द स्मर्फ्स ( 3D ऍनिमेशनपट )

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
1 Aug 2011 - 5:33 pm

शुक्रवारी मुलांच्या 'ऑर्डर'ला मान देउन (हो, आजकालची मुले विनंती करत नाहीत) द स्मर्फ्स हा 3D ऍनिमेशनपट बघितला.
तसे मला ऍनिमेशनपट भयंकर आवडतात. फार वर्षांपुर्वी 'चिकन रन' नावाचा एक ऍनिमेशनपट बघीतला होता, तेव्हापासुन जो छंद लागलाय तो आजपर्य़ंत टिकुन आहे.

तर द स्मर्फ्स ही एका काल्पनीक खेड्यातील निळ्या रंगातल्या कार्टुन्सची ही एक कहाणी आहे. ही कार्टुन कॅरॅक्टर्स आपल्या दैनंदीन मानवी जिवनात आल्यावर काय काय धमाल होउ शकते ते ह्या चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला गेल्या आहे.

निळ्या रंगाचे स्मर्फ्स एक जादुइ खेड्यात रहात असतात. गार्गामेल ह्या एका जादुगाराला (wizard) ह्या निळ्या स्मर्फ्सची निळाइ हवी असते. ही निळाइ मिळवून तो जगातील सर्वात शक्तिमान जादुगार (wizard) बनणार असतो. त्यासाठी त्याला सर्व निळ्या स्मर्फ्सना ठार करयचे असते.

ह्या जादुइ खेड्यात एक निळे आजोबा (पापा) असतात. त्यांना 'भविष्याच्या झलकी' मधुन मधुन दिसत असतात (जादुइ गोलात). त्यांचा नातु (clumsy) हा फार वेंधळा, सारखा धडपडणारा (साजिद खानच्या चित्रपटातला हीरो जसा हुकलेला असतो तसा) असतो. ह्या खेड्यात सगळॆ पुरुष स्मर्फ्सच असतात पण गार्गामेलने त्यांच्यात फुट पाडण्यासाठी एक सुंदर 'निळी' तयार केलेली असते जीला आजोबांनी आपलेसे करून वाढविलेले असते. गार्गामेलला आपली ही खेळीही फुकट गेली ह्याचा भयंकर राग असतो.

एकदा आजोबा एका जादुच्या वलयात भविष्याची झलक पहात असताना त्यांना दिसते की त्यांच्या खेड्याचा गार्गामेल हा विनाश करणार आहे. त्याच वेळी नेमका गार्गामेल त्यांच्या खेड्यावर हला करतो. त्याच्यापासुन वाचण्यासाठी धावपळ करत असताना एक पाण्याची पोकळी तयार होते आणि काही निळॆ स्मर्फ्स त्यातुन न्यु यॉर्कच्या सेंट्रल पार्क मधे येउन धडकतात.

तीथुन ते पोहोचतात एका कंपनीचा मार्केटींग व्हीपी, पॅट्रीकच्या घरी. पॅट्रीकला ही काय बला आली आपल्याकडे असे वाटुन तो त्यांना हुसकुन लावायचा विचार करतो. पॅट्रीकच्या बायकोला, ग्रेसला मात्र हे निळॆ स्मर्फ्स फार्फार आवडतात (बायकोच ती नवर्‍याला जे आवडणार नाही ते तीला नेमके आवडणार, अगदी अमेरीकन नवराही बिचाराच असतो हो). तर पॅट्रीकला त्यांना घरात ठेउन घ्यावे लागते. बरं आता ह्या पॅट्रीकच्या ऑफिसात काहीतरी लोच्या झाला आहे. त्याचे प्रमोशन झाले आहे पण त्याला दोन दिवसात एक ऍड बनवायची असते. ती नाही बनवली तर त्याची महिला बॉस त्याला 'फायर' करणार असते. बाइच ती, दोन दिवसात हा बिचारा कसे काय काम पुर्ण करेल हे तिच्या कठोर मनाला शिवत देखील नाही. तर पॅट्रीक ह्यामुळे तणावाखाली असतो. तशात ग्रेसला दिवस गेलेले असतात. पॅट्रीकला ही जबाबदारी नको असते, म्हणजे तो अजुन तयार नसतो ह्या जबाबदारीसाठी असे त्याचे म्हणणे असते.

तर इथुन पुढे निळॆ स्मर्फ्स गार्गामेलचा सफाया करून त्यांच्या जादुइ दुनीयेत परत कसे जातात, पॅट्रीकची नोकरी जाते की रहाते आणि तो बाप बनण्याच्या जबाबदारीसाठी तयार होतो का ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी सिनेमा पाहुन घ्या.

हा चित्रपट एकदम सरळ-धोपट सिनेमा आहे. कथा फारशी प्रभावी नाही. काहीही चढउतार नाहित की वळणॆ नाहीत. पुढच्या सीन मधे काय होणार ह्याचा अंदाज आधिच येतो. कथेतील पात्रेही व्यवस्थित फुलवलेली नाहीत. आजोबांचा नातु clumsy हा तसा का आहे आणि तो तसा असण्याचे प्रयोजन काय ह्याची उत्तरे मिळत नाहीत. पॅट्रीकच्या महिला बॉसचा प्रॉब्लेम काय असतो, तीचे अचानक मतपरीवर्तन का होते हेही व्यवस्थित फुलवलेले नाही. निळ्या रंगाचे स्मर्फ्स त्यांच्या जादुइ दिनियेतुन आपल्या मानवी जगात आल्य़ानंतरही फारशी काही धमाल होत नाही. कथा फुलवायला फार स्कोप होता पण संधी घालवली आहे. थ्रीडी अनुभवही फार चांगला नाही. वास्तविक हा सिनेमा थ्रीडी नसता तरीही चालले असते.

ज्यांना ऍनिमेशनपट आवडतात आणि मुले आहेत त्यांनी एकदा बघायला हरकत नाही.

ज्यांनी रिओ बघितला आहे आणि ज्यांना तो फार आवडाला आहे त्यांना द स्मर्फ्स नावडण्याची दाट शक्यता आहे. रिओ हा एक भारी आणि अशक्य सिनेमा आहे.

मौजमजाचित्रपटविचारप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

गणपा's picture

1 Aug 2011 - 7:05 pm | गणपा

रिओ हा एक भारी आणि अशक्य सिनेमा आहे.

खल्लास इथेच सगळं संपल.
पण जालावर बरी प्रिंट मिळताच पाहिला जाईलच.
-(एकही अ‍ॅनिमेशन पट न सोडणारा) गणा

रमताराम's picture

1 Aug 2011 - 9:24 pm | रमताराम

-(एकही अ‍ॅनिमेशन पट न सोडणारा) गणा
+१
स्मर्फ्स ही अ‍ॅनिमेशन मालिका पूर्वी दूरदर्शनवर दाखवत तेव्हापासून या गोंडस पोरांचा आपण फ्यान हौ.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2011 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

एकही अ‍ॅनिमेशन पट न सोडणारा

+२

हा शिणिमा देखील पाहिला जाईलच. सध्या आम्ही लायनकिंग १-२-३ मध्ये बिज्जी आहोत; अतिशय सुंदर अनुभव घेत आहोत.

वरची स्टोरी वाचता बिंडोक शिणिमे केवळ आपल्याकडेच बनतात ह्या कल्पनेला तडा गेल्या आहे.

सोत्रि's picture

2 Aug 2011 - 12:18 pm | सोत्रि

वरची स्टोरी वाचता बिंडोक शिणिमे केवळ आपल्याकडेच बनतात ह्या कल्पनेला तडा गेल्या आहे.

एक्दम सहमत, +100

-(बिंडोक सिनेमेच आवडीने बघणारा) सोकाजी

रेवती's picture

1 Aug 2011 - 7:19 pm | रेवती

हम्म....
बरी माहिती मिळाली.;)
मुलाला विचारते शिनेमा बघायचाय का म्हणून!

स्मिता.'s picture

1 Aug 2011 - 9:33 pm | स्मिता.

अर्रे!! हा शिणुमा आहे का? मला एवढे दिवस पोस्टर्स बघून कळतच नव्हतं की हे निळे निळे कार्टूनस काय आहेत ते. एकंदरीतच पाहिला जाईल असे वाटत नाही.

रिओ शोधून बघावा म्हणते.

मिसळपाव's picture

1 Aug 2011 - 10:45 pm | मिसळपाव

.. Toy Story आणि Shrek (पहिला भाग फक्त) पाहिले नसलेस तर जरूर बघ. तुला रिओ 'भारी आणि अशक्य' वाटला म्हणतोस मग या तीन मूव्हिज (च्यामारी, हलंत कसा काढायचा विसरलो!) लई म्हणजे लईईईईईईईईई भारी वाटतील !!!!

रेवती's picture

1 Aug 2011 - 11:34 pm | रेवती

टिंब एच म्हणजे हलंत.

मिसळपाव's picture

2 Aug 2011 - 6:00 am | मिसळपाव

सगळे प्रकार करून पाहिले. '३ ईडियट्स' लिहिताना मात्र आपोआप येतो - म्हणजे ट वर येतो, स वर नाहि - पण सोचनेकि बात ये है कि टिंब एच वगैरे काहिहि न करता येतो.

प्राजु's picture

1 Aug 2011 - 10:58 pm | प्राजु

टॉय स्टोरी, कार्स टू - थ्री डि, अतिशय आवडले. अप सुद्धा खूप आवडला.
पण श्रेक नाही आवडला.

प्राजु

मला कार्स अजिबात आवडत नाही कारण त्या शिनेमाचा हिरो 'लाइव्ह' नाही. मी नाही कनेक्ट करु शकत स्वतःला त्या हीरोशी. त्या उलट प्राणी, पक्षी इ. हीरो लाइव्ह असतात. त्यांना भावना असतात त्यामुळे त्यांच्याशी कनेक्ट होता येते.

श्रेक तर माझा आणी माज्या मुलांचा सखा आहे.

- (श्रेकमय) सोकाजी

रेवती's picture

1 Aug 2011 - 11:35 pm | रेवती

कार्स २ ची सुरुवात छानच केलिये.
मुलं आ वासून बघत होती.

हे तिन्ही सिनेमे पाहिले आहेत. फाईडिंग निमो आणी श्रेक हे तर विषेश आवडीचे. मी आणि माझी मुले डायलॉग बोलत बोलत हे शिनेमे बघतो आता इतके तोंडपाठ झाले आहेत.

पण त्यांच्यापुढे रीओ चांगला नाही असे म्हणायचे आहे का? अश्या मुव्हीज नाही कंपेअर करु शकत.

तसे असेल तर आइस एज सगळे भाग बघितलेस का असे विचारीन. तांत्रिकदृष्ट्या आणी स्टोरीच्या मानाने तु म्हटलेल्या सर्व अ‍ॅनिमेशनपटांपेक्षा सरस आहे आइस एज.
तसे असेल तर मग तुला रोड्साइड रोमिओ कसा वाटला?

1.रिओच्या सुरुवातीचे गाणे आणि त्यातली रंगसंगती निव्वळ अप्रतिम
2.रिओ सिनेमचा वेग
3.ब्राज़ीलच्या रिओ-द-जानेरोच्या झोपडपट्टीतुन केलेला पाठलाग
4.संवाद निव्वळ अशक्य असेच अजुनही म्हणेन.

- (अ‍ॅनिमेटेड) सोकाजी

नेटफ्लिक्स च्या यादित टाकलाय.

त्यांच्यापुढे रिओ चांगला नाहि असं नाहि. प्रत्येक पिक्चरची काहि खासियत असते. पण रिओ मधे माकडांची टोळी, पांढरया खलनायक काकाकुवाने क्लोरोफॉर्म वापरून त्या कर्मचार्याला बेशुध्द करणं वगैरे विसंगत वाटतं. मी 'विसंगत' म्हणतोय - 'illogical' (शासकिय मराठित तर्कहिन म्हणण्यापेक्षा illogicalच बरं) नव्हे. मासे बोलतात, संसार मांडतात वगैरे Finding Nemoतला भाग ष्टोरित कसा फिट्ट बसतो. मासे बोलतात हे सामान्यापणे illogical आहे पण त्या पिक्चरच्या कथेत अगदि सुसंगत वाटतं. रिओच्या कथेत मात्र विसंगतीचे खूप खाचखळगे येतात.

तुझ्या #१ मुद्द्याशी १००००% सहमत! तशी Finding Nemo मधे सुरूवातीला निमोचा बाबा त्याला घेऊन शाळेत निघतो तेव्हा त्या कोरालवरचे, कोरालवरच्या रहिवाशांची रंगांची काय उधळण आहे, व्वा!

मादागास्कर मधल्या किंग जुलियन III चे (Sacha Baron Cohen - नक्कि कसं उच्चारावं ते अजून न कळल्यामुळे विंग्रजीतच लिवलंय) संवाद तुझ्या भाषेत 'निव्वळ अशक्य'. त्याला काहिच अ‍ॅवार्ड वगैरे नाहि मिळालं आश्चर्यच आहे.

आणि कथा, पात्रं, संवाद, पात्रांच्या हालचाली/त्यातले बारकावे या सगळ्यात अप्रतिम असा, चाळिसएक वर्षांपुर्वीचा चित्रपट - Jungle Book. बघितला नसलास तर पहिला त्याच्या मागे लाग!!

कुम्फू पांडा टू ही चांगला आहे.. अजून पहायचा योग नाहि आलेला.
मला निमो खूप आवडला, आईस एज सुद्धा चांगला आहे. अजून रिओ नाही पाहिलेला.
पण या अनिमेशन पटांची मी ही फॅन आहेच.

माडागास्कर १ ही आवडला होता मला.

५० फक्त's picture

2 Aug 2011 - 6:58 am | ५० फक्त

कार्स २ पाहिला, एकदम मस्त आहे, सोकाजीराव या पुढच्या पिक्चरला एकत्र जाउया पोरांच्या ऑर्डरनुसार..

सोत्रि's picture

3 Aug 2011 - 11:02 am | सोत्रि

नक्कीच, डन!

- ( प्रॉमिस करून पाळणारा (?) ) सोकाजी

मस्तानी's picture

2 Aug 2011 - 7:59 am | मस्तानी

राटातोई (Ratatouile) हा सुद्धा उत्तम आहे ...

सोत्रि's picture

2 Aug 2011 - 12:25 pm | सोत्रि

आहाहा...

काय आठवण काढलीत...
तुफान पिक्चर.

मिसळपाव , आता काय म्हणशील?
एक उंदीर आणि आचारी हे तर भयंकर विसंगत आहे (आणि बरेचसे किळसवाणे सुद्धा) पण हा शिनेमा काय तुफान बनवलाय.

- (आज एक्दम ऍनिमेटेड झालेला) सोकाजी

मिसळपाव's picture

3 Aug 2011 - 12:13 am | मिसळपाव

मी आधी म्हंटलं ना, त्याप्रमाणे उंदीर आणि आचारी हे illogical आहे पण विसंगत नव्हे. एकदा स्टोरी लाईन ठरवल्यावर......जाउंदे. एकतर मी समीक्षक नव्हे आणि मुख्य म्हणजे 'रिओ मला विसंगत वाटला' हे तुला ठसवून सांगायचा तर माझा अजाबात हेतू नव्हे!! मी रोडसाईड रोमिओ ची वाट बघतोय, तू जंगल बुक (परत एकदा) बघुन टाक. :-)

सोत्रि's picture

3 Aug 2011 - 11:05 am | सोत्रि

जंग़लबूक टोरेंट वर ह्या विकांताला लावणार आहे.
खरड्वहीत खरड टाकीन बघुन झाल्यावर.

- ( टोरेंटने पृथ्वीवर डाउनलोड न झालेला ) सोकाजी

पक्या's picture

2 Aug 2011 - 7:59 am | पक्या

गेल्या वर्षी आलेले How to Train your Dragon , The legend of Guardians हे पण मस्त अ‍ॅनिमेशनपट आहेत. काही वर्षापूर्वी पाहिलेला The Polar Express हा ही खूप सुंदर होता. Happy Feet ही चांगला वाटलेला.

साबु's picture

2 Aug 2011 - 9:59 am | साबु

मी आत्तापर्यन्त पाहिलेले सगळेच अनिमेशनपट मस्त होते...
रोड टु अल-ड्-राडो नावचा एक आहे.. मस्त आहे...

श्रेक
इनक्रेडिबल्स
कुन्ग फु पान्डा
नेमो
टोय स्टोरि
चिकन रन
अप

मिसळपाव's picture

3 Aug 2011 - 12:16 am | मिसळपाव

झकास आहे. मिगालचे हावभाव मस्त दाखवलेत. घोड्याचं नाव विसरलो. का नाहिच आहे त्याला नाव? परत बघूक होया...

प्रचेतस's picture

2 Aug 2011 - 10:08 am | प्रचेतस

वॉल ई पण एक मस्त सिनेमा होता.

प्रीत-मोहर's picture

3 Aug 2011 - 11:23 am | प्रीत-मोहर

इफ आय अ‍ॅम नॉट मिसटेकन अ‍ॅनिमेशनपटासाठीचे ऑस्कर मिळालय वॉली ला... त्यातला वॉली नावाचा रोबुड्या कित्ती क्युट आहे

प्रचेतस's picture

3 Aug 2011 - 1:34 pm | प्रचेतस

बेस्ट अ‍ॅनिमेशन फिल्म्ससाठी ऑस्कर मिळालाय, शिवाय इतरही ५ विभागात नामांकने मिळाली होती.

मराठे's picture

3 Aug 2011 - 12:30 am | मराठे

पिक्सार चे जवळजवळ सगळेच चित्रपट (टॉयस्टोरी - १ पासून कार्स - २ पर्यंत) सगळेच मस्त आहेत. त्यांच्या शॉर्ट फिल्म्सपण मस्त आहेत. त्यामानाने ड्रीमवर्क्सचे चित्रपट ज$$रा कमी पडतात .. पण फार नाहीत. श्रेक, मादागास्कर आणि आईसएज मस्त आहेत पण ओव्हर द हेज सारखे काही टुकारही आहेत.
बाय-द-वे, यश-राज चा रोडसाईड रोमियो हा माझ्या मते फसलेला प्रयोग आहे. त्यापेक्षा हिंदीतलं जंगलबूक कित्येक पटीने चांगलं होतं.

यश-राज चा रोडसाईड रोमियो हा माझ्या मते फसलेला प्रयोग आहे

काही पॉइंटर्स मिळतील का ? फसलेला आहे असे का वाटले ते जाणुन घ्यायला आवडेल.

- (रोमियो पण रोडसाईड नसलेला) सोकाजी

मयुरा गुप्ते's picture

3 Aug 2011 - 4:27 am | मयुरा गुप्ते

आमच्या घराजवळ एक डिस्कांऊंट थिएटर आहे. चित्रपट लागुन जेव्हा ३-४ महिने होतात तेव्हां ते तेथे अगदी स्वस्तात बघायला मिळतात्.आम्ही त्याचे अगदी पिटातले प्रेक्षक आहोत...

पिक्चरच्या जाहीराती बघुन तरी स्मर्फ घरी डीवीडी आणुन बघावा किंवा डिस्कांऊंट थेटरात स्वस्तात्-मस्त मोठ्या पडद्यावर घरुन नेलेले पॉपकॉर्न खात बघावा असा वाट्ला.....(हो..नाहीतर टिकीटापेक्षा पॉपकॉर्न महाग असतात सगळीकडे)

--मयुरा.

दीप्स's picture

3 Aug 2011 - 1:02 pm | दीप्स

अरे !! शीट !!

काय हे !! अहो एवढ तर सांगितलं ना मग पूर्णच स्टोरी सांगितली असती तरी चालली असती . आता फक्त शेवट बघण्यासाठी जावे लागणार मला. पण पुढची फिल्म बघण्या सारखी आहे ना नाही तर फुकट धावपळ व्हायची जीवाची. काय बरोबर ना?

सोत्रि's picture

3 Aug 2011 - 1:12 pm | सोत्रि

एक्दा बघण्यासारखी आहे.

- (जीवाची धावपळ न होणारा) सोकाजी

सहज's picture

3 Aug 2011 - 1:27 pm | सहज

ऍनिमेशनपट यावरुन आठवले. (वर उल्लेखलेले) बहुतांशी हॉलीवूडपट असतात. मधे एका जपानी एनिमेशनपटाबद्दल ऐकले होते 'स्पीरीटेड अवे', २००१ साली आला होता.

अनेक अनिमेशनकारांना अनेक चित्रपट करावे लागतील इतकी कल्पनाशक्ती, गोष्ट फुलवणे हे काम एका सिनेमात मियाझाकी या प्रसिद्ध जपानी एनिमेटर (जपानी वॉल्ट डिस्ने) केले आहे असे म्हणतात. या सिनेमाला ऑस्कर मिळाले आहे.

त्यामुळे तोही बघायला पाहीजे.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2011 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

अतिशय सुंदर चित्रपट. सर्व सिनेमांचा बाप असा ज्या 'जॉनी मेरा नाम' चा उल्लेख केला जातो त्याच प्रकारचा हा अ‍ॅनीमेशन मधला बाप.

ह्याची खास प्रकाराची गेम वेबसाइट पण झकास आहे.

दिपक's picture

4 Aug 2011 - 11:50 am | दिपक

'स्पीरीटेड अवे' खुप आवडलेल्या ऍनीमेटेड चित्रपटांपैकी आहे. वॉल-ई, अप, ग्रेव्ह ऑफ द फ़ायरफ़्लाईज, बेरफुट जेन...हेही अप्रतिम आहेत.

स्मर्फ्सची छान ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद! लवकरच पाहीन.

शाहिर's picture

3 Aug 2011 - 4:27 pm | शाहिर

Final Fantasy VII: Advent Children

फायनल फंटसी ७ नावाचा अ‍ॅनीमेशन पट पाहिला होता ..अतिशय सुन्दर होता ..
त्याच्या इतर भागां बद्दल माहीती आहे का ??