..नमस्कार ..ब-याच दिवसांनी येथे येत आहे. आता रेग्युलर राहीन. माझी बदली दिल्लीला झाली बंगळूर सोडले त्यामुळे मध्यंतरी मिपावर नव्हतो..............
हल्लीच इंग्लंड बरोबरच्या झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताला हार मानावी लागली व सचिन सामन्यात धावा काढू शकला नाही म्हणून विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर व मध्य रात्री पर्यंत ह्या घटनेला अक्षरशः कुटून काढले. सचिनने संदीप पाटिलला केलेला फोन, त्यावर तो काय बोलला असेल ह्याच्या अटकळी ह्या वाहिन्या लावीत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात सुद्धा मोठाल्या बातम्या आल्या होत्या. बातमीत दिले होते, सचिन म्हणतो, "क्रिकेट सिलेक्टर्स् ना जर का वाटत असेल की मी धावा काढू शकणार नसेल तर त्याने भारतीय संघात माझा समावेश करू नये". सिलेक्टरस् हेही म्हणत होते की अजून दोन कसोट्या राहिल्या आहेत, कोलकत्याची इडन गार्डनवर होणारी व नागपूरची, ह्या दोन कसोट्यांमधून सचिनला धावा काढण्याची संधी मिळेल व तो येणाऱ्या कसोट्यां मध्ये धावा काढून खरा उतरेल.
ह्या पार्श्वभूमीवर कारगिलमधल्या ऑपरेशन विजय मध्ये लॉन्गरेंज पॅट्रोलवर गेलेल्या व पाकिस्तानच्या हातून पकडल्या गेल्यावर हालाहाल करून मारण्यात आलेल्या कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांची हृदयाचा ठाव घेणारी बातमी माझ्या कानावर पडत होती. वाटले सचिनला जशी कोठच्या कसोटीत धावा जमल्या नाहीत तर पुढच्या येणाऱ्या कितीतरी कसोट्यांना धावा काढायची एक, अजून एक, अशा कितीतरी संध्या मिळत राहतात. पण कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांना जीवनाच्या कसोटीत जिवंत राहायच्या धावा काढण्यासाठी अजून एकच संधी त्यांच्या सिलेक्टरने दिली असती तर किती बरे झाले असते. थोडी चूक झाली असेल, थोडा अंदाज चुकला असेल तेवढ्यात पाकिस्तानी रेंजरसने त्या पॅट्रोलला पकडले व त्यांना जीवनातूनच आऊट केले .....हालाहाल करून. सचिनला परत परत मिळणाऱ्या संधीला बघून आज दिवंगत कॅप्टन सौरभ कालियाच्या आई वडिलांना काय वाटत असेल.
आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.com/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/
(मराठी ब्लॉग)
प्रतिक्रिया
30 Nov 2012 - 10:13 pm | पैसा
तुमची अर्धी राहिलेली (काश्मिरमधील सुनील खेरची) कथा वाचायची उत्सुकता आहे. सावकाशीने लिहा. तोपर्यंत कॅप्टन सौरभ कालियाबद्दल आणखी थोडे लिहाल का? हल्लीच त्यांच्या वडिलांबद्दल फेसबुक वर काही वाचले होते.
1 Dec 2012 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>सौरभ कालियाबद्दल आणखी थोडे लिहाल का?
अजून माहिती नक्की लिहा.
आता मिपावर लिहायला वेळ मिळेल तेव्हा लिहिते राहाच.
-दिलीप बिरुटे
30 Nov 2012 - 10:16 pm | तर्री
चितळे सो.- अनपेक्षित सुरवात , अपेक्षित शेवट.
अजब तुझे सरकार !
30 Nov 2012 - 11:06 pm | इष्टुर फाकडा
जिनिव्हा कन्वेन्शन ची केस पाक विरुद्ध कोर्टात लढवण्यात बर्याच अडचणी आहेत असे कुठेतरी वाचले होते. या केसच्या आधारावर पाक काश्मीर मध्ये सार्वमत घेण्याची मागणी पुढे रेटू शकते, असं काहीतरी.
तुम्ही या विषयावर लिहाच. एकुणात काश्मीर मध्ये सार्वमत घेण्यात भारताच्या अडचणीचा ढोबळ अंदाज आहेच पण आपला लेख insight ठरेल.
1 Dec 2012 - 4:28 am | अगोचर
आपल्या बद्दल, भारतिय सेनेबद्दल आणि कॅप्टन सौरभ कालिया यांच्या बद्दल नितांत आदर बाळगुन हे मान्डु इच्छितो की हा फरक युद्ध आणि खेळ यातला आहे. आयुष्यात एकच डाव मिळतो.
1 Dec 2012 - 9:48 am | रणजित चितळे
पटले
1 Dec 2012 - 5:35 am | मावळा शिवबाचा
१. संत ज्ञानेश्वर २. संत तुकाराम ३. संत रामदास ४. शिवाजी महाराज(हे पहिले हवे होते पण कालानुरूप मांडायचा प्रयत्न केला आहे)५. संभाजी महाराज ६. बाजीराव पेशवे ७. कान्होजी आंग्रे ८. थोरले माधवराव पेशवे ९. राणी लक्ष्मीबाई १०. वासुदेव बलवंत फडके ११. ज्योतिबा फुले १२. बाळ गंगाधर टिळक १३. धोंडो केशव कर्वे १४.बालगंधर्व १५. विनायक दामोदर सावरकर १६. प्र.के.अत्रे १७. बाबासाहेब आंबेडकर १८.बाळासाहेब ठाकरे १९. मंगेश देसाई २०. शरद पवार २१. भीमसेन जोशी २२.लता मंगेशकर २३. बाबा आमटे २४. सुनील गावस्कर २५.दिलीप वेंगसरकर २६. आशा भोसले २७. प्रकाश आमटे २८. अण्णा हजारे २९.सचिन तेंडूलकर.यापुढे मराठी नाव आठवत नाही. (राज ठाकरेंना अजून सिद्ध व्हायचे आहे.)
बघा.................कमीत कमी २८ नावे शोधून काढली की ज्यांनी जगाच्या इतिहासावर आपली छाप सोडली आहे (अनावधानाने काही नावे राहिली असल्यास कृपया जोडावी. या सर्वांवर सवडीने स्वतंत्र लेख लिहायचा प्रयत्न करीनच) मराठी इतिहासात मानाचे पान असलेल्या या वीरांवर कमीत कमी मिपावर चिखलफेक होऊ नये हीच विनंती. (वर उल्लेखित सर्वानीच कधीतरी अपयश घेतले होते.......याचा विसर न व्हावा)
1 Dec 2012 - 8:53 am | पैसा
भा.पो. पण भावनेच्या भरात अर्थविपर्यास होऊ नये ही विनंती. चितळेसाहेब मिपावर पूर्वीपासून उत्तम लिखाण करत आहेत आणि त्यांच्या लिखाणात कुठेही कोणावर चिखलफेक केली गेलेली नाही याची कृपया नोंद घ्यावी.
या सर्व दिग्गजांबद्दल तुम्ही जरूर लिहा. आम्हा सर्वांना वाचायला आवडेलच. पण या लेखातल्या भावना नीट समजून घेऊन मग प्रतिक्रिया लिहिली असतीत तर जास्त बरं झालं असतं. असो. मिपावर स्वागत. आणि तुमच्या लेखांची वाट बघत आहोतच.
1 Dec 2012 - 9:47 am | रणजित चितळे
सचिन बद्दल नुसता आदरच नाही तर प्रेम पण आहे. ह्यात सचिनवर चिखलफेक करायचा प्रश्नच (स्वप्नातसुद्धा) नाही. मला वाटते ह्या लेखाला नाव दुसरे द्यायला पाहीजे होते - आपला प्रतिसाद वाचून मला वाटायला लागले, व नाव बदलायला तयार आहे. येथे फक्त सौरभ कालीयाच्या आई वडीलांना एखादवेळेला असे वाटले असेल असे वाटते की त्यांच्याही मुलाला अजूनएक संधी मिळाली पाहीजे होती...
1 Dec 2012 - 9:48 am | रणजित चितळे
सचिन बद्दल नुसता आदरच नाही तर प्रेम पण आहे. ह्यात सचिनवर चिखलफेक करायचा प्रश्नच (स्वप्नातसुद्धा) नाही. मला वाटते ह्या लेखाला नाव दुसरे द्यायला पाहीजे होते - आपला प्रतिसाद वाचून मला वाटायला लागले, व नाव बदलायला तयार आहे. येथे फक्त सौरभ कालीयाच्या आई वडीलांना एखादवेळेला असे वाटले असेल असे वाटते की त्यांच्याही मुलाला अजूनएक संधी मिळाली पाहीजे होती...
2 Dec 2012 - 9:56 am | चैदजा
शरद पवार आणि तत्सम राजकारण्यांना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज यांच्या पंगतीत बसवणे योग्य नाही.
सदर धागा पाकिस्तान लश्कर/राज्यकर्त्यां विरुद्ध आहे. आणि शरद पवार वैगरे मंडळी पैश्यासाठी (स्वत:ला मिळण्यार्या) पाकिस्तानशी सामने ठरवत आहेत.
1 Dec 2012 - 10:11 am | अमोल खरे
पण आपण नुसते हळहळण्याशिवाय काहीही करु शकत नाही. दरवेळेस आपले सरकार पाकिस्तानशी संबंध सुधारायला जाते आणि तोंडावर पडतात ते आपले सैनिक. वाजपेयींच्या वेळेस पाकिस्तानशी बससेवा सुरु केली, तेव्हा शिवसेनेने विरोध केला होता तेव्हा भर सभागृहात वाजपेयींनी शिवसेनेचा अपमान केला होता हे मी स्वतः टीव्ही वर पाहिले आहे. (हमारे दुश्मन तो पाकिस्तानसे ज्यादा यहां है असे काहीसे वाजपेयींचे उद्गार होते) त्याच वाजपेयींनी कारगिल झाल्यावर आमची बस कारगिलला नेली असं म्हणत गळा काढला. त्यातच कालिया आणि अनेक सैनिकांचा बळी गेला. मुळात जो पर्यंत लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधींच्या लेव्हलचे पंतप्रधान मिळत नाहीत तो पर्यंत आपले सैनिक असेच अपमानास्पद रितीने मरत राहणार आणि आपण फेसबुक, मिपावर हे वाचुन त्रागा करत राहणार.
1 Dec 2012 - 10:50 am | श्री गावसेना प्रमुख
कारगीलच्या वेळेस लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधीं हे होते वाटते
आपले सैनिक असेच अपमानास्पद रितीने मरत राहणारमरण कधी पासुन अपमानास्पद होतय
1 Dec 2012 - 1:01 pm | ५० फक्त
कोणत्याही सैनिकाचं मरण, तो कोणत्याही का देशाचा असेना, अपमानास्पद कधीच नसतं. त्याच्या देशासाठी तरी, सैनिकाचं मरण हे अभिमानास्पदचं असतं.
1 Dec 2012 - 1:28 pm | आनन्दा
ते मरण त्या वीरासाठी नक्कीच अभिमानास्पद असते. पण जर ते सबळ कारणासाठी नसेल, आणि विशेषतः असे वेदनादायक असेल तर राष्ट्रासाठी अत्यंत अपमानास्पद असते.
राष्ट्राने अश्या वीरांचे मरण आणि त्यातून झालेला आपल्या अस्मितेचा अपमान कधीच विसरू नये, त्याचा प्रतिशोध घ्यायचा सर्वतोपरी प्रयत्न करावा.
1 Dec 2012 - 3:33 pm | खेडूत
कॅप्टन अमित वर्मा आणि सौरभ कालिया आणि के नचिकेत, अजय अहुजा यांच्याविषयी इथे माहिती मिळेल.
http://www.youtube.com/watch?v=nu2w3-3wRok
खरं तर ही पूर्ण मालिका आवर्जून पहावी अशी आहे.
(मग क्रिकेट सामन्यांना महासंग्राम आणि टीम ला सेना वगैरे...!)
1 Dec 2012 - 4:10 pm | परिकथेतील राजकुमार
काही मिपाकरांनी देखील कुटाण्याला हातभार लावला आहेच. त्यांचे देखील दोन शब्दात कौतुक करतो आणि मी माझे २१ शब्द संपवतो.
1 Dec 2012 - 5:30 pm | इरसाल
यांचे वडिल मागील कित्येक वर्ष सरकारचा पाठपुरावा करत आहेत.
मागील दोन संरक्षण मंत्र्यांनी मिडीया समोर केलेले वादे विसरुन वार्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आणली आहे.
सद्य सरकार काय करेल याबद्द्ल काळच काय ते ठरवेल.
अवांतरः तिकडे रब्बानी साहिबा हाफिज सईद बद्द्ल पुरावे मागत आहेत. पुरावे द्या मग करतो शिक्षा.
त्या कोणा एकाला केली होती म्हणे शिक्षा तो ४ वर्ष तुरुंगात आणी घरी त्याच्या बयकोला पोर झाले म्हणे.इथे भारत आक्षेप घेतोय. आपणच आपली महाभारत संस्कृती विसरुन कसे चालेल ?
2 Dec 2012 - 11:25 am | श्रीरंग_जोशी
२६/११ चा हल्ल्याची योजना बनवण्यापासून त्याचे नियंत्रण करणारे लोक व त्यांचे कक्ष पाकच्या भूमीवर होते. भारतीय सुरक्षा संस्था भारतात अन्वेषण करून त्याची माहिती गोळा करू शकतात. काही प्रमाणात इतर देशांच्या गुप्तहेर संस्थांकडून माहिती मिळवू शकतात.
पुरावे गोळा करण्यास योग्य जागा पाकिस्तान होती व योग्य वेळसुद्धा प्रत्यक्ष हल्ले सुरू असतानाची होती. जेव्हा पाकिस्तानी सरकार म्हणते की आमच्या भूमीचा वापर इतर देशांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी होऊ देणार नाही तेव्हा या उक्तीला कृतीत उतरवण्यासाठी पुरावे गोळा करणे, साक्षीदार जमविणे व संशयितांना अटक करणे हि केवळ त्यांचीच जबाबदारी होती.
भारत सरकारने होईल तेवढी माहिती वेळोवेळी पाठवली. त्याचा प्रत्यक्ष उपयोग उरलेले पुरावे नष्ट करणे व संशयितांना सुरक्षित स्थळी पोचवण्यासाठी केला गेला असवा असे मानण्यास पुरेसा वाव आहे (यामागचे गृहीतक - पाकिस्तानी न्यायालयातील या खटल्याची आजवरची प्रगती).
3 Dec 2012 - 8:42 pm | गणामास्तर
रंगाकाका त्या हीना रब्बानी कडे बघून गप्प बसाव लागतंय ओ. ;)
नाही तर आपल्या गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानात घुसून पुरावे गोळा केले असते. :)
3 Dec 2012 - 11:05 pm | बॅटमॅन
पण हीना साहेबांचा आवाज हा टोट्टल टर्न् ऑफ् आहे ;)
3 Dec 2012 - 11:28 pm | गणामास्तर
म्हणूनचं मी तिच्याकडे बघून गप्प बसावं लागतंय म्हणालो ना..नाही तर ऐकून म्हणालो असतो. :)
अवांतर : बॅट्या लेका तुला तिच्या आवाजाशी काय करायचयं बे?
4 Dec 2012 - 11:20 am | बॅटमॅन
ही ह्हा ह्हा ह्हा गणामास्तर तुला तिच्याशी काय करायचंय बे आँ ;) आता आम्हाला चानस पायजे :P तुमचं झालं सगळं :D
4 Dec 2012 - 11:06 am | श्रीरंग_जोशी
समजू शकतो मास्तर, पण पाकड्यांनी आपल्या गुणी सूनबाईच्या माहेरच्या माणसांना थोडी तर किंमत द्यावी, दिखावाच सही पण काही तर करावे...
5 Dec 2012 - 9:27 am | अमोल खरे
हॅहॅहॅहॅ.... मिपावर चतुरंग काकांना रंगाकाका म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे आधी रंगाकाका हिना रब्बानीबद्दल काहीतरी बोलले का काय असं वाटुन दचकलो.
5 Dec 2012 - 10:09 am | परिकथेतील राजकुमार
मी चुकून हिना रंग्गानी असे वाचले.
5 Dec 2012 - 6:11 pm | रेवती
आँ? माझं लक्षय बर्का ;) अमोल, परा.
5 Dec 2012 - 11:50 pm | परिकथेतील राजकुमार
रब्बानीवर का रंगाकाकांवर ?
6 Dec 2012 - 12:26 am | रेवती
तुझ्यावर तर आधी लक्ष ठेवायला हवे पण ते माझ्या शक्तीबाहेरचे आहे. मी आपली रंगाकाकांवरच लक्ष ठेवते. ;)