रंग कवितेचे -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
23 May 2011 - 11:04 am

पहिली माझी कविता हो
प्रेयसीने वाचली -
अर्धी लिहिली होती तरी
अय्या कित्ती छान म्हणाली !

दुसरी माझी कविता हो
आईने ती ' पाहिली ' -
कौतुकाने सांभाळूनी
पेटीतच ती ठेवली !

तिसरी माझी कविता हो
बापाने वाच(व)ली -
कागद मागे पुढे बघुन
कोरी बाजू वर ठेवली !

चौथी माझी कविता हो
दुसऱ्याने ती पाहिली -
खो खो हसून तिसऱ्याकडून
तीनशे मित्रात फिरवली !

पाचवी माझी कविता हो
बायकोने वाचली -
काही समजली नाही तिला
रद्दीतच तिने घातली !

सहावी माझी कविता हो
शेजाऱ्याने वाचली -
नेहमीप्रमाणे 'जळून ' त्याने
तुकडे करून भिरकावली !

सातवी माझी कविता हो
टीकाकाराने चाळली -
त्यालाही ना कळल्यामुळे
'सर्वोत्तम ' कविता ठरली !!

अद्भुतरससंस्कृतीकवितामुक्तकसमाजजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

23 May 2011 - 12:48 pm | अरुण मनोहर

आठवी माझी कविता
मिपावर आज टाकली
पहा किती वाचकांनी
भराभरा ती चाळली