"ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही"? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो.
"काय झाले सक्काळी सक्काळी", आमचे अर्धांगं.
"अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.", मी.
"मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.", उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले.
त्या आवाजाच्या "उंची" वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी मांडवली करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले. ''अगं काही नाही गं, हे माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आता सोशल मिडीया आणि तत्स्म संस्थाळांसाठी 'कोड ऑफ कंडक्ट' आणणार आहे".
"अरे बापरे, का?", सौ.
"अगं ते आपले उच्चविद्याविभूषित वकिल आहेत ना कपिल सिब्बल, त्यांना म्हणे राग आला. फेसबूकवर, त्यांचे 'दैवत', ज्याच्याशिवाय ह्यांना कोणीही हिंग लावून विचारणार नाही आणि निवडून देणार नाही असे ह्यांना वाटते, त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट होतोय आणि त्यावर फेसबूकवाले काहीही करत नाहीत? मग त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत फेसबूकच्या अधिकार्यांना बोलावले. त्यांच्या वकिली भाषेत समजावून सांगीतले. पण फेसबूकवाले काही बधेनात. त्यांच्या (फेसबूकवाल्यांच्या) म्हणण्यानुसार त्यांच्या पॉलिसीप्रमाणे जर मजकूर आक्षेपार्ह नसेल तर फक्त विवादास्पद आहे म्हणून ते मजकूर सेंन्सॉर करणार नाहीत.
आता आला सिब्बलांना राग. मी एक मंत्री आणि माझे ऐकत नाही? बघतोच आता. लगेच ह्यांना 'आपल्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी' आठवली. म्हणे आमच्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी जपण्यासाठी आम्हाला काहीतरी करणे आवश्याक आहे. अरे, आमचे स्थानिक लोक म्हणजे कोण? तर ते म्हणजे, सत्ताधारी पक्षातील सत्तधीश बरं का.
आम जनता देशात रहाते, तीही स्थानिक आहे, तीला काही सेन्सेबिलिटी असते हे ह्या सत्ताधुंदाच्या गावीही नाहीयेय. संरक्षण ह्यांच्या हिताचेच हवेय. आम जनता काय जगतेय कशीही. जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवा, जनता काटकसर करून जगते आहेच.
बॉम्बस्फोटात लोकं मरताहेत, जे बॉम्बस्फोटं करताहेत त्यांच्या धर्माचे राजकारण होऊन त्यांना पोसतो आहोतच. त्या धारातीर्थी पडलेल्यांच्या नातेवाईकांना काय सेंसिबीलीटी असते? ते आम जनता आहेत. ते थोडीच स्थानिक सत्ताधीश आहेत? ते थोडीच बाहेरून येवून स्थानिक झालेले आहेत. त्यांना भावना नसातात. असल्या तरीही त्यांनी त्या मोकळ्या करायचा नाहीत.
पण तरीही तुम्ही तुमच्या भावनांना मोकळी वाट केलीत तर हे स्थानिक सत्ताधिश 'कोड ऑफ कंडक्ट' आणणार. ह्यांना काळजी फक्त ह्यांच्या हक्कांची, सोयीची. पण ज्या जनतेने त्यांना तीच्या सोयी पहाण्यासाठी निवडून दिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे आत्ममग्न हे. म्हणुन म्हणालो की ही लोकशाही आहे कि सरंजामशाही". असे म्हणत बायकोकडे बचितले तर ती मुलाचा डबा भरण्यात आत्ममग्न.
म्हणजे मी हे सगळे इतका वेळ भिंतीशीच बोलत होतो?
"अगं, आपले व्यक्तिस्वातंत्र्य डबाबंद व्हायची वेळ आलीय, भाजीपोळीचा डबा काय भरते आहेस." मी जरा चिडूनच बोललो.
"द्या मग चिरंजीवांना १०० ची नोट आजपासून रोज", सौ.
मी लगेच तडकलो, "अरे आमच्या वेळी १० रुपयाची नोट मिळायची मारामार आणि ह्यांना नुसते खायला १०० रुपये?"
मग मुलगा म्हणाला, "पिताश्री, ते १०० रुपयांच जाउदे. आत्ता एवढे चिडून कपिलअंकलना नाही नाही ते बोलत होतात. पण एका गोष्टीकडे तुम्ही त्यांच्यासारखेच आणि तसेच सोयिस्करीत्या दुर्लक्ष करता आहात. व्यक्तिस्वातंत्र्य काय फक्त मोठ्यांनाच असते? आम्हा मुलांना नसते? तुम्ही आमच्यासाठी 'कोड ऑफ कंडक्ट' लावायला मोकळे आणि जर हेच तुमच्या बाबतीत घडले तर लगेच गळे काढणार तुम्ही?"
च्यामारी***, मुलगा आता मोठा होउ लागलोय हे विसरलेच होतो मी. लगेच वाफाळत्या चहाच्या वाफेमागे चेहरा लपवून; माझ्या रागाची वाफ त्या चहाच्या वाफेत मिसळवून पेपर वाचण्यात मग मीही 'आत्ममग्न' झालो.
***गविजींना धन्यवाद, ह्या शब्दाची व्युत्पती समजावून सांगीतल्याबद्दल :)
प्रतिक्रिया
7 Dec 2011 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार
मगाशीच शेखर कपुर ह्यांचा एक जबरदस्त ट्विट वाचला.
@shekharkapur Shekhar Kapur
Can u hold the Loudspeaker Co responsible for the lies politicians tell at mass election rallies?
7 Dec 2011 - 2:18 pm | मोदक
:-)
7 Dec 2011 - 12:09 pm | चिंतामणी
:bigsmile:
7 Dec 2011 - 1:09 pm | सुहास झेले
हा हा हा .. लैच :) :)
7 Dec 2011 - 1:16 pm | गवि
मस्त आहे. "जाता जाता" (लेखकः चकोर) या नावाच्या मटामधल्या हलक्याफुलक्या सदराची आठवण झाली.. रोज कॉलम लिहिलात तर मजा येईल..
7 Dec 2011 - 1:38 pm | मोहनराव
:)
7 Dec 2011 - 2:15 pm | पैसा
आता हळूहळू मिपावर सेन्सॉरशिप लागू होणार आहे! कपिल अंकलच्या आदेशाची वाट बघतोय आम्ही! ;)
7 Dec 2011 - 3:06 pm | प्यारे१
घाबरलोय....
हे सदस्येचं मत की संपादिकेचं? ;)
7 Dec 2011 - 3:07 pm | पैसा
कपिल अंकलसमोर कोण संपादक आणि कोण सदस्य!
8 Dec 2011 - 5:19 am | चतुरंग
कपिल पाजी म्हणायचं! (हा पाजी मराठीतला ;) )
7 Dec 2011 - 2:15 pm | मन१
लेखही मस्त आणि पराने दिलेली ती ट्वीट सुद्धा...
7 Dec 2011 - 2:24 pm | ५० फक्त
कोड ऑफ कंडक्ट आहे का कोडं ऑफ कंड्क्ट कुणास ठाउक, पण जे काय आहे ते बरं आहे.
लेख मस्त झालाय, लिहा तुम्ही मिपावर एक कॉलम दररोज.
7 Dec 2011 - 2:24 pm | अर्धवट
मागे रामलीलावर गेलो होतो तिथला एक बोर्ड आठवला..
हू हा हु हा..
कपिल सिब्बल चूहा..
लेख मस्त पडलाय..
7 Dec 2011 - 2:49 pm | वसईचे किल्लेदार
हा हा हा खुपच छान लेख. आपली खुसखुशीत शैली खुपच आवडली.
7 Dec 2011 - 3:43 pm | अमृत
पण या राजकारण्यान्ना कोड ओफ कन्डक्ट कोण लावणार? हि मन्डळी तर कायम एक्मेकान्वर चिखलफेक करीत असतात... काही मोठ्या पक्शातील नेते तर याच कामगीरीसाठि असतात की काय असा सन्शय येतो.... म्हणजे नेते करतील ते राजकारण आणि जनता करेल ती बदनामी काय?
बाकी आपले लिखाण आवडले...
अमृत
7 Dec 2011 - 5:43 pm | जाई.
मस्त लेखन
10 Dec 2011 - 7:55 pm | आनंदी गोपाळ
आत्ममग्न होणे आवडले
(नेटावर केलेली पापे कुठे लपवू असा विचार करण्यात आनंदी) गोपाळ