काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार?
वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता. जर संस्थेचे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचे हेतु स्पष्ट माहिती असतील तर मदत करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेणे सोपे होईल इतकेच. या संस्थेचे जाहिरात कँपेन फार परिणाम कारक आहे, हे ध्यानात ठेवलेले बरे.
मला माझ्याकडून कोणतेही बेलगाम आरोप व्हायला नको आहेत. (त्यामुळे मी योग्यरित्या लेखन करणे आवश्यक समजतो. याला पॉलिटिकली करेक्ट असेही म्हणता येईल का?)
संस्थेच्या कामाचा अवाका पाहिलात तर माझी भीती का आहे हे लक्षात येईलच. आज केंद्र सरकार मध्ये
जी संस्था आपल्या बळावर केंद्रातील ३०% पेक्षा जास्त मंत्री पदे ख्रिश्चनांकडे घेऊ शकते तीची ताकद किती मोठी असेल?
मुळ लेखात मी काही माहिती दिली होती, जसे सद्य ख्रिस्ती मंत्री
(Minister of Information and Broadcasting)
(Ministry of Social Justice and Empowerment),
(Ministry of Water Resources and Ministry of Minority Affairs)
(Ministry of Rural Development).
यांच्याकडे असलेली मंत्रीपदे पाहीलीत तर संस्थेचे सध्या असलेले कार्य आणि मंत्रीपदे यात व्यवस्थित सुसंगती आढळते. ज्या योगे एखाद्या विशिष्ट (ख्रिस्ती?) समुहाला त्याचा फायदा होऊ शकतो असे मानायला जागा आहे. या यादी व्यतिरिक्त अजून अनेक मंत्री आहेत.
म्हणजेच संस्थेने राबवलेले ख्रिस्ती नेतृत्त्व उभे करण्याचे धोरण फळे देत आहे असे मानायला जागा आहे. तसे पाहिले तर हे धोरण फार जुने आहे. राजाला किंवा गाव प्रमुखालाच ख्रिश्चन केले की इतर आपोआप होतात या मार्गावर अजूनही हे काम सुरू आहे असे लक्षात येते.
टीम गोवा ने लिहिलेल्या पोर्तुगीज आक्रमणाच्या लेखांकात हीच कार्यपद्धती वाचली आहे. त्या काळात झालेल्या धर्मांतराच्या घटनांमध्ये अशाच प्रकारे नेतृत्त्वालाच ख्रिस्ती करण्याचे प्रकार दिसतात. मात्र आज शिक्षण, आर्थिक प्रगती आणि आरोग्य यांच्या नावाखाली हे काम फार पॉलिश्ड स्वरूपात चालले आहे.
ख्रिस्ती समाजातील नेतृत्त्वच राजकारणातही आले पाहिजे तरच आपला ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवता येईल हे धोरण स्पष्ट आहे.
सध्या दोन लाखापेक्षा जास्त मुलांना ही संस्था प्रशिक्षण देते आहे. अर्थातच संस्थेची तत्त्वे पाहिलीत तर हे प्रशिक्षण कोणत्या स्वरूपाचे आहे हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. येत्या काही वर्षात हे दोन लाख प्रशिक्षित काय करतील अंदाज बांधणे अशक्य नाही!
ख्रिस्ती धर्मांतराच्या पद्धतशीर कार्याविरुद्ध आवाज उठवणार्या हिंदू संस्था दिसून येतात. त्या विरुद्ध काहीही करू शकत नाहीत हे ही जाणवते.
पण मुस्लीम समाजातही हे काम पद्धतशीरपणे चालते आणि त्याची काही वाच्यताही होत नाही हे नमूद केलेच पाहिजे. म्हणजेच दोन्ही समाजांना येथे एकत्र येऊन काही काम करता येणे शक्य आहे. दोघांनाही सारखीच भीती आहे.
प्रतिक्रिया
23 Jun 2011 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार
जिझस तुम्हाला सदबुद्धी देवो.
आमेन !
23 Jun 2011 - 11:40 am | आंसमा शख्स
खुदा माझ्याकडे पाहायला समर्थ आहे. धन्यवाद!
23 Jun 2011 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार
उत्तम !
बाकीच्यांकडे देखील लक्ष द्यायला त्यांचे त्यांचे देव समर्थ आहेत. तुम्ही उगाच गळे काढू नका.
येशुचा सच्चा पाईक
परा
23 Jun 2011 - 1:16 pm | वाहीदा
येशुचा सच्चा पाईक
परा,
मग तू तुझ्या cafe त बिड्या का ओढत बसतोस ?
पाईप ओढत जा ... पाईप ही पाईक होण्याच्या जवळ असते ;-)
23 Jun 2011 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार
सध्या आर्थीक परिस्थीती वाईट आहे :(
तू माझ्याकडून घेतलेले २०,०००/- परत केलेस की मग लागीन पाईप , चिरूट वैग्रे ओढायला. हुक्का सुद्धा आणिन एक.
23 Jun 2011 - 2:12 pm | वाहीदा
बाब्बो ! कसल्या लहानपणी खेळलेल्या गोट्यांचा, पैशात हिशोब लावत बसलास ?
हलकटा
२०,०००/- च्या ऐवजी २०,००० दगडे हाणीन डोक्यात ;-)
23 Jun 2011 - 5:19 pm | कुंदन
बापरे.....
ठाण्याची की काय ग तु ?
23 Jun 2011 - 3:47 pm | पियुशा
ख्रिस्ती समाजातील नेतृत्त्वच राजकारणातही आले पाहिजे तरच आपला ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवता येईल हे धोरण स्पष्ट आहे.
हेच वाक्य काहि मुस्लिम राष्ट्राला देखिल लागु पड्ते ना ,(अफगाणिस्त्तान्,पाकिस्तान)
पुर्ण जगात "अल्ला" हा एकच धर्म प्रस्थापित व्हावा म्हणुन बळ- बळ जिहाद च्या नावाखाली मुस्लिम करवुन त्याना दहशतवादाच्या आगित झोकुन द्यायला प्रव्रुत्त करणार्या काहि मुस्लिमाबद्दल आपले (लेखकाचे )काय मत आहे जाणून घ्यायला आवडेल :)
निदान ख्रिस्ति लोक धर्मप्रचारासाथि दहशतवादि कारवाया ,बॉम्ब हल्ले ,अपहरण करुन निष्पाप जिवान्चे बळी तरी घेत नाहीत.
23 Jun 2011 - 9:56 pm | शिल्पा ब
अहो मैडम, मग तर इथे थयथयाट सुरु होईल. ख्रिश्चनांच्या बाबतीत तितका होणार नाही हे ते जाणून आहेत. बालीशंच बरं का तुम्ही!!
23 Jun 2011 - 11:42 am | शिल्पा ब
तुम्ही ख्रिश्चन लोकांच्या फारच मुळावर उठलात बॉ!!! एका दिवसात दोन लेख!! बाकी केंद्रात एक ख्रिश्चन स्त्री खेळ चालवतेय तर मंत्री ख्रिश्चन का नसतील? वोट बँक नको का? बाकी धर्मांतर मग ते बळजबरीने असो वा फसवणुकीने किंवा धाकटपटशाने असो मिशनरी या कामात तरबेज आहेत, मग ते भारतात असो का अफ्रिकेत असे ऐकुन आहे. पण मग या कामात मुसलमान मागे राहताहेत म्हणून एवढी चिंता वाटते का?
23 Jun 2011 - 11:43 am | JAGOMOHANPYARE
कसेल त्याची जमीन, पोसेल त्याचा धर्म.. कुणी काही करु शकत नाही
23 Jun 2011 - 11:45 am | शिल्पा ब
हे असे आपले हिंदु बांधव!!! कसा वाढणार धर्म?
23 Jun 2011 - 1:47 pm | JAGOMOHANPYARE
हिंदु बांधवानी ताळागाळातील लोकाना चांगले आयुष्य जगायला मदत करावी, म्हणजे ते दुसर्या धर्मात जाणार नाहीत, असे मला सुचवायचे आहे......
बाकी, खुदा गवाह वाल्यानी धर्मांतराबाबत गळा काढणे म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली चली हज असेच म्हणावे का? :)
23 Jun 2011 - 11:49 am | चिरोटा
मायबाप सरकारात एकूण ४४ कॅबिनेट मंत्री आणि साधारण ३५ राज्यमंत्री आहेत. म्हणजे एकूण ८० धरुया. मग त्यात वर उल्लेख केलेले फक्त ४/५. हे सगळेच जण संस्थेने केलेल्या कामाने भारावून ख्रिश्चन झाले? माझ्या माहिती प्रमाणे वायलर रवी वगैरे जन्मानेच ख्रिश्चन आहेत.
नक्की 'भिती' काय ते अस्मा ह्यांनी स्पष्ट करावे.
23 Jun 2011 - 12:00 pm | आंसमा शख्स
असे कसे मी म्हणेन?
कुनी भारावून ख्रिश्चन झालेले नाही. पण या नेटवर्कचा उपयोग होत असावा. अन्यथा या संस्थेने लिडरशीप ट्रेनिंगवर इतका भर कशाला दिला असता?
त्यांची खाती पाहा काय सांगतात ते? काहीच सुसंगती दिसत नाही का?
23 Jun 2011 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार
युसुफ युहान्नाच्या धर्मांतराबद्दल देखील असेच प्रवाद ऐकले आहेत :) त्याच्यावर देखील जबरदस्तीने इस्लाम लादल्याचे ऐकुन आहे. त्याविषयी आपली मते ऐकायला उत्सुक आहे.
23 Jun 2011 - 12:37 pm | चिरोटा
सुसंगती मानावी तशी आहे. Ministry of water resources मध्ये कुठल्याही धर्माचा मंत्री झाला तरी काय फरक पडणार आहे? कोळसा खात्याचा मंत्री कोणी झाला ख्रिश्चन तरीही असेच काहीतरी म्हणता येईल. असो.
Ministry of rural develoment मध्ये ईलासराव देशमुख आहेत. ते हिंदुच आहेत ना?ईतर राज्यमंत्र्यांपैकी अगथा संगमा ख्रिश्चन आहेत. पण त्या ख्रिश्चन आहेत म्हणून तिथे आहेत असे म्हणण्यापेक्षा त्या 'साहेबांच्या' पक्षातल्या आहेत म्हणून त्यांची तिकडे वर्णी लागली असावी.
http://rural.nic.in/i1.htm
23 Jun 2011 - 11:34 pm | अप्पा जोगळेकर
सुसंगती मानावी तशी आहे.
असेच म्हणतो. सुतावरुन स्वर्ग गाठण्याचे धंदे वाटतात.
23 Jun 2011 - 12:59 pm | सूड
डोक्यावरुन गेलं आहे.
23 Jun 2011 - 5:42 pm | अमोल केळकर
सहमत :)
अमोल केळकर
23 Jun 2011 - 7:47 pm | भडकमकर मास्तर
कसेल त्याची जमीन, पोसेल त्याचा धर्म.. कुणी काही करु शकत नाही
हे जागोजींचे वाक्य फार आवडले...
सुप्परलाईक
23 Jun 2011 - 8:15 pm | अमित देवधर
ही फारच विशेष आणि सहसा उजेडात येत नसलेली माहिती आहे. शिवाय हा विषय गंभीर असला तरी त्याचं गांभीर्य लोकांच्या लगेच लक्षात येत नाही.
हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद!
23 Jun 2011 - 11:00 pm | पैसा
ही माहिती बर्याच जणाना विचित्र वाटेल, पण गोव्यात अनेक ख्रिश्चन कुटुंबात गरीब मुलीना कागदोपत्री दत्तक घेतात आणि ख्रिश्चन धर्माची दीक्षा देऊन घरात राहणारे नोकर म्हणून नंतर वागवतात.
तसंच एका धार्मिक संस्थेतर्फे बिहार झारखंडमधून मुलीना गोव्यात आणून ख्रिश्चन कुटुंबांमधे कामाला ठेवलं जातं. या मुली हळूहळू मालकांबरोबर चर्चमधे जातात आणि मग ख्रिश्चन धर्म स्वीकारतात. -
24 Jun 2011 - 7:08 am | आंसमा शख्स
मी हे उदाहरण देणार होतो. पण मी एकांगी माहिती देत आहे असा आरोप माझ्यावर होईल म्हणून दिली नाही. यात बंगाल मधून आलेल्या मुस्लीम मुलींचाही समावेश आहे.
24 Jun 2011 - 11:29 am | मुलूखावेगळी
@ आस्मा
आपण वर नमुद केलेच आहे
२-३ दिवसांपुर्वीच ह्या विषयावर चर्चा झाली आणि असेच कळले कि असाच प्रकार मुस्लीम समाजातही चालतो. लोकसंख्या वाढ्वायला तरुण मुलांना परधर्मीय मुलींशी विवाह केल्यास त्यांना स्पोर्ट बाइक अशीकाही प्रलोभने दाखवतात, वगेरे......
हे खरे आहे का?
तुम्हांला ह्याबद्दल काही आधिक माहिती असेल तर ह्यावर उजेड टाकावा.
24 Jun 2011 - 5:54 pm | llपुण्याचे पेशवेll
मुस्लिम धर्म वाले लव्ह जिहाद म्हणतात त्याला. ब्राम्हण मुलीशी जमवणार्याला ५ लाख, दलित मुलिसाठी २ लाख वगैरे बक्षिसे असतात. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर चालते हे. कोकणामधे हिंदू मुलीनी मुसलमानाशी लग्नं करण्याचे प्रकार फार वाढले आहेत. गांभिर्याने पाहीले पाहीजे याकडे. काय म्हणता?
24 Jun 2011 - 8:49 pm | शिल्पा ब
हो, पण अशी काय वेळ आली कि या मुली मुसलमानांशी लग्न करायला तयार होतात? काहीतरी कारण असेलच ना?
24 Jun 2011 - 9:09 pm | मुलूखावेगळी
व्यनीतुन सांगतलेय, ते कारन ज्यांनी मला सांगितलेय ते ऑफिशियल असेलच असे नाही
24 Jun 2011 - 10:08 pm | आनंदयात्री
आमची उत्सुकता कशी शमावी आता ?
25 Jun 2011 - 12:39 pm | चिरोटा
ह्यात ऑफिशियल्/अनऑफिशियल हा काय प्रकार आहे?
मुलखावेगळी,मला ते कारण ऑफिशियली व्यनीतून सांगा.
29 Jun 2011 - 1:12 pm | मुलूखावेगळी
@ आनंदयात्री
ते कारण सांगुन मी विकतशत्रु बनु शकत नाही
@चिरोटा
वेळ मिळाल्यवर व्यनी करते.
9 Jul 2011 - 7:20 am | पंगा
माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे, भारतातील ख्रिस्ती नागरिकांना सामान्यतः लागू असलेल्या नागरी कायद्याखाली दत्तकविधानाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे, भारताच्या हिंदू नागरिकांप्रमाणे मूल दत्तक घेण्याची मुभा भारताच्या ख्रिस्ती नागरिकांना नाही. फारफारतर 'गार्डियनशिप' (प्रतिपाळ करण्याची कायदेशीर परवानगी) मिळू शकते. परंतु 'गार्डियनशिप' म्हणजे दत्तकविधान नव्हे, आणि अशा पालक-पाल्यातील नात्यास (म्हणजे पिता-पुत्र अथवा तत्सम अर्थाने) कायद्याच्या दृष्टीने मान्यता नाही अथवा "गार्डियन"चा/ची कायदेशीर वारसदार म्हणून अशा पाल्यांस कोणताही हक्क प्राप्त होत नाही. (असे हक्क हिंदू भारतीय नागरिकांच्या दत्तक मुलांस उपलब्ध होतात. किंबहुना, दत्तकविधानाची तरतूद भारतीय नागरिकांपैकी हिंदूंखेरीज - यात कायद्यानुसार 'हिंदूं'च्या व्याख्येमध्ये बौद्ध, जैन आणि शीख यांचाही समावेश होत असल्याचे कळते - इतर नागरिकांना उपलब्ध नाही, असे कळते.)
गोव्यातील परिस्थिती अर्थात (पुन्हा, माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे) याहून किंचित वेगळी आहे. भारतात इतरत्र लागू असलेले या बाबतीतील विविध नागरी कायदे तेथे लागू नाहीत. त्याऐवजी, गोव्याच्या मुक्तीचे वेळी तेथे लागू असलेला पोर्तुगीजकालीन (तथाकथित* "समान") नागरी कायदा तेथे आजही लागू आहे.
(* अवांतर: "तथाकथित" हा शब्द वापरण्याचे कारण, हा कायदादेखील पूर्णपणे "समान" नाही, असे कळते. हा कायदा जारी करते वेळी तत्कालीन पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदू प्रजाजनांच्या पारंपरिक प्रथा लक्षात घेऊन, त्यातील काही प्रथा-परंपरा-पद्धतींच्या पालनास अडथळा येऊ न देण्याच्या दृष्टीने काही सवलती आणि काही तरतुदी - बहुधा Gentile Hindu Usages Decrees of 1880 अथवा 'मूर्तिपूजक, बहुईश्वरवादी आणि असंस्कृत हिंदू प्रथांसंबंधीच्या १८८०च्या कायद्या'न्वये - लागू केल्या. ('Gentile'चा क्र. २चा अर्थ या संदर्भात पहावा.) पैकी एका तरतुदीनुसार, गोव्यातील हिंदू पुरुष प्रजाजनांस काही मर्यादित आणि अपवादात्मक परिस्थितींत - जसे, प्रथम पत्नीस एका विशिष्ट वयापर्यंत कोणतीही संतती अथवा आणखी एका विशिष्ट वाढीव वयापर्यंत पुत्र न झाल्यास - दुसरा विवाह करण्याची कायदेशीर संमती आहे, जी बहुधा आजही लागू आहे, असे वाचनात आलेले आहे. अर्थात, या तरतुदीचा आज वापर केला जात नसावा, अशी आशा आहे.
अतिअवांतर: गोव्यातील तथाकथित "समान" नागरी कायद्यातील असमानतेबद्दल एक उद्बोधक आणि रोचक लेख येथे वाचावा.)
मात्र, गोव्यातील या तथाकथित "समान" नागरी कायद्याखालीसुद्धा दत्तकविधानाची तरतूद ही गोव्यातील हिंदू वगळता इतरेजनांस उपलब्ध नाही, असे या बातमीवरून कळते. (गोव्यातील हिंदूंना असलेली दत्तकविधानाची मुभा हीसुद्धा बहुधा "मूर्तिपूजक, बहुईश्वरवादी आणि असंस्कृत हिंदू प्रथांसंबंधीच्या" पोर्तुगीज कायद्याखाली "देण्यात आलेली" एखादी "सवलत" असावी, अशी आपली माझी अटकळ आहे.)
आता एवढ्या सगळ्या गीतापाठानंतर मला वरील विधानातल्या "कागदोपत्री दत्तक"चा अर्थ समजू शकलेला नाही. मुळात दत्तकविधानाची कायदेशीर तरतूदच जर (गोव्याच्या रहिवासी असलेल्या आणि/किंवा भारतीय नागरिक असलेल्या) ख्रिस्ती कुटुंबांना उपलब्ध नाही, तर मग अशी कुटुंबे (गरीब मुलींना) "कागदोपत्री" तरी कशी दत्तक घेऊ शकतील? हं, अशा गरीब मुलींची कायद्याने "गार्डियनशिप" घेणे आणि त्यांचा प्रतिपाळ करणे त्यांना शक्य आहे, परंतु "गार्डियनशिप"खाली अशा कुटुंबांत आणि अशा मुलींमध्ये मातापिता आणि पुत्रीचे किंवा अन्य तत्सम कोणतेही नाते प्रस्थापित होत नाही. फक्त 'अशा पाल्याच्या पालनपोषणाची (म्हणजे बहुधा दोन वेळचे खाऊ घालण्याची), निवार्याची आणि व्यक्तिगत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची - थोडक्यात अशा पाल्यास "सांभाळण्याची" - जबाबदारी अशा कुटुंबांनी स्वखुशीने स्वीकारलेली आहे, आणि तशी ती जबाबदारी स्वीकारण्याची परवानगी कोर्टाने सदर कुटुंबास दिलेली आहे' एवढ्याच मर्यादित व्याप्तीपलीकडे कायद्याच्या दृष्टीने अशा योजनेस काहीही अर्थ राहत नाही. त्यापुढे, पालनपोषणाच्या मोबदल्यात अशा पाल्यांनी घरकाम केल्यास, असे पाल्य आणि असे पालक यांच्यात कोणताही नातेसंबंध नसल्याने, निदान "कागदोपत्री दत्तक घेतले आणि मग घरमोलकरीण म्हणून ठेवले" हा आरोप तरी फोल ठरतो. ("लहान मुलांचे शोषण" ही तक्रार असल्यास त्याचा वेगळा विचार - आणि तोही बहुधा एखाद्या वेगळ्या कायद्याच्या दृष्टीने - कदाचित करता येईलही, परंतु "दत्तक घेऊन मग नोकरासारखे वागवणे" हा आरोप निदान या परिस्थितीत तरी समजू शकत नाही.)
आणखी एक गोष्ट मला समजलेली नाही. 'गावाकडील एखाद्या (नात्यातल्या नसलेल्या, किंबहुना जातकुळीतल्याही नसलेल्या) गरीब मुलाला शहरात आणले आणि आपल्या घरात ठेवून घेतले, त्या मुलाने घरातील लहान मुलांना सांभाळले, घरातील वरकामाला हातभार लावला आणि बहुधा कुटुंबप्रमुखाला त्याच्या कामधंद्यात मदतही केली, त्या बदल्यात कुटुंबाने त्या मुलास दोन वेळचे खाऊ घातले आणि घरात राहण्यापुरती जागा दिली आणि कदाचित मोठा झाल्यावर छोट्यामोठ्या ठिकाणी काहीतरी बारीकसारीक नोकरी करता येण्याइतपत - पण तितपतच - जुजबी कौशल्ये शिकवली', असे प्रकार महाराष्ट्रातल्या काही सधन हिंदू/ब्राह्मण कुटुंबांत मी अगदी कालपरवापर्यंत पाहिलेले आहेत. (त्यानंतर अनेक वर्षांपासून बहुतांशी भारताबाहेर राहिल्याने आजची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचा योग आलेला नाही, त्यामुळे आजही हे प्रकार घडतात की नाही याची कल्पना नाही. परंतु 'आज हे होत नाही' असे ठामपणे म्हणता येण्याइतकी खात्रीलायक माहितीही माझ्याजवळ नाही.) अशा व्यवस्थांमध्ये बहुधा अशा व्यवस्थेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षास काहीही गैर वाटल्याचे माहीत तरी नाही अथवा जाणवलेले तरी नाही. कदाचित अशा व्यवस्था गैर नसतीलही. किंवा असतीलही. मला माहीत नाही. पण मग अशा व्यवस्था जर वाजवी असल्या, तर अशा व्यवस्थांमध्ये आणि आपण उल्लेख केलेल्या प्रकारामध्ये फरक तो काय? आपण उल्लेख केलेल्या प्रकारामधील पालक हे ख्रिस्ती आहेत, आणि मी वर्णिलेल्या प्रकारातील पालक हे मराठीभाषक हिंदू/ब्राह्मण आहेत (आणि पाल्यही हिंदू आहे; पाल्याची जात कोणतीही असू शकते), यापलीकडे?
राहता राहिला प्रश्न ख्रिस्ती धर्माच्या दीक्षेचा. (मला वाटते ही खरी दुखरी नस आहे. "ख्रिस्त्यांनी हिंदू मुलांचे धर्मांतर करणे" हा खरा आक्षेप आहे, "नाममात्र दत्तक घेऊन नोकरासारखे ठेवणे" वगैरे केवळ दुय्यम, भावनिक सबबी. पण ते एक असो.) त्याचाही थोडासा विचार करू.
मूलतः प्रत्येक व्यक्तीस आपापला धर्म ठरवण्याचा खरे तर अधिकार असतो. मात्र, कायद्याने अज्ञान व्यक्ती ही आपल्या बाबतीत असा कोणताही निर्णय स्वतः घेण्यास अक्षम असते, असे मानले जाते. सामान्यतः अज्ञान व्यक्तीच्या संदर्भात, अशा अज्ञान व्यक्तीचे हितसंबंध लक्षात घेऊन आणि आपापल्या मगदुराप्रमाणे योग्य वाटतील असे कोणतेही निर्णय घेण्याची जबाबदारी अधिक अधिकार हा अशा अज्ञान व्यक्तीच्या कायदेशीर पालकांचा असतो. मग ते कायदेशीर पालक म्हणजे अशा अज्ञान व्यक्तीचे जन्मदाते आईबाप असोत, किंवा कायद्याने दत्तक आईबाप असोत, किंवा कायदेशीर "गार्डियन" असोत. असे निर्णय न पटल्यास अशी कायद्याने अज्ञान व्यक्ती ही कायद्याने सज्ञान झाल्यावर आपला वेगळा निर्णय घेऊ शकतेच, परंतु तोवर अशा निर्णयांची जबाबदारी अधिक अधिकार हा सामान्यतः पालकांचाच राहतो.
'आपल्या पाल्याने अमूकअमूक धर्माचा अनुयाय करणे हे योग्य अथवा हितावह आहे' असे एखाद्या पालकास वाटल्यास (मग भले असा पालक हा निव्वळ कायदेशीर 'गार्डियन' असो) त्यात गैर अथवा बेकायदेशीर असे काही नसावे. (तसेही बहुतांश वेळा आपल्या अज्ञान पाल्याचा धर्म पालकच ठरवतात की.** )
तसेही, 'गार्डियन्ज़ अँड वार्ड्ज़ अॅक्टा'त 'आपल्या पाल्याची धर्मनिश्चिती करण्या'स अथवा 'आपल्या पाल्यास धार्मिक शिक्षण अथवा दीक्षा देण्या'स प्रतिबंध करणारी कोणतीही भाषा दिसली नाही. (हे योग्यच आहे. समजा, एक हिंदू पालक दांपत्य आहे. त्यांची कोणा हिंदू गुरूवर श्रद्धा आहे. ते ज्याचा प्रतिपाळ करतात अशा हिंदू पाल्यास त्यांनी आपल्या श्रद्धेप्रमाणे त्या गुरूची दीक्षा देणे हे अयोग्य ठरावे काय? त्यास प्रतिबंध असावा काय?)
(** 'मी जन्माने हिंदू आहे' म्हणजे नेमके काय? 'मी हिंदू आहे' हे नेमके कोणी ठरवले? मी ठरवल्याचे तर आठवत नाही. माझ्या जन्मदात्या आईवडिलांनीच ठरवले ना? त्यांना जर वाटले असते, की मला हिंदू न बनवता मुसलमान अथवा ख्रिस्ती बनवावे, तर त्यांना अडवणारे - कायद्यासकट - नेमके कोण होते? समजा त्यांना वाटले असते, तर एखाद्या काझीकडे नाहीतर पाद्र्याकडे मला घेऊन जाऊ शकलेच असते, की "घ्या बाबा, याला तुमच्या धर्माची दीक्षा द्या" म्हणून, आणि त्यांना बहुधा कायद्याने कोणीही अडवू शकले नसते - आणि मग भले त्यांनी स्वतः त्या धर्माची दीक्षा घेतली असो वा नसो. त्यांनी तसे केले नाही हा भाग अलाहिदा. सांगण्याचा मुद्दा, आपल्यापैकी बहुतांशांचा धर्म हा आपण कायद्याने अज्ञान असताना आपले पालकच ठरवत असतात. किंबहुना, बहुतांश वेळा तसे मुद्दाम "ठरवण्या"चे कष्टही ते घेत नाहीत - परंपरेने घरात जो धर्म चालत आलेला असतो, त्यात "बाय डीफॉल्ट" चिकटवून देतात झाले! मग त्या धर्माचे संस्कार - किंवा त्या धर्मात आवश्यक असेल तर दीक्षा - हीसुद्धा "बाय डीफॉल्ट"च देतात. पण निर्णय पालकांचा असतो, हे महत्त्वाचे!
बरे, कायद्याने सज्ञान झाल्यावर मी माझ्या स्वयंनिर्णयाने माझा धर्म बदलू शकतोच की! अर्थात बर्याचदा मी त्या भानगडीत पडत नाही, ही गोष्ट वेगळी. पण करू शकतो, हे महत्त्वाचे! तसेच आपण उल्लेखिलेल्या "कागदोपत्री दत्तक" मुलीही करू शकतातच. करतील की नाही, हा त्यांचा प्रश्न.
मग दु:ख नेमके कशाचे?)
तेव्हा, "कोणीतरी हिंदूंना ख्रिस्ती (अथवा अन्य) धर्माची दीक्षा देत आहे" यामागील आपले दु:ख (पटले नाही तरी) कदाचित समजू शकतो, परंतु ते मांडण्याकरिता आपण दिलेले उदाहरण आणि युक्तिवादाचा डोलारा हा निदान माझ्या तरी आकलनापलीकडचा आहे, असे खेदाने सांगावेसे वाटते.
9 Jul 2011 - 9:38 pm | पैसा
मी प्रत्यक्ष पाहिलेल्या उदाहरणात मालकाने आमच्या बँकेत खाते उघडताना मोलकरणीला आपले आडनाव लावले होते. जरा जास्त चौकशी करताच ते आपले 'पोसके' (दत्तक) आहे, असं उत्तर मिळालं. परंतु तुम्ही कोणत्या कायद्याच्या आधारे दत्तक घेतले आहे? असा प्रश्न मात्र मी त्याना विचारला नाही कारण बँकेला त्याची गरज नव्हती!
पंगा, तुमच्या काळ्या पांढर्या अक्षरातल्या सगळ्याच शंकाना उत्तरे मी देऊ शकणार नाही पण आंतरजालावर शोधले तर ख्रिश्चन लोकांच्या "दत्तकविधाना"बद्दल काही वेबसाईटस वर उल्लेख सापडतात. पण अर्थातच याबाबत कायद्याचे तज्ञच तुम्हाला जास्त माहिती देऊ शकतील.
दुसर्या लग्नाबद्दलची तरतूद आता वापरात नसावी, कारण माझ्या पाहण्यात असे एकही उदाहरण आलेलं नाही. शिवाय गोव्यात धार्मिक रीत्या लग्न करण्याआधी लग्नाचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तेव्हा, दुसरं लग्न करायला तशी परवानगी आता नसावी.
>> "ख्रिस्त्यांनी हिंदू मुलांचे धर्मांतर करणे
अशा मोलकरणी फक्त हिंदूच असतात असं नाही तर कधी कधी जन्माने ख्रिश्चनही असतात. यातील मुख्य शक्यता अशी असावी की गोव्यात बालकामगारांबद्दलचे कायदे बर्यापैकी व्यवस्थितरीत्या पाळले जातात. या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी या मुलीना दत्तक घेतलं जात असावं. (हिंदूंच्या घरी अशी 'पोसकी' मुलगी/मोलकरींण असल्याचं मी तरी गोव्यात कुठे ऐकलेलं नाही. तशी प्रथा जुन्या ख्रिश्चन कुटुंबात असल्याचं मात्र ऐकलं आहे.)
(अवांतरः बालकामगारांबद्दलच्या कायद्याची अम्मलबजावणी करणार्या सरकारी मंडळाच्या अध्यक्षा एक धडाडीच्या मुस्लिम महिला आहेत, आणि त्यांच्या तोंडून त्यानी सोडवलेल्या अनेक केसेस ऐकल्या आहेत.)
माझा मुख्य आक्षेप दत्तक घेतल्यानंतर त्या मुलीला मोलकरीण म्हणून वागवण्याबद्दलच आहे. जर एखाद्या मुलीला मी माझं आडनाव देणार असेन, तर माझ्या खर्या मुलीइतक्याच शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक संधी तिला देणे ही माझी नैतिक जबाबदारी असली पाहिजे.
>> यामागील आपले दु:ख (पटले नाही तरी) कदाचित समजू शकतो,
मला दु:ख का होईल? ज्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही (उद्या समजा तुम्ही मुस्लिम झालात! ) तर माला कशासाठी दु:ख वाटेल ते तुम्हीच मला जरा समजून सांगितलं तर बरं होईल. मी जे पाहिलंय किंवा ऐकलंय तेच मी इथे लिहिलंय. ते योग्य आहे का अयोग्य याबद्दल माझी काही टिप्पणी मी लिहिलेली नाही. माझे जे काही आक्षेप आहेत ते नैतिक या स्वरूपाचेच आहेत.
उदा. एखाद्याने जर बायबलचा अभ्यास केला आणि येशूची शिकवण पटून तो ख्रिश्चन धर्मात सामील झाला, (कायद्याच्या भाषेत म्हणजे, अक्कलहुषारीने, नशापाणी न करता आणि स्वेच्छेने) तर त्याला कोणाचाच आक्षेप असणार नाही. पण जो आपले निर्णय स्वतः काही कारणाने घेऊ शकत नाही, (आर्थिक्/सामाजिक वगैरे कारणे), अशा व्यक्तीला लालूच दाखवून किंवा धाकाने धर्म बदलायलाच काय , इतर कोणतीही गोष्ट कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली करायला लावणे ही गोष्ट बरोबर नाही, असं मला तरी वाटतं, अर्थात, तुम्हाला आपली मतं असण्याचा हक्क आहेच!
10 Jul 2011 - 7:40 am | शिल्पा ब
<<<जो आपले निर्णय स्वतः काही कारणाने घेऊ शकत नाही, (आर्थिक्/सामाजिक वगैरे कारणे), अशा व्यक्तीला लालूच दाखवून किंवा धाकाने धर्म बदलायलाच काय , इतर कोणतीही गोष्ट कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली करायला लावणे ही गोष्ट बरोबर नाही,
+१
23 Jun 2011 - 11:36 pm | अप्पा जोगळेकर
यांच्याकडे असलेली मंत्रीपदे पाहीलीत तर संस्थेचे सध्या असलेले कार्य आणि मंत्रीपदे यात व्यवस्थित सुसंगती आढळते. ज्या योगे एखाद्या विशिष्ट (ख्रिस्ती?) समुहाला त्याचा फायदा होऊ शकतो असे मानायला जागा आहे.
अशा कोणत्या बाबी आहेत की ज्यामुळे या संस्थेचे कार्य, मंत्रीपदे आणि ख्रिस्ती समाजाला झालेला फायदा यांचे रिलेशन लावता येईल? हे स्पष्ट करावे.
दोन्ही समाजांना येथे एकत्र येऊन काही काम करता येणे शक्य आहे. दोघांनाही सारखीच भीती आहे.
असेच वाक्य याच लेखकाने ख्रिश्चन बहुसंख्यांक सदस्य असलेल्या संस्थळावरसुद्धा टाकलेले असू शकते अशी शंका कारण नसताना मनात आली.
तुमचे नाव जर वेगळे असते तर इथले काही प्रतिसाद वेगळे झाले असते.
23 Jun 2011 - 11:50 pm | आंबोळी
अप्पांच्या ३ ही मुद्द्यांशी सहमत
24 Jun 2011 - 7:04 am | आंसमा शख्स
साधे सोपे रेलेशन आहे.
ग्रामिण पाणी मंत्रालय ख्रिश्चन लॉबीच्या दबावाखाली काम करत असेल तर काय घडू शकते?
उदा. भारतात पाण्याची पातळी खाली जाते आहे. वॉटर रिसोर्स मिनिस्ट्रीच्या मंत्र्यांनी आदेश दिला की एका भागात बोअर वेल्स खणण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. पण परवानगी कुणाला द्यायची हे मंत्री ठरवू शकतात.
याचा सरळ परिणाम नॉर्थ शोअर ख्रिश्चन चर्च यांच्या कार्यात दिसतो. यांनी मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी दुष्काळी भागात बोअर वेल्स खोदल्या आहेत.
त्याच चर्चच्या कामाच्या रिपोर्टमध्ये ते म्हणतात की याचा फायदा घेऊन आम्ही २० चर्चेस प्लांट केली. आणि सुमारे ५००० लोकांना ख्रिस्ती करण्यात यश मिळवले.
अधिक माहितीसाठी वाचा - http://www.northshoremissions.org/FAITHNETWORK_USERFILESTORE/filecabinet...
खुदा यांना हे सर्व पाहण्याची दृष्टी दे!
हे तर एक उदाहरण झाले इतरत्र काय घडत असेल याची कल्पनाच केलेली बरी. जागे व्हायचेच नसेल तर नका होऊ.
जैसी आपकी मर्जी!
23 Jun 2011 - 11:55 pm | अर्धवटराव
असं धर्मांतर होत असेल तर प्रोब्लेम काय आहे? त्याचे जे काहि लौकीक-पारलौकीक (असतील तर) फायदे असतील त्याकरता आपापल्यापरिने प्रयत्न करणे सर्वांना शक्य आहे. द गेम इज ओपन फॉर एव्हरीबडी...
( हिंदू ) अर्धवटराव
24 Jun 2011 - 12:24 am | शुचि
मला देखील बरेचदा अर्धवटराव यांनी मांडलेला विचार मनात येतो पण मग भीती वाटते हिंदू धर्म उद्या अशा धर्मांतरामुळे अल्पसंख्यांक झाला तर? (नक्की कशाची भीती ते सांगता येत नाही) पण अल्पसंख्यांक होण्याची भीती वाटते. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे अन समाजात स्वतःच्या प्रकृतीस अनुरूप, समविचारी "कारवाँ" तो शोधत असतो. आपण एकटे पडू याची भीती त्याला वाटते.
दुसरा पैलू आहे तो आनंद विभागून द्विगुणीत करण्याचा. आपल्या धर्मातील नानाविध सुंदर रचना, गोष्टी कोणाबरोबर तरी विभागून त्यांचा आस्वाद घ्यावासा वाटतो. उद्या सगळेच अन्य धर्माचे झाले तर ते कसे शक्य होईल? शिवाय आपले विचार,साहीत्यसंपदा हळूहळू नाश पावेल.
धर्म हा आप्ल्या अस्तित्वाचा/आयडेन्टिटीचा एक मोठा भाग नाही का?
24 Jun 2011 - 1:18 am | अर्धवटराव
शुचि,
जेंव्हा हिंदू अल्पसंख्यांक होईल त्यावेळी तुम्ही-आम्हि अगोदरच धर्मांतरीत झालेले असु. त्यामुळे एकटेपणा वाटणार नाहि. जर धर्मांतरीत झालेले नसु तर धर्म टिकावा म्हणुन फाईट मारत असु, तेंव्हा एकटेपणा वगैरे वाटायला सवडच नसेल. तसही जगातले सर्वच धर्म-संस्कृती स्थित्यंतराच्या चक्रातुन जात असतात आणि ते योग्यही आहे.
पर्सनली मलादेखील हिंदू धर्म टिकावा, वाढावा असं मनापासुन वाटतं... पण त्यामागे धर्मप्रेम कमी आणि व्यवहार जास्त आहे. हिंदू धर्म एक बफर आहे आणि हे बफर आज जो भिन्न-भिन्न कारणांवरुन जगात संघर्ष चाललाय त्याला बॅलेन्स करायला फार आवश्यक आहे असं मला वाटतं. खैर... हे झालं विषयांतर.
राहिला प्रश्न आनंद विभागुन द्विगुणीत करण्याचा... तर ते ऑप्शन नेहमी अव्हेलेबल असेल... कुठल्याही परिस्थितीत.
>>धर्म हा आप्ल्या अस्तित्वाचा/आयडेन्टिटीचा एक मोठा भाग नाही का ?
-- अर्थात आहे. आणि त्याकरताच संघर्ष चाललाय... आदिम काळापासुन. आणि या संघर्षाला वैयक्तीक, कौटुंबीक, सामाजीक, देश, असे सगळे परिमाण आहेत.
( धार्मीक ?????) अर्धवटराव
24 Jun 2011 - 12:52 pm | sagarparadkar
पण एक मत नोंदवावंसं वाटतं की आजतागायत कोणालाच त्यांच्या-त्यांच्या तत्वज्ञानानुसारदेखील ईश्वरप्राप्ती झालेली नाही ... सर्वांचीच अवस्था हती आणि आंधळे या गोष्टीतील अंधळयांप्रमाणेच आहे तर एक अंधाने दुसर्याला नावं ठेवण्यात काय हशील आहे?
त्यापेक्षा सर्वांनी एक्-मेकांशी माणूसकीने वागणे हे जास्त योग्य ठरेल
26 Jun 2011 - 6:13 pm | वेताळ
चर्च मध्ये बुट घालुन जाता येते म्हणुन त्याना चर्च आवडत होते. तशी प्रथा मंदिरात पाडली तर हिंदुधर्म देखिल वाढण्यास मदत होईल.
26 Jun 2011 - 8:14 pm | आंबोळी
>>चर्च मध्ये बुट घालुन जाता येते म्हणुन त्याना चर्च आवडत होते. तशी प्रथा मंदिरात पाडली तर हिंदुधर्म देखिल वाढण्यास मदत होईल.
हाहाहा... बरोबर... आणि दारू पण वाटा प्रसाद म्हणून मग तर प्रचंड फोफावेल हिंदू धर्म....
आजुन कोणाच्या काही सुचना आहेत का?
28 Jun 2011 - 9:25 pm | इंटरनेटस्नेही
.
29 Jun 2011 - 1:14 pm | मुलूखावेगळी
काही लोकांना तर चर्च मध्ये लग्न कराय्ची पन इच्छा असते.
म्ह्ननुन काय मग आपन आप्लया प्रथा सोडायच्या कि काय??
26 Jun 2011 - 9:15 pm | चेतन
निरागस चेहेर्याआडचे धर्मांतर
हे मुसलमान धर्माबद्दलही म्हणता येईल. पण तुम्हाला उपयोगी अशा काही लिंका ;)
जोशुआ प्रोजेक्ट
लिंक २
कॅलेब प्रोजेक्ट
(हिंदु) चेतन
10 Jul 2011 - 12:57 am | नर्मदेतला गोटा
हे कोण मंत्री आहेत ?
नावे काय ?
आणि म्हणणे सपष्ट मांडा
-
मागे तुम्ही
" राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था?"
असे खरडले होतेत
ते खरे का हे खरे ?
का तो TP होता ?