सर्वत्र अगरबत्तीचा मंद दरवळ पसरत होता.स्वयंसेवकांची लगबग चालू होती. मुवी जातीने सारी तयारी व्यवस्थीत झाली का नाही हे पहात होतेच तरी सुद्धा मधून अधून आप्ल्या खास सेवाकर्यांना सांगून आलेल्या पाहुण्यांची आसनव्यवस्था पहायला सांगत होते.आपण लढवलेली शक्कल इतकी यशस्वी होइल या बद्दल ते स्वतः पण साशंक होते परंतु पुरेसी गर्दी झाली आहे हे पाहून "बाबांच्या " मनात आपल्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावेल यात काही शंका नाही असेही वाटत होते.
दरबारात आपल्या सोईस्कर वेळेनुसार आणि गटागटाने समस्त मिपाकर हजर होत होतेच्.(वेळेवर किंवा वेळेपूर्वी आल्याने कट्ट्याला बट्या लागतो असे काहींचे प्रांजळ आणि परखड मत होते)
मुवींबरोबरच जेपी आणी टका आलेले असल्याने येणार्या मिपाकरांना दरबार शोधायला काही अडचण येऊ नये म्हणून दरबाराबाहेर दिशा-दर्शनाच्या "महत्वाच्या" कामावर टकाची नेमणूक झाली होती.
"टक्या तिथेपण काहीतरी फाजीलपणा करेल म्हणून मी राहू का त्याच्यावर लक्ष ठेवायला" (जमल्यास मदतीला)असे सांगून जेपीनेही स्वतःची रवानगी आघाडीच्या मोर्च्यावर केली होती.ज्यांना मुवींनी दिलेले तपशील नीट समजले होते त्यांनी आल्या आल्या टक्याकडे नेहमीप्रमाणे काणाडोळा करून आपल्याला सोइस्कर (बाबांच्या प्रवचनाचा कंटाळा आला तर मागच्या मागे कटायला सोपे अशी) जागा पकडून गप्पांचा फड रंगवला होता.
"वल्ल्या काय सांगू इतक्या थंडीत घरून सकाळी दहाला सुद्धा यायची परवानगी न्हवती पण हु.एक्क्याला सांगीतले तू न्यायला ये म्हणजे परवानगी मिळेल्,पाहिजे तर तुला बाबा दर्शनात ईंट्रेष्ट न्हायीच मला तिथे सोडून आला तरी चालेल येताना वल्ल्याला सांगून करतो काहीतरी व्यवस्था !"आणि तसही मला एक दोन आय्डींना भेटायची उत्सुक्ता होतीच" इती चौ रा काका
"ते ठिक आहे पण या नाखुकाकांची काय सवय जात न्हाई उशीरा यायची त्यांची वाट पाहून मीच बुवांना सांगितलं तुम्ही आणि सगा व्हा पुढे !" वल्लींनी खंत व्यक्त केली
मंद प्रकाशामुळे बाहेरून आलेल्यांना लगेच कोण कुठे आहे हे समजायला वेळ लागत होता त्यामुळे "खो$$$खो$$$ अश्या ठसकेबाज आवाजानंतर वल्लींना बुवा कुठे आहेत याचा अंदाज आला आणि ते चौ रा काका सोबत तिथे पोहोचले.
सगाने केलेल्या "चा" विनोदाचा अंमल ओसरल्याबरूबर बुवा-पीडन कामाची जबाबदारी वल्लींनी स्वखुशीने हातात घेतली.
बॅट्या आला तोच काहीसा तणतणचं "भेंडी एकाला इथला पत्ता नीट माहीती असेल तर शप्पथ ! गाडीने दगा दिला म्हणून तुला फोन करतोय तर तू पण उचलीनास सग्या @@@@च्या ! तुझं बरोबर आहे म्हणा "सगा समीप बुवा आणा !मोबाईल दिसे बापुडवाणा !!"(स्वगतःच्यायला सारखी विडंबन वाचून आपल्यालाही साकी प्रादुर्भाव झालाय का काय )
आलो मग झक मारत रिक्षावाल्याच्या मर्जीनं आणि माझ्या दमड्यांनी.
"हो नाही बघीतला तुझा कॉल आता थंड घे ! म्हणजे चहा कॉफीची सोय आहे मुवींनी केलेली!"
बॅट्यानेही परिस्थीतीचा अदमास घेत मुवींनी आपल्यालाच खास मेसेज का टाकला असा विचार केला आणि चौ रा काका
शेजारी बस्तान टाकले.
पलिकडच्या भागात अनाहितांचाही गप्पा फड जोरात चालूच होता पुढचा स्पेशल अनाहिता कट्टा तुळशीबागेत घ्यावा का यावर चाचपणी चालू होती.पण "श्री क्रुष्ण मिसळ " मध्ये मिसळ खाण्याला ना न्हवती तर (हाटेल मालक)गप्पांवर आणि वेळेवर बंधन आणतील असी रास्त शंका होतीच.
"अग एका मिसळप्रसिद्ध हाटेलात फक्त हॉटेलची वेळ विचारली तर पैसे मागीतले "वेळ विचारण्याचे" स्नेहांकितातै.
"सांग ना त्या हॉटेलच नाव" "चांगलेच दात घशात घालते त्याच्या!!" इती अजयातै
नाही गं असं फक्त म्हणायच असत. मिपा धाग्यावर असा प्रतिसाद टाकला कि असेच बिनबुडाचे सुरसुरी प्रतीसाद अगदी ओसंडून वाह्तात !स्नेहांकितातै नी लगेच खुलासा केला.
पैसातै जरा चलबिचल करताना दिसत होत्या त्याला कारणही तसेच होते म्हणा ! बाबांना भेट द्यायला आणलेले "तळलेले काजू " स्वतःच द्यावेत का स्वयंसेवकाकडे अशी द्विधा अवस्था होती.मागच्या कट्ट्याला शेवटच्या माणसापर्यंत फक्त रिकामी पिशवी पोहोचली होती याची ताजी आठवण त्यांच्या जमेस होतीच म्हणा.
"काहीही म्हणा मुवींनी कट्ट्याला जागा अशी का निवडली आश्रमाची कळेना" बहुगुणींनी अनाहितांच्या मनातील शंका बोलून दाखवली.
अग त्यांच्या बाबांना (महाराजांना) आपल्या मिपाकरांना भेटायचे होते आणि..! पैसातैनी सूचक पण बहुमोल माहीती पुरवली.(त्याही विचारात होत्याच की मुवींनी समस वर सांगितल्या प्रमाणे ते विशेष आय्डीधारक कधी भेटतील)
इकडे माफक आवाजात असलेला गप्पा-दंगा चौ रा काका अधून मधून निवडक शिरशिरी शेर्यांनी सातमजलीत रूपांतर करीत होतेच. सावधगिरीचा उपाय म्हणून सगा आणि बॅट्याने वल्लींना आपल्या व बुवांच्या मध्ये बसवले होते याचा परीणाम एकच झाला की वल्लीना बुवांकडून स्वतःच्या वाट्याचे तसेच या दोघांच्या वाट्याचेही गुद्दे-चिमटे मिळत होते.
इतक्यात मोदकाचे आगमन झाले तो आला तेच डोक्याला हेल्मेट (सायकलवाले) आणि सायकलपटूचे पेहरावात !
"काही नाही पाचगणी ते पुणे अशी सायकल स्पर्धा होतीच आणि हा आश्रम पण वाटेवरच आहे. म्हटल घरी जाऊन गाणी एकत झोपण्यापेक्षा प्रवचन ऐकत झोपू ! शेवटी काय झोप महत्वाची!!"
बाहेर कंटाळून जेपी-टका आत आले होतेच पण मुवींच्या सूचनेनुसार त्यांना थेट मिपाकरांच्यात बसता येणार नव्हते म्हणून ते हॉलच्या अगदी जेमतेम कडेला दिसायला तर प्रेक्षक म्हटलं तर (च) स्वयंसेवक अश्या बेतानं बसले.
मुवींनी माईकचा ताबा घेऊन घोषणा केली की बाबांचे आगमन झाले आहे आणि मिपाकर काही शंका समाधानासाठी काही विचारू शकतात. वेळे अभावी प्रातिनिधीक म्हणून फक्त २-३ च मिपाकर प्रश्न विचारू शकतील बाबांची तब्येत ठीक नसतानाही ते आपल्याकरीता आज हजर झाले आहेत्.(खरी गोम अशी होती की अपर्णातैंनी आग्रहाने मुवींसाठी दिलेल्या कोल्हापुरी तांबडा रस्सा मुवींनी त्याहीपेक्षा प्रेमळ आग्रह करून बाबांना खाऊ घातला होता. परिणामी बाबांचे "कवीता-उगम्-केंद्री" वारंवार जाणे झाले होते.) पण उघडपणे तसे दाखवणे मुवींसाठी आणी मिपा प्रतिश्ठेसाठीही फारसे हितावह नव्हतेच.
मुवींनी विनंती केल्यावर (अर्जंट बोलावण आलं तर दरबार बर्खास्त करून जाईन या बोलीवरच) बाबा आसनस्थ झाले.
पुढे शंका समाधान येन प्रकारे!!
बुवा पहिल्या रांगेत बसल्याने आणी सग्यानेच त्यांचा हात वर केल्याने त्यांचाही नाइलाज झाला.बुवा उभे राहीले.
बुवा : बाबा मी इतके विविध लिखाण करतो तरी मला सगळे फक्त विशिष्ठ कवितांसाठी टोचून प्रतिसाद देतात काहीजण तर अगदी टवाळकी करतात असे का व्हावे ???
बाबा: वत्सा (बाबा सगळ्यांना वत्स म्हणतात) असं आहे की तू तुझे कर्म करीत राहा बाकीचे काय म्हणतात याकडे लक्ष नको देऊ पण एक मोलाचा सल्ला देऊ काय "जस अनुपम खेर अभिनेता म्हणून चांगला आहे पण डायरेक्टर म्हणून अगदी पकावू आहे हे तुला ओम जय जगदीश ने कळाले असेलच" तेव्हा तुझी लेखन प्रतीभा फक्त त्या प्रकारात गुंतवून ठेवू नकोस. भेळ-पुरी कधी तरीच ठिक रोजच्या जेवणात भाजीच पाहिजे भले ती वेग-वेगळी आणि नव्या नव्या पद्ध्तीने असली तर उत्तमच ! बुवांच्या चेहर्यावरून त्यांचे फारसे समाधान झाले नाही तरी मुवी प्रेमा मुळे म्हणा का वल्ली खालून (पायाला) चिमटे काढत असल्याने म्हणा बुवा खाली बसले.
एवढ्यात नेमकी टकाने टाळी वाजवली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या (टकाने अनावधानाने डास मारण्यासाठी टाळी वाजवली होती हे फक्त त्याला आणि जेपीलाच माहीती होते हे बरे झाले)
अनाहीतांतर्फे एक तरी सदस्याने बोलावे म्हणून कुणीतरी उठले.(नेमकी त्याच वेळी धागाकर्त्याला डुलकी लागली होती म्हणून हा संवाद ऐकीव माहीतीवर आहे)
अनाहीता : बाबा काही सदस्य कधी या नावाने तर कधी त्या नावाने धाग्यावर खफगिरी करतात आणि हाकलेले तरी जात नाहीत असं का असाव बर!
बाबा : असं आहे तुम्ही सगळे "थेट नेट" माणसं आहात, सर्व मिपाकरांसाठी आधिच माहीती असलेली एक मज्जा-विनोद सांगतो एक सरदारजी इले़क्टरॉनीक्स्च्या दुकानात जावून हा टिव्ही कितीला दिला असे विचारतो आणि पुढे प्रत्येक वेषांतरातही दुकानदार त्याला सरदारजी म्हणून बरोब्बर ओळ्खतो. त्या किस्श्यामधला सरदारजी म्हणजे हा बहुनामी आयडी आहे तो येतच राहणार नव्या नव्या नावाने आपण त्याला ओळखण्याची गरज भासणार नाहीच तोच दाखवेल त्याची वैचारीक पात्रता! तेव्हा निश्चींत रहा !
या गडबडीत अगदी बाबांच्या समोर उजव्या कोपर्यात एक व्य्क्तीला आजूबाजूचे लोक धरून ठेवत होते आणि तो हातवारे करून ऊठून निघून जायच्या तयारीत होता शेवटी ती व्यक्ती निघून जाण्यात यशस्वी झाली पण जाताना समस्त मिपाकरांकडे आणि बाबांकडे ही रागाने बघत हातवारे करीत गेली याचे मुवींनाही नवल वाटले.
बाबा: मुवी वत्सा कोण रे हा आणि असा रागवलाय का?
मुवी : सांगतो तोच तर मह्त्वाचा प्रश्न आहे याला वाटते बहुतांश मिपाकर हे ह्याच्या विरूद्ध आहेत म्हणजे याच्या लिखाणाच्या, साहीत्य सेवेच्या आणि तळमळीच्या ! आता मला सांगा..
मुवींना मध्येच थांबवत (ते अंतर्मयी असल्याने आणि मुवींवर विशेष लोभ असल्याने विचारण्यापूर्वीच बाबांना समस्या समजली होती)
बाबा : मी फक्त अधुनिक रूपक कथा सांगतो जसा पाहीजे तसा त्याचा अर्थ घ्या .
"एकदा एक रेल्वेच्या चालका कडून अपघात होऊन एक कुत्रे मरते, तेव्हा चौकशी अधिकारी त्याला विचारतो रूळाच्या शेजारी झोपडीत गाडी का घातली त्यामुळे कुत्रे मेले ना ! सांग असं का केले.
रेल्वे चालक : साहेब काय करू माझ्या समोरून रूळावर एक म्हैस येत होती तीला वाचवायला गेलो आणि गाडी बाजूला गेली माफ करा साहेब.
अधिकारी : अरे एका म्हशीला वाचवण्यासाठी असे नाही करायचे मेली तर मरू दे ती म्हैस पण गाडीतल्या प्रवाशांची जबाबदारी तुझ्यावर आहे ना. ठीक आहे. आत्तापर्यंतचे निर्दोष रेकॉर्ड पाहून मी तुला फक्त समज देवून सोडतो.
पुन्हा आठ दिवसांनी त्या रेल्वे चालकाला चौकशीला सामोरे जावे लागले यावेळेला ५०-६० शेळ्या आणि ४-५ गाई मारल्या गेल्या म्हणून.
अधिकारी : अरे आता काय केलेस तू हे ??
रेल्वे चालक : काय करू तुम्हीच सांगीतल्याप्रंमाणे वागलो त्याच फळ असे मिळाले मला !!
अधिकारी : काय मी काय सांगेतले तुला की शेळ्या मार शेतात घालव गाडी??
रेल्वे चालक : तुम्हीच म्हणलातना की एखादी म्हैस मेली तर चालेल पण साली ती म्हैसच रेल्वे लाईन सोडून शेतात पळाली आणि माझा नाईलाज झाला घातली गाडी तिच्या मागे मागे आता सांगा माझं काय चुकलं.
अधिकारी :अरे मुर्खा लाईनवरून गाडी चालवण तुझं पहील आणि महत्वाच काम आहे पाठलाग करणं नाही.
**
बाबा :तुझ्या त्या मसीह्याला सांग अगदी शेतात जावून पाठलाग करणार्याला चांगला चालक म्हणत नाहीत.
आणि बाबा (कळ आल्यामुळे) आत निघून गेले.
बुवांनी माइकचा ताबा घेतला आणि "मी तुम्हाला हा नानासाहेब नेफळे उपाख्य माईसाहेब कुरसुंदीकर उपाख्य ग्रेटथिन्कर उपाख्य टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उपाख्य ग्रेटथिंकर यांची भेट घडवून आणतो असं म्हटल होतं पण आज ते येणार नाहीत माईंना राम मंदीरात सोडून येताना त्यांचा रस्त्यात (पण) पाय घसरला आणि त्यांमुळे उसण भरलीय असं त्यांनीच मला कळवले आहे."
मी पुन्हा डुलकीत गेल्याने पुढचं काही फारसं आठवत नाही .बॅट्या-सगाला माहीती असेल तर सांगतीलच ते कधीतरी..
============================================
यापूर्वी व यानंतर कुठेही प्रकाशीत नाही.
ही मुवीच्या "बाबांची" जाहीरात नाही.
नावे व व्यक्ती खरे असल्यास निव्व्ळ जोगायोग समजावा.
हे लिखाण "बिनबियांच्या कथा" या योजने अंतर्गत आहेत.
खुलासा संपला.
प्रतिक्रिया
10 Jan 2015 - 12:58 pm | मितान
जबरदस्त !
:))
10 Jan 2015 - 1:34 pm | नाखु
वरील लिखाणात ज्यांचा उल्लेख आहे त्यांनी मोठ्या मनाने माफ करावे व अगदी हल्के घ्यावे.
ज्यांचा उल्लेख होऊ शकला नाही त्यांनीही अगदी मोठ्या मनाने माफ करावे व हल्के घ्यावे.
====
धन्यवाद
10 Jan 2015 - 1:56 pm | जेपी
=))
जबर-दस्त. =))
अवांतर-बाबांचा सल्ला अस एक सदर चालु करायला हरकत नाही.
(बाबा भक्त)जेपी
10 Jan 2015 - 2:02 pm | सविता००१
भारी आहे. :)
10 Jan 2015 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त !
10 Jan 2015 - 2:36 pm | टवाळ कार्टा
सहीच :)
"आवाजावर" शब्द गाळत गाळलात काय? ;)
तुम्ही अनाहितांना घाबरता हे आधीच माहित होते...म्हणूनच मी आणि जेप्याने फुल्टू फिल्डिंग लावलेली
10 Jan 2015 - 3:21 pm | अजया
घशात घातलेले दात, गळा दाबुन बाहेर काढायचे प्रात्यक्षिक होतकरु मिपाकरांवर कशेळी कट्टा येथे करण्याचे बाबांनी मला आवाहन केले आहे ^_~
मी तर केवळ आज्ञाधारक
अजया
13 Jan 2015 - 9:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
होतकरु मिपाकरांची यादी पहायला मिळेल का एकदा. =))
13 Jan 2015 - 9:54 pm | टवाळ कार्टा
=))
14 Jan 2015 - 7:58 am | अजया
ज्यांच्यावर प्रात्यक्षिक होईल ते होतकरु.काहींच्या नावाचे रेकमेंडेशन अनाहितामधुन देखिल आले आहे =)) "यादी नाही देणार,सस्पेन्स काय मग कट्ट्याला? ^_~
14 Jan 2015 - 9:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ट.का. म्हाराज, इन्शुरन्स काढा मोट्ठा...अचानक धनलाभाची संधी आहे तुला =))
14 Jan 2015 - 10:01 am | टवाळ कार्टा
मिपावर शेपूट घालून गोंडा घोळवणारे जास्त आहेत हे माहित आहे मला...त्यामुळे कट्ट्याला पानपताऐवजी पुरंदर करण्याचा प्रयत्न असेल...आणि तसेही दिवस कट्ट्यापेक्षा रात्रकट्टा जास्त चांगला असेल असा माझा अंदाज आहे
:)
14 Jan 2015 - 1:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
10 Jan 2015 - 3:48 pm | मुक्त विहारि
एकदम खुसखुशीत लेख...
10 Jan 2015 - 5:08 pm | सस्नेह
...लैच !
11 Jan 2015 - 9:13 pm | पैसा
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:
=)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL: =)) :ROFL:
11 Jan 2015 - 9:23 pm | जेपी
याला हसण म्हणायच की काय...
*biggrin*
11 Jan 2015 - 9:37 pm | सस्नेह
हास्य-रांगोळी
13 Jan 2015 - 11:03 pm | अत्रुप्त आत्मा
छे छे!!! मनस्पर्षहर्षवायू!
13 Jan 2015 - 11:07 pm | पैसा
खेचरवाहनद्विगजमध्यगजान्तलक्ष्मीसमदर्शनअत्रुप्तआत्मावर्णन वाचून हास्यधाराधबधबाप्रवाहित झाले ना ओ!
13 Jan 2015 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा
ख्याक!
13 Jan 2015 - 2:59 pm | प्रचेतस
=))
हा धागा नेमका वेरूळला गेल्यामुळे वाचायचा राहिला होता.
जबराट लिहिलंय नाखूकाका.
13 Jan 2015 - 3:13 pm | बॅटमॅन
खी खी खी =))
13 Jan 2015 - 9:17 pm | चौकटराजा
नाखूदादा , आज तुम्हाला प्यीयेल व जदळवी नी झपाटलेले दिसतेय ! बाबौ ! मुविंच्या छातीवर रिबनीचे भले मोठे फूल
लावलेले होते. त्यामूळे ते ह्या सगळ्या प्रकाराचे सी ई ओ असल्याचे दिसत होते. हे लिहायला का विसरलात. कोणाच्या तरी
मोबाईल वर मुवि है ये कट्टेका दिवाना हे गीत चालू होते. हे ही लिहायचे विसरलात ?
13 Jan 2015 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा
@"सगा समीप बुवा आणा !मोबाईल दिसे बापुडवाणा !!>>> आग्गाग्गाग्गागागा!!!
@बाबा: वत्सा (बाबा सगळ्यांना वत्स म्हणतात) असं आहे की तू तुझे कर्म करीत राहा बाकीचे काय म्हणतात याकडे लक्ष नको देऊ पण एक मोलाचा सल्ला देऊ काय "जस अनुपम खेर अभिनेता म्हणून चांगला आहे पण डायरेक्टर म्हणून अगदी पकावू आहे हे तुला ओम जय जगदीश ने कळाले असेलच" तेव्हा तुझी लेखन प्रतीभा फक्त त्या प्रकारात गुंतवून ठेवू नकोस. भेळ-पुरी कधी तरीच ठिक रोजच्या जेवणात भाजीच पाहिजे भले ती वेग-वेगळी आणि नव्या नव्या पद्ध्तीने असली तर उत्तमच ! बुवांच्या चेहर्यावरून त्यांचे फारसे समाधान झाले नाही तरी मुवी प्रेमा मुळे म्हणा का वल्ली खालून (पायाला) चिमटे काढत असल्याने म्हणा बुवा खाली बसले. >>> .. ..
कै कै ठिकाणी तर तुफ्फान हाणलय!
14 Jan 2015 - 1:18 am | सतिश गावडे
भन्नाट लिहिलंय.
14 Jan 2015 - 8:06 pm | नाखु
खरे तर बांबांनी त्यांच्या प्रवचनात खास सांगीतलय की निवडून आल्यावर उमेदवाराने चार वर्ष आणि लेख्/कवीता/काथ्या कुट फेकल्यावर लेखकानं ४ दिवस तिकडं फिरकायच नसतं (नस्ती स्पष्टीकरण कोण देणार)
सर्व वाचकांचे/अवाचकांचे आभार.
"सतिश गावडे/बॅटमॅन/वल्ली/पैसातै/स्नेहांकिता/मुक्त विहारि/इस्पीकचा एक्का/मितान/सविता००१"=="बिनबियांच्या कथा" आवडल्याबद्दल धन्यवाद. वल्लीदांच्या आग्रहाने चार ओळी खरडण्याची धाडसकला शिकलो हेच खरे!
"अत्रुप्त आत्मा"- आम्ही तुमचे फुल्ल ५ स्पीडवरचे फॅन आहोतच
"तुम्हाला आवडल ! भरून पावलं"
"चौकटराजा" - तुमचे लक्ष होते म्हणा की तरीच मुवींकडून आत्ता आणून देतो म्हणून नेलेले रिबनीचे भले मोठे फूल कुणी गायब केले ते मला शेवटपर्यंत कळाले नाही.
"टवाळ कार्टा/जेपी" आत्ता सांगीतलं तर चालेल ना ती कॉलर ट्यून ( मुवि है ये कट्टेका दिवाना) तुम्च्या दोघांची होती आणि आळी-पाळीने मिस्-कॉल खेळत होतात ते. पण स्वयंसेवक असावेत तर तुम्च्यासारखे असे बाबांचे सेवक उज्व्यांच्या उजवीकडील उजवे म्हणत होते असे मी ऐकले आहे.
"अजयातै" -नका धरू मजवरी दात! (पाहीजे तर मुवींना विनंती करून बाबा-कट्टा पुन्हा आयोजीत करू हा.कां ना.का.)
कॅप्टन जॅक स्पॅरो - बाबांची दाढी असली का नकली अशी जाहीर चौकशी नको करत जाऊ भावा ! आयोजकांची गोची होते ना !!
14 Jan 2015 - 10:11 pm | टवाळ कार्टा
15 Jan 2015 - 9:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्क!!!! =))
14 Jan 2015 - 8:58 pm | सस्नेह
लिहीत जा हो *smile*
15 Jan 2015 - 9:59 am | प्रीत-मोहर
मस्त लिहिलय नाखुकाका. लिहित रहा
15 Jan 2015 - 11:27 am | योगी९००
कवीता-उगम-केन्द्र . हॅ हॅ हॅ... सर्वत्र अगरबत्तीचा मंद दरवळ पसरत होता.... का ते आत्ता कळले...!!!
बाकी मी आश्रमात येण्याचा प्रयत्न केला पण टकांनी मला बाहेरच्या बाहेर पिटाळले. का ते कळले नाही.
15 Jan 2015 - 12:52 pm | टवाळ कार्टा
उग्गीच???