शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
31 Jan 2013 - 8:25 am

परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता.

अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल.

असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता.

ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.'

खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती.

असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे.
--------------------------------------------------------------------------

(राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.)

संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.

इतिहासप्रकटनविचारआस्वादअनुभवमत

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

31 Jan 2013 - 8:30 am | स्पंदना

गो ब्राह्मण प्रतिपालक...

आता जर का राजमुद्राच जर अशी असेल तर तेथे विरोध येतोच कोठुन?

खरच काहीच्या बाही काढुन उगा नको ते वाद घालण्यापेक्षा, दुसरे काही विषय चर्चेला घेतले तर बर होइल. मग अगदी कुंकु सुद्धा चालेलं.

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 9:43 am | आजानुकर्ण

गो ब्राह्मण प्रतिपालक...

आता जर का राजमुद्राच जर अशी असेल तर तेथे विरोध येतोच कोठुन?

ही राजमुद्रा.यात कोठेही गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द दिसत नाही.

राजमुद्रा

हरे रामा! मी तर हरीतात्यांची आरोळीच इथे राजमुद्रा म्हणुन दिली की हो.
कान पकडा! कान!!माझा हो!

अँग्री बर्ड's picture

1 Feb 2013 - 4:31 pm | अँग्री बर्ड

गोब्राह्मणप्रतिपालक हि बिरुदावली ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज वापरत होते त्याप्रमाणे आपल्याला देखील वापरायला आवडेल असे छत्रपती संभाजी महाराजांनी एका पत्रात लिहिले होते. अधिक माहिती पुण्याचे पेशवे देऊ शकतात, किंबहुना मी हे त्यांच्याच एका प्रतिसादात वाचले होते.

आजानुकर्ण's picture

1 Feb 2013 - 10:14 pm | आजानुकर्ण

संभाजी, राजाराम, किंवा नंतरच्या कोणत्याच महाराजांनी गोब्राम्हणप्रतिपालक ही पदवी वापरली नाही असे ऐकले आहे. शिवाजीराजेही स्वतःला गोब्राम्हणप्रतिपालक म्हणवून घेत नसत असेही ऐकले आहे. मात्र शिवाजींना इतर लोक गोब्राम्हणप्रतिपालक म्हणत असावेत किंवा ती पदवी शिवाजींनंतर त्यांना चिकटली असा एक प्रवाद आहे. असो. संभाजीराजांचे ते पत्र किंवा पत्राचा संदर्भ पाहायला आवडेल.

चौकस२१२'s picture

4 Jan 2022 - 8:58 am | चौकस२१२

गोब्राह्मणप्रतिपालक
हे पत्रिकात्मक आहे हे मुद्दामून समजून न घेता राजकीय कारणासाठी जातीय तेढ वाढवण्यासाठी त्याला विरोध केला गेलं हे महाराष्ट्राचे दुर्दैव

रयतेचा धर्म = हिंदू
हल्ला करणारा केवळ सत्तेसाठी हल्ला ना करत रयतेच्या धर्मावर पण वार करीत होता म्हणून या रयतेचं प्रतीक म्हणजे , देवळे, पशुधन, आनि देवळाचे कारभार पाहणारे म्हणून प्रतीकात्मक ब्राहमण आणि या प्रतिकाच संरक्षण करणारा राजा एवढाच त्याचा अर्थ !

शिवाजी महाराजांचा आणि हिंदू धर्माचा संबंध नव्हतं वैगरे मुक्तफळे बी ग्रेडी बारामतीच्या भानामतीच्या ,मुखातून निघतात त्याचा हा प्रकार

पण जिथे " टूल किट" हेच आहे कि ३.५% ना झोडपा / सोप्पे आहे आणि राजय करा तिथे काय बोलणार
बाय द वे तो माझा " टूल किट" धागा कोणी चाणक्षणें उडविला कोण जाणे !

असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे.
शेवट असा करणे आवश्यक होते का ? ते सगळे कोते राजकारण आहे, हे सगळ्यांना माहित आहे.

सिद्धार्थ ४'s picture

31 Jan 2013 - 9:10 am | सिद्धार्थ ४

कहर आहे. अहो मी स्वतः ब्राह्मण आहे आणि मला जेंव्हा पासून आठवते तेंव्हा पासून माझ्या घरी माझी आई शिवाजी महाराजान विषयी सांगत आली आहे. महाराजान विषयी मला अत्यंत आदर आहे आणि ते कोणत्या जातीचे आहेत ह्याचाशी मला काही कर्तव्य नाही. आणि कोणाला तो असू नये. अशी मनसे हजारो वर्ष्यातून एकदा जन्मतात. शिवाजी महाराजांच्या नखाची सर जरी माझ्या अंगी आली तरी मी माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असे समजीन. तुम्ही कुठे संभाजी ब्रिगेड आणि त्यांची विचारसरणी घेऊन बसला आहात. सोडून द्या. जेंव्हा तुम्ही महाराज आणि त्यांचे कार्य जातीवादाला जोडलं तेंवा मी म्हणेन तुम्हाला शिवाजी महाराज कळलेच नाहीत. वरती aparna akshay म्हणाल्या तेच खरे. "खरच काहीच्या बाही काढुन उगा नको ते वाद घालण्यापेक्षा, दुसरे काही विषय चर्चेला घेतले तर बर होइल. मग अगदी कुंकु सुद्धा चालेलं "

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2013 - 9:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१००.

शैलेन्द्र's picture

31 Jan 2013 - 9:15 am | शैलेन्द्र

खर सांगायच तर शिवकालीन महाराष्ट्रात जाती होत्या पण तो जातीयवादी नव्हता, आणि तिच त्याची शक्ती होती. अनेक ब्राम्हण तलवार गाजवायचे, जिवा महाला नावाचा न्हावी तरबेज पटाइत होता.

जातीतुन जातियवाद चालु झाला तो पेशवाईत.

जातीतुन जातियवाद चालु झाला तो पेशवाईत.
आता दोन्ही संपला ना ? ना शनिवार वाडा ना सातारा ना कोल्हापूर
मग हे काय चाललंय ? ब्रिगेडी च? अन त्यांमागच्या "जाणत्या राजाचे"

कोणत्याही ३.% च्या घरात जर कोना ऐतिहासिक महान व्यक्तीचा फोटो असले आर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा.. बाजीरावांचा नाही

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 9:40 am | आजानुकर्ण

अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल.

जर शिवाजीराजांच्या पूर्वी भारत शतकानुशतके पारतंत्र्याच्या अंधकारात होता, आणि त्यामुळे महाराष्ट्रील ब्राम्हणांची राज्याभिषेक करायला मिळण्याच्या संधीची अनुपलब्धता होती तर तीच अनुपलब्धता भारतातीलच गागाभट्टांना लागू होत नाही काय? की त्या काळात उत्तरेत काही राज्याभिषेक करण्याच्या संधी गागाभट्टांना मिळाल्या होत्या?

प्रचेतस's picture

31 Jan 2013 - 9:50 am | प्रचेतस

हो.

उत्तरेतल्या औरंगजेबाच्या मांडलिक राजपूत राजांपैकी काही जणांचे राज्याभिषेक गागाभट्टांनी केले होते.

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 9:52 am | आजानुकर्ण

माहितीबद्दल आभारी आहे

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 9:50 am | आजानुकर्ण

प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत.

मला वाटते राज्याभिषेक ही प्राविण्याची गोष्ट नसून procedure ची गोष्ट असावी. येथे तलवारबाजीशी तुलना चुकीची वाटते.

उदा. पुस्तक वाचून पोहता येणार नाही, मात्र गणपती प्रतिष्ठापना नक्कीच करता येईल. त्याचप्रमाणे पुस्तक वाचून तलवारबाजी करता आली नाही तरी राज्याभिषेक करता यावा.

शिवाजीमहाराज जातीयवादी होते यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र हे सिद्ध करण्यासाठी वापरलेले एकंदरीत argument चुकलेले वाटते.

सृष्टीलावण्या's picture

31 Jan 2013 - 12:21 pm | सृष्टीलावण्या

मला वाटते राज्याभिषेक ही प्राविण्याची गोष्ट नसून procedure ची गोष्ट असावी.

प्राविण्याशिवाय प्रोसीजर करता येते आणि ती पण राजाभिषेकासारखी, अत्यंत तोलामोलाची, हे माहित नव्हते. असो. बाकी चालू द्या.

यसवायजी's picture

31 Jan 2013 - 10:56 pm | यसवायजी

पुस्तक वाचून पोहता येणार नाही, मात्र गणपती प्रतिष्ठापना नक्कीच करता येईल

म्हंजे पहा.. लग्नातले विधी करणारे वेगळे.. आणी 'घाटावरचे विधी' करणारे वेगळे.. घाटावरच्यांना लग्नात नेऊन कसे चालेल??
बर त्यावेळचे इथले, प्रतिष्ठापना एकवेळ वाचुन करतील, पण म्हणुन काय आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?

सृष्टीलावण्या's picture

1 Feb 2013 - 9:45 am | सृष्टीलावण्या

आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?

१०० टक्के सहमत. जातीद्वेषाचा आधुनिक चष्मा लावून शिवरायांनी घेतलेले अनेक निर्णय चुकीचे कसे होते हे सांगण्यासाठी काही मंडळी इतका केविलवाणा अट्टाहास का करतात तेच कळत नाही. विशेषकरून एऱ्हवी ज्यांच्याकडून सुसंगत विचारांची अपेक्षा करावी ते पण असे कसे लिहितात कळत नाही.

गवि's picture

1 Feb 2013 - 10:32 am | गवि

बर त्यावेळचे इथले, प्रतिष्ठापना एकवेळ वाचुन करतील, पण म्हणुन काय आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?

तत्समच लहानपणापासून आम्ही गावाकडे लग्नसणादि खास प्रसंगी, गावातली कापडपेठ सोडून "बाँबेवरुन कापडं" आणतोच की..

पिंपातला उंदीर's picture

31 Jan 2013 - 9:52 am | पिंपातला उंदीर

सर्वसामान्य ब्राम्हण जरी कधीही शिवरायांच्या विरुद्ध नसला तरी काही धार्मिक मुखंड नक्कीच वेगळा विचार करणारे होते यात शंका नाही. राजर्षी शाहू महाराजना पण या मुखंडानचा फटका बसला होता.

सृष्टीलावण्या's picture

31 Jan 2013 - 12:24 pm | सृष्टीलावण्या

काही धार्मिक मुखंड नक्कीच वेगळा विचार करणारे होते यात शंका नाही.

ते कसे काय बुवा.. इतकी खात्रीशीर विधाने करण्याचा आधार काय...

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2013 - 10:00 am | अत्रुप्त आत्मा

@महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनाराजाभिषेकाचा विधी माहित नव्हता.>>> =)) =)) =)) प्रचंड विनोदि युक्तीवाद

मालोजीराव's picture

31 Jan 2013 - 11:45 am | मालोजीराव

....बुवांनी आन मी ५०० वर्षांपूर्वीच 'राज्याभिषेक कसा करावा' ,'तुमचा राज्याभिषेक तुम्हीच शिका' आणि '७ दिवसात राज्याभिषेक विधी शिका' असे लेख मिपा वर प्रकाशित केले होते.परंतु नेमकं १६७०-१६७५ या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे मिपाचा सर्वर डाऊन असल्याने विधी सापडला नसावा...!

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2013 - 12:11 pm | अत्रुप्त आत्मा

मालोजी....=)) ऐसे लिहोन...मजसी का मारिले तुंम्ही..हसवून हसवून =))

मालोजीराव's picture

31 Jan 2013 - 2:25 pm | मालोजीराव

खरंय बुवा....हसू नका...गागाभट्ट सायबानी आपले लेख ढापून एकत्र करून 'राज्याभिषेक प्रयोग ' ग्रंथ लिहिलाना ...आहात कुठे...अजून मानधन पोचला नाय...बुवा तुमी एकट्यानं नाय न खाल्लं ;)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2013 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवा तुमी एकट्यानं नाय न खाल्लं>>> =)) =)) बास.... बास अता. =)) =))

सृष्टीलावण्या's picture

1 Feb 2013 - 9:51 am | सृष्टीलावण्या

चाललेला संवाद वाचून एक कथा आठवली... एकदा एक गाढव आणि माकड परस्परांना उद्देशून म्हणतात, अहाहा काय तुझे सुंदर रूप, अहाहा काय तुझा स्वर्गीय आवाज...

कृपया ही करमणूक थांबवू नये ही विनम्र विनंती.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Feb 2013 - 12:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे

उंट उंट, माकड नाही. बाकी चालू दे.

बॅटमॅन's picture

1 Feb 2013 - 12:12 pm | बॅटमॅन

मूळ श्लोक असा आहे:

उष्ट्रानां च गृहे लग्नं गर्दभा: स्तुतिपाठका: |
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनि:||

च्यायला या विसर्गाचापण एक स्मायली झालेला दिसतोय =))

आणि स्मायली पण लै भारी झालीय. डोक्याला चावी मारमारून शेवटी झिंज्या उपटणारी.

बॅटमॅन's picture

1 Feb 2013 - 12:23 pm | बॅटमॅन

=)) झिंज्या उपटणारी नै तर डोक्यावर हात मारणारी :| =))

प्रचेतस's picture

1 Feb 2013 - 12:33 pm | प्रचेतस

थेट डोक्यावर पण नै. टू बी स्पेसिफिक-कपाळावर =))

बॅटमॅन's picture

1 Feb 2013 - 12:38 pm | बॅटमॅन

कपाळ-करवंटी ती हीच काय =)) =))

विकास's picture

1 Feb 2013 - 9:33 pm | विकास

चला या धाग्याच्या निमित्ताने काहीतरी शिकायला मिळाले. एक शब्द पण न लिहीता स्वतःच्या भावना कशा व्यक्त करायच्या ते!
:|
=))
ت

आनन्दिता's picture

1 Feb 2013 - 11:26 pm | आनन्दिता

आम्हाला पण शिकवा की ही स्मायली.... लै भारी आहे!!

सृ ला, विमे,ब्याट,वल्ली .....मानधनातील काही वाटा मिळेल या अपेक्षेनी जर तुम्ही बुवा आणि माझ्या संवादशृंखलेत आला असाल तर लक्षात असू द्या एक फुटकी 'शिवराई' हि मिळणार नाही कुणाला ! भट्ट सायबांकडून मानधन कसं काढून घ्यावं यावर सल्ले घेणारा /मागणारा रीतसर धागा येइलच त्यावर कायदेतज्ञांनी मते द्यावीत हि विनंती.
असो...बुवांबरोबर 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' हे जळजळीत सत्य बाहेर आणणारे पुस्तक लिहित आहोत.

प्रचेतस's picture

1 Feb 2013 - 12:38 pm | प्रचेतस

हॅहॅहॅ.
बाकी तुमच्याकडून आधीच एक अस्सल शिवराई मिळाल्यामुळे आम्ही तुमच्या ऋणात आहोत. :)
याउप्परी इतर कसल्याही मानधनाची जरूरी नोहे.

तुम्ही पुस्तके लिहाच, आम्ही त्यावर आधीच बंदी आणण्याची तितकीच जळजळीत घोषणा करीत आहोत =))

मग काव्यसंग्रह लिही !!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2013 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवांबरोबर 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?'
हे जळजळीत सत्य बाहेर आणणारे पुस्तक लिहित आहोत.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif मेलो मेलो ,मालो-जी राव ठार झालो http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

विकास's picture

1 Feb 2013 - 9:54 pm | विकास

'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' हे जळजळीत सत्य बाहेर आणणारे पुस्तक लिहित आहोत.

राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार शिवाजी महाराज नव्हतेच असे म्हणणे आहे का?

सृष्टीलावण्या's picture

2 Feb 2013 - 12:34 pm | सृष्टीलावण्या

नाट्यछटाकार दिवाकर म्हणतात, "भेंडीरमणाने उठावे, बटाटेनंदनाची स्तुती करावी, बटाटेनंदनाने पुढे यावे, भेंडीरमणाची वाहवा करावी, याने त्याला शेली म्हणावे, त्याने याला कीट्स म्हणावे! चालला आहे सपाटा! असे केल्याशिवाय जगात भागत नाही!"

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 10:01 am | आजानुकर्ण

येथे दोन दुवे मिळाले. हे दोन्ही लेखक मला माहीत नाहीत. मात्र दोन्ही लेखकांनी बी-ग्रेडी दाव्यांना थोडेसे समर्थन दिल्यासारखे वाटते.

१. social history of india पान 245 (<a href="http://books.google.com/books?id=Be3PCvzf-BYC&pg=PA246&lpg=PA246&dq=gaga... दुवा</a>
२. छत्रपती शिवाजी (ले. भगवानसिंग राणा) पान ७७ (दुव<a href="http://books.google.com/books?id=HsBPTc3hcekC&pg=PA78&lpg=PA78&dq=gaga+b...दुवा</a>

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 10:02 am | आजानुकर्ण

असो. गूगल बुक्स वर शोधता येईल

पहिल्या पुस्तकाचे लेखक एन सदाशिवन

प्रचेतस's picture

31 Jan 2013 - 10:06 am | प्रचेतस

दुवे दुरुस्त केलेत.

प्रचेतस's picture

31 Jan 2013 - 10:16 am | प्रचेतस

बाकी हे दोन्ही लेखक कितपत विश्वसनीय आहेत याची शंका वाटते.
मोडीशी परिचय नसल्यामुळे (अर्थात दफ्तरातील तत्कालिन मोडीतील साधनांविषयी परिचय न झाल्यामुळे ) विख्यात इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकारांनी शिवरायांविषयी कित्येक चुकीची विधाने केलेली आहेत (याविषयी बॅटमॅन अधिक सांगू शकेल).

तसेच या संशोधकांबाबत होणे सहज शक्य आहे.

बॅटमॅन's picture

31 Jan 2013 - 11:56 am | बॅटमॅन

भगवानसिंह राणा यांच्या पुस्तकातील एतत्संबंधी भाग सदाशिवन यांच्या पुस्तकातून उतरून घेतल्यागत वाटतोय. बाकी सदाशिवन यांच्या पुस्तकातील भाग पाहिला. सभासद बखरीची कॉपी केलीये बस्स. ५०,००० लोक वगैरे उल्लेख तिथेच आहेत. बाकी त्यांच्याच मते असेही दिसते, की जुनी मातब्बर मराठा घराणी शिवाजीमहाराजांचे स्वामित्व मानण्यास राजी नसण्याने त्यांनी तो कर्मठ दृष्टिकोन उचलून धरला. म्हणजे काही ब्राह्मणांमुळे नव्हे, तर मराठ्यांमुळे महाराजांना त्रास झाला असे दिसते त्यांच्या पुस्तकावरून!!! असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2013 - 11:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>विख्यात इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकारांनी शिवरायांविषयी कित्येक चुकीची विधाने केलेली आहेत

वल्लीशेठ, सर जदूनाथ सरकारांनी कोणकोणती शिवरायांविषयी चुकीची विधानं केली आहेत ? महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत कोणती मंत चूकीची वाटतात त्याची कारणं काय ? सर जदुनाथांची विधानं चूकीची आहेत कोणत्या संदर्भग्रंथावरुन सर जदुनाथांची मंत ही चूकीची आहेत, असा निष्कर्ष काढता येतो ? माहिती देता आली तर जरुर द्यावी.

सर जदूनाथांचं शिवाजी अ‍ॅन्ड हीज टाइम या पुस्तकातील राज्याभिषकाचं प्रकरण इतक्यात चाळलं आहे. (वाचलं नै हं)

-दिलीप बिरुटे

राज्याभिषेकाबद्दल असं नाही पण एकूणात महाराजांच्या चरित्राबद्दल जदुनाथ सरकारांनी समकालीन मोडीतील कागदपत्रांचा (मोडी येत नसल्याने) अभ्यास केला नाही. ते मुख्यतः इंग्रजी, डच, पोर्तुगीझ, फ्रेंच आणि फारसी कागदपत्रांवरच विसंबून राहिले. अस्सल मराठी साधनांशी परिचय न झाल्याने शिवाजीबद्दलच्या इतिहासात त्यांच्याकडून बर्‍याच त्रुटी राहिल्या आहेत.

याबद्दल नेमकी माहिती मजजवळ नाही म्हणूनच वर बॅटमॅन अधिक सांगू शकेल असे लिहिले आहे.

वल्ली त्या त्रुटी हि नाहीत आणि घोडचुका हि नाहीत...त्या गाढवचुका आहेत.शिवाजी महाराज-अफजलखान प्रकरणात शिवाजी राजांना खुनी ठरवणे ,शिवाजी महाराज आणि मराठे लुटारू होते असा निष्कर्ष काढणे या काही ठळक गाढवचुका होत.
बाकी सर जदुनाथ सरकार वर्ल्ड क्लास इतिहासकार होते यावर दुमत नाही

विकास's picture

31 Jan 2013 - 9:23 pm | विकास

शिवाजीने रामदासांकडून पण सल्ला घेतला होता असे म्हणलेले दिसले. हे पहील्यांदाच ऐकले...

सर जदूनाथ लिहितात काढा 'शिवाजी अ‍ॅन्ड हिज टाइम' पान नंबर २०२. ''जैसा की अंग्रेज राजदूत हेनरी ऑक्सिनडन ने कुछ व्यथापूर्वक लिखा है कि प्रतिदिन धार्मिक संस्कार और ब्राह्मनओ से परामर्श के पश्चात शिवाजी को अन्य कार्यो की देखभाल के लिए समय नही मिल पाता था | शिवाजी ने सर्वप्रथम अपने गुरु रामदास स्वामी और अपनी माता जिजाबाई की वन्दना की और उनके आशिर्वाद प्राप्त किये''

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2013 - 1:13 pm | llपुण्याचे पेशवेll

आणि पुढे तर he touched feet of his mother Jijabai and Teacher Samarth Ramdas असे पण लिहीले आहे. :)

अमोल केळकर's picture

31 Jan 2013 - 10:37 am | अमोल केळकर

नवीन माहिती मिळाली

अमोल केळकर
मला इथे भेटा

गजानन भास्कर मेहेंदळ्यांच्या "शिवाजी-हिज लाईफ अँड टाईम्स" या पुस्तकात आत्ताच राज्याभिषेकाचे प्रकरण पाहिले. त्यात ब्राह्मणांनी विरोध केल्याचे कुठे दिसत नाही. शिवाय गागाभट्टांशी महाराजांचा कमीतकमी १६६४ पासूनचा परिचय होता हे सिद्ध करणारा पुरावाही त्यात दिलेला आहे. त्यामुळे अचानक गागाभट्ट राज्याभिषेक करायला का आले वगैरेचा उलगडा होतो. काही लोकांनी बोंबा मारल्या आणि मग शिवाजीराजांनी घाईघाईत गागाभट्टांना बोलाविले असे नसून जुना जाणता परिचयाचा पंडित म्हणून बोलाविले आहे. राज्याभिषेक १६७४ ऐवजी नंतर किंवा आधी झाला असता तरी तेच आले असते असेही यावरून वाटते.

हे झाले अस्सल साधनांच्या आधारे केलेले कथन. मुळात ही विरोधाची कथा कुठल्या बखरीत आलीये ते पाहिले पाहिजे. समजा कुणी विरोध केलाही असेल, पण वर काहींनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी अशा फालतू अडथळ्यांना जुमानणारा पुरुष कधीच नव्हता. प्रत्येक प्रश्नावर तोडगा तयार असे त्यांच्याकडे- हे असले कर्मकांडाचे भंपक अडथळे त्यांना कधीच बांधून ठेवणे शक्य नव्हते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2013 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवाजी अशा फालतू अडथळ्यांना जुमानणारा पुरुष कधीच नव्हता. प्रत्येक प्रश्नावर तोडगा तयार असे त्यांच्याकडे- हे असले कर्मकांडाचे भंपक अडथळे त्यांना कधीच बांधून ठेवणे शक्य नव्हते.

राजेंच्या काळात समाजमनावर धर्मशास्त्राचा प्रचंड पगडा होताच. राज्याभिषेकासाठी राजे शिवाजी क्षत्रीय असण गरजेचं होतं. आणि हे क्षत्रीयपण सिद्ध करायला धर्मशास्त्राच्या पुस्तकाचे पठण करणार्‍या विद्वानांची आवश्यकता होती. भोसल्यांचं कूळ क्षत्रीय नव्हतं, शूद्र जातीत जन्मलेला माणूस एवढा अधिकारी कसा होऊ शकतो ही खूळचट कल्पना तत्त्कालीन काळातील विद्वानांच्या मनात येणं साहजिक आहे. आणि कर्मकांडाचा नाही म्हटला तरी राजेंवर चांगलाच पगडा दिसून येतो. गागाभट्टच एक असा विद्वान होता की राज्याभिषेकाच्या बाबतीत ब्राह्मण विद्वानांमधे राजे क्षत्रीय असण्याबद्दल एकमत होत नव्हतं. (एकमताचा अर्थ विरोध नव्हता असं म्हणायला इथे वाव आहे) तेव्हा राजे क्षत्रीयच आहे हे तत्त्कालीन पंडितांना ठासून सांगणारा एकमेव विद्वान गागाभट्टच होता. गागाभट्टचा आणि राजेंचा परिचय होताच. गागाभट्ट यांचे गुरुबंधू पैठणचे तेव्हा त्यांचं येणं जाणं इकडे होतंच. पण या गागाभट्टाला खरं पटवलं ते चतूर चिटणीस बाळाजी आवजी (विकिपिडियावर भर घालायची बाकी आहे) यांनीच. भोसल्यांची वंशावळ तयार करुन ते क्षत्रीय कसे आहे हे कागदोपत्री गागाभट्टांसमोर मांडले आणि त्यांनी राजे क्षत्रीय आहेत त्यांची कुळपरंपरा उदयपूरच्या राजपूत कुळामार्गे श्री प्रभूरामचंद्र यांच्या सूर्यवंशी कुळापर्यंत जाते. आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे एकमेव म्हणजे राजे श्री शिवाजी. गागाभट्टांनी क्षत्रीय असल्याची प्राथमिक घोषणा केल्यानंतर त्यांचा सन्मानही करण्यात आला. गागाभट्टांना राज्यभिषेकाला येण्याचं निमंत्रण दिलं गेलं आणि गागाभट्टांनी पुढे राजे कसे क्षत्रीय ठरतात ते येथील विद्वानांना सांगितलं, थोडक्यात येथील विद्वानांना त्यांनी गप्प केलं आणि मग राज्याभिषेकाचा सोहळा पुढे गेला.

बखरकाराचं आणि इतिहासकाराचं काही वर्णन वाचून मला मोठी मौज वाटते. भारतातल्या विद्वान ब्राह्मणांना या सोहळ्यास निमंत्रण देऊन बोलावण्यात आलं आणि रायगडावर अकरा हजार ब्राह्मण आपल्या सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्याला हजर झाले त्याची संख्या तुम्ही म्हणता तशी पन्नास हजाराच्या पुढे गेली. चार महिने विद्वान ब्राह्मणांचा रायगडावर मुक्काम होता काय मिष्ठांन्नाच्या पंगती, द्रव्य, अहाहा. असो.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

1 Feb 2013 - 11:03 am | बॅटमॅन

भोसल्यांचं कूळ क्षत्रीय नव्हतं, शूद्र जातीत जन्मलेला माणूस एवढा अधिकारी कसा होऊ शकतो ही खूळचट कल्पना तत्त्कालीन काळातील विद्वानांच्या मनात येणं साहजिक आहे. आणि कर्मकांडाचा नाही म्हटला तरी राजेंवर चांगलाच पगडा दिसून येतो.

मुळात माझा मुद्दा असा आहे, की निव्वळ काही पंडित म्हणतात म्हणून महाराजांनी राज्याभिषेक केलेला नाही. पंडितमन्य धर्माविरुद्ध जाऊन आपले म्हणणे त्यांनी खरे केलेले आहे, उदा. त्या काळात धर्मांतर म्हणजेच अब्रह्मण्यम् असूनही त्यांनी धर्मांतर करून घेतलेच ना नेतोजी पालकर आणि बजाजी निंबाळकरांचे! आता सभासद बखर वाचावी लागेल, पण प्रस्थापित मुखंड मराठा घराण्यांचे तोंड बंद करण्यासाठीच त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला असण्याची शक्यता जास्त वाटते.

बखरकाराचं आणि इतिहासकाराचं काही वर्णन वाचून मला मोठी मौज वाटते. भारतातल्या विद्वान ब्राह्मणांना या सोहळ्यास निमंत्रण देऊन बोलावण्यात आलं आणि रायगडावर अकरा हजार ब्राह्मण आपल्या सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्याला हजर झाले त्याची संख्या तुम्ही म्हणता तशी पन्नास हजाराच्या पुढे गेली. चार महिने विद्वान ब्राह्मणांचा रायगडावर मुक्काम होता काय मिष्ठांन्नाच्या पंगती, द्रव्य, अहाहा. असो.

लै लोक आले होते इथपर्यंत ठीक आहे, पण रायगडाचा साईझ पाहता पन्नास हआर लोक, तेसुद्धा ४ महिने राहणे अशक्य आहे.

योगप्रभू's picture

1 Feb 2013 - 12:46 pm | योगप्रभू

क्षत्रियत्वाच्या किंवा खानदानीपणाच्या मुद्यावरुन भोसले कुळाला कमी लेखण्याचा उगम कुठून सुरु झाला, याचाही एकदा विचार झाला पाहिजे. देशमुख पाटलांना आपल्याहून हलके समजतात, हे अगदी आजही दिसून येते. वेरुळची पाटीलकी मिळाल्यानंतरही बाबाजी पाटील यांच्या वारसांना हाच अनुभव आला. मालोजीराजांच्या पराक्रमावर खूश होऊन निंबाळकरांनी आपखुशीने मालोजीराजे भोसलेंशी सोयरीक केली तरी इतर देशमुखांनी मात्र भोसले घराण्याशी अढी ठेऊन वागण्याचे सोडलेले नव्हते.शहाजीराजेंची सोयरीक जाधवांशी जमवताना भोसल्यांना पुष्कळ त्रास झाला होता आणि अखेर आपल्या सरदारांत दुही माजू नये म्हणून अहमदनगरच्या निजामशहाने आणि त्याच्या दरबारातील मुत्सद्द्यांनी राजकीय गरजेपोटी त्यांचे मनोमीलन घडवले. मात्र पुढे दोन्ही घराण्यातील वैराग्नी उफाळून आलाच. त्याचे पडसाद शिवाजीराजेंच्या काळापर्यंत सुरु होते. भोसल्यांच्या पराक्रमाचा सूर्य तळपत असताना जाधवांनी बादशहाची चाकरी करणे पसंत केले. जातीच्या या हेव्यादाव्याला कंटाळून शहाजीराजेंनी बंगळुरु हे कायम वास्तव्याचे ठिकाण म्हणून पसंत केले. पुणे-सुपे जहागीर हक्काची असतानाही शहाजीराजे महाराष्ट्रात क्वचित आले. याचे कारण कधी तरी शांतपणे समजून घेतले पाहिजे. जो अनुभव शहाजीराजेंना, तोच शिवाजीराजांना आला. गावोगावचे देशमुख-इनामदार शिवाजीराजांना मानायला तयारच नव्हते. जावळीच्या मोर्‍यांनी शिवाजीराजांचा अपमान करताना 'तुम्ही काल राजे झाला आहात. स्वतःला राजे म्हणवून घेतल्याने कुणी राजा होत नसतो. आमचे तसे नाही. आम्ही पिढ्यानपिढ्याचे राजे आहोत.' अशा शब्दांत त्यांना दुय्यम लेखले.
शिवाजीराजांनी आपल्या हयातीत हा उच्च-नीचपणाचा वाद मिटवण्याची शर्थ केली. कधी धाक दाखवून, कधी गोडीगुलाबीने मन वळवून तर कधी घरच्या सोयरीकी करुन त्यांनी 'मराठा तितुका मेळवावा' धोरण चालवले, पण त्याला यश आले नाही म्हणूनच अनेक मराठा घराणी आदिलशहापासून मोगलांपर्यंत महाराजांच्या विरोधात लढत राहिली. इतपर्यंत तर ब्राह्मण विद्वानांच्या आगावपणाचा संबंधही नव्हता.
स्वतःचा पराक्रम सिद्ध करुनही महाराजांना राज्याभिषेकाची तीव्र गरज का भासत होती? शिवाजीसारखा व्यवहारी राजकारणी मुघल-रजपुतांसारखा डामडौलापोटी कोट्यवधी होनांची उधळपट्टी करणारा होता का? त्याचे कारण म्हणजे महाराजांच्या एक गोष्ट पक्की लक्षात आली होती, की भोसल्यांचे नेतृत्व मराठे आणि रजपुतांनी मानायचे असेल तर त्यांना अभिषिक्त राजा होण्यावाचून पर्यायच नव्हता. पुन्हा हा अभिषेक काशीच्या ब्राह्मणांनी केल्यास एकाचवेळी सगळ्यांचीच तोंडे बंद होणार होती. ब्राह्मणाला शिक्षा सुनावण्याचा अधिकार अभिषिक्त राजाला असतो. म्हणजे राज्याभिषेकाच्या एकाच कृतीमुळे शिवाजीराजे ब्राह्मण वतनदार, देशमुख मराठा व रजपूत अशा आपले नेतृत्व मानण्यास खळखळ करणार्‍या उच्चवर्णियांना स्वतःच्या हुकुमाखाली आणू पाहात होते. लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे याला ब्राह्मणांचीही संमती होती कारण असे होणे, हेच हिंदूधर्माच्या रक्षणासाठी काळाची गरज होती. रामदास-मोरोपंत पिंगळे-अनंतभट्ट कावळे व गागाभट्ट या ब्राह्मणांच्या भूमिकांकडे त्यासाठीच पाहिले पाहिजे.
शिवाजीराजांना ब्राह्मण शूद्र समजत होते, असा गलका केला जातो. राज्याभिषेकाच्या निमित्ताने हा मुद्दा मांडला जातो. एखाद्या गोष्टीचे स्वतःला हवे तसे इंटरप्रिटेशन कसे करावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शिवाजीराजांना राज्याभिषेक करायचा, अशी कल्पना गागाभट्टाने मांडल्यानंतर ब्राह्मणांनी धर्मशास्त्रातील शंका उपस्थित केली होती. त्याकाळी मुंजीचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना होता. राजांची मुंज झालेली नव्हती. उपनयन संस्कार झाला नसेल तर ब्राह्मणाचे पोरही शूद्रच ठरते, असल्या समजुतींचा तो काळ. त्यामुळे जर शिवाजीराजांवर हा संस्कार झाला नाही तर त्यांना क्षत्रिय मानायचे कसे? राज्याभिषेक करायचा कसा? पुढे जाऊन राज्याभिषेकात राजाचा विवाह पुन्हा एकदा राणीशी लावला जातो. मुंज झालेली नसताना सोडमुंज करायची कशी? अशा शंका ब्राह्मणांनी गागाभट्टांना विचारल्या. गागाभट्ट हे 'वेदोनारायण' होते. त्यांनी ब्राह्मणांच्या शंकांचे धर्मशास्त्राच्या आधारेच निरसन केले. राजांचे कुळ शिसोदिया रजपुतांपर्यंत जाते आणि लग्नात मुंज-सोडमुंज एकाचवेळी करता येते, असा पर्याय असल्याने राज्याभिषेकात काहीही धार्मिक त्रुटी नाहीत, हे गागाभट्टाने पटवून दिले.
बजाजी निंबाळकरांना स्वधर्मात घेतानाही असाच खल झाला होता, परंतु धर्मशास्त्रात शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्ताचा पर्याय असल्याचे एका ब्राह्मणाने दाखवून दिल्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जास्त खल केला नाही. एक चांगला पायंडा पडला, ज्याचा फायदा पुढे नेताजी पालकरांच्या वेळी झाला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा राजाला राज्याभिषेक होतो आणि तो छत्रपती होतो त्यावेळी असे प्रायश्चित्त देऊन सदर व्यक्तीला धर्मात घ्यावे, अशी आज्ञा तो देऊ शकतो. त्यासाठी धर्मशास्त्राची संमती घेण्याची गरज नसते. या अधिकाराचा वापर शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी केलेला आहे. एका बाटलेल्या ब्राह्मणाला प्रायश्चित्त देऊन स्वधर्मात घेण्यासाठी त्यांनी राजाज्ञा काढली होती व त्यानुसार घडलेही.
तत्कालीन समाज हा रुढी-परंपरा-धर्मशास्त्र-उच्च नीचता-सामाजिक चालीरीती यांना मानूनच चालत होता. शिवाजीराजे काय किंवा तेव्हाचा ब्राह्मण समाज काय, सगळे या मर्यादित परीघातच जगून गेले आणि त्यांनी जमेल तितक्या, जमेल तिथे सुधारणाही घडवल्या आहेत. चुकाही बर्‍याच झाल्या आहेत, पण मागच्या चुकांमधून शिकत पुढे जाण्याचा हा प्रवासही दुर्लक्षता येणार नाही. त्यामुळे ब्राह्मण विद्वानांवर भलत्याच बाबतीत जाळ काढणेही अप्रस्तुत ठरावे. विज्ञानाने डोळे उघडल्याने आपल्या पिढीला तर्कनिष्ठ विश्लेषणाचे शिस्तबद्ध शिक्षण मिळाले असले तरी आपण आजच्या काळाच्या कसोटीवर इतिहासातील घटना घासून बघणे अनुचित असते, इतकेच.

आजानुकर्ण's picture

1 Feb 2013 - 10:15 pm | आजानुकर्ण

सुंदर प्रतिसाद

अधिराज's picture

1 Feb 2013 - 10:16 pm | अधिराज

योगप्रभूजि खुप छान विचार मांडले हायेत तुम्ही, तेही कोणत्या एका बाजूची टीमकी न वाजवता. तुमचा इथला प्रतिसाद म्हंजे चिख्लात उगव्ल्यालं कमळ च जणू!

सुंदर प्रतिसाद. यातल बरचस मी वाचलय.
मुख्य म्हणजे जाधव घराण हे माझ्या माहेरचं. त्यामुळे बराचसा घराण्याचा इतिहास हेळव्यांकडे ऐकला आहे. हो हे खर आहे की जाधवांनी कायम कधी आदिलशहा, कधी बादशहा यांचीच चाकरी केली. जिजाउंच्या एकटं पडण्याचे कारण हे घराण्याचे एकमेकाला खाली दाखवण्याचे प्रकारच होते.

किसन शिंदे's picture

2 Feb 2013 - 8:46 am | किसन शिंदे

व्वा!! काय सुंदर प्रतिसाद दिलाय.!

फारएन्ड's picture

2 Feb 2013 - 1:09 pm | फारएन्ड

कोणत्याही काळात एवढ्या मोठ्या गोष्टींभवती क्लिष्ट राजकारण असतेच. राज्याभिषेकाबद्दल ते येथे खूप चांगले उलगडून दाखवलेले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2013 - 8:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या सोयीनं आपला विचार कसा गोलगोल लिहुन रेटता येतो त्याचा उत्तम नमुना म्हणजे वरील प्रतिसाद. 'शिवाजीराजांना ब्राह्मण शूद्रच समजत होते' हे सोडून महाराजांवर उपनयन संस्कार केल्यामुळे क्षत्रीय समजले जाणार होते हे वाक्य वाचून तर माझी खूपच करमणूक झाली. उपनयन संस्कार करुन एखादा 'शूद्र' 'क्षत्रीय' ठरला मला वाटतं जगाच्या इतिहासातले एकमेव उदाहरण असेल असे म्हणायला हरकत नसावी. आमच्याकडे वर्ण व्यवस्थेने ज्यांना 'शूद्र' ठरवले त्यांच्यावर उपनयन संस्कार करुन समस्त नागरिकांना योग्य त्या दरात योग्य त्या वर्णात प्रवेश दिल्या जाईल, अशा जाहिराती तेव्हा दिसल्या असत्या. असो.

गागाभट्टाने राजांना राज्यभिषेकाची कल्पना सूचवली हे वाचून तर काय बोलावे काही समजत नाही. मल्हारराव चिटणीस श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकराणात्मक चरित्रात लिहितात. [काही तरी संदर्भ असावा म्हणून लिहितो] ''राज्य करण्यास अंगे सात. राजा व प्रधान, राष्ट्र, दुर्ग व कोशबल, सुर्हुद्रूल, व सेना ही सात अंगे तशी सिद्ध झाली'' तेव्हा राजे शिवाजींनीच आपलं मनोगत आपल्या आईजवळ व्यक्त केलं. नंतर आईने आशिर्वाद दिला. रामदासांकडे तसा निरोप पाठविला. ''सर्व राज्यातील मोठे पंडित, विद्वान बोलावून व शिबिकादि याने पाठवून आणिले. सर्व सरकारकून व सरदार जमा केले. आप्त-सृह्त्त्संबंधी, इष्टमित्र यांस आणून, सभा करुन आपले मनोगत '' या उपरि या अन्वयें. छत्रसिंहासन करावे ऐंसे आहे, याचा विचार कसा करावा ?'' म्हणून स्वतः प्रश्न केला आणि सर्वांचे अनुमोदन घेतले. ''राज्यभिषेक करावा' ऐसे सिद्ध झाले.

आणि मग पुढे काय घडले ते पूर्वीच्या प्रतिसादात मी लिहिले आहेच.

''तत्कालीन समाज हा रुढी-परंपरा-धर्मशास्त्र-उच्च नीचता-सामाजिक चालीरीती यांना मानूनच चालत होता'' इतकेच वाक्य एवढ्या प्रतिसादातील पटण्यासारखे आहे. बाकी, चालू द्या.

-दिलीप बिरुटे

कुणावर आपले विचार लादण्यासाठी किंवा विशिष्ट अजेंडा रेटण्यासाठी मी या संस्थळावर येत नाही कारण मुळात मीच आजवर माझ्यावर विशिष्ट विचार लादून घेतलेले नाहीत. कुठल्याही कंपू आणि कळपात सामील न होण्याचे दुष्परिणाम सहन केले आहेत त्यामुळे 'आपल्या सोयीने' किंवा 'विचार रेटणे' हे शब्दप्रयोग मी माझ्याकडून नाकारतो. इतरांना काहीही म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे. असो.
केवळ इतकेच सांगावेसे वाटते, की इतिहास, बखरी, संदर्भसाधने मी लिहिलेली नाहीत आणि त्यावर अभ्यासपूर्ण लिहिण्याइतकी कुरुंदकर परंपरेची पात्रताही माझ्या अंगी नाही. शेकोटीला चारजण जमतात, शिळोप्याच्या गप्पा होतात, 'कुछ अपनी सुनाओ, कुछ मेरी सुनो', इतकेच माफक महत्त्व माझ्यालेखी.
जे विचार करमणूक करणारे असतात, ते गांभीर्याने घ्यायचे नसतातच. :)
इतरांना चालू देत. मी मात्र थांबतो.

मालोजीराव's picture

4 Feb 2013 - 12:17 pm | मालोजीराव

सुंदर प्रतिसाद योगप्रभुजी,
जावळीच्या मोर्यांचे उदाहरण हेच सांगते कि प्रस्थापित वतनदार सुरवातीच्या काळात शिवरायांना जुमानत नव्हते, अफझलखानवधा नंतरच सगळ्या वतनदारांच्या मनात शिवरायांविषयी विश्वासाची भावना निर्माण झाली.

बजाजी निंबाळकरांना स्वधर्मात घेतानाही असाच खल झाला होता, परंतु धर्मशास्त्रात शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्ताचा पर्याय असल्याचे एका ब्राह्मणाने दाखवून दिल्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जास्त खल केला नाही. एक चांगला पायंडा पडला, ज्याचा फायदा पुढे नेताजी पालकरांच्या वेळी झाला.

हा निर्णय सर्वस्वी शिवछत्रपतींनी घेतला त्यासाठी आधीच्या कोणत्याही घटनेचा दाखला घेण्याची गरज पडली नसावी.बजाजीराजे नाईक-निंबाळकर यांना स्वधर्मात घेतलेच नव्हते, कारण त्यांचे कधी धर्मांतर झालेच नव्हते.हि दंतकथा आहे त्यामुळे या कथेचा ऐतिहासिक संदर्भ म्हणून दाखला देणे उचित वाटत नाही.

योगप्रभू's picture

4 Feb 2013 - 1:08 pm | योगप्रभू

बजाजीराजेंना धर्मात घेतल्याचा प्रसंग हा दंतकथा आहे, हे मी यापुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद :)

योगेश कोलेश्वर's picture

3 Jan 2022 - 5:05 pm | योगेश कोलेश्वर

क्या बात है sir जी...वस्तुनिष्ठ विश्लेषण...अप्रतिम..

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jan 2013 - 10:47 am | परिकथेतील राजकुमार

प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब...

ओक्के !

सृष्टीलावण्या's picture

31 Jan 2013 - 12:29 pm | सृष्टीलावण्या

मला इतिहास तज्ज्ञ न म्हणता केवळ इतिहास संकलक म्हणा असेच श्री. अप्पा परब ह्यांचे म्हणणे आहे. मला त्यात विनयशीलता जाणवते.

पिलीयन रायडर's picture

31 Jan 2013 - 11:47 am | पिलीयन रायडर

शिवाजी महाराजांना कुणी विरोध केला, महाराजांनी कुणाला विरोध केला.. आता कोणं कुणाला विरोध करतय ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही..
मला महाराजांविषयी नितांत आदर आहे.. आणि माझ्या मुलाला एकवेळ "देव" म्हणजे काय हे माहिती नसेल पण महाराज नक्की माहिती असतील...

"सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक बोभाट झालियाउपरी , नित्यवादांस कारण धागा आणिक प्रतिसाद ऐसे जाणोन वाचनमात्र नतीजा पावेल..." अशी शंका का बरे येत आहे?

सृष्टीलावण्या's picture

31 Jan 2013 - 12:46 pm | सृष्टीलावण्या

वाचनमात्र नतीजा पावेल...

काही प्रतिसाद 'वाचा आणि विसरा' ह्याच प्रकारात मोडत आहेत.

बॅटमॅन's picture

31 Jan 2013 - 12:53 pm | बॅटमॅन

मार्मिक प्रतिसादु!! ऐसेचि म्हणितो. ट्रोलावळीचा पुंडावा खंडेल ते करणे, बहुत काय लिहिणे :)

ग्रेटथिन्कर's picture

31 Jan 2013 - 12:30 pm | ग्रेटथिन्कर

ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला विरोध केला होता. कारण ब्राह्मणी धर्मानुसार क्षत्रिय अस्तित्वात नाहित, अशी कंडी ब्राह्मण पिकवत होते .असाच विरोध शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात केला गेला. परब सायेबांचा इतिहासाचा नको तेवढा जास्त अभ्यास झालेला असावा. :-P

बॅटमॅन's picture

31 Jan 2013 - 12:38 pm | बॅटमॅन

वेदोक्त प्रकरणाला भक्कम पुरावा आहे तसा शिवाजी महाराजांना विरोध केल्याचा अस्सल पुरावा नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2013 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा

ब्याटिंग मॅनास हणुमोदण्ण...!

मालोजीराव's picture

1 Feb 2013 - 10:53 am | मालोजीराव

वेल ब्याटिंग रे !

ग्रेटथिन्कर's picture

31 Jan 2013 - 1:39 pm | ग्रेटथिन्कर

बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला विरोध केला हे सर्वश्रुत आहे, फक्त पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करावी असाच चर्चेचा सुर दिसतोय. चालुद्या

बॅटमॅन's picture

31 Jan 2013 - 1:55 pm | बॅटमॅन

तुमची विधाने कुठल्या पुराव्यावर आधारित आहेत ते सांगा आधी. बाकी बकवास बाजूला राहूदे. कुठले तरी विधान वदवून घेण्याचा बालिश अट्टाहास स्पष्टच दिसतोय वरती.

आनन्दिता's picture

31 Jan 2013 - 10:10 pm | आनन्दिता

कै च्या कै बरळून झाल्यावर पुरावे मागितले कि लोक्स "चालुद्या" म्हणून पळून जातात!!!

पैसा's picture

31 Jan 2013 - 2:18 pm | पैसा

शिवाजी महाराज महाराष्ट्रात होऊन गेले हीच महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ते नसते तर आज आपण सगळे औरंगझेबाचे अनुयायी झालो असतो. महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ते आमचे महाराज आहेत!

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ते आमचे महाराज आहेत!

प्रचंड बाडीस!

सृष्टीलावण्या's picture

31 Jan 2013 - 2:33 pm | सृष्टीलावण्या

महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही.

काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते. महाराजांनी सोन्याच्या नांगराऐवजी लाकडी नांगर चालवला असता तरी 'काही फरक पडला' नसता पण जनमानसाला प्रेरित करण्यासाठी काही वेळा काही पावले उचलणे आवश्यक असते.

स्वतः लिएँडर पेसने म्हटले आहे की एकदा हरत असताना त्याला एक प्रेक्षक तिरंगा फिरवताना दिसला आणि त्याचा आत्मविश्वास जागा झाला.

असो. राजांना अभिषेक, सम्राट्पद मिळावे की नाही हा लेखाचा विषय नसून जातीद्वेष्ट्या खोडसाळ प्रचाराला उत्तर देणे हा मुख्य हेतु आहे.

पैसा's picture

31 Jan 2013 - 6:04 pm | पैसा

काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते.

याच्याशी सहमत आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला.

महाराजांच्या सैन्यात फक्त सर्व जातींचेच नव्हे तर मुस्लिम धर्माचे सरदार सुद्धा मोठ्या पदांवर होते. माणसे पारखताना महाराजांनी जातधर्म काही पाहिला नाही आणि कार्यसिद्धीसाठी कोणत्याही विरोधाची तमा बाळगली नाही.

अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्‍या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2013 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्‍या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.

+१०,०००... कारण लाखमोलाचा विचार !

इतिहासाचा उपयोग जुन्या गोष्टींचा केवळ रवंथ करण्यासाठी करण्यापेक्षा, फक्त आणि फक्त शहाणे होऊन भविष्याकाळात एकत्रितपणे योग्य निर्णय घेणासाठी करण्याची कुवत नागरिकांत (आणि पर्यायाने नेत्यांत) आली की राष्ट्र वयात येऊन प्रगत व्हायला सुरुवात होते.

गडबडीत एक शुन्य कमी टंकले गेले ! कृपया वरील दोन्ही ठिकाणी "+१००,०००" असे वाचावे

शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला.

ही सोन्याच्या अथवा गाढवाच्या नांगराने जमीन नांगरायची प्रथा फार प्राचीन आहे आणि तिचा संबंध गधेगाळ आणि अश्वमेध ह्या दोन प्राचीन प्रथांशी आहे.
कलिगाधिप खारवेलाच्या हाथीगुंफा शिलालेखात ' खारवेला हा दुष्ट राजाची बाजारपेठ गाढवाच्या 'पृथुल' नांगराने नांगरतो असे लिहिले आहे. हा सुमारे २२०० वर्षापूर्वीचा शिलालेख आहे.
मेडे च अवराजनिवेसिंत पीथुड गदभनंगलेन कासयति!

पृथ्वी हे मातेचे रूप आणि गधेगाळीतील गाढव हे गर्दभ नांगराचे रूप. एकंदरीत अमंगलाचे, अप्रतिष्ठतेचे आणि मानहानीचेही प्रतिक.

याउलट सूर्य हे सोन्याचे प्रतिक. सूर्याला वेदांमध्ये हिरण्यगर्भ असे म्हणले गेले आहे. अश्वमेधात मृत अश्वाला सोन्याच्या चकतीवर ठेवले जाते. एकंदरीत सोने हे मांगल्यतेचे प्रतिक.

तेव्हा गाढवाच्या नांगराने अपवित्र झालेली जमीन सोन्याच्या नांगराने नांगरणे म्हणजे तिचा अधम पुरुषाशी झालेला अपवित्र संयोगाचा परीणाम पुसून काढण्यासाठी तिचा पुन्हा दिव्यत्वाशी संबंध येऊ देणे पर्यायाने अपवित्र झालेल्या पृथ्वीला परत पवित्र करणे हा उद्देश.

एकंदरीत आदीलशाही सरदार मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त करून गाढवाच्या नांगराने भूमी नांगरली होती. तीच जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून शिवाजीराजांनी तिला पुन्हा आपलेसे करून घेतले.

सुनील's picture

31 Jan 2013 - 6:22 pm | सुनील

महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही

असे आज म्हणता येते.

पण तत्कालीन सामन्य जनतेसाठी आपल्या स्थावर मालमत्तेवर "अधिकृत" राजसत्तेची मोहोर असावी असे वाटणे स्वाभाविक होते. आणि महाराजांचा राज्याभिषेक त्या सामान्य जनतेला विश्वास देण्यासाठी होता. त्याची गरज होतीच.