(..चाल.. कोणतीही..)
विचारमैथुन चालू असावे
जेव्हा काही कामच नसते
कचेरीमधे लेखन प्रसवत
चोप्य पस्ते..चोप्य पस्ते..
(...चाल बदलून...)
अंगलटीला उलटुन येता
प्रतिक्रियांच्या पचपच पिंका
ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका
पेरुन द्याव्या विकीलिंका..
(..चलन बदलून...)
बोटावरची थुंकी बदलणे
रुमाल टाकुन जागा धरता
प्रकाटाआ डुकाटाआ
अशक्य होईल बूच मारता.
(..चालचलन आणि वृत्त बदलून..)
अच्रत ब्वलत शीबै नैकै
पुलेशुभेच्छुक पुभालटा
तर्रीभरला शाब्दिकरस्सा
इथे उकळतो रटारटा..
(.. चाल सोडून...)
डायरिया जिलब्या अन चपला
ठोठो हसता कोणी खपला
काळेबेरे काही नाही
शब्दकोष टेंपोत बसवला..
..............................
प्रतिक्रिया
16 Dec 2011 - 3:22 pm | प्रास
हे भारीये, येकदम!
मेलो, खपलो, ठार झालो......!
बाजार उठवला नि टेंपोत बशिवला.....
:-D
16 Dec 2011 - 3:23 pm | मेघवेडा
आगागागा! बा जा र! =)) =)) =))
सीरिज तयार करा आता एक याची...
पुभालटा पुभालटा पुभालटा पुभालटा!
16 Dec 2011 - 3:28 pm | प्यारे१
शरदिनीतैंना टफ फाईट आहे... :)
गवि हे मिसळपावगावचे नवे 'मास्तर' आहेत. ;)
16 Dec 2011 - 3:34 pm | चिगो
धन्य आहे तुमची.. आता हे पण ग्राऊंड मारताय तुम्ही..
बादवे, "स्क्रि.का.मो.गो" पोचलंय. "मी ? म्हातारा ??" वाचून मलाही तसंच वाटलं की साला लै फास्ट बदलतंय माझं आणि माझ्यापुरतं जग..
लगे रहो..
16 Dec 2011 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा
डायरिया जिलब्या अन चपला
ठोठो हसता कोणी खपला
काळेबेरे काही नाही
शब्दकोष टेंपोत बसवला.. ----^---- अबाबाबाबा ...फट फुट फट्याक...मेलो मेलो...वाचवा वाचवा...
16 Dec 2011 - 3:56 pm | स्पा
भयाण भयाण आहे .....
मेलो ,वारलो, खपलो , पिच्लो, गचकलो, महानिर्वाणलो
आवरा... :D
गवि सोमासव थोड द्या पाठवून इथे
16 Dec 2011 - 3:37 pm | अन्या दातार
तुफ्फान सुटलीये गविंची गाडी :)
हहपुवा कसे काय सुटले शब्दकोषातून? ;)
16 Dec 2011 - 3:40 pm | गवि
हहपुवा कसे सुटले??
अरे कमेंटकर्त्यांनी माझ्याकडून सुटलेल्या अशा असंख्य चिजा अॅड कराव्यात अशी इच्छा आहे..
16 Dec 2011 - 3:40 pm | प्रीत-मोहर
आगागागागागा
__/\__
16 Dec 2011 - 3:45 pm | गणपा
हॅ हॅ हॅ.
पक्के मुरलेले दिसताय. ;)
16 Dec 2011 - 3:51 pm | पिलीयन रायडर
ओ जरा दुसर्यांना पण स्कोप ठेवा की... !!
असं सगळच तुम्ही करुन टाकलं, तेही इतकं भारी तर बाकीच्यांना "न्युनगंड" येइल ना...!!
16 Dec 2011 - 3:55 pm | गवि
सगळंच कुठे?? पैल्यांदाच ट ला ट लिहिलं आहे.. सांभाळून घ्या...
बाकी.. हरभर्याच्या झाडावर चढवू नये ही विनंती.. हरभर्याचे झाड फार मजबूत नसते असं ऐकून आहे.. आमच्या वजनाने वडाचे झाडही खाली येईलशी भीती वाटते तिथे हरभर्याची काय कथा.. ;)
16 Dec 2011 - 4:38 pm | पिलीयन रायडर
जातीच्या सुंदराला काहीही शोभतं तसय तुमचं..
"जातीच्या प्रतिभावंताला काहीही जमतच..."
आणि वर पुन्हा "कसच काय.. आम्ही आपलं ट ला ट जोडला... " असली वाक्य पण लिहायला लागलात... !! (टिपीकल "प्रतिभावंत" छाप वाक्य...!)
ओळख राहु द्या गवि...
16 Dec 2011 - 3:55 pm | sneharani
हा हा हा!
जबरा!
=))
16 Dec 2011 - 3:57 pm | भिकापाटील
हांग......आश्शीSSSSSSSSSSSS
=)) =)) =)) =))
भिकापाटील.
16 Dec 2011 - 4:00 pm | अन्या दातार
आपलं "गद्यामध्ये
एंटर पेरुनी" छाप प्रयत्न
हहपुवा अन अधिक-वजा
घाटावरती कोकण मेवा
हुच्चभूंची काय कथा
टेकडीवरुनी बघती गावा
16 Dec 2011 - 4:07 pm | मैत्र
गवि.. आता कुठलाही प्रांत राहिला नाही तुमचा ... काय तोडलंय !!
कॉलिंग शरदिनी तै... जोरदार स्पर्धा.. समजणारी / वजनात झकास बसणारी कविता... किंवा किंकविता :)
पु भा ल टा ! पुभालटा!!
16 Dec 2011 - 4:12 pm | विजुभाऊ
(.. आयडी बदलुन...)
छान वावा झकास अन फुटला
प्रतिसाद टंकण्या कोणी गेला
वाक्य नवे रच्याकने
शब्दकोष फाट्यावर मेला.
16 Dec 2011 - 4:26 pm | मन१
भ*न्नाट* कविता आहे.
16 Dec 2011 - 5:00 pm | सोत्रि
गवि,
खुप छान ! मझा आला !!
पुकशु आणी पुकप्र :)
- (विचारमैथुनात मग्न असणारा) सोकाजी
16 Dec 2011 - 5:14 pm | किसन शिंदे
हाहाहाहा....
चौफेर फटकेबाजी..!!:bigsmile:
पु.भा.प्र ;)
16 Dec 2011 - 5:14 pm | स्वातीविशु
गवि तुम्ही खरे कवी.......जिलब्या अन चपला
ठोठो हसता कोणी खपला
काळेबेरे काही नाही
शब्दकोष टेंपोत बसवला..वा.....मस्त...
16 Dec 2011 - 7:24 pm | जाई.
=)) =)) =))=))=))=))=))=))=))
गवि राँक्स _/\_
16 Dec 2011 - 7:40 pm | अविनाशकुलकर्णी
ह.ह.पु.वा...मस्त
16 Dec 2011 - 9:04 pm | रमताराम
(.. चाल सोडून...)
हे लै भारी.
एखादे कडवे 'ताल सोडून' असते तर अजून मझा आला असता.
17 Dec 2011 - 12:23 am | प्रभो
लई भारी!!
17 Dec 2011 - 6:05 am | रेवती
प्रतिभेला आलेला बहर आवडला.
17 Dec 2011 - 8:48 am | लीलाधर
रस्सा लई झ्याक जमलाय गवि :) ----^----
17 Dec 2011 - 10:10 am | आत्मशून्य
जबर्या......
17 Dec 2011 - 1:12 pm | सुहास झेले
हा हा हा ... जबरा !!!
17 Dec 2011 - 2:44 pm | विदेश
चाल चलन वृत्त बदलून आमची रोती सूरत पार बदलून टाकली !
छान .
17 Dec 2011 - 3:22 pm | दिपक
तू प्रेमि ..... आ .......हा ....
मै प्रेमि ....... आ ~~ह्हा...
फिर कया डॅडी क्या अम्मा ...............
ईक बस तू ही ..... प्यार के काबील ...
सारा जहा है निकाम्मा ........
17 Dec 2011 - 3:45 pm | पैसा
गवि, तुमची प्रतिभा घोड्यासारखी चौखूर उधळलीय! भीषण शुंदोर!!
17 Dec 2011 - 3:52 pm | सुहास..
ही ही ही ही ही ..नॉन्-स्टॉप हसलो !
17 Dec 2011 - 4:48 pm | ५० फक्त
मज्जा आली, फक्त आता यात मजा येण्यासारखं काय आहे हे कोणी विचारु नये म्हणजे मिळवलं.
17 Dec 2011 - 5:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
धन्य आहात!! :)
17 Dec 2011 - 7:53 pm | देविदस्खोत
लगे रहो...... वाहवा........... वाहवा....... लगे रहो !!!!!!!!
25 Oct 2013 - 3:46 pm | बॅटमॅन
केल्या गेले आहे.
25 Oct 2013 - 4:34 pm | वेल्लाभट
झक्क्क्कास! सुटलेले आहात तुम्ही!