* शाकुंतल ते कट्यार *

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
22 Apr 2012 - 1:48 pm

मध्यंतरी मला ठाण्यातल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जाण्याचा योग आला. :)
पं. चंद्रकांत लिमये निर्मीत शाकुंतल ते कट्यार या नाटकाचा प्रयोग होता. :)
मला परवानगी मिळ्याल्याने त्या नाटकाची प्रकाशचित्रे टिपता आली.:)
फक्त मिपाकरांसाठी इथे देत आहे. :)
आनंद घ्या... :)

कॅमेरा :--- निकॉन डी ५१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

कलासंगीतसंस्कृतीनाट्यछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

22 Apr 2012 - 3:39 pm | चौकटराजा

यातील एक व्यक्ती माझी मित्र असून दुसरी व्यक्र्ती माझ्या पत्नीची मैत्रिण आहे.दुसर्‍याच एका व्यक्तीचे गाणे मी त्या व्यक्तीसमोर फक्त तीन फुटावर बसून ऐकले आहे.( आजही आठवते कुमारांची नंद रागातली "राजन अब तो आजा रे " ही बंदिश गायलेली ) तिसर्‍याच एका व्याक्तीची तानक्रिया अफाट म्हणजे अफलातून च आहे. मी त्या तानेचा फॅन आहे.
या कार्यक्रमाची सुरूवात " पंचतुंड नररूंड माल धर " या नांदीने झाली का?
सर्व फोटू मस्त !
आभार !

चौकटराजा's picture

25 Apr 2012 - 7:24 pm | चौकटराजा

जांभळ्या रंगाचा अंगरखा घातलेले व बहुदा चारूदत्ताच्या भूमिकेत असलेले डॉ. रविन्द्र घांघुर्डे हे मित्र आहेत. ते भारत देशात संगीत अलंकार परिक्षेत पहिले आलेले असून सूरसिंगार संसद पारितोषिक विजेते ही आहेत. त्याना मंगेशकरांकडून मा दीनानाथ पुरस्कार मिळालेला असून डॉ> वसंत राव देशपांडे यांची गायकी हा विषय घेऊन त्यानी संगीतात डॉ़क्टरेट केलेली आहे. एका चित्रात निळसर नौवार साडी नेसलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना या संगीतालंकार असून त्यांची संगीतातील डोक्टरेट पुरी होत आली आहे. त्या माझ्या पत्नीची मैत्रीण आहेत. निवेदक म्हणून माईक वर वाचन करणारे बहुदा भालचंद्र पेंढारकरांचे चिरंजीव आहेत. अश्विनशेठच्या भूमिकेत काळा कोट घातलेले पंडित चंद्रकांत लिमये आहेत. एका खाजगी मैफलीत त्यांचे गाणे जवळून ऐकण्याचा योग आला होता. प्रल्हाद अडफडकर हे एक उत्तम नाटयगीत गायक व नट असून ते भगव्या वेषात दिसत आहेत. अचाट तानक्रिया ही त्यांची खासीयत असून त्यांचे नाटकांचे अनेक कार्यक्रम कृष्णधवल च्या जमान्यात टी व्ही वर झाले आहेत. मी त्या तानक्रियेचा चाहता आहे. बकुळ पंडित या अभिनेत्री वंदना पंडीत यांच्या भगिनी असून उगवला चंद्र पुनवेचा या गीताने त्या अजूनही लोकप्रिय आहेत.

रमताराम's picture

22 Apr 2012 - 6:08 pm | रमताराम

पण नुसत्या फटूऐवजी बरोबर थोडे तपशीलही दिलेस तर बहार येईल. थोडा एकुण कार्यक्रमाच गोषवारा, मांडणी याबद्दल ऐकण्यासही उत्सुक आहे.

मदनबाण's picture

22 Apr 2012 - 9:12 pm | मदनबाण

@चौकटए राजा.
" पंचतुंड नररूंड माल धर " या नांदीने झाली का?
हो...
@रमताराम
पण नुसत्या फटूऐवजी बरोबर थोडे तपशीलही दिलेस तर बहार येईल. थोडा एकुण कार्यक्रमाच गोषवारा, मांडणी याबद्दल ऐकण्यासही उत्सुक आहे.
हा कार्यक्रम न-चुकवण्यासारखा आहे,अत्यंत सुरेल मैफिलीचा आनंद घेता येतो. एक से एक बढिया गाणी ऐकायला मिळतात.
माझे सर्व लक्ष फोटो काढण्यातच जास्त होते,शिवाय प्रेक्षकांचा रसभंग न होता नाट्यगॄहात वेगवेगळ्या अ‍ॅंगल मधे फोटो काढण्यात गेला, पुढच्या वेळी जेव्हा हा कार्यक्रम पहायचा योग येईल तेव्हा मात्र फक्त कांनांचा वापर करीन ;)
या वेळी गाण्याकडे कमी आणि फोटो काढण्यात लक्ष जास्त दिले गेले.

मान्य. परन्तु त्या फोटोमधील व्यक्ती कोण कोण आहेत एव्हढेतरी लिहायचे होते. चंद्रकात लिमये, सौ.भोगले सोडल्यास इतरांची ओळख पटली नाही.

रमताराम's picture

24 Apr 2012 - 12:48 pm | रमताराम

मला एवढेच ओळखता आले.

४. स्त्री: वंदना घांगुर्डे
७. रवींद्र घांगुर्डे
११. प्रह्लाद अडफडकर
१२. कु. फैयाज

५० फक्त's picture

23 Apr 2012 - 9:51 am | ५० फक्त

मस्तच रे धन्यवाद एका छान कार्यक्रमाच्या ओळखीबद्दल,
@ रमताराम, पुण्यात हा कार्यक्रम कधी आहे यावर लक्ष ठेवुन राह्तो, मग लगेच तुम्हाला फोनवतो. नक्की जमवु.

रमताराम's picture

24 Apr 2012 - 12:49 pm | रमताराम

मी ही लक्ष ठेऊन आहेच.

कार्यक्रमाची फोटोरूपी ओळख छान रे बाणा.

मूकवाचक's picture

24 Apr 2012 - 11:09 am | मूकवाचक

+१

परिकथेतील राजकुमार's picture

24 Apr 2012 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार

तपशील हवा होता म्हणणार्‍यांशी सहमत.

या प्रतिक्रिया देणार्‍यातील एक व्यक्ती माझी मित्र असून दुसरी व्यक्ती माझ्या परिचयाची आहे.दुसर्‍याच एका व्यक्तीचे प्रतिसाद मी त्या व्यक्तीसमोर फक्त तीन फुटावर बसून वाचले आहे.( आजही आठवते रमतारामांची 'मीच तो गुप्त आहे' ही डरकाळी) तिसर्‍याच एका व्यक्तीची प्रतिक्रिया भिकार म्हणजे फालतूच आहे. मी त्या फालतूपणाला उबलो आहे.
या प्रतिक्रियेची सुरूवात " मी लै भारी. मला पहा आणि फुले वहा " या नांदीनेच का होते?

सर्व फोटू मस्त !

आभार !

प्यारे१'s picture

24 Apr 2012 - 12:32 pm | प्यारे१

>>>>मी त्या फालतूपणाला उबलो आहे.
या प्रतिक्रियेची सुरूवात " मी लै भारी. मला पहा आणि फुले वहा " या नांदीनेच का होते? <<<<

फक्त याच नाही तर सगळ्याच प्रतिक्रियांची सुरुवात.... !
वर लोकांनी वाहिलेल्या सगळ्याच गोष्टींना 'फुले' म्हणण्याचा अट्टाहास. :)

म्हणूनच चिंचवडला लांबूनच नमस्कार करावा असे ठरवले आहे. (वल्लीच्या अपवादानं नियमच सिद्ध होतोय.) ;)

रमताराम's picture

24 Apr 2012 - 12:51 pm | रमताराम

आजही आठवते रमतारामांची 'मीच तो गुप्त आहे' ही डरकाळी
अरे बाबा आता काय सांगू तुला. ;). असल्या फालतू गोष्टींवर किती चर्चा करतोय्स तू.

फोटो उत्तम आहेत रे बाणा. हाय क्वालिटी आणि अँगल्सही मस्त. शिवाय आपल्याइथे इतकं हायक्लास थिएटर उभं राहिलं याचाही आनंद झालाय. हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच ना?

बाकी फोटोग्राफीशी संबंधित नसलेला एक मुद्दा जाणवला. जवळजवळ सर्व पात्रे ज्येष्ठ नागरिक वाटावीत इतकी प्रौढ का आहेत? कोणाचा अवमान करण्याचा हेतू नाही आणि तसं काही ध्वनित होत असलं तर माफी. तरुणवर्ग संगीतनाटकात काम करत नाही, की हे नाटकच वृद्ध , पन्नाशीच्या पात्रयोजनेचे आहे? की जुन्या लोकांनी स्मरणरंजन म्हणून रि-युनियन केली होती?

-संगीतनाटकांविषयी ज्ञान नसल्याने नॉस्टाल्जिया निर्माण न झालेला (गवि)

रमताराम's picture

24 Apr 2012 - 1:35 pm | रमताराम

जवळजवळ सर्व पात्रे ज्येष्ठ नागरिक वाटावीत इतकी प्रौढ का आहेत?
का ते ठाऊक नाही पण आहेत हे नक्की.
एक महत्त्वाचे म्हणजे 'संगीत नाटक' हा प्रकार जवळजवळ अस्तंगत झालेला आहे. मागच्याच पिढीने - किंवा त्याच्याही मागच्या पिढीने - त्याला डाऊनमार्केट'च्या यादीत टाकला आहे. त्यात गायक आणि नट मिळले मुश्किल (पूर्वीही गायक-नटांमधे खरंच 'नट' म्हणावेत असे किती होते हा एक वादाचा मुद्दा). मला वाटते जे प्रसिद्ध गवयी होण्याइतपत मजल मारू शकत नसत ते नाटकात जात (बालगंधर्व वगैरेंचा अपवाद समजायचा.) आता गल्लीबोळात स्पर्धा होतात नि वर्षाला पाच-पंचवीस आयडॉल्स वगैरेच्या स्पर्धा होतात. त्यातून गायक म्हणून मिरवता येते तसेच पैसाही तुलनेने चांगला मिळतो. त्यातच प्रेक्षकांच्या घटत्या संख्येमुळे तिथे किती काळ तग धरता येणार ही अनिश्चितताही आहेच. त्यामुळे नव्या पिढीत संगीत नाटकाचे आकर्षण नसणे समजण्याजोगे आहे. त्यात गैर काही नाही. संगीत नाटकातील पदे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी मुळात त्यांना नाटक म्हणावे का? असा प्रश्न नेहमीच माझ्या मनात राहिलेला आहे. छप्पन्न पदांचे नाटक हे नाटक राहते की मैफल होते? मागल्य पिढीने दहा ते पंधरा पदे असलेली नाटके पाहिली.

आज राहुलसारखे ताज्या दमाचे लोक जे संगीत नाटक दाखवतात ते संगीत नाटकाचा २०-२० अवतार आहे. प्रत्येक पद तीन ते चार मिनिटात गायले तर त्याची खुमारी काय राहिली. नाटकाचा वेळ कमी करण्यासाठी केलेले संपादन अनेकदा हास्यास्पद होते. राहुलने केलेल्या कट्यार्'मधे पंडितजींचे पात्रच नव्हते! केवळ दाखवण्यापुरते यातून संगीत नाटक जिवंत राहिलेच तरी 'हे' 'ते' नव्हेच. हा सिंहाचे कातडे घेतलेला कोल्हाच म्हणावा लागेल. बदलत्या काळात संगीत नाटकाला श्रद्धांजली वाहणे अधिक योग्य ठरेल.

हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच ना?
हो तिथेच आहे. :)

मला संगीत नाटके आवडतात् पण त्या बद्धल जास्त माहिती नाही,मी पाहिलेले पहिले संगीत नाटक हे संगीत संम्राट तानसेन होत.ते टिव्हीवरच बहुधा संह्याद्री वाहिनीवर पाहिलं होत.
बकुळ पंडीत आणि मुकुंद मराठे ही वरच्या रमताराम यांनी दिलेल्या यादीत भर ! :)
सर्व प्रदिसात देणार्‍या मंडळींना थांकु. :)

बंडा मामा's picture

25 Apr 2012 - 7:03 am | बंडा मामा

फोटो आवडले नाहीत.ह्यात काय विशेष आहे समजले नाही.पडद्यावरच्या कुरुप जाहिराती आणि जरठ लोक रसभंग करणारे आहेत. फोटोपेक्षा माहिती दिली असती तर आवडले असते.

फोटो आवडले नाहीत.ह्यात काय विशेष आहे समजले नाही.
हरकत नाही,ज्याची त्याची आवड / समज !

पडद्यावरच्या कुरुप जाहिराती आणि जरठ लोक रसभंग करणारे आहेत.
जाहिराती फोटोत आल्या नाहीत तर स्पॉन्सर्स पैसे द्यायला तयार होत नाहीत्,आणि ज्यांना आपण जरठ लोक म्हणतात ते आमच्यासाठी मान्यवर आहेत.

फोटोपेक्षा माहिती दिली असती तर आवडले असते.
संगीत नाटकावर २ शब्द लिहावेत इतकी माहिती माझ्याकडे नाही.

असो...

इरसाल's picture

25 Apr 2012 - 4:18 pm | इरसाल

फक्त एकच की ,भारतीय स्टेट ब्यांक आणी एल आयसी चे फलक डोळ्यात खुपत आहेत.

चालायचेच म्हणा : कालाय तस्मे: नमः