मिपा सदस्य हो , खरे तर उच्च दर्जाचा कॅमेरा ( अति उच्च नव्हे) आता सर्वसामान्यांच्या हातात येणे अवघड नाही. मॅक्क्रो मोड व मॅन्युअल मोड आता बर्याच कॅमेर्यात मिळतात हे त्याचे कारण आहे. सकाळी आठ ते सायंकाळी ५ या वेळेतच एकेकाळी फोटो काढता येत असत. यातून प्रगती होत होत आता ६४०० चे आय एस ओ सेटींग असलेले कॅमेरे आल्यामुळे काहीशा नॉईज ( टिपके टिपके ) असलेले का होईना फोटो अंधारात काढता येतात. काही दिवसानी हा नॉईज पूर्णपणे घालविणारे सॉफ्टवेअर पण येऊ शकेल.
पण आता एखाद्या माणसाने तांत्रिक रित्या फोटो उत्तम काढले तरी त्याचे आकर्षण संपत जाईल .कारण सर्वच जणांना असे फोटो काढता येतील. आगामी काळात फोटो तील विषयांच्या कल्पकतेला महत्व राहील यात मात्र शंका नाही. तेच फोटोग्राफरचे वेगळेपण ठरणार आहे.
आपण गेर्ले तीन भागास प्रतिसाद दिल्याबद्दल प्रतिसादकांचे मनः पूर्वक आभार .
उरलेले मानकरी फोटो खालील प्रमाणे-
मुन्नार केरळ राज्य
मुन्नार
अल्लेप्पी ब्लू लॅगून
मुन्नार ते पेरीयार घाट्- वेलदोडयाचे रोपटे
प्रतिक्रिया
8 Jun 2012 - 12:54 pm | जयवी
क्या बात है..... !!
तुमच्या फोटोग्राफीला एक कडक सॅल्यूट !!
8 Jun 2012 - 1:06 pm | निश
चौकटराजा साहेब, एकदम सही मस्त आले आहेत फोटो.
8 Jun 2012 - 3:13 pm | गोंधळी
मस्त फोटो.
७ नं चा फुलाचा रंग छान आहे.
8 Jun 2012 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार
सलाम तुमच्या फोटोग्राफीला.
हा शेवटचा भाग फारच हूरहूर लावून जात आहे.
8 Jun 2012 - 4:03 pm | jaypal
>>>>आगामी काळात फोटो तील विषयांच्या कल्पकतेला महत्व राहील यात मात्र शंका नाही. तेच फोटोग्राफरचे वेगळेपण ठरणार आहे.
१००० वेळा सहमत.
केमेरा महत्वाचा नसुन त्या मागिल डोळा (नजर) महत्वाचा असतो
फोटो क्र.२ व ३ आवडले
8 Jun 2012 - 5:07 pm | आबा
असेच म्हणतो
9 Jun 2012 - 3:12 pm | अमृत
डोळे निवलेत. या सर्व फोटोंचे श्रेय तुमच्या सौंदर्य दृष्टीला.
अमृत