पिल्लु ला शाळेत अॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय.
१) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे.
फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी.
तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त.
अॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त.
२) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही.
फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा.
तोटे - टुशन मिळत नाहीत, फी जास्त, पुर्ण हिंदी व ईंग्रजी अभ्यासक्रम मराठी विषय नाही, ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात(एकीव माहीती).
३) आय. सी. एस. ई. - दिल्ली बेस्ड नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था, पण ईंटर्नॅशनल रेक्ग्नेशन्. शिकवायची पद्धत वेगळी. माहीतीतील जवळपास कोणी नाही.
फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, ईंग्लीश विषय(समजणे) चांगला केला जातो. फी वरील दोहोंच्या मधे.
तोटे - नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था त्यामुळे भविश्यातील नुकसान माहीत नाही.
आजकाल बरेच लोक (६० ते ८० टक्के %) सि. बी. एस. ई. कडे पळतायत, कारण माहीत नाही.
क्रुपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद ईन अॅडव्हान्स.
अवांतर : अभ्यासक्रम तपासतोय पण बरच वेळखाउ काम आहे. सि.बी. एस. ई. ला ९वी मधेच ११वीच गणीत दिसतय.
प्रतिक्रिया
14 Jan 2015 - 10:40 am | असंका
शब्दात थोडी गफलत होतीये असं वाटतंय. आपल्याला "संज्ञा" नसून "शब्द" म्हणायचे असावे. माध्यम बदलले म्हणून संज्ञा बदलली असे होत नसावे.
आणि नवनवीन शब्द आपण सगळेच नेहेमीच शिकत असतो. मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात जाणार्या मुलांना त्याची थोडी जास्त लवकर सवय करून घ्यावी लागेल एवढेच.
14 Jan 2015 - 9:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत. मला स्वतःला सुरुवातीचं आख्खं वर्ष (डिप्लोमाला असताना) बराचं त्रास झाला होता. न्युमरेटर (अंश) आणि डिनॉमिनेटर (छेद) ह्याच्यात मी किती घोळ घातलाय म्हणुन सांगु? =)) त्रिकोणमिती मधल्या संकल्पनांनी तर डोस्क्याचा भुगा केला होता.
आता समभुज त्रिकोण, स्मद्विभुज त्रिकोण, लंबगोल, दंडगोल, त्रिज्ज्या, व्यास वगैरे शब्द वापरायला पण जड जातयं.
शिवाय फक्त आमच्या शाळेतल्या मुलांचं नशिब चांगलं म्हणुन आमच्या विज्ञानाच्या बाई खुप छान शिकवायच्या. अभ्यासक्रमात शिकवणं बंधनकारक नसतानासुद्धा पुढे संकल्पनांचा उपयोग कुठे होतोय हे सांगायच्या. बाकी सगळ्या विषयांचा आनंदी-आनंद होता. ना.शा.चा त्या बाईंनी जेवढा नाश केला तेवढा आजच्या राजकारण्यांनीही नै केलेला. =))
14 Jan 2015 - 1:06 pm | यसवायजी
डिप्लोमाला पहिला महिना लै त्रास झाला मला. 'सम ऑफ दि नंबर्स' म्हणजे मला वाटायचं की या सगळ्या आकड्यातील काही आकडे घेतलेत कॅलक्युलेशनसाठी. :D
14 Jan 2015 - 1:13 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११११११११११११११११११११
21 Jan 2015 - 5:09 pm | कपिलमुनी
+११११
14 Jan 2015 - 10:34 am | असंका
पिअर प्रेशर चा मुद्दा अत्यंत योग्य आहे. माझ्या माहितीतील कुणाचीही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जात नाहीत. आणि कुठेही गेलं तरी चित्र बदलत नाहिये. त्यामुळेच आता मराठी शाळेत आपल्या मुलांना आपल्याला मिळाली तशी कंपनी मिळणार नाही, ही भावना जास्त त्रासदायक होतीये...
बाकी प्रतिसाद विस्कळीत वाटला नाही....आश्वासक वाटला. धन्यवाद.
14 Jan 2015 - 5:30 pm | गणेशा
सर्व प्रतिसाद वाचले, चांगली माहिती मिळाली, पहिली साठी बहिनीच्या बाळासाठी शाळा फिरतोय पण बर्याच गोष्टींचा अडथळा येतोय.
फि चे तर सांगु नका .. मला एक कळत नाहिये बरेच जण आपला पाल्य कुठल्या चांगल्या शाळेत जातोय ते म्हणतायेत, पण त्यांनी शाळेचे नाव का सांगितले नाहिये, निदान ज्यांना पुढे अॅडमिशन घ्यावयाची आहे त्यांना त्याचा फायदा नक्की झाला असता.
----
आता मुळ मुद्दा ..
माझ्या मते, ज्या शाळेत स्पोर्ट ला महत्व दिले जाते त्या शाळेत मला माझ्या मुलीला घालायचे आहे. अभ्यासक्रमामुळे जर जास्त तोटे होत असते तर आज एस.एस.सी बोर्ड वाले येथे टाईप करत बसले असते का ?
एस.एस.बोर्ड वर सोप्पा म्हणुन खुप धब्बा मारला आहे, मला एक कळत नाही कशाला हवाय अवघड अभ्यास ?
सोप्पा अभ्यास करुन बाजुने चित्रकला/संगित/खेळ/आणि इतर गोष्टी शिकण्यासाठी जास्त वेळ देता येत असेन तर ?
सी.बी.एस.सी वाईट आहे म्हणत नाही, पण फी परवडते आहे काय ? कमीत कमी ५० हजार. आणि जर येथेच व्यक्तीमत्व घडन होत असेल तर साध्या गरीब लोकांचीमुले व्यक्तीमत्वाविनाच जगणार आहेत काय ?
दूसरी गोष्ट ..
स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम वगैरे काही नसते.. मग तसे असेन तर लॉजिक जास्त प्रगत होते ते मातृभाषेतील शिक्षणामुळे, मग आपोआप सगळ्या गोष्टी येतात.
तरीही एस.एस.सी बोर्ड आणि ईग्लिश मेडीयम पण चांगळे हवे असेन तर कॉन्व्हेंट शाळा चांगल्या असतात असे वाटते.
नुकतेच पिंपरीचिंचवड येथील मार एव्हान्युअस आणि निर्मल बेथनी शाळेला भेट दिली शाळा आवडल्या फी १०,००० च्या आत ( १० वी ला पण ), पण नर्सरी पासुन अॅडमिशन घ्यावे लागते येथे.
---
मला तरी मराठी मेडियम शाळाअ आवडते, पण आमच्या घरच्या सगळ्यांचा आग्रह इंग्लिश मेडियम आहे, तसे असेन तर वरील कॉन्व्हेंट मला योग्य वाटते.. चित्रकला/फोटोग्राफी/संगित/खेळ यापैकी मनाला तजेला देणार्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत असे मला वाटते. शिक्षण कुठले ही वाईट नसते.. पद्धत वेगळॅए असली तरी आपण कधी ना कधी शिखरावर पोहचतोच असे वाटते.
---
मितान तुझ्या मुलीची शाळा कोणती आहे ग ?
16 Jan 2015 - 9:22 am | पिलीयन रायडर
सोपा अभ्यासक्रम की अवघड असं नाही हो..
शिकणे आणि शिकवण्याची पद्धत.. आपण फार "घोका आणि ओका" कॅटेगरीमध्ये येतो.. कारण परीक्षापद्धतच तशी आहे.. शिवाय "अॅप्लिकेशन" जमत नाही ते वेगळंच.. बाकी CBSE मध्येही इतर विषयांना प्राधान्य दिलं जात असणारे..
कालच ऑफिसमध्ये ही चर्चा झाली.. तर आमच्यातला सगळ्यात पॅशनेटली काम करणारा, विषयाला समजुन विचार करणारा, कन्सेप्ट क्लिअर असणारा मनुष्य चक्क ICSE चा निघाला. महाराष्ट्रात कदाचित अजुन ते एवढं प्रसिद्ध नाहीये पण उत्तरेकडे लोक अनेक वर्षांपासुन शिकत आहेत..
कुणाला ICSE बद्दल माहिती असेल तर सांगा...
16 Jan 2015 - 1:27 pm | गणेशा
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला माझा मुद्दा निट मांडता आला नाही. मला सीबीएससी/बोर्ड/आयसीएससी/मराठी-इंग्रजी/ या पेक्षा थोडे सोप्पे मुद्दे सांगायचे होते या संधर्भातुन.
म्हणजे बघा .
१. मराठी (एकमेव बोर्ड एस.एस.सी) ही मातृभाषा असल्याने मराठीतुन शिकताना आपण ती भाषा सहज आत्मसात करुन आपले लॉजिक चांगले डेवलप करु शकु , शिवाय लहान वयात .. नमन कमळ बघ .. अश्या सारखे साधे साध्ये वाक्य मुले वाचु शकतील. आणि जास्त वेळ पाठंतरा पेक्षा संकल्पना, आणि वेगळ्या गोष्टी वर पण देता येतील .
इंग्रजीच्या विरोधात नाही, पण इंग्रजी लहान मुलांना शिकवताना त्याचे शब्द पाठच करावे लागतात, म्हणजे मराठीत बाराखडी आली की बेसिक वाचन जमते. म्हणजे जा म्हणायचे असल्यास ज ला काना जा. आणि काना मात्रा विरहित शब्द तर लगेच वाचता येतात.
इंग्रजीत केजीच्या मुलांना जा ला गो म्हणतात आणो ABCD मधील g आणि o मिळुन गो होतो हे जीओ पाठच करावे लागते.
२. मुळात आपले शिक्षण पाठंतर घोका आणि ओका अश्या स्वरुपातील आहे असे जे आपण म्हणता ते बरोबर आहे... या ही पलिकडे जावुन मी म्हण्तो, आपण आपल्या पाल्याला सतत कुठल्या ना कुठल्या रेस ला जोडुन देतो, हे मला चुक वाटते.
नर्सरी पासुन घाल cbsc/icse ला. अभ्यासक्रमात कीती विषय , त्यांचा अवघडपणा आपण बघत नाही, मुले हुषार आहेत ते करतील हो ते, शिकवले ही जाईल चांगले पण त्यांना अभ्यास सोडुन वेळ हवा की नको.
cbse मध्ये येव्हडे मार्क पाड , नंतर या परिक्षा दे.. नंतर हे कर आणि ते.
समजा असे बघा. icse ला १३ विषय आहेत.
वर्षात २ महिन्याची सुट्टी पकडली, तर ११ महिने शिल्लक राहतात, म्हणजे १ महिन्याला १ पुस्तका पेक्षा जास्त अभ्यास त्या मुला ला करावयचा आहे, हे मला तरी अति वाटते, भले ते किती ही उच्च शिक्षण आणि पद्धत देवुद्या.
फक्त अभ्यासातुन व्यक्तीमत्व घडते ही आपली विचारसरणी चुकीची आहे. अभ्यासात पारंगत होण्यासाठी मग क्लास आले. शाळा आण क्लास यांनी थकुन गेलेले आपले बाळ बघुन पुन्हा आपण त्याला टीव्ही वर कार्टुन लावुन देणार .. जाउद्या थोडा विरंगुळा म्हणुन,
फिझिकल अॅक्टीवीटी चे काय ? शाळेत १ तास त्याला दिलेला असल्याने सगळी जबाबदारी संपत नसते, उलट पुढील अनेक समश्या उभ्या राहतात.
३. समजा मी माझ्या बाळाला जवळचय स्टेट बोर्ड च्या शाळेत घातले, आणि त्याला क्लास ला न घालता, त्या वेळात इतर खेळ आणि गोष्टीत वेळ घालावला, तर ते मला जास्त योग्य वाटते. मला १० वी पर्यंत कीती मार्क आहेत, मी पहिला आलो होतो का मध्यम होतो हे आता कोणॅए विचारात नाही, ६० टक्के १० वी ला आणि ९० टक्के मिळालेला पुढे इंजिनिअरींग नंतर त्या बेस वर पुढे जातो. मान्य त्याची तयारी १० वी पर्यंत होत असेन तर असे म्हणने असते. पण त्याची खरेच गरज नाही असे माझे मत. रेस ला लावण्यापेक्षा व्यक्तीमत्व विकास महत्वाचा, मुले आपोआप मार्ग निवडतात.
आणि icse कीती ही चआंगले असुद्या हो १ लाखात नर्सरी ला आणि केजी ला ते असे काय शिकवतात ?
४. फी, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे (माझ्यासाठी तरी) , मला एक कळत नाही, cbse/icse शाळा शहरात जास्त आहेत, मग गावाकडची मुले पुढे येणारच नाहीत का ? तर तसे नाही, आपण म्हणतो तसे शिकवण्याची पद्धत वर अवलंबुन आहे, आणि जर असे असेन तर सीबीएससी/बोर्ड/आयसीएससी/मराठी-इंग्रजी हे मुद्दे गौण ठरतात. आणि जर तसे नसेन तर माझ्या सारखे गावाकडे शिकलेली मुले पुढे या लोकांचय स्पर्धेत मागेच राहणार असेच मानुन चालावे लागणार.
१ लाख फी ... ट्युशन्ची फी २५ हजार तरी असेन आणि बसेस आणि इतर खर्च २५ हजार. वर्षाला येव्हडा खर्च अनावश्यक वाटतो मला.
५. जर आपण एखादा हुशार माणुस icse\cbse आहे असे माणुन तो अभ्यासक्रम चांगला माणणार असु तर मग स्टेट बोर्ड मधले पण पण हुषार असतीलच. वयक्तीक उदा. देतो. मी आणि माझी बेस्ट फ्रेंड (दोघे ही मराठी कुटुंबातुन) बिसीएस ला एकत्र अभ्यास करायचो. ती cbse पुणे शरातुन आणि मी एसएससी मराठी गावातुन, दोघे ही टॉपर कॉलेजचे. पण गणित..प्रोग्रॅमिंग आणि एलेक्ट्रोनिक्स मी तीला शिकवायचो आणि थेरॉटीकल विषय ती मला कारण ती जरी हुशार होती ८० % पेक्षा जास्त मार्क होते तरी लॉजिकल विषय ती ला अवघड जायचे मग आपण असे म्हणु शकु का की cbse बोर्ड मध्ये लॉजिक डेवलप करत नाही.
तर तसे नाहीये.. प्रत्येक माणसाच्या कुवती वेगळ्या आहेत, २-२ वर्षे कॉलेज ला फेल होणारे , प्रोग्रम्स पण पाठ करणारे आणि लॉजिक शुन्य असणारे पण आज युएस युके मध्ये मोठ्या पगारावर कामाला आहे. का ? कदाचीत स्ट्रगल करण्याची व्रुती असेल त्यांच्यात जास्त जी हुशार मुलात नैराष्य येण्यास कारणीभुत ठरणारी कारणे असतात तशी.
बरेच वेगवेगळे उदआ. आहेत.
६. त्यामुळॅ कुठली पद्धत कशी.. कश्यात कुठल्या रेस मध्ये जाता येते .. काय केले तर पुढचे भविष्य बनते हे सगळे आपले विचार असतात, मुलांना संतुलित आयुष्य मिळाले पाहिजे..
अभ्यासा बरोबरच त्यांचे कलागुन .. त्यांचे छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे.. आलेल्या अपयशातुन ही पुढे जाण्याची जिद्द त्यांच्यात निर्मान झाली पाहिजे... खेळामुळे त्यांच्ये फिटनेस कडे ही लक्ष राहिले पाहिजे.
अभ्यासक्रम मुळे पुढच्या येत्तेत मुलांना पाठवत असेन, पण त्यांच्या कक्षा रुंदवण्याचे कार्य हे संपुर्ण भवताल करत असते.. त्या सर्व गोष्टी>साठी वेळ देता आला पाहिजे.
मग सीबीएससी/बोर्ड/आयसीएससी/मराठी-इंग्रजी काही ही असो .. ज्याला पुढे जाता येइल तो जाईनच..
पण शारीरीक्/माणसिक दडपण घेवुन अभ्यासात उत्तुंग राहण्यात पण काही अर्थ नाही, आणि फक्त शारीरीक माणसिक कनखर पण अभ्यासा..ज्ञान याकडे दुर्लक्ष पण योग्य नाही.
खुप मोठा आणि विस्कळीत प्रतिसाद असु शकतो.. पुन्हा वर बघुन वाचला पण नाही .. क्षमस्व
19 Jan 2015 - 2:33 pm | पिलीयन रायडर
१. मुद्दा पटला नाही. मातृभाषेत संकल्पना चांगल्या कळातात हे मान्य. पण जर सवयच इंग्रजीमधुन शिकायची केली तर ते ही फार अवघड नाही. जसं की मी सेमी इंग्लिशमुळे ८ वी पासुन गणित/ विज्ञान इंग्रजी मधुन शिकले. आता मला कुणी ते मराठीत सांग म्हणालं तर मला सांगता येणार नाही.. मला मराठीतले शब्द वापरताही येणार नाहीत. मुलांना भाषा शिकताना मराठी काय किंवा हिंदी / इंग्रजी काय, सगळंच नवीन.. ह्यात मराठीतला हलकासाच अॅडव्हान्टेज मिळेल कारण माझ्या मुलाला ती त्यातल्या त्यात जास्त येते. पण त्याला हिंदीसुद्धा बरीच चांगली येते. आणि आता शाळेत ऐकुन ऐकुन थोडिशीच का होईना पण इंग्रजी वाक्यांचीसुद्धा सवय होतेय.
अजुन एक मुद्दा असा की ३री नंतर ICSE मध्ये ३री भाषा म्हणून तुम्ही मराठी / संस्कृत / फ्रेंच घेऊ शकता. मी फ्रेंच घेईन. कारण माझं मराठी उत्तम आहे, ३री भाषा म्ह्णुन शिकवल्या जाईल त्यापेक्षा माझ्या मुलाला घरी मी जास्त छान शिकवीन. आजपासुनच.. माझी आई M.A संस्कृत आहे. ती अर्थातच सर्वोत्तम शिक्षक असेल तिच्या नातवासाठी.. मग शाळेनी त्याला फ्रेंच शिकवु देत ना.. जे आपण घरी जास्त चांगल्या पद्धतीनी करुन घेउ शकतो ते आपणच करुन घ्यावं असं माझं मत आहे..
२. इथे तुमचा गैरसमज होतोय. एक तर CBSE / ICSE म्हणजे रेस नाही. ती शिकवण्ञाची जास्त चांगली पद्धत आहे. इथे मुलांना १०-१२ वेगवेगळे विषय नसतात. ते SSC प्रमाणेच असतात. पुस्तकं दोन असतात (Grammer I and II). फरक हा आहे की आपण एक पुस्तक, त्यातले धडॅ, त्या खालचे प्रश्न आणि त्यातुनच पडणारा पेपर असे शिकलो. इथे मात्र असा मामला नाही. तुम्हाला विषय कळला असेल तर तुम्ही पेपर सोडवु शकाल अशी पद्धत. प्रोजेक्टसमधुन शिकणे, एखादी कादंबरी अभ्यासक्रमात असणे, त्यावर वाचुन, समजुन २० मार्कांसाठी लिहु शकणे (जसे की माझ्या मित्राला "चाणक्यनीती" होती. आणि चाणक्याचे पात्र ह्यावर लिहायचे होते..) ही त्यांची शिकण्याची पद्धत आहे. जी मला जास्त योग्य वाटते. आजवर मी मराठी मध्ये सुद्धा कांदबरी वाचुन त्यावर प्रश्नोत्तरे लिहीली नव्हती.. (तुम्ही ही लिंक पहा.. http://www.cisce.org/icse_X_Syllabus.aspx)
त्यांना खेळायलाही खुप वेळ दिला जातो. दर वर्षी एक खेळ शिकणे आवश्यक असते. शाळांमध्ये तशा सोयी आहेत.
३. मुळात क्लासला घालायची गरजच नाही.. जर शाळा आणि पालकांचा सहभाग असेल तर आणखीन क्लास कशाला लागतो?
आणि % किंवा नोकरी ह्यावर मुलाला जोखायचे कशाला? त्याला जे तो शिकतोय ते समजलं की झालं.. मार्क्स आपोआप येतील, यश आपोआप मिळेल.. SSC मध्ये हे समजलं की नाही हे कळतच नाही.. आम्ही नाही का घोकुन घोकुन शेवटी पास झालोच.. कुठेरई नोकरीला लागलोच.. कसे तरी निभावतोय.. पण जे करतोय ते सगळं कळतय असं अजिबात नाही..
४. इंग्रजी माध्यमांच्या SSC शाळांची फीस सध्या ३० हजार + आहे. मी जे ISCE शाळा बघत आहे तिची सुद्धा फीस ३० हजारच आहे.. १लाख फिला माझाही विरोध आहे. विनाअनुदानित शाळांना ३०-४० हजार फीस आकारावी लागत असावीच असा माझा कयास आहे. (जागा, शिक्षक इ खर्च धरुन..)
५. मान्य.. शेवटी अभ्यासक्रम ही काय एकमेव गोष्ट नाहीचे.. प्रत्येकाची कुवत, आवड-निवड, परिस्थ्ती इ अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत.
६. अगदी अगदी.. सगळंच महत्वाचं आहे.. सद्यपरिस्थिती मध्ये मला ICSE योग्य वाटतय.. परवडत आहे.. आनी पालक म्हणुन मी माझ्या मुलाला मदत करु शकेन असं वाटतय.. ह्या उप्पर मार्कांपेक्षा माझा मुलगा विवेकी असावा हे महत्वाचे.. शेवटी शाळा म्हणजे उत्तम माणसे बनवण्याचे कारखाने नव्हेत. माणुस हा घरामधल्या संस्काराने जास्त घडतो..
19 Jan 2015 - 3:41 pm | सस्नेह
म्राठी मातृभाषा म्हणून सोपी जाईल हे अगदी खरं. पण बारावीनंतर मराठीतून शिक्षण देणारी किती महाविद्यालये आहेत आणि ती व्यवसाय मिळवून देण्यास उपयुक्त आहेत का ?
ICSE साधारण CBSE ला समांतर आहे. बिंधास घे अॅडमिशन .
19 Jan 2015 - 3:54 pm | पिलीयन रायडर
हो हे ही खरंय..
अजुन एक सांगते..
माझा नवरा.. "मला मार्कांशी मतलब नाही.." वाला आहे..
पण माझं थोडं वेगळं मत आहे.. धरुन चालु की आपला मुलगा हा सामान्य मुलांमध्ये येतो. (Highest Possibility). म्हणजे तो फार हुषारही नाही आणि फार ढ सुद्धा नाही.
आता सामान्य मुलं सामान्यतः नोकरी करतात (Again Highest Possibility). म्हणजे माझ्याही मुलाला उद्या पदवी मध्ये चांगले मार्क्स पाडुन चांगल्या ठिकाणी नोकरी करावी लागेल. (चांगले मार्क्स - चांगले कॉलेज - चांगली प्लेसमेंट - चांगली नोकरी) म्हणजेच मार्कांना अगदीच कमी लेखुन चालणार नाही. त्याला खुप समजलं असलं पण परीक्षेत लिहुन मार्क पडत नसतील तर त्याला परीक्षा देण्याची पद्धत सुद्धा शिकावीच लागेल. ते ही स्किलच आहे.
म्हणजेच आज मला असा अभ्यासक्रम निवडावा लागेल जो ह्या वरच्या सर्व मुद्यांना सगळ्यात चांगला सपोर्ट करेल.
हा फार सरधोपट विचार आहे. पुढे माझ्या मुलाची प्रगती पाहुन मला अंदाज येईलच की त्याचा कल काय, आवड कसली, बुद्धी किती वगैरे.. पण आज मला Highest Possibilities धरुनच विचार करावा लागेल.
Worst Case सुद्धा विचारात घ्यावी लागेल की जर तो प्रचंड ढ निघाला तर काय. सध्या तसं वाटत नाही. तसं झालं तर उपायही वेगळे असतील..
19 Jan 2015 - 4:42 pm | गणेशा
आपले मुद्दे बरोबर आणि मुद्देसुद आहेत. माझे आणि आपले विचार वेगळे असले आणि मी icse बोर्ड कधीही प्रेफर करणार नसलो तरी तुमचे मुद्दे पटले.
विशेषकरुन .. फ्रेंच लँग्वेज, नो क्लास आणि शेवटचा मुद्दा ही.
तुम्हाला सद्यपरिस्थिती मध्ये ICSE योग्य वाटतय.. परवडत आहे.. आनी पालक म्हणुन तुम्ही मुलाला मदत करु शकेन असं वाटतय तर तेच हवे असते मुलांना. आणि हे सर्वार्थाने योग्य वाटते.
मला माझ्या जवळपासच्या icse शाळांच्या फी कमीत कमी ७०-८० हजार आहे हे माहीती आहे. बालेवाडीतील एखादी शाळा ३०-४० हजार फी वाली मला माहीती आहे.
मला मात्र तरीही मराठी - आणि कॉन्व्हेंट ssc कडेच माझा ओढा वाटतो आहे.
तुम्ही खाली जे मार्कच लिहिलेले आहे, जसे तुमच्या मिस्टरांचे म्हणणे आहे तसेच माझे ही आहे, हा अगदी कमी नाही पण बरे असले तरी बस्स.. फक्त कला/खेळ पाहिजेच असे माझे मत. आणि कमी फी मध्ये शिस्तप्रिय आणि वेळ मिळु शकणारी शाळा म्हणुन मी खालील ३ शाळा निवडलयात पण अजुन कमित कमी १ १/२ वर्षे टाईम आहे पण मला बाळाला शाळेत घालायला.
शाळा.
१. मार इव्हान्युअस, पिंपळे गुरव
२. ज्ञान प्रबोधीनी(मराठी), निगडी प्राधिकरण ( लांब आहे पण ही शाळा बघु)
३. निर्मल बेथनी, काळेवाडी.
19 Jan 2015 - 5:31 pm | पिलीयन रायडर
तिन्ही शाळा फार वेगवेगळ्या लोकेशनला आहेत.. जवळची शाळा चांगली..
ज्ञानप्रबोधिनी तर उत्तमच..
19 Jan 2015 - 7:49 pm | पिलीयन रायडर
एक सांगायचं राहिलं..
मलाही खेळ फार महत्वाचा वाटतो.. त्यामुळे शाळेला खेळाची परंपरा आहे का हे ही मी बघते..
तुम्ही एकदा मी वर दिलेली लिंक पहा.. आणि त्याहुनही हे पहा - http://www.cisce.org/pdf/ICSE-Class-X-Syllabus-Year-2014/1.Syllabus%20Re...
ह्यात तुम्हाला विषय कोण कोणते आहेत हे कळेल.. आणि ते निवडायचे कसे असतात वगैरे हे ही.. सहज माहिती म्ह्णुन देते.. सगळ्यांनाच उपयोगी आहे
20 Jan 2015 - 6:16 pm | असंका
ज्ञानप्रबोधिनीवाले चिंचवडच्या पुढे रहात असाल तर अॅडमिशन देतील का? आम्हाला घर बदलावे लागले होते.
20 Jan 2015 - 8:18 pm | मितान
नाही मिळणार...
20 Jan 2015 - 10:55 pm | श्रीगुरुजी
तुम्हाला निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीत मुलाला घालायची इच्छा आहे का पुण्यातील टिळक रस्त्यावरील ज्ञानप्रबोधिनीत? पुण्यातील या शाळेत माझी मुलगी आहे. त्यामुळे या शाळेचे सर्व फायदे-तोटे व धोरणे मला माहिती आहेत.
21 Jan 2015 - 2:22 pm | ऋषिकेश
मी बहुदा माझ्या मुलीला पहिली ५-७ वर्षे "होम लर्निंग स्कुल" असलेला एक पर्याय निवडणार आहे
-- मातृभाषेतून शिक्षण
-- शासकीय मान्यता नाही त्याचबरोबर ठराविक फिक्स्ड अभ्यासक्रम नाही.
-- मुलांच्या कला कलाने अभ्यासक्रम ठरतो आणि घेतला जातो
-- सगळे शिक्षण स्वानुभवातून असते. इयत्ता २रीपर्यंत एकही विषय नाही की पाठ्यपुस्तक नाही
-- मातृभाषेतून शिक्षण मात्र सुरूवातीपासून ४ भाषांची ओळख (बोलणे)
तिची पहिली काही वर्षे स्वतःचे जग स्वतःच्या आवडी समजून घेत, स्वत:ला आवडेल त्या वेगात जावीत म्हणून हा पर्याय निवडत आहे. पाचवीपासून तिचा बेस प्रयोगशील शिक्षणातून पक्का झाल्याने कोणत्याही एसएससी शाळेत घालेन असे म्हणतोय.
21 Jan 2015 - 2:35 pm | पिलीयन रायडर
होम लर्निंग म्हणजे काय? पालक स्वतः शिकवणार का?
आणि ह्यात जर मुल शाळेत जाणार नसेल तर इतर मुलांमध्ये मिसळणे, मित्र-मैत्रिणी बनवणे, सहली, गॅदरींग, स्पोर्ट्स डे असं सगळंच राहुन जाईल ना.
मला व्यक्तिशः शाळा ह्याच गोष्टींसाठी महत्वाची वाटते. बाकी अभ्यासक्रम तर आपणही करुन घेऊ शकतोच. पण मुलं शाळेतल्या बाईंच वेगळ्या पद्धतीने ऐकतात, तसं आपलं ऐकत नाहीत हे एक माझं निरीक्षण...
21 Jan 2015 - 4:21 pm | ऋषिकेश
नाही शाळेत जायचं पण शाळेला शासकीय मान्यता नाही व शासकीय अभ्यासक्रम नाही.
शाळेत जाणार, मित्रमैत्रिणी असणार. सहल दर महिन्याला आहे :) गॅदरिंग आहे, मुलांनी केलेल्या वस्तु विकायची जत्रा सुद्धा आहे. स्पोर्ट्स डे नसला तरी वर्षभर चुरस निर्माण होईल अशी पॉइंट सिस्टिम आहे.
शिवाय मुलं कधी शेतात जाऊन शेती समजून घेतात तर कधी गॅरेजमधे आठवडा काढून गाड्यांची मशीन्स. कधी काही छायाचित्र्कार येऊन १०-१२ दिवस निस्ते छायाचित्रणमय वातावरण असते तर कधी संगीताच्या संगतीत कित्येक दिवस जातात. दर आठवड्याला पालक व मुले मिळून स्वयंपाक करतात
विषय, वेळापत्रक वगैरेचं बंधन प्राथमिक यत्तांना नसते. वेगळा प्रकार आहे पण शासकीय मान्यता नसल्याने रिस्कही आहेच.
पुण्यात अशी ग्राममंगल म्हणून एक कोथरूडला शाळा आहे (अजूनही २-३ आहेत). मी त्या शाळेचा विचार करतो आहे. (ऑलमोस्ट नक्की केले आहे)
21 Jan 2015 - 4:27 pm | टवाळ कार्टा
पोर खर्या शाळेत जायला वैतागेल नंतर
21 Jan 2015 - 4:39 pm | ऋषिकेश
तीला खूपच आवडलं तर १०वीपर्यंत शिकायची सोय आहे :)
काही विद्यार्थी तसे बाहेरही पडले आहेत. त्यांनाच गाठून बोलायचे आहे म्हणून निर्णय नक्की करायला थांबलो आहे :)
21 Jan 2015 - 4:29 pm | पिलीयन रायडर
अरे वा.. मला अजिबात माहिती नव्हतं ह्याच्या बद्दल.. आता तर मी हा पर्याय निवडु शकत नाही कारण मी शाळा फायनल केली आहे.. पण हा पर्याय उत्तम आहे..
21 Jan 2015 - 4:24 pm | अजया
मस्त संकल्पना.मलाही अशा शाळेत जायला आवडलं असतं.
21 Jan 2015 - 5:12 pm | कपिलमुनी
बदली झाली देशांर्तगत जसा की पुणे ते चेन्नई / बेंगळुरू / दिल्ली तर अशा प्रसंगी कोणत्या शाळा सोयीच्या ?
आणि भविष्यात २-३ वर्षासाठी सहकुटुंब परदेशी राहावे लागणार असेल तर आतापासून कोनत्या शाळेत अॅडमिशन घेतली पाहिजे ?
22 Jan 2015 - 12:05 am | मनिष
आम्हीही सध्या ह्याच स्थितीत आहोत. अर्थात, बोर्डापेक्षाही शाळा महत्वाची हे आमच्या मनात नक्की आहे. कित्येक जुन्या SSC शाळा ह्या नव्यानेच चालू झालेल्या 'XYZ International School' किंवा तत्सम शाळांपेक्षा निश्चितच सरस आहेत. त्यामुळे अशी कुठलीही CBSE/ICSE शाळा सगळ्या एस. एस. सी. शाळांपेक्षा चांगली असते हे मला अर्थातच पटत नाही. पुण्यात 'अक्षरनंदन' ही मराठी शाळा अतिशय चांगली आहे, किंवा जुन्या इंग्लिश मिडियम पैकी लॉयला, सेंट व्हिन्सेंट, सेंट मेरी, सेंट जोसेफ (पाषाण) ह्या एस. एस. सी. शाळा कित्येक नवीन CBSE/ICSE शाळांपेक्षा चांगल्या आहेत.
हे असले, तरीही पिरा यांच्या ह्या मताशी मी बहुतांशी सहमत आहे. CBSE प्उस्तकांत मॅथ्स आणि सायन्स खूप नीट आणि सविस्तरपणे समजवले जातात. कित्येक १०+२ नंतरच्या प्रवेश परिक्षा ह्या CBSE पॅटर्नवर असल्यामुळे तसेच पुर्ण भारतभर भरपूर CBSE शाळा असल्यामुळे बहुतेकांची सध्या पसंती CBSE शाळांना असते. ह्यामुळेच कित्येक SSC शाळा आता CBSE होत आहेत किंवा CBSE ची पुस्तके वापरतात. केंद्रीय विद्यालय सोडले तर बाकी CBSE शाळांमध्ये प्रमाणित NCERT ची पुस्तके नसतात, शाळा स्वतःला सोयीस्कर अशा लेखकांची/प्रकाशनांची पुस्तके घ्यायला सांगतत. CBSE/ICSE शाळांमध्ये SSC सारखी एकच बालभारतीची पुस्तके नसतात. मी स्वतः SSC मधून ११ वीत गेलो तेंव्हा मला हे पहिल्यांदाच कळले होते, आणि मग जेंव्हा CBSE ची पुस्तके पाहिली तेंव्हा आपली SSC ची पुस्तके किती तोकडी होती हे जाणवले. आता SSC किंवा CBSE चा अभ्यासक्रम (syllabus) जवळपास सारखाच आहे, पण coverage आणि पुस्तकात तो कसा समजावून दिला आहे त्यात खूप फरक आहे. आता SSC ची पुस्तके खूप सुधारली असली तरीही CBSE सरस आहेत.
पण....पुण्यात आजही मराठी निदान वैकल्पिक म्हणून शिकवणार्या CBSE शाळा बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. कित्येक CBSE शाळा दुसरी-तिसरीत तोंडी मराठी शिकवतात, आणि मग मराठीशी फारसा संबंध नसतो. :(
आम्हीही सध्या थोडे गोंधळलो आहेत - अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर फार ताण/होमवर्क नसणारी आणि पुस्तकाबाहेरही खूप शिक्षण असते ह्यावर ठाम विश्वास असणारी शाळा शोधतो आहे. मुलांना स्वतःला विचार करायला, प्रयोग करायला प्रोत्साहन देणारी आणि त्यांची individuality ('स्वत्व') जपणारी शाळा हवी आहे. 'अक्षरनंदन' बघितली, तिथून शिकलेली आणि वेगवेगळ्या व्यवसायात असलेली मुले/मुलीही माहिती आहेत आणि त्यातल्या काही जणांशी बोललोही आहे, खूप वेगळी आणि 'स्वत्व' गवसलेली मुले वाटली ती. २१-२२ वर्षाच्या मुलांनी बसवलेली नाटके पाहिली तर त्यांच्य विचारंची/बुद्धीची झेप लक्षात येते, पण मराठी मिडीयम असल्यामुळे बरीच काळजी वाटते - आम्ही दोघेही मराठी मिडीयम मध्ये शिकलो नाहीत. शिवाय ११वीत vernacular शाळेत शिकलेल्या मुलांचे हालही पाहिलेत (खूप चांगले cope-up केलेलेही माहित आहेत), तसेच अजून १० वर्षे महाराष्ट्रातच राहू ह्याचीही खात्री नाही. शिवाय तिथे बहुतेक सगळेच महाराष्ट्रीयन, त्यामुळे होणारे मोनो-कल्चर हेही मला फारसे चांगले वाटत नाही. त्यामुळे 'अक्षरनंदन' चा विचार बाजूला ठेवला. (अर्थात तिथे थेट पहिलीत अॅडमिशन मिळणेही अवघड आहे) अजूनही मला 'अक्षरनंदन' म्हटले की थोडी चलबिचल होते. SSC बोर्ड स्वीकारूनही त्यांनी स्वतःची वेगळी आणि अतिशय चांगली ओळख निर्माण केली आहे. कोणाला मराठी मिडीयम चालणार असेल, तर पुण्यात 'अक्षरनंदन' हा खूप चांगला पर्याय आहे.
आमचा पिलू आता ५.५ वर्षांचा आहे, आणी त्याची सध्याची माँटेसरी खूपच छान आहे, 'शिकलेच पाहिजे' असा दबाव नसल्याने आणि तिथल्या अतिशय मोकळ्या वातावरणामुळे तो खूप काही शिकला आहे आणि खूप काही-काही बनवत अस्तो. त्यामुळेच आम्ही आत्तापर्यंत दुसर्या शाळेत टाकले नाही, पण ती आता संपेल आणि पहिलीसाठी योग्य शाळेचा शोध सुरू आहे. पण Nursery/Jr. KG मधेच बर्याच अॅडमिशन होत असल्याने आणि RTE मुळे पहिलीत अॅडमिशन फार कमी आहेत. थोडी relaxed असणारी, फार अभ्यास-अभ्यास न करणारी आणि उत्तम सुविधा असणार्या एका ICSE शाळेत अॅप्लाय केले आहे (त्यांची फी खूप जास्त असली तरीही), तिथे झाले तर फारच छान, नाहीतर मग कुठल्या शाळेत घालावे हा आमच्यापुढचा सध्याचा मोठ्ठा पेच आहे.
आमच्या अपेक्षा साधारणपणे अशा आहेत -
तर, कोणाला बावधन, कोथरुड, कर्वे-रोड, बाणेर, पाषाण, औंध किंवा ह्याच्या जवळच्या परिसरात आमच्या अपेक्षात बसणार्या दुसर्या शाळा माहीत असतील तर अवश्य सुचवा, खूप मदत होईल.
पिरा - तू/तुम्ही कुठली शाळा नक्की केली? व्यनी करणार का?
ऋषिकेश भेटून बोलुया का? ग्राममंगल विषयी थोडा वाईटही फीडबॅक मिळाला आहे. पण मलाही आवडती शाळा तू म्हणतो तशीच वाटते - जरा निवांत आणि सविस्तर बोलायचे का?
22 Jan 2015 - 1:36 pm | पिलीयन रायडर
१. अक्षरनंदन निर्विवाद चांगली शाळा आहे. पण आम्हाला खुप लांब पडतेय म्हणुन तो पर्याय नाईलाजाने सोडून दिला. शाळाअ घराजवळ हवी हा मुख्य मुद्दा होता.
२. मराठी वातावरण हवे हे ही महत्वाचे. मला स्वतःलाही हिंदाळलेल्या आणि मराठीला महत्व न देणार्या शाळा आवडत नाहीत.
३. बोर्ड महत्वाचे आहेच.. मलाही मुलाला इंग्लिश मिडियम मध्ये घालायचे होते. आता SSC - इंग्लिश मिडीयम शाळा म्हणजे नावाला इंग्लिश मिडियम... शिवाय ह्याही शाळा अनुदानित नसल्याने शाळांचे नाव जरी मोठे असले तरी शिक्षक सतत बदलत असणार (आणी हा प्रॉब्लेम सगळीकडे असणार...)
४. माझ्यातही ऋषिकेश सारखी हिम्मत नाही.. :( त्यामुळे शासकिय मान्यता असलेले बोर्ड माझ्यासाठी मस्ट...
आणि आता फायनली मला ह्याचा विचार करुन फार कंटाळा आलाय... जे होईल ते होइल असं ठरवुन अॅड्मिशन घेतली...
22 Jan 2015 - 7:25 pm | खेडूत
>>> जुन्या इंग्लिश मिडियम पैकी लॉयला, सेंट व्हिन्सेंट, सेंट मेरी, सेंट जोसेफ (पाषाण) ह्या एस. एस. सी. शाळा कित्येक नवीन CBSE/ICSE शाळांपेक्षा चांगल्या आहेत.
* यांपैकी सेंट मेरीज फक्त आयसीएसई वाली आहे !
बाकी अनेक मुद्द्यांशी सहमत .
महाराष्ट्रात रहायची खात्री नसेल तर CBSE बरी म्हणजे नंतर त्रास होत नाही. महाराष्ट्रात नाही राहिले तरी दहावी ते बारावीला इथे परत येण्याचा प्लान असावा म्हणजे नंतर भटकंती टाळता येईल. याआधी म्हटलंच आहे त्याप्रमाणे परदेशी जावे लागणार असेल तर ICSE बरी. कारण तिकडे सहज प्रवेश मिळतो.
प्रयोगशील शाळा चांगल्या असल्या तरी त्यांत सातत्य असण्याची खात्री नसते.
'त्या' शाळांत मिळणार्या विशेष गोष्टी बाहेर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करता येईल. त्यात जोखीम,नाही.
मी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो म्हणून आता मनपा शाळेत मुलांना पाठवणारे पण माहिती आहेत. तर दुसरीकडे विविध पंथ/ योग वाले शाळा काढतात. त्याची आश्रम पधधत वगैरे असते- पण एकूणच असले दु:साहस तर नकोच.
आत्ता बरी वाटेल ती शाळा घेऊन पुढे पाचवीपर्यंत बदलता पण येते.
22 Jan 2015 - 1:08 am | संदीप डांगे
जी शाळा आई वडिलांना होमवर्क देत नसेल ती सर्वोत्तम शाळा, असे आमचे एक ठाम मत आहे.