खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी
उगाच्या उगाची किती कुंथीशी
मानवाची नसे कोणतीही स्थिती
चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी
जात जातीत भेदे अशी ती कशी
जळेना कळेना मढी जाळीशी
बाबारे कोरडे तरी तेच आहे
लिहिशी कविता तू ती कशाने अशी
यात ना काही तरी तू तोच आहे
पिसारा कशाला उगा दाविशी
करावे भरावे उणे तूच पाहे
खपावे मरावे गोवरी जाळताहे
(कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )
प्रतिक्रिया
15 Mar 2012 - 3:21 pm | कवितानागेश
एकाच दिवसात जास्त धागे तयार करणार्यांसाठी काहीतरी कायदा येणार होता म्हणे! :P
15 Mar 2012 - 4:08 pm | यकु
कथा बालकथा बालगीत
15 Mar 2012 - 3:28 pm | प्रचेतस
यकुशेठ,
काही खरं नाही राव.
पुण्यात या आता लवकर. मस्त कट्टा करू एक.
विडंबन झकासच.