चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 9:58 am

गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले. साधारण ४०-६० मिनिटांचा प्रवास वेळ कमी झालाच पण प्रवास सुसह्य झाला. आणखी एक जमेची बाजु म्हणजे आता पावसाळ्यात रस्त्यात पाणी भरले असेल का ही धास्ती बाळगावी लागणार नाही!

पूल कधी संपला आणि कुर्ला पश्चिमेत कधी पोचलो ते समजलेच नाही, मात्र पोचल्यावर प्रश्न पडला की अवघा २.९ किमी उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा अंत पाहत, वेळ, इंधन यांची नासाडी करत व नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी उघड्या डोळ्याने पाहत शासनाने दहा वर्षे का घालवली? यातुन बोध घेत यापुढील सर्व प्रकल्प वेळेत पुरे व्हावेत यासाठी सर्व शासकिय यंत्रणा आगाउ पाउले उचलतील का? अनेक शासकिय संस्था म्हणजे महापालिका, केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगर प्राधिकरण, लोहमार्ग आस्थापना यांचा मेळ साधण्यासाठी योग्य ते उपाय/ समन्वय संघटना निर्माण करणे आता अत्यावश्यक झाले आहे. निदान यापुढे तरी हे साध्य होवो ही ईच्छा!

समाजजीवनमानप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियामाहिती

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Apr 2014 - 10:42 am | निनाद मुक्काम प...

कुर्ल्यात माझे आईबाबा राहतात , त्यामुळे भारतात आलो की एक फेरी तेथे होतेच.
मनोहर जोशी खासदार असतांना ह्या पुलाचे काम सुरु झाले.
पण तेव्हा पासून ह्या कामाला नकटीच्या लग्नाला ... असेच स्वरूप प्राप्त झाले ,
आमच्या ऐकण्यात अनेक गोष्टी आल्या.
मूळ प्रकल्पानुसार हा पूल कुर्ला स्टेशन वरून जाणार होता. ह्यामुळे कुर्ला स्टेशन जवळील वेस्ट मधील एक मशीद , गणपतीचे जागृत देवस्थान व काही दुकाने जाणार होती.
आता ह्या सर्व लोकांनी एकत्र येउन धार्मिक दबाब आणून मूळ प्रकल्प खोळंबून ठेवला. त्यांची अनधिकृत बांधकामे सुरक्षित ठेवण्यासाठी मग मूळ प्रकल्प बदलून घेतला , त्यात सुद्धा आमच्याकडील राजकारण्याचे बाधकाम ,नवीन बांधलेली शाळा मध्ये आली व त्यामुळे परत प्रकल्पात बदल करण्यात आला.
सांताक्रूझ च्या बाजूने काम काही वर्षापूर्वी पूर्ण झाले होते.
शेवटी आज हा महामार्ग सुरु झाल्याची बातमी ऐकली.
ह्या महामार्गामुळे आमची कुर्लाची मोक्याची जागा अजूनच मोक्याची झाल्याची वंदता आहे.

पण आपल्याकडे पहिल्यापासूनच पंचवार्षिक योजना राबवल्या जातात.

खरे तर जवळ पास तब्बल ३ किमी लांबीचा पूल असल्याने ३ पंचवार्षिक योजना लागायला हव्या होत्या.

पण दुसर्‍याच पंचवार्षिक योजनेत काम पूर्ण झाले, ह्या बद्दल सरकारचे अभिनंदन.

नेहमीसारखे सुंदर फोटो असणार अशी अपेक्षा होती; पण :-(
सवडीने टाका फोटो - उड्डाणपुलावरून नेहमीपेक्षा वेगळं दिसतं जग!

तुमचा अभिषेक's picture

19 Apr 2014 - 1:45 pm | तुमचा अभिषेक

उड्डाणपूलावरून काढलेले नसले तरी आकाशातून उड्डाणपुलाचे काढलेले बरेच फोटो परवापासून वॉस्सपवर फिरत आहेत. जे तिथे आहेत त्यांच्यापर्यंत एव्हाना पोहोचले असतीलच.

भाते's picture

18 Apr 2014 - 11:24 am | भाते

सर्वसाक्षी यांचा धागा बघुन काही फोटो पाहायला मिळतील असे वाटले होते. पण मग लक्षात आले की रोजच्या ऑफिसला जायच्या गडबडीत ऊड्डाणमार्गावर गाडी थांबवुन फोटो घेणे शक्य नाही. काही सेकंद गाडीचा वेग जरासा कमी केला तरी पाठीमागुन कर्कश्य भोंगे ऐकुन कानाचे पडदे बधिर होतिल.
जमल्यास, सुट्टीच्या दिवशी वेळ काढुन मुद्दामुन जाऊन फोटो काढा अशी आग्रहाची विनंती.

चेम्बुर सांताक्रुझदेखिल आज चालु होईल. पर्फेक्ट टायमिंग ?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2014 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

@ मात्र पोचल्यावर प्रश्न पडला की अवघा २.९ किमी उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा अंत पाहत, वेळ, इंधन यांची नासाडी करत व नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी उघड्या डोळ्याने पाहत शासनाने दहा वर्षे का घालवली? >>> धंदा है भाई धंदा..इन हरामियों का धंदा!!

शुचि's picture

19 Apr 2014 - 12:37 am | शुचि

साकीनाका तर बॉटलनेक होता बरोबर?

स्पंदना's picture

19 Apr 2014 - 4:52 pm | स्पंदना

करनेकी! बोले तो किधर है साकीनाका पुछना पडता।
बोले तो सब बिल्डींग एकदम गायब। एकदम फुटबॉल स्टेडीयम हुएला है! वो पॅरामाउंट हस्पिटलही एकदम गायब।
रास्ता सिध्धा मेन लँड चायना के आगे।

कवितानागेश's picture

19 Apr 2014 - 10:09 am | कवितानागेश

ही बातमी ऐकून 'हुश्श...' करायची पण ताकद नाहीये. ज्याम पकवलंय त्या रस्त्यानी.
संध्याकाळी ट्रॅफिकमुळे कित्येकवेळा कलिन्यापासून कुर्ला स्टेशनपर्यंत चालत आलेय... :(

इरसाल's picture

19 Apr 2014 - 12:37 pm | इरसाल

२४ एप्रिल ची नांदी तर नाही ?

स्पंदना's picture

19 Apr 2014 - 4:54 pm | स्पंदना

झक्कास ढंप्याराव!! बोले तो चकाचक!

ढंप्या's picture

19 Apr 2014 - 6:17 pm | ढंप्या

हे फोटो चेम्बुर सांताक्रुझ रस्त्याचे आहेत............!!!

या फोटोवरुन पॄथ्वी गोल आहे हे सिद्ध होते. शिवाय हा उड्डाण पूल इतका उंच आहे की त्यावरुन पृथ्वी चे क्षीतीज रेशा गोलाकार वळताना दिसते.........

प्यारे१'s picture

20 Apr 2014 - 2:32 pm | प्यारे१

हे असलं सगळं गुजरात बद्दल बोलायचं हो विजुभौ!

म्हाराष्ट्राबद्दल नै. ;)

भाते's picture

20 Apr 2014 - 2:06 pm | भाते

लय भारी!