यु. जी. कृष्णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे.
हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.
थोडक्यात जगाला जाणून घेण्यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्यात शब्दांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा शब्दांच्या माध्यमातूनच झाला आहे. पण युजींचे शब्द हे फक्त ते ज्या अवस्थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत. पण युजी हे काही शब्दांचे फटकारे मारुन रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला शब्दांचा वापर हा यांत्रिक आहे, तर रजनीशांनी केलेला शब्दांचा वापर हा नितांत कलात्मक आहे - त्यातून सृजनशीलता डोकावते आणि ती आकर्षित करते.
एरव्ही शब्द म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्तारलं आहे आणि ज्या अफाट विस्ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्या किंवा ती प्रतिमा उभी राहण्यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे!
त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्यासाठी आपण जोडत असलेली शब्दरुपी ठिगळे आणि चिंध्या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या शब्दांच्या लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही शब्दरुपी ठिगळे पाहिल्या शिवाय आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही.
हा शब्दप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही शब्दप्रतिमा लोकांकडे फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्षणीक अर्थाने शब्दावडंबर माजवात जगत राहणारे लोक आहेत, आपण शब्दजीव आहोत. शब्दप्रतिमांच्या ठिगळांशिवाय आपलं चालु शकत नाही. शब्दप्रतिमांची ही ठिगळे विशिष्ट पद्धतीने जोडणे ही झाली भाषा. पण मुळात शब्द म्हणजे काय त्याच्या खोलात शिरण्याचं कारण नाही. कारण शब्द हे फक्त चिन्ह-प्रतिमा आहेत. त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच शब्दांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, शब्द पुसला जातो. शब्दाचा गळा दाबा, मनात कसलीही प्रतिमा उमटू शकत नाही. प्रात्यक्षिकासाठी कुठलाही शब्द घ्या. उदा. मुलगा. मुलगा या शब्दातून जी प्रतिमा मनात येते ती फाडून टाकली, ती नष्ट करुन पाहिली तर 'मुलगा' हा एक निरर्थक, विनोदी शब्द शिल्लक रहातो! प्रत्येक शब्द असा मनात नष्ट करुन नलीफाइड, व्हॉईड केला तर हे लक्षात येऊ शकेल.
शब्दांच्या मागील प्रतिमा छाटून टाकून आपण तेवढ्यापुरतं शब्दावेगळे, शब्दमुक्त होऊ शकतो आणि याच शब्दातून निपजणार्या विचारांच्या वावटळींतूनही वेगळे होऊ शकतो, पण हे फक्त तेवढ्यापुरतंच होता येतं. विचारांचा ब्रम्हराक्षस आपण त्याच्या शब्दरुपी अपत्यांची कत्तल करुन मारुन टाकू शकत नाही.
शब्द ही आपली शेवटची मर्यादा आहे. शब्द हीच आपली अंतिम सीमारेखा आहे, आपल्यावर ओढलेलं कवच आहे. शब्दांना जर ओेलांडून पुढे जाता आलं तर, शब्दावेगळं रहाता आलं तर कदाचित त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणत असावेत. कदाचित त्यामुळेच आध्यात्मात मौन राहून पाहिलं जातं असावं.
प्रतिक्रिया
14 Nov 2011 - 9:58 am | मराठी_माणूस
एक वेगळिच संकल्पना समजली. (अर्थात शब्दांच्याच माध्यमतुन)
14 Nov 2011 - 10:25 am | नगरीनिरंजन
आपल्या मूळ अस्तित्वापासून एक पर्याय निवडून आपण इतके दूर आलो आहोत की दुसरा पर्याय आहे असा विचार पचवणेही खूप जड जाते.
स्वतःच तयार केलेल्या एका आभासी दुनियेत आपण राहतो आणि ही आभासी दुनिया निर्माण व्हायची पहिली पायरी म्हणजे भाषा होय.
ज्याप्रमाणे नयनरम्य ठिकाणी गेलेले टुरिस्ट समोरचे दृष्य खरोखर पाहण्याऐवजी कॅमेर्यात बंदिस्त करायला धडपडतात त्याप्रमाणेच आपणही थेट भिडणार्या अनुभवाला सामोरे जाण्याऐवजी तो शब्दबद्ध करायला धडपडतो. अगदी मनातल्या मनातही आपण आपल्या जाणीवा शब्दबद्ध करण्यात अर्धी शक्ती घालवून त्या बोथट करतो.
ज्यांना आपण अप्रगत म्हणतो त्या आदिमानवाला कदाचित आपल्यापेक्षा जास्त जाणीवा असतील असे वाटते.
असो. शब्दाशिवाय राहणे हे सध्यातरी अशक्यप्राय वाटते आहे.
लेख आवडला. थोडक्यात आटोपल्यासारखा वाटला.
14 Nov 2011 - 10:25 am | प्रभाकर पेठकर
प्राण्यांमध्येही संवाद चालतो. मनुष्य आणि पाळीव प्राण्यातही नुसत्या नजरेच्या साहाय्याने संवाद चालतो. नुसते पाहण्यानेही पाळीव कुत्र्याला समजते मालकाला काय अभिप्रेत आहे. नुसत्या नजरेतूनही राग, प्रेम वगैरे भावना पाळीव प्राण्यांना समजतात.
'शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले' अशीही कधी कधी आपली अवस्था होते. त्यासाठी आपल्या मनातील शब्दांचा आधार असतो हे मान्य केले तरी समोरुन कुठलेही शब्द न येता मनात 'अर्थप्रतिमा' तयार होतेच की, जसे पत्नी रागात असताना चाललेल्या मौनातून तर पर्वताएवढ्या अर्थप्रतिमा मनात तयार होतात.
हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.
मला वाटतं ह्या अध्यात्मिक पातळीवर माझा मुलगा पोहोचला आहे. माझ्या कुठल्याही शब्दांनी/वाक्यांनी त्याच्या मनावर कुठलीही प्रतिमा निर्माण होत नाही.
विनोद वगळता, सदरहू लेखातून मांडलेला विचार मनाला पटला नाही. क्षमस्व.
14 Nov 2011 - 10:31 am | ऋषिकेश
शब्दावेगळे रहाण्याचे सुचविणारा लेख मात्र शब्दबंबाळ वाटला (हे म्हणजे मौनावरील भाषणासारखे वाटले!) ;)
14 Nov 2011 - 10:58 am | मन१
पण धागाकर्त्याशी नाही तर ऋषिकेश, पेठकर आणि ननि ह्यांच्याशी, तेही थोडेफार.
मुळातच लेख जssssरासा डोक्यावरून गेलाय.
जिथवर संत साहित्य वगैरे ऐकून त्यानुसार मोक्ष म्हणजे निव्वळ शब्द मुक्ती नव्हे. काहितरी वेगलच आहे म्हणतात.
काय आहे तेही ठावूक नाही.
@शब्द ह अनिवार्य मानवाविष्कार आहे. प्रानी हे प्रामुख्याने "भावना" पोचवतात एकमेकांना;पण अनुभव नाही सविस्तर वर्णन करु शकत. एकाच्या अनुभवातून दुसरा तिथे नाही शिकू शकत.
एखादी घटना, गणन वर्णन करण्यासाठी शब्द हवेतच.(निदान वृत्तपत्र इंडस्ट्रीतल्या उगवत्या तार्याने तरी शब्दांचे म्हत्व जाणून असावे ;-) शब्दच नसते तर पेपर कसा चाल्ला असता?)
वेळाभावी इतकेच.
14 Nov 2011 - 11:09 am | पैसा
शब्दांबद्दल एक वेगळा विचार यशवंतने मांडला आहे. मूकबधिर लोकांच्या काही जाणिवा आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा तीव्र असतात हे खूपदा अनुभवाला येतं. युजींसाठी हे शब्दातीत होणं खरं असेल, पण शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी आधी शब्दांची पूर्ण अनुभूति होणं गरजेचं आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांना तेच कठीण आहे.
शब्द हाच माणसाला प्राण्यांपासून वेगळं करतो. आणि शब्दातीत झालेल्या व्यक्तीबद्दल काही लिहायचं तर लेखकाला शब्दांचाच आधार घ्यावा लागतो आणि समजून घेण्यासाठी आमच्यासारख्या वाचकांना शब्दांनाच त्यांच्या वेगवेगळ्या अर्थासह शरण जावं लागतं. शब्दाला त्यामागच्या प्रतिमेपासून वेगळं करणं ही फारच कठीण गोष्ट आहे. फारच कठीण!
14 Nov 2011 - 11:21 am | मन१
हो. खरय.
पण म्हणून शब्दसामर्थ्य गमावण्याची मनिषा बाळगणे कसे इष्ट होइल?
मुळात शब्द आणि शांतता, शब्द आणि अनुभव हे विरुद्धार्थी मानणेच ठिक वाटत नाही.
शब्द हे अनुभवास पूरक(complementry) असतात.
14 Nov 2011 - 11:31 am | पैसा
बाकी शब्द आहेत म्हणून शांततेचा अर्थ कळतो, पण एखाद्याला शब्दांची अडचण वाटूही शकेल. तुला आणि मला वाटणार नाही रे मनोबा!
14 Nov 2011 - 11:39 am | नगरीनिरंजन
शब्द आणि अनुभव विरुद्धार्थी आहेत असे नाही (लेखातही असे थेट म्हटलेले नाही). अनुभव आणि शब्द यांचा काहीएक संबंध नाही असे मला वाटते.
अनुभव शब्दातीत असतात आणि ते इतरांना सांगण्यासाठी शब्दांची गरज पडते. परंतु हळूहळू शब्दालाच इतकं महत्त्व येत गेलंय की अनुभव पुरेसा भिडेपर्यंतच तो शब्दबद्ध करायची घाई होते.
इतरांशी संवाद साधायला शब्दांची गरज आहे, पण स्वतःशी संवाद साधायला शब्दांची काय गरज?
14 Nov 2011 - 11:47 am | मन१
...की अनुभव पुरेसा भिडेपर्यंतच तो शब्दबद्ध करायची घाई होते.
ह्याच्याशी १००% सहमत. लेखात हेच म्हटले असेल तर तेही मान्य.
इतरांशी संवाद साधायला शब्दांची गरज आहे, पण स्वतःशी संवाद साधायला शब्दांची काय गरज?
स्वतःशी संवाद साधायला श्ब्दांची गरज कधीकधी पडते ती आपल्या स्मृती पक्क्या करायला.(म्हणूनच गतकाळातील डायरी वाचणे हा एक वेगळाच अनुभव असतो. शब्द म्हणजे अनुभव नाही. पण चित्र्/फोटो,पिक्चर आहेत.)
आपण सगळ्यांनी बालपण अनुभवले तरी कालमानाने स्मृती धूसर होतात. नुकतेच मी बालवाडीचे, चौथीचे, सातवीचे असे सर्व फोटो पाहिले, स्मृती पुन्हा पक्क्या झाल्या. माझाच चेहरा माझ्या अजून नीट लक्षात राहिला. आपल्याला वाटते की आपल्याला सर्व आठवते, पण ते तसे नसते; जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष फोटोचा अनुभव घेता तेव्हा हे जाण्वते .
जसे फोटो एक प्रकाशचित्र उभे करतो त्याच धर्तीवर शब्द हे शब्दचित्र उभे करतात.
समजा:-
मी काल पाहिलेला एक खांब खूप मोथा आहे हे कुणाला सांगायचे असेल, किंवा "किती" मोठा आहे हे सांगायचे असेल तर मला असेच सांगावे लागेल की "काल एक खाम्ब पाहिला, दोन्-तीन पुरुष उंचीचा तरी होता"
इथे शब्दविहीन विचार कसे सांगता येतील?
14 Nov 2011 - 12:06 pm | नगरीनिरंजन
माझ्यासाठी तरी माझ्या आठवणी मूकपट असतात. उदा. आजीची आठवण येते तेव्हा मला तिचा मऊ, सुरकुतलेला हात गालावरून फिरल्यासारखं वाटतं तेव्हा कोणताही शब्द माझ्या डोक्यात येत नाही किंवा आजी, हात, मऊ असे शब्द उमटत नाहीत. ते मला जाणवतं आणि मग त्याला मी शब्दरूप देतो (जसे आत्ता देत आहे). आधी स्पर्श जाणवतो आणि मग तो कसा आहे हे वर्णन करायला मी शब्द वापरतो. हा वर्णनाचा भाग अनुभवानंतरचा आहे. त्या भागावर जोर देऊन अनुभव (याठिकाणी स्मृती) कसा पक्का होणार?
एक प्रसंग सांगतो,
एका रात्री माझा मावसभाऊ जेवण झाल्यावर घराबाहेर निघाला आणि उंबर्यापाशी त्याला काहीतरी वळवळ जाणवली. त्याने वाकून पाहिले तर एक फुरसे त्याच्या पायाला अगदी तोंड लावून बसले होते. तो घाबरून आत आला आणि सांगू लागला की उंबर्यात साप आहे पण त्याला ते सांगता येईना. म्हणजे दातखीळ वगैरे बसली नव्हती पण त्याला शब्दच आठवत नव्हते. साप आहे हे कसं सांगायचं हेच त्याला समजत नव्हतं. इतका त्या अनुभवाचा पगडा जबरदस्त होता की वर्णनाच्या पायरीपर्यंत जायला त्याला खूप वेळ लागला. त्या प्रसंगाची त्याची आठवण म्हणजे ती भीतीची भावना; साप हा शब्द नाही. तो त्यानंतर कितीतरी वेळा साप म्हणाला असेल पण त्या शब्दाने त्याला त्या प्रसंगाची आठवण होईलच असे नाही.
14 Nov 2011 - 11:28 am | प्रास
लेख पुन्हा पुन्हा वाचला. काहीतरी विशेष विचार देण्याचा प्रयत्न जाणवला पण बहुतेक कुठेतरी 'शब्दात' कमी पडलात असं काहीसं मला वाटतंय.
म्हण्टलं तर तुम्ही स्वतःदेखिल शब्दप्रभुच पण तुम्हीच अशा विषयावर लिखाण करणं विचारप्रवृत्त करत होतं आणि म्हणूनच लेख अनेकदा वाचला गेलाय.
तुम्ही लिहिलेली काही वाक्ये -
ही बहुतेक युजींचे विचार असावेत. शब्दांवर प्रेम करणारा तुमच्यासारखा माणूस असं लिहितो ना. तरीही विचार करता वरील 'शब्दां'तूनच शब्दांचं तोकडं रूप स्पष्ट होतंय. काही अंशी हे सुद्धा त्या 'शब्दां'चं यशच नाही का? आणि असं बघा की या शब्द-भाषेच्या मर्यादाच त्यांच्या उत्क्रान्तिकामी उपयुक्त होतात. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही पण शब्द आणि भाषा तरीही या तोकडेपणामुळेच परिपूर्णतेकडे जाण्याचा यत्न करू शकतात. म्हणूनच व्यक्तिशः मला उपरोल्लेखित विचार पटण्यासारखे वाटत नाहीत.
बाकी,
यावरून युजी एकूणच प्रचंड भ्रमात होते आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला अशी खात्री वाटू लागली आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माझा नाईलाज आहे.
:-)
14 Nov 2011 - 1:20 pm | गवि
उत्तम विषय ..कोणाला पटेल न पटेल पण यशवंताने एक वेगळा विचार मांडला आहे..
आणि त्यावर उत्तम चर्चा होत आहे याचाही आनंद झाला...
14 Nov 2011 - 2:10 pm | विजुभाऊ
शब्द हे अक्षरांचे बनलेले असतात. स्वतन्त्र अक्षराला अर्थ नाही. जर शब्दाला निव्वळ अक्शर मानले तर त्याची अर्थाशी लिंक रहात नाही.
रजनीशांनी भावतीत ध्यानासाठी असेच काहीसे सांगितले होते.
14 Nov 2011 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार
आमचा यक्कु हुच्चभ्रु झाला म्हणायचे.
14 Nov 2011 - 2:53 pm | मन१
हुच्चभ्रु "झाला" ह्यास आक्षेप.
14 Nov 2011 - 3:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शब्दावेगळं रहाता आलं .....
कसं शक्य आहे राव. शब्दामुळे जी जाणीव अंतस्तरावर जिथे कुठे होत असेल असं ते मर्मस्थान नाहीसं करणं काय सोपं काम आहे काय. अशी अवस्था म्हणजे वेडं होणं असे मला वाटते.
आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।।
शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।।
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।
असा विचार करणारा तुकोबा साला आपल्याला आवडतो. बाकी, लेखामागील कल्पना मला झकास वाटली.
-दिलीप बिरुटे
14 Nov 2011 - 5:34 pm | यकु
मला आज खरोखर एक मिपाकर म्हणून अभिमान वाटतो आहे.
इथं आलेल्या प्रतिसादांवरून मिसळपाव वर फक्त एकमेकांच्या नाकात काड्या घालण्याचे धंदे सुरु असतात हा भ्रम धुळीस मिळाला आहे अशी आशा करतो. शेजारच्या नव्या संस्थळावर आजच आलेल्या अनुभवावरुन हेही स्पष्ट झाले की तथाकथित हुच्चभ्रुची कातडी ही फार पातळ असते. थोडासा हटकून हुच्चभ्रुपणा करणारा हा लेख तिथे काय दिसला, त्या तथाकथित अभ्यासू सदस्याला त्याच्या घोटीव हुच्चभ्रूपणावर अतिक्रमण झाल्यासारखं वाटलं आणि हा लेख 'अनाठायी' व 'मिथ्या' असल्याचा निर्णय देऊन ते हुच्चभ्रु म्हणून नावाजलेले महाशय मोकळे झाले. (मग माझा त्यांच्याबद्दलचा अनुभव होता तो जसाच्या तसा तिथे मांडावा लागला.)
इथे मात्र मी ऑनलाइन नसतानाही आपण सर्वांनी कसलाही आव न आणता चर्चा केलीत त्याबद्दल शतश: आभार.
हुच्चभ्रुपणा फक्त 'स्कीन डीप' असतो हे मला माझ्या पुरतं कळालं. तो ज्यांना हवाय त्यांना लखलाभ असो.
आणखी एक गोष्ट लक्षात आली की हुच्चभ्रुला त्याचा भोचकपणा सुरु ठेवण्यासाठी हुच्चभ्रोत्तेजक वातावरण लागतं, किमान हुच्चभ्रु म्हणून मिरवणार्या दोस्तांची संगत लागते. असो.
आता धागाकर्ता म्हणून आलेल्या प्रतिक्रियांची पोच देतो.
नगरीनिरंजन यांना बरोबर नस सापडली आहे. त्यांचा छोटासच लिहीलंय पण त्याचं मर्म शब्दात मांडणारा प्रतिसाद मोलाचा आहे.
हे अगदी खरं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा दुर्गुण नाही, तर सगळ्यांचा स्वभाव आहे. मी युजींचा संदर्भ घेऊन लिहायला सुरुवात केलीय कारण, ते त्या अनुभवापर्यंत गेले आहेत आणि मला कुठेतरी, काहीतरी धुसर जाणवतं आहे.
नगरीनिरंजन म्हणतात की,
मी मला जे जाणवतंय ते शब्दबद्ध करायला धडपडलो. का? मला त्याचं कारण माहित नाही, पण असं वाटतं की थेट अनुभव ही तेव्हाचा 'जाणवतो' जेव्हा आपण तो शब्दांच्या अनेक फुटक्या तुटक्या तुकड्यांमध्ये सांधतो. म्हणून असेल कदाचित.. पण अजूनही मला पक्क समजलेलं नाहीय.
नगरीनिरंजन पुढे म्हणतात की,
हे ही खरंय. इथंही पुन्हा वरीलप्रमाणेच कारण संभवते. जाणीवा बोथट होतात, त्या मांडताना त्रासही होतो हे अनुभवतो आहे.
ते खरंच, पण माझ्यासमोर धूसर चित्र उभं राहतंय, ते चितारण्याचा प्रयत्न केला इतकंच.
पेठकर काका
हरकत नाही. मी पूर्णपणे सगळे मंतव्य स्पष्ट करायला कमी पडलो आहे हे मला जाणवतं आहे.
ऋषिकेश
Wink
मला सध्यातरी शब्दांशिवाय वेगळा व्यक्त होण्याचा मार्ग सापडलेला नाहीय. तो सापडला की निश्चितच माझे शब्द तुम्हाला दिसणार नाहीत. आणि हो, शब्दावेगळे रहा असं मी सुचवलेलं नाहीय, शब्दावेगळे काही असेल ते तुटपुंज्या प्रयत्नातून समोर मांडलं आहे.
पैसा
इथं खरी गोम आहे. शब्दाला त्यामागच्या प्रतिमेपासून वेगळं करणं म्हणजे स्वत:ला या पसार्यातून बाहेर काढणं. ते कठीणच नाही, काही वेळा शब्दश: डोकं भ्रष्ट करणारं आहे (सध्या त्याच वेदनेतून जातोय).
मन
इथे गैरसमज झालाय. शब्दसामर्थ्य गमावून बसायचं असं नाही. डोक्यावर झालेलं ओझं थोडं बाजूला टाकून रहाता येतं का तो प्रयत्न करुन बघायचा.
प्रास
भाषा परिपूर्णतेकडे जात नाहीय. शब्द, भाषा मेलेलीच आहे. तीच मढी शब्दांच्या प्रतिमांच्या रुपात आपल्या छातीवर बसली आहेत. आपला उरलासुरला जीवंतपणाही हे मृत शब्द व भाषा खाऊन टाकत आहे. पण शब्दच नसतील तर काय, त्यामुळं मी मांडलेला विचार पटण्यासारखा नसेल.. पण शब्दातीत असं काही असेल, ते मी मांडू शकत नाहीय हा माझा तोकडेपणा.
असं म्हटल्याने काहीही फरक पडत नाही. किमान हे मत दिलखुलास आहे हे महत्त्वाचं आहे. हुच्चभ्रुपणाची झूल पांघरुन शब्दांचे इमले बांधत इथे घोटीव व उसन्या तर्काचा आधार घेतलेला नाहीय. अशा मतामुळं भावना दुखावत नसतात, शक्यच नाही.
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
पुढं कधी वेडाफिडा झालो तर गाववाले म्हणून मला सांभाळून घ्या. :)
14 Nov 2011 - 7:36 pm | प्रास
असं मत बरेचदा बर्याच जणांकडून व्यक्त होताना बघायला मिळतं. पण या बद्दल किमानपक्षी माझ्या मनात तरी शंका आहे. भाषा मृत केव्हा मानली जाते? मला वाटतं, जेव्हा त्या भाषेचा, त्यातल्या शब्दांचा उपयोग संवादासाठी होणं थांबतं तेव्हा ती मृत झाल्याचं समजतात. संवादासाठीच्या मुद्याचा विचार करता, संवाद किमान दोन व्यक्तिविशेषांमधला गृहित धरून त्याबद्दल म्हणता येतं की एकाच्या मनातला अभिप्रेत असलेला अर्थ दुसर्याला अजिबात न कळणं हे संवादाच्या अभावाचं लक्षण मानावं लागतं. असं होताना आजच्या भाषांसंदर्भात दिसतंय का? तसं दिसत असेल तर जरूर म्हणावं की भाषा मृत झालेली आहे अन्यथा कमीत कमी तिच्यात धुगधुगी तरी आहे हे मान्य व्हावं. नाही का?
आता शब्द आणि त्यांचे अर्थ यांचंही या संदर्भात विवेचन आवश्यक ठरेल. खूपदा एखाद्या शब्दाच्या वा शब्दांच्या उच्चारणानंतर त्या उच्चारणाने मनःपटलावर काही प्रतिमांचे उमटणे होते आणि त्यातून अर्थनिष्पत्ती मानली जाते. बहुतांशी ही अभिव्यक्ती पूर्वानुभवांवर आधारीत असल्याचं समजतं. पण प्रत्येक अर्थनिष्पत्तीमध्ये हीच प्रक्रिया होईल असं काही आपल्याला म्हणता येत नाही. हे वि. का. राजवाड्यांनी त्यांच्या लेखामध्ये चांगलं स्पष्ट केलं आहे. (सं. राजवाडे लेखसंग्रह) काव काव करणारा तो कावळा हे पूर्वानुभवातून समजणारं प्रतिमायुक्त अर्थनिष्पत्तीचं उदाहरण मानलं जाईल पण सूई शब्दातून एका बाजूला टोक आणि दुसर्या बाजूला छिद्रं असणारी लोखंडाची छोटी वस्तु अशा प्रकारची प्रतिमा उत्पन्न होणं कठीण आहे. तेव्हा सांगण्याचा मुद्दा हा की शब्द आणि अर्थ यांच्यासंदर्भात सतत नवी जडणघडण आणि निर्मिती होत असते. हिलाच काही अंशी भाषेची उत्क्रान्ति का मानू नये? हेच मी भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण मानतो आणि माझ्याही. :-)
युजींच्या रुपांतरणोत्तर असो किंवा संतांनी सांगितलेल्या अध्यात्मिक अनुभवांनंतर असो, जे काही फरक व्यक्तीच्या शरीर आणि मनासंदर्भात होतात ते त्यांचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे असंच सर्वमान्य मत आहे. एकदा हे तसंच आहे आणि पराकोटीचं वैयक्तिक आहे हे मान्य केलं की त्यासाठी तोकडेपणावरून शब्दांना आणि पर्यायाने भाषेला लांछन लावण्याची काहीच गरज नाही असंच मला म्हणायचं आहे.
अर्थात या लेखात तुम्ही मांडलेला विचार वेगळा आहेच हे आधीही जाणवलं होतंच.
युजींबद्दलंचं माझं वैयक्तिक मत खुल्या दिलाने घेतल्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर दुणावला आहे. :-)
14 Nov 2011 - 9:41 pm | यकु
>>>>>असं मत बरेचदा बर्याच जणांकडून व्यक्त होताना बघायला मिळतं. पण या बद्दल किमानपक्षी माझ्या मनात तरी शंका आहे. भाषा मृत केव्हा मानली जाते? मला वाटतं, जेव्हा त्या भाषेचा, त्यातल्या शब्दांचा उपयोग संवादासाठी होणं थांबतं तेव्हा ती मृत झाल्याचं समजतात. संवादासाठीच्या मुद्याचा विचार करता, संवाद किमान दोन व्यक्तिविशेषांमधला गृहित धरून त्याबद्दल म्हणता येतं की एकाच्या मनातला अभिप्रेत असलेला अर्थ दुसर्याला अजिबात न कळणं हे संवादाच्या अभावाचं लक्षण मानावं लागतं. असं होताना आजच्या भाषांसंदर्भात दिसतंय का? तसं दिसत असेल तर जरूर म्हणावं की भाषा मृत झालेली आहे अन्यथा कमीत कमी तिच्यात धुगधुगी तरी आहे हे मान्य व्हावं. नाही का?<<<<<<
नाही. इथे भाषा/ शब्द वेगळ्या अर्थानं मृत आहे/त. तुम्ही जे सांगितलंय ते भाषाशास्त्रीयदृष्ट्या, भाषेच्या वापराविषयी, साहित्य व्यवहाराविषयी, संभाष़ण पूर्ततेविषयी लागू होतं.
इथे शब्द/ भाषा मृत आहे म्हणजे शब्दांचा चिन्ह म्हणून वापर तेवढ्याच जोरदार असेल.. पण शब्द म्हणजे एक तुकडा आहे. एक प्रतिमेचा तुकडा. हे तुकडे काही जीवंत नाहीत. त्यात कसलाही जीव नाही. ते तुमच्या-आमच्या वापरात येतात तेव्हा जीवंत होतात. त्यावर तुमच्या-आमच्या अभिनिवेशाचं आरोपण होतं तेव्हा त्यांच्यात जीव येतो. या दृष्टीने भाषा जीवंत आहे. या तुकड्यांचं तुमच्या मनात प्रतिबिंब पडून हे तुकडे पक्षी भाषा जीवंत असल्याचा अनुभव येत असेल.. जीवंत तुम्ही/ आम्ही आहोत.. भाषा नाही.. या दृष्टीकोनातून ती जीवंत असू शकत नाही.
Smile
भाषेची उत्कान्ती जरुर माना - पण ती फक्त भाषिक दृष्टीकोनातून. तुम्ही वेगळे, तुमची भाषा वेगळी.
तुम्ही आणि तुमची भाषा एकच भासत असले तरी तसे खरंच तुम्ही आहात काय? तुमच्या जीवंतपणाशी भाषेच्या जीवंतपणाचा काही संबंध नाही. आज तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा बोलत असाल ते फक्त ती फक्त चिन्हे आहेत.. हां, शब्दात, भाषेत तुमचं हृदय, अभिनिवेश गुंतला असेल म्हणून भाषा तुम्हाला तुमच्या इतकीच जीवंत वाटत असेल. पण ती खरेच तशी आहे का? नक्कीच नाही.
नाही. भाषेला किंवा शब्दांना लांच्छन लावलं जात नसून शब्दातून किंवा भाषेतून आमच्यावर पडणार्या बंधनांवर, बेड्यांवर लांच्छन लावलं जात आहे. त्या बेड्या तुटाव्यात, तरीही भाषा, शब्द जीवंत राहू शकतात हा अनुभव आहे.
:)
14 Nov 2011 - 9:47 pm | प्रभाकर पेठकर
एकाच्या मनातला अभिप्रेत असलेला अर्थ दुसर्याला अजिबात न कळणं हे संवादाच्या अभावाचं लक्षण मानावं लागतं.
मला आलेली एक बोलकी इमेल....(कोणी लिहीली आहे पत्ता नाही)
*******************************************************************************************************
"मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत.
पण चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसा असणार?
थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती.
एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले. तीन चार शब्दांचे अर्थ सांगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे.
मी तिला म्हटलं, 'अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू? काहीही असू शकेल'.
एका शब्दाचा/व्हर्बचा अर्थ काहीही?
तिला कळेना.
'ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज'. ती म्हणाली.
तिला वाटलं असतील दोन तीन अर्थ!
पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता.
मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू.'हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस '.
'ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास '.
लगेच वहीत क्लास लावणे =जॉइंन असं लिहिलं.'क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस?
''ओ येस '.
'आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू/टिकली लावतो.
''येस, आय अंडस्टँड '.- टु अप्लाय. तिनं लिहिलं.
'पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंडही लावतो. तिथे तो अर्थ नाही होत '.
'ओके; वी पुट ऑन दॅट''.
'आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं.
आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्! '
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, 'हां, तुम्ही पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, 'पुस्तकाला पाय लावू नको. सो—टु टच्.''मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '.
'हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '.
मीन्स लाव,बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर!'
'बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.
म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ/रेफरन्स शिवाय नुसता लाव कसा समजणार?
आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत. '
'नो,नो. प्लीज टेल मी मोअर '. म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
'बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही, रेडिओ इ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो.पण देवासमोर नीरांजन,उदबत्ती,समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो.
फटाके लावतो, आग लावतो, गॅस लावतो = पेटवतो.'
ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली.
'बघ, मी कुकर लावलाय. दोघी हसलो.
आधीचा कुठला अर्थ आहे का यात? खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द — 'लावलाय.'
आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच! '
'मी रोज सकाळी अलार्म लावते'
******************************************************************************************************************
शब्द एक (एकाच कुटुंबातील) पण अर्थ अनेक.
त्यामुळे शब्दाविना कसे जगावे????
14 Nov 2011 - 9:28 pm | Nile
धाग्यावर आलेले प्रतिसाद पचत नसतील तर लिहित जाऊ नका. मुळात धाग्यावर धाग्याच्या विषयासंबंधित प्रतिक्रीया कोणी दिली असेल तर त्यावर वैयक्तिक टिप्पणी करणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. तुमची स्तुती करायची असो नाहीतर शिव्या द्यायच्या असो, त्यासाठी तुम्ही ऑनलाईन आहात का नाहित हे पहायचे कारण इथे फोरमवर तरी नसते.
(तुमचा आक्रस्ताळेपणा पुर्वीच्या यु.जी. वर लिहलेल्या लेखांनंतर आलेल्या प्रतिसादांवरही पाहिलेला आहे. त्यामुळे लेखावर प्रतिक्रीया देत नाही. दिली तर तुमचे पुर्वग्रहदुषित प्रतिसाद काय येतील याची कल्पना आलीच आहे.)
टीपः कोणा गाढवाने 'हे संस्थळ ते संस्थळ' अशा प्रकारे मला प्रश्न विचारल्यास उत्तर दिले जाणार नाही.
14 Nov 2011 - 10:05 pm | यकु
सल्याबद्दल मंडळ आभारी आहे. कुठे लिहायचे आणि लिहायचे नाही याबद्दल आमचे मस्तक शाबूत असल्याने आम्ही ते विचारात घेऊच. पण तरीही आपण जो बहुमोल सल्ला दिला आहे तो जे तुमच्या वैयक्तिक प्रतिमांनी प्रभावीत होत असतील त्यांना द्या. सबब आपले शब्द इथे व्यर्थ गेले आहेत. शब्दांचा वापर नीट शिकून या. आपले कधीही, कुठेही स्वागत आहे.
हो का? हे आपण लिहीलेत हे बरे केलेत. सध्या आपण ज्या व्यक्तिच्या शब्दबंबाळ अतैव त्याज्य प्रतिमेवर भुलून इथे हे ज्ञानकण उधळता आहात त्या व्यक्तीने काय म्हटले आहे तुम्हाला ऐकवतो -
काही कळले का? तुम्ही आम्हाला व्यक्तिपूजेतून मुक्त होण्याचा सल्ला दिला आहे. पण स्वतः हे काय चालवले आहे? जो प्रगल्भ म्हणून अनेक संस्थळावर मिरवतो, त्याने तोंड फोडून लोकांना अफू खाण्याचे, हाराकिरी करण्याचे सल्ले दिलेले चालतात. त्याच्या प्रतिमेचा तुमच्यावर प्रभावही पडतो. पडो. पण पुन्हा इथे आपले शब्द बापुडे केवळ वारा सोडू नका.. त्याकडे आम्ही लक्ष देणार नाही.
आमची ती व्यक्तिपुजा आणि तुमचं ते इन्स्पिरेशन किंवा काय जे असेल ते?
बरं. मग? इथे आपला कुठे संबंध येतो?
मग आता इथे कशाला येणे केलेत? एकदा शिकलेला धडा पुन्हा पुन्हा विसरता आणि असे दुसर्यावर आरोप करीत सुटता.
असे कुणीही आपणास विचारणार नाही ही समस्त सदस्यांच्या वतीने मी तुम्हाला हमी देतो. तुम्ही नजर ठेऊन पहा. मी त्यांच्याशी बोलणारही नाही, तरी ते असले मूर्खपणाचे तुमच्याच मनात निर्माण झालेले प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीत. स्वतःच कल्पना करुन आपण त्या प्रश्नांनी उगीच बेजार होत आहात. तस्मात आराम घ्यावा.
व्यक्तिपुजेतून मुक्त होण्याचे सल्ले देणार्यांनी जरा स्वतः च्या कृत्यांवर नजर टाकावी. बाकी आपण एक जालीय मित्र म्हणून आम्हाला कधीही हवेच आहात. अर्थात हे विधान केल्यानं आम्ही तुम्हाला आमचा अपमान करण्याची संधी देत आहोत.. पण मैत्री हवी तर एवढं चालायचंच.. नाही का?
14 Nov 2011 - 10:42 pm | Nile
कुणाच्याही स्वागताची आम्हाला गरज नाही आणि अपेक्षाही नाही. आम्हाला जिथे जायचं तिथे आम्ही जातो.
हा पुर्वग्रहदूषित मुर्खपणा पुरे. हा निष्कर्ष कसा काढलात? मी वरती लिहलेले मत कोणाही बाबत खरे आहे. हेच मत मी पुर्वीही अनेकदा व्यक्त केले आहे. (पहा: http://www.misalpav.com/node/18205#comment-316333 ) कोणाची बाजू घेणं वगैरे फालतू आरोप करून तुमची वैचारिक दिवाळखोरीच जाहिर होते आहे. तेव्हा लेबलं लावून तुमचा आक्रस्ताळेपणा अजून सिद्ध करायची आवश्यकता नाही.
त्याशिवाय, एका संस्थळावर वाईट प्रतिक्रीया आली म्हणून दूसर्या संस्थळावर जाऊन रडगाणे गाऊन दाखवणे, त्या कारणाने इतरांना हुच्चभ्रु म्हणून हिणवण्याने तुम्हाला दोन चार मूर्ख समर्थक कदाचित मिळतील पण तरीही हा प्रकार बालीशच आहे.
आम्ही कोणताही धडा शिकलेला नाही. आम्हाला उलट मजा येते अशा प्रकारांमुळे, म्हणून पुन्हा पुन्हा येतो.
माझ्या मतांव्यतिरीक्त कोणतेही स्पष्टीकरण मला विचारण्यात अर्थ नाही, त्याचे स्पष्टीकरण देण्यास मी बांधील नाही.
14 Nov 2011 - 10:59 pm | यकु
वेल डन् !
उत्तरं पटली.
आम्ही हुशार आहो, मूर्ख आहो किंवा अजून काही असा कुठेही दावा केलेला नाही.
आपल्या मनातील दुसर्या व्यक्तिची प्रतिमा मलिन झाली/कुणी ती करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्रागा करु नये हे मित्रत्वाचं सांगणं (किंवा करावा किंवा कसेही.. पुन्हा म्हणायचात आम्ही फालतू गोष्टी ऐकण्यास बांधील नाही)
करणारच असाल तर फालतू तोंड फोडून व्यक्तिपुजेतुन मुक्त होण्याचे सल्ले देऊ नयेत.
च्यायला आजकाल थ्री डायमेन्शनल वाक्य लिहावी लागतात काही मित्रांखातर. असो.
आपल्याला हा शेवटचा प्रतिसाद.
बाकी आपले बुद्धीकौशल्य गप राहून आम्ही पाहूच संशय नसावा.
14 Nov 2011 - 5:43 pm | वपाडाव
फुल्ल पानभर ढवळाढवळ केली अन एक वाक्य समजलं..... तेही मन१ यांच.....
तर आपल्याकडून पास करण्यात आलं आहे....
14 Nov 2011 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार
यक्कु सेठ, अहो लेख प्रकाशित केला की 'गंगार्पणमस्तू' म्हणावे आणि मागे वळून देखील बघू नये हे आम्ही तुमच्या सारख्या विद्वानाला समजवायचे होय ?
जौ द्या हो :) प्रत्येकाची आपापली मते आणि आपापली दैवते.
14 Nov 2011 - 5:56 pm | यकु
लेख गंगार्पणच हो. पण हुच्चभ्रंच्या शब्दकोशात विचारस्वातंत्र्य, परमत सहिष्णूता असं काहीसं असतं
असं फार वेळा ऐकून होतो हो... आणि त्याचा जयघोष नेहमी कानीकपाळी पडत होता. सार्या जगाला ढोंगी ठरवणारे हे हुच्चभ्रू, ज्यांच्याकडं सद्सदविवेक बुद्धीचा अंश शिल्लक असेल अशी आमची आशा होती तेच महाढोंगी निघाले..
आम्ही ते हलगी वाजवून जाहीर करतोय.. एवढंच.. :)
14 Nov 2011 - 5:58 pm | गवि
@ पराशेठ..
गुस्ताखी माफ असावी, पण..
लेख प्रकाशित केला की 'गंगार्पणमस्तू' म्हणावे आणि मागे वळून देखील बघू नये
... एवढा निर्विकारपणा / निरिच्छपणा / निरपेक्षपणा कोणी इथे करु शकत असेल किंवा कसे अशी घनदाट शंका आहे. असं असेल तर लेख लिहीण्याची प्रेरणा तरी कशी व्हावी जर वळूनही बघायचे नसेल तर? आपण साद देतो ती प्रतिसादाच्या आशेनेच / इच्छेनेच ना?
..माफीसह ही शंका नोंदवतो..
14 Nov 2011 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
गवि अहो माझे वाक्य निट वाचलेत का ? :-
हे आम्ही तुमच्या सारख्या विद्वानाला समजवायचे होय ?
मी यक्कुंसारख्या विद्वान माणसाबद्दल बोलत आहे हो :)
तुमचा-आमचा प्रश्नच वेगळा आहे. आम्ही तर कितीदा निव्वळ धिंगाणा घालायला म्हणूनच धागे काढतो. आपण स्कोर सेटल केले, वाद घातले, फाटक्यात पाय अडकवले तर ठिक आहे हो, ते आपण करतोही ;) मुद्दा विद्वानांचा आहे.
असे बोलल्याबद्दल आपणास २ क्वार्टरींचा दंड लागु केल्या गेला आहे, जो आम्ही पुढील विकांतास आपल्या नगरीत येऊन वसूल करूच.
14 Nov 2011 - 6:17 pm | यकु
आमच्या पुढच्या पुणें भेटीत एक भरदारशी पगडी आणि उपरणे यांची तजवीज करणे.
आता विद्वान ही पदवी दिलीच आहे आपण तर विद्वत्तेची परंपरागत वस्त्रेही द्यावी लागणार आहेत हे ध्यानात ठेवावे.. ;-)
बाकी कार्यक्रम कुठं लकडी पुल की बालगंधर्व चौक, की स.पे.?
14 Nov 2011 - 6:21 pm | गवि
हॅ हॅ हॅ..
झिरमिळ्या नकोत का पगडीला ? ;)
@पराशेट.. २ क्वार्टर दोघांत पुरतील का? ;)
15 Nov 2011 - 11:15 am | श्रावण मोडक
काय गवि? इतका अतिसभ्य प्रश्न? अहो, ती संख्या पऱ्यानं स्वतःपुरता हिशेब करून सांगितली आहे. ;)
14 Nov 2011 - 7:08 pm | विजुभाऊ
शब्दावेगळं रहाता आलं .....
कसं शक्य आहे राव
बिरुटेसर
शब्दाची अर्थाशी फारकत केली तर शब्दावेगळे होणे शक्य होते. हा प्रयोग मे एकरुन पाहिलेला आहे
14 Nov 2011 - 8:00 pm | आत्मशून्य
अत्यंत बकवास लिखाण. या पेक्षा फडतूस काही असूच शकत नाही.
अवांतर :- जर या धाग्यावर लिहलेले विचार आपण खरोखर "जगत" असाल तर माझी "नेमकी" प्रतीक्रीया आपण नक्किच समजू शकाल.
14 Nov 2011 - 8:55 pm | यकु
ती सकाळीच तिकडे समजली आत्मशून्य.
तिकडे गेला नाहीत का तुम्ही?
14 Nov 2011 - 9:18 pm | आत्मशून्य
पण म्हटलं मूद्दामहून काहीतरी वेगळ खरडून बघूया लोक्स काय म्हणतात ते.
अवांतर :- लेखातील मतांशी सहमती आहे म्हणून मी शूध्दलेखन फाट्यावर मारतो हे मात्र खरं न्हवे :)
14 Nov 2011 - 9:46 pm | धनंजय
श्री. यशवंत एकनाथ यांनी त्यांच्या प्रतिसादात माझा उल्लेख केलेला आहे. (मी मिसळपाव संकेतस्थळावरही सदस्य आहे, आणि मिसळपाव संकेतस्थळावरही साधारण याच शैलीत लेखन करतो. मिसळपाव संकेतस्थळावरून मला हाकलून लावायची सोय करत नाही, तोवर वेगवेगळ्या संकेतस्थळांची तुलना मला समजलेली नाही.)
त्यांनी प्रतिसाद नीट वाचलेला नाही, आणि आणि लेखाला मिथ्या आणि अनाठायी म्हटले आहे, असा त्यांचा गैरसमज झालेला आहे. असे नव्हे.
लेखक ज्याला "प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्या किंवा ती प्रतिमा उभी राहण्यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे!" त्याला सहमतीने "मिथ्या" म्हटलेले आहे.
मात्र त्या ठिकाणाहून शब्दांना दोष देणे हे अनाठायी म्हटले आहे.
- - -
"अनाठायी" आणि "मिथ्या" शब्द वापरलेली वाक्ये संदर्भासह वाचता यावीत तो प्रतिसाद पूर्णच येथे डकवत आहे.
14 Nov 2011 - 10:23 pm | यकु
आपल्याला सकाळी दिलेले उत्तर आपल्या ध्यानात आले नाही काय?
पुन्हा एकदा वाचून पहा -
सर्वप्रथम सांगू इच्छितो की मला नेहमीच तुमची भाषाशैली, वाक्यरचना अत्यंत बुकिश, मानवी मेंदूतुन बाहेर न पडता एखाद्या यंत्रातून बाहेर पडल्यासारखी वाटते. अतिशय शुष्क आणि मनोरंजकतेचा अभाव असलेली. त्यामुळे तुमचे प्रतिसाद कुठेही दिसले की ते टाळुन पुढे जायची मी स्वतःला सवय लाऊन घेतली आहे. हे मी तुम्हाला कधी सांगितलं नव्हतं म्हणून आज सांगतोय. राग नसावा.
फक्त वर तुम्ही सांगितलेले अफू खाणे, हाराकिरी करणे वगैरे थोडेसे मनोरंजक वाटले, हा ही अपवादच.
त्यामुळं -
अंतर्मुख ऊहापोहासाठी मौनाचा फायदा असला, तरी शब्द/सांकेतिकता वगैरे यांच्याबाबतचे वरील तात्त्विक विवेचन अनाठायी आहे. इतकेच काय, मनाने केलेल्या जगाच्या खोट्या घटकांच्याबाबत शब्दांच्या साहाय्याने देखील "मिथ्या" असा निर्णय करता येतो.
याबाबत पुढे काही लिहीणे मी अनाठायी आणि मिथ्या मानतो.
हे आपल्याला समजलं नाही?
समजलं असेल तर इथे पुन्हा साद-प्रतिसाद करीत बसण्याचं काही कारण संभवत नाही.
तरी असो.
आपल्या इथल्या नवीन प्रतिसादावर उत्तर -
हे वर जे काही सारवण केलं आहे त्याला 'पश्चातबुद्धी' नावाचा शब्द आहे.
त्याचा अर्थ आपल्याला माहित नसेल हे संभवत नाही.
बाकी या स्पष्टीकरणाची अपेक्षा नव्हती, पण आपली हुच्चभ्रु प्रतिमा राखण्यासाठी आपल्याला तो देणे भाग पडले असेल तर क्षमा मागतो.
आम्ही फटक्यात काम संपवतो. कंटाळवाण्या भाषेत शब्द आणि तर्कांच्या लडी बांधत बसत नाही.
हे जे वर लिहीलं आहे ना ती आपलीच मुक्ताफळं आहेत तिकड्च्या संकेतस्थळावर लिहीलेली.
नेमक्या कुठल्या बुद्धी दौर्बल्यामुळे (आपण मनोरंजक लिहीत नाही, फक्त क्लिष्ट वैचारिक लिहिता हा आमचा समज आहे) आपल्याला हे लिहीण्याचे कष्ट पडले? हे जरा स्पष्ट केलंत तर आपल्या चाहत्यांच्या मनात जी प्रतिमा आहे तिच आमच्याही मनात स्थापित होण्यास मदत होईल.
तुम्हाला हे कुणी सांगितले? की तुमच्या बुद्धीकुहरात जेवढा प्रकाश पडतो तेवढ्यावरच आपण विसंबून रहाता? तसं असेल तर मार्गच खुंटला. अशी बेधडक विधानं करण्यापूर्वी स्वतःचा आवाका तपासावा, मगच ते सांगावं.
बर. असेल जे काय असायचं ते... आता काय.
15 Nov 2011 - 12:14 pm | मदनबाण
ह्म्म्म...
यशवंता, तुम्हा दोघांच्या वादात मधे न-पडण्याचे मी ठरवले होते !
परंतु धनंजयराव हुच्चभ्रु प्रतिमा राखण्यासाठी लेखन करतात हे तुमचे म्हणणे मला काही पटत नाही.
त्यांचे आजवरचे लेखन आणि जालीय वावर पाहता, ते हुच्चभ्रु प्रतिमा निर्माण करण्यासाठी तसे लेखन करतात हे मला अजिबात वाटत नाही.
त्यांचे प्रतिसाद वाचनास दुर्बोध असतील तर तो त्यांचा दोष मानावा? की आपल्याला ते समजत नाही हा आपला दोष मानावा ?
प्रत्येक जण त्याच्या विचारसरणी नुसार लेखन करत असावा असे मला वाटते आणि एखाद्याचे लेखन वाचुन त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व समजु शकते,पण ज्याचे लेखन /प्रतिक्रिया समजत नाही किंवा तसे तो व्यक्ती लिहतो म्हणुन तो व्यक्ती हुच्चभ्रु कसा ?
प्रत्येक व्यक्तीची एक वैचारीक बैठक असते, भावना असते आणि त्याचा आधार होवुनच लेखन केले जाते असते...
एखादा विचार पटला नाही ,किंवा आवडला नाही म्हणुन किंवा समजला नाही म्हणुन त्याला एका विशिष्ठ पद्धतीचा ठरवणे हे चूक आहे. (मुद्धामुन तसे करणारी मंडळी लगेच लक्षात येतात, कारण त्यांचे इतर लेखन /प्रतिसाद वाचले की त्यांचे खरे व्यक्तीमत्व समजुन येते.)
यशवंता याच धाग्यावर काही प्रतिसादात असे म्हंटले आहे की त्यांना हा लेख समजला नाही म्हणजे असा निष्कर्ष काढावा की तू हुच्चभ्रु पद्धतीने लिहतोस म्हणुन ?
हे सर्व माझ्या मनातले विचार/भावना मांडण्यासाठी शब्दांचा आधार घ्यायला लागतोय ! ;)
थोडक्यात धनंजयरावांचे लेखन /प्रतिसाद हे हुच्चभ्रुपणा करण्यासाठी आहे हा तुझा विचार योग्य वाटत नाही.
यावर अधिक भाष्य करण्याची माझी इच्छा नाही...
17 Nov 2011 - 6:20 pm | बंडा मामा
अतिशय शुष्क आणि मनोरंजकतेचा अभाव असलेली. त्यामुळे तुमचे प्रतिसाद कुठेही दिसले की ते टाळुन पुढे जायची मी स्वतःला सवय लाऊन घेतली आहे.
हेच तुम्ही युजींबाबतही आचरणात आणा. तुमचे आयुष्य आनंददायी होईल हे आम्ही शब्दाविण जाणले आहे. तुम्हाला युजी हे शुश्क आणि मनोरंकतेचा अभाव असलेला वाटत नाहीत म्हणुन तुमची चिडचिड होते हेही आम्ही शब्दाविणा ताडले आहे.