ट्रफिकची भेळ

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Sep 2012 - 9:54 pm

आतुन बाहेर पाहू म्हणता
काचेवर धुक्याचा खेळ
बाहेर कशी मजबुत झालिये
वहानांची पुरति भेळ

पावसाचं पाणी भेळेवरती
वाढवू पाहातय तिचा भाव
त्यातच मधे बाइकवाला
जणू फिरे पातेल्यात डाव

पुढे एक छोटी गाडी
गाडिवरती रांगडी घोडी
ट्रॅफिक जॅम असुन सुद्धा
वाट देती तिला थोडी

इतक्यात तिथे एक काकु
घरी पहाती फोन टाकु
मागून काका म्हणती त्यांना
तू चालव मी देतो टेकू

मी कडेला गाडीमध्ये
पार्किंग करुन बसलोय मस्त
बाहेर छान भेळ जमतीये
मजेमजेनी करतोय फस्त

रोज त्याच तिकिटावरती
चालु होतो तोच खेळ
उद्या या तुंम्ही सुद्धा
दोघे मिळुन खाउ भेळ ...

हास्यवावरकवितासमाजजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

5 Sep 2012 - 10:13 pm | पक पक पक

लै भारी ... :)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2012 - 11:45 am | अत्रुप्त आत्मा

प्र.का.टा.आ.

पक पक पक's picture

5 Sep 2012 - 10:15 pm | पक पक पक

पुढे एक छोटी गाडी
गाडिवरती रांगडी घोडी
ट्रॅफिक जॅम असुन सुद्धा
वाट देती तिला थोडी

:d: च्यायला ......

मोदक's picture

5 Sep 2012 - 10:20 pm | मोदक

राजे, भेळीविषयी बोलताहेत ते!

विलासराव's picture

5 Sep 2012 - 11:18 pm | विलासराव

हा तर फोर्ट मधील मिठाईवाला दिसतोय रे.

चला मग रविवारी जावूया.... विमे, प्रास'दा, झेलेश आणि खरे पण येतील.

परवा पावसाने हाल केले + मी तुमचा जुना नंबर ट्राय करत होतो. :-(

विलासराव's picture

6 Sep 2012 - 12:18 pm | विलासराव

नक्की .

मी कडेला गाडीमध्ये
पार्किंग करुन बसलोय मस्त
बाहेर छान भेळ जमतीये
मजेमजेनी करतोय फस्त

गाडी घेतल्या पासुन लै मजा करताय राव... पार्‍टी कधी देताय... ? ;)

गणामास्तर's picture

6 Sep 2012 - 8:29 am | गणामास्तर

अहो गाडी घेतल्या पासून ते फक्त आश्वासने देत फिरतातं.

तर्री's picture

5 Sep 2012 - 10:24 pm | तर्री

हवालदार , रिक्षा , बस गाड्या भेळेत मिसळल्या असत्यात तर ?

पक पक पक's picture

5 Sep 2012 - 10:29 pm | पक पक पक

हवालदार , रिक्षा , बस गाड्या भेळेत मिसळल्या असत्यात तर ? :crazy:
ओ त्ये हवालदार नाहीत आता ,आल्टो वाले इंस्पेक्टर आहेत... ;)
तुम्हाला पण पार्‍टी दिली नाय वाट्त अजुन... :d:

सोत्रि's picture

7 Sep 2012 - 8:26 am | सोत्रि

पन्नासरावांच्या प्रतिसादाला मान देऊन जिलीबी जाहीररित्या मागे घेतली आहे.

तरीही 'काका म्हणती.... मी लावतो टेकू' वगैरे सारख्या ओळी जर पन्नासराव म्हणतात तसे बौद्धिक सामर्थ्य असेल तर.... असोच. मला आपले कवितेतले काही कळत नाही तेच बरे आहे.

- (चटकदार) सोकाजी

मोदक's picture

7 Sep 2012 - 12:27 pm | मोदक

+१

ओके.. आमच्या प्रतिसादाला बूच बसल्याने बुवांना खरीखुरी जिलबी खिलवून भरपाई केली जाईल..! ;-)

५० फक्त's picture

7 Sep 2012 - 1:14 pm | ५० फक्त

धन्यवाद ओ सोकाजी,

ते टेकु टाकु ते मलाही आवडलेलं नाही, पण एखादा आंबा असतो थोडा कच्चा, क्रेटमध्ये एखादी बाटली असते फुटलेली..
असो.

अन्या दातार's picture

5 Sep 2012 - 11:08 pm | अन्या दातार

आत्ता जरा लायनीवर आला बघा. उगाच धौतीयोग चूर्णजनित* कवितांपेक्षा हा प्रयत्न सुसह्य आहे

*शब्दश्रेयः सूड.

आतुन बाहेर पाहू म्हणता
काचेवर धुक्याचा खेळ
बाहेर कशी मजबुत झालिये
वहानांची पुरति भेळ

>> मजबूत हे विशेषण भेळीस लावणे योग्य वाटलं नाही. आणि वाहन हो वहान नाही! असोत.

पावसाचं पाणी भेळेवरती
पडतय कसं बदा बदा
त्यातच कुणी बजरंग फिरवतोय
आपली बाइक जणू गदा

>> येथे बजरंग दलाचा काय संबंध ?

पुढे एक छोटी गाडी
गाडिवरती रांगडी घोडी
ट्रॅफिक जॅम असुन सुद्धा
वाट देती तिला थोडी

>> घोडी हे घोड्याचे अनेकवचन कि स्त्रीलिंगी रूप? आजच "horse van" हा प्रकार बघितला. पण ती गाडी "छोटी" या गटात बसणारी नव्हती.

इतक्यात तिथे एक काकु
घरी पहाती फोन टाकु
मागून काका म्हणती त्यांना
तू चालव मी देतो टेकू

>> काकु फोन टाकताना कसला टेकू देत होते हो काका ?

मी कडेला गाडीमध्ये
पार्किंग करुन बसलोय मस्त
बाहेर छान भेळ जमतीये
मजेमजेनी करतोय फस्त

रोज त्याच तिकिटावरती
चालु होतो तोच खेळ
उद्या या तुंम्ही सुद्धा
दोघे मिळुन खाउ भेळ ...

>> पार्टी चा काय झालं हो ?

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2012 - 12:59 am | अत्रुप्त आत्मा

@काही लोकांना "विनोद" कळत नाहीत.>>> पण आंम्हाला तो कळतो...तुमच्या बाबतीत सहीच्या रुपानी झालेला. :-p

प्रचेतस's picture

5 Sep 2012 - 11:45 pm | प्रचेतस

कविता छान झालीय. भेळेसारखीच चटपटीत

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2012 - 12:53 am | अत्रुप्त आत्मा

व्वा...व्वा... अनेक प्रति-सादकांनी जिलब्या दिलेल्या पाहून ड्वाले भरून आले,,,असोत...!
या पावसाळी दिवसात भेळ कित्ती जणांना पचणार म्हणा...? :-p

प्रचेतस's picture

6 Sep 2012 - 8:13 am | प्रचेतस

सहमत आहे.
एका बर्‍यापैकी चांगल्या कवितेला, निदान तसा प्रामाणिक प्रयत्न करून लिहिलेल्या कवितेला जिलब्या देणे हे अनाकलनीय आहे.

काही लोकांचा कोठा अंमळ जडच असतो हेच खरे.

बुवा, अजुन ड्रायव्हिंगच्या पहिल्या टप्प्यात आहेत हे स्पष्ट होतं आहे कवितेतुन, मी हेच सांगायला एवढा मोठा लेख लिहिला असता,

आणि बहुतेक प्रत्येकालाच ड्रायव्हिंग सुरु केल्यावर हा अनुभव येतोच, ट्रॅफिक मध्ये गाडी चालवता न येणं, समोरचा आपल्याच गाडीखाली येउन मेला तर काय अशी भिती वाटणं, आपल्या गाडीवर चरे उठण्याची भिती, फक्त आपण लई भारी हे दाखवण्यासाठी ' डायरेक्ट मंडईत पार्किंगला लावली दुस-या दिवशी गाडी' असं सांगणारेच जास्त भेटतात.त्यात कष्टाचे पैसे घालुन घेतलेल्या गाडीचं कौतुक देखील असतं, कवि लोकं पहिल्या प्रेमाचं कौतुक करणा-या कविता करतात, उदा - तुझे डोंळे, माझे काळे मग सुरु झाले चाळे - असल्या नाहीतर - तुझ्या श्वासाच्या लहरीवर माझ्या हृदयाच्या आंदोलनांचा पुल पडला , असल्या कविता जिलब्या निश्चित म्हणता येतील , पण एका वेगळ्या प्रेमावर, वेगळ्या विषयावर जिलबी असा प्रतिसाद देणा-यांनी आपण नविन गाडी घेतल्यानंतरचे दिवस आठवुन पहावे, गाडीला पडलेल्या पहिल्या
च-यानंतर रात्रभर न आलेली झोप आठवावी, आणि नसेल घेतली गाडी तर जेंव्हा घ्याल तेंव्हा हि कविता वाचुन बघा, मग भावना समजतील या मधल्या.

एखादा गंभीर विषय असा थोडासा विनोदी पद्धतिनं मांडायला सुद्धा बौद्धिक सामर्थ्य लागते, आणि लिहिलेलं न समजुन घेता उगा लेखकाय्चा किंवा कविचा इतिहास पाहुन प्रतिसाद देणं हे जास्तच खटकलं.

पाषाणभेद's picture

6 Sep 2012 - 1:29 pm | पाषाणभेद

वा वा!! बुवांची कवीता अन तुमचे विश्लेषण आवडले.

लीलाधर's picture

6 Sep 2012 - 9:38 am | लीलाधर

बुवा आवडेश हो तुम्ही केलेली भेळ तों.पा.सु. :-D :-P

स्पा's picture

6 Sep 2012 - 10:04 am | स्पा

वा बुवा लय भारी

प्रचंड प्रतिसाद लिहीता येईल पण रडू येईल, आवंढा दाटेल वगैरे कारणांनी थांबतो. आवंढ्याने घशात दुखण्याचा त्रास होतो.

उत्तम कविता. भिडलि ...

-- कवि

गवि's picture

6 Sep 2012 - 10:15 am | गवि

मेल्या नालायका. हलकटा.

--शिवि

स्पा's picture

6 Sep 2012 - 12:26 pm | स्पा

=)) =))

इरसाल's picture

6 Sep 2012 - 9:43 am | इरसाल

बाडीस.
बुवा छान जमुन गेले आहे. आवडले.

पुर्वग्रहाबाबत ५०शी सहमत.

गवि's picture

6 Sep 2012 - 9:51 am | गवि

ठीक.

सस्नेह's picture

6 Sep 2012 - 12:17 pm | सस्नेह

भेळेची पाकृ लै भारी जमलीये..
आमी रोज खाताव आसली भेळ. सांजंचा टाईमपास बरा हुतो..

मोहनराव's picture

6 Sep 2012 - 1:23 pm | मोहनराव

ओक्के..

भेळ जम्या नही. वै.पाटणकर काढा घेइन म्हणतो.
कविता ओढुन ताणुन केल्या सारखी वाटली.

शुचि's picture

6 Sep 2012 - 9:02 pm | शुचि

चटपटीत भेळ आवडली.

ज्ञानराम's picture

7 Sep 2012 - 3:35 pm | ज्ञानराम

भेळ चांगली झाली आहे.
:bigsmile:

बॅटमॅन's picture

10 Sep 2012 - 11:06 pm | बॅटमॅन

भेळ उशिराच खाल्ली, पण मस्त जमलीये!!!