एकदा तरी पहावा असा.

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
31 Oct 2014 - 10:30 am

डॉ.प्रकाश बाबा आमटे.

      मराठी चित्रपट जगतात सध्या (हिंदीच्या तुलनेने) चांगले आशयघन/नाविन्य विषय्/नवीन प्रयोग असलेले चित्रपट येऊ लागले आहेत्.सकस विषय आणि दर्जेदार निर्मिती बरोबर जाहीरात-वितरण यावर विशेष लक्ष्य दिल्याने चित्रपट व्यवस्थित कमाई करू शकतो हे बालक पालक्/पोष्टर बॉईज ने दाखवून दिले आहे.
      नमन झाल्यावर आता मुळ विषयः

      डॉ.प्रकाश बाबा आमटे कालच पाहिला.
      सरळ रेघ (आवडलेल्या गोष्टी/जमेच्या बाजू):

      • वेगळा विषय निवड तसेच प्रसिद्धी पासून दूर व्रतस्थपणे काम करणार्या माणसांची समाजाला ओळख करून देणे
      • उच्च निर्मिती मुल्ये (कुठेही हात आखडता घेतला नाही
      • करूण्/भावस्पर्शी प्रसंग आटोपशीर ठेऊन "मेलो ड्रामा" टाळल्याबद्दल विशेष आनंद
      • नक्षल्ग्रस्थ भागातील सरकारी अनास्था/एकूण समाजाचा अदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण यावर तटस्थ पण सूचक भाष्य
      • मुळात हयात असलेल्या सेवाव्रती व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट बनवताना योग्य ती काळजी आणि स्वातंत्र्य मर्यादा घेतली आहे (एतीहासीक चित्रपटात जे कल्पना स्वातंत्र्य मिळते,ते ईथे नाही याचे भान ठेवले आहे
      • चित्रपटात कुठेही गाणी नाहीत. आहेत तीही पार्श्वसंगीत स्वरूपात त्यामुळे रसभंग होत नाही
      • चित्रपटाचा मूळ ऊद्देश डॉ.प्रकाश बाबा आमटेची विशेषता/महती सांगण्याचा असला तरी तो जीवन पट न होऊ देता कार्यपट ठेवला आहे.(म्हणजे जीवनपटामध्ये बालपणाचे/तारूण्यातील प्रसंग दाखवून श्रेष्ठता/गुण अधोरेखीत केले जातात तसे ईथे नाही) कार्य पट असल्याने अडचणी आणि त्याचे निवारण जास्त सहज स्वाभावीक (अकृत्रीम) वाटतात
      • लहान-सहान प्रसंगातून कथा फुलवली आहे.त्यामुळे परीस्थीती निर्मित हलके फुलके हास्य प्रसंग चित्रपट (आशयाला धक्का न लावता)अगदीच गंभीर होण्यापासून वाचवतात

      तिरकी रेघ थोड्याच पण खटकणार्या बाबी (ऊणीवेच्या बाजू नाहीत तर मज पामराच्या अपेक्षा)

      • एकाच वेळी अनेक विषय असल्यामूळे अदिवासी समस्या/सरकारी भोंगळपणा,अनास्था,खाबुगिरी /नक्षलवाद उगम यावर पुरेसे भाष्य करण्यास मर्यादा
      • खरे तर हा विषय आवाका चित्रपट किमान दोन भागात करावा ईतका मोठा आहे तो एकाच चित्रपटात घेऊन पुरेसा न्याय दिला जात नाही
      • पटकथेवर घेतलेली मेहनत थोडी कमी पडली आहे (कदाचीत बर्याच आघाड्या संभाळल्यामुळे असेल)
      • सफाईदार संकलन नसल्याने आणि गोळीबंद संवाद/पटकथा नसल्याने, दीर्घकाळ आणि खोल असा परीणाम देण्यात चित्रपट (काही अंशी) कमी पडतो

      एकदम आडवी रेघः (आम्हाला आडव करणारी)

      • जरा चित्रपट चांगला चालला कि दर वाढवतात हे मल्तीप्लेक्स वाले, यांना पण एक पडदा सारखे कायम दर ठेवण्याचा कायदा करावा
      • टॅक्स फ्री असूनही १५० रुपये प्रती माणशी द्यावे लागले आणि स्क्रीन ची (आसन क्षमता) वसंत पेक्षा पण कमी त्यामुळे जास्तीच वाईट वाटले
      • बाकी मी काही समीक्षक नाही (मिपा नामवंत तर नाहीच नाही) तेव्हा जाणकारांच्या प्रतीक्रिया अपेक्षीत
        वि.सू.प्रतिसाद व्यतिरीक्त लेखनाची पहिलीच वेळ आहे तेव्हा व्याकरण व मांडणी चुका संभाळून घेणे.(अक्षरास हासू नये या शालेय निबंध लेखन चालीवर वाचले तरी चालेल)

मौजमजाचित्रपटआस्वादसमीक्षामतशिफारस

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

31 Oct 2014 - 10:58 am | प्रचेतस

पहिल्याच लेखनाचे स्वागत.

लिहिलंय छान. चित्रपट बघायची पण इच्छा आहे पण आमचे इंग्रजी चित्रपट पाहायला सोकावलेलं मन नेहमीच मागे ओढतं

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2014 - 12:13 pm | बोका-ए-आझम

चित्रपटाचा मूळ ऊद्देश डॉ.प्रकाश बाबा आमटेची विशेषता/महती सांगण्याचा असला तरी तो जीवन पट न होऊ देता कार्यपट ठेवला आहे.(म्हणजे जीवनपटामध्ये बालपणाचे/तारूण्यातील प्रसंग दाखवून श्रेष्ठता/गुण अधोरेखीत केले जातात तसे ईथे नाही)

हे बेष्ट. बरेच वेळा चित्रपटाची समीक्षा करणे म्हणजे त्याची कथा सांगणे असा लोकांचा समज असतो. तुम्ही तसं केलेलं नाही हे चांगलं आहे.

वाटच बघत होतो या चित्रपटाच्या मिपा समीक्षणाची.
दिवाळीच्या सुट्टीत सहकुटुंब बघायचा विचार होता पण जमले नाही.
नक्की बघणार

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2014 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा

@ तिरकी रेघ थोड्याच पण खटकणार्या बाबी (ऊणीवेच्या बाजू नाहीत तर मज पामराच्या अपेक्षा)

@एकाच वेळी अनेक विषय असल्यामूळे अदिवासी समस्या/सरकारी भोंगळपणा,अनास्था,खाबुगिरी /नक्षलवाद उगम यावर पुरेसे भाष्य करण्यास मर्यादा >>> सहमत.

@खरे तर हा विषय आवाका चित्रपट किमान दोन भागात करावा ईतका मोठा आहे तो एकाच चित्रपटात घेऊन पुरेसा न्याय दिला जात नाही >>> +++१११

@पटकथेवर घेतलेली मेहनत थोडी कमी पडली आहे (कदाचीत बर्याच आघाड्या संभाळल्यामुळे असेल) >> ये भी रैट्ट है।

@सफाईदार संकलन नसल्याने आणि गोळीबंद संवाद/पटकथा नसल्याने, दीर्घकाळ आणि खोल असा परीणाम देण्यात चित्रपट (काही अंशी) कमी पडतो >>> *YES* एकदम मंजे एकदम रैट्ट!!! *HAPPY*
-----------------------
या शिवाय ... सोनाली(तै) कुलकर्णींच्या ऐवजी सदर व्यक्तिरेखेची गरज पूर्ण करणारी (दुसरी) सक्षम अभिनेत्री घ्यायला हवी होती. एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे,(विशेषतः बिबट्या मेल्याचा प्रसंग) त्यामुळे काहि प्रसंगातली गंभीरता निष्प्रभ झालीये. एकदोन ठिकाणी तर हसूही येतं.
बाकि सर्व ठीकठाक आहे. :)

एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे
तरी बर्र. जुन्या सोनाली तै आहेत. नवीन सोनाली तैईना तर (कमी काय... जास्ती काय) अभिनयच करता येत नाही.

काव्यान्जलि's picture

31 Oct 2014 - 5:11 pm | काव्यान्जलि

चित्रपट खरच खूप छान आहे .

सतिश गावडे's picture

31 Oct 2014 - 5:20 pm | सतिश गावडे

छान परिक्षण. चित्रपटाच्या चांगल्या वाईट गोष्टी व्यवस्थित मांडल्या आहेत.

खळगोट's picture

1 Nov 2014 - 12:11 pm | खळगोट

चित्रपट एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2014 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान परिक्षण ! बहुतेक मुद्दे चपखल आहेत. चित्रपट मनावर परिणाम करतो हे निश्चित... पण बरेच दिवस मनात घर करून बसेल असा नाही... तो तसा असायला पाहिजे इतकी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची खोली आणि व्याप्ती निश्चितच आहे.

नाखु's picture

3 Nov 2014 - 3:49 pm | नाखु

परिक्षण लिहिण्यास माझा मुलगा (वय १२ वर्षे) कारण ठरला:
हा चित्रपट पहायचा आहे त्याच वेळेस आलेला "हॅपी न्यु इअर" असताना !!! हेच मला आवडले!!
चित्रपट पहाताना त्याच्या विचार-शंका,माझ्या अल्प्मतीने दिलेली स्पष्टीकरणे-पळवाट यातून हा विषय मिपा बोर्डावर आणावा असे वाटू लागले.
आपले पहिलेच लिखाण वाचले गेले आणि प्रतीसाद-दखल झाले याचा आनंद आहे.
सर्व वाचकांचे-प्रतिसादकांचे आभार.

चित्रपट खरेच छान आहे, आणि एकदा नाही दुसर्यांन्दा पाहण्यासारखा ही आहे.

मी दूसर्यांनादा पण जातो आहे पहायला.. बाकी अडव्या-उभ्या रेघा असतातच.. पण माणसाचा परिस्थीलाच आव्हान देवुन केलेला प्रवास खरेच जबरदस्त आहे..
सुंदर सिनेमा .. प्रत्येकाने मराठी चित्रपट पहावेच पहावे.

अरुन मुम्बै's picture

5 Nov 2014 - 12:10 am | अरुन मुम्बै

चित्रपट - डॉ. प्रकाश बाबा आमटे
लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा - समृद्धी पोरे
सीन 1-
एका जिल्हाधिका-याच्या टेबलावरचा फोन खणखणतो. टेबलावरच्या नेमप्लेटमुळे त्याचं आडनाव 'कांबळे' असल्याचं कळतं.. पुढील फोनवरचा संवाद..
कांबळे - हो, बोला सर...
पलिकडून - प्रकाश बाबा आमटे हे कोण आहेत? त्यांच्यावर मोनॅको देशाने टपाल तिकिट काढलंय.
कांबळे - हो, हो मी ओळखतो त्यांना. त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहली आहे.
पलिकडून - आर यु शुअर मि. कांबळे?
कांबळे - येस सर, आय अॅम व्हेरी मच शुअर
पलिकडून - देन व्हू वॉज बाबासाहेब आंबेडकर?
कांबळे - ?? .... सॉरी सर, या प्रकाश आमटेबद्दल माहिती काढून सांगतो.
या सीनमधून समृद्धी पोरे यांनी नेमके काय म्हणायचे होते? कांबळे आडनावाच्या जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा आमटे यांच्यातला फरक ठाऊक नसणार का?