नेहमीच धडकी भरते...!

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
22 May 2008 - 11:04 am

प्रदीप कुलकर्णींच्या प्राणाची तुळस बहरलेली पाहून आम्हांला मात्र धडकी भरली :)

भरदार तुझ्या दिसण्याने
नेहमीच धडकी भरते... !
झाडु घेउनी उभा ज़री
बिन् दिक्कत ही अवतरते... !

तो तुझाच - खोलीमधला
कुरतडला गाउन, सदरा... !
अन् तुझ्याच हाय कृपेने
भार्येचा चढतो पारा... !

या मंत्रभारल्या वेळी
मी इथे एकटा नाही... !
ते तुझेच - उंदिर,झुरळे
मावश्या नि बोके काही... !

ही शांत, सुभगशी संध्या
पण किंचित उदासवाणी... !
ओट्यावर, ज़मिनीवर ना
सांडले दूध वा पाणी... ?

झटक्यात उगवशी केव्हा
मी वडे,भजी तळताना... !
मोरीत उगवशी माझ्या
कांतीला उजळवताना... !

तू नसूनसुद्धा असशी
अडगळीत, माळ्यावरती... !
खुडबूड सततची चाले
फडताळी, अवतीभवती... !

कविताविडंबनप्रकटनप्रतिसादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

22 May 2008 - 12:39 pm | धमाल मुलगा

ही शांत, सुभगशी संध्या
पण किंचित उदासवाणी... !
ओट्यावर, ज़मिनीवर ना
सांडले दूध वा पाणी... ?

:)

झटक्यात उगवशी केव्हा
मी वडे,भजी तळताना... !
मोरीत उगवशी माझ्या
कांतीला उजळवताना... !

अरे वा...

हे असं पण असु शकतं? आयला, कसं काय जमतं बुवा तुम्हा लोकांना एव्हढ्याश्या गोष्टींवरुन सुध्दा कविता गज़ला करायला?

छान. चालू द्या...

अवांतरः बेसनलाडूचे दर्शन बर्‍याच दिवसांनी घडले...छान!

फटू's picture

23 May 2008 - 1:01 am | फटू

तशा कविता आम्हीही लिहितो... पण आमची प्रतीभा अश्रू आणि प्रेम याच्यापुढे एक पाऊलही टाकायला मागत नाही...
लय भारी राव... अगदी छान जमलं आहे विडंबन...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग's picture

23 May 2008 - 1:43 am | चतुरंग

छान विडंबन.

(स्वगत - हम्म्..केशवा, बिघडायला लागली बरं का रे मंडळी एकेक करुन. ह्याच साठी केला होता अट्टाहास! ;) )

चतुरंग

केशवसुमार's picture

23 May 2008 - 9:52 am | केशवसुमार

बेसनशेठ,
विडंबन आवडले..

मोरीत उगवशी माझ्या
कांतीला उजळवताना...
! ह्या वरून आम्हाला आमच्या कंदिल - द दिवा विडंबनातला
मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा
बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या?
ह्या द्विपदी आठवल्या..
(वाचक) केशवसुमार

गारंबीचा बापू's picture

23 May 2008 - 9:55 am | गारंबीचा बापू

वा बेला,

मजा आली रे!!!

तुझा,

बापू