नमस्कार,
आज मिसळपाववर येणार्या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे.
असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.
मग अश्या वेळी काही लोक त्यांना सांभाळून घेऊन पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु) देतात तर काही लोक त्यांना चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे त्या लेखकाचा लेखन करण्याचा उत्साह मारल्या जातो. ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक आपला स्वत:चा सुरूवातीचा काळ विसरले आहेत की काय अशी शंका येते. प्रत्येक लेखावर चांगलेच लिहा असं मला म्हणायचे नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की जे लोक नवीन आहेत, नुकतेच लिहायला लागले आहेत त्यांनी चांगलं लिहावं, उत्तम लिहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि पुढील लेख यापेक्षा चांगला येईल अशी मदत करावी ते राहीलंच. काही लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या अंगावर जाणार्या असतात की तो लेखक/लेखीका पुन्हा काही लिहीण्याचा प्रयत्नच करत नाही.
हे टाळता येऊ शकतं का? तर नक्कीच टाळता येतं. एखादा लेखक नवीन आहे तर त्याला त्याचे लेखन कसे सुधारावे याबद्दल मदत करा. काही प्रतिक्रिया असतील तर तो नवीन असे पर्यंत त्याला जरा सांभाळून घ्या. तो लेखक येथे जरा स्थिर स्थावर होऊ द्या आणि मग त्याच्या पुढील लेखांवर काय हव्या त्या प्रतिक्रिया द्या. म्हणजे तो लेखक बर्यापैकी येथील वातावरणाशी समरस झालेला असेल. आणि आपले मत उत्तम मांडू शकेल.
नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे.
सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या.
याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे किंवा ऑरकुट सारख्या गप्पांचे धागे चालवून घेईल असे नाही. माझा रोख केवळ नवीन लोकांना लिहीतं करावं आणि त्यांनी चांगलं लिहायला लागावं यासाठी जूण्या लोकांनी प्रयत्न करावे अशी विनंती करावी एवढाच आहे.
कृपया याकडे लक्ष द्यावे. नवीन लोकांनी निश्चिंतपणे लिहायला लागा. हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे त्यामुळे आपल्या लिखाणावर चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरा. खरं तर त्यातच मजा आहे. मात्र कुणी उगाचच अती करून वाईटच प्रतिक्रिया देत असेल तर संपादक मंडळ त्याची काळजी घेईल.
- नीलकांत
प्रतिक्रिया
9 Jun 2011 - 6:29 pm | बिपिन कार्यकर्ते
भले!
9 Jun 2011 - 6:34 pm | धमाल मुलगा
संपुर्ण अनुमोदन!
आणि नवसदस्यांना मदतीचे आश्वासनही देतो. तसं नेहमी शक्य तितका हा प्रयत्न करणं चालू असतंच. तरीही सदरहू प्रकटनाच्या उत्तरादाखल पुनरुच्चार करतो आहे.
एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ :)
9 Jun 2011 - 7:07 pm | सुहास..
पुलेशु ! ;)
9 Jun 2011 - 8:02 pm | आनंदयात्री
हेच म्हणतो. बर्याच दिवसांपासुन ह्या गोष्टी बोचतात. याबद्दल खासगीत तसेच जाहिर बोललोही आहे आणि त्यासाठी मित्रांचा रोषही पत्कारला आहे.
9 Jun 2011 - 6:38 pm | माझीही शॅम्पेन
हे विशेष आवडल , बाकी सर्व भा.पो. धन्यवाद !!
11 Jun 2011 - 12:24 pm | निनाद मुक्काम प...
सहमत आणी ह्या विषयाला हात घातल्याबद्दल नीलकांत ह्यांचे आभार .
आपण मिपावर दीर्घकाळ आहोत व आपला कंपू जमला आहे .म्हणून नवीन सदस्यांवर तोंडसुख घेणे केव्हाही चूक
.किंबहुना ह्या मागे एक उद्देश असाही असेन की दर दिवसाला अनेक नवीन सदस्य मिपावर येतात .अर्थात बरेच जण अनेक काळ एकतर मुकवाचक असतात .किंवा एखादी प्रतिक्रिया देत असतात .तेव्हा एका नवीन सदस्याला टार्गेट केले.कि तर बाकीच्या नव सभासदांना एक गर्भित इशारा मिळतो. '' आमच्या पासून जपून म्हणजे एक तर आमच्या लिखाणाला बळेबळे चांगले म्हणा, किमान पक्षी वाईट म्हणून नका .नाहीतर गाठ फक्त माझ्याशी नाही तर माझ्या संपूर्ण कंपूशी आहे .'
11 Jun 2011 - 12:34 pm | टारझन
.अगदी सहमत.आणि खुलासेवार लिहील्या बद्दल जर्मनांचे आभार.
आपण मिपावर दिर्घकाळ आहोत व आपण मराठी आहोत. म्हणुन मराठी भाषेचा रेप करने केंव्हाही चुक
.किंबहुना ह्या मागे एक उद्देश असाही असेन की दर दिवसाला अनेक नविन प्रकारच्या व्याकरण चुका मला करता येतात. अर्थात बरेच जण त्याला इग्नोर करतात. किंवा एखादी प्रतिक्रीया देउन समजावण्याचा प्रयत्न करतात. तेंव्हा एकदा समजुन सांगितले.कि तर बाकीच्या चुका टाळण्याचा एक गर्भित इशारा मिळतो."आम्हाला समजुन सांगु नका एक तर आमच्या कसल्याही प्रकारच्या लिखाणाला बळेबळे चांगले म्हणा,किमान पक्षी वाईट म्हणु नका. नाही तर मी स्वत:ला फार स्पेषल समजिन आणि कंपु मिळुन माला टार्गेट करतो असे गावभर ओरडत फिरेन .'
मी कुठेही डॉटतो,त्या डॉट ला नविन लाईन वर फेकतो. पण सुधरत मात्र नाही ! प्रत्येक मिपाकर जरा जुणा झाल्यावर थोडासा शहाणा होतो; पण ते दुसर्यांनी दिलेल्या सल्ल्यांनी नाही , तर स्वत:च चढवुन घेतलेल्या कारणांनी ...
14 Jun 2011 - 9:53 am | गेंडा
अगदी सहमत.आणि खुलासेवार लिहील्या बद्दल णीलकाण्टचेसुध्दा आभार.
11 Jun 2011 - 1:35 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आणी ह्या विषयाला हात घातल्याबद्दल टारझन ह्यांचे आभार .
आपण मिपावर परदेशस्थ आहोत व आपला मेंदू गंजला आहे .म्हणून जुन्या सदस्यांवर तोंडसुख घेणे केव्हाही चूक
.किंबहुना ह्या मागे एक उद्देश असाही असेन की दर दिवसाला काही सदस्य त्यासाठीचस् मिपावर येतात .अर्थात बरेच जण अनेक काळ एकतर मुकवाचक असतात .किंवा एखादी प्रतिक्रिया देत असतात कारण ते स्वतःला दिडशहाणे समजत नसतात. जुन्या सदस्याला टार्गेट केले आणि त्याच्या नावाने धागे किंवा गळे काढले की इतर जुन्या सभासदांना एक गर्भित इशारा मिळतो. '' आमच्या पासून जपून म्हणजे एक तर आमच्या फालतु + रटाळ + स्वतःची लाल करणार्या + मराठीवर बलात्कार करणार्या लिखाणाला बळेबळे चांगले म्हणा, किमान पक्षी वाईट म्हणून नका .नाहीतर गाठ फक्त माझ्याशी नाही तर माझ्या मुक्काम पोस्ट च्या पारायणाशी + माझ्या तुम्हाला येणार्या भिकार खरडींशी किंवा मग मी जाहिर धागा काढून गाळणार्या मगरीच्या अश्रुंशी आहे .'
मुर्ख चुकतात, त्या चुकीविषयी ऎकतात, पण शिकत मात्र नाही ! प्रत्येक मनुष्य सदस्यत्वाच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुस-याच्या उडालेल्या सदस्यत्वाने नाही, तर स्वत:ला बसलेल्या लाथेनी...
9 Jun 2011 - 6:38 pm | रेवती
लेखकाशी सहमत.
लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे
तसंच मिपावर आपल्या आगमानाचे धागे काढणं ही थांबवा.
आधी लेखांवर प्रतिक्रिया देवून ओळखी तर करून घ्या असं सांगावसं वाट्टं.
9 Jun 2011 - 6:47 pm | मृत्युन्जय
रेवतीताईंशी सहमत.
नवीन लेखकांनी आल्याआल्या लगेच लेखनच पाडायला सुरुवात केली की कुठेतरी कडकड प्रतिक्रिया दिली जाते. त्या ऐवजी आधी वाचनमात्र मग प्रतिसाद मात्र आणि खरडमात्र होउन नंतर लेख पाडले तर कदाचित हा प्रॉब्लेम येणार नाही.
अर्थात नीलकांतची सुचना मान्य. एकदम अंगावर जाणार्या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. माझ्याकडुन असे आजवर झाले असल्यास यापुढे आधिक काळजी घेइन.
अवांतर; हा प्रतिसाद मी मिपावर ज्येष्ठ आहे हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न देखील आहे ;)
9 Jun 2011 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखकाच्या विचारांशी सहमत.
एकोळीचे धागे, फाल्तू कौलं, आगमनाचे धागे, सदस्यांचे वाढदिवसाचे धागे, (जयंती-पुण्यतिथीचे भरपूर माहितीवजा असलेले लेखन सोडून ) केवळ प्रणामाचे धागे, काय बोलू शब्दच नाही असे म्हणून छायाचित्राला टाकून येणारे धागे, कै च्या कै प्रतिसाद, हिशेब चुकते करणारे प्रतिसाद, हे सर्व खरडफळ्यावर जाऊ द्या....!
नवीन लिहिणा-यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, याच्याशी सहमत.....!
-दिलीप बिरुटे
9 Jun 2011 - 7:09 pm | विकास
नीलकांत यांच्या लेखातील मताशी आणि बिरुटेसरांच्या प्रतिक्रियेतील मताशी पूर्ण सहमत!
दोघांना पुलेशु! ;) (ह.घ्या रे बाबांनो!)
3 Jan 2014 - 2:09 pm | जेपी
:-)
9 Jun 2011 - 7:03 pm | सूड
+१
9 Jun 2011 - 6:39 pm | विशाखा राऊत
+१
9 Jun 2011 - 6:43 pm | स्वैर परी
नीलकांत चे म्हणणे पटले. नवीन सदस्यांच्या लेखांवर उत्साहवर्धक प्रतिक्रिया दिल्यास त्यांचा लिखाणाचा हुरुप वाढेल. त्याना सांभाळुन घेणे हे जुन्या सदस्यांकडुन अपेक्षित आहे!
9 Jun 2011 - 6:47 pm | जगड्या
नवीन सदस्यांची एवढी काळजी घेणारे दुसरे संकेतस्थळ पाहण्यात नाही.
याबद्दल नीलकांत आणि इतर मिपा करांचे धन्यवाद.
9 Jun 2011 - 6:54 pm | गंगाधर मुटे
पूर्णत: सहमत.
रेवती यांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. :)
9 Jun 2011 - 7:14 pm | विसोबा खेचर
सहमत रे नीलकांता..
तात्या.
9 Jun 2011 - 7:17 pm | ५० फक्त
नीलकांतची सुचना मान्य. एकदम अंगावर जाणार्या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. माझ्याकडुन असे आजवर झाले असल्यास यापुढे आधिक काळजी घेइन.
9 Jun 2011 - 8:06 pm | परिकथेतील राजकुमार
हेच बोल्तो. असे घडले असल्यास मी देखील नक्की काळजी घेईनच. मुळात असे घडले असल्यास ह्या धाग्याच्या निमित्ताने सदर लेखकांची माफि देखील मागतो.
आता जाता जाता नीलकांत ह्यांना काही सुचवावेसे वाटते :-
१) नविन लेखकांच्या बरोबरच जुन्या लेखकांनी देखील आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे ह्याची स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे असे वाटते. 'हळुहळु समजतील, लक्षात घेतील' असे वाटणे चुकीचे आहे असे वाटते.
२) अनेक नवे लेखक / सदस्य हे ब्लॉगधारक असतात. मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात.
३) काही नविनच नव्हे तर जुने सदस्य देखील त्यांच्या धाग्यावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेवर स्वतःची एक प्रतिक्रीया (ती देखील धागा खाली खाली निघाला की ) देऊन धागे वार आणत असतात. ह्या प्रकारामुळे इतर लेखनावर अन्याय होत नाही का?
४) अनेक सदस्य हे इथे केवळ स्वतःचे लेखन प्रकाशीत करण्यापुरते येतात. इतर कोणाच्याही धाग्यांवर त्यांचा वावर दिसत नाही. हे 'वाटचाल' पाहून देखील लक्षात येतेच. त्यांच्या बाबतीत काय धोरण ठरवता येईल ?
५) कित्येकदा उचलुन आणलेल्या कविता / लेखनाखाली त्याविषयी पुरावे देऊन देखील कारवाई होताना दिसत नाही. अर्थात संपादकांच्या व्यस्ततेचा आदर आहेच.
सध्या येवढेच सुचत आहे आणि कावेरी हाका मारते आहे.
9 Jun 2011 - 8:25 pm | आनंदयात्री
बरोबर आहे. पण हे जरी खरे असले तरी जनरली ज्या पद्धतीने या लेखकांचा पाणउतारा होतो ते फारच टोचते. मिपावर येण्याचे इथे लिखाण करण्याचे आमंत्रण दिल्यावर 'इथले क्राउड कल्चर्ड नाही' असे सांगुन वर उदाहरणादाखल दोन-चार प्रतिसादांच्या लिंक तोंडावर मारल्या गेल्या होत्या. अश्या अनेकांच्या तक्रारी असाव्यात.
9 Jun 2011 - 10:09 pm | प्रशांत
एकदम बराबर ... भाऊ +++++
10 Jun 2011 - 11:13 am | गवि
मुद्दा क्रमांक १ आणि ३ शी सहमत आहे. नवीन लिखाण सुरु केले तेव्हा मीही या गोष्टी नकळत केल्या. त्याबद्दल सूचना आल्यावर नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून काहीसा अस्वस्थही झालो आणि त्यामुळेच त्यावर विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हतो.
नंतर हळूहळू मिपाची रचना उलगडली तसे हे मुद्दे योग्यच आहेत हे स्वतःहून कळलं.
मला मिपावर फार मोठ्या प्रमाणावर कौतुक मिळाले. बर्याचशा प्रतिक्रिया लेखन आवडल्याच्याच असतात. पण इतके होऊनही माझ्या शेवटच्या पोस्टवर टुकार असल्याची टीका आलीच आहे. अशा वेळी परा यांनी पूर्वी म्हटलेले एक वचन मी लक्षात ठेवतो:
"तीस चाळीस चांगल्या प्रतिक्रियांनंतर एक प्रतिकूल प्रतिक्रिया आल्याने लेखक खचत असेल तर दोष लेखकाकडे जातो.."
तेव्हा या कारणाने लिखाण थांबवावे असे अजिबात नव्हे. उलट त्यातला योग्य भाग स्वीकारुन आणि न पटणारे सोडून आपले लेखन चालूच ठेवावे असा सल्ला नवीन मेंबरांना द्यावासा वाटतो. मिपा हा मित्रांचा कट्टा आहे. त्यात असल्या गोष्टी होतच असतात.
आता पहा ना.. माझ्या मिपावरच्या सुरुवातीच्या काळात पराभाऊंच्या टीकेमुळे माझ्या लेखनाच्या सुरुवातीसच काहीसा तणाव झाला खरा पण आम्ही सांगलीहून त्यांजसाठी आठवणीने भडंग आणून त्यांच्याशी दिलजमाई केली. ;)
(देतो देतो पराभाऊ..थांबा जरा.. ;) ) त्यांनी मात्र आम्हास पुण्यात मस्तानी पाजली नाही. असो.
10 Jun 2011 - 11:16 am | मृत्युन्जय
पण आम्ही सांगलीहून त्यांजसाठी आठवणीने भडंग आणून त्यांच्याशी दिलजमाई केली.
गविंवर टीका सुरु करावी म्हणतो ;)
10 Jun 2011 - 3:34 pm | नरेशकुमार
गवीचे लेखन खुप खुप खराब असते.
गवि लई लई वाईट्ट. दुश्ट.
.
.
.
आता मला पन भेळ.
10 Jun 2011 - 3:37 pm | गवि
डीटेल पत्ता व्यनि करा. पाठवतो.. येत्या काही दिवसात. एकदम ताजे मागवून..
10 Jun 2011 - 11:20 am | मृत्युन्जय
बर्याच अंशी शमत आहे. शिवाय काही लोक अक्षरशः प्रत्येकाच्या खरडवहीत जाउन प्रतिक्रियांचा जोगवा मागताना दिसतात. त्यांच्याविषयी तिडीक येते. अश्याने खर्या प्रतिक्रिया कधीच मिळायच्या नाहीत.
10 Jun 2011 - 11:27 am | शिल्पा ब
सहमत. अगदी १०१% सहमत.. वैताग मेला!!
10 Jun 2011 - 5:29 pm | गोगोल
सांगा ना सांगा?
9 Jun 2011 - 7:50 pm | आनंद
आणि वरती " ण " का आलाय ते ही लक्षात आल.
9 Jun 2011 - 8:21 pm | अलख निरंजन
सहमत आहे. पण ज्या 'जुण्या' सदस्यांणा उद्देशुन हे णिवेदण आहे त्या जुण्या सदस्यांची प्रतिक्रिया कुठाय?
9 Jun 2011 - 8:33 pm | टारझन
कित्ती बै काळजी तुम्हाला बाकी सदस्यांच्या प्रतिक्रीयांची :) मी तर अलख निरंजन यांची मिसळपाव वरील लेखांचा फॅण आहे ... किती मोलाचं योगदान आहे त्यांच :) ध्यनु धन्यु :)
बाकी एकट्यासाठी णिवेदण आहे होय हे ? :)
9 Jun 2011 - 8:27 pm | टारझन
सहमत आहे .
आणि लेखकांना माझ्या कडुन जास्तित जास्त प्रोत्साहन मिळेल याची काळजी घेतल्या जाईल.
9 Jun 2011 - 9:42 pm | विकास
लेखकांना माझ्या कडुन जास्तित जास्त प्रोत्साहन मिळेल याची काळजी घेतल्या जाईल.
हे आश्वासन आहे का धमकी? ;)
9 Jun 2011 - 10:13 pm | टारझन
थोडा बदल ... "नविन लेखकांना " प्रोत्साहन दिल्या जाईल :)
बाकी काही जुणे जाणते रिटायर झालेले, दळणदळु लेखक .. डोक्याला विट येईतो एकाच विषयावर कितीही टिका झाली तरी वैचारिक मलबद्धकोष्टिक लिहीतात .. त्यांना मात्र प्रोत्साहनाची गरज नाही .. किंवा टिके ने ते डिस्करेजही होत नाहीत .. आणि निलकांतच्या निवेदनात त्यांच्याविषयी काही भाष्यही नाही .. त्यांना नॉर्मलंच उत्तरं देऊ :)
बाकी टिका करण्यावर निलकांत यांची बंदी नाही :) मिसळपाव चा उत्कर्ष व्हावा असे आम्हाला पुर्वीपासुन वाटत आले आहे , ह्याविषयी कोणाला दुमत असल्यास कळवावे :)
सहकार्य पुर्वी पासुन होते त्यामुळे नव्याने आहे असे सांगणे जरुरी नाही :)
बाकी धमकी की अश्वासन .. पब्लिक ला जे समजायचं तेच समजते ,, मग आपले शब्द का खर्ची करा ? :)
- धमकीवडी
9 Jun 2011 - 11:05 pm | नीलकांत
कुणावरही टिका करण्यासाठी काही प्रयोजन आवश्यक आहे.कायमच टिका योग्य नाही. आणि त्यायोगे होणारं नकारात्मक वातावरण सुध्दा चांगलं नाही. नीलकांतचं व्यक्तिगत मत काय यापेक्षा मिसळपाव अधिकाधीक समृध्द कशाने होईल हे महत्वाचं.
त्यामुळे टारझन कडून येत्या काळत अनेक चांगले लेख अपेक्षीत आहे तसेच अनेक सदस्यांना सकारात्मक प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करताना सुध्दा बघायचे आहे. थोडक्यात काय तर मिपाचा उत्कर्ष व्हावा ही जी मनात सुप्त असलेली भावना आहे ती प्रत्यक्षात यावी आणि त्यासाठी थोडे प्रत्यक्ष काम सुध्दा व्हावे अशी माफक अपेक्षा आहे.
अशीच अन्य प्रतिक्रियामात्र सदस्यांकडून सुध्दा अपेक्षा आहे की केवळ प्रतिक्रियांत आपली प्रतिभा दाखवून समोरच्याची अडवणूक करण्याचे एककलमी कार्य न करता लेख लिहा आणि शक्य तेवढ्यावेळ सकारात्मक चर्चा घडवून आणा ही विनंती.
- नीलकांत
9 Jun 2011 - 11:19 pm | टारझन
१. लेख लिहुच लिहु .. ( लिहीलेले आहेतही )
२. टिका लेखनावर असल्यास हरकत नकोय ही विनंती . लेखकावर व्यक्तिगत , जाति / शारिरिक किंवा अजुन पर्सनल टीका होत असेल तर आक्षेप ठिकंच . लेखनावरील टिके वर सुट मिळावी.
३. उठसुठ पाककृती .. चार ओळींच्या कविता , एकोळी धागे. .. किंवा फुसके काथ्याकुट .. ह्यांच्यावर बोटसुख घेण्यास थोडी सुट हवी. ( नविन सदस्यांनी केल्या तर समजु शकतो , अलिकडे जानेमाने आद्य लोकंही नवे धागे काढतात ते बघुन शरम वाटते :) )
४. धोरण कडक ठेवल्यास "बापमेल्या सारखे सुतकी"* चेहरे करुन बसल्याचे फिलिंग संस्थळावर येईल असे वाटते .
* : संस्थापक लिखीत.
9 Jun 2011 - 8:43 pm | सुधीर काळे
नीलकांत-जी,
संपूर्ण सहमत. कांहीं चांगले लिहिण्यासारखे नसेल तर गप्प रहावे, कमीत कमी कुचेष्टा तरी करू नये.
हा लेख प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक reminder म्हणून पुनःप्रकाशित करावा असेच वाटते!
9 Jun 2011 - 9:47 pm | सुधीर१३७
>>>>>हा लेख प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक reminder म्हणून पुनःप्रकाशित करावा असेच वाटते!
...........पण महिनाअखेरला विसरले जाईल, त्याचे काय?............. :wink:
9 Jun 2011 - 8:57 pm | विजुभाऊ
सहमत आहे.
चेष्टा /टीका/मस्करी ही सर्व सदस्यांच्या बाबतीत होत असते.
मात्र कोणत्याही सदस्यांच्या बाबतीत ते मुद्दाम होऊन केली जात असेल तर मात्र ते चुकीचे आहे.
नव्या सदस्याना मुद्दाम होऊन कोणी त्रास देत असेल असे वाटत नाही. जुने सदस्य त्याबाबतीत थोडे निर्ढावतात .
इथले सदस्य थोडे थट्टेखोर आहेत खरे. नव्या सदस्याना रुळायला वेळ जाईल हे खरे
9 Jun 2011 - 9:48 pm | सुधीर१३७
+१
9 Jun 2011 - 9:20 pm | ईन्टरफेल
आपल्याला जास्त काहि समजत नाहि
तवा तुमि म्हनताल ति पुर्व दिशा
आमाला काय ? वाचायच आहे
एक मिसळपाव वाचक
9 Jun 2011 - 9:27 pm | कौशी
अगदी बरोबर निलकान्त....सहमत आहे
9 Jun 2011 - 9:30 pm | छोटा डॉन
असहमत होण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.
योग्य वेळी नेमके सांगणारे मनोगत आले ह्याचा आनंद वाटला, सर्वांनाच फायदा होईल व खास करुन नव्या सदस्यांना निश्चितच मदत होईल असे वाटते.
सहकार्य आहेच :)
- छोटा डॉन
9 Jun 2011 - 9:42 pm | इरसाल
नीलकांत साहेबांशी सहमत. विजुभौंनी दिलेल्या पाठींब्या नंतरही ह्याच कारण साठी लेख टाकायची हिम्मत झाली नाही म्हणून आतापर्यंत फक्त पाकृवरच भागवलेय.
9 Jun 2011 - 9:50 pm | पैसा
मला एक गोष्ट कळत नाही, मी नवीन सदस्य आहे की जुनी? म्हणजे मी नेमक्या कोणत्या बाजूला आहे?
नवीन सदस्याना प्रोत्साहन द्यावं ही गोष्ट नक्कीच जाणीवपूर्वक केली पाहिजे. आणि बहुतेक वेळा ती इथे होते सुद्धा. मी मिसळपाववर आल्यापासून यशवंत कुलकर्णी, गगनविहारी यांच्यासारखे काही चांगले लिहिणारे नवीन सदस्य इथे आले. आणि सर्वानीच त्यांचं छान स्वागत केलं होतं. मी जेवढं काही लिहिलंय त्यावरही रॅगिंग म्हणण्यासारखं कधी काही झालं नाही. :) हे माझं नशीबच! पण नवीन सदस्यांकडून कोणत्या चुका होतात हे त्याना न दुखवता सांगण्याचं काम बिपिन कार्यकर्तेंसारखे काहीजण करत असतात.
तसंच मी पण माझ्यापेक्षा नव्या सदस्याना जमेल तेवढी मदत माझ्याकडून करत असते. जर एखाद्याचं लिखाण मला आवडलं नाही तर तिथे काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वभावाचा असतो, त्यामुळे कधीकधी या जुन्या सदस्याला सामान्य वाटणारी, पण नव्या सदस्याला जरा जास्त वाटेल अशी चेष्टामस्करी कोणा जुन्या सदस्याकडून होते, हळूहळू नवीन सदस्य इथे रुळतात आणि तेही या मस्करीत सामील होतात. हे पूर्णपणे थांबणं शक्य नाही. पण वेळोवेळी अशा खोडकर सदस्याना जागेवर आणायचं काम जुने सदस्यच करत असतात.
फक्त सगळ्यानीच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा हे श्रेयस्कर!
9 Jun 2011 - 11:23 pm | Nile
आम्ही प्रतिसाद देताना नवा का जुना हे बघत नाही. कोणालाही प्रामाणिक प्रतिक्रीया देणं खोटी प्रोत्साहनपर प्रतिक्रीया देण्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं वाटतं. प्रामाणिक प्रतिक्रीयेमध्ये आवश्यकतेनुसार प्रोत्साहनही देण्याचा प्रयत्न असतो हे वे.सां.न.
9 Jun 2011 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा
मला येऊन जेमतेम १ महिनाच झाला आहे...तेंव्हा मला मराठीत अजिबात टाईप करता येत नव्हतं.आणी युयुत्सू यांनी ज्योतिष भाकित वर्तवल,आणी मलाही शांत बसवेना...मी सरळ ईंग्रजी लीपीत आव्हान टाकलं...त्याच्यावरही चित्रविचित्र प्रतिक्रीया आल्या...पण तेवढ्यात कोणीतरी ते देवनागरीत टाईप करुन मला बहुमोल मदत केली...त्या क्षणी मला मी योग्यठिकाणी वर्णी लावल्याचा आनंद झाला...नंतर मी मराठित टाईप करु लागलो व त्यातलीही प्राथमिक मदत अनेकांनी केली.आजचा वरील लेखही खुप सपोर्टिव्ह वाटतो आहे...त्यामुळे मला नविन काही लिहिताना बिनधास्त पणे लिहिता येईल...धन्यवाद
10 Jun 2011 - 12:13 am | आत्मशून्य
नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांची आचारसंहीता पटली.
10 Jun 2011 - 12:47 am | आशु जोग
>>याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे
१. सरसकट कुठलाही नियम लावू नये
२. विशेषतः माझ्या एका धाग्याबाबत कडवट प्रतिक्रिया आल्या होत्या
मिपा सर्वर तेव्हा बराच आजारी असल्याने मला त्याचा तातडीने समाचार घेता आला नाही
मिसळीची बरीच रडारड सुरू होती, उघडतच नसे
३. पण काही माणसे पूर्ण न वाचताच प्रतिक्रिया देतात
हे ही थोडे तपासून पहावे
४. कुणी सदस्य मिपावर नवा असला तरी लिहायला वाचायला तो आयुष्यात खूप आधी शिकलेला असू शकतो
५. फार नियमांची जाचकता दिसली की सदस्य काढता पाय घेऊ लागतात, बाकी इथे सदस्यांना लिखाणाचे पूर्ण स्वातंत्र्य आहे असे दिसते, मात्र सदस्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहीजे
http://www.misalpav.com/node/18089
हा धागा पाहीला तर कळेल
धागाकर्ता कळ्कळीने काही मांडतो आहे
आणि लोक वाचण्याचेही कष्टही घेत नाही आहेत
आणि अज्ञानी प्रतिक्रिया मात्र खरडत आहेत
10 Jun 2011 - 4:12 am | पिवळा डांबिस
हा नव्या-जुन्याचा वादही तसा जुनाच आहे!
http://www.misalpav.com/node/2377
ही कविता/ विडंबन हे २००८ सालातलं आहे!!!
:)
मला वाटतं मिपावर मिळणार्या प्रतिक्रिया हया लेखनाला मिळतात लेखनकर्त्याला नव्हे. तसे काही लेखक बघून टार्गेट करणारे लोक कदाचित असतीलही पण मिपाकरांच्या एकूण संख्येच्या (>१२०००?) मानाने त्यांचं प्रमाण अगदी नगण्य आहे हे कोणीही मान्य करील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं!
मला नाही वाटत की सामान्य मिपाकर धागा वाचल्यावर प्रतिक्रिया देण्याआधी जाऊन धागाकर्त्याचा मिपावरचा अवधी आणि नंबर बघतो, तो लेखक नवा मिपाकर आहे की जुना हे आधी ठरवतो, आणि मग प्रतिक्रिया कशी द्यायची ते ठरवतो!!
लिखाण वाचनीय असेल तर त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळतात/ मिळाव्यात. लिखाण अवाचनीय असेल तर त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळत नाहीत/ मिळू नयेत...
इथे जुन्या अगदी आद्य मेंबरांच्याही वाईट अथवा वादग्रस्त लिखाणावरही टीका होते. तेंव्हा फक्त मेंबर नवा आहे म्हणून काहीही अवाचनीय लिखाणाच्या प्रशंसेची अपेक्षा केली जाऊ नये...
एक खुलासा करणं आवश्यक आहे की इथे मी लिखाणात चांगलं आणि वाईट असा भेद करत नाही. मला वाईट वाटणारं लिखाण इतर कोणाला चांगलं वाटू शकतं आणि व्हाईस व्हर्सा! मी वाचवलं जाणारं आणि न वाचवलं जाणारं असा भेद करतो आहे!!
मिपावर किती मेंबर लेखक आहेत यापेक्षा मिपावरच्या लेखनाचा दर्जा काय आहे हे माझ्यामते जास्त महत्वाचं आहे!!!
आता प्रोत्साहन देण्याबद्दल,
जर नव्या लेखक/कवीने मनापासून प्रयत्न केलेला वाचकांना जाणवला तर त्याला प्रोत्साहनही दिलं जातं. पण काहीही लिहून जर 'नवीन आहे म्हणून चालवून घ्या' अशी जर अपेक्षा बाळगली तर अपेक्षा भंग निश्चित होतो...
जर मिपावरचा सामान्य लेखक हा आधी काही महिने वाचक असतो हे गृहितक मान्य केलं तर मग त्याला इथे प्रकाशित होणार्या लिखाणातलं चांगलं-बेकार कुठलं हे समजायला फारशी अडचण होऊ नये...
दुसरं म्हणजे स्वतःचं लिखाण प्रकाशित करण्यापूर्वी वाचून बघून ते आपल्याला स्वतःला तरी वाचवतंय का इतकं बघण्याची अपेक्षा करायला हरकत नसावी. आपण केलेली विधानं सत्य आहेत का याचाही विचार करायला हरकत नाही.
असो! हे आमचे दोन पैसे!
बाकी आम्ही स्वतःला नवीन समजत असल्याने नव्या-जुन्या सगळ्यांचीच कृपा असो द्यावी ही विनंती!!
:)
10 Jun 2011 - 12:06 pm | सुहास..
पिडाकाका !
कविता आणि प्रतिसाद दोन्ही साठी __/\__
10 Jun 2011 - 5:37 am | नरेशकुमार
मला सुरुवातीला खुप म्हंजे खुप त्रास झाला. पन आत्ता जरा बरे आहे.
.
नविन लोकांना उत्तेजन दिल्याबद्दल निलकांतचा आभारी आहे.
10 Jun 2011 - 11:13 am | किसन शिंदे
नरेशकुमारांप्रमाणे सुरुवातीला माझीही सारखीच स्थिती होती ( काही लोकांनी तर माझा आय डी डूप्लिकेट ठरवून टाकला होता.) , नेहमी वाटायचं ह्या बाबींवर कोणीतरी प्रकाश टाकला पाहिजे आणी ते काम तुम्ही केल्याबद्दल तुमचे आभार.
सध्या चांगलाच रुळलोय.
10 Jun 2011 - 5:52 am | अभिज्ञ
नीलकांतशी पुर्णत: सहमत.
एखाद्याचा एखादा लेख आवडला नाही तर त्याला तसे सौम्यपणे व सभ्यपणे सांगता येऊ शकते.वा अश्या लेखांकडे निव्वळ दुर्लक्ष करता येईलच,परम्तु नवीन लेखकांना उपहासात्माक प्रतिसाद देणे टाळले जावे.
10 Jun 2011 - 8:59 am | रणजित चितळे
मी तसा नवा सदस्य आहे येथे पण मला असा एकही अनूभव आला नाही. खरे म्हणजे प्रतिक्रीया किंवा प्रतिसाद पाहताना मी कधी हे बघितलेच नाही की सदस्य किती जूना का नवा आहे आणि प्रतिक्रीयेच्या किंवा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला सदस्य कसा आहे त्याचे विचार कसे आहेत हे जाणता येते व त्याच बरोबर आपला लेख किंवा विचार कितपत विवेक पूर्ण आहे ते ताडता येते. माझ्या मते येऊदेत कसेही प्रतिसाद.
मला मि पा आवडले.
10 Jun 2011 - 9:11 am | ऋषिकेश
सगळ्यांच्या मताचा आदर ठेऊनही थोडक्यात सांगायचं तर या मताशी पूर्ण सहमत नाही. वर पिडां म्हणतात त्याप्रमाणे बहुसंख्य सदस्य हे लेखक बघुन प्रतिसाद देत असतील असे वाटत नाही. प्रतिसाद हा साधारणतः लेखनावरच असतो तसा नसला तर इतर सदस्य प्रतिसादकर्त्याला सुनावतातच / अगदीच नियमांत बसणारा नसला तर संपादक त्यांचे काम करतातच.
त्यामुळे पाणउतारा, निरुत्साहित करण्यासाठी म्हणून नव्हे पण जर लेखन आवडलं नाही तर ते का आवडलं नाही हे अजूनही सांगत राहिन. माझ्यामते नव्या सदस्यांना अश्या प्रतिक्रीयांचाही पुढील लेखन करतेवळी उपयोग व्हावा.
10 Jun 2011 - 11:24 am | नीलकांत
माझा रोख मुद्दाम नवीन लेखकाला निरुत्साही करणार्या आणि पुढे त्यांनी लिहूच नये अश्या स्वरूपाच्या प्रतिक्रियांबाबत आहे.
याचा अर्थ असा मुळीच नाही की कुणी तरी नवीन येतोय आणि काहीही वादग्रस्त लिहीतो आहोत आणि मिपाकरांनी ते चालवून घ्यावं.
नवीन लेखक आता कुठे लिहायला लागतो. त्याला मराठी टंकण्यापासून ते प्रकाशित करण्यापर्यंतचा टप्पा आपल्याला वाटतो त्यापेक्षा जरा लांब वाटतो. अश्या वेळी त्याच्या वाटेत तुम्हाला या मार्गावर प्रवेश नाही असा बोर्ड लावणार्या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे असं माझं मत. बाकी पिडा काका यांच्याशी सुध्दा सहमत आहे. प्रतिक्रिया लेखनालाच असल्या पाहिजेत लेखकाला नकोत.
नवीन लेखकांचे लेखन लक्षात आले तर जरा त्यांना सांभाळून घ्या एवढेच मला सांगायचे आहे. एकदा का सदस्यं पक्का झाला आणि मिपाचं स्वरूप त्याच्या लक्षात आलं की तो सुध्दा सरावून जाईल. मग होऊन जाऊ द्या :)
- नीलकांत
11 Jun 2011 - 2:15 pm | ऋषिकेश
सहमत
इथे तर सहमती आहेच
प्रश्न इथे येतो. मिसळपाववर सारेच निष्णात लेखक नाहित व तसे अपेक्षितही नाही. अश्यावेळी चुका अत्यंत नीटपणे दाखवलेली कैक उदा. दाखवता येतील. मी स्वतः नवीन असताना अनेक सदस्यांनी प्रोत्साहन दिले तशा अनेक चुकाही दाखवून दिल्या आहेत. एखाद्याच्या लेखनावर मात्र तु म्हणतोस तसे वाभाडे काढले जातात हे सत्य आहे. मात्र असे का होते हा आत्मपरिक्षणाचा विषय झाला. आपला अख्खी दुनिया छळ करते असा गैरसमज सतत बाळगून चांगल्या इच्छेने दिलेल्या प्रतिसादांचा किंवा सहज केलेल्या गमतीचा विपर्यास केलेला अनेकदा आढळेल.
शिवाय काही सदस्य असे आहेत ज्यांना अश्या ओढलेल्या कोरड्यातच गंमत वाटते. अश्या सदस्यांच्या लेखनावर चांगल्या वाईट कशाही प्रतिक्रीया द्या काहि खुचपट काढणे --> वाद उकरणे --> १००+ प्रतिसाद हा पॅटर्न वापरलेला दिसतो की नाही?
असो.
तुझ्या मुळ मतितार्थाशी सहमत आहेच. मात्र यावर जाहिर चर्चा व्हावी इतके टोक, जेष्ठ सदस्यांकडून गाठले जाते असे वाटत नाही (किंवा माझा अभ्यास कमी पडतोय :) )
10 Jun 2011 - 12:05 pm | नितिन थत्ते
मला नव्या लेखकांना टारगेट करून पाणउतारा केला जातो असे दिसलेले नाही.
10 Jun 2011 - 1:53 pm | चिंतामणी
:(
म्हणजे नीलकांतची चुक झाली म्हणायची.
10 Jun 2011 - 1:54 pm | चिंतामणी
:(
म्हणजे नीलकांतची चुक झाली म्हणायची.
10 Jun 2011 - 1:55 pm | गणेशा
मी येथे तसा नविनच आहे (कालावधी कीती ही असला तरी ७-८ नहिने पण नाही झाले येवुन).
परंतु जुन्या लोकांपेक्षा ही नविन लोकांना रिप्लाय देने मला आवडतेच.
तरीही जुन्या चांगल्या लेखांमुळे छान वाटते, आणि जुन्या लोकांचे लेखन ही वाचनिय असते.
तरीही आपल्याला न आवडलेल्या किंवा फालतु धाग्यांना रिप्लाय न देने हे टिंगल करण्यापेक्षा ही चांगले आहे.
मग तो फालतु धागा जुन्यांचा असो वा नविन लोकांचा..
वरती गवि म्हणतात तसे प्रतिक्रिया ह्या लेखनाला असल्या तरी प्रोत्साहन हे लिहिणार्याला असते.
उगाच कोणाला ही प्रोत्साहन द्यायचे नाही पण ज्यांचा प्रामाणिक प्रयत्न असेन त्यांना नक्कीच प्रतिसाद द्यायला हवे. भले लिखानात सुधारणा दाखवाव्यात पण टिंगल करु नये असे वाटते.
एक नविन सभासद...
गणेशा
10 Jun 2011 - 1:51 pm | चिंतामणी
टिंगळ टवाळी कमी होईल अशी (भाभडी) आशा आहे.
11 Jun 2011 - 7:56 am | सुधीर मुतालीक
नीलकांत यांच्या भावना समजू शकतो. मी ही नवीन सदस्य आहे. एक दोन लेख टाकलेत. पहिला लेख टाकल्यावर बरेच दिवस मिपा वर फिरकलो नव्हतो. पण जेव्हा आलो आणि माझ्या लेखावर वीस हून अधिक बोल बघितल्यावर छान वाटले. आणि मिपा ची मला चटक लागली. मला मिळालेल्या सगळ्या प्रतिक्रिया काही माझ्या लिखाणाचे उदो उदो करणा-या नव्हत्या . नंतरच्या माझ्या लिखाणाला फक्त दोन वा तीनच प्रतिक्रिया मिळाल्या. पण मी माझी चटक जाऊ दिली नाही. लेखक हे नाही बघत की त्याला प्रतिक्रिया कशी मिळाली - बरी वा वाईट ! प्रतिक्रिया मिळणं हाच लेखकाचा सन्मान असतो. लेखक हाही वाचक असतोच ना. किंबहुना, लिहिणा-याने खुपदा आधी वाचकच असावे लागते. मग वाचक म्हणुन मी नाई का कधी बोचरी टीका करत ? प्रत्येक जण करत असेल. करीत नसेल तर प्रगल्भते मध्ये गडबड आहे. तसेच माझ्या ही लिखाणाच्या बाबतीत कुणी करू शकते ही परिपक्वता इथे लिहिणा-या कडे असायला पाहिजे. मिपा सारखा एखादा तरी मंच अहो असुद्या, जिथे दिलखोल के बागडावं, खरखर बोलावं. याला सांभाळ त्याला सांभाळ करत सतत भान बाळगत जगताना इथे जरा मुक्तपणे व्यक्त होण्याची मुभा असू द्याना. त्या कृत्रिम पणे सांभाळण्याच्या उद्योगांमध्ये चांगल्या प्रतिक्रिया मिळतात हो खूप. पण त्या खोट्या असू शकतील या जाणीवेने एन्जोय करता येत नाहीत. मिपा वर ख-या प्रतिक्रिया मिळतात याचे सुख उपभोगता आलं पाहिजे. त्या ब-या वाईट कशा ही असोत पण ख-या असाव्यात. मराठी माणुस खूप सावरत जगण्यात आपले आयुष्य खर्ची घालतो. म्हणुन आपल्या कडे फार जण उद्योजक नसतात. स्वत:ला सावरतात इतरांकडून ही सावरून घेतात. सवारणा-यालाही सावरतात. साली झोकून देवून जगण्याची मजा, रिस्क घेण्याची झिंग त्यामुळे येतच नाही. तुम्ही इतका छान मंच निर्माण केलाय, जरा खरं खरं होऊ द्या इथे.
11 Jun 2011 - 10:07 am | नगरीनिरंजन
वा! क्या कही!
11 Jun 2011 - 12:14 pm | Nile
है शाबास! तुमची रसिकता आवडली ब्वॉ आपल्याला. संपादक-व्यवस्थापकांची बोटं धरून का "जेष्ठ" होता येतं?
11 Jun 2011 - 12:28 pm | नीलकांत
नवीन लोकांना खोटं खोटं चांगलं लिहा असं कोण म्हणतंय? माझा रोख फक्त एवढाच आहे की अशी प्रतिक्रिया देऊ नका की ज्याने त्या नुकत्याच लिहू लागलेल्या लेखकाचा पुढे लिहीण्याचा उत्साह करपून जावा. नाही आवडलं लेखन तर ते सांगण्याच्या अनेक पध्दती आहेत की. नकारात्मक प्रतिक्रिया देऊन सुध्दा पुढे लिहीताना काय भान बाळगावं हे सांगणारी ओळ टाकली तर लेखकाला कदाचीत मदतच होईल.
आता तुमचं बघा ना, तुम्ही लेख लिहीला त्याला चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि तुम्ही आनंदीत झालात. मात्र याच वेळी तुमच्या लेखाला आलेल्या १५ प्रतिक्रिया तुमच्या लिखानाच्या वाभाडे काढणार्या आल्या असत्या तर तुम्ही नाराज झाले असते व कदाचीत पुन्हा लिहीले असते की नाही हे सांगता आले नसते. नवीन लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांनी लागलीच चांगले आणि साहित्यमुल्य असलेले लिहावे असा अट्टाहास अनाठायी आहे असं वाटतं. लेखक जेव्हा नवीन असतो तेव्हा काही काळ त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याचा अगदीच हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया टाळाव्यात म्हणजे त्याच्या लिखानात सुधारणेस वाव राहील. नवीन लेखकांना पळवून लावण्याच्या नादात मिसळपाव पाच दहा लेखकांनी लिहीण्याचे व त्याच पाच दहा लोकांनी प्रतिक्रिया देण्याचे ठिकाण बनेल. असा उच्चभ्रु दर्जा मिळवावा अशी मिसळपावची कधीच इच्छा नव्हती आणि नाही सुध्दा.
- नीलकांत
14 Jun 2011 - 1:56 pm | अजातशत्रु
हेच म्हणतो
यातील नवीन लेखकांना पळवून लावण्याच्या नादात मिसळपाव पाच दहा लेखकांनी लिहीण्याचे व त्याच पाच दहा लोकांनी प्रतिक्रिया देण्याचे ठिकाण बनेल. असा उच्चभ्रु दर्जा मिळवावा अशी मिसळपावची कधीच इच्छा नव्हती आणि नाही सुध्दा. या विचारांशी शतशः सहमत
काहि लोक कंपु बाजी करुन ज्या मुद्द्यात दम नाहि असे निरर्थक मुद्दे माहित असताना देखिल तो लेखक केवळ आपला कंपु / समविचारि आहे म्हणून मुद्दाम त्यांच्या लेखनाला सहमती दर्शवतायत,
यातले काहि हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणारेहि आहेत,
हे माझ्या नाहितर इतर लेखकांच्या लेखना वरिल प्रतिक्रियांवरुन मला तरि जाणवलेय..
डायर्या लिहा असे सांगणारे/ काड्या घालणारे आणी कहर म्हणजे असले लिखाण इथे आणू नका म्हणजे
अप्रत्यक्षपणे लिहूच नका असे सांगणारे सदस्य
तुमचा वरचा 'सा' निट लागला नाहि खालचा 'ध' बरोबर येत नाहि असे म्हणून नुकत्याच (लिहू) गाऊ लागलेल्या लेखकाचे गळे हे (लेखनशास्त्री) गायनशास्त्री घोटतात हे पाहून त्या लेखकाचे वाईट वाटते..
नवीन लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांनी चांगले आणि साहित्यमुल्य असलेले आणी विशेषतः आपल्याला आवडेल असेच लिहावे असा अट्टाहास अनाठायी आहे असं मलाहि वाटतं..
नाही आवडलं लेखन तर ते सांगण्याच्या अनेक पध्दती आहेत हे मि हि अनेकदा सांगितले आहे
निदान माझ्या बाबतीत तरी..दुर्देवाने टिका सहन करण्याची प्रघल्भता काहि सदस्यांकडे नाहि आहे,
अन् मोठे दुर्देव म्हणजे जे सदस्य या गोष्टि करतायत तेच इथे काय नको,काय हवे,कसे हवे यावर चर्चा करतायत...ती व्हायलाहि हवी पण त्यात सुर तोच जाणवतोय....
असो..
मला वाटलं हा धागा माझ्या मुळे काढला की काय?
हि अतिशयोक्तीची भावना मनाला चाटून गेली
आय नो ते खरे नाहि
पण या गोष्टि इथे घडल्यात हे खुद्द मालकांना जाणवले..आणी त्यांनी त्याची योग्य ती दखल घेतली त्या बद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार
सर्वांनीच योग्य ती काळजी घेतली तर भविष्यात हे प्रॉब्लेम येणार नाहित...:)
जय महाराष्ट्र......!!
16 Jun 2011 - 1:32 am | सुधीर काळे
माझ्या मते इथे सभासदांनी वाचावे, आवडलेले किंवा न आवडलेले मुद्दे लिहावेत, जमल्यास विधायक सूचनाही कराव्यात पण कुचेष्टा करू नये. कांहीं बोचणारी टीका असेल तर 'व्यनि'द्वारा करावी! प्रतिसादाचा उद्देश आपली हुषारी दाखविण्याचा नसावा तर लेखात सुधारणा करण्याकरता किंवा न पटलेले मुद्दे सांगण्याकरता असावा.
इथे कंपूगिरी नक्की होती व खूप होती व तिचा भर दोन गोष्टींवर असायचा. एक गोष्ट होती "अहो रूपं अहो ध्वनि:" तर दुसरी गोष्ट होती कंपूमधल्या एकाद्याच्या लिखाणावर टीका केली कीं त्याच्यावर हल्ला करणे!
कुणाच्या का प्रयत्नाने असेना, पण हल्ली हे 'अतिरेकी' खूपच 'सज्जन' झालेले आहेत असे दिसते!
16 Jun 2011 - 7:41 am | टारझन
पण काही बाबळीच्या गाठी आहेत , त्यांना कितीही प्रयत्न केले तरी अतिरेकी लेखन करण्यापासुन कोणी अजुन तरी रोखु शकलेलं नाही :) प्रकरण कधी थांबणार हे ? ;)
16 Jun 2011 - 1:08 pm | बिपिन कार्यकर्ते
काळेसाहेब, तुमच्या प्रतिसादातील दोन्हीही मुद्द्यांशी असहमत आहे.
०१. सगळीकडे सगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना पुरून उरायची हिंमत पाहिजे. आपला आपल्या लेखनावर भरवसा पाहिजे. लेखन चांगले असेल तर टिकेल आणि फालतू टीकाकार विस्मृतीत जातील. सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत केले पाहिजे.
०२. बर्याच लोकांना आपल्यापेक्षा वयाने लहान लोकांनी टीका केली की खूप त्रास होतो. (तुमच्या बाबतीत मी हे बघितले नाहीये हे आवर्जून सांगतो.) जालावर लोकांची वयच मूळात माहित नसतात फारशी. त्यातून टीका झालीच तर वरचा मुद्दा आहेच.
०३. कंपुगिरी / अतिरेकी इत्यादी बद्दल. माझ्यामते काही फारसे बदलले नाहीये. थोडाफार फरक असेलही. पण तुमचाच दृष्टिकोन बदलला असावा असे वाटते. किंवा तुम्हाला सवय झाली असावी. ;)
16 Jun 2011 - 7:20 pm | सुधीर काळे
बिपिन-जी,
१. मी "अहो रूपं अहो ध्वनि:"ची उदाहरणे सतत पहात असतो हे मात्र खरे.
२. मी नेहमीच एका तत्वाचा पुरस्कार करतो आणि ते म्हणजे "निरोपावर टीका करा निरोप्यावर नव्हे". पण इथे निरोप्याला निशाण बनविलेले मी रोजच पहातो. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी सर्व बरे-वाईट प्रतिसाद वाचतो, चांगल्या सूचना अमलात आणतो, न पटल्यास त्याबद्दल बर्याचदा 'व्यनि'द्वारा कळवतो, व्यक्तिशः टीका करणार्यांना "अनुल्लेखाने मारतो" व सुखाने जगतो.
३. कंपूबाजी नक्कीच कमी झालेली आहे हे मला जाणवते. संवय झाली म्हणून नव्हे.
४. बर्याच बाबतीत आपले दोघांचे एकमत नाहीं असे दिसते.....इलाज नाहीं!
28 Feb 2013 - 7:26 am | कपिलमुनी
नवीन सदस्यांसाठी ;)
28 Feb 2013 - 7:32 am | वेल्लाभट
या पोस्ट बद्दल तुमचं अभिनंदन, नीलकांत.
28 Feb 2013 - 7:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद.
28 Feb 2013 - 8:54 am | लौंगी मिरची
आजच लिलि काळे यांचा लेख आणि प्रतिसाद वाचले . पण त्या बाई वेड पांघरुन पेडगाव गाठतायत असं वाटलं . कारण बरेचसे शब्द जे अवघड आहेत ते अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत .जर समोरासमोर अशी फसवणुक होत असेल तर पब्लिक गप्प बसणार नाहिच किंवा बसुहि नये . माझ्या पहाण्यात शक्यतो चांगल्या लेखाला चांगले वाईट प्रतिसाद , व्यक्तिपरत्वे आवडीनिवडीनुसार मिळतात . लिखान वाईट नसतच फक्त ते मांडण्याची पद्धत ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार माणुस घेतो आणि टिकाहि त्यावरच असते . त्यामुळे निलकांत यांच्या या लेखाचा गैरफायदा फसव्या लोकांना होऊ नये असे मनापासुन वाटते . लोक मुद्दाम इथे काहिहि भोचक , भंकस लिहित असतिल आणि वर नविन आहे , त्रास देऊ नका असे सुचवत असतिल तर यावर संपादकांनीच लक्ष घालुन हे प्रकार थांबवावेत .
असो .
28 Feb 2013 - 9:00 am | प्रसाद गोडबोले
धन्यवाद
28 Feb 2013 - 2:23 pm | अधिराज
नीलकांत यांच्या लेखातील मताशी आणि
या वरिल प्रतिक्रियेशी सहमत.
28 Feb 2013 - 2:27 pm | अनिदेश
सहमत !!!!....मिपा वय - ९ दिवस :)
28 Feb 2013 - 5:14 pm | मन१
काळजी ह्या शब्दाला दुहेरी अवतरण चिन्हात (double quotes मध्ये) टाकल्यास मीही सहमत.
28 Feb 2013 - 4:36 pm | NiluMP
सहमत. याच सदर्भात मिपावर कोणीतरी चांगला लेख होता "चला लेखक बनुया" म्हणून.
हा सगळा घोळ होतोय तो कोणाला किती प्रतिसाद आले आहेत हे सर्वाना कळते म्हणून. एखादया लेखाच्या प्रतिसाद फक्त त्या लेखकाला दिसेल अशी सोय करा आणि मग बघा.
4 Mar 2013 - 4:40 pm | अधिराज
कंपूबाजांना या उपायाचा तितकासा फरक पडेल असं वाटत नाही, कारण कोण काय प्रतिसाद देणार ते बहुदा हे लोक ठरवत असावेत आधीच.
28 Feb 2013 - 6:30 pm | मृत्युन्जय
मुलांनो सगळ्यांनी एक गोष्ट समजुन घ्या की नविन सदस्यांप्रती जुन्या सदस्यांचे वर्तन कसे असावे यासंबंधी हा धागा आहे. नविन आय डीं बद्दल नाही.
28 Feb 2013 - 6:42 pm | मोदक
जे ब्बात!!!!
28 Feb 2013 - 6:51 pm | पैसा
आय पी सलामत तो आय डी पचास!
28 Feb 2013 - 7:37 pm | मन१
मोदकच्या वरील दोन्ही आयडींनी दिलेल्या प्रतिसादाशी सहमत आहे ;)
28 Feb 2013 - 7:07 pm | प्रकाश घाटपांडे
एकूणच हा मानवी वर्तनाचा भाग आहे. तशात आंतरजालाच्या असलेल्या मर्यादा व बलस्थाने दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. टंकणारा कुठल्या मोड मधे व मूड मधे आहे व वाचणारा कुठल्या मोड मधे व मूडमधे आहे या बावी महत्वाच्या ठरतात. एखाद्या संकेतस्थळाची प्रकृती त्यातील सरासरी लेखनाच्या प्रतिमेवर ठरते. तुच्छतेला प्रतिष्ठा मिळते आहे हे जेव्हा नव्या सदस्याच्या लक्षात येते त्यावेळी तो उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने वर्तन करु शकतो. मग संकेतस्थळाची चॅट रुम व्हायला लागते. एखाद्याच्या वेदनेचा विषय जेव्हा बाकीच्यांच्या विनोदाचा होतो तेव्हा तो दुखावला जातो. त्याला संकेतस्थळाबद्दल वाटणारी आपुलकी नाहीशी व्ह्यायला लागते. सदस्यांची संख्या जेव्हा खूप मोठी होते त्या वेळी त्याचे व्यवस्थापन व नियंत्रण अवघड होउन बसते. अजून ही अनेक बाबी असतील. मानवी संबंधात या बाबी अपरिहार्य आहेत. असो......