मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रस्सा...

गवि · · जे न देखे रवी...
काव्यरस
(..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ..............................

वाचन 11927 प्रतिक्रिया 0