घुसमट

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
10 Jul 2012 - 6:54 am

घुसमट-भाग १

स्वयपाक घरच्या दाराची कडी खळकन निघाल्याचा आवाज तिने ऐकला. ताठरल्या शरीरान श्वास रोधून ती पडून राहिली. क्षणा दोन क्षणातच बेडरूमच्या दारावर धसफशीचा आवाज आणि पाठोपाठ एक सणसणीत लाथ!
'स्साली' त्याच्या तोंडून निसटलेली शिवी तिला लख्ख ऐकू आली. बाजूला झोपलेल्या दोन्ही मुलांकडे तिने पहिले. आईच्या कुशीत निर्धास्त होती ती! घामान डबडबलेला चेहरा पुसत ती उठून बसली. हॉल मध्ये काहीतरी फेकल्याचा आवाज अन मग शांतता!!!
दारावर लाथ घालणारा, तिचा नवरा होता! तिच्या दोन मुलांचा बाप ! सहाच महिन्यापूर्वी तिला घटस्फोट देऊन दुसर लग्न केलेला! त्याच्या शिवाय जगाव लागेल याची कल्पना कधीच न केल्यामुळे, उध्वस्त झाली होती ती. कोर्टाच्या फेऱ्या , वकिलांचे सल्ले, नातेवाईकांचे शेरे, या सगळ्या चक्रातून उस पिळावा तशी पिळवटली होती. त्याच्या पगारातून मिळणाऱ्या पोटगीवर घर चालण शक्यच नव्हत, मग याच निवडण टिपण, त्यांचा स्वयंपाक अशी अडली नडली काम करायला लागली होती ती.
अन आज सहा महिन्यान तो मुलांना भेटायच्या सवलतीचा बहाणा करून आला होता. कोर्टात त्यान मुलांची जबाबदारी सपशेल नाकारली होती. ' मुलांना आईच हवी' हे त्याच तत्वज्ञान तिन खाल मानेन ऐकल होत. पण काल आल्यापासून मुलांशी बोलताना , त्यांच्याशी खेळताना , तिला जाणवत होती ती त्याची नजर! हावरी लोचट नजर!
'पप्पा तुम्ही घटस्फोट घेतला ना?' चार वर्षाचा प्रज्वल बोलून गेला .
'अरे घटस्फोट कोर्टासाठी ! म्हणून नाती थोडीच तुटतात?' त्याचा अर्धा प्रश्न तिला होता.
'अरे मी तुमचा बापच आहे ! भारतीय परंपरेनुसार काही बदललं नाही .'
अच्छा ! म्हणजे तिन आजही त्याला नाही म्हणायचं नाही!
धसमुसळा तर तो पहिल्यापासूनच होता. तीच डोक सणकल! जेवण आटोपून तो हॉलमध्ये गेल्याबरोबर तिने दाराला कडी लावून टाकली. स्वयंपाक घर आवरून तिने मुलं झोपवे पर्यंत त्यान वाट पहिली , पण मग मात्र एखाद्या चोरासारखा तो स्वयपाक घराची कडी काढून आत आला होता ! बेडरुमच्या दाराच्या दोन कड्यांमूळे त्याला चरफडत परतावं लागल!
सकाळी ती नेहमीच्या गडबडीत रमून गेली.
'तुला गरज नाही वाटत का?' त्यान सरळच प्रश्न केला.
तो कानाआड करत तिने आपली काम चालू ठेवली. आज एकांचा वीस माणसांचा पोळीचा स्वयंपाक होता. ती एखाद्या चक्रासारखी भरभर आवरू लागली. सगळ आवरून डबे भरे पर्यंत त्यांचा माणूस दाराशी आला. त्याने दिलेले पैसे घेवून त्याला डबे वेळेवर परत करण्याची आठवण करून ती दमून टेबलाशी बसली.

'जेवण विकून कामावतेस?' त्याचा छद्मी प्रश्न
हल्ली तिला रडू सुद्धा यायचे बंद झाले होते. ती तशीच खाल मानेन बसून राहिली.
'अजून मंगळसूत्र अन कुंकू आहे ना?' तो परत बोलला.
'तुम्हाला किंमत आहे का त्याची?' ती उसळून बोलली.
तिच्या डोळ्यात रोखून बघत तो म्हणाला,' आहे ना! म्हणून तर आलोय. तुझी गरज भागवायला! आठ दहा महिने झाले असतील नाही? नाही , तू तशी कुठे बाहेर जाणार नाहीस म्हणून म्हंटल.'
आता मात्र तिचा संयम संपला. तिने सरळच टिकली काढून टेबलाला चिटकावली , पाठोपाठ मंगळसुत्र! तिचा तो संताप बघून तो खो खो हसू लागला,
' अग पुरुषांना सगळ चालत , बायकांना नाही चालत ' तस जुन पुराणाच तत्वज्ञान त्यान तिला सुनावलं.
एकूण समाजाची सारी बंधन , उपचार तिच्यावर लादून तो निर्धास्त होता. तो घरात आलेला समाजाला चालत होत. त्यान जबरदस्ती केली असती तरी समाज तिलाच हसला असता. कुणीतरी साखळदंडान पाय जखडावेत तस झालं तिला.
'आज परत जायला हवय. मी परत येईन. तो पर्यंत शांत होशील ना? खूप दिवस झाले, मला सवय लागलीय तुझी'
तो कोडगेपणा ऐकून ती मनातल्या मनात चरफडत राहीली.
त्याच्याशी तिने नऊ वर्ष संसार केला होता. आई बापांनी करून दिलेला , समाजाच्या दृष्टीने तिला साजेसा , पुरेस कमावणारा अशी सारी विशेषने असलेला तो नवरा होता. सहा वर्षाची मुलगी अन चार वर्षाचा मुलगा असं हेवा वाटण्याजोग आटोपशीर , औरस चौरस कुटुंब होत! होत त्यात समाधान मानून तिच्या चाकोरीबद्ध आयुष्यात ती सुखी होती. अन मग अचानक आलेल हे वादळ. त्याचे बाहेर कुणाशी तरी संबंध, ते वाद, ती भांडण , त्याला हवा असणारा घटस्फोट, या सगळ्यातून ती आत्ताशी कुठे बाहेर पडत होती. 'कुणाची तरी कोण' म्हणून ओळखीशिवाय , एक व्यक्ती म्हणून बाहेर जात होती. समोरचा एकाकी अन अभद्र रस्ता तिला दिसत होता , पण त्यात हा नव्यान आलेला प्रश्न नव्हता . सगळ संपल आता, आता नवरा हा फक्त अपुऱ्या पोटगी पुरता. इथून पुढे दोन कच्चीबच्ची घेऊन त्यांच्या कडे बघत जगायचं , हे तिन नक्की केल होत. पण देत असलेल्या पोटगीच मोल मागायला तो परत येईल याची तिने कधीच कल्पना नव्हती केली.
इतकी वर्ष त्याच्या बरोबर एकत्र राहिल्यान , ती त्याला लख्ख वाचू शकत होती. त्याच्या वागण्या बोलण्यात कायम , स्वत:च्या पुरुषत्वाचा उल्लेख असायचा. 'मी पुरुष आहे मला चालतंय.' 'मी पुरुष आहे मी करणार' ' या गोष्टी पुरुष करीत नाहीत, या बायकांनी करायच्या गोष्टी' हे सार त्याच्या बोलण्यात असे. कधी कधी उठून तिने वादहीं घातला होता. पण ते त्याचे संस्कार होते, आणि तसा विशेष या गोष्टीचा तिला फारसा जाच कधी वाटला नव्हता. उलट पुरुषाला थोडा अहंकार हवाच असं तीच मत बनल होत.
आज मात्र तो पुरुषी अहंकार एका नरात बदलला होता! त्याच्या कळपातली एक मादी म्हणून तिला वापरायचा तो प्रयत्न नव्हे तर हक्क समजत होता. त्यान बाहेर सुख शोधल तर ते रास्त होत. पण तिने मात्र फक्त त्याचाच शिक्का शरीरावर घेऊन जगायचं होत. खरच ! या आठ दहा महिन्यात तिला कधीच हीं जाणीव झाली नव्हती. घटस्फोटात आपल शारीरिक सुखही कायमच दुरावल हीं जाणीव तिला स्पर्शलीही नव्हती. होती ती फक्त समाजाच्या चौकटीत रहायची धडपड ! तशी ती फार वयस्क नव्हती, एकविसाव्या वर्षी लग्न अन एकोणतिसाव्या वर्षी घटस्फोट...!
सगळे विचार माग सारीत ती कामाला लागली, पुढची काम एकमेकात गुंतून गोंधळ होऊ नये म्हणून ती आलेली प्रत्येक ऑर्डर , प्रत्येक काम केलेन्डरवर लिहित असे.
"अरे! मार्च....? एप्रिल मध्ये मुलीचा वाढदिवस...."
तिच्या पोटात खड्डा पडला. म्हणजे या कारणान तो परत येणार.
तिने तासाभराच्या अंतरावर दुसर्‍या गावात रहाणार्‍या आईला पोस्टकार्ड टाकल. हल्ली प्रवासाची आणि गाडीभाड्याची चैन विचार करुन करावी लागायची तिला. सारच लिहिता येत नसल्यान वाढदिवसाच निमित्त तिलाही पुरेस होत.
घरात तिच्या आईला बघुन तो चमकलाच. पण मग परत डोळ्यात कावेबाजपणा घेउन त्यान मुलीला डिवचल
"काय ग? किल्ले बांधतेस का?"
रात्री टी.व्ही. वर लागलेल दूरदर्शन पाहुन त्यान मोठ्यान विचारल
"केबल बंद केल का?'
"मला परवडत नाही" तिने सरळच सांगुन टाकल
"मी देतो ना पैसे ." तो तिच्या आईकडे बघत बोलला."मुलांना बर पडेल."
"नको" ती तुटक बोलली.
तिची आई अगदे कानकोंडी होउन बसली होती. म्हंटल तर ती त्याच्या घरात राह्यली होती, म्हंटल तर ती आपल्या घटस्फोटीत मुलीला आधार द्यायचा प्रयत्न करत होती.
"हे बघा आई.."तो तिच्या आईकडे बघत बोलला," झाल ते झाल. विसरुन जा. अश्या उपचारांमुळे माणस तुटत नाहीत, नाही का? तुम्हाला मी आजपण आई म्हणुनच हाक मारतोय ना?"
त्याच्या त्या निर्लज्ज्पणाच्या कळसान तिचा संताप संताप झाला, काही सुचेनास झाल तिला.
उपरा कुणी जर वाकड्या नजरेन तिला पहाता तर ती उघड उघड विरोध करु शकली असती, पण हे सगळच अवघड होउन बसल होत. तिच्या नकाराची त्याला गंमत वाटत होती. जीव मुठीत घेउन पळणार्‍या उंदराशी खेळाव तसा उंदीर मांजराचा खेळ तो खेळत होता.

(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

अमितसांगली's picture

10 Jul 2012 - 8:11 am | अमितसांगली

माझ्या बहिणीची एक मैत्रीण डॉक्टर आहे. नुकतेच तिचे लग्न झाले. लग्नात जवळपास १० लाख रुपये खर्च झाले. प्रथेप्रमाणे नंतर जाचक सासुरवास सुरु झाला. २१ व्या शतकात टी.व्ही.,गाडी, सोने माहेरकडून आणण्यासाठी छळ सुरु केला. माहेरच्या लोकांशी पूर्णपणे संबंध तोडले. रोज मारहाण करू लागले. प्रसुतीच्या अगदी काही दिवसापुर्वीही मारले व त्यातच तिच्या गर्भाचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचा प्रचंड मानसिक परिणाम तिच्यावर झाला व टी आता मनोरुग्ण आहे. सर्व घरात एवढ्या प्रमाणात नसले तरी मुलींकडून मोठ्या प्रमाणत हुंडा, सासुरवास, अपमानास्पद वागणूक हे अजूनही सुरूच आहे.

एका स्त्रीने नवरा वारल्यानंतर आपल्या तीन मुलांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे मोठे केले. एक अभियंता झाला. त्याने लग्न झाल्यावर स्वताचा संसार थाटला व आईला रामराम केला. मुलगी लग्न करून नघून गेली. दुसर्या मुलाने व्यवसायात चांगले यश मिळवले पण घराची परिस्थिती काय? रोज आईला शिव्या देणे व मारणे. हे आता मुक्तपणे सहन करण्यावाचून त्या आईकडे आता पर्यायाच नाही.

स्त्री शिकली, कर्तुत्ववान झाली, स्त्री-पुरुष समानता आली, समाजही बदलला पण समाजाची मानसिकता खरोखरच बदलली का ? स्त्री आजही स्व-संरक्षण करू शकते का ? ती सुरक्षित आहे का ? तिला सर्वांकडून मनापासून सन्मानाची वागणूक मिळते का ? आधुनिक बदलांसाठी ती सुसज्ज आहे का ? दुर्दैवाने यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत.

आरक्षण आले, समानता आली, सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटविला असे काहीही असले तरी दिवसेंदिवस स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात वाढच होत आहे. कामाच्या ठिकाणी होणारी कुचंबना, कुचेष्टा, गर्दीचा फायदा घेऊन होणारे स्पर्श हे सर्व स्पष्ट करतात कि भारतीय समाज आजही स्त्रियांकडे फक्त "चूल नि मुल " व "भोगाची वस्तू " याच दृष्टीकोनातून बघतो आहे. भीती, लाज, संकोच, बदनामी यामुळे स्त्रिया तक्रार करत नाहीत याचाच गैरफायदा अनेकजण घेतात.

स्त्रियांच्या असहायतेपनाची, दडपणाची, भीतीची मजा घेण्याची विकृती वाढत आहे. रस्त्यावरून जाताना, प्रवासात छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या ठिकाणी होणारे अन्याय, खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका, प्रवासातील त्रास हे सर्व मनावर दगड ठेऊन सहन करण्याशिवाय तिच्यावर पर्यायच नाही.

यात चूक कोणाची? पण अजून किती दिवस हे सहन करायचे ?? यावर काही उपाय?

पालक जरी परंपरागत विचारांचे असले तरी मुलांनी त्यांची जबाबदारी ओळखून वागायला हवे. स्त्रियांना छळण्यात कसला पुरुषार्थ?

स्पंदना's picture

10 Jul 2012 - 11:33 am | स्पंदना

ममो, वल्ली, मृत्युंजय, ५० फक्त, वीणा, निवेदिता ताई अन स्नेहाराणी धन्यवाद.

अमित...
तुम्ही लिहिलेले प्रसंग वाचुन मन अवाक झाल. एक डॉक्टर ? तिने असा अत्याचार सहन करावा? अन तिच्या माहेरच्यांनी परिस्थिती हाताबाहेर जाउ पर्यंत गप्प बसाव? प्रोफेशनल ट्रेनिंग्ज तुम्हाला माणसांशी डील करायला शिकवत नाहीत का? असणारच त्यातल्या त्यात डॉक्टर म्हणजे तर पुर्‍या कोर्स मधे पेशंटच्या नात्यान बाकि बरीच मंडळी तुम्ही पहाता.
असो.
मला बोलायच आहे ते तुमच्या >>स्त्रियांच्या असहायतेपनाची, दडपणाची, भीतीची मजा घेण्याची विकृती वाढत आहे. रस्त्यावरून जाताना, प्रवासात छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या ठिकाणी होणारे अन्याय, खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका, प्रवासातील त्रास हे सर्व मनावर दगड ठेऊन सहन करण्याशिवाय तिच्यावर पर्यायच नाही. या पॅरावर.
तुम्ही जे दडपण म्हणता ते घरी असण एक वेळ ठिक, पण बस मध्ये रस्त्यावर अशी दडपण का? माफ करा पण १० वर्षापुर्वी पर्यंत रस्त्यावर हात लावणार्‍याच्या पाठीत जे हातात असेल ते मारणारी निदान मी तरी होते. काय हिम्मत नसते त्या भ्याड माणसात. माझ उत्तर एकच असायच 'तुम अपने तरिकेसे हात लगा चुके ना? ये मेरा हात लगाने का तरिका है। " तशी परत फिरुन विचारायच निर्ढावलेपण करणारे पण होते. मग उगा तिथच उभा राहुन भेडसावायला बघ, असे प्रकार चालायचे. पण घाबरणार्‍याला घाबरवल जात, न घाबरणार्‍याला नाही. पण वाईट वाटत ते एकाच गोष्टीच, अश्या वेळी रस्त्यावर उपस्थितांपैकी, एकही स्त्री वा पुरुष माझ्या मदतीला नाही आला.
दोन वर्षापुर्वी, केरळात असच फिरत असताना एका तेरा चौदा वर्षाच्या मुलीला एकजण हात लावताना पाहिल अन दटावल , पळता भुई थोडी झाली त्याला नुसत्या दटावण्यान.
मुद्दा एकच जेंव्हा स्त्री वा मुलगी प्रतिकार करते, तेंव्हा नुसते बघे होण्या ऐवजी, पुढे व्हा. निदान तिच्या बाजुला उभे राहुन तिला मोरल सपोर्ट द्या.

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 8:34 am | मराठमोळा

छान सुरुवात.

ही कथा म्हणून सुरु झालीये आणि कथा म्हणूनच संपावी अशी आशा करतो. कथेला प्रतिसादकांनी भलतेच वळण दिले नाही म्हणजे झाले.
पु भा प्र.

सोत्रि's picture

11 Jul 2012 - 9:15 pm | सोत्रि

खरंच, फक्त एक कथा म्हणूनच आस्वाद घेतला जावा असे वाटते, मनापासून.

एकदम दमदार सुरूवात झाली अहे. पु.भा. प्र.

-(घुसमट न होउ देणारा) सोकाजी

प्रचेतस's picture

10 Jul 2012 - 8:45 am | प्रचेतस

छान लिहित आहात.
कथा वाचताना जयवंत दळवींची आठवण झाली.

पुभाप्र.

निवेदिता-ताई's picture

10 Jul 2012 - 9:02 am | निवेदिता-ताई

छान लिहिले आहे....वाचत रहावे असे..... :)

मृत्युन्जय's picture

10 Jul 2012 - 10:02 am | मृत्युन्जय

लिखाण छान जमले आहे. कथा वाचतो आहे.

५० फक्त's picture

10 Jul 2012 - 10:13 am | ५० फक्त

उत्तम लिहिलंय, धन्यवाद.

पण या निमित्तानं काही प्रश्नांना वाट मोकळी करुन मिळेल ही अपेक्षा.

चित्रगुप्त's picture

10 Jul 2012 - 10:37 am | चित्रगुप्त

वाचनीय कथा. पुढील भाग लवकर यावा.
मराठमोळा यांच्या "ही कथा म्हणून सुरु झालीये आणि कथा म्हणूनच संपावी अशी आशा करतो" . .. शी सहमत.

एक विनंती:
सहज प्रवाह असलेलं हे लिखाण वाचताना अधून मधून 'शरीरान' (शरिराने वा शरिरानं), 'घामान' (घामाने व घामानं), 'संपल' (संपलं) वगैरे वाचताना ठेच लागल्यासारखं वाटलं.
हा मुद्दा तुमच्या खालील वाक्यानं जास्त स्पष्ट होईलः
......."अग पुरुषांना सगळ चालत , बायकांना नाही चालत "
इथे 'चालत' हाच शब्द एकदा "चालतं" असा, तर एकदा "चालत" असा हवा.
तसंच 'तीच' आणि 'तिचं' याचे अर्थ वेगवेगळे असल्याने यथायोग्य शब्द असावा.
(शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दल क्षमस्व).

स्पंदना's picture

10 Jul 2012 - 11:17 am | स्पंदना

तुम्ही सांगे पर्यंत लक्षात नाही आल. आता लक्षात ठेवेन. पण काय होत चित्रगुप्त साहेब,लिहायचा वेग अन अश्या बारिक सारिक शुद्धलेखनाच्या चुका यांचा मेळ बसे पर्यंत त्यातल काही तरी एक निसटत. म्हणजे अगदी शब्द शब्द निरखत राहिले तर कथा निसटुन जाते. हे अस बर्‍याचदा होत. तरिही प्रयत्न करेन.

बाकि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

10 Jul 2012 - 4:39 pm | मुक्त विहारि

आधी सगळे लिहुन घ्या आणि मग शांतपणे व्याकरणाच्या एरर( मराठीतील चपखल प्रतिशब्द आठवत नाही)सुधारत बसा.

आहे काय अन नाही काय

प्रास's picture

10 Jul 2012 - 5:35 pm | प्रास

एरर = त्रुटी (?) चूक (?) हे चपखल नैत? :-o ;-)

वीणा३'s picture

10 Jul 2012 - 10:57 am | वीणा३

जर त्या बाई ने काहीच प्रतिकार केला नाही तर कथा आहे हे माहित असून पण खूप चीडचीड होईल :(.
काही नमुनेदार बायका अतिशय वाईट नवऱ्या बरोबर चूपचाप राहताना बघितला ना की त्यांचाच राग येतो त्यांच्या नवऱ्या पेक्षा.

sneharani's picture

10 Jul 2012 - 11:17 am | sneharani

झकास जमलीये, येऊ दे पुढचा भाग लवकर!!

अर्धवटराव's picture

10 Jul 2012 - 11:39 am | अर्धवटराव

कथा काल्पनीक असली (असावी अशी इच्छा) तरी बरीच प्रातिनिधीक म्हणावी लागेल... पण अजुन फार काळ नाहि चालणार हे... म्हणजे, पुरुषी मानसीकता नाहि बदलणार, पण घुसमट सहन करण्याचं प्रमाण खुप कमी होईल आणि प्रथम डिफेन्सीव्ह - मग अफेन्सीव्ह संघर्ष प्रचंड वाढतील.

अर्धवटराव

सुहास..'s picture

10 Jul 2012 - 11:45 am | सुहास..

खर तर !

थोडा अपेक्षाभंग झाला आहे , अर्थात हे कथानक असेल तर वोक्के असे म्हणेन मी...कारण एका पुरूषाच्या कथेवरून जर समस्त पुरूषवर्गाचे जनरायलेशन होणार असेल तर _/\_

ही मिरर ला आलेली पिंपरी चिचंवड ची सत्यघटना !

पाच वर्षे सुखाचा संसार करणार्‍या बायकोने ,अचानक एकुलत्या एका मुलीच्या हक्कासकट पोटगी मागत डिव्होर्स फाईल केला. नवरा मारहाण करतो ई.ई. नेहमी ची कारणे ...ती आणि तो दोघे ही कमी अधिक प्रमाणात कमवित होते...साक्ष ई.ई. चालु असताना आठ वर्षाच्या मुलीला कोर्टात उभे रहावे लागले, तिने दिलेली साक्ष ही अशी ..

माझी आई आणि दुसरा एक माणुस घरातील बेडवर होते, आई खाली होती आणि माणुस वरती होता.....ते काय करत होते...हे विचारल्यावर मुलीने ...ते मला कळाल नाही असे उत्तर दिले...किती वेळा असे पाहिलेस तेव्हा मुलीने मी शाळेतुन आल्यावर नेहमीच असायचे ...पप्पा येईपर्यंत ...

ते आई वडील गेले खड्ड्यात...पण आज त्या आठ वर्षांच्या मुलीवर सख्ख्या आईची साक्ष द्यायची वेळ आली..काय संस्कार घडले असतील ??

विचार कर अपर्णा ..किती सहजगत्या आपण पुरूषाला जबाबदार ठरवितो....(सगळ्या च नव्हे)स्त्रिया ( सगळ्याच )पुरूषांना " मॅन्युपुलेट " करत नाहीत...हे तरी कितपत सत्य असावे..

५० फक्त's picture

10 Jul 2012 - 12:09 pm | ५० फक्त

म्हणुनच लिहिलं होतं - पण या निमित्तानं काही प्रश्नांना वाट मोकळी करुन मिळेल ही अपेक्षा.

स्पंदना's picture

11 Jul 2012 - 10:01 am | स्पंदना

दोन दिवस लागले हा प्रतिसाद पचवायला सुहास. जनावराच्या पातळीवर उतरलेल्या व्यक्ती त्या. अर्थात दोघेही. कारण तो पुरुषही एका लहाण मुली समोर असल काही करु धजला, अन ती आई तर्....बिआँड एनी कमेंट.

पण तुझ हे वाक्य..किती सहजगत्या आपण पुरूषाला जबाबदार ठरवितो....(सगळ्या च नव्हे)स्त्रिया ( सगळ्याच )पुरूषांना " मॅन्युपुलेट " करत नाहीत...हे तरी कितपत सत्य असावे.. याच उत्तर आहे माझ्या कडे. एखादी वक्ती आपल्या अधिकाराचा, आपल्याला निसर्गतः लाभलेल्या वर्चस्वाचा जो बाऊ करते त्या बद्दल ही कथा आहे. आता इथे जर तिचे माहेरचे पुरुष दाखवले असते, तर ते साहजिकच तिच्या बाजुने नसते का? तसेच उगा विनयभंगाचा वा बलत्काराचा कांगावा करणार्‍या स्त्रियाही मी नाकारत नाही. यालाच मी एखाद्या व्यक्तीने निसर्गतः मिळालेल्या वर्चस्वाचा घेतलेला अवाजवी फायदा म्हणेन मी.
मला स्वतःला हा पुरुष म्हणुन वेगळा कायदा अन स्त्री म्हणुन वेगळ्ळा व्यवहार नाही आवडत, तरीही मला सांग्...रस्त्याने कोणती स्त्री आजपर्यंत तुझ्या वा दुसर्‍या कोणाच्या ही ज्यांना आपण 'प्राय्व्हेट पार्टस ' म्हणतो अश्या ठिकाणी मुद्दाम बळजबरी युक्त दुखरा स्पर्श करुन गेली? चिमटे काढुन गेली? आहे अस कोणत उदाहरण की एक पुरुष शांतपणे रस्त्याने चाललाय अन येता जाता त्याला स्त्रिया नको तिकडे चिमटे काढताहेत? अगदी नॉर्मल दिसणारे पुरुष अस करुन काही झालच नाही असे पुढ चालु लागतात. एका घराबाहेर पडलेल्या स्त्रीला हे 'रोजचच ' म्हणुन सहन कराव लागत यात फरक नाही का?

सुहास..'s picture

12 Jul 2012 - 11:35 am | सुहास..

.रस्त्याने कोणती स्त्री आजपर्यंत तुझ्या वा दुसर्‍या कोणाच्या ही ज्यांना आपण 'प्राय्व्हेट पार्टस ' म्हणतो अश्या ठिकाणी मुद्दाम बळजबरी युक्त दुखरा स्पर्श करुन गेली? चिमटे काढुन गेली? आहे अस कोणत उदाहरण की एक पुरुष शांतपणे रस्त्याने चाललाय अन येता जाता त्याला स्त्रिया नको तिकडे चिमटे काढताहेत? अगदी नॉर्मल दिसणारे पुरुष अस करुन काही झालच नाही असे पुढ चालु लागतात. एका घराबाहेर पडलेल्या स्त्रीला हे 'रोजचच ' म्हणुन सहन कराव लागत यात फरक नाही का? >>.

मान्य ,अगदी मान्य !! पण तु हे जे रोजचच चित्र म्हणते आहेस त्याची सध्यस्थितीतील टक्केवारी काढली तर चित्र बदलते आहे. हे तुला ही मान्य करावे लागेल. अर्थात परिस्थिती उलट व्हावी अशी अपेक्षा तुला नसावी ...एक मात्र मला म्हणावे लागेल , अर्थात खेदाने च, की हल्ली स्त्रियांना आपले प्रायव्हेट पार्ट कितपत प्रायव्हेट ठेवायचे आहेत, तु दिलेले प्रतिउत्तर आणि काल सातार्‍यात घडलेली घटना वाचली असशील च ..नसशील तर . " आपल्या प्रियकरा च्या सांगण्यावरून आपल्या तिसर्‍या मुलीला ( नुकत्याच जन्मलेल्या) अनाथालयात सोडुन दिल्याची " ...हे कस आणि का घडतय ? हे माझ्या मते ...अर्थात जरा साहस च म्हणावे लागेल

हल्ली जग जवळ येते आहे ...एक मिनीटात कोणाशी ही भावनिक/शारीरिक दुरावा निर्माण झाला तर तो ताबडतोब शमवता येतो ..ईतके पर्याय उपलब्ध आहेत ...एक पिढी अशी होती ज्यांच्या समोर ईतकी ओपन नेस आणि पर्याय उपलब्ध नव्हते , प्रेयसी-प्रियकर, नवरा-बायको यामध्ये केवळ शारिरिक ओढीपेक्षा ही नाते गोते, जबाबदार्‍या, आदर या गोष्टीला स्थान जास्त होते ..सध्या ते ढासळते आहे ...आय नीड दिस अ‍ॅन्ड विल गेट ईट अ‍ॅनीहावू ..याला हल्ली फ्रीडम ही म्हणतात..पण हेच त्या आधीच्या पिढी ला स्विकारणे कठीण जाते, अर्थात तो भाग वेगळा ...यातला दुसरा एक भाग असा होता की तू ज्या पध्दती कथा-नायकिणीची " घुसमट " दाखवित आहेस ...ती घुसमट संपवायला ( खेडं असल तरी ) खुप वेळ लागत नाही ...माझा अपेक्षा भंग झाला तो त्याच मुळे !! ( ईतका कमी वेळ लागतो की घुसमटी ची जाणीव देखील होत नाही )...अर्थात तु ते लिहिण्याचे साहस केलेस त्याबद्दल अभिनंदन आहेच :)

अररर
मीच माझ्यासाठी बनवलेल्या नवीन गाइडलाईन्स
* वेगवेगळ्या मेड इन मिडिया न्युज वाचून मत बनवु नये...
* लग्न आणि मोनोगमी वर अंधश्रद्धाळु विश्वास ठेऊ नये...
* जग खूपच वेगाने बदलते आहे, जुन्यापिढीत सगळेच चांगले होते आणि नवीन मधे सगळेच वाईट असे वाटायला लागले की आपले वय झाले आहे असे समजावे...
* खरे काय आणि खोटे काय हे आपल्याला फारच क्वचित माहित असतं...आणि शेवटी काय पकडला जातो तोच चोर बाकी सगळेच पोलिस...

सुहास..'s picture

12 Jul 2012 - 1:06 pm | सुहास..

वेगवेगळ्या मेड इन मिडिया न्युज वाचून मत बनवु नये. >>

वरील बातमी मेड ईन मिडीया ???

* लग्न आणि मोनोगमी वर अंधश्रद्धाळु विश्वास ठेऊ नये... >>

ते उदाहरणादाखल आहे , आंतरजालाच्या छटाकभर चौकटीचा प्रॅक्टीकल लाईफशी घोळ नको ..

* जग खूपच वेगाने बदलते आहे, जुन्यापिढीत सगळेच चांगले होते आणि नवीन मधे सगळेच वाईट असे वाटायला लागले की आपले वय झाले आहे असे समजावे... >>
पुन्हा नाही ..वेगाने बदलते आहे हे सांगतोय ...काय चांगले आणि काय वाईट हे ठरवणारा मी कोण टिक्कोजीराव !! आणि कोठल्या ही पिढी शी त्याचा काय संबध ?

* खरे काय आणि खोटे काय हे आपल्याला फारच क्वचित माहित असतं...आणि शेवटी काय पकडला जातो तोच चोर बाकी सगळेच पोलिस... >>>

वर उत्तर दिले आहे.

बाकी मालक, अजुन " नाईट लाईफ " चे किस्से लिहिले नाहीत, अर्थात, आंजावर लिहीताना , किमान मी तरी स्वतः ला लिमीट दिली आहे, शिवाय ..एका चौकटीतुन जगणारे, विकीपिडीत आणि गोड-गोड गुलाबी आयुष्य काढुन ओकार्‍या काढणार्‍यांच्या समोर माझ संवेदनशील कितपत पोचेल, त्यापेक्षा टिंगल टवाळी च बरी !!

सुहास : - )
जरा तुमचे तिन्ही प्रतिसाद वाचा आणि काही contradiction जाणवतयं का बघा...नाय जाणवलं तर _/\_

स्पा's picture

10 Jul 2012 - 11:56 am | स्पा

अपर्णा तै

कथा नाही आवडली

टिपिकल गुळगुळीत झालेला विषय..:(
"गृहशोभिका" छाप वाटली ...

स्पंदना's picture

10 Jul 2012 - 7:01 pm | स्पंदना

स्पाउ?
कोणता विषय गुळगुळीत झाला रे? घटस्फोटानंतरही बायकोला "आपली" समजण्याचा? असे कितीसे घटस्फोट होताहेत? जरी प्रमाण वाढल तरी?
अन आता मी पडले स्त्री, म्हणजे जे मुळच फिलींग असत; काय म्हणतात ते कोअर, ते स्त्री ! अन नको असलेले स्पर्शच काय पण नजराही किती ओंगळ वाटतात हे मी तुला कोणत्याही भाषेत उलगडुन नाही सांगु शकत. ते फक्त 'जाणिवच ' सांगु शकेल तुला. पण मुंबईच्या लोकलन अशी कितीशी जाणिव जिवंत ठेवली असेल देव जाणे.
तरीही वेळात वेळ काढुन जे काही वाटतय ते सांगितल्या बद्दल धन्स. थोडावेळ माझाच माझ्यावरचा विश्वास उडला लेका. पण जरा दम धर.

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 7:40 pm | मराठमोळा

विषय खरं तर गुळगुळीत झालाय याला माझंही समर्थन आहेच.
पण इथे विषयांतर न करता नवा धागा सुरु करत आहे.. कारण इथे अपेक्षेप्रमाणे झालं तसं कथेचं विषयांतर होऊ नये म्हणून.
तिकडे चर्चा करु

वॉव!
दगड गुळगुळीत झाला म्हणुन कमी लागतो का फेकुन मारल्यावर?
याला म्हणतात परदु:ख शितळ. तीच वेळ स्वतःवर आली की हेच म्हणणारी माणस कळवळुन उठतात. नव्या दु:खाच्या नव्या आरोळ्या!
बाकि मला तुमच्या पहिल्या प्रतिसादा पासुन इथे चर्चा नको काही समजल नाही. या विषयाच पोटेंशिअल मला माहित नसेल अस वाटत का ममो तुम्हाला? अन ज्या विषयावर मी लिहिते आहे, त्याचे प्रतिसाद तिकडे का? इथे का नाहीत? इथे का चर्चा नको? संपादकांना नको असेल तर ते तस सुचवतील पण तुम्ही का या लेखाची दिशा ठरवता आहात? अन एव्हढा गुळगुळीत झालेला विषय घेउन मग तुम्ही कसा काय काथ्याकुट सुरु केला?
हा आटापिटा खरच काही समजल नाही.

या विषयाच पोटेंशिअल मला माहित नसेल अस वाटत का ममो तुम्हाला? अन ज्या विषयावर मी लिहिते आहे, त्याचे प्रतिसाद तिकडे का? इथे का नाहीत? इथे का चर्चा नको? संपादकांना नको असेल तर ते तस सुचवतील पण तुम्ही का या लेखाची दिशा ठरवता आहात? अन एव्हढा गुळगुळीत झालेला विषय घेउन मग तुम्ही कसा काय काथ्याकुट सुरु केला?

ही कथा 'कथा' (साहित्याचा प्रकार) या सदरात असल्याने सर्वांनी केवळ वाचनाचा आनंद घ्यावा असे मलातरी वाटते. मी काथ्याकुट यासाठीच सुरु केला. अन्यथा गुळगुळीत विषय फक्त 'पेज थ्री' सारखे चघळलेच जातात, चोथा झाला की थुंकले जातात. खरे पिडीत लोकं इथे हे सर्व वाचायला देखील येत नसावेत. लेखात कुठेही 'इथे ज्वलंत चर्चा अपेक्षित आहे' असे म्हंटले नसल्याने किंवा तसा अनुरोध नसल्याने माझा गैरसमज झाला असावा. तुम्हाला हवं असेल तर मी माझा धागा संपादकांनी विनंती करुन मागे घ्याय्ला तयार आहे.

>>याला म्हणतात परदु:ख शितळ. तीच वेळ स्वतःवर आली की हेच म्हणणारी माणस कळवळुन उठतात. नव्या दु:खाच्या नव्या आरोळ्या!

अशी वेळ जेव्हा कूणावर येते तेव्हा ती व्यक्ती/कोर्ट्/परिस्थिती लेख वाचून किंवा चर्चा वाचून निर्णय घेत नसावेत. एखाद्या व्यक्तीवर अशी वेळ आली असेल आणि त्याने/तिने लेख लिहिला किंवा चर्चा घडवली तर ती जास्त उपयुक्त ठरेल कदाचित.

असो..
माझा इथेच पुर्णविराम.
धन्यवाद.

इनिगोय's picture

10 Jul 2012 - 10:00 pm | इनिगोय

एक लाख वेळा सहमत. तू उल्लेखलेल्या नकोशा गोष्टी कोणाहीकडून येतात, तेव्हा कर्णासारखं बाईलाही कवच द्यायला हवं होतं विधात्यानं असं वाटत राहतं.

मात्र निमूटपणे समोरच्याला वाटेल तसं वागू देणारी स्त्री किंवा कोणीही व्यक्तीसुद्धा तितकीच जबाबदार धरायला हवी.
१३ वर्षांचं मौन सोडून चुकीला चूक म्हणायला शिकल्यामुळे आता कुठे 'हा संसार माझा पण आहे' ही भावना अनुभवत असलेली एक मुलगी मी रोज बघतेय. इथे या घुसमटीला १३ वर्षं तिला त्रास देणार्‍या तिच्या कुटुंबीयांइतकीच तीसुद्धा जबाबदार आहे, हे तिला तर्‍हेतर्‍हेने पटवून द्यावं लागलं. पहिल्यांदा तिने हे धाडस केलं, तेव्हाचा अनुभव सांगताना तिचा आनंद चेहर्‍यावरून ओसंडत होता! समोरचे तिच्या भावनिक, मानसिक दुबळेपणाचाच फायदा घेतायत हे तेव्हा समजलं तिला.

आणि ही मुलगी सीए आहे, तिच्या हाताखाली गेली ३-४ वर्षं टीम काम करते!!

या कथेतल्या तिलासुद्धा दुबळेपणा टाकून स्वतःची मानसिक ताकद पुर्ण वापरावी लागेल सुखांत व्हायला हवा तर. खाली एका प्रतिक्रियेत नायिकेच्या नवर्‍याचा संताप येतो असं लिहिलंय.. तो एकटाच जबाबदार नाही ना तिच्या त्रासाला?

अपर्णा तै.. खरतर कथेबद्दल नाही तर त्या विषयाबद्दल माझ हे मत होत .. तेही तुझं आधीचं एक अप्रतिम ललित वाचल्यामुळे झालेलं...
ते वाचून एकदम हा नेहमीचाच विषय तू हाताळल्याने तशी प्रतिक्रिया आली .बाकी कै नै

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Jul 2012 - 12:22 am | विश्वनाथ मेहेंदळे

स्पावड्या, कथेचे राहू दे. हल्ली तुझे प्रतिसाद मात्र एकाच छापाचे असतात हां, टिपिकल आणि गुळगुळीत झालेले.

बाकी तू कधीही गृहशोभिका वाचलेला दिसत नाहीस. असे लेखन नसते त्यात. ते "माहेर" मध्ये असते.

बॅटमॅन's picture

11 Jul 2012 - 12:25 am | बॅटमॅन

बाकी तू कधीही गृहशोभिका वाचलेला दिसत नाहीस. असे लेखन नसते त्यात. ते "माहेर" मध्ये असते.

तेच म्हणत होतो गृहशोभिकामध्ये असे कधी लिहितात ;)

पैसा's picture

11 Jul 2012 - 5:18 pm | पैसा

तुम्ही दोघेही माहेर आणि गृहशोभिका दोन्ही इतके लक्ष देऊन वाचता?

वर्तमान नै पैसातै भूतकाळ आहे तो :D :P

सुहास..'s picture

11 Jul 2012 - 5:45 pm | सुहास..

ज्यो !

एके काळी धम्या ने लिहील होतं ( )

Unfortunately, when I was working on that thing, seen hell of cases & damned huge number of people who in the morning use to argue & try to paint us as social criminals , same rascals coming to us in the evening to rescue their drunk kids, or more serous, their half nude daughters/relatives arrested by the cops right there at that place.
I need no introduction to the thinking process of these so-called social statused diplomatic selfish bullshitters!

I have been left with only one feeling towards such people- Sheer Disgust! nothing else.

टिआरपीकरिता विचारजंती मोहोळ उठवु नकोस ...हा विषय, चौकटीत जगणार्‍या वाचकांना " टॅन्जट " जाईल ..

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 6:01 pm | नाना चेंगट

Unfortunately, when I was working on that thing, seen hell of cases & damned huge number of people who in the morning use to argue & try to paint us as social criminals , same rascals coming to us in the evening to rescue their drunk kids, or more serous, their half nude daughters/relatives arrested by the cops right there at that place.
I need no introduction to the thinking process of these so-called social statused diplomatic selfish bullshitters!

I have been left with only one feeling towards such people- Sheer Disgust! nothing else.

मराठी भाषेत देवनागरी लिपीत कोण अर्थ सांगेल?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Jul 2012 - 8:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्याचे माहित नाही. मी हातात येईल ते वाचतो. शाळेत असतानाच मी शतायुषी ते हैदोस इतका मोठ्ठा bracket कव्हर केला होता ;-)

स्पावड्या, कथेचे राहू दे. हल्ली तुझे प्रतिसाद मात्र एकाच छापाचे असतात हां, टिपिकल आणि गुळगुळीत झालेले.

त्याच काये न विमे काका ..
तुमच्या इतकं शब्द पांडित्य आणि शब्द छल करण्याच सामर्थ्य मज पामराच्या अंगी नाही..
म्हणून आम्ही आपले गुळगुळीत प्रतिसाद देत असतो..
आता तुम्ही मनावर घेतलंत तर आम्हाला शहाणे करून सोडालच :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Jul 2012 - 8:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुमच्या इतकं शब्द पांडित्य आणि शब्द छल करण्याच सामर्थ्य मज पामराच्या अंगी नाही..

शब्दछल चा अर्थ कुणाला तरी एकदा विचारून बघा. किमान शब्दकोशात बघायची तसदी घ्या.

आता तुम्ही मनावर घेतलंत तर आम्हाला शहाणे करून सोडालच

त्यापेक्षा "कालचा गोंधळ बरा होता" असे आत्ताच म्हणतो ;-)

प्यारे१'s picture

10 Jul 2012 - 12:05 pm | प्यारे१

अरे 'कॅटेगरी' कथा आहे ना!
कथा म्हणून वाचा नि नंतर शिक्के मारा की पोट्टे हो...!

आपातै, तू ल्हिव... चटाचटा.
चांगलं ल्हिवलंय!

नगरीनिरंजन's picture

10 Jul 2012 - 12:09 pm | नगरीनिरंजन

पूर्ण झाल्यावर सविस्तर अभिप्राय देईन.

सस्नेह's picture

10 Jul 2012 - 1:50 pm | सस्नेह

सुरेख मांडणी अन वेधक कथानक.
सर्व भाग वाचल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2012 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर

कथा म्हणून चांगली आहे. तशी , कथा अजून संपलेली नाही किंवा नीट सुरूही झालेली नाही. पण जो 'पहिला भाग' म्हणून प्रकाशित केला आहे त्यात कथेचा समतोल आणि घटस्फोटीत स्त्री मनाची उद्विगनता खालील वाक्या-वाक्यातून एक अपेक्षित परिणाम साधते:

हल्ली तिला रडू सुद्धा यायचे बंद झाले होते.

एकूण समाजाची सारी बंधन , उपचार तिच्यावर लादून तो निर्धास्त होता. तो घरात आलेला समाजाला चालत होत. त्यान जबरदस्ती केली असती तरी समाज तिलाच हसला असता. कुणीतरी साखळदंडान पाय जखडावेत तस झालं तिला.

'कुणाची तरी कोण' म्हणून ओळखीशिवाय , एक व्यक्ती म्हणून बाहेर जात होती.
समोरचा एकाकी अन अभद्र रस्ता तिला दिसत होता.

आज मात्र तो पुरुषी अहंकार एका नरात बदलला होता!

तिने मात्र फक्त त्याचाच शिक्का शरीरावर घेऊन जगायचं होत.

जीव मुठीत घेउन पळणार्‍या उंदराशी खेळाव तसा उंदीर मांजराचा खेळ तो खेळत होता.

ह्या शेवटच्या वाक्यात मात्र कथानायिकेची पराभूत मनःस्थिती प्रकर्षाने जाणवल्याने थोडासा विरसच झाला. ही मनःस्थिती बदलण्याची तिव्र गरज आहे असे वाटते. जागोजागी दिसून येणारी 'असहाय्यता' नैसर्गिकही आहे. पण 'पराभूतता' कथानायिकेला मनाने दुबळे बनविते आहे. तिच्या संघर्षाचे कौतुक होण्याऐवजी ती सहानुभूतीची याचक बनत जाईल, तसे होऊ नये.

लिहायचा वेग अन अश्या बारिक सारिक शुद्धलेखनाच्या चुका यांचा मेळ बसे पर्यंत त्यातल काही तरी एक निसटत. म्हणजे अगदी शब्द शब्द निरखत राहिले तर कथा निसटुन जाते.

श्री. चित्रगुप्त ह्यांच्या प्रतिसादाला दिलेल्या प्रतिक्रियेशी सहमत नाही. 'लिहिण्याच्या' वेगात/प्रवाहात शुद्धलेखनाकडे लक्ष दिलं जात नाही मान्य आहे पण संपूर्ण लिहून झाल्यावर 'प्रकाशित' करण्याआधी 'पूर्वदृश्या'चा पर्याय आहे. त्या प्रक्रियेत आपले लेखन शांतपणे वाचून (घाईघाईत 'प्रकाशित' करण्याचा मोह टाळून) चुका शोधून, सुधारून नंतर 'प्रकाशित' करण्यात परिपक्वता आहे. तसा प्रयत्न करावा. एखादा पदार्थ किंवा जेवण अतिशय चविष्ट बनवायचं पण खरकट्या ताटात वाढायचं हे जितकं चुकीचं आहे तितकंच एक सुंदर लेख अशुद्ध लेखनाने बरबटलेला असणं चुकीचं आहे.

आपण शुद्धलेखनाचे मनावर घेणार असल्याचे नमूद केले आहेच, धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

10 Jul 2012 - 4:42 pm | मुक्त विहारि

कथेला रंगत येत आहे.

रेवती's picture

10 Jul 2012 - 6:43 pm | रेवती

वाचतीये.

पण पुरेसा डार्कनेस अजुनही कथेत उतरला तर 'काहीसे वेगळे' लिखाण वाचयची हौस भागेल असं वाटतयं. लेखनास शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2012 - 6:59 pm | प्रभाकर पेठकर

एक महत्त्वाचा मुद्दा लिहायचा राहून गेला.

घटस्फोट झाला असेल तर तो पुरुष कथानायिकेला परकाच आहे. तो तिला छळत असेल तर ती त्याच्या विरुद्ध पोलीसात तक्रार करु शकते. त्याच्या विरुद्ध, दुसर्‍याच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा, विनयभंगाचा, शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

कथानायिकेच्या हाती इतकी जबरदस्त प्रतिकार शक्ती असताना त्याचा तिने वापर केला नाही तर कथानक एकदम पोकळ आणि एकतर्फी होऊन जाईल.

स्पंदना's picture

10 Jul 2012 - 7:22 pm | स्पंदना

मुवी , प्यारे१, स्नेहांकिता, ननि आभार.
प्रभाकर काका धन्यवाद पण आता तुमची छाप आली ना विचारावर? :( :-( :sad:
रेवती अनेक धन्यवाद अगदी स्पेस्श्शल.
आत्मशुन्य कसे आहात?

सूड's picture

10 Jul 2012 - 8:41 pm | सूड

कथा छान, पुभाप्र !! या कथेत मात्र, नायिकेच्या नवर्‍याशी सूत जुळवून त्याच्याशी दुसरा संसार थाटायला तयार होणारी स्त्रीसुद्धा मला तितकीच दोषी वाटते.

मेघना पेठेंचं 'नातिचरामि' वाचलंय का ? नसेल तर वाचा एकदा. लग्नसंस्थेवर छान ताशेरे ओढलेत.
फक्त संस्कार म्हणून महागडे सोहळे करुन नंतर जर धुसफूसच होणार असेल तर लग्न करावंच का असा प्रश्न हल्लीचे घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंध (हे म्हटल्यावर पुरुषांवरच बोट ठेवलं जातं, स्त्रियासुद्धा मागे नाहीत या बाबतीत) बघून वाटतो.

जेनी...'s picture

10 Jul 2012 - 8:48 pm | जेनी...

वाहाती ओघवती कथा , पूढचं लवकर लिहि. अप्र्णा .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Jul 2012 - 2:03 am | निनाद मुक्काम प...

हे काय पूजा एकोळीत प्रतिसाद संपविला ?

माझी तुझ्याकडून दीर्घ प्रतिसाद तोही तुझ्या धाटणीचा अपेक्षित होता.

मराठे's picture

10 Jul 2012 - 9:41 pm | मराठे

खूप प्रभावी लेखन! कथा वाचताना नायिकेच्या नवर्‍याचा खूप खूप संताप येतो, हेच कथा यशस्वी होण्याचं लक्षण आहे.

मन१'s picture

10 Jul 2012 - 9:59 pm | मन१

कथा जमते आहे.
पुढील भाग्गाच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

10 Jul 2012 - 11:29 pm | पैसा

सुरुवातीकडे पाहता एक दमदार कथा वाचायला मिळेल असं वाटतं आहे. अपर्णाकडून अशाच कथांची अपेक्षा आहे. कसलाही परिणाम करून न घेता, जशी सुचली आहे तशी कथा लिहीत जा. त्या कथेच्या अनुषंगाने काय चर्चा होईल तीही विधायक होईल आणि कथा आणि प्रतिक्रिया मिळून एक उत्तम धागा तयार होईल याची खात्री आहे.

स्पा, जगातल्या सगळ्या कथा ३/४ प्रकारच्या कथासूत्रांमधे बसवता येतील. तेव्हा विषय वापरून झाला आहे असा विचार करण्यापेक्षा कसा मांडला आहे, फुलवला आहे याकडे लक्ष दे.

बॅटमॅन's picture

11 Jul 2012 - 12:03 am | बॅटमॅन

जगातल्या सगळ्या कथा ३/४ प्रकारच्या कथासूत्रांमधे बसवता येतील.

एग्जॅक्टलि!!!!!!

स्पा's picture

11 Jul 2012 - 10:04 am | स्पा

बापरे सगळ्या पाशवी शक्ती माझ्या मागेच पडल्यात ...
बर्र माझे शब्द मी मागे घेतो बाबा ...
पण बरीच बुचं मारून झाल्याने , आता ती प्रतिक्रिया पण उडवता येत नाहीये ;)

कवितानागेश's picture

11 Jul 2012 - 12:40 pm | कवितानागेश

कथा म्हणून नक्कीच छान लिहिली आहे.
पण मला अशा कथा वाचवत नाहीत.
मूळातच कुठलाही अन्याय सहन करताना कुणाला पहिले की मला भयानक राग येतो.
शिवाय जगभरच स्त्रिया स्वतःला नक्की कधीपासून आणि कशामुळे 'अबला' समजायला लागल्या, हे तर मला कधीच कळू शकत नाही.

मूळात सगळेच जीव, एक जीव म्हणून सारखे. जे काही फरक असतात ते वरवरचे.
मग कुठल्याही फालतू कन्सेप्ट्स धरुन ठेउन कुणीही स्वतःला / दुसर्‍याला कमकुवत वगरै समजतात, आणि अन्याय करतात, सहन करतात, तेन्व्हा त्या सगळ्याच जीवांचा वैताग येतो.

शिवाय जगभरच स्त्रिया स्वतःला नक्की कधीपासून आणि कशामुळे 'अबला' समजायला लागल्या, हे तर मला कधीच कळू शकत नाही. - + १००, मलादेखील नाही. किमान माझ्या जवळच्या स्त्रिया तरी स्वताला नक्कीच अबला समजत नव्हत्या, हे नक्की.

नेहमी प्रमाणे ओघवते लिखान ..

पुढील भाग वाचल्यावर कथेची दिशा कळेलच.

सामाजिकते पेक्षा ही माणसांच्या मनाचे कंगोरे दाखवणारी कथा असल्यावर वाचण्यास आवडेल.

निदान पुन्हा ती स्त्री तिच्या आधीच्या नवर्‍याला (तिला अधिकार असताना ही) लांब रहा असे खडसावू शकत नाहिये त्यावरुन मनामनाची स्थीत्यंतरे दाखवण्याचा प्रयत्न आहे असे वाटले...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Jul 2012 - 2:20 am | निनाद मुक्काम प...

सविस्तर प्रतिसाद कथेनंतर
लिखाणात दळवी आणि काही अंशी तेंडुलकरांची झलक जाणवली. मात्र ही लेखन शैली साध्या सरळ भाषेत प्रसंग डोळ्यासमोर उभा करते. पुरूष प्रधान संस्कृतीत आजकालच्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात असे प्रकार गावात आणि शहरांमध्ये अजूनही घडतात.

आता भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले म्हणजे कुटुंबं व्यवस्था ढासळली असा सोयिस्कर अर्थ काढला जातो. पण खरे कारण स्त्री आता काही अबलेची सबला झाली आहे. आणि ओढून ताणून उगाच मदर इंडिया चा आव आणत जीव जाळत संसार करणारी स्त्री आता इतिहासजमा होत आहे. निदान शहरात तरी.

कथा कोणत्या अंगाने जावी व त्यावर कोणत्या अंगाने चर्चा घडावी हे सांगण्याचा मला वाचक म्हणून अधिकार नाही. माझे कार्य कलाकृतीचा आस्वाद घेणे व जमल्यास आपल्या परीने त्यावर मत प्रदर्शन करणे.
तेव्हा इथेच थांबतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Jul 2012 - 2:20 am | निनाद मुक्काम प...

सविस्तर प्रतिसाद कथेनंतर
लिखाणात दळवी आणि काही अंशी तेंडुलकरांची झलक जाणवली. मात्र ही लेखन शैली साध्या सरळ भाषेत प्रसंग डोळ्यासमोर उभा करते. पुरूष प्रधान संस्कृतीत आजकालच्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात असे प्रकार गावात आणि शहरांमध्ये अजूनही घडतात.

आता भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले म्हणजे कुटुंबं व्यवस्था ढासळली असा सोयिस्कर अर्थ काढला जातो. पण खरे कारण स्त्री आता काही अबलेची सबला झाली आहे. आणि ओढून ताणून उगाच मदर इंडिया चा आव आणत जीव जाळत संसार करणारी स्त्री आता इतिहासजमा होत आहे. निदान शहरात तरी.

कथा कोणत्या अंगाने जावी व त्यावर कोणत्या अंगाने चर्चा घडावी हे सांगण्याचा मला वाचक म्हणून अधिकार नाही. माझे कार्य कलाकृतीचा आस्वाद घेणे व जमल्यास आपल्या परीने त्यावर मत प्रदर्शन करणे.
तेव्हा इथेच थांबतो.

रमेश भिडे's picture

16 Dec 2014 - 4:53 pm | रमेश भिडे

छान सुरुवात.

मराठी_माणूस's picture

16 Dec 2014 - 5:30 pm | मराठी_माणूस

"बाजार" चित्रपटातील नसिरुद्दिन चा एक डायलॉग आठवला. शब्द थोडे वेगळे असतील , मतीतार्थ मात्र तोच आहे
"इस धरती पर सबसे दरींदा जानवर मर्द है"