नमस्कार,
आज मिसळपाववर येणार्या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे.
असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.
मग अश्या वेळी काही लोक त्यांना सांभाळून घेऊन पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु) देतात तर काही लोक त्यांना चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे त्या लेखकाचा लेखन करण्याचा उत्साह मारल्या जातो. ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक आपला स्वत:चा सुरूवातीचा काळ विसरले आहेत की काय अशी शंका येते. प्रत्येक लेखावर चांगलेच लिहा असं मला म्हणायचे नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की जे लोक नवीन आहेत, नुकतेच लिहायला लागले आहेत त्यांनी चांगलं लिहावं, उत्तम लिहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि पुढील लेख यापेक्षा चांगला येईल अशी मदत करावी ते राहीलंच. काही लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या अंगावर जाणार्या असतात की तो लेखक/लेखीका पुन्हा काही लिहीण्याचा प्रयत्नच करत नाही.
हे टाळता येऊ शकतं का? तर नक्कीच टाळता येतं. एखादा लेखक नवीन आहे तर त्याला त्याचे लेखन कसे सुधारावे याबद्दल मदत करा. काही प्रतिक्रिया असतील तर तो नवीन असे पर्यंत त्याला जरा सांभाळून घ्या. तो लेखक येथे जरा स्थिर स्थावर होऊ द्या आणि मग त्याच्या पुढील लेखांवर काय हव्या त्या प्रतिक्रिया द्या. म्हणजे तो लेखक बर्यापैकी येथील वातावरणाशी समरस झालेला असेल. आणि आपले मत उत्तम मांडू शकेल.
नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे.
सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या.
याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे किंवा ऑरकुट सारख्या गप्पांचे धागे चालवून घेईल असे नाही. माझा रोख केवळ नवीन लोकांना लिहीतं करावं आणि त्यांनी चांगलं लिहायला लागावं यासाठी जूण्या लोकांनी प्रयत्न करावे अशी विनंती करावी एवढाच आहे.
कृपया याकडे लक्ष द्यावे. नवीन लोकांनी निश्चिंतपणे लिहायला लागा. हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे त्यामुळे आपल्या लिखाणावर चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरा. खरं तर त्यातच मजा आहे. मात्र कुणी उगाचच अती करून वाईटच प्रतिक्रिया देत असेल तर संपादक मंडळ त्याची काळजी घेईल.
- नीलकांत
प्रतिक्रिया
28 Feb 2013 - 9:49 pm | धन्या
हा अनुभव ताजा आहे.
एनी पब्लिसीटी ईज गुड पब्लिसीटी या न्यायाने केवळ टीआरपी वाढतोय म्हणून थिल्लर धाग्यांकडे दुर्लक्ष करुन गुणवत्तेशी तडजोड करण्यात काहीच अर्थ नाही.
28 Feb 2013 - 11:16 pm | मोदक
एकूणच हा मानवी वर्तनाचा भाग आहे. तशात आंतरजालाच्या असलेल्या मर्यादा व बलस्थाने दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. टंकणारा कुठल्या मोड मधे व मूड मधे आहे व वाचणारा कुठल्या मोड मधे व मूडमधे आहे या बावी महत्वाच्या ठरतात.
नेमके लिहिलेत... धन्यवाद.
28 Feb 2013 - 8:56 pm | फिरंगी
मान्य...............
28 Feb 2013 - 9:04 pm | तुमचा अभिषेक
नवीन सभासदांना शाश्वती देणारा असा धागा बघून बरे वाटले. मी देखील मिपावर नवीनच आहे, पण स्वताची अशी काही तक्रार किंवा वाईट अनुभव नाही, उलट चांगलाच आहे. :)
28 Feb 2013 - 11:01 pm | रमेश आठवले
मिपाचे बरेच सदस्य टोपण नाव वापरतात. याचे काय कारण असावे ? टोपण नावाच्या आड दडून काय हवे ते लिहिण्याची मुभा मिळते असे तर त्यांना वाटत तर नसेल ना ?
4 Mar 2013 - 8:29 pm | धन्या
टोपण नावाने लिहिण्याची परंपरा आंतरजालाचा जन्म होण्यापूर्वीची आहे. त्यात मिसळपावचा काही संबंध आहे असं वाटत नाही. पूर्वी आपले सुधारणावादी जहाल विचार लोकांना पटले नाहीत तर आपल्या घराची, देहाची मोडतोड होऊ नये म्हणून लोक टोपणनावाने लिहित असावेत. हीच परंपरा तशीच पुढे आली असावी, त्यामागचं कारण संपलं तरीही.
नाही. जालावर थोडा अवधी गेला की टोपण नावाच्या मागची खरी व्यक्ती कोण आहे हे बरेच वेळा कळते. फेसबुकवर अॅडवले जाते, फोन केले जातात, सोबत ट्रेकींग वगैरेला जातात, आठ पंधरा दिवसाआठ हादण्यासाठी नवनविन हाटेले शोधून खादाडी कटटे केले जातात, दारु वगैरेच्या पार्टया होतात. सो टोपण नावाआड दडण्याचा प्रश्नच येत नाही.
28 Feb 2013 - 11:08 pm | भिकापाटील
आठवल्यानन्तर सान्गतो :प
1 Mar 2013 - 12:25 am | खटपट्या
नीलकान्त दादान्शी मी पूर्ण सहमत आहे. लीलीताईवर फारच बोचरी टीका झाली.
मी माझा पहीला लेख लीहू की नको असा विचार करतो आहे.
4 Mar 2013 - 8:35 pm | धन्या
तुमची लीलीताई डुप्लिकेट आयडी असण्याची दाट शक्यता आहे. केवळ दंगा करण्याच्या उद्देशाने लिलि काळे या नावाने इथलाच कुणीतरी जुना सदस्य अवतरला असावा.
एखादा आयडी डुप्लिकेट आयडी असावा अशी चारचौघांना शंका येऊनही अशा आयडींवर दंगा करण्यासाठी व्यवस्थापनाकडून तात्काळ कारवाई का केली जात नाही हे मात्र अनाकलनिय आहे.
2 Mar 2013 - 10:20 am | श्री गावसेना प्रमुख
लिली हा डुप्लिकेट आय डी असावा म्हणुनच कदाचीत
5 Mar 2013 - 7:31 pm | मी-सौरभ
प्रतिसाद क्रमांक १००
रच्याकने: नीलकांताने एका पेक्षा जास्त प्रतिसाद दिलेला हा एक्मेव धागा असावा असे वाटते. त्या हैद्राबाद्च्या धाग्यावर कदाचित असतील त्याचे एकापेक्षा जास्त प्रतिसाद
3 Jan 2014 - 8:49 pm | अकिलिज
लेख लिहला आहे आणि बर्याच सदस्यांनी अनुमोदनही दिले आहे याचाच अर्थ पाणी मुरलेले आहेच आणि परिणाम ही दिसलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर चेसुगु. थोडा तिरपा विचार करायचा. प्रॅक्टिकल तर नव्ह्ताच. कुणाला त्रास देत नव्हता आणि विचार तर चांगलेच मांडत होता. पण कंपूबाजी आणि चिडवाचिडवीमुळे कायमचा निघून गेला. हा धागा नवीन लेखकांसाठीचा आहे पण तो तर जूना होता. तो परत असायला हवा. कदाचीत शांतपणे पाहत असेलही. तसाच एक छोटा डॉन. आजकाल काही लेखच लिहीत नाहीये. कदाचीत ईतरांना त्याचा कॉम्प्लेक्स असावा.
दर्जा सुधारावा ही गोष्ट मान्य. पण नवीन लेखकाची लेख लिहीण्याची ईच्छा मारणे वाईटच.
एक सल्ला. नवीन लोकांना जरा हळू मारा. थोडं जुन्यांनाही जपा.