< थेट्रातली मज्जा >

यसवायजी's picture
यसवायजी in जनातलं, मनातलं
17 Sep 2014 - 7:47 pm

आमचे प्रेर्नास्तान
------------------
बारका हुतो तवा आज्जाबरबर चंद्रमा थेट्रात जायला मला कद्दीच आवडलं न्हाई, पण त्यो वडत मला घेऊन जायचा. दर शुक्करवारी बच्च्चनचा पिच्चर हमखास लागायचा. दोन-तीन तास तर बसायचं हाय तिथं, पर आज्जाला आधी एवढा वेळ का लागायचा मला त्या टायमाला कद्दीच समजलं न्हाई. त्यो आधी आसपासची जागा बघायचा, कुठं थुकलंय का? *गून्, *तून ठेवलंय का बघायचा. मग रुप्पयाचा एक बंदा घेऊन लाकडी शीटच्या पट्ट्यामधनं फिरवायचा. भौतेक ढेकनं मारत हुता. मग तरुनभारत पेपर शीटवर हातरायचा तवा कुठं तेच्याच शीटवर मला जर्रा जागा मिळायची टेकवायला. इंटर्वेलला मुतारीत लै वास मारतो म्हणत मग आमी एका झाडाखालीच जायचो. मला हे समदं त्या टायमाला कसंतरीच वाटायचं.

काल सिटी प्राईडमधे असाच एक थोडा वेगळ्या रूपातील आजोबा मला पाहायला मिळाला. आजोबा म्हणतोय कारण एक चिमुरडा त्याच्या आजूबाजूला फिरत होता. थ्री-फोर्थ, फंकी टी-शर्ट अशा रूपात तो मल्टीप्लेक्सच्या एका टिकीट काउंटरवर उभा होता. हेडफोन कानात घालून डोलणं चालू होते आणि त्याच्या पर्सनॅलीटीला शोभेल अशा स्मार्टफोनवर, मोठे नख असलेल्या तर्जनीने टचस्क्रिनशी चाळा करत त्याने टिकीटाचा रेफरंन्स नंबर दिला, टिकिटं घेतली. मग फूड काउंटरवर जाउन ओर्डर दिली "३ चीज बर्गर, २ बटर पॉपकॉर्न आणी २ कोक". आणी थेट ऐटीत जाउन बसला आत मौ-मौ सीटवर.

पिच्चर संपला.. हल्ली पाश्चात्यांच्या या असल्या थेरांमुळे थेट्रातली मजाच गेलीय, पण पिच्चर बघताना तसा माहोल आता का नाही याचे उत्तर काल मिळाले मला.

multi

संस्कृतीविडंबनमौजमजाविचारअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त विडंबन पण ते फंकी टी-शर्ट सैल होते की घट्ट ह्याचा उलगडा काही झाला नाही.

बाकी, पहील्यांदाच "मी पयला".

प्रचेतस's picture

17 Sep 2014 - 8:11 pm | प्रचेतस

खी खी खी =))

पिंपातला उंदीर's picture

17 Sep 2014 - 8:15 pm | पिंपातला उंदीर

शिर्शक वाचुन लैच अपेक्शेने धागा उघडला होता

आज्जा असल्यामुळे टिशर्ट, जीन्सचा तपशील विचारत नाही.

* आज्जी असती तर विचारला असतात का असे विचारायला येऊ नये, अपमान केला जाईल.

भारतातले आणि डॉइशलांड (आपलं जर्मनी हो) मधील मुलंमुलीच अजून आयच्या अन बापाच्या बापाला मानतात. आणि त्यांच्याकडून लाड करून घेतात. आज्जोबा बागेतली हिरवळ पाहता पाहता नातवंडांबरोबर आख्खा कॉर्नेटो खातात. नशिबवान लेकाचे.

जेपी's picture

17 Sep 2014 - 8:22 pm | जेपी

गंडलय.
यसवाजी आयडी कडुन हुच्च अपेक्षा होत्या.

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 9:04 pm | टवाळ कार्टा

थोडासा गंडल्यासारखा मला पण वाटला...पण मला काहिच लिहीता येत नाही...त्यापेक्शा हे बरेच चांगले आहे :)

हो. गंडल्या लॉजिकनंच लिवलंय. रोज तेच तेच संस्कृती-भारतीय्-वेस्टर्न वाचून वैताग आलाय. म्हटलं करा मज्जा. :))

टवाळ कार्टा's picture

18 Sep 2014 - 9:09 am | टवाळ कार्टा

=))

साती's picture

17 Sep 2014 - 8:36 pm | साती
बटर पॉप्कॉर्न आणि कोक वरून आठवलं. हे टी शर्ट आणि थ्री फोर्थ वाले आजोबाच डायरेक्ट टिनला तोंड लावून कोक पिताना सर्रास दिसतात. धोतरातले किंवा पंच्यातले आजोबा असे करताना दिसणारच नाहीत. आमचे कोंकणातले आजोबा संध्याकाळी सहा वाजले की पाटलाच्या टावरानावर जात.(टॅवर्न हा शहरी शब्दं) दोनचार चणे तोंडात टाकत काचेच्या ग्लासातल्या पांढर्याशुभ्र माडीत आपली दोन बोटे बुडवत. आणि मग टिचक्या मारून आपल्या पूर्वजाना माडीचे तुषार अर्पण करत. कोकणी संस्कृती टिकवली ती अश्या पंचातल्या, पूर्वजांनाही माडीचे अर्घ्य वाहणार्या आजोबांमुळे. म्हणजे खरा दोष त्या कोकच्या टिनचा आणि थ्री फोर्थचा. आजही आजोबांनी पंचे किंवा धोतर नेसले असते तर खरी भारतीय संस्कृती टिकली असती असे मला वाटते. प्रा डॉ साती काळे.

दोनचार चणे तोंडात टाकत काचेच्या ग्लासातल्या पांढर्याशुभ्र माडीत आपली दोन बोटे बुडवत.
आणि मग टिचक्या मारून आपल्या पूर्वजाना माडीचे तुषार अर्पण करत.

=))

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2014 - 9:04 pm | टवाळ कार्टा

, =))

प्रदीप's picture

18 Sep 2014 - 2:13 pm | प्रदीप

.

आदूबाळ's picture

17 Sep 2014 - 8:44 pm | आदूबाळ

नखाने टचस्क्रीन??

तेच ना!! मी सुद्धा एकदा मॅनीक्युअर केलेल्या नखात टचस्क्रीन बुडवून बुडवून भाजी खायचा प्रयत्न केला होता. पण मॅनीक्युअरमध्ये मीठ जास्त पडल्याने भाजी खारट झाली.

-सुजया

मीही हल्ली मल्टीप्लेक्स / मॉल मधे थ्री-फोर्थ, फंकी टी-शर्ट घातलेल्या अनेक आजोब्यांना पाहतो, तो किती तरी लांबलचक हेडफोन आणि नातवंडांना दोनच चीज बर्गरांमध्ये कटवायची मानसिकता.

मला तर असे आजोबे सहनच होत नै.

हे सर्व होतंय मराठी सिनेमांना दिलेल्या शास्कीय अनुदानामुळे. बाकी कै नै.

- फिलीप करू-ते

अजया's picture

17 Sep 2014 - 9:19 pm | अजया

=))

जीन्स घातली होती का? नायतर फाऊल आहे. नुस्ती म्यानिक्यूर्ड नखं असून काय उपेग?
-खुदुखुदु बाळ

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 2:09 pm | बॅटमॅन

=))

मार्क ट्वेन's picture

17 Sep 2014 - 9:32 pm | मार्क ट्वेन

आमच्याकडे आजोबा कध्धीच थेट्रात न्यायचे नाहीत. नेहमी आजीच न्यायची.
या चिमुरड्याची आजी का बरे थेट्रात नेत नाहीये? किती बर त्या आजोबांनी करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावते सेक्सी आजोबा हवे असतात. त्यांनी गचाळ राहुन चालत नाही. वर त्यांनी कमवुन आणलेले पैसे स्वतःच थेटरात जाउन उडवायचे. आजी काय बरे करत असतील? कोठे मैत्रिणींबरोबर अड्डा जमवला असेल? की सांस-बहू बघत बसली असेल? घरी रामरक्षा वगैरे संस्कार या आज्यालोक करत असतील का? पिक्चर बघताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी त्याच्या आजीने घेउ नये? कोणी सांगितलय वाती वळायला?

स्पंदना's picture

18 Sep 2014 - 8:21 am | स्पंदना

त्या आज्याही तसल्याच!!
आजकाल बसल्या असतील सिरियली लावुन. मग नको असतात त्यांना आजोबा अन नातवंडे.

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2014 - 9:57 pm | पिवळा डांबिस

येस!
आय अ‍ॅम अ‍ॅन आजोबा!
आय हॅव अ फंकी टी-शर्ट!
आय हॅव अ थ्री-फोर्थ!!
मिपा हॅज अ प्रॉब्लेम?
-डांबिस नैतरकोण
:)

आदूबाळ's picture

17 Sep 2014 - 10:07 pm | आदूबाळ

:))

एक नंबर!

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 12:51 am | बॅटमॅन

डांबिस नैतरकोण>>> =)) _/\_

सौ सोनार की एक लोहार की.

सॉलिड डांबिस प्रतिसाद. _/\_

तिमा's picture

18 Sep 2014 - 1:55 pm | तिमा

डांबिस नैतरकोण

'पिवळा पडुकोणीस' अशी सही हवी होती.

यसवायजी's picture

18 Sep 2014 - 7:28 pm | यसवायजी

पाडुकोणास? :))

काळा पहाड's picture

17 Sep 2014 - 11:04 pm | काळा पहाड

एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

पैसा's picture

18 Sep 2014 - 2:08 pm | पैसा

आजोबाची थ्री फोर्थ लो वेस्ट होती का? ती गळून पडली तर तो शरमेल. तुम्ही कशाला शरमताय? आँ?

काळा पहाड's picture

17 Sep 2014 - 11:18 pm | काळा पहाड

(प्रा.डाँ.ची माफी मागून असं कसं चालु दे.... नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय)

अजोबा एक
नाव असतं
मल्टिप्लेक्शच्या मल्टिप्लेक्शमधे
थ्रीफोर्थ घातलेलं थेटर असतं !
पिच्चर पहायला जातो टचस्क्रीन सह तेव्हा
पहावत नाही,
सीट असली कुठंही तरीही
बसवत नाही
३ चीज बर्गर
२ बटर पॉपकॉर्न
मौ-मौ सीटवर
२ कोक ढोसले जातात.

अजोबा असतो
एक हेडफोन चा स्पीकर
चिमुरड्यासह पहाणारा
हमशकल्स वाला पिच्चर

अजोबानं कसं आज्जासारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 2:09 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

चित्रगुप्त's picture

19 Sep 2014 - 11:20 pm | चित्रगुप्त

असाच एक आजोबा आणि नातू:
.

नातवाबरोबर अस्मादिक.

यसवायजी's picture

20 Sep 2014 - 5:25 pm | यसवायजी

आजोबा, फोटो दिसत नाही.

१००मित्र's picture

21 Sep 2014 - 9:10 am | १००मित्र

चित्रगुप्त.... फोटो "गुप्त" की "लुप्त" ...?

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2014 - 10:41 pm | चौथा कोनाडा

सही विडंबन ! फर्मास ! मजा आ गया !

मज्जा येत होती वाचायला. अजून लांब भारी वाटलं असतं नक्की.

पण खराय.तसं सगळं कंडीशनल झालंय खरं हल्ली. पण आपण जे भोगायचो, ते पण पूर्वीच्या मंडळींना बोअर वाटत असेलच की. चेंज इस द नेम ऑफ द गेम बॉस !

पर लिवलंय लय भारी. फकस्त सिटी प्राईड च्या ऐवजी "शिटी" कसं वाटेल ?
(काहितरी सूचना करणे हा खरा पुणेकराचा धर्म आहे.... कळलें ?)