फायली : एक दाबणे !

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
3 Apr 2012 - 4:41 pm

लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून
हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.03.2012
http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx

भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार.

--------------------------------------

जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे.

मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?
LIAR: खरं सांगायचं म्हणजे, कुत्र्याने हे..
मी: बास! तुम्ही कुत्र्याने कागद चघळले हे जुने रडगाणेच वाजणार तर?
LIAR: नाही, नाही मी तसं कुठं म्हणालो. कुत्रे कागद खात नाहीत. आमच्या कंपाऊंडमध्‍ये आम्ही शेळी पाळली होती, कर्मचार्‍यांना शेळीचे दूध लागले तर असावी म्हणून. पण काये ना, त्या कुत्र्याला इकडे-तिकडे वास काढत हिंडायची सवय होती आणि ते नेहमीच शेळीमागे लागायचं. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही त्या शेळीलाच आत बांधू लागलो होतो, तिथे ती कागदपत्रं ठेवली होती. भानगड अशी झाली की त्या शेळीला त्या जुन्या कागदपत्रांची चव आवडली आणि शेळीच्या चर्वण उद्योगाचा सुगावा आम्हाला लागण्यापूर्वीच तिनं अर्ध्याच्या वर त्या दस्तऐवजांचा फन्ना उडवला..
मी: आय फील समथिंग फिशी बिहाइंड..
LIAR: Goat-ey. पण तुमचं बरोबर आहे. यामागची आणखी एक कारणमिमांसा आहे. काही वर्षांपूर्वी अभिलेखागारात चोर शिरले होते. आम्ही पडताळणी केली तेव्हा आणीबाणीबद्दलची कागपत्रे तेवढी गहाळ झाली होती.
मी: हे सरकारचंच काम मानायचं का?
Liar: नाही, नाही माझ्या विश्वसार्ह सूत्रांनी कळवलंय हे काम पाकिस्तानच्या जनरल कयानींचंच म्हणून. त्यांना सत्ता उलथवून टाकायची आहे आणि ते त्यांना लोकशाही मार्गाने करायचं होतं. त्यांना वाटलं आणीबाणीच्या कागदपत्रांतून काही हाती पडेल. ते बाड वाचून चित्रपट तयार करावा असे एखाद्या बॉलीवूड दिग्दर्शकालाही वाटले नसेलच असे नाही, पण माझा यावर तेवढा
विश्वास नाही.
मी: मग, तुम्हाला काय वाटतं?
Liar: मला वाटतं हा सगळा त्या खोलीत पाणी साठल्याच्या दुष्परिणाम आहे. X-Z दरम्यानच्या फायली फायलींग कॅबीनेटच्या तळाशी रचून ठेवल्या होत्या. रात्री कुणीतरी बेसीनमधला नळ सुरु ठेवला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ती खोली पाण्‍याने भरुन गेली. कॅबीनेटच्या बूडाशी असलेली कागदपत्रे गहाळ झाली.
मी: मला एक कळत नाहीय, Emergency बद्दलची कागदपत्रे X-Z दरम्यान कशी ठेवलीत तुम्ही?
Liar: अहो तो फायलींग करणारा लिपीक! तो तामिळनाडूचा आहे ना. त्याने Yemergency करुन त्या फायली Y मध्‍ये ठेऊन दिल्या.
मी: मला हेही खरं वाटत नाही.
Liar: तुम्हाला सांगतो प्रकाशकांनाही असंच वाटलं! माझ्या हाताखालच्या एका क्लर्कने मला सांगितलं, पंतप्रधान आणि राष्‍ट्रपतीदरम्यान आणीबाणीबद्दलची बातचीत असलेले ते पूर्णच्या पूर्ण दस्तऐवज त्याने पुस्तक म्हणून छापण्यासाठी प्रकाशकाला दिले होते. नकारघंटा वाजवून त्यांनी ते परत पाठवले.
मी: पण त्यांनी कागदपत्रे परत तर पाठ‍वली होती ना?
Liar: त्यांचं म्हणणं पडलं की त्यात कसलाही साहित्यिक दर्जा नाही, त्या कागदपत्रांची शैलीपण भयंकर आहे आणि त्यातील पटकथा तर कचराछाप आहे.
मी: मग? तुम्ही काय केलंत?
Liar: त्यानंतर लगेच मी ऑफिसबाहेरच्या भय्याची भेळपुरी खाल्ली, ती बांधून आली होती त्या कागदावर इंदिरा गांधींची स्वाक्षरी होती. पण काही लोक म्हणतात की मानवी मूर्खपणाच्या सखोलतेचा पुरावा म्हणून एलियन्सनी ती कागदपत्रं पळवलीत.
मी: आणखी काही सबबी?
Liar: आता तुमच्यापासून काय लपवणार.. खरं म्हणजे एकदा संडासातलं पाणी संपलं होतं, मग..
मी: बस्स!! आता खरी गोष्‍ट काय आहे ते सांगा.
Liar: अहो, कसची कागदपत्रं आणि काय. आमच्याकडे काहीच नव्हतं. इंदिरामॅडम राष्‍ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटल्या तेव्हा त्यांनी मॅडमला विचारलं की, आणीबाणी लादायचीच असे त्यांच्या मनात असल्याची अफवा खरी आहे का? मॅडमजींनी आधी त्यांना डोळा मारला, मग त्यांच्या पोटात हलकासा गुद्दा मारला आणि शेवटी गोड हसल्या.

पुढे आम्हाला कळालं की राष्‍ट्रपतींनी आणीबाणी जाहिर केलीय.

****

विनोदराजकारणआस्वादमाध्यमवेधलेखभाषांतर

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

3 Apr 2012 - 5:05 pm | परिकथेतील राजकुमार

यू टू ?

परवाच मिपाचे धोरण मोडल्याने ग्रेस ह्यांच्यावरील एक लेख असाच उडालेला असताना, तुमच्या सारख्या जाणत्याकडून असे घडावे ?

२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.

३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल.

3 नंबर मध्‍ये दिलेली सूट घेतलीय पराशेठ.

आता संदर्भ म्हणजे हे नव्हे, ते म्हणजे हे वगैरे शब्दांचा कीस पाडण्‍यापेक्षा मला ज्या शब्दांचा कीस पाडायचा होता तो मी वर लेखात पाडला आहे.

संपादको, प्लीज उडवा धोरणात बसत नसेल तर आणि एकडाव माफी द्या.

पराशेठ खवत बोलू तुम्हाला हा मुद्दा मुद्दाम बोलावं असा वाटत असेल तर ;-)

आणि ही मूळ लेखकाची परवानगी, आत्ताच मिळाली:

Hushing The Files - Permission
Inbox
x

Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator
20:02 (1 hour ago)

to manas.c
Hi Sir,

This is Yashwant Kulkarni from Indore, MP.
It was nice to read the mockery you made in Hushing the files in HT issue on Fools Day.

I loved it & I wish to translate it for my blog which is Marathi.

I would be obliged if you grant me permission to translate your writeup in Marathi.

manas.c@livemint.com
20:15 (1 hour ago)

to me
Yes you may do so, provided you carry a line at the end of your translation that the original column was carried in Hindustan Times

From: Yashwant Kulkarni, Marathi, Hindi, English Translator [mailto:yekulkarni@gmail.com]
Sent: Tuesday, April 03, 2012 08:01 PM
To: Manas Chakravarty
Subject: Hushing The Files - Permission

पैसा's picture

3 Apr 2012 - 9:31 pm | पैसा

मस्त आहे! येस मिनिस्टरची आठवण झाली!

उत्तम, आणि त्याबरोबरच यकुचे आभार, लेखन वापरण्यासाठी आदर्श पत्राचा नमुना दिल्याबद्दल धन्यवाद.

मदनबाण's picture

4 Apr 2012 - 8:49 am | मदनबाण

लेखन वापरण्यासाठी आदर्श पत्राचा नमुना दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या नेत्यांचे आदर्श हे जगाला लाजवतील असेच आहेत ! आदर्श घोटाळ्यातील कागदपत्रे अशीच गहाळ झाली म्हणे !

भाषांतर चांगलं केलंयस पण मूळ लेखच अजिबात खास मनोरंजक वाटला नाही. विनोद ओढलाताणला आहे असंच वाटलं.

ह्युमरच्या नादात थोडं 'जास्त' झालंय असं वाटलं. ( हे मूळ लेखकासाठी)
बाकी चुरचुरीत लेख.

शिल्पा ब's picture

4 Apr 2012 - 10:53 am | शिल्पा ब

आवडलं. येस मिनीस्टर टाईप वाटलं.

मराठी_माणूस's picture

4 Apr 2012 - 11:35 am | मराठी_माणूस

फारसे विनोदि वाटले नाही

कवितानागेश's picture

4 Apr 2012 - 1:54 pm | कवितानागेश

(LIAR) हे पद छान आहे! :)

धन्यवाद दोस्तहो!
मूळ लेखकाचे इंदिरा गांधी आणि आणीबाणीबाबतीत काही वैयक्तिक हेवेदावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.