एका काकबनात असंख्य कावळे नांदत होते. वेगवेगळ्या मतप्रवाहाचे थवे होते त्या काकबनात. पत्येक थवा आपापल्या मतप्रवाहांवर ठाम होता. त्या मतप्रवाहांमधली विवीधता त्या काकबनाचे वैषिठ्य होते. अनेक नविन कावळे त्या बनात येऊन आनंदाने विहार करायचे. बरेच कावळे त्या काकबनात असलेल्या थव्यांना बिचकूनही असायचे. कारण हे थवे कधी कधी झुंडीने काही वेगळेपणा दाखवणार्या कावळ्यांवर तुटून पडायचे. त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाले. पण हे त्या थवे करुन रहणार्या कावळ्यांच्या कधी लक्षात आलेच नाही. कारण ते त्यांच्या थव्यांमध्येच मशगूल होते.
बर्याच दिवसांनी एक वेगळा भासणारा कावळा त्या काकबनात आला. वेगळाच होता तो. स्वत:चे एक वैचारिक अधिष्ठान घेऊन आला होता हो. त्याची मते टोकाची होती पण वास्तविक होती. कधी कधी ती सामान्य कावळ्यांच्या आकलना पलिकडची होती. हा नविन आलेला कावळा काही मते मांडायचा आणि ती त्याचे ठाम मते असल्याने त्यांचा पाठपूरावा करून ते मते समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. त्यात काही थव्यांना त्याची मते पटायची नाही. कदाचित त्याची ती मते त्यांच्या थव्याच्या मतप्रवाहापेक्षा वेगळी असावित. पण त्यांना कोणी एक कावळा येऊन असे त्याची मते रेटतोय असेच वाटायचे. त्या कावळ्यावर सगळे झुंडीने तुटून पडायचे. तरीही तो कावळा त्याच्या मूळ मतांवर ठाम राहून ती मते तो समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. पण तो जेवढा प्रयत्न करायचा तेवढेच त्याच्या मूळ भूमिकेवर शंका घेतली जायची.
तो कावळा बिचारा वैचारिक पातळीवर वाद-प्रतिवाद करायचा प्रयत्न करायचा. अर्थात एवढ्या सगळ्यांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागायचे त्यामुळे त्याला शब्दांचे खेळही करायला लागायचे. पण कदाचित तो सर्वसमावेशक व्हावे म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या मतप्रवाहाच्या सर्वांना समजावे म्हणून, तसे करत असावा कदाचित पण त्याने आणखिनच गुंता वाढायचा. मग त्याच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होऊन तो कसा आपल्याच मतांशी ठाम आहे ह्यावर लक्ष केंद्रित व्हायचे. आणि मग त्या वेगवेगळ्या मतप्रवाहाच्या थव्यांकडून पुन्हा तेच शब्दांचे खेळ होत रहायचे. पण मग ते कधीकधी वैचारिक न राहता व्यक्तिगत व्हायचे. त्या शब्दांच्या खेळांना, तो वेगळा कावळा परत शब्दांचेच खेळ करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आणि हे चक्र चालूच राहयचे.
ही अशी काकबने आजही अस्तित्वात आहेत. कोर्पोरेट क्षेत्रात, समजात, सरकारी कचेर्यांत. अव्याहत चालू असणारा हा खेळ आहे. आता हे त्या वेगळ्या कावळ्यांवर अवलंबून असते की त्यांनी थव्यांच्या झुंडशाहीपुढे हताश होऊन हार मानायची की आपल्या मतांवर ठाम राहयचे...
प्रतिक्रिया
20 Jan 2013 - 10:42 pm | गणपा
या अश्या जंगलाच्या, गावांच्या, समुद्र-विहिरींच्या गोष्टी कालांतराने येत असतात. :)
कधी काळी चवीनं वाचायचो. २-४ पिंकाही टाकून यायचो.
साला आता तावातावाने मतं मांडायचा तो उत्साह राहिला नाही. :(
(वाढत्या वयाच लक्षण दुसरं काय?)
एखादी फांदी पकडून गंमत बघण्यात जास्त मज्जा आहे हे या कावळ्यांना कळेल तो सुदिन. ;)
20 Jan 2013 - 10:52 pm | मोदक
बर्याच दिवसांनी एक वेगळा भासणारा कावळा त्या काकबनात आला. वेगळाच होता तो.
बरेच प्रश्न पडले..
तो कावळा आधीच्या स्वर्गीय काकबनातून या झुंडशाहीयुक्त नरकसमान काकबनात का आला असेल..?
आधिच्या काकबनातील कावळ्यांनी त्याला हुसकून टाकले असावे का..? जर तिथे तो सुखी असेल तर नवीन काकबन कशासाठी धुंडाळेल..?
सध्या इतकेच. ;-)
21 Jan 2013 - 11:35 am | इनिगोय
हेच प्रश्न पडले! उत्तरे मिळाल्यास आभारी राहू.
20 Jan 2013 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा
20 Jan 2013 - 11:40 pm | पैसा
कावळा हा सामाजिक पक्षी आहे. वेगळा कावळासुद्धा त्या समाजाचा भाग असतोच. त्याने काही चांगले सांगितले तर त्याचेही कौतुक होते. पण आपण किती बरोबर आहोत हे सांगताना दुसरे चूकच आहेत असे सतत म्हणू नये. नाही तर त्यातून काहीच साध्य होत नाही. तुम्हाला सकारात्मक बदल व्हायला हवा असेल तर स्वतः सतत नकारात्मक बोलू नये. दुसरा कसा चूक आहे हे न सांगताही आपण कसे बरोबर आहोत हे नेहमीच सांगता येते आणि ते बाकी सगळ्यांना आवडतेदेखील.
21 Jan 2013 - 11:46 am | सोत्रि
पैसातै, झक्कास!
मनापासून सहमत.
-(सामाजिक) सोकाजी
21 Jan 2013 - 12:43 am | पिंपातला उंदीर
कावळा आणि थवा ही रुपक आवडली : )
21 Jan 2013 - 1:23 am | टवाळ कार्टा
तो कावळा मिसळकावचा सभासद आहे का? ;)
21 Jan 2013 - 1:36 am | अग्निकोल्हा
वन्स अ काकबन देन ऑलवेज अ काकबन असुनही त्या एकांड्या कावळ्यांच्या जिद्दिला मनःपुर्वक सलाम.
अशा एकांड्या कावळ्यानेच प्रुथ्वी सपाट न्हवे तर चक्क गोल आहे असा शोध लावुन मानवप्राण्यावर थोर उपकार केले व देवाच्या नजरेतुन न्हवे तर आजुबाजुच्या सर्व गोश्टी माणसाच्या नजरेतुन पहावयास शिकवले (वैज्ञानिक द्रूष्टीकोनाला चालना व विकास दिला) म्हणूनच एकांड्या कावळ्यांच मोल फार अनमोल आहे. एकांड्या कावळ्यांना मनःपुर्वक आदर!
21 Jan 2013 - 10:22 am | मोदक
धन्यवाद,
हाही लेख पूर्वग्रह बाजूला ठेवून तुम्हाला वाचता आला यातच सर्वकाही आले.
"जया अंगि मोठेपण तया यातना कठिण" आणि "एकांड्या कावळ्यांच मोल फार अनमोल आहे" या गोष्टी तुम्ही दिलेल्या उदाहरणाला लागू आहेत हे मान्य.
21 Jan 2013 - 5:53 pm | अग्निकोल्हा
तुमचे विचार ऐकुन बरं वाटलं. जग देवाच्या न्हवे तर माणसाच्या नजरेतुन बघायला लोकं शिकतील यातच सर्वकाही आले. मान्य आहे माणसाच्या नजरेतुन जग बघताना बराच गोंधळ आहे पण देव तरी कुठे सगळं तर्कशुध्द देतो ?
21 Jan 2013 - 3:29 pm | सस्नेह
माफ करा पण 'एकांडा' कावळा 'अनमोल' असला तरी इतर सर्व 'बिनमोल' हे नाही पटले...
21 Jan 2013 - 3:40 pm | इरसाल
पण कावळा एकांडा कसा. अंड तर कावळी देते ना ?
21 Jan 2013 - 4:44 pm | धमाल मुलगा
पक्का इरसालपणा करणं हा स्थायीभावच म्हणा! ;-)
21 Jan 2013 - 5:56 pm | अग्निकोल्हा
एकांडा कावळा व त्याची अंड देणारी कावळी यावर मत व्यक्त करण्यास मी असमर्थ आहे!
21 Jan 2013 - 5:59 pm | दादा कोंडके
ड वर अनुस्वार हवाय का?
21 Jan 2013 - 6:07 pm | धमाल मुलगा
_/\_
दादा... आमचा साष्टांग नमस्कार हो तुमाला!
21 Jan 2013 - 6:15 pm | इरसाल
तस्मात तो अनुस्वार इथे स्वार करवतोय " ं" हा बघा
21 Jan 2013 - 6:20 pm | अग्निकोल्हा
अगदी अ हा शब्द चुकुन टायप झाला मानुन त्याजागी "थ" शब्द गृहीत धरला तरी ;)
21 Jan 2013 - 5:54 pm | अग्निकोल्हा
ठिक आहे पटत नसेल तर काथ्याकूट टाका, नुसत्या प्रतिसादाने काय कळणार ? मला ही माफ करा...
21 Jan 2013 - 1:44 am | इष्टुर फाकडा
आय एम टू ओल्ड फोर धिस शिट !
21 Jan 2013 - 12:50 pm | धमाल मुलगा
सागरु,
वेलकम टू मिपा वृध्दाश्रम!
ो, डांबिसकाका, घ्या नोंदणी करायला. :-)
21 Jan 2013 - 10:43 pm | इष्टुर फाकडा
डांबिसकाका शेक्रेट्री आहेत का काय? तुम्ही आणि गम्पाभाऊ मंडळावर दिसताय :)
21 Jan 2013 - 9:36 am | इरसाल
कावळा म्हणे मी काळा पांढरा तो बगळा....बगळा....ऑ बगळा......रियली.......
21 Jan 2013 - 10:05 am | मनीषा
+१ सहमत
तसेच वेगळा कावळा नक्की काय वेगळे सांगतो आहे हे समजून घ्यायला काहीच हरकत नाही. त्याच्याशी तुम्ही सहमत व्हायलाच पाहिजे असे काही नाही. तो कावळा वेगळे काही सांगतो, आमच्या मताच्या विरूद्ध मत मांडतो म्हणून कलकलाट करू नये. शेवटी अशा चर्चा, वादविवाद म्हणजे, We all agree to disagree... असेच नाही का?
काकबनाची शोभा ही त्यात मुक्तपणे विहरणार्या कावळ्यांप्रमाणेच, या काही थोड्या, 'वेगळ्या' कावळ्यांमुळे देखील अबाधित आहे.
21 Jan 2013 - 10:45 am | शैलेन्द्र
+१
21 Jan 2013 - 11:08 am | पैसा
हे काही भारत-पाकिस्तान नव्हे. इथे सगळ्यांची आपापली जागा आहे.
21 Jan 2013 - 10:31 am | जेनी...
सोकाजी अतिशय समर्पक कथन करुन सद्धाची मिपा परिस्थिती मांडली आहे त्याबद्दल
कौतुक .
झुंडीने रहाण्यात आणि झुंडीने तुडुन पडन्यात ज्या कावळ्याना मजा वाटते ते स्वताहाच
वैयक्तिक नुकसान करुन घेत असतात हे त्याना कधी कळणार कोन जाणे .
असो ... लेख अतिशय आवडला .
21 Jan 2013 - 11:06 am | श्रिया
रुपक कथा आवडली, सध्याच्या वातावरणाशी चपखलपणे जुळणारी आहे. विरोध विचारांपुरता मर्यादित न राहता, विचार करणार्या व्यक्तीपर्यंत जातो, तेव्हा त्यातून अपेक्षित परिणाम साधणे खूपच कठीण होते.
21 Jan 2013 - 4:28 pm | चेतन
कंपु हे अंतिम सत्य आहे. बरेच कावळे त्यांच्या मनासारखे नाहि झाले की कंपुबद्दल तक्रार करतात.
आणि दुसरिकडे काकबन बनवतात. थोड्या दिवसाने तिथेही कंपु तयार होतो. तस्मात
"काक चेष्टा बको ध्यानम स्वान निद्रा तथैव च
अल्पहारी गृह त्यागी इति विद्यार्थी पंथ लक्षणम"
याप्रमाणे विद्यार्थी व्हायचं की बोधकथा लिहणारे बुध्द हे प्रत्येकाने ठरवावे
कावळा (चेतन)
21 Jan 2013 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा
@याप्रमाणे विद्यार्थी व्हायचं की बोधकथा लिहणारे बुध्द हे प्रत्येकाने ठरवावे>>>>> भरपूर सहमत
================================================================
(भरपूर सहमत असणारा.... ;) )
21 Jan 2013 - 5:35 pm | विलासिनि
आगळा कावळा - "तो पहा मावळता सुर्य चंद्रासारखा भासतो."
वेगळा कावळा - "देवासारखा कसा भासेल सुर्य?" "देव नसतोच मुळी हे माझे मत."
आगळा कावळा - "देवासारखा नाही मी चंद्रासारखा म्हणालो."
वेगळा कावळा - "देव नसतोच मुळी हेच माझे मत."
थवा - "देवासारखा नाही तो चंद्रासारखा म्हणाला."
वेगळा कावळा - "देव नसतोच मुळी हेच माझे मत."
आगळया कावळयाच्य विचारांचा चुकीचा अर्थ लावून त्यावर स्वतःचे ठाम मत बनवून त्याचा पाठपूरावा करून काय साधले वेगळया कावळयाने.
21 Jan 2013 - 6:26 pm | कवितानागेश
सोत्रिकाकांना अभ्यास वाढवण्यासाठी शुभेच्छा!
21 Jan 2013 - 6:52 pm | kanchanbari
वेगळ्या कावळ्याला स्वता:चे वेगळे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर झुंडीला तोंड द्यावेच लागेल
अशी वेगळ्या कावळ्यांची बरीच उदाहरणे आहेत या समाजात......
21 Jan 2013 - 10:48 pm | रामपुरी
"त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाल"
असले कावळे पैशाला पासरी असतात. दहा पाच इकडे तिकडे गेले तरी काकबनाला काही ..ट फरक पडत नाही.
वेगळी मतं असणं ठिक पण ती कुठे आणि कशी व्यक्त करावीत हे समजणं जास्त महत्वाचं. आणि अश्या "वेगळ्या" मतांना अहंकाराची फोडणी असणे म्हणजे "आधीच ... तशात... प्याला" त्यातली गत
22 Jan 2013 - 12:31 am | शुचि
खरच काही कळलं नाही. कोण कावळा? .... धन्यवाद ;)
22 Jan 2013 - 12:40 pm | संजय क्षीरसागर
विध्यार्थी हा सर्वात सोपा मार्ग आहे. बोधकथा लिहीणार्यांना कंपूची गरज आहे... बुद्धाला कंपूची गरज नाही.
22 Jan 2013 - 12:50 pm | कवितानागेश
सोत्रीकाका, जनरली सगळेच कावळे जे काही वागतात, तेच नॉर्मल आहे हे तुम्हाला अजूनही कळले नाही का?
"वेगळ्या" कावळ्याला इतर कावळ्यांशी जमवून घ्यायला चांगल्या सल्ल्याची गरज आहे असे तुम्हाला वाटत नाही का?
22 Jan 2013 - 12:56 pm | गणामास्तर
एखादं झटँग पैकी कॉकटेल बिकटेल पाजा त्या "वेगळ्या" कावळ्याला म्हणजे गप होतयं सरळ.