हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन :

शाहिर's picture
शाहिर in जनातलं, मनातलं
4 Jul 2011 - 7:05 pm

मूक चित्रपट पासून ते आज वर मराठी कलाकारानी चित्रपटसृष्टी मध्ये मोठे योगदान दिले आहे ..अनेक नामवंत कलाकार , अभिनेते ,दिग्दर्शक आणि निर्माते आजवर तयार झाले आहेत ..तसेच हिंदी चित्रपटाची कर्मभूमी मुंबई हि देखील महाराष्ट्र मध्ये आहे ..परंतु आजवर तयार झालेल्या हिंदी चित्रपटांकडे नजर टाकली तर असे दिसून येते कि मराठी संस्कृती व मराठी व्यक्तिरेखा यांना कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे ..पूर्वी च्या चित्रपट मध्ये बिझिनेस मन कोण ?? तर सिंघानिया !! मेहता ..वर्मा ...कपूर ..शहा ..
का? एखादा किर्लोस्कर ? गरवारे ? पवार ( काका नव्हे ..काकांचे उद्योगाविषयी नंतर ) किंवा कामत ..असा नाव सुद्धा दिसून येत नाही ..किंवा हिरोचा नाव ? ते सुद्धा मराठी नसते !!
मात्र यांच्या घर मधील मोलकरीण दाखवताना मात्र यांना मराठी माणूस आठवतो ..मग ती नउवारी नेसलेली बाई असते ..

महेश मांजरेकर आणि इतर एखादा दुसरा दिग्दर्शक अपवाद वगळता मराठी व्यक्तिरेखा हिंदी चित्रपट मधून मुख्य भुमिके मध्ये कधीच दिसल्या नाहीत ..
सर्वाधिक दर्शन होता ते पंजाबी संस्कृतीचा ..हिंदी चित्रपट एखाद्या परदेशी माणसाने पाहिले तर भारतात फक्त पंजाबी च राहतात असा समाज होईल कि काय असे वाटते ..
उत्तर प्रदेश ..बिहारी ..भोजपुरी..हरयाणवी ..राजस्थानी ..तसेच बंगाली व्यक्तिरेखा सुद्धा चित्रपट मध्ये प्रामुख्याने दिसून येतात ..

हिंदी चित्रपट मध्ये दिसते ती महाराष्ट्रमधील फक्त मुंबई !! त्यामधला मराठीपण पैसे खाणारे मराठी पोलीस ..गणपतीचा एखादा गाणं.. एवढाच मर्यादित असता ..
(पुणेकर अजून हिंदीमध्ये कसे दिसले नाहीत याचा आश्चर्य वाटत )..
मराठी गायक..संगीतकार तसेच मराठी मुलींनी हिंदी पडदा गाजवला आहे..माधुरी..उर्मिला ..ते मुग्धा गोडसे पर्यंत दखलपात्र (याही पूर्वीच्या कित्येक अभिनेत्री नी केला असेल..) भूमिका केल्या आहेत..पण मराठी मुलींची मुख्य भूमिका त्यांना मिळाली नाही..

पण मराठी हिरो हिंदी मध्ये चमकले नाही ..त्यांनी नोकराच्या भूमिका केल्यामुळे मराठी हेरो ची प्रतिमा ढासळली (त्यांच्या स्वताच्या अनेक आर्थिक अडचणी होत्या असे एका कार्यक्रमा मध्ये सांगितला ..असो..)

पण मराठी भूमी वर मराठी माणसाने सुरुवात केलेल्या चित्रपटसृष्टी मध्ये आज मराठी संस्कृतीला स्थान नाही हेच खरे !!

संस्कृतीचित्रपटप्रकटनविचारमाध्यमवेधसमीक्षा

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

4 Jul 2011 - 7:30 pm | चिरोटा

ज्यांच्याकडून कधी मान मिळाला नाही अश्यांकडून असली अपेक्षा ठेवायची कशाला?

नितिन थत्ते's picture

4 Jul 2011 - 8:27 pm | नितिन थत्ते

ह्म्म्म.

हिंदी चित्रपट सृष्टी ही मुंबईत केंद्रित असल्यामुळे मुंबईत मराठीचे/मराठी लोकांचे जे रूप निर्माता दिग्दर्शकांना मुख्यत्वे दिसते ते चित्रपटात उतरते. त्यामुळे सिंघानिया वगैरे नावे शेठजींची असणार यात काही नवल नाही.

मराठी माणूस फक्त घरगडी/मोलकरीण म्हणूनच दाखवला गेला आहे हे पटत नाही. इन्स्पेक्टर वेलणकर, धुरंधर भाटवडेकर ही नावे चटकन लक्षात येतात. आणखीही असतीलच भिकू म्हात्रे खेरीज.

स्टिरिओटायपिंग सगळ्याच लोकांचे झालेले असते. पारशी व्यक्ती चित्रपटात विनोदी म्हणूनच ९० टक्के वेळा दिसते. तसेच बिहार या राज्यात घडणारा चित्रपट (तेथील लोक, खलनायक, सिस्टिम) हा आत्यंतिक बर्बरावस्थेचे चित्रण करतो.

पंजाबीचा प्रभाव अलिकडे वाढलेला आहे याचे कारण "भरपूर पैसा असलेला आणि खर्चणारा तसेच देश सोडलेला पण मन देशात गुंतलेला परदेशी समाज" या कॅटॅगरीत हा समाज बसतो. त्यांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवले जातात. यश/आदित्य चोप्रा हे यांचे म्होरके.

पडद्यावर काम करणार्‍या मराठींची संख्या बाकीच्यांच्या मानाने कमी असेल पण पडद्यामागे काम करणारी नावे दिसत असतात की! आणि आपल्याकडे तरी शिनेमात काम करायला आईवडील सर्रास परवान्या देत असतील असे वाटत नाही. आजकाल चित्र बदलत असेलही.......त्यातून येणारे मराठी कलाकार दिसायला जरा वेळ द्यायला हवा.
एका हिरव्या मैत्रिणीने 'मॉन्सून वेडींग' नावाचा चित्रपट पाहून आपल्याकडे अगदी तशीच लग्ने असतात असा समज करून घेतला होता. शिवाय चोप्रापटांमध्ये जे काही भव्य दिव्य;) दाखवतात त्यावरून भारतात गरिबी कुठे आहे? सगळे तर गडगंज दिसतात असाही समज झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
बर्‍याच वर्षांपूर्वी एका सिरियल मध्ये कोणीतरी लांबची सासू आपल्या बर्‍याच सुनांना ढीगभर सोन्याचे दागिने भेट म्हणून देते असे दाखवले तेंव्हा हसू आले.

प्रियाली's picture

4 Jul 2011 - 9:18 pm | प्रियाली

यापूर्वीही अशाप्रकारच्या अनेक चर्चा झडल्याचे आठवते. बाकी, मराठी अभिनेत्रींची गाडी माधुरी आणि उर्मिलाच्या पुढे न नेऊ शकणार्‍यांकडून अधिक अपेक्षा काय ती करायची. अन्यथा, नूतन, तनुजा, नलिनी जयवंत, उषाकिरण, शशिकला, सुलोचना, ललिता पवार, पद्मिनी कोल्हापुरे, स्मिता पाटील आणि अगदी आईच्या भूमिका करणारी रीमा लागूपासून अनेक तारकांची वर्णी लागते.

मराठी पात्रेच आठवायची झाली तर आनंदमधील रमेश देव-सीमाचे कुटुंब, धुरंधर भाटवडेकर, करण जोगळेकर (अक्षय कुमार: मैं खिलाडी), यशवंत आंग्रे (अजय देवगणः खाकी), अश्विन गुप्ते (तुषार कपूर: खाकी), प्रताप नारायण टिळक (नाना पाटेकरः क्रांतीवीर), रघुनाथ शिवलकर, सुभाष नागरे (अमिताभः सरकार) वगैरे वगैरे यादी भरपूर मोठी आहे.

मराठी नायकांच्या यादीत अमोल पालेकर आणि नाना पाटेकर ही दोन्ही नावे पुरेशी बोलकी आहेत.

जेव्हा चित्रपट काढणारे बिगर मराठी असतात तेव्हा बिगर मराठी आडनावे आणि संस्कृती दाखवणे हे आलेच. जेव्हा मराठी निर्माते चित्रपट काढू लागतील तेव्हा मराठी संस्कृतीही दिसेलच हे महेश मांजरेकरच्या चित्रपटांवरून दिसते. मराठी नसूनही हृषीकेश मुखर्जी आणि राम गोपाल वर्मासारख्यांनी मराठी संस्कृतीला बर्‍यापैकी पडदा दिला आहे.

बाकी प्रश्न राहिला बिझनेसमनना मराठी आडनावे देण्याचा... तर ते आडात नाही तर पोहोर्‍यात कुठून यायचे? चित्रपट मुंबईत घडत असेल तर काम करणारी बाई मराठी असणे आलेच. हिमाचल प्रदेश, दिल्ली किंवा कश्मिरात घडणार्‍या चित्रपटात गंगूबाई दिसत नाही.

मराठी_माणूस's picture

4 Jul 2011 - 10:33 pm | मराठी_माणूस

जसे दिसते तसे उतरते हे म्हणणे बरोबर नाही. काही अपवाद वगळता मराठी प्रतीमा उजळु नये असाच प्रयत्न असतो.
अमोल पालेकर चे उदाहरण हे चपखल वाटत नाही . त्याला विशिष्ठ भुमिकाच दिल्या गेल्या (मध्यम वर्गीय मराठी).

मराठी कलाकाराना ग्लॅमर वाले रोल सातत्याने कधीही मिळाले नाहीत.

एका मुलाखतीत दिलिप प्रभावळकराना , त्यांच्या लगे रहो मुन्नभाइ चित्रपटाच्या अनुभवा बद्दल विचारताना मुलाखत घेणर्‍याने त्यांचे संजय दत्त बद्दलचे मत विचारताना अशा सुरात प्रश्न विचारला कि जणु काही प्रभावळकर हे खुप भाग्यवान कि ज्याना संजय बरोबर काम करण्याची संधी मीळाली. खरे तर ही संधी संजय साठी मोठी होती, प्रभावळकरांच्या पायापाशी बसुन शिकण्याची. संजयला असा प्रश्न विचारला जाईल ह्याची सुतराम शक्यता नाही.

किशोर कुमारने गायलेले मराठी गाणे ही जणू खुप मोठी गोष्ट असल्या सारखी चर्चा होते. त्याने आधि म्हणे अट घातली की मला ळ , ज (जन्म मधला) असे अक्षर नकोत. मग ते वगळुन तसे गाणे लिहले गेले. जणू काही त्याचे गाणे हा मराठी भाषेचा सन्मान होता. किशोर कधि अभिमानाने मि मराठी गाणे म्हटले आणि अजुन म्हणायचे आहे म्हणुन आग्रह धरला असे काही आठवत नाही. एखादा कलाकार कधीही एका कम्युनिटी पेक्षा मोठा असु शकत नाही (कलाकार म्हणुन किशोर बद्दल पुर्ण आदर आहे).

बेर्डे च्या हिंदीतल्या भुमिका ह्या तर अभिमानस्पद नाहीतच. कुणि म्हणेल अभिनय हा अभिनय असतो.

एक उदाहरण देतो. गोलमाल (नविन) गाजल्यावर , त्याचे अजुन काही प्रकार निघाले. अर्शद वारसीचा अभिनय , अजय पेक्षा सरस असुनही हिरो चि भुमिका अजय कडेच आहे . कारण तो हीरो आहे. दुय्यम भुमिका केल्याने ग्लॅमर ला धक्का बसतो .

खुपते तिथे गुप्ते ह्या कार्यक्रमात बर्‍याच मराठी कलाकारानि , हिंदीतील वातावरण मराठी लोकासाठी पोषक नसते हे उघड सांगीतले . ज्याना ते बोचते , ते त्याला टाळतात. बाकीचे अभिनय हा अभिनय असतो असे म्हणून, नोकर, गडी माणूस , असे रोल स्विकारतात आणि तशा प्रथा पाडायला मदत करतात.

बर्‍याचदा मराठी लोकांच्या हिंदी उच्चारा बद्दल आक्षेप घेतला जातो. परवा एका पेपर मधे कत्रीना ची मुलाखत वाचाताना, तिने स्वतः म्हटले आहे कि तीचे हींदि उच्चार आत्ता आत्ता थोडे सुधारात आहेत . ते तिच्या कामाच्या आड का येत नाहीत.

हिंदीतल्या एका दिग्गज अमराठी दिग्दर्शकाने म्हटले आहे की "ही अत्यंत खेदाची गोष्ट होती की, अनेक मराठी कलाकार गुणी असूनही त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत फारशी कदर केली जात नसे. " तरीही आम्ही चार दोन नावे फेकुन स्वतःच स्वत:ची समजुन काढुन घेतो.

सहज's picture

5 Jul 2011 - 8:42 am | सहज

बर्‍याचदा मराठी लोकांच्या हिंदी उच्चारा बद्दल आक्षेप घेतला जातो. परवा एका पेपर मधे कत्रीना ची मुलाखत वाचाताना, तिने स्वतः म्हटले आहे कि तीचे हींदि उच्चार आत्ता आत्ता थोडे सुधारात आहेत . ते तिच्या कामाच्या आड का येत नाहीत.

अहो "कत्रीना प्रमाणे" (हिरॉइन मटेरीयल) एखादी मराठी मुलगी असेल तर तिच्याही कामाच्या आड तिचे हिंदी (डबिंग)अथवा अभिनय येणार नाहीत हो. विचारा कुठल्याही मराठी मुलीला किंवा मुलाला.

एक तारा's picture

5 Jul 2011 - 10:51 am | एक तारा

सहमत

हुप्प्या's picture

4 Jul 2011 - 10:37 pm | हुप्प्या

अनेक सिनेमात मराठी नावाची पात्रे असतात पण त्यात मराठीपण नावालाही नसते. महाराष्ट्रात वाढलेला, मध्यमवर्गी, मराठी आडनाव लावणारा माणूस काहीतरी मराठी बोलेल की नाही? पण हिंदी सिनेमात तसे दिसत नाही. निव्वळ एक मराठी नाव निवडायचे. तसे नाव असणारा माणूस कशी भाषा बोलतो, वेषभूषा याचा अभ्यास शून्य.
उदा. ३ इडियटस मधला तो सायरस द व्हायरस. ह्याचे आडनाव म्हणे सहस्रबुद्धे असते. पण त्याच्यात लग्न अगदी उत्तर भारतीय पद्धतीचे! मराठीचा मागमूस नाही असे का? मग सहस्रबुद्धे कशाला हवा? शर्मा, वर्मा, चोप्रा, कपूर चालले असते की राव!
तेजाब मधला अनिल कपूर, गुलाम मधला आमिर खान, गर्दिश मधला अमरिश पुरी (पुरुषोत्तम साठे!), वास्तव मधला संजय दत्त. अनेक उदाहरणे आहेत. उगाचच मराठी नावे देण्यापेक्षा नायक, नायिकेकडून तसे दिसण्याची, वागण्याची तयारी करुन घ्यावी. अन्यथा दुसरे कुठलेतरी नाव निवडावे.

मी-सौरभ's picture

4 Jul 2011 - 11:57 pm | मी-सौरभ

स्वतः मुंबईकर जर मराठी संस्क्रुती जपत नसतील तर ....

परप्रांतियांची मक्तेदारी असलेल्या बॉलीवूड कडून ही अपेक्षा का?

हुप्प्या's picture

5 Jul 2011 - 12:16 am | हुप्प्या

एक म्हणजे मराठी माणूस मराठी संस्कृती जपत नाही हा शोध कसा लावला तुम्ही ?
दुसरे असे की एकाच्या चुकीमुळे दुसर्‍याची चूक ठीक होत नाही.
पात्राचे नाव सोडल्यास कुठल्याही कोनातून तो/ती मराठी वाटत नसताना अट्टाहासाने त्याला मराठी म्हणून खपवणे आणि मराठी माणसाने मराठी संस्कृती सोडण्याचा काहीही बादरायण संबंध लावत आहात.
सिनेमात दाखवलेले खोटे असले तरी अवास्तव असू नये, जगात जे घडते त्याच्याशी ताळमेळ असेल तरच ते पचनी पडते. उद्या मुघल काळातील सिनेमात बादशाह मोबाईलवर बोलताना दाखवला किंवा औरंगजेबाचे पात्र बंबईया हिंदी बोलताना दाखवले तर कसे वाटेल?
एखाद्या घरातील रामूकाका छाप घरगडी नेहमीची दीनवाणी भाषा सोडून अस्सल अमेरिकन वा ऑस्ट्रेलियन हेल काढून इंग्रजी बोलताना दाखवला तर चालेल का?
दलिप ताहिल सारख्या माणसाला मराठी माणूस म्हणून खपवला की असा रसभंग होतो. भात खाताना दाताखाली खडा आला की जसे होते तसाच.
आता भातात खडा आल्यावर तक्रार केली तर अहो उपम्यातही खडे असतात असे स्पष्टीकरण द्याल का?

मुक्तसुनीत's picture

5 Jul 2011 - 8:00 am | मुक्तसुनीत

"पॉप्युलर कल्चर" या नावाखाली हिंदी चित्रपटांमधे जे दाखवले जाते त्याला कितपत महत्त्व द्यायचे ? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बटबटीत , स्टिरिओटाईप्स्नी बुजबुजलेल्या , उथळपणाने भरून वाहिलेल्या एकंदर मांदियाळीत "आमच्या समाजाचे प्रतिबिंब नीट पडत नाही" असे म्हणणे म्हणजे चिखलात आपला चेहरा नीट दिसत नाही असे म्हंटल्यासारखे आहे. मराठी समाजाला योग्य चित्रणावाटे "न्याय" कुणी द्यायचा ? करण जोहर-यश चोप्रा-बडजात्या वगैरे वगैरे लोकांनी की सलमान खान-आणि-इतर पोपट लोकांनी ? काय दिवे लावले यांनी म्हणून यांच्याकडून मराठी समाजाचंच नव्हे तर कशाचंही यथार्थ चित्रण होईल अशी अपेक्षा करायची ?

सविता's picture

5 Jul 2011 - 11:04 am | सविता

सुपरलाईक!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jul 2011 - 11:30 am | llपुण्याचे पेशवेll

फोडलंस मित्रा फोडलंस. ;) (आमचाही एक स्टिरीओटाईप प्रतिसाद)

पर्फेक्ट प्रतिसाद.

जाताजाता: अस्सल मराठी वातावरण असलेला एक सिनेमा म्हणजे सई परांजपेंचा 'कथा'.

रुपी's picture

9 Jul 2011 - 2:04 am | रुपी

सहमत!
हिंदी चित्रपट असे काय लागून गेले की त्यात मराठी संस्कृती दाखवत नाहीत म्हणून गळे काढायचे?
आता आमीर खान बघा ना (मला स्वतःला त्याचं काही कौतुक नाही, पण आत्ता उदाहरण हेच आठवलं). तो बॉलीवूडच्या कुठल्याही पुरस्कार समारंभाला जात नाही (ऑस्करला जातो .. असो) किंवा महत्त्व देत नाही. शेवटी आपण कुणाकडून काय अपेक्षा ठेवायच्या हेही आपणच ठरवायला पाहिजे ना?

असेही ही चोप्रा वगैरे मंडळी भारताबाहेर वसलेल्या पंजाबी लोकांना आवडतील असे चित्रपट काढतात. त्यामुळे त्यात तशी पात्रे दिसणे साहजिकच आहे. यांना कुणी भारतातील वेगवेगळ्या संस्कृती चित्रपटांमधून जगाला दाखवण्याचा मक्ता दिलेला नाही. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी हे काम करण्यासाठी कुणी मराठी माणूस का पुढे येत नाही याची चर्चा केलेली जास्त बरी नाही का?

इथे आपल्यालाच हिंदीचं फार कौतुक... अजय-अतुल आता हिंदीत जाणार याला आपण त्यांना 'जोगवा' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याहूनही जास्त महत्त्व देणार. सध्या तर किती तरी मराठी चित्रपटांमधून एक तरी हिंदी गाणं असतं (याची सुरुवातपण अजय-अतुलच्याच 'चमचम' पासून झाली असवी). कितीही मराठी कार्यक्रमांत निवेदक उगीचच त्यांची इंग्रजी झाडत असतात. मराठी शिकण्याची इच्छा असणार्‍या राहूल सक्सेनाला (हाय रे देवा - इथेही तेच घासून घासून गुळगुळीत झालेलं नाव) ती पल्लवी जोशी 'तुला मराठी शिकायचंय तर ते माझ्याकडून तरी नक्की नको शिकूस' हे अभिमानाने सांगते... ज्या गोष्टीची या क्षेत्रात असलेल्या मराठी लोकांनाच कदर नाही (अपवाद असतीलही) त्याची अपेक्षा दुसर्‍यांकडून का ?

जाता जाता - तशी चित्रपटांमध्ये नावंही तीच तीच असतात. पूजा, राज, राहुल, प्रेम हीच मुख्य पात्रांची नावे का? बाकी सगळ्यांनी काय घोडं मारलंय कुणाचं? आमची नावं काय आई-वडिलांनी विचार करून नाही ठेवली का?

विजुभाऊ's picture

5 Jul 2011 - 11:13 am | विजुभाऊ

उत्तरेकदील मुलुखात " बाई" म्हणजे कामवाली बाई असेच समजतात
मध्य प्रदेशात इंदोर वगैरे भागात घरगडी लोकांची आडनावे हमखास पवार ,जाधव अशी आढळतात
मराठी लोकांत ज्या वेळेस ठकराल , सक्सेना , सिंघानिया वगैरे आडनावाचे घरगडी आढळतील त्यावेळेस कदाचित ही परिस्थिती बदलेली असेल

मालोजीराव's picture

5 Jul 2011 - 12:40 pm | मालोजीराव

मध्य प्रदेशात इंदोर वगैरे भागात घरगडी लोकांची आडनावे हमखास पवार ,जाधव अशी आढळतात

हे सांगू शकत नाही....पण हो इंदूर,ग्वाल्हेर,गुना,राजगढ,धार या भागात पवार,जाधव,शिंदे,चव्हाण,बागल इ. राजघराणी किंवा सरकार घराणी आहेत...

-महाराजा श्रीमंत सर उदोजीराव आनंदराव पवार बहादूर

देखणेपणा हा किमान गुण मेन हिरोच्या भूमिकेला लागतो.

मिलिंद सोमण वगळता (मर्दानी) देखणेपणा असलेले मराठी मुलगे पटकन आठवत नाहीत. अजिंक्य देव कदाचित या क्याटेगरीत ओढूनताणून आणता येईल (आला असता एकेकाळी). आताच्या पुरुषमंडळींपैकी सुबोध भावे, लोकेश गुप्ते वगैरे देखणे म्हणता येतील, पण लार्जर दॅन लाईफ हिरोच्या भूमिकेत ते कितपत फिट होतील सांगता येत नाही.

बाकी प्रशांत दामले, लक्ष्या, अशोक सराफ, विजय चव्हाण, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अशा मराठीतल्या "हिरो" मटेरियल्सचे चेहरे आठवून पहावेत. (अभिनय सर्वांचाच उत्कृष्ट आहे असे सोपेपणासाठी धरु)

यापैकी एकालाही हिंदी सिनेमासृष्टीतला मेन हिरो म्हणून भूमिका देण्यासारखी अंगयष्टी (चण, सौष्ठव इ.इ.) आणि चेहरा नाही हे कबूल करणं जड जाऊ नये. यांना केवळ मराठीतच समहाऊ ते स्थान घेता आलं.

ऑलरेडी हिंदीत आलेले श्रेयस तळपदे आणि रितेश देशमुखही बरेच लहानखुरे आणि साधेसुधे दिसणारे आहेत. त्यांनाही अशी मुख्य भूमिका एखाद्याच आर्ट फिल्ममधे वगैरे मिळू शकेल.

अतएव मराठी मुलांची फिजिकल बिल्ड आणि चेहरेपट्टी बॉलीवूड (बॉलीवूडच का कोणत्याही सिनेलाईनीच्या) भूमिकांच्या "मुख्य हिरो" च्या जागी कल्पणे जड जाते.

आता हा साचा मोडावा आणि सामान्य चेहर्‍याचेही हिरो बनवावेत असं म्हणता येईल. पण ही खूपच वेगळ्या ध्येयाची भाषा झाली. ज्याला सिनेमा अ‍ॅज अ व्यवसाय करायचाय तो हे असलं करणार नाही.

त्यामुळे उपरोक्त सर्वजणांना एकतर साईडहिरो आणि अन्य दुय्यम रोल्स उरतात किंवा मग जिथे देखणेपणा आणि बॉडीची जरुरी नाही असे चरित्र रोल्स.

तिथे मग पूर्वी नाना पाटेकर, श्रीराम लागू, विक्रम गोखले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मोहन जोशी अशा अनेकांनी वर्णी लावली आहे. ते खूप अ‍ॅक्सेप्टही झाले. पण चरित्र भूमिका, हिरॉईनचा बाप, खलनायक, पोलीस कमिशनर वगैरे रोल्स मधे. यातही नाना, डॉ. लागू, विक्रम गोखले, मोहन जोशी यांना माकडचेष्टावाली किंवा नोकराची वगैरे भूमिका करताना पाहिल्याचे आठवत नाही. ते आब राखूनच होते. पण "हिरो" नाही.

उलट नजरेने पाहू. जॉनी लिव्हर, केष्तो, शक्ती कपूर, हल्ली राजपाल यादव यांनी बहुतेक वेळा बिनाहिरो वाल्या (म्हटलं तर) चीप कॉमेडी भूमिकाच जास्त केल्या आहेत आणि हे कोणी मराठी नाहीत.

आता मराठी मुलींकडे वळू.. :)

मराठी मुलींमधे हिरॉईनला आवश्यक लेव्हलचे सौंदर्य, नाजुकपणा जास्त प्रमाणात सापडत असल्याने क्लासिकली आणि आजपर्यंत बर्‍याच मराठी मुलींनी हिंदीत मेन हिरॉईन म्हणून व्यवस्थित करियर केली. तनुजा, नूतन, लीना, माधुरी, सोनाली बेंद्रे, ममता, उर्मिला, काही प्रमाणात सोनाली कुलकर्णी अशा ज्यांच्यात ते पोटेन्शिअल होतं त्या सुपरहिट झाल्यासुद्धा.

मराठी वगैरे असं काही बघून कोणी सिनेमाचा बिझनेस करत असतील असं मुळीच वाटत नाही. ज्याला त्याला लायकीप्रमाणे आणि फिजिकल अ‍ॅपिअरन्स प्रमाणे भूमिका मिळतात. एक रजनीकांत (केवळ अभूतपूर्व लोकप्रियतेमुळे) आणि कमल हसन सोडला तर हिंदी मेन हिरोंमधे दाक्षिणात्यांचंही प्रमाण काही फार नाही. इव्हन रजनीचे हिंदीतले फार कमी रोल्स एकमेव हिरो म्हणून असावेत. बहुतांश वेळा तोही साईडहिरोच आहे. हे सर्व पाहता मुद्दाम मराठी माणसाला नोकर किंवा नॉन हिरो म्हणून दाखवतात वगैरे भावना कमी होईल.

आपण मराठी माणसे पॅरेनॉईड आहोत असे कधीकधी वाटते.

मराठी_माणूस's picture

5 Jul 2011 - 1:19 pm | मराठी_माणूस

रविन्द्र महाजनी, यशवंत दत्त, चंद्रकांत सुर्यकांत हे काय मर्दानी वाटत नव्हते ? मर्दानगी ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही.

अजय देवगण, सुनील शेट्टी , शशीकपुर , अजुन कितीतरी ठोकळे , ह्यांच्यात काय "लार्जर दॅन लाईफ" आहे ?

आता आपणच दळ्भद्री विचार करणार असु तर नाईलाज आहे ?

"आम्ही शिवाजी राजे ......" चित्रपटात ह्याचि थोडी झलक दाखवली आहे , मराठी नाव चालणार नाही म्हणून दुसरी नावे घेतली जातात. हा चित्रपट महेश मांजरेकरांचा आहे , आणि त्यानी हींदीत काही दीवस काढले आहेत.

आपण मराठी माणसे पॅरेनॉईड आम्ही तर अजिबात नाही, स्वाभीमानी जरूर आहोत.

चिरोटा's picture

5 Jul 2011 - 1:38 pm | चिरोटा

आपली डिमांड काय आहे? मराठी हिरो हिंदी चित्रपटात पाहिजेत की मराठी संस्कृती हिंदी चित्रपटात दिसत नाही ती दिसली पाहिजे ही?
वर मराठी हिरो का नाहीत त्याचे उत्तर दिले आहेच. हिंदीत हिरो म्हणजे गौर वर्ण,५'१०'' उंची आणि बर्‍यापैकी शरीरयष्टी अशी व्याख्या आहे. अभिनय नंतर येतो. आता सलमान,शशी कपूर वगैरे उदाहरणे नकोत. त्यांचे घराणेच चित्रपटसृष्टीत आहे.पंजाब्,हरयाणा,राजस्थान वगैरेचे अनेक लोक त्या हिरोच्या व्याख्येत बरोबर बसतात. आपण्,दाक्षिणात्य,बंगाली, गुजराती त्या व्याख्येत बसत नाही.दॅट्स ईट.
हिरॉईन म्हणजे ५'३'' ते ५' ६'' उंची, सडपातळ बांधा आणि फोटोजेनिक चेहरा ही व्याख्या आहे. त्या व्याख्येत मराठी/बंगाली मुली बसायच्या.

मक्तेदारी नाही हो. पण प्रमाण कमीजास्त असू शकतं ना भौगोलिक समाजात..? हिरो किंवा तत्सम रोल का धरावे? सर्वोच्च पदावरील आशा लता या सिनेसृष्टीतच वेगळ्या रोलमधे आहेत. त्यांना का मराठी म्हणून नाही मागे ठेवले? इंडस्ट्रीची तशी पद्धत किंवा कट असेल तर? तेजाब फेम एन चंद्रा (नार्वेकर) का प्रसिद्ध झाले?

रामचंद्र चितळकर, लक्ष्मीकांत इतके का गाजले ? देबू देवधर टॉप सिनेमॅटोग्राफर का मानले जावेत?

तरीही असं काही मराठी म्हणून वाटण्यालाच पॅरेनॉईया म्हणतात. की न्यूनगंड म्हणायचा?

मी मराठीत कोणी देखणे असूच शकत नाही असं म्हटलं नाही. मिलिंद सोमणला अ‍ॅक्नॉलेज केलेच ना? रविंद्र महाजनींचा उल्लेख राहिला. आठवले नाही त्या वेळी. त्यांच्याविषयी विधान मान्य.. (अर्थात हे सर्व सब्जेक्टिव्ह आहे आणि मुख्य म्हणजे गवि किंवा मराठी माणूस या व्यक्तींपेक्षा सिनेनिर्माते/दिग्दर्शक यांच्या परसेप्शनला इथे महत्व आहे. तरीही आपण जनरलायझेशन करण्याचा प्रयत्न करत आहोत. केवळ कारणे शोधण्यासाठी.. कारण मराठी हा बेस कोणाला नाकारण्यासाठी असू शकत नाही हे हिरॉईन्सवरुन सिद्ध झाले आहे..)

यशवंत दत्त आणि सूर्यकांत यांचे फोटो इथे डकवतोय. हिंदी हिरो या कन्सेप्टशी ताडून आपापले मत बनवावे.

मराठी_माणूस's picture

5 Jul 2011 - 1:55 pm | मराठी_माणूस

वा रे हुशारी.

असे कपडे धर्मेंद्र, जीतेंद्र ह्याना घातले तर ते सुध्दा तसेच दीसतील.

हे म्हणजे "आपल ते कारट आणि दुसर्‍याचा तो बाळ्या " असे झाले.

रामचंद्र चितळकर, लक्ष्मीकांत इतके का गाजले ? ह्यानि आडनावे का नाही वापरली ?

हेहे :) :) काहीसे मान्य. पण तुमच्या मनात असलेली ती रुबाबदार तरणीबांड हिरोसारखी प्रतिमा जालावर उपलब्ध असल्यास प्लीज शेअर करा.

असो..सूर्यकांत किंवा दत्तसाहेब कसे योग्य नव्हते असे एकेका व्यक्तीविषयी मुद्दे मांडायचे नसून एकूण "मराठी" हा बेस असंख्य गोष्टींसाठी उगीच धरला जातो एवढेच म्हणायचे होते.

किंवा मग असा विचार करु, की केवळ "मराठी" या बिरुदामुळे टाळले जाणे किंवा खास काही मिळणे याला काय मूळ कारण असावे बरे? याचा काही अंदाज ?

बादवे.. वर काहीसे मान्य केले आहे खरे पण प्रश्न उरला आहे.

असे कपडे धर्मेंद्र, जीतेंद्र ह्याना घातले तर ते सुध्दा तसेच दीसतील.

असे तुम्हाला वाटले.

गंमत पहा.. म्हणजे मराठमोळे साधे कपडे हा "तसे" दिसणारा प्रकार म्हणायचा का ? की जो घातल्यावर धर्मेंद्र जितेंद्र हे (निर्विवाद हँडसम ?!?!) हिरो ही "तसे" (बावळट ?!?!?) दिसतील??

असो.. :)

मराठी_माणूस's picture

5 Jul 2011 - 2:28 pm | मराठी_माणूस

मला फक्त पेहरावा प्रमाणे प्रतीम दिसेल असे म्हणायचे होते.

मराठमोळे म्हणजे बावळट वगैरे हे तुमचे गॄहीतक असावे , आपल ते कारट........ च्या सारखे

पेहेराव म्हणजे? सूर्यकांतसाहेबांच्या फोटोत चांगला रुबाबदार मराठमोळा फेटा तर आहे..

बावळट शब्द नको.. तो माझा शब्द हे ठीक.

पण असे कपडे घालून जितेंद्र धर्मेंद्र "तसा"च दिसेल म्हणजे कसा? हे मराठमोळे कपडेच आहेत ना?

पेहरावाप्रमाणे दिसेल म्हणजे उदा गावकरी (फेटा इ.इ.) ड्रेस घातल्यावर मनुष्य देखणा असूनही देखणा दिसणार नाही का ?

मला वाटतं मुद्दा तुम्हाला पटला आहे. त्यामुळे आता वादासाठी वाद घालत नाही.

रामचंद्र चितळकर, लक्ष्मीकांत इतके का गाजले ? ह्यानि आडनावे का नाही वापरली ?

तो त्यांचा पॅरेनॉईया असावा असा एक अंदाज करता येईल. लावायला हवे होते बिनधास्त नाव.

पण त्यांना कामे देणार्‍यांना त्यांची खरी मराठी नावे आणि मराठीपण माहीतच नव्हते असे म्हणणे अवास्तव ठरेल.

तरीही त्यांना मोठ्या संधी मिळाल्याच ना?

आताशाही अजय अतुल यांनी एक हिंदी सिनेमा संगीतबद्ध केला आहे. यापुढेही त्यांना हिंदीत संधी मिळत आहेत. त्यांनी मराठीला संगीत देतानाही आडनावे लावलेली नाहीत आणि हिंदीतही कदाचित तेच कन्व्हेन्शन पाळतील. आता त्यांना नाव लपवल्याने काम मिळाले हा भाबडेपणा झाला.

एन. चंद्रा तर प्रोड्युसरही होते. ते तर संधी "देणार्‍या" जागी पोचले होते... अशा वेळी तिथे पोचल्यावर तरी नाव लपवण्याचा उद्देश काम मिळवणे असा असू शकत नाही.

दुसरा एक अंदाज. तसेही सिनेसृष्टीत छोटी नावेच वापरतात. त्याकाळी आणि काही प्रमाणात आत्ताही धर्मेंद्र देओल, जितेंद्र कपूर अशी पूर्ण नावे न लावला धर्मेंद्र जितेंद्र लावणारे सर्वत्रच अनेकजण होते.

साधना, अमिता, प्राण, जगदीप, प्यारेलाल, आणि अशा काही अमराठी अभिनेते/संगीतकार वगैरेंनीही पूर्ण नावे लावलेली नाहीत.

आणि आशा भोसले, लता मंगेशकर, अमोल पालेकर अशांनी मोठ्या अभिमानाने लावलीही आहेत.

धमाल मुलगा's picture

5 Jul 2011 - 2:34 pm | धमाल मुलगा

व्ही.शांताराम= शांताराम वणकुद्रे
ह्यांच्याबद्दल काही असं कारण होतं का? एकुणच नावांची जंत्री वाचल्यावर पटकन हे नाव समोर आलं म्हणून विचारलं झालं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Jul 2011 - 5:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्यांच्या नावाचे अनेक विचित्र उच्चार होऊ शकत होते. त्यामुळे गोंधळ उडू नये म्हणून त्यांना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच बाबुराव पेंढारकरांनी* हा सल्ला दिला होता.
(*धुंद मधुमती गाण्यात कीचकाच्या भूमिकेत आहेत ते, नाव कदाचित चुकले असेल, बरेच दिवस झाले ही माहिती वाचून)

गवि's picture

5 Jul 2011 - 2:14 pm | गवि

प्रकाटाआ

मला तरी वर दिलेला सूर्यकांत ह्याचा फोटो ऐन तारुण्यातला वाटत नाहिये. आपण त्यांच्या कोल्हापूरमधील घरातील संग्रहालयाला भेट दिली असेलच, तर तेथील त्यांचे ऐन जवानीतले 'मर्दानी' सौंदर्य दाखवणारे फोटो आठवून पहावेत ही विनंती.

रवींद्र महाजनी ह्यांची दणकट शरीरयष्टी, उत्तम अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्व पाहता ते हिंदी फिल्मसृष्टीत हिरो कसे बनले नाहीत ह्याचंच आश्चर्य वाटतं.

नितिन थत्ते's picture

5 Jul 2011 - 9:41 pm | नितिन थत्ते

रविंद्र महाजनी आणि अजिंक्य देव दोघेही हिंदीत "हिट आणि हॉट" टाइपच्या सिनेमात येऊन गेले. अजिंक्य देव तर त्यात व्हिलन होता.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jul 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार

मराठी संस्कृती म्हणजे काय ? आणि तीला स्थान द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे ?

आशा काळे, अलक कुबल (एक उच्चार बुकल असा देखील आहे म्हणे )ह्यांच्या चित्रपटातुन मराठी संस्कृतीचे वारंवार आणि साग्रसंगीत दर्शन घडायचे म्हणे. मग त्यांचे चित्रपट धडाधड का पडले ? त्यांना हळदी कुंकवाची दुकाने म्हणुन का हिणवले गेले असावे ?

नितिन थत्ते's picture

5 Jul 2011 - 1:04 pm | नितिन थत्ते

>>अलक कुबल (एक उच्चार बुकल असा देखील आहे म्हणे )

एक उच्चार कुबट असाही ऐकला आहे. :)

शाहीर जी,

मराठी संस्कृती व मराठी व्यक्तिरेखा यांना कायमच दुय्यम स्थान

उचापतखोरपणा कमी, पडखाऊ वृत्ती.

मुंबईच्या कोलाहलात हिंदीला संभाषणात मराठीपेक्षा मानाचे स्थान देणाऱ्या मराठी समाजाला पैशाचे बळ नाही, त्यामुळे वैचारिक व अर्थिक कोंडीत अडकलेला मराठी माणूस बावळट शिपाई, घरगडी, मोकलकरीण किंवा सरळ मनाचा बाप असा भुमिकेमधे पहायला लागतो.
असेच वाईट वाटते ते बंगाली माणसांचे. त्यांच्या व्यक्तीरेखा ढगळ धोतरातील पान चबाऊ? बोंधू रे.....की झाले...

नितिन थत्ते's picture

5 Jul 2011 - 4:36 pm | नितिन थत्ते

पैशाचे बळ हे कारण नसावे. अन्यथा पारश्यांचा उपयोग बावळट दाखवून केवळ विनोदनिर्मितीसाठी झाला नसता.