तीन डझन सूक्ष्मकथा : एक लक्षवेधक , रंजक लेखनप्रकार

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
3 Mar 2013 - 1:33 am

दुसर्‍या एका संकेतस्थळावर एका वेगळ्याच लेखनप्रकाराबद्दल वाचायला मिळालं. कमीत कमी शब्दांत एखादी गोष्ट सांगून जाण्याच्या एका लेखनप्रकाराबद्दल.
त्याचं एक क्लासिकल उदाहरण दिलं जातं ते म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे ह्यानं केवळ सहा शब्दांत लिहिलेली एक कथा:-
"For sale, Baby Shoes, Never Worn." .
.
म्हटलं आपणही असं काही लिहून पाहुयात.
ह्यात थीम एकच; प्रत्येक वाक्याच्या मागं काहीतरी एक अध्याहृत घटना, कथा हवी. ती एका वाक्यावरून लागलिच डोळ्यासमोर यावी. मला पुढील काही गोष्टी सुचल्या :-
.
पुस्तकखरेदेसाठी रोजरोज उपाशी राहणं परवडणारं नव्हतं.
.
झिजलेल्या चपला दडवत व्याह्यांकडे टाकलेले आशाळभूत स्मित.
.
अजगराच्या मिठीत गळाठलेले मृतप्राय हरीण
.
स्फोटानंतरः- हो, माझाच तर हात तो!
.
नवर्‍यासोबत असल्यानं तिनं बाजूलाच असूनही त्याला ओळखही दाखवली नाही.
.
जाहिर सत्कार होतानाही त्याला खर्‍या कर्त्याची आठवण पुसता आली नाही.
.
गर्दित खेटल्यावर आपल्याच मुलीचा दिसलेला तो चेहरा.
.
आता तो पोलिसांपासून दूर, निवांत होता.
.
अंत्यविधी(दहनामुळं) संपल्यानं पुरावा नष्ट झाला होता.
.
कवळी बसवतानाही आठवत असलेला रम्य मधुचंद्र.
.
तंत्रज्ञानामुळं का असेना तो बाप बनलाच.
.
शेवटी एकदाचा पाळणा हलला.
.
ओकारीतून सांडलेले घोट नि हास्याचा फवारा.
.
पुन्हा खालमानेनं तो उकिरड्यातलं खरकटं अन्न शोधू लागला.
.
आज पुन्हा डझनभर दारुडे तिच्यावर चढणार होते.
.
नलिनी त्याच्या बाहूंत असतानाच मनिषाचाही आलेला कॉल.
.
रसाळ ट्याहॅच्याऐवजी निष्प्राण बाहेर आलेला मृतदेह.
.
जबरदस्तीनं सुन्नत होउनही विठूचच नाव ओठांवर.
.
तिच्या अगतिकतेवर हसत त्यानं गोलाई हाताळली.
.
लेकराचय जीवाकडे पहात तिनं मांड्या फाकवल्या.
.
ऐसा मत समझ पीके बोल रहा हूं
.
पेढा भरवताना त्यानं सारं श्रेय पालकांनाच दिलं.
.
तुझं गुपित हे ; गुपित ठेवण्या॑त माझा काय फायदा?
.
अरेरे आजपासून तिसर्‍याही मुलीचाच बाप म्हणवून घ्यावं लागणार.
.

आता अजून काही परिचित वाक्ये :-

मै तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हू
.
म्हणून सांगते शेखर मला विसरून जा. (courtsey :- "माझे पौष्टीक जीवन" -- पु ल )
.
शत्रूच्या ह्या सुवर्णमोहरा तुझ्याकडे कशा?
.
रश्मी तर म्हणाली तू तिच्याकडे काल झोपायला नव्हतीस.
.
मुलासकट त्याने तिला स्वीकारले होते.
.
"इन्स्पेक्टर सायेब तो खरच त्यो याक्सिडेंट व्हता."
.
काय? नापास झाला म्हणून आत्महत्या??!!
.
मुलाचे मामा मुलाला आणा
.
शरीराने नाही पण मनाने मी त्याचीच झालिये.
.
आजन्म अविवाहित राहण्याची हा शंतनुपुत्र प्रतिज्ञा करीत आहे.
.
हे दशरथा, तुलाही तीव्र पुत्रशोक घडेल.
.
केशवा, माझ्या आप्तांस मी कसा मारु?
.
तू केलेल्या तपोभंगाबद्दल हा शाप, मेनके.
.

आता काही चितपरिचित, इतिहासप्रसिद्ध सूक्ष्मकथा:-
you too Brutus?
.
'Able was I ere I saw Elba'
.
काका मला वाचवा.
.
देवा त्यांना माफ कर.
.
ह्या संन्याशाच्या पोरांना वाळीतच टाका.
.
आम्ही वडीलमस्तकी असता चिंता कोण गोष्टीची?
.

तुम्हालाही अशा काही सुचतात का? वरच्या कथा कशा वाटल्या हे ही कळवा.
.
--मनोबा

कथामुक्तकविचारप्रतिसादविरंगुळा

प्रतिक्रिया

यावरनं एक सुचली :

`करून गेला सारा गाव, कागदोपत्री आमचं नांव'

आदूबाळ's picture

3 Mar 2013 - 1:50 am | आदूबाळ

झिजलेल्या चपला दडवत व्याह्यांकडे टाकलेले आशाळभूत स्मित.

ही कथा भयंकर आवडली!

शुचि's picture

5 Mar 2013 - 2:47 am | शुचि

असेच म्हणते.

दादा कोंडके's picture

3 Mar 2013 - 1:59 am | दादा कोंडके

पहिली काही वाक्यं (कथा) वाचून वाईट वाटलं त्यामुळे पुढच्या विनोदी वाक्यांची मजा घेउ शकलो नाही.
पण कल्पना मस्तच.

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2013 - 2:05 am | संजय क्षीरसागर

म्हंजे मजा येईल

नीलकांत's picture

3 Mar 2013 - 8:12 am | नीलकांत

सामान्यतः सलग वाचनात एखादेवेळी या वाक्यांचा परिणाम एवढा जाणवला नसता. तेवढा परिणाम अशी सुटी वाक्य देऊन साधलाय. प्रत्येक वाक्य आपला ठळक रंग घेऊन आहे.

खटपट्या's picture

3 Mar 2013 - 9:03 am | खटपट्या

खूपच छान

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2013 - 9:15 am | श्री गावसेना प्रमुख

नवर्‍यासोबत असल्यानं तिनं बाजूलाच असूनही त्याला ओळखही दाखवली नाही.
आजकालच हे जनरल
थोडक्यात पण पानभर

नगरीनिरंजन's picture

3 Mar 2013 - 9:31 am | नगरीनिरंजन

छान! बर्‍याच लिहील्या आहेत आणि त्यातल्या बर्‍याचशा आवडल्या.
काही कथा लिहीण्याचा माझाही प्रयत्नः

१. माझ्या अटेंशन स्पॅनसाठी सूक्ष्म कथाच बर्‍या वाटतात ब्वॉ; कोण त्या लांबलचक लघुकथा वाचत बसेल?

२. ऑफिसातून आल्या आल्या, फोन करून न कळवताच घरी येऊन बसलेली सासू पाहून तिचा पारा चढला.

३. रस्त्यात पडलेली पन्नासची नोट त्याने बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने उचलून खिशात घातली आणि सिग्नलवर बसलेल्या लंगड्या भिकार्याला वळसा घालून रस्ता ओलांडू लागला.

४. "ईईईई..मला नाही आवडत पोळीचा लाडू", पाय आपटत रोहन आजीला म्हणाला, " मला कॉर्नफ्लेक्स पाहिजेत!"

५. शेजारचा जोशी नवीन गाडीचे पेढे देऊन गेल्यावर तो बराच वेळ पेपरमध्ये डोकं खुपसून स्वयंपाकघरातले भांड्यांचे आवाज ऐकत राहिला.

शेजारचा जोशी नवीन गाडीचे पेढे देऊन गेल्यावर तो बराच वेळ पेपरमध्ये डोकं खुपसून स्वयंपाकघरातले भांड्यांचे आवाज ऐकत राहिला.

कमाल...

पैसा's picture

3 Mar 2013 - 12:02 pm | पैसा

अरे देवा, तू परत आलास?

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2013 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावर नवीन सदस्याचा धागा आला.

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2013 - 1:35 pm | संजय क्षीरसागर

धाग्याचा गुंताडा झाला!

सस्नेह's picture

3 Mar 2013 - 1:26 pm | सस्नेह

यापेक्षा बोली भाषेतल्या म्हणी जास्त परिणाम साधून जातात असं वाटतं. एका एका म्हणीत संपूर्ण कथा साठवलेली असते.
उदा. अगं अगं म्हशी मला कुठं नेशी
दिवस गेला रेटारेटी अन चांदण्यात कापूस पेटी इ.

पैसा's picture

3 Mar 2013 - 5:55 pm | पैसा

मनोबा आणि नगरीनिरंजन यांच्या लघुत्तम कथा पण मस्तच आहेत.

स्पंदना's picture

4 Mar 2013 - 6:38 am | स्पंदना

गुर्जी? आणि हिकडं?

मन छान लिहिलं आहे.

नगरी ते भांड्यांचा आवाज...एकदम मस्त.

निनाद's picture

4 Mar 2013 - 6:52 am | निनाद

एका वेळी एकच सूक्ष्मकथा देऊन त्यावर कथा रचायला सांगितले असते तर अजून मजा येईल.
याची मालिका होऊ शकेल.

तुमच्या सूक्ष्मकथा कुठायत?

निनाद's picture

4 Mar 2013 - 9:25 am | निनाद

'बेंचवर बसण्यापेक्षा सूक्ष्म देह धारण केलेला बरा असा धन्याने विचार केला.'

काही चांगल्या तर काही फारच ओंगळ वाटल्या, उगाच बडवुन ठोकुन सुक्ष्म केल्यासारख्या, म्हणजे स्वर्गातुन एक ग्रॅमचे दागिने आणल्यासारख्या. अर्थात हे माझं मत आहे. काही वाक्यं कथेला रिप्रेझेंट करत नाहीत, त्यामागं बरेच पर्याय सोडुन जातात.

पुर्वी गणेशानं एक धागा काढला होता त्यात वपुंच्या लिखाणात असायची अशी वाक्यं लिहुन काढली होती त्याची आठवण झाली. अर्थात वपुंपेक्षा हे फार बरं, त्यांच्या वाक्यातुन बराच काळ काहीच कळत नाही.

अर्थात वपुंपेक्षा हे फार बरं, त्यांच्या वाक्यातुन बराच काळ काहीच कळत नाही.

तुम्च्या प्रतीक्रीयांपेक्षा वपू परवडले, क्रिप्टिक प्रतिक्रियांची पण एक स्टैल असते. असो शिकाल हळू हळू

अग्निकोल्हा's picture

4 Mar 2013 - 10:26 am | अग्निकोल्हा

मिपाची ट्विटर अवृत्ति आता त्वरीत सुरु करवी ही शिफारस.

तर्री's picture

4 Mar 2013 - 10:30 am | तर्री

सवई प्रमाणे बंड्याने २०० काढले व तिच्या ब्लाउज मध्ये खोचले. आपण हनिमून ला आहोत हे जेंव्हा आठवले तेंव्हा तो चपापला. तेवढ्यात अर्धवट झोपेत ५० परत देत ती म्हणाली , जाताना रिक्षा ने जा आणि परत या !

संजय क्षीरसागर's picture

4 Mar 2013 - 1:00 pm | संजय क्षीरसागर

बंड्या बेसावध, हनिमून, दोनशे देतो, ती पन्नास परत देते, कपाळात!

स्पंदना's picture

5 Mar 2013 - 4:34 am | स्पंदना

तर्री?

कप्पाळ माझ!

बॅटमॅन's picture

5 Mar 2013 - 12:10 pm | बॅटमॅन

अगायायाया......प्राचीण जोक आहे म्हणा असा एक, तेची आटवन झाली ;)

तर्री's picture

4 Mar 2013 - 2:10 pm | तर्री

वर्गमूळ व घनमूळ शिकवून झाल्यावर गुरुजी म्हणाले आता मुळव्याध जाईल , इन्स्पेक्टर गप्पगार !

मराठी कथालेखक's picture

8 Apr 2016 - 5:19 pm | मराठी कथालेखक

मस्तच :)

सुबोध खरे's picture

4 Mar 2013 - 8:52 pm | सुबोध खरे

एक म्हातारी लहानपणीच मेली

आमावस्येच्या रात्री बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना एकटाच त्या जुन्या वाडयात झोपलेल्या राहूलला एका भेदक किंकाळीने जाग आली.

'तिचं फेसबूक स्टेटस् अजूनही सिंगलच आहे'

तिच्या नातवांना, तिचे फेसबुक स्टेटस सिंगल पाहुन मजा वाटली.

तुमचा अभिषेक's picture

5 Mar 2013 - 4:02 pm | तुमचा अभिषेक

त्याला आता तिच्या आधाराची गरज नाही, हे लक्षात येताच ती खचली.!

तुमचा अभिषेक's picture

5 Mar 2013 - 4:05 pm | तुमचा अभिषेक

ती त्याला मारायला म्हणून जोडा काढायला गेली आणि अचानक तिला जाणीव झाली की आजवर ती अनवाणीच फिरत होती.

प्यारे१'s picture

5 Mar 2013 - 8:48 pm | प्यारे१

. आज पुन्हा त्याच्या मिठीत जाताना उमलणारा शहारा पुसायचा व्यर्थ प्रयत्न करत राहिले. नवर्‍याच्या इलाजासाठी पैसे देणार आहे तो!

. मिपाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला मी प्रतिसादच देणार आहे, तोही पहिला वहिला! ;)

मन१'s picture

12 Mar 2013 - 6:40 pm | मन१
मन१'s picture

12 Mar 2013 - 6:40 pm | मन१

सर्व वाचकांचे आभार.
विशेष आवडलेल्या सूक्ष्मकथा:-
ननिंची
शेजारचा जोशी नवीन गाडीचे पेढे देऊन गेल्यावर तो बराच वेळ पेपरमध्ये डोकं खुपसून स्वयंपाकघरातले भांड्यांचे आवाज ऐकत राहिला.
.
@स्नेहांकिता :-
हम्म. म्हणी प्रभावी असतात हे खरच.
.
@५०फक्त :-
कोणत्या बर्‍या वाटल्या; कोणत्या खटकल्या ते सांगितलत तर बरं होइल.
.
@अपर्णा अक्षय :-
तिच्या नातवांना, तिचे फेसबुक स्टेटस सिंगल पाहुन मजा वाटली.
आवडलं.
.
@तुमचा अभिषेकः-
त्याला आता तिच्या आधाराची गरज नाही, हे लक्षात येताच ती खचली.!
प्रभावी.
.
पुन्हा एकदा सर्व वाचकांचे आभार.

रातराणी's picture

7 Apr 2016 - 11:30 pm | रातराणी

भारी धागा.
एक माझी:
रात्रीच्या वेळी एकटीच बस स्टॉपवर उभी ती. तिच्यासमोर करकचून ब्रेक दाबत बाइक थांबवून त्यानं विचारल, "कुठे जायचंय, आपल्याला?"
काहीसं घाबरत तिनं उत्तर दिलं "घरी.."

चांदणे संदीप's picture

8 Apr 2016 - 12:08 am | चांदणे संदीप

कुठ जायचय आपल्याला? असं विचारल्यावर ती घाब्रेल नै तर काय?? ;)
=))

रातराणी's picture

8 Apr 2016 - 8:02 am | रातराणी

खी खी हे यू वॉना राइड म्हणल्यावर हसत हसत गेली असती नै?

राजू's picture

8 Apr 2016 - 11:39 am | राजू

माणसाचे मन अतृप्त असते कि इच्छा अपूर्ण राहतात?

कल्पवृक्ष लावूनी बाबा गेला.बाकीचे काका बोरी लावतात.

आणि राजसुखापुढे तिची ममता फिकी पडली!!!!!

मानसी१'s picture

8 Apr 2016 - 2:46 pm | मानसी१

फॉर सेल: न्यु बॉर्न झबली, टोपडी,sweaters,onsies
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काहीही दुख्खी नाही. भारतात मिळणार्या ५-७.५ पौंडाचे कपडे , माझ्या जन्मताच १० पौंडाच्या बाहुलीला झालेच नाही.
धावत जाउन आजीने मोठे कपडे आणले

गामा पैलवान's picture

8 Apr 2016 - 4:49 pm | गामा पैलवान

थोडक्यात आटपलं.
-गा.पै.

आदूबाळ's picture

8 Apr 2016 - 8:08 pm | आदूबाळ

किंवा...

"आवाज आला की निघूयाच..."

मराठी कथालेखक's picture

9 Apr 2016 - 5:05 pm | मराठी कथालेखक

"बघ , पोहोचवलं की नाही तुला वेळेवर झेंडावंदनाला ?", मुलाला बाईकवरुन उतरवताना दोनदा सिग्नल तोडल्याचं आणि एकदा चुकीच्या दिशेनं बाईक चालवल्याचं विसरुन तो अभिमानानं म्हणाला.

सिरुसेरि's picture

12 Apr 2016 - 6:52 pm | सिरुसेरि

त्याने गाडीवर लिहिले - "शेवटी मामाचीच केली "

किरण नाथ's picture

13 Apr 2016 - 4:30 pm | किरण नाथ

आजही ब्लन्क कौल आला कि तिचे डोळे पाणावतात.