अनसंग हीरो

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
13 Apr 2013 - 2:34 pm

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली. कोणी म्हणतल की वॉर्न , गिलेस्पी, मॅकग्राक यांची कमी ऑस्ट्रेलिया ला जाणवत आहे. कोणी लिहिल की हेडन, लॅंगर, गिली यांच्या तोडीचे फलंदाज ऑस्ट्रेलिया ला मिळाले नाहीत त्यामुळे त्यांच साम्राज्य लयाला चालल आहे. पण या सगळ्या पोस्टमार्टम मध्ये एका बहाद्दराचा उल्लेख कुठेच आला नाही. पण तो तर ऑस्ट्रेलिया चा राजसूय चालू असताना पण कुठे येत नव्हता. वारंवार योगदान देऊन. अनेक मॅच विनिंग खेळ्या खेळून पण त्याला क्रेडिट कधी मिळालेच नाही. तो खेळाडू म्हणजे डेमीयन मार्टिन. तोच तो डेमीयन मार्टिन ज्याने पॉंटिंग सोबत 2003 मध्ये आपल्या विश्व चषक जिंकण्याच्या मन्सुब्याना सुरुंग लावला होता. 89 धावांची जबरी खेळी करून भारतीय गोलंदाजाना धूळ चारली होती. पण सर्व क्रेडिट घेऊन गेला आकर्षक खेळी करून गेलेला पॉंटिंग. 2004 मध्ये ३० वर्षानंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला त्यांच्याच देशात पराभूत करून बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरल तेंव्हा मॅन ऑफ द सिरीज होता डेमीयन मार्टिन.46 च्या सरासरीने फलंदाजी करून टीम ला अनेक मॅच जिंकून देण्याची कर्तबगारी गाजवून पण त्याची क्रिकेट चाहतयानी आणि माध्यम यानी कधी हवी तशी दखलच घेतली नाही. त्याची निवृत्ती पण अशीच दुर्लक्ष्याच्या धूक्यात गुर्फूटून गेली. मार्टिन चा दोष असलाच तर एवढाच की तो मैदानावर शांत असायचा. मैदानाबाहेर पण माध्यमांच्या पुढे यायला लाजायचा. एकदा मात्र आपल्याबरोबर जिंकल्यावर जल्लोष करताना त्याने पॉंटिंग सोबत शरद पवारना बाजूला व्हयला सांगताना त्यांच्याशी धक्काबुक्की केली होती त्यावेळेस राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यानी एका गाढवावर मार्टिन असे लिहून त्याची धिंड काढली होती त्यावेळेस मीडीया ने तो 'इवेंट' चांगलाच कवर केला होता. त्या मानी खेळाडूचा प्रसारमाध्यमांशी आलेला हा बहुतेक शेवटचाच सम्बन्ध. बाकी पॉंटिंग, हेडन आणि नंतर हसी आणि क्लार्क यांच्या तारंगणात हा धुमकेतू कायमच हरवून गेला.

असे अनेक अनसंग हीरो प्रत्येक क्षेत्रात असतात. कधी आपल्या अतिप्रकाशित सहप्रवाशामुळे तर कधी स्वतहाचे मार्केटिंग नीट न करता आल्याने हे अनसंग हीरो कधी लोकांसमोर येतच नाहीत.

भारतीय राजकारणमधला असाच एक सध्याचा अनसंग हीरो म्हणजे मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज चौहान. याने सतत दोन वेळा भाजप ला राज्यात सत्तेवर आणले. पण हे त्यांचे सगळ्यात मोठे यश नाही. बिमारु राज्यात गणना होणार्‍या मध्य प्रदेश सारख्या राज्याला या अपमानास्पद जागेवरून बाहेर काढण्याचा चंग यानी बांधला आहे. सध्या मध्य प्रदेश साडे अकरा टक्के ह्या दराने विकास दर नोंदवत आहे. मध्य प्रदेश लवकरच बिमारु मधून बाहेर पडेल अशी चिन्ह दिसायला लागली आहेत. पण हा शालिन मुख्यमंत्री कुठलाही गाजावाजा न करता आपले काम करत आहे. त्याने कधी मध्य प्रदेशी अस्मितेचे ढोल बडवले नाहीत किंवा कुणावरही खालच्या पातळीवर टीका करण्याच्या लोकप्रिय मार्गाचा अवलंब केला नाही. त्याच्या राज्यात अल्पसंख्य पण सुरक्षित आहेत हे विशेष. आता पण पुढच्या निवडणुकीत पण भाजप मध्य प्रदेश ची सत्ता टिकवेल असेच दिसत आहे. पण शालीनता, अभ्यासुपणा आणि पडद्या आड राहून काम करण्याची वृत्ती असल्याने बहुतेक पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ते कधीच नसतील.

मराठ्यानी मोगली जुलुमी सत्तेविरूद्ध दिलेला दीर्घ लढा इतिहासात अजरामर आहे. पण या इतिहासाचे गोडवे गाताना राजाराम महाराजना त्याचे फारसे श्रेय मिळालेले दिसत नाही. संभाजी महाराज शत्रू च्या हाती पडून मारले गेल्यावर मराठ्यांचा प्रतिकार पूर्णपणे मोडून पाडण्याची शक्यता होती. पण राजाराम महाराजनी दूर जिंजी ला जाऊन हा लढा चालू ठेवला. नुसता लढा चालू ठेवला नाही तर औरंगझेब च्या नाकी नौ आणले.

असे खूप जन आहेत. माझी लिस्ट. टेनिस मध्ये पॅटरिक रॅफटर आणि गोरान इवन्सेवीच. राजकारणात मनमोहन सिंघ (लोकांच्या शिव्या खायला तयार यासाठी), अभिनेत्यांमध्ये संजीव कुमार आणि आपला आवडता इरफान. आणि सगळ्यात महत्वच माझी आई. भले आपल्याला श्रेय मिळो ना मिळो आपल्यावर पडलेली जबाबदारी पार पाडणे एवढेच या अनसंग हीरो ना माहीत असते. भले याना माइक वर जबरदस्त भाषण ठोकाता येत नसतील, भले यांचे व्यक्तिमत्व आकर्षक नसेल किंवा स्वतहाचे मार्केटिंग करता येत नसेल पण या अनसंग हीरो मुळेच देशाचा गाडा नीट चालत असतो. हा अनसंग हीरो कुठेही आढळू शकतो. दमवणारी नौकरी करून घर संभालणारी एखादी गृहिणी, तुमच्या बाजूच्या खुर्चिवर बसणारा तुमचा मीतभाषी ऑफीस मधला सहकारी किंवा सकाळी उठून आरशात बघितले तरी तो दिसेल तुम्हाला. तुमचा अनसंग हीरो कोण आहे?

समाजजीवनमानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Apr 2013 - 2:49 pm | श्री गावसेना प्रमुख

माझी लिस्ट.
सुरेश कलमाडी:राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन

शरद पवारःकृषी क्षेत्राची भरभराट

ए राजा:लोकांना परवडेल अश्या दरात मोबाईल सेवा भ्रष्टाचार करुन का होईना उपलब्ध करुन दिली

जयस्वाल ,मनमोहन:लोकांना विज उपलब्ध व्हावी ह्या हेतुने घोटाळा करुन का होइना पन कोळसा उपलब्ध करुन देणे

अजुन कुणाला जोडता येइल तर बघा

पिंपातला उंदीर's picture

13 Apr 2013 - 2:53 pm | पिंपातला उंदीर

माझे मिसळ पाव वरचे अनसंग हीरो - गावसेना प्रमुख : )

दादा कोंडके's picture

13 Apr 2013 - 3:06 pm | दादा कोंडके

"मला प्रसिद्धी आवडत नाही, हे माझं वाक्य खूप प्रसिद्ध झालं" अशी ग्राफिटी वाचली होती.

लाल टोपी's picture

13 Apr 2013 - 4:44 pm | लाल टोपी

सुरीला आवाज आणि अनेक मधूर गाणी देउनही लता-आशा यांच्या भरभराटीच्या काळात येऊन गेलेल्या गयिकेला मिळावा तसा लोकाश्रय मिळाला नाही.

मदनबाण's picture

13 Apr 2013 - 5:46 pm | मदनबाण

कधी आपल्या अतिप्रकाशित सहप्रवाशामुळे तर कधी स्वतहाचे मार्केटिंग नीट न करता आल्याने हे अनसंग हीरो कधी लोकांसमोर येतच नाहीत.
खरयं मार्केटिंग करता येणे महत्वाचे आहे, जसे दुष्काळग्रस्त आणि तहानलेल्या राज्यात आयपीएल चे झाले.

अमोल खरे's picture

13 Apr 2013 - 6:05 pm | अमोल खरे

माझा अनसंग हिरो म्हणजे आपल्या मिपावरचा परा. बिचारा इतकं कळकळीने लिहितो तरी कोणाला त्याची कदरच नै.

प्यारे१'s picture

13 Apr 2013 - 6:46 pm | प्यारे१

ऑ????????

हे शिरेसली लिहिलंय? की तुम्हाला दुसरं कुणी अपेक्षित आहे?

कवितानागेश's picture

13 Apr 2013 - 7:53 pm | कवितानागेश

हेच लिहायला आले होते. ;)

आदूबाळ's picture

13 Apr 2013 - 6:37 pm | आदूबाळ

क्रिकेटः अनिल कुंबळे
इंग्रजी साहित्यः मनोहर माळगांवकर

बाकी आठवतील तसे टंकीन...

चावटमेला's picture

13 Apr 2013 - 7:38 pm | चावटमेला

क्रिकेट - रॉबिन सिंग
टेनिस - मायकेल चँग

कपिलमुनी's picture

14 Apr 2013 - 12:42 am | कपिलमुनी

जो मैदानावर भरपूर ओकायचा ..आणि खरट्यासारखा एकच शॉट फिरवयचा

दादा कोंडके's picture

14 Apr 2013 - 1:00 am | दादा कोंडके

आणि खरट्यासारखा एकच शॉट फिरवयचा

अगदी अगदी. :))

अर्धवटराव's picture

14 Apr 2013 - 1:29 am | अर्धवटराव

>>भारतीय राजकारणमधला असाच एक सध्याचा अनसंग हीरो म्हणजे मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज चौहान
+१

खास करुन दिग्गी राजा आणि उमा भारतीच्या नेतृत्वापासुन म.प्र.ची सुटका झाली. त्यानंतरच्या अस्थीरतेच्या वातावरणात म.प्र.ला सुशासन देण्याचा त्यांचा प्रयत्न विषेश उल्लेखनीय.

अर्धवटराव

मिपावरचे बरेचसे कवी मला अनसंग हिरो वाटतात.

मालोजीराव's picture

14 Apr 2013 - 1:33 am | मालोजीराव

मार्टिन बरोबर लैंगर आणि मायकल बेव्हन च पण नाव घ्यायला पायजेल राव
फ़ॉर्मूला वन मधे मिका हकिनन
स्विमिंग मधे अलेक्झाण्डर पोपोव्ह
इतिहासात शाहूजी महाराज थोरले

क्लिंटन's picture

14 Apr 2013 - 8:14 am | क्लिंटन

सध्या मध्य प्रदेश साडे अकरा टक्के ह्या दराने विकास दर नोंदवत आहे.

शिवराजसिंह चौहान चांगले काम करत आहेत हे राज्यातील रस्त्यांच्या आणि सुधारलेल्या वीज परिस्थितीवरून लक्षात येईलच.पण मध्य प्रदेश सरकार चांगले काम करत आहे म्हणून साडे अकरा टक्के जीडीपी वाढीचा वेग आहे.जीडीपी वाढीचा वेग जास्त आहे म्हणून मध्य प्रदेश सरकार चांगले काम करत आहे असे नाही.

इन जनरल, राज्याच्या जीडीपी वाढीचा वेग हे राज्य सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करायला तितकासा योग्य मापदंड नाही (जीडीपी देश पातळीवर बराच जास्त रेलेव्हन्ट आहे पण राज्य पातळीवर तितकासा नाही) याविषयी महिन्या-दोन महिन्यात मिपावर लिहायचा विचार आहे.

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2013 - 8:40 am | श्रीरंग_जोशी

माझ्या या प्रतिसादातील एक परिच्छेद इथे डकवतोय.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रालोआमध्ये आजच्या घडीला पंतप्रधानपदासाठी लागणारी पात्रता असणाऱ्या नेत्यांमध्ये मी जसवंतसिह यांना प्रथम स्थान देईन. १९९८ ते २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी जितक्याही जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या त्या यशस्वीपणे पार पाडल्या. उदा. नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, पोखरण अणुचाचणीनंतर पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांशी वाटाघाटी, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री वगैरे वगैरे. त्याखेरीज केंद्र सरकारची धोरणे ठरविण्यातही वाजपेयींचे उजवे हात ते समजले जात.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दुर्दैवाने त्यांनी दाखवलेल्या कर्तॄत्वापेक्षा कंदहारला अतिरेक्यांना स्वतः घेऊन जाणे या तथाकथित वाईट कामासाठीच अधिक ओळखले जाते.

लेखाची संकल्पना आवडली.

पैसा's picture

14 Apr 2013 - 10:04 am | पैसा

ज्यांना त्यांचे श्रेय पुरते मिळाले नाही अशा नावांचे उत्तम संकलन.

अभ्या..'s picture

14 Apr 2013 - 10:12 am | अभ्या..

सकाळी उठून आरशात बघितले तरी तो दिसेल तुम्हाला

हो. अगदी :(

शैलेंद्रसिंह's picture

14 Apr 2013 - 12:36 pm | शैलेंद्रसिंह

नरसिंहा राव हे माझ्या मते असेच अनसंग हिरो आहेत. १९९१ च्या सुधारणांचे श्रेय मनमोहन सिंग ह्यांना दिले जाते, पण त्याकाळात अल्पमतातील सरकार ५ वर्ष चालवुन सगळ्या आर्थिक सुधारणांना राजकिय भवितव्य प्राप्त करुन दिले.
बाबरी पतन नरसिंहा रावांनी मुद्दाम होऊ दिले ज्यामुळे त्या आंदोलनातली हवाच निघुन गेली. शतप्रतिशत भाजपाचे स्वप्न साकार होईपर्यंत मुद्दा चिघळत ठेवायचा अडवाणींचा डाव उधळला गेला.