डिजिटल कॅमेरा हा फोटोग्राफर साठी क्रांतिकारी शोध आहे. कितीही फोटो वाया गेले तरी सामग्रीची नासधूस होत नाही ही ती क्रांति.त्याच बरोबर फोटो एडिटिंग सुलभ पणे करता येते. बर्याच कॅमेरा ब्रॅड चा दोष ( ते त्याला त्यांचे वैशिष्ट्य म्हणतात) असा की त्यात मूळ फोटोत ब्लू रंगाची कास्ट येते. फोटोशॉप सारखे सॉफ्टवेअर वापरून ती कास्ट बाजूला करता येते. यलो व तांबडा रंग थोडा वाढवून फोटोत एक प्रकारचा " गोडवा" आणता येतो.तसेच फोटोत प्रकाश कमी असेल तर तो ही आणता येतो. पण जास्त प्रकाश आला तर कोणताही डिजिटल ग्राफिक एडिटर आपल्याला मदत करू शकत नाही. तसेच फोटो फोकस मधे येणे हे "बाळंतपण" नीटपणे झाल्याचे लक्षण असते. त्यात अनशार्प मास्क नावाचे टूल वापरून थोडी दुरूस्ती करता येते. पण थोडीच. या उलट शार्प फोकस आलेला भाग ब्लर टूलचे वेगवेगळे पर्याय आणून भुरकट करता येतो.
आपल्याला आपले फोटो सुलभपणे कापता येतात व कोंपोझिशन सुधारता येते. डॉज टूल वापरून मूळ फोटोत नसलेले कट लाईटस निर्माण करता येतात.
कॅमेर्यात किती मेगॅपिक्सल कोंबले आहेत या पेक्षाही त्याचा सेन्सर किती मोठा आहे याला बारकाव्यांचा बाबतीत महत्व असते. लार्ज ( काही किलो वजन असलेले) फॉर्मॅट कॅमेरा या बाबतीत उच्च दर्जाचे बारकावे टिपू शकतात. पूर्वी काळ्या कापडात डोके खुपसून फोटो काढणार्या ग्राफरचा तो कॅमेरा हे लार्ज फॉरमॅट चे मस्त उदाहरण आहे. ( नॅशनल जिओ च्या मासिकातील फोटोग्राफी अशा 'लार्ज' सेन्सरवर केलेली असते.)
फुलांचा राजा म्हणजे गुलाब .त्याचे काही फोटो मी काढलेले आहेत ते खाली देत आहे.
वरचा फोटो - स्थळ- शालीमार बाग श्रीनगर
वरचा फोटो - स्थळ- शालीमार बाग श्रीनगर
वरचा फोटो - स्थळ- शालीमार बाग श्रीनगर
वरचा फोटो- स्थळ महापालिका पुष्पप्रदर्शन- प्राधिकरण निगडी
वरचा फोटो- स्थळ महापालिका पुष्पप्रदर्शन- प्राधिकरण निगडी
वरचा फोटो- स्थळ महापालिका पुष्पप्रदर्शन- संभाजी उद्यान पुणे
वरचा फोटो- स्थळ निशात बाग श्रीनगर काश्मीर
प्रतिक्रिया
27 May 2012 - 10:08 am | प्रचेतस
फोटो छान.
पहिला व दुसरा फोटो फसलेला आहे. दोन्हीमधली फुले शार्प यायला हवी होती तसे ना होता ती थोडीशी ब्लर झालेली दिसत आहेत. चौथा आणि सातवा फोटो फ्रेमच्या बाहेर गेले आहेत.
कुठलेही एडिटींगचे तंत्र न वापरता निव्वळ कॅमेर्याद्वारेच ते अधिक सुस्पष्ट काढता आले असते.
27 May 2012 - 1:23 pm | चौकटराजा
पहिल्या फोटोत ब्लर टूल वगैरे काही वापरलेले नाही.
दुसर्या वा सातव्या बाबतीत सहमत ! या कोणत्याही फोटोत एडीटींग वापरलेले नाही. त्यातील
चुका मूळ चुकाच आहेत व मूळ जमा बाजू मूळच आहेत.
27 May 2012 - 1:48 pm | प्रचेतस
ब्लर टूल न वापरताही फोटो ब्लर आला आहे म्हणजेच कुठंतरी फसलेला आहे. मॅक्रो मोड मध्ये काढताना शार्पनेस अॅडजस्ट झालेला नाही.
27 May 2012 - 1:52 pm | चौकटराजा
मॅक्रो चा पुरता वापर झालेला नाही. हे खरे.
27 May 2012 - 10:07 am | नरेंद्र गोळे
आपले फोटो सुरेख आहेत. मन प्रफुल्लित करतात.
चित्रपेशीय तपशीलाबाबत मी वल्ली यांचेशी सहमत आहे.
अशाच भावी चित्रमेजवान्यांसाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा!
27 May 2012 - 10:12 am | मदनबाण
छान... :)
हे गुलाब पाहुन मला माझा ए रोझ फॉर ए रोझ हा धागा आठवला.
27 May 2012 - 1:21 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त फोटू-- (फुले अवडणारा)--
अत्रुप्त आत्मा
27 May 2012 - 1:23 pm | प्रचेतस
फुले आवडणारा का (फक्त)गुलाब आवडणारा?
27 May 2012 - 1:27 pm | अत्रुप्त आत्मा
28 May 2012 - 11:28 am | सौरभ उप्स
प्रयत्न छान केलाय... फोटो चांगले आलेत फक्त angle आणि object ची background हे अजून devolop केल तर अजून छान होईल.
28 May 2012 - 11:42 am | निवेदिता-ताई
खूप सुंदर ..
28 May 2012 - 11:59 am | मृत्युन्जय
आमचे हे फटु कसे आले आहेत सांगा बरे जरा:
28 May 2012 - 5:39 pm | चौकटराजा
वा वा ! त्यातील फुलांची निवडही मस्त आहे. व फोकसिंग ही वाखाणण्याजोगे. कदाचित मी २०१२ मधे असे फोटो काढू शकेन .पण २००७ मधे माझी " मॅक्रो " मोड ची तयारी कमीच होती.