.
उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन !
रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत..
भ्रष्टाचार - - बेसुमार
महागाई -- बेसुमार
भाववाढ - - बेसुमार
वाहने -- बेसुमार
लोकसंख्या - - बेसुमार
अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार
घुसखोर -- -बेसुमार
रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार
रस्त्यात खड्डे .. ! ! !
आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली ..
"बेसुमार" म्हणून ओरडणारे..
मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून -
घरातच का बरे गप्प बसून रहातात - ?
बेसुमारीला बराचसा आळा घालणे,
आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे -
असे मला तरी वाटते .
तुम्हाला ? ? ?
.
प्रतिक्रिया
14 Aug 2012 - 4:05 pm | वसईचे किल्लेदार
बेसुमार
14 Aug 2012 - 4:10 pm | मी_आहे_ना
बेसुमार गुंडांनी भरलेली मतपत्रिका ... मते तरी कोणाला द्यायची? म्हणूनच आम्ही वाट पाहतोय 'रिकॉल' ऑप्शनची. भले त्यामुळे मतदानावरील खर्च बेसुमार होवो!
14 Aug 2012 - 4:18 pm | ५० फक्त
१. रिकॉल ऑप्शन
२.७५% पेक्षा कमी मतदान झाल्यास निवडणुक रद्द करण्याची प्रक्रिया असावी.
३. उमेदवाराला मत देण्यापेक्षा फक्त पक्षाला मत देणे, पक्ष निवडुन आल्यावर पुन्हा एकदा त्या पक्षाने उमेदवार निवडणे पुन्हा प्रत्यक्ष मतदानानेच.
14 Aug 2012 - 4:27 pm | इनिगोय
लेखक आणि प्रतिसादकांशी सहमत. दर निवडणुकीच्या वेळी मी घरच्यांसह मतदान करते आणि सोबतच्या प्रत्येकाला मतदानाचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न करते. तुम्ही?
उरलेले सव्वाशे वाचक का शांत?
14 Aug 2012 - 4:33 pm | मन१
विषय तोच तो असला तरी मी ही तेच ते रडगाणं गाणार आहे.
.
मागची सात आठ वर्षे मताधिकार मिळाल्यापासून मतदान केलेलं आहे. त्यामुळे काहीही झाट फरक पडलेला नाही. मी केलं नसतं तरी काही फरक पडला नसता. एखाद्या वेळेस निवडून न येणार्या टीम अण्णामुळे पडायची शक्यता होती. पण त्यांनी स्वतःच्या कर्मानी आधीच्या पुण्याईची माती केली.
.
लोकशाही = मतदान असा सार्वत्रिक पसरलेला समज पूर्णतः बरोबर नाही.
लोकशाही मतदानाच्या पलीकडेही काहीतरी आहे; पण काय आहे ते ठाउक नाही.
.
.
भारतात democracy नसून hippocracy आहे.
.
मतदान हे उत्कृष्ट सेफ्टीवॉल्व आहे. सध्या विविध आधुनिक सामंतांचेच राज्य आहे. "आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली" अशी अगतिक, निर्बल, बरीचशी भ्रष्ट अशा सामान्याची अवस्था आहे. "उषः काल होता होता काळ रात्र झाली" हे गीत म्हणे आणीबाणीच्या कालात लिहिलं गेलं होतं; ते आख्ख्या भारतातल्या left behind आणि नव्याने left behind असलेल्या लोकांसाठी कायमचेच खरे आहे.
अर्थात त्या क्षुद्र भुक्कडांबद्दल वाईट वाटून घ्यायचे कारण नाही.तशीही ती साली lesser breed, कमअस्सल ,दुय्यम माणसे आहेत; अशी समजूत आम्ही आमची नकळतपणे घालून घेत असतो. असो.
.
.
सामान्यांनीच निवडून दिलेल्या राजकारण्यांबद्दल त्याच्या मनात घृणा असते.
"सगळे साले लुच्चे, नीच " आणि काही इतर अश्लाघ्य शिव्या स्वतःच निवडून देणार्यांबद्द्ल सामान्य वापरतो.
त्यातल्या त्यात कोर्ट्,लष्कर(armed forces) व काही काळापूर्वीपर्यंत पत्रकार ह्यांच्याबद्दल सामान्यांना जबरदस्त आदर होता.
आदर असणार्यांपैकी एकही प्राणी सामान्यांनी निवडून दिलेला नाही!
ना कोर्ट, ना जवान ना पत्रकार.
तरी ह्यांना लोकशाही हवीये. आनंद आहे.
.
.
.
तुमच्या भल्यासाठी इंग्रजांना घालवले गेले हा तुमचा गैरसमज करुन देण्यात आलेला आहे. स्वतःला सत्ता हवा असलेला कुणीही आधीच्या सत्ताधार्याला हाकलतो; तद्वतच ह्यांनी इंग्रजांना हाकले आहे. इंग्रजांच्या नजरेत एखाद्या फडतूस चाळकर्याची नि लोकलमधून लटकून जाणार्याची जी काय किंमत होती; त्यापेक्षा अधिक आजच्या राज्यकर्त्यांच्या नजरेत आहे असे जर कुणाला वाटत असेल तर त्याला माझा साष्टांग दंडवत.
.
भेंचोत रस्त्यात समजा कुठेही काही खुट्ट झालं; टकराटकरी झाली तर पहिला आवाज काय निघतो? "मै कौन हूं पता है? " लागलिच समोरुन उत्तर तयार "मै भी ऐरागैरा नही हूं| तमक्या पुलिसवाले का ढमका हूं. नाहीतर मी दादा-भाउ- अशा कुणाचा तरी खास मर्जीतला हूं" म्हणजे काय?
"मी अधिक शक्तीशाली म्हणून मी बरोबर" हे असलं तुम्हा आम्हा भारतीयांचं natural instinct , reflecx action बनलय.
"मी योग्य तसा जातोय. तू राँग साइड आहेस" हे आर्ग्युमेंट कुणीच का करत नाही?
अरे भाड्या तू कुणी का असेना एखाद्या सत्त्ताधार्याची अनौरस औलाद का असेना मी काय करु? "कहां से आ अरहा था? राँग साइड क्यूं आ रहा था" असे कुणीही का म्हणत नाही?
करणार कसे? करायला नैतिक अधिष्ठान नाही. असे आर्ग्युमेंट केल्यास आणि मागे कुणी गॉडफादर नसल्यास तुमच्या जीवीताची कुठलीच ग्यारंटी इथली कायदा सुव्यवस्था देत नाही.
.
.
सभ्य लोक "कशाला उगीच पोलिसांच्या फंदात पडता" असे सहज बोलून जातात. सभ्यांना पोलिसांची भीती आहे. शक्तीशाली , गुंडे "पोलिसच ना, करुन घेउन म्यानेज" हे असले उद्गार काढतात.
वस्तुतः पोलिसांची भीती गुंडांना हवी. सभ्यांना पोलिसांबद्दल आपलेपणा वाटावा.इथे स्थिती उलट आहे.
.
.
अर्थात ह्यात भरडून निघणार्यांबद्दलही , शोषितांबद्दलही हल्ली तितकं वाईट वाटत नाही. कुठं तरी वाचल्याप्रमाणं संधी मिळताच हेच शोषित शोषक होतात.
.
.
सध्याचे व्यवस्थेचे कौतुक करणारे लगेच मुद्दे घेउन येतात "भ्रष्टाअचार काय आमच्याच देशात आहे का? इतरत्र असगळं काही आलबेलच आहे का?"
त्यास उत्तरः- "नाही. सगळं आलबेल आहे असं मुळीच नाही. पण इतर देशांत नियम मोडण्याबद्दल लाच द्यावी लागते. इथे नियमानुसार काम करायलाही पैसे द्यावे लागतात. पासपोर्ट काय, लायसन्स काय, एजन्ट शिवाय काढून बघा मग वैताग समजेल. " . पासपोर्टसाठी मला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट मागितले. हे काढण्यासाठी मुलात डोम्मिसाइल सबमिट करावे लागते. डोमिसाइल असेल तरच नॅशनॅलिटी मिळते असा तेव्हा नियम होता.
त्यानुसार मी नॅशनॅलिटी काढूनही आणले. आणि तत्काळ मला पासपोर्ट ऑफिसातून पुन्हा हाकलून देण्यात आले . कारण? " सबमिट केलेले ओरिजनल डोमिसाइल पुन्हा अर्ज विनंत्या करुन आण. तरच आम्ही प्रक्रिया पुढे सुरु ठेवू." आमचा हात दगडाखाली अडकला होता. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. शेवटी कसं बसं डोमिसाइल आणलं नि सुटलो. माझ्यासोबतच्या इतर कुणालाही असले सव्यापसव्य करावे लागले नाहीत. कारण स्पष्ट होतं. जाउन द्यात. इथे नको.
.
.
एका पेप्रात मोठ्या कौतुकानं आल्ं होतं "India is functioning anarchy!" आनंद आहे.
14 Aug 2012 - 5:07 pm | मी_आहे_ना
(फक्त शेवटच्या परिच्छेदासाठी) कालच मी माझा आणि मुलाचा (५वर्षांनी करावालागतो म्हणून) पासपोर्ट रिन्यू केला. 'पासपोर्ट सेवा केंद्र'मधे कुठेही जास्तिचे पैसे नं देता काम झाले. (पी.एस.के. हे टी.सी.एस.कडे आऊटसोर्सड आहे, त्यामुळे संपूर्ण पारदर्शकता. ) वेळ लागला जास्ती, पण तो एजंटकडून आलेल्यांनाही लागला. मुळात तिथे एजंट्सना प्रवेशच नाही. (थोडक्यात, सुधारणा होतायेत.)
14 Aug 2012 - 5:42 pm | इनिगोय
माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांचं पासपोर्टचं काम पैसा न खिलवता झालं. पण मन१सारखे इतरांचे अनुभवही ऐकले आहेत. पासपोर्ट ऑफिसमध्ये नेमकं काय घडतं ते इथे / इतरत्र कोणी सांगू शकेल का? आणि मनस्ताप टाळून तो मिळवणं १००%केसेस मध्ये शक्य आहे का?
14 Aug 2012 - 6:10 pm | मन१
चुकीचा अर्थ निघतोय असं वाटतय. एक गोष्ट स्पष्ट करतोय. मला तिथे कुणीही पैसे दे असं सुचवलं नाही.
मात्र भयंकर रडकुंडीला आनलं गेलं. व्यवहारात प्रथमच इतका थेट पडत होतो. सरकारी ऑफिस ही काय चीज असू शकते ह्याची त्यावेळेस नीटशी कल्पना नव्हती. हां, नम्बर एकचा शरीफ नि डरपोक असल्यानं फारच नम्रतेने, अजिजीने बोलायचो. त्याचा असलाच तर काही परिणाम असू शकतो.
अजून एक म्हणजे माझ्याकडे राशन कार्ड नव्हते. पण त्याला पर्याय म्हणून लागणारी हरेक कागदपत्रे होती. लाइअट बिल , टेलिफोन बिल आणि अजून एक काहीतरी फोटो आयडी म्हणून (आता आठवत नाही) तरी तंगवला साला.
"असं कसं राशन कार्ड नाहिये" म्हणून भयंकर पिडला. आख्ख्या ऑफिसात लागलेल्या सूचनापत्रात, बोर्डवर कागदांच्या लिस्ट मध्ये राशन कार्ड अनिवार्य आहे हे कुठंही लिहिलं नव्हतं.
बरं, मी संशयास्पद वाटलो म्हणायलाही जागा नाही. तशा स्थितीत थेट घरी येउन चौकशी करणे स्वतःहून कंम्प्लेंट दाखल करणे हे ही माणसं कधीही करु शकतात.(पासपोर्ट पोलिस आयुकतालयातून इश्यू होत होता त्यावेळी. एक पोलिसप्रतिनिधीही असायचा आमच्याइथे.)
त्याच वेळी माझ्या एका भावी कुलीगला माझ्या निम्मेही कागदपत्रं नसताना सहज पासपोर्ट दिलेला. जन्मदाखला नाही? हरकत नाही, दे अॅफिडेव्हिट जोडून. राहत्या ठिकाणचा पुरावा नाही, दे प्रतिज्ञापत्र काही हरकत नाही. नाव्/स्पेलिंग मध्ये घोळ आहे, दे एखाद्या जिम्मेदार गॅझेटेड ऑफिसरचं पत्र.
माझ्या कुलीगच्या दृष्टीतून पाहिलं तर आख्खं ऑफिसच कसं co operative होतं.
चांगले अनुभवही आहेत, माझे पी एफ चे पैसे वेळेत पूर्ण मिळाले होते. त्याबद्दल मी मिपावरच जाहीर धागा काढून आभार मानले होते. पण ते प्रसंग विरळा. लाइट मीटर नीट करा म्हणून सांगायला गेलो तर पार दिमाग खराब केलं होतं.
माझी तक्रार काय होती? "सध्या आमचे मीटर चारेकशे रुपये बाय डिफॉल्ट वीज बील दाखवते आहे. आमचे ह्याहून जास्तही येउ शकते. कृपया चांगला मीटार बसवणे, किंवा आहे त्यास दुरुस्त करणे."
झालं. आख्खी यंत्रणा अशी काही तुटून पडली की बस रे बस. "तुम्ही मीटार खराब का केलत" हा त्यांचा प्रश्न.(ते आम्हीच केलेलं आहे हे भाड्यांनी गृहित धरलं होतं.) आम्ही केलं असतं तर फुकटात फायदा घ्यायच्या ऐवजी इथं सज्जन माणसासारखे आलो असतो का बोंबलत. अशक्य प्रकार आहे.
असो. प्रत्येकाच्या वैयक्तिक घताना म्हटल्या तर आख्खी मिपा ब्यांडाविड्थ संपेल. वैयक्तिक घटना टाळून सार्वत्रिक तक्रार, कंप्लेंट, भाष्य हे माझं वरचच सध्याही आहे.
14 Aug 2012 - 7:04 pm | इनिगोय
लाच नसेल तर मग अशा अडवणुकीचं काय कारण असू शकतं?.. आणि शरिफ आणि डरपोकचं म्हणाल, ते तर मी पण आहे हो. मध्यमवर्गात 'मोडतो' आपण. पण नडला त्याला शब्दशः फोडण्याचा इतिहास असलेल्या एका कलिगलाही मॅरेज सर्टिफिकेट्च्या वेळी असाच अनुभव आला होता.
असो, धागा हायजॅक केल्याचा आरोप होईल आता, आवरते घेऊया इथे, वाटल्यास व्यनिचा उपयोग करू.
15 Aug 2012 - 12:58 am | काळा पहाड
तुम्हाला सोपा उपाय माहीत नाहिये? अहो विंग्रजीत भयंकर हात्वारे करत जोरजोरात बोला. हे कारकुंडे भुताला नाही इतके इन्ग्रजीला भितात. ते मराठीत घसरले तरी आपण इंग्रजी सोडायची नाही. मधे मधे त्यांना बोलताना थांबवून विंग्रजीत मोबाइल वर सुचना द्यायच्या. हा एक् उपाय. किंवा दुसरा मग पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात १० तोळ्याची (खोटी) सोन्याची माळ, दोन मोबाइल, गॉगल इ. घालून अतिशय निर्बूद्ध पणे बोलणे.
14 Aug 2012 - 7:21 pm | तुषार काळभोर
तुमच्या भल्यासाठी इंग्रजांना घालवले गेले हा तुमचा गैरसमज करुन देण्यात आलेला आहे. स्वतःला सत्ता हवा असलेला कुणीही आधीच्या सत्ताधार्याला हाकलतो; तद्वतच ह्यांनी इंग्रजांना हाकले आहे. इंग्रजांच्या नजरेत एखाद्या फडतूस चाळकर्याची नि लोकलमधून लटकून जाणार्याची जी काय किंमत होती; त्यापेक्षा अधिक आजच्या राज्यकर्त्यांच्या नजरेत आहे असे जर कुणाला वाटत असेल तर त्याला माझा साष्टांग दंडवत.
सभ्य लोक "कशाला उगीच पोलिसांच्या फंदात पडता" असे सहज बोलून जातात. सभ्यांना पोलिसांची भीती आहे. शक्तीशाली , गुंडे "पोलिसच ना, करुन घेउन म्यानेज" हे असले उद्गार काढतात.
वस्तुतः पोलिसांची भीती गुंडांना हवी. सभ्यांना पोलिसांबद्दल आपलेपणा वाटावा.इथे स्थिती उलट आहे.
याच्याशी १००% सहमत. बाकीच्याला पास.
15 Aug 2012 - 10:01 pm | दादा कोंडके
एकेक शब्द खणखणीत!
१००% सहमत...
15 Aug 2012 - 10:53 pm | शिल्पा ब
मनोबांशी सहमत.
एक पासपोर्टाचं सोडलं तर ..कारण आम्ही एजंटतर्फे काढला होता म्हणुन.
14 Aug 2012 - 5:01 pm | इरसाल
वाक्यच काय, शब्दच काय किंवा अक्षरच काय......... तर दिलेल्या एक एक टिंबाशी १००% सहमत आहे.
15 Aug 2012 - 9:28 pm | सूड
खरेंऽऽऽच!!
(अगदी खरे)
15 Aug 2012 - 9:41 pm | अन्या दातार
+१
(नगदी खरे)