स्वेच्छानिवॄती

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
21 Jul 2008 - 8:19 pm

आदरणिय गुरु केशवसुमारांची निवॄती हे प्रकटन वाचले. ते वाचल्यावर म्हणलं चला आपणही प्रयत्न करावा

हा एक प्रयत्न...

टाळले मी ज्या सर्व कवितांना स्मरतो आहे
विडंबकाचे आज मी विडंबन करतो आहे

खर्‍या कवित्वाच्या त्या खोट्या वेटोळ्यातं
आत कुठेतरी विडंबक गुदमरतो आहे

अट्टाहास प्रतिमेतून सुटण्याचा का कळेना
खरच का मी विडंबनाला विटलो आहे

विडंबनातली ती मजाच् सारी निराळि
आठवुन हे सारे कवितेत कुढतो आहे

वॄत्तानुसार गझल विडंबकही करु शकतो
विडंबनाला मात्र मी का डावलतो आहे

मात्रेत कोलांट्याउडया पुर्वी मी ही मारल्या
विडंबनाचा मात्र आज उपहास करतो आहे

प्रतिमेचा पिंजरानव्हे ही खरीखुरी प्रतिभा
नको ते मागणे, नको ती भलावणी का करतो आहे

साद घालते मला खुले आभाळ कवींचे
आज सोनेरी पिंजर्‍यात मी अडकतो आहे

(खिन्नसुमार) चेतन

अवांतरः ह. न. घ्या.

प्रतिशब्दविडंबनविचारशुभेच्छाप्रतिक्रियाप्रतिभा

प्रतिक्रिया

मला माहित नाही कशी सुधारायची पण त्या चालीत नाही बसत कविता..
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt