स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे.
नारदमुनी: नारायण , नारायण.
विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला?
नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन!
विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला?
नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले. "जस्ट डू इट!"
(चेहेर्यावरचा घाम पुसत लक्ष्मीची एन्ट्री होते.)
लक्ष्मी: हॅलो मुनीवर!
नारद: नमस्कार देवी, कश्या आहात? अंमळ थकलेल्या वाटता.
लक्ष्मी: हो, हे काय आत्ताच फिटनेस सेंटरमधून आलिये. माहेरी एक लग्न निघालय, म्हटलं जरा वजन कमी करावं.
(विष्णूकडे रागाने कटाक्ष टाकत) यांच्यासारखे सुपरबॉलचे चोचले कसे परवडावेत आम्हाला! (आत जाते)
विष्णू (सावरून घेत): तर, काय हो मुनीवर तुमच्या तब्येतीचं हे असं कश्यामुळे झालं?
नारद: हम्म्म्.......आउटसोर्सींग! हल्ली पृथ्वीतलावरच्या फेर्या कमी झाल्यात,बरचसं काम त्रिखंड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स केलय. व्हिडिओ कॉन्फरन्स करूनच अपडेटस् घेत असतो.
(तेवढ्यात लक्ष्मी हातात ओनियन रिंग्जची प्लेट घेऊन बाहेर येते.)
लक्ष्मी: अहो मुनीवर यांच्याही पोटाचा घेर केवढा झालाय पहा ना! सगळी पितांबरं गुढग्यापर्यंत वर सरकलियेत. तरी सांगत असते, सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे! पण आमचं कोण ऐकणार?
विष्णू (मखलाशी करत): फार नाही हो मुनीवर, तसा मी योगा करत असतो अधून मधून. सुस्कारे सोडतानाच कपालभातीही होवून जाते.
लक्ष्मी (फणकार्याने): थोडा कसला, परवाच झालेल्या कैलास व्हिजिटमध्ये गरूडाला यांचं वजन सहन न होवून दोनदा थांबावं लागलं असं शंकरभावोजी जीटॉकवर सांगत होते. बरं, मी जाते बाई! लग्नात घ्यायचा उखाणा तयार करायचाय.
विष्णू (थट्टेच्या सुरात): देवी, आम्हालाही ऐकू द्याकी तुमचा उखाणा! लग्नानंतर घेतलाच नाहियेत.....
लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल,
विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
नारद: हा हा हा. छानच हो देवी! पण एक सांगा, खमंग कांदा भज्यांवरून अनियन रिंग्जवर कश्याकाय आलात?
लक्ष्मी: मिसेस मोहिनी धन्वंतरींनी आमचं डाएट प्लॅन करून दिलय, त्याप्रमाणेच करते सगळं. बरंतर मुनीवर, मी जरा शॉपिंगला जाऊन येते. (राजरथ हॅन्डबॅग आणि हायहिल्स सावरत प्रस्थान करते.)
विष्णू: मुनीवर, आजकाल बातम्या मिळण्यासाठी आम्हाला तुमच्याशिवाय इतरही पर्याय आहेत बरं का! नुकतेच चित्रगुप्ताने ट्वीट केल्यानुसार तो त्याच्या चोपड्या आउटडेट करून काम क्लाऊड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स करतोय म्हणे!
नारद: हम्म्....चालायचच. दिवस बदलले तशी तंत्रंही बदलली. अनायसे होणारा व्यायाम मात्र थांबला.
(नारदाच्या आयफोनची कॉलर ट्यून वाजते) हां, बोल रे.....काय? काय म्हणतोयस तू?........आस्सं होय्......निघतोच्.....लगेच.
विष्णू: काय हो मुनीवर काय झालं? काही गडबड?
नारद: हो हो सांगतो. लगेच निघायला हवं मला. असुर ग्रुप ऑफ हॅकर्सनी म्हणे त्रिखंड सर्व्हिसेसची वेबसाईट हॅक केलीये. यापुढे बातम्या काढण्यासाठी आणि पुरवण्यासाठी मलाच त्रिलोकीची यात्रा करावी लागणार. अर्थात माझे व्यवहार सुरळीत होणार. अहो शेवटी यंत्र ते यंत्र आणि तंत्र ते तंत्र! त्या यंत्रांना निकामी करण्यासाठी असूर गृपची योग्य ती कळ दाबण्याचं कार्य पार पाडलं ते आमच्या तंत्रानंच.......काहीही झालं तरी कळीचा नारद मी. जाता जाता "चारी तोंडानं चारीठाव चरणार्या" ब्रम्हदेवालाही काम तंत्रानं होऊ देण्याबद्दल सांगतो म्हणजे त्याच्या वाढणार्या वजनाखाली कोमेजणारं कमळ पुन्हा तरारून येईल!
नारायण नारायण!
(शिर्षक श्रेय- रंगाण्णा.)
प्रतिक्रिया
7 Feb 2012 - 3:04 am | प्राजु
हाहाहा!!! सॉल्लिड!!
7 Feb 2012 - 6:03 am | बहुगुणी
वा, रेवती ताई, अप्रतिम! एखाद्या स्टॅंड-अप-कॉमेडी साठी उत्तम पक्का माल आहे, कॉलिंग संदीप चित्रे.....
7 Feb 2012 - 9:59 am | पियुशा
लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल,
विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
हे हे हे भारीच आहे :)
7 Feb 2012 - 3:47 pm | चैतन्य दीक्षित
स्टँड-अप कॉमेडीसाठी ही स्क्रिप्ट खूपच मस्त ठरेल.
लक्ष्मीचा उखाणा भारीच :)
8 Feb 2012 - 9:41 pm | संदीप चित्रे
धन्स बहुगुणी ....
रेवती,
तुझा खुसखुशीत लेख आवडला.
ह्याचे स्टॅंड अपच्या दृष्टीने काही करता येईल का बघतो.
कॉपी राईट म्हणून 'भेळ' पुरेल असा अंदाज आहे :)
9 Feb 2012 - 9:48 am | रेवती
अगदी चालेल. एका भेळेवर आम्ही खूष!:)
9 Feb 2012 - 5:14 pm | मी-सौरभ
भेळेचे कुरीयर चार्गेस कोण देणार..
(नदीच्या अलीकड्चा)
9 Feb 2012 - 7:10 pm | रेवती
अरे, संदीप हा जवळच (त्यामानाने) राहतो.
त्यातून त्याची बायको आहे सुगरण.
मीच जाईन म्हणते आहे.;)
10 Feb 2012 - 1:57 am | कुंदन
जाताना ओन्यिन रिंगा घेउन जा हो.
7 Feb 2012 - 7:09 am | इन्दुसुता
जबरदस्त आवड्या.... निखळ मनोरंजन.
7 Feb 2012 - 7:28 am | तुषार काळभोर
मस्तच!!!
7 Feb 2012 - 8:14 am | शाहिर
बाकी चालू द्या !!
7 Feb 2012 - 8:28 am | प्रचेतस
भारीच.
7 Feb 2012 - 8:35 am | मदनबाण
(शिर्षक श्रेय- रंगाण्णा.)
मला तर अख्खा लेख रंगाण्णांनीच टंकलाय असा दाट संशय आहे ! ;)
बाकी चालु द्या...
नारायण ! नारायण ! ;)
7 Feb 2012 - 8:37 am | पक पक पक
मस्त आहे , छान लिहील आहे........ आवडल.
7 Feb 2012 - 9:45 am | सविता००१
रेवतीताई, जबरदस्त लिहिलय. खूप मजा आली. डोळ्यासमोर येत होते सगळे प्रसंग.
7 Feb 2012 - 9:57 am | सूड
आवडेश !!
जाता जाता: शिर्षक की शीर्षक ?? ;)
नारायण नारायण !!
7 Feb 2012 - 11:04 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुला लग्न करायचे आहे की नाही ??
7 Feb 2012 - 11:12 am | पियुशा
___/\____
तुला लग्न करायचे आहे की नाही ??
ख....ह्.....प......ले ;)
7 Feb 2012 - 10:37 am | मी-सौरभ
साहित्या संमेलन लाईव्ह बघितलस की काय??
त्याचाच परीणाम आहे ना हा??
7 Feb 2012 - 11:05 am | चिगो
मस्त आहे..
7 Feb 2012 - 11:14 am | इरसाल
नारदमुनी गिटार आणि स्पोर्ट शूज हा हा हा
साधारणपणे असा काहीसा अवतार ....हा यम आहे पण सदृश्य ........
आन्जासा
7 Feb 2012 - 11:16 am | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! खूप दिवसांनी रेवतीताई इन अॅक्शन! 'जस्ट डू इट' आणि उखाणा एकच नंबर! मजा आली!
7 Feb 2012 - 2:01 pm | राघव
:) मस्त लिहिलंय!
राघव
7 Feb 2012 - 11:21 am | आदिजोशी
लिखाणातील विनोदाबद्दल बोलत नाही.
हिंदू धर्म कितीही सहिष्णू असला, देवांची चेष्टा केल्याबद्दल घरावर दगड पडत नसले आणि हत्या करायचे फतवे निघत नसले तरी आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही. विनोदी लिखाणासाठी किंवा सहज गंमत म्हणून लिहिण्यासाठी अन्य लाखो विषय आहेत.
अवांतरः दशावतारी नाटकं ही वेगळी परंपरा आहे. त्याचा आणि ह्याचा काडीमात्र संबंध नाही.
7 Feb 2012 - 12:44 pm | मूकवाचक
"आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही" ... आपले देव? विसरा ते आता!
उलट विष्णु, लक्ष्मी, नारद वगैरे कुठल्याही ठराविक 'समाजाचे' (पक्षी: जातीचे) नसल्याने या लेखात एकदम निखळ(!) आणि 'सेफ' विनोद आहे. थोडा अभ्यास वाढवा आणि अशा निखळ विनोदाचा मनमुराद आनन्द लुटा :-)
7 Feb 2012 - 12:47 pm | आदिजोशी
'समाजाचे' (पक्षी: जातीचे)
मी कोणत्या जातीचा उल्लेख केला हे कळेल काय? तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.
7 Feb 2012 - 1:18 pm | मूकवाचक
अभ्यास वाढवा असे उपरोधाने लिहीले होते. त्यातून हिन्दूधर्मीय आपापल्या जातीची दैवते, नेते इ. बद्दल जितके 'सेन्सिटिव्ह' असतात, तितके विष्णु, लक्ष्मी, नारद इ. बद्दल नसतात इतकेच सुचवायचे होते. असो. यात व्यक्तिगत रोख दिसत असल्यास क्षमस्व.
7 Feb 2012 - 1:20 pm | सूड
किती वेळा मॉडिफाय कराल !!
7 Feb 2012 - 2:15 pm | ५० फक्त
+१ टु आदिजोशी, असलंच जरा इतर धर्मिंय देवतांबद्दल लिहलं तर किती गोंधळ होईल.
7 Feb 2012 - 5:00 pm | यकु
कल्याण आहे ऽ!!!
अहो रेवती आजी कधीतरी सटी सहा महिन्यातून, मोठ्या मुष्कीलीनं लिहायला घेतात... आणि त्यात हा छिद्रान्वेष.
रेवतीआजी, पुढच्या वेळी लिहीले ना, तर फक्त वाचून काही आक्षेपार्ह नाही हे ठरवण्यासाठी Preview टाका.
7 Feb 2012 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा
@आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही.>>> आपल्या धर्मशास्त्रातला विरोधाभास/वेडेपणा/विसंगती इतकी हास्यास्पद आहे,,,की खरंतर अश्या नव्या पद्धतीनं केलेली विषयाची हताळणी किमान देवांना माणसात तरी आणुन सोडते...त्यामुळे माझ्यासारख्यांना असे विनोदीलेखन हे देवांवरच मानवानी उपकार केल्यासमान वाटते...असो..देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा.. :-)
@तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.>>> हे मन लाऊन वाचा,,,एकदातरी...प्लीज..
http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7...
7 Feb 2012 - 2:28 pm | आदिजोशी
देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा..
मी सनातन धर्माची पाठराखण कधी केली? एकदातरी...प्लीज.. असं म्हणून जो सावरकरांचा लेख वाचायला दिलात तो आधीच वाचला आहे. तो इथे देण्याचे कारणच कळले नाही. सावरकरांच्या विचारांपैकी ०.०००००१% विचार आणि आचार पाळणं आपल्यातल्या किती लोकांना शक्य आहे ह्याचेही उत्तर द्या.
देवांची रेवडी उडवू नये असे म्हणणे म्हणजे सनातन धर्माची पाठराखण करणे असे वाटत असेल तर आनंद आहे.
तसेच जे मत मी मांडले आहे ते माझे वैयक्तिक आहे. ते बरोबरच आहे हा अट्टाहास नाही आणि तसे कुणी वागावे हा आग्रहही नाही. मग उगाच का मिरच्या झोंबल्या?
7 Feb 2012 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा
@मग उगाच का मिरच्या झोंबल्या?>>> तुमचं सगळं म्हणणं मान्य...आमचं सगळं मत मागे...
7 Feb 2012 - 2:35 pm | आदिजोशी
तुमचं सगळं म्हणणं मान्य...आमचं सगळं मत मागे...>>>>
तुमचा मानभावीपणा भावला.
देवधर्म आणि कर्मकांड ह्या विषयीचे माझे विचार इथे (http://adijoshi.blogspot.in/2008/06/blog-post.html) वाचता येतील.
माझ्याकडून ह्या विषयावर लेखनसीमा.
8 Feb 2012 - 8:38 am | शिल्पा ब
का उगाच तालिबानी होताय?
आम्हाला आमचे देव बिव सगळे आवडतात अन आम्ही त्यांच्याविषयी अशी गंमत केलेली त्याला/तिलाही आवडते असा आमचा समज आहे. ज्यांचा असा समज नसतो ते त्यावरुन दंगली करतात त्यांना आम्ही तालिबानी म्हणतो.
25 Jun 2016 - 9:07 am | पिलीयन रायडर
+१०००००००
I can freely talk about my religon and that is why Proud Hindu!
Revakka as usual rocks!!!
7 Feb 2012 - 2:43 pm | श्रीरंग
मनातलं बोललास आदि.
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.
9 Feb 2012 - 7:14 am | इन्दुसुता
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.
हिंदू देव हे फक्त सॉफ्ट टार्गेट्स असणे केव्हाच मागे पडले आहे... चपलांवर लक्ष्मीची चित्रे, गणपती विषयी अश्लील वक्तव्ये, हुसेनांची चित्रे या बद्दल तरी समग्र हिंदूंना एकत्र आणू शकतो काय आपण?
मी कट्टर हिंदू आहे (आणि असे म्हणताना कोणाच्या बा ची भिती नाही ), पण मूर्तिपूजक नाही. देवाची ( देवता नव्हे ) जी संकल्पना हिंदूंना अपेक्षित आहे, त्यावर वरील विनोदाने काही फरक पडू नये.
खेदाची बाब येव्हढीच आहे की ईतर धर्मीय ( ज्यांना त्यांच्या धर्मावर विनोद केलेला चालत नाही) सोकावतात ... म्हातारी गेल्याचे दु:ख नाही हो पण काळ सोकावतो आणि त्यांच्या धर्मांबद्दल काही विनोद करण्यासाठी आपल्या कुणाच्याच पृष्ठ्भागात दम नाही...... :(
31 Jul 2016 - 8:30 am | मितभाषी
+१
हेच बोलतो.
7 Feb 2012 - 11:41 am | कोल्हापुरवाले
वाडलेले पोट धरुन हसत आहे !!
7 Feb 2012 - 12:07 pm | प्रीत-मोहर
हाहाहा मस्त ग .. :)
7 Feb 2012 - 12:40 pm | Maharani
उखाणा भारीच !! छान जमले आहे!!
7 Feb 2012 - 1:18 pm | अत्रुप्त आत्मा
ह्हा ह्हा ह्हा....एक नंबर झालाय प्ले...सगळ्या देवतांना अंतरजालीय/-इहलौकिकात आणुन सोडल्याबद्दल धन्यवाद... :-)
7 Feb 2012 - 2:47 pm | गणपा
हा हा हा..
एकदम खुसखुशीत.
7 Feb 2012 - 6:43 pm | कुंदन
असेच म्हणतो.
अवांतर : शिर्षक वरुन सुचले , शुद्धलेखनाचे का औटसोर्स करायचे असेल तर कळवा. आमचे काही मित्र याबाबत तुम्हाला मदत करु शकतील.
7 Feb 2012 - 2:50 pm | यकु
मज्जा आली गं रेवतीआज्जे..
अजून लिही.
7 Feb 2012 - 2:50 pm | कपिलमुनी
पण विडंबनाचे टारगेट सदैव हिंदु देवता असतात हे बघुन वाईट वाटला ..
खरोखर भावना दुखावणे काय असता ते जाणवला ..
लिखाण हे निखळ आनंद देणारा असावा ..
बाकी माणसाने स्वताच आपल्या धर्माचा अभिमान ठेवला तर इतर ठेवतील ..
7 Feb 2012 - 2:54 pm | स्मिता.
मस्त! खूप दिवसानी निखळ विनोदी काहितरी वाचलं.
जस्ट डू इट आणि विष्णूपंतांच्या नावाने घेतलेला उखाणा क्लास...
7 Feb 2012 - 3:05 pm | मेघवेडा
हा हा हा! बेष्ट! मात्र घाईघाईत उरकल्यासारखं वाटलं..
7 Feb 2012 - 3:09 pm | वपाडाव
देव हा प्रत्येक माणसात आहे....
7 Feb 2012 - 3:11 pm | नगरीनिरंजन
:-D
कलियुग असल्याने स्वर्गात देवांना असाच कैतरी टैमपास करावा लागत असेल.
7 Feb 2012 - 3:16 pm | छोटा डॉन
लेख वाचुन मनापासुन हसलो, मस्त लेख आहे.
काही प्रतिक्रिया वाचुन तर धो धो हसलो, मनोरंजक प्रतिक्रिया आहेत.
- छोटा डॉन
7 Feb 2012 - 6:15 pm | तिमा
छोटा डॉनशी अंशतः सहमत. कारण लेख वाचून फारसे हंसू आले नाही. पण प्रतिक्रिया वाचून मात्र भरपूर हंसलो.
लेख तसा बरा आहे. पण रेवतीताईंकडून जास्त अपेक्षा होती.
7 Feb 2012 - 3:28 pm | जागु
वा मजा आली वाचताना.
7 Feb 2012 - 3:51 pm | प्राजक्ता पवार
:)
7 Feb 2012 - 5:25 pm | गणेशा
खुपच निखळ लेखन
आवडले ...
7 Feb 2012 - 6:24 pm | स्वाती२
भन्नाट!
7 Feb 2012 - 6:51 pm | पैसा
रेवती, तू पण वाद ओढवून घ्यायला शिकलीस तर! आता तुझे सगळे धागे हिट होणार बघ! फक्त प्रत्येकाला उपप्रतिसाद द्यायचं तेवढं जमव ब्वॉ! ;)
नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला!
7 Feb 2012 - 7:05 pm | गणपा
एक नारद माझ्या चांगलाच ओळखीतला आहे.
पण 'तो' तोच का? हे कळण्यासाठी वरील संवाद नेमका केव्हा घडला (म्हणजे एक्झॅक्ट काळ/वेळ काय) ते आधी कळायला हवं. :)
7 Feb 2012 - 10:00 pm | रामदास
नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला!
सहमत .
7 Feb 2012 - 7:01 pm | गणपा
अजुन फक्त ४९ उरले. ;)
7 Feb 2012 - 7:04 pm | मनराव
सुपरी कोणाला दिली आहे......
8 Feb 2012 - 11:02 am | मी-सौरभ
कोण आहे रे काँपिटीशन आमच्या धंद्याला???
7 Feb 2012 - 9:01 pm | मराठे
मस्त!
स्वगतः देवसुद्धा मॉडर्न होतील पण लोकांनी होऊ दिलं पाहिजे ना!
7 Feb 2012 - 9:09 pm | जाई.
हाहाहा
मजा आली वाचून
7 Feb 2012 - 9:56 pm | रेवती
धन्यवाद मंडळी!
आवाहन न करता इतके प्रतिसाद मिळणे हे माझ्यासाठी मोठीच गोष्ट.
त्या लक्ष्मीमातेचीच कृपा.
अनेकांनी प्रेमापोटी प्रतिक्रियांचे शतक व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली.
अनेकांना लेखन आवडले, काहींना नाही आवडले.
अगदी असेच अपेक्षित होते. न आवडल्याचे कळवणार्यांचेही तेवढेच स्वागत.
यातून आपल्या देवदेवतांची कुचेष्टा करण्याचा हेतू नव्हता.
गणपतीबाप्पाला स्वेटर घातल्यावर काहींना क्यूट वाटते तर काहींना आवडत नाही.
आपापला दृष्टीकोन. मी कट्टर देवभक्त नसले तरी देवावर श्रद्धा असणार्यांपैकी आहे.
देवाला अगदी आपल्या मनाजवळ मानणे मला भावते.
बाणा, हा लेख रंगाकाकांनी लिहिलेला नाही. शुद्धलेखनाच्या चुकांकडे तरी बघ, लगेच समजेल.
मेवे, हो, लेख जरा संपल्यासारखा मलाही नंतर वाटला.
पैसाताई आणि गणपा, रयवारी एका मराठी ग्रुपच्या मिटींगला सहज आणि पहिल्यांदाच गेले असताना डोक्यात किडा वळवळू लागला. सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले होते. नंतर लेखनावर हात फिरवण्याचा मूड नव्हता.
आभार लवकर का मानले असे विचारू नये. उद्या जमणार नसल्याने आज मानले एवढेच.;)
8 Feb 2012 - 9:48 pm | संदीप चित्रे
आम्ही पहाटे चार वाजता फक्त 'अटलांटिक सिटी'हून परत घरी येतानाच जागे असतो ;)
8 Feb 2012 - 9:51 pm | रेवती
अस्सं होय.
7 Feb 2012 - 9:57 pm | निनाद मुक्काम प...
लय भारी
लेख आणी प्रतिक्रिया खुसखुशीत आहेत.
7 Feb 2012 - 10:13 pm | पाषाणभेद
फेसबुक काय, ओनियन रिंग काय मजा आहे बुवा!
7 Feb 2012 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले. :)
आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल,
विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
हे तर लैच भारी. बाकी, विष्णूपंत हे क्रिकेटचे फ्यान होते असे ऐकलेले होते. बाकी, क्रिकेटमधील दारुण पराभव पाहवत नसल्यामुळे विष्णूपंत सुपरबॉलकडे वळले की काय ? :)
टीप : विष्णूपंत हे इहलोकातील एखाद्या काल्पनिक मनुष्याचं नाव असावं म्हणून प्रतिसादात विष्णूपंत असे लिहिले आहे. कोणा शिव आणि वैष्णव पंथांच्या भक्तांनी उगाच टेंशन घेऊ नये, ही नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
7 Feb 2012 - 10:45 pm | मितभाषी
हाहाहा रेवतीताई ढेर दुखवस्तवर हसलो लेख वाचताना.
मितभाषी.
7 Feb 2012 - 11:00 pm | सानिकास्वप्निल
उत्तम लिहिले आहेस रेवती :)
"सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे!" हे वाचून खुप हसायला आले :bigsmile:
आणी उखाणा तर क्या बात!! क्या बात!! क्या बात!!
8 Feb 2012 - 5:04 am | बबलु
मस्त.
"शंकरभावोजी जीटॉकवर" --- जबरी. :)
आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल,
विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! --- हपुवा. :) :)
8 Feb 2012 - 10:06 am | चित्रा
काही कल्पना अजून फुलवून एखादे नाटुकले होऊ शकले असते असे वाटले. अर्थात निर्मितीची वेळ बघता पटकन लेख संपला यात आश्चर्य नाही.
8 Feb 2012 - 11:13 am | विसोबा खेचर
मस्त.. :)
8 Feb 2012 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
अशा लिखाणाचा आम्ही जाहिर निषेध करतो आहोत !
आपल्याच संस्कृतीची खिल्ली उडवणारे लेखन आपल्याच लोकांकडून व्हावे यासारखे दुर्दैव नाही.
परा कटियार
अध्यक्ष
चतुरंग दल
8 Feb 2012 - 5:39 pm | असुर
जाहीर पुणेरी मराठी:
+१
रेवतीआजीने आम्हाला पराषेटच्या गोटात परस्परच ढकलून दिल्याने संमती देतो आहे. बाकी या ढकलाढकलीचा आनंद (अथवा दु:ख) साजरा करण्याबाबत आम्ही साशंक आहोत.
खाजगी पुणेरी मराठी:
लेख आवडला हो. पण मेव्या म्हणतोय तसा - शुरु होतेही खतम हो गया, और भौत घाईघाईमें लिख्या लगता है.
--असुर
8 Feb 2012 - 9:53 pm | रेवती
बरं झालं बाबा निषेध केलास.
म्हटलं गेला कुठे हा.
जमलं तर त्या असुरालाही समजाव.
त्याचं नाव लिहिलं हे एकच मनात धरून बसलाय.
9 Feb 2012 - 11:23 am | jaypal
9 Feb 2012 - 3:46 pm | स्पा
ह्यःह्यः
रेवती आज्जी मधेच काय झटका आला का ग?
एकदम भन्नाट लीव्लयेस =)) =))
शतक करू आपण तुझ खाम्पलीट :D
10 Feb 2012 - 11:07 am | अभिज्ञ
मस्त खुसखुशीत लेखन.
वाचताना मजा आली.
काहि प्रतिसाद वाचून छान करमणूक झाली.
अभिज्ञ
10 Feb 2012 - 11:17 am | चौकटराजा
अहो , लेखिका बाई , का अशी आमच्या देव देवतांची चेष्टा करता. ....आता आमच्या कित्ती किती भावना दुखावल्या म्हणून सांगू ? आमच्यात फतवे निघत नाहीत म्हनून त्याचा लई म्हजी लईच डिस अॅडवव्हान्टेज घेता की हो !
कल्पना भारी आहे. पण एक " बग" त्यात आहे..... देवांना भूक ही भावना नसते... संदर्भ .. जीतेंद्र , प्रेमनाथ देवेन वर्माचा लोक परलोक
हा चित्रपट. ( यावर भारत सरकरने बंदी घातली होती..... भावना दुखावल्या..... आ>>>>ईईईईए ग )
त्यामुळे विष्णूना सेंट्रल ओबेसिटी होणे गैरलागू आहे. फारतर सोमरसाचा डोस ज्यादा आल्याने काही अघटित आजार आला असे रूपक घेता
आले असते ...अरे ,,, अरे पण देवाना आजारही होत नाहीत ,ते अजरामर आहेत ना .....? मग अश्विनीकुमार , डॉ. धनवंतरी यांचे काय बुवा
तिथे...... ? अरारा ...... काहीच संगति लागत नाही ... मति गुंग झाली...... मग आता लेखनसीमा .
10 Feb 2012 - 1:01 pm | गणपा
लेखाची चांगली चिरफाड केलीये..
लगे रहो. :)
24 Jun 2016 - 5:46 pm | जेपी
मस्त आहे लेख..
24 Jun 2016 - 6:53 pm | नूतन सावंत
रेवाक्का_/\_
24 Jun 2016 - 7:43 pm | पद्मावति
=)) मस्तं!!