाका. इतर किल्ला वगैरे काही न दाखवता परत रस्त्यावर आणून सोडले. तो टेक्सीड्रायव्हर नंतर सांगायला लागला की हे सगळे गुंड लोक आहेत. मी जर त्याना टाळून गाडी पुढे नेली असती तर पुढच्या फेरीला मला मारले असते.

सुबोध खरे's picture

23 Jan 2015 - 7:11 pm | सुबोध खरे

अगदी असाच अनुभव मला पण फतेहपूर सीक्रीला आला होता. पहिल्यांदा कार( भाड्याची) पार्किंगसाठी १०० रुपये. तेवढ्यात मी काही सरकारी गाड्या बर्याच पुढे जाऊन पार्क करीत असलेल्या पाहिल्या. आमची गाडी मी माझे लष्कराचे ओळखपत्र दाखविल्यावर पुढे जाऊ दिली त्याना फुकट पार्किंग होते . मग मी माझे लष्कराचे ओळखपत्र दाखविल्यावर पार्किंग वाला म्हणाला पैसे देऊ नका . आता पर्यंत कारच्या खिडकीला लटकलेली पोरं( गाईड आहेत सांगणारी) जरा बिचकली. मी त्यांना सांगितले मला गाईड नकोच. फारच गयावया केल्यावर मी एकाला विचारले तुमचे किती पैसे? त्यावर त्यांचे आपापसात ठरले आणि एक पोरगं तयार झालं ते म्हणालं कि तुम्ही काय द्याल ते. आम्ही आत गेलो तेथे तो पोरगा म्हणाला इथ चादर विकत घ्या. एक झिरझिरीत चादर ३०० रुपये म्हणाला मी त्याला म्हणालो मला चादर घ्यायचीच नाही. फार आग्रह चालला होता. पण मी ठाम होतो. असे सर्व ठिकाणी चालले होते. प्रत्येक इमारतीचा मासळी बाजार पाहून उद्विग्न व्हायला होते. शेवटी वैतागून मी परत कार मध्ये आलो. परत येताना त्या पोराला ५० रुपये देऊ केले तर तो माजाने म्हणाला. मी तुमचे पार्किंगचे पैसे वाचवले मी आवाज चढवून म्हणालो कि मी लष्करात आहे म्हणून पैसे वाचले आहेत तुला हवे असतील तर ५० रुपये घे नाही तर चालू लाग. तो म्हणाला मग हे तरी कशाला देता. मी शांतपणे ड्रायव्हर ला सांगितले गाडी चालू कर आणि निघून आलो.
सगळाच चावटपणा आणि हरामखोरी.

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले

१७

सूड's picture

28 Jan 2015 - 2:21 pm | सूड

१२+३+२?

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 3:31 pm | प्रसाद गोडबोले

१८ = १२+३+२+१ !

हा एक बेनीफिट ऑफ डाऊट म्हणुन मी सोडुन दिला होता =))

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2015 - 3:53 pm | अत्रुप्त आत्मा

@१२+३+२+१ ! >> =)) __/\__ =))

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 11:55 am | टवाळ कार्टा

हे १७...१८ काय आहे?

मृत्युन्जय's picture

28 Jan 2015 - 2:55 pm | मृत्युन्जय

हे काय प्रकरण आहे? १७ काय?

आम्हाला आमची दैवते पावेनात आणि ते पीर पावतील ही आशा ठेवायची

स्वामी संकेतानंद's picture

23 Jan 2015 - 4:15 pm | स्वामी संकेतानंद

कोणी कसली आशा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नै?
मी माझ्या आश्रमात तर कसलीही आशा ठेवून येऊ नका असे स्पष्ट सांगतो. आशा ठेवून येतच आहात तर आपल्या जबाबदारीवर येणे, निराश झाल्यास आश्रम जबाबदार नाही हे आधीच बजावून देतो.

पैसा's picture

23 Jan 2015 - 4:19 pm | पैसा

तुमचा देव कोन्चा?

स्वामी संकेतानंद's picture

23 Jan 2015 - 4:23 pm | स्वामी संकेतानंद

आमचा देव कर्म! कर्म करा, खड्ड्यात जाणार असाल तर जाणे काय चुकते हो? शिखर गाठणार असाल तर गाठणे काय चुकते हो? चिल मारा, चिलम मारा.. न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति....

पैसा's picture

23 Jan 2015 - 4:29 pm | पैसा

लोकांना खड्ड्यात जावा म्हणून सरळ सांगा की!! =)) कर्म बिर्म कशाला ते मधे?

बॅटमॅन's picture

23 Jan 2015 - 4:40 pm | बॅटमॅन

खड्ड्यात जावा?

मग उरलेल्या जावेला आनंद होईल.

किंवा खड्ड्यात सी, हेचटीएमेल, इ.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2015 - 4:47 pm | टवाळ कार्टा

hit

केदार-मिसळपाव's picture

23 Jan 2015 - 8:39 pm | केदार-मिसळपाव

असल्या पांचट प्रतिसादासाठी तुला अनुमोदन..
फार फार विचार खुप खुप लवकर करावा लागतो त्यासाठी.
जावा ह्या शब्दाचा अनेकांगी वापर जमला आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2015 - 8:49 pm | टवाळ कार्टा

=))

स्वामी संकेतानंद's picture

23 Jan 2015 - 7:06 pm | स्वामी संकेतानंद

असं थेट खड्ड्यात जा सांगू लागलो तर आमचे आश्रम कसे चालणार?

पैसा's picture

23 Jan 2015 - 9:12 pm | पैसा

काही स्वामी लोक लोकांना लाथा घालतात आणि लोक त्यातच खुश असतात!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 10:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता तुम्हीच सांगताय तर आशाला तुमच्या आश्रमात येताना बरोबर आणणे धोक्याचे आहे हे पटले आहे ! :) ;) +D

दादा पेंगट's picture

23 Jan 2015 - 6:57 pm | दादा पेंगट

पीर पावायला गेलो नव्हतो वो, त्याला भेटायला गेलो होतो.. च्यायला, पहिल्या वाक्यातच तसा स्पष्ट उल्लेख असूनही कळत नाही लोकांना..

बॅटमॅन's picture

23 Jan 2015 - 5:46 pm | बॅटमॅन

दैवी शेंचुरी.

दादा पेंगट's picture

23 Jan 2015 - 7:00 pm | दादा पेंगट

तेंडुलकर पावला !!

आता (इथे आणि क्रिकेटमध्ये पण) शेंचुरीत काय एक्साईटमेंट राहीली नाही राव.
कालची कोकरं पण करून जातात शेंचुर्‍या.. ;)

नवीन पानावरचे नवीन प्रतिसाद गायब न होता दिसताहेत.

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2015 - 11:00 pm | श्रीगुरुजी

देवळात फार वेळा जात नाही. दरवर्षी नियमाने गोंदवले येथील श्रीमहाराजांचे समाधी मंदीर व नंतर श्रीरामाच्या मंदीरात दर्शनाला जातो. दोन्ही मंदीरात खूप शांत व समाधानी वाटते.

क्लिंटन's picture

23 Jan 2015 - 11:01 pm | क्लिंटन

कोकणातल्या डेरवण या ठिकाणी मागच्या आठवड्यात जाणे झाले.हा अनुभव या चर्चेत इतरांनी लिहिलेल्या अनुभवांपेक्षा वेगळा आहे तरीही लिहितो.आमची शाळेत असतानाही त्या ठिकाणी सहल गेली होती.त्या गोष्टीला खूप वर्षे झाल्यामुळे तिथे बघितलेल्या काही गोष्टी लक्षात नव्हत्या. त्या तिथे गेल्यावर परत समजल्या. एक तर तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटनांवरील पुतळ्यांबरोबरच कुणा वालावलकर महाराजांची समाधीही आहे.

सर्वप्रथम बाहेरच एक बोर्ड लावला आहे.त्यावर कुठले कुठले नियम लिहिले आहेत.त्यातील महत्वाचा नियम म्हणजे स्त्रियांना वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच समाधीच्या तिथे प्रवेश दिला जाईल!! म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही.असो त्यावर आणखी लिहितोच.दुसरे म्हणजे नियमांमध्ये शांतता राखा, गडबड गोंधळ करू नका इत्यादी सूचना होत्याच.सगळ्यात मजा होती शेवटच्या सुचनेत--"हे नियम मान्य नसल्यास इथे यायची तसदी घेऊ नये". म्हणजे हा प्रकार पुणेरी पाट्यांच्या तोंडात मारेल असा झाला.अर्थातच सगळ्या सुचना आम्ही आत जायच्या आत वाचल्या नाहीत आणि शेवटच्या सुचनेचीच थोडी टवाळी केली.

ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा तिथे जायच्या रस्त्यावर बसलेल्या एका जाडसर स्त्रीने हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे सांगितले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो.

आमची शाळेची सहल गेली होती त्यावेळी त्या समाधीच्या तिथे बघितले ते आठवले.तिथे एक ८-१० वर्षे वयाच्या मुलाला गळ्यात वीणा घालून "श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ" असे विविध सुरांमध्ये म्हणायला उभे केले होते.तिथे त्या कामासाठी चार मुले ठेवली आहेत म्हणे आणि चोवीस तास हा जप सतत चालू असतो असे आम्हाला तिथे सांगितले होते ते आठवले.८-१० वर्षे वयाच्या मुलांकडून दररोज सरासरी सहा तास हे काम करून घेणे हा प्रकार मला तरी अजिबात हजम झालेला नव्हता.आणि मला असे काहीतरी करायला न लागता शाळेत जायला मिळते म्हणून किती सुदैवी आहे हे त्यावेळी समजले.

(वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या नसाव्यात अशी अपेक्षा.पण तिथे बघितलेली सत्य परिस्थिती लिहिली आहे).

हाडक्या's picture

23 Jan 2015 - 11:12 pm | हाडक्या

भावना दुखावल्या तर कशाला घाबरता..

आप-भक्तांच्या भावना दुखावल्या तर घाबरत नाही मग इथे कशाला घाबरायचं?
चूक आहे आणि चूक वाटलं तर किमान इथे तरी नक्की मांडले पाहिजे..

उगा नसत्या हळव्या अस्मितांच्या भितीने ढिश्क्लेमर कशाला द्यायचे ??

क्लिंटन's picture

24 Jan 2015 - 9:44 am | क्लिंटन

याचाच अर्थ माझ्यासाठी आआप समर्थकांच्या भावनांपेक्षा वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना अधिक महत्वाच्या आहेत :)

असो. डेरवणला बघितलेला प्रकार विशेषत। त्या मुलांकडून २४ तास जप म्हणून घेणे मला तरी अजिबात आवडले नव्हते. जे चूक ते चूकच. आणि इतकेच काय तर गावाचा उल्लेखही 'श्रीक्षेत्र डेरवण' असा केलेलाही खटकलाच. हे वालावलकर महाराज जे कोणी असतील त्यांना भगवंताच्या पंगतीत नेऊन बसविणे कितपत योग्य आहे?

हाडक्या's picture

27 Jan 2015 - 4:02 pm | हाडक्या

याचाच अर्थ माझ्यासाठी आआप समर्थकांच्या भावनांपेक्षा वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना अधिक महत्वाच्या आहेत

हा हा हा !
इथे आप समर्थक औषधाला देखील उरले नाहीत असे वाटतेय, तरी कित्ती कित्ती ते बदडायचं म्हणतो मी. बच्चों की जान लोगे क्या क्लिंटन साब.. ?

असो,

चूक ते चूकच. आणि इतकेच काय तर गावाचा उल्लेखही 'श्रीक्षेत्र डेरवण' असा केलेलाही खटकलाच. हे वालावलकर महाराज जे कोणी असतील त्यांना भगवंताच्या पंगतीत नेऊन बसविणे कितपत योग्य आहे?

हे एवढेच म्हणायचे होते.. :)

मुक्त विहारि's picture

23 Jan 2015 - 11:28 pm | मुक्त विहारि

"अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे भक्त होते.वालावलकरांचा मुंबईस्थित बिझनेस होता. त्या पैशातून काही समाजोपयोगी काम करावे, ह्या उद्देशाने त्यांनी डेरवणला हॉस्पीटल आणि शिवसुष्टीला मदत केली."

अशी ऐकीव माहिती आहे.

बादवे,

डेरवण हॉस्पीटल मात्र उत्तम होते.मला स्वतःला त्या हॉस्पीटलचा २ वेळा फार चांगला अनुभव आला.चॅरिटेबल ट्रस्टचे हॉस्पीटल कसे असावे, ह्याचा उत्तम नमुना, म्हणजे डेरवण हॉस्पीटल.

अर्थात सध्याची परिस्थिती माहीत नाही.

क्लिंटन's picture

24 Jan 2015 - 9:48 am | क्लिंटन

हो बाजूलाच हॉस्पिटलही आहे आणि नक्कीच ते समाजपयोगी काम आहे. आक्षेप आहे तो देणगीदाराची समाधी वगैरे करून महाराजीकरण करण्यास आणि मुख्य म्हणजे खेळणे-शाळेत जायचे वय असलेल्या मुलांकडून जप म्हणण्यासारखे काम करून घेण्यास.

सुबोध खरे's picture

24 Jan 2015 - 9:59 am | सुबोध खरे

क्लिंटन साहेब
आपले सर्व लिखाण संपूर्ण सत्य आणि पटण्यासारखे असले तरी एक सत्य हेही आहे कि "चमत्काराशिवाय नमस्कार नाही". बर्याच वेळेस सार्वजनिक कार्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा चमत्काराचे पाठबळ घ्यावे लागते. त्यातून एखादे स्वामी जिवंत नसतील तर त्यांच्या बद्दल वलय निर्माण करणे जास्त सोपे जाते.
रच्याकने-- मला २६ जानेवारी, १५ ऑगस्ट रोजी किंवा पंडित नेहरून्पासून खालपर्यंत सर्व राजकारण्यांचे शाळकरी मुलांना गणवेष घालून झेंडे हलविण्यासाठी रस्त्यात तासंतास उभे करणे डोक्यात जाते.
डिस्क्लेमर -- मी अजून डेरवण ला गेलो नाही. आणि तेथे वालावलकर स्वामी आहेत हे मला आजच कळले. मी कोणत्याही स्वामींचा भक्त नाही.

क्लिंटन's picture

24 Jan 2015 - 1:29 pm | क्लिंटन

"चमत्काराशिवाय नमस्कार नाही". बर्याच वेळेस सार्वजनिक कार्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा चमत्काराचे पाठबळ घ्यावे लागते. त्यातून एखादे स्वामी जिवंत नसतील तर त्यांच्या बद्दल वलय निर्माण करणे जास्त सोपे जाते.

शक्य आहे. आपला समाजच असा म्हटल्यावर अशा काही गोष्टी करणे गरजेचे असावेही.पण तरीही माझ्यासारख्याला त्यातल्या बर्‍याच गोष्टी खटकल्याच.

आणि मुख्य म्हणजे खेळणे-शाळेत जायचे वय असलेल्या मुलांकडून जप म्हणण्यासारखे काम करून घेण्यास."

मान्य...१००% मान्य पण.....

मी त्याच भागात होतो आणि २ वेळा तिथल्याच हॉस्पीटल मध्ये जायला लागले, म्हणून थोडे सांगू शकतो.

मला पण आधी हाच आक्षेप होता, पण त्या निमीत्ताने घरातला एक खाणारा कमी होतो, हे वास्तव पण स्वीकारायला हवे.

असो,

आज मला किंवा माझ्या मुलांना खायची भ्रांत नाही, म्हणून मी असे लिहू शकतो, पण उद्या जर त्या मुलांच्या पालकांच्या जागी मी असतो तर, मी पण माझ्या मुलांना नक्कीच पाठवले असते.

पापी पेट बरेच काही करायला भाग पाडते, पण त्या पोटात पापाचा पैसा जात नाही ना, इतकेच आपल्या हातात नक्की असते.

एक मात्र नमूद करावेसे वाटते,

ह्या निमित्ताने आपल्याशी दिलखुलास चर्चा करता आली.नाहीतर तसे तुम्ही चानस देतच नाही.

आज मला किंवा माझ्या मुलांना खायची भ्रांत नाही, म्हणून मी असे लिहू शकतो, पण उद्या जर त्या मुलांच्या पालकांच्या जागी मी असतो तर, मी पण माझ्या मुलांना नक्कीच पाठवले असते.पापी पेट बरेच काही करायला भाग पाडते, पण त्या पोटात पापाचा पैसा जात नाही ना, इतकेच आपल्या हातात नक्की असते.

पालकांच्या बाजूने विचार केला तर त्यांचे बरोबरच आहे.पण या संस्थेला खरोखरच चार मुलांना मद्त करायची असेल तर त्यांना "श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ" असे म्हणायला लावण्यापेक्षा एखाद्याचे खरोखरच चांगले करायचे असेल तर इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही.

ह्या निमित्ताने आपल्याशी दिलखुलास चर्चा करता आली.नाहीतर तसे तुम्ही चानस देतच नाही.

:)

मुक्त विहारि's picture

25 Jan 2015 - 12:12 am | मुक्त विहारि

तिथे पण एक जण एकतारी वर हा जप म्हणत असतो.

त्यामुळे तीच प्रथा डेरवणला पण असावी.

"एखाद्याचे खरोखरच चांगले करायचे असेल तर इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही."

सहमत.

अर्धवटराव's picture

28 Jan 2015 - 3:30 am | अर्धवटराव

इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही.

संस्था स्थापकांच्या मते स्वामी समर्थ नामस्मरण हा अत्यंत खात्रीचा आणि आवश्यक उपाय असावा.

साडीपेक्षाही संपूर्ण अंग झाकणारा प्रकार म्हणजे पंजाबी कपडे किंवा जीन्स व शर्ट/कुर्ती.

पैसा's picture

24 Jan 2015 - 1:59 pm | पैसा

केरळात पद्मनाभस्वामीच्या देवळात गेलो तेव्हा माझा मुलगा तीन वर्षांचा होता. त्याला पण लुंगी नेसायला लावली होती.

रेवती's picture

26 Jan 2015 - 4:52 pm | रेवती

लहान मुलांना तरी यातून वगळायला हवे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2015 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा

@लहान मुलांना तरी यातून वगळायला हवे. >> ह्हं...!!! कसले वगळणार हे धर्म-शास्त्र वाले!? अहो..ज्या देवळामठांमधे लोकर/मोजे चालत नाहीत..तिथे कडाक्याच्या थंडित तान्ह्या मुलांचेही काढायला लावतात.. हे डोळ्यांनी पाहिले आहे. आता या मुद्द्यावर (कुणिही...) सोवळं म्हणजे स्वच्छता! हे वादात केलं जाणारं (अत्यंत खोटारडं) समर्थन-लाऊन पहा..! सगळा अंधळा-समजुत-दार पणा एका फटक्यात उघडा पडेल! :)

पैसा's picture

26 Jan 2015 - 9:47 pm | पैसा

लोकर आणि रेशीम दोन्ही प्राणिज. मग रेशीम चालतं आणि लोकर नाही असं का? (आता रेशीम एखादेवेळी नैसर्गिक मिळेल, पण लोकर बहुधा सिंथेटिक असते.)

दुसरी गोष्ट, धूतवस्त्र चालतं ना सोवळं म्हणून? खरं तर तेच बरं. वर्षानुवर्षं न धुतलेलं सोवळं, त्यात कसरी, झुरळं भरलेली असतात, वास घालवायला त्यात डांबर गोळ्या घालतात, ते कसलं आलंय पवित्र कर्माचं?

स्वामी संकेतानंद's picture

27 Jan 2015 - 9:27 am | स्वामी संकेतानंद

रेशीम तयार करताना रेशमाचे ककून त्याच्या आता रेशीमकीडा जिवंत असतानाच उकळत्या पाण्यात टाकायचे असतात, म्हणजे सलग धागा मिळतो. थोडक्यात रेशमी वस्त्रे घालणे म्हणजे हजारो रेशीमकीड्यांना हालहाल करून मारणे. देवाच्या दॄष्टीने हे पवित्र कार्य आहे बरे.

आणि असे पवित्र कार्य करणारे लोक एरवी णॉणव्हेज खाणार्‍यांकडे कुणी पतित असावेत असे पाहतात. त्यांना विचारायला पायजे, त्या किड्यांच्या जागी तुम्हांला उकळून ठार मारले तर चालेल का? अल्गद देवाघरी जाल. जन्ममृत्यूच्या फेर्‍यातली एक स्टेप तरी जरा शॉर्ट होईल.

याच दांभिकपणाच्या मुद्द्यांवर सहमत.

संदीप डांगे's picture

27 Jan 2015 - 11:47 pm | संदीप डांगे

प्रचंड सहमत

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2015 - 2:42 pm | श्रीगुरुजी

६-७ वर्षांपूर्वी डेरवणला गेलो होतो. तुम्ही म्हणता ती समाधी दिसली नाही. बहुतेक ती शिवसृष्टीला लागून असलेल्या शेजारच्या परीसरात असावी. ते दार बंद होते. त्यामुळे तिथे जाता आले नाही.

शिवसृष्टी बर्‍यापैकी बोअरिंग होती. सर्वत्र मावळ्यांचे रंगीबेरंगी पुतळे, मूर्ती आणि त्यांचे एकसारखे रंग व तोंडवळे. त्यामुळे बघून २-३ मिनिटातच कंटाळा आला. एकंदरीत गेलो नसतो तरी काही बिघडलं नसतं.

विटेकर's picture

28 Jan 2015 - 2:41 pm | विटेकर

क्लिन्टन साहेबांनी लिहिले आहे म्हणजे खरेच असणार ! पण समर्थ संप्रदायात डेरवण च्या कामाचे कौतुक होत असते.
या दासनवमीला ( १३ फेब्रु ला) तिथले आमंत्रण आहे ... तेव्हा ऑखो-देखा-हाल बघायला मिळेलच !
मला तिथल्या मुलांशी बोलण्यात जास्त विन्त्रेस्ट आहे.

मला तिथल्या मुलांशी बोलण्यात जास्त विन्त्रेस्ट आहे.

आणि तुमचे अनुभव वाचण्यात मला :) ही मुले त्या महाराजांच्या समाधीच्या तिथे आहेत.यावेळी मी समाधीच्या तिथे गेलो नाही (कारण ते हिलरीला तिथे जाऊ देत नव्हते) तर असा एक मुलगा मी शाळेत असताना सहल गेली होती त्यावेळी बघितला होता आणि समाधीच्या तिथले अनुभव पूर्वीचे आहेत.मधल्या काळात काही फरक झाले असल्यास कल्पना नाही.बहुदा अशा प्रथा एकदा चालू झाल्या की बंद केल्या जात नाहीत त्यामुळे फार अपेक्षा नाही पण तरीही लहान मुलांना असे जप म्हणायला लावणारी प्रथा त्यांनी बंद केली असेल तर अती उत्तम.

बोका-ए-आझम's picture

24 Jan 2015 - 3:11 am | बोका-ए-आझम

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि इथली महालक्ष्मी, सिद्धीविनायक, लालबागचा राजा वगैरे देवस्थानं हे सिद्ध करतात. लोक बोरिवली-दहिसरवरुन सोमवारी रात्री चालत येतात मंगळवारच्या सिद्धीविनायक दर्शनाला. अंगारिका असेल तर विचारायची सोयच नाही. लालबागच्या राजाला गणेशोत्सवात आणि महालक्ष्मीला नवरात्रात तोबा गर्दी असते. धर्म हा खरा Recession -proof व्यवसाय!

काय हवे ते डायरेक्ट गणपतीला सांगा की, उगाच मध्ये त्या उंदराची लुडबूड कशाला?

खटपट्या's picture

24 Jan 2015 - 3:23 am | खटपट्या

धर्म हा खरा Recession -proof व्यवसाय!

उलट Recession आल्यावर हा धंदा फोफावतो :)

मित्रहो's picture

25 Jan 2015 - 1:46 am | मित्रहो

श्रद्धेचा बाजार झालाय, मंदीरात भटजी लुटतात वगेरे खरे आहे. पण हा एक बाजार आहे म्हणूनच याला स्वीकारले तर काय वाइट आहे. हा एक फार मोठा उद्योग आहे. कुणी जरी कधी Business of Faith याचा अभ्यास केला तर नक्कीच डोळे दिपवून टाकणारे आकडे समोर येतील. लाखो लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. पुजारी, भटजी, फुलवाला, प्रसादवाला, हॉटेलवाला, खेळणी विकनारा, ऑटोवाला असे कितीतरी रोजगार आहेत आणि तेही Unskilled. दुसऱ्या कुठल्याही उद्योगात इतक्या मोठ्या प्रमाणात किमान कौशल्याचा रोजगार निर्माण होत नाही. कॅशचा व्यवहार हा प्रकार सोडला तर कुठेही काहीही बेकायदेशीर नाही. कुणीही तुम्हाला गनपॉइंटवर देवळात या किंवा अभिषेक करा असे म्हणत नाही. बाजार म्हटल कि फक्त आणि फकत Transaction असत तेंव्हा हे सार स्वीकारणे सोप जात.

दुसरा मुद्दा असा की काही देवस्थान फार दुर्गम भागात आहेत आणि देवस्थान नसती तिथे फारस काही नसत. कोण कशाला रामेश्वरमला जात होत. फारच झाल तर सरकारने तिथपर्यंत जायला पूल केला असता. तेही शक्यता कमीच. पण समुद्रावरुन रेल्वे पूल कधीच नाही. जास्तीत जास्त कुण्या मोठ्या माणसाने त्या कवरत्ती सारखे पंचतारांकित हॉटेल बांधले असते आणि काही मोजकी माणसे तिथे गेली असती. कदाचित सौंदर्य टिकले असते पण तेही थोड्या लोकांसाठीच.

हुप्प्या's picture

26 Jan 2015 - 4:06 am | हुप्प्या

ज्या प्रमाणात, ज्या दर्जाचे कष्ट केले जातात त्या प्रमाणात फळ मिळावे हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने हिताचे असते.
देवाला अभिषेक करण्याचे ५०० रुपये दिले ह्या व्यवहारात नक्की घडले काय? कुणी तरी एका भांड्यात पाणी घेतले, ते एका आकार दिलेल्या दगडावर ओतले आणि ओतताना काहीबाही मंत्र म्हटले. ते पाणी यथावकाश गटारात वाहून गेले. ह्यातील कुठल्या कामाला ५०० रुपयाला न्याय देईल इतके कष्ट लागले असतील का? मला वाटत नाही. अशा प्रकारे अवाच्यासवा खर्च म्हणजे ज्याने ते खर्चलेले आहेत त्याची लूट आणि ज्याने मिळवले आहे त्याची आयती कमाई. हीच गोष्ट नारळ, हार, तुरे, पूजेची सामग्री, प्रसाद वगैरेबद्दल. काही अपवाद सोडल्यास ह्या गोष्टींचा दर्जा सुमार असतो. ह्यातल्या अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा वापरून त्यांचे मूल्य कमी केले जाते मात्र विकत घेणार्‍याला तेवढेच पैसे मोजावे लागतात.
एक म्हणजे इथे मुक्त स्पर्धा नाही. कुणी वाट्टेल तो येऊन दुकान उघडू शकत नाही, अभिषेकाचा ठेका घेऊ शकत नाही. वंशपरंपरागत पद्धतीने ही कामे वाटली जातात. संस्थान वा ट्रस्ट ठरवते की हे धंदे कुणी करायचे. तेव्हा हे भेदभावावर आधारित आहे. त्यामुळे काही मूठभर लोकांना असा हमखास स्वस्तात कमाई करून देणारा धंदा हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने चांगले नाही.
बेकायदा म्हणाल तर पूजेत एकदा वापरलेली फुले आणि नारळ पुन्हा पुन्हा वापरणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?
आपले आणि देवस्थानाचे स्थानमहात्म्य वापरून विविध सेवा व वस्तूंकरता अवाच्या सवा दर आकारणे न्याय्य आहे का? भाविकांना सोयी सुविधा न पुरवता त्यांना गृहित धरून त्यांना नाडणे, लुटणे हे योग्य आहे का? कधीतरी त्या देवस्थानाला येणारा भाविक कायदेशीर व्यवहार, तक्रार, भांडणे ह्या भानगडीत पडणार नाही हे माहित असल्यामुळे त्यांची अडवणूक करून आपले उखळ पांढरे करणे हे बेकायदा नाही का?
दुसरा विचार असा की ह्या प्रकारात किती ऊर्जा व्यर्थ दवडली जाते ते पहा. टनावारी झेंडूची फुले आणि नारळ कुठेतरी पिकत असणार. त्या शेतात ती पिके लावण्याचा खर्च, पाणी, खत, तोडणी हा खर्च, वाहतुकीचा खर्च. आणि ह्या पदार्थांचे होते काय? फुले उकिरड्यात, नारळ फोडलाच तर पाणी गटारात आणि कदाचित खोबरे प्रसाद म्हणून.
तर बहुतांश ऊर्जा ही पुन्हा कचर्‍यात जमा होते. हे चांगले आहे काय? ह्या झेडू ऐवजी अन्य खाद्य पिके लावली असती तर लोकांची अन्नाची गरज भागली असती. नारळ खाद्य म्हणून वापरले असते तर कदाचित जास्त अन्न उपलब्ध झाले असते. पण निव्वळ पूजेकरता हे प्रकार वापरणे हे व्यर्थ आहे. ऊर्जेचा अपव्यय आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2015 - 7:55 am | अत्रुप्त आत्मा

हुप्प्या,

तुम्ही अतिशय सूचक मुद्दे मांडलेले आहेत. मला कधीतरी या सर्व्हिसच्या विषयावर लिहायला याचा उपयोग होणार आहे. :)

मित्रहो's picture

27 Jan 2015 - 3:24 am | मित्रहो

माझ्या अनुभवानुसार तरी वस्तूची किंमत Mat Cost+Labor Cost+S&G+Profit अशा साध्या गणितावर नसते. एक साधी पाण्याची बॉटल बाहेर १५ ला मिळते, स्टेशनवर कधी कधी १५ ला तर कधी २० ला. ट्रेनच्या आत हमखास २० आणि पंचतारांकित हॉटेलात १६९ रुपयाला मिळते. साऱ्याच गोष्टीत लक्झरी टॅक्स नसतो. आधी IRCTC चे टिकट घेतले तर एसी टिकीटाचे ६० आणि स्लीपरचे ४० असा घरी पाठवायचा दर होता. आजही असाच काहीसा नियम आहे. कोणी बंगलोर, हैद्राबाद किंवा चैन्नेइ या सारख्या शहरात मराठी भटजी शोधून त्याला सत्यनारायणाला बोलावले तर तो कसा २५१ रुपयात येइल. थोडा विचार केला तर इतर मुद्दे बाकी उद्योगांना काही ना काही प्रमाणात लागू होतातच.

असो. आपण वाद घातल्याने काही हा प्रश्न सुटनार नाही. Let's agree to disagree.

विटेकर's picture

28 Jan 2015 - 2:49 pm | विटेकर

राजकारण्यांपासून ते शिक्षकांपर्यन्त प्रत्येकाने भ्रष्टाचार करायचा आणि भटजी नी काय घोडे मारले आहे ? त्यांना पोट-पाणी नाही का ?