"पांगिरा"

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
22 May 2011 - 8:55 pm

"पांगिरा"

कथा : विश्वास पाटील
दिगदर्शन: राजीव पाटील ( जोगवा फेम)

---

काय लिहु तेच जास्त कळत नाहि इतका भिषण वास्तववादी आघात झालाय मनावर... ह्या चित्रपटातुन जे चित्रण दाखवले गेले आहे, ते आपल्या अवतीभोवती आपण कायम पहात असतो- ऐकत असतो आणि त्यामुळे शेतकर्यांच्या जीवनाबद्दल तेथील राजकारनाबद्दल विचार करताना मनात कमालीची अस्वस्थता आणते आहे.. सामान्य गावामध्ये वस्तीवरती लोक कसे जीवन जगतायेत.. राजकारणी -सरपंच सरकारी योजनांचा बोजवारा वाजवुन कसा पैसा उकळतो.. गावातील -वस्तीवरील लोकांच्या रोजचे जीवन तर खरेच मन पिळवटुन टाकणारे आहेत..
त्यांचे आभाळाच्या पांघरुनाखाली निजलेले स्वप्न पिक .. त्याची चिंता .. जमीनीच्या गर्भातील संपत चालले नीरजीवन खायला महाग असताना पिकवलेला शेतमाल पुन्हा दलालांच्या कचाट्यात सापडणे आणि आयुष्य गमावलेले शेतकरी...
सगळेच सुन्न करते.. एक चित्तथरारक चित्रकृती..

सिनेमाची सुरुवात पाण्याची पातळी आणि जमीनीतील कमी पाण्याची पिके या विषयावरुन पी.एच्.डी करणार्‍या मिता सावरकर पासुन सुरु होते.. असे वाटत होते तीच या चित्रपटाची नायिका आहे .. पण तसे नाहिच .. या चित्रपटात नायक - नायिका नाहित ... चित्रपटाचा खरा नायक आहे "गाव" .. पांगिरा गाव.
निसर्गाच्या देण्याने समृद्ध असा गाव.. पण भुजल पातळी कमी होत आहे.. सरपंच ..राजकारणी शेतकर्यांची लुट करत आहे.. संपुर्ण जमीनीच्या जमीनी पोटात घालण्याचे प्रयत्न आहेत.
सामन्य लोकांचे सामन्य जगणे आणि त्यांची भोळी आशा .. एकमेकातील परिस्थीतीच्या तडाख्यामुळे असणारे वैर हेच खरे ह्या चित्रपटाची मध्यवर्ती भुमीका असलेले गाव..

पुढे शेतकरी कसे हवालदिल होउन जगतायेत हे पाहने म्हणजे खरेच खुप जीवाला लागते .. त्यातुन पुढे होणार्‍या मारामारी.. आणि मग जेंव्हा अंतिम अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो तेंव्हा कसे तरी सावरायला लागले तर पिकाच्या लिलावातील कमी बोली मुळे आयुष्य उद्ध्वस्थ झाल्यामुळे होणारी दंगल आणि पोलीसांचा बेछुट गोळीबार ..
आणि उरलेली भयान शांतता ...

विश्वास पाटलांच्या लेखनीतुन उतरलेली कथा म्हणजे भयानक मनस्पर्षी असनार हे माहित होतेच.. त्यात भर म्हनुन दिगदर्शन कमालीचे उच्च झालेले आहे.. वस्तुस्थीती .. परिस्थीती खुद्द आपल्या गावातीलच आहे असे बघताना वाटत राहते... प्रत्यक प्रसंग म्हणजे आपल्याच कुटंबावर होत असलेला अत्याचार वाटतो आहे.. आणि माणुस म्हणुन आपण या भुमिपुत्रांचे देणे लागत नाहि का? असा प्रश्न आपल्या पुढे उभा राहु पाहतोय ...

(अवांतर : गंगाधर मुटे यांचे जे लेख असतात.. अगदी तीच परिस्थीती या चित्रपटात पहायला मिळते.. अता पर्यंत ते मांडत आलेले प्रश्न-लेख ज्या शेतकर्‍यांवर आधारीत आहेत ते शेतकरी ह्या चित्रपटात दाखवले आहेत... असेच वाटले..)

आमच्या फलटन जवळच्या गावात चित्रकरण झालेले आहे तरी अशीच परिस्थीती जेंव्हा माझ्या गावात अनुभवायला मिळतेय तेंव्हा खरेच खुप असह्हय वाटते आहे.. चित्रपटाचे "जीव उडला.. पाण्यासाठी" खुप उत्तंग गाणे आहे.. खुप हेलावते मन यावेळेस.. शेवटची कविता किशोर कदमांचीच असणार "रांड मुंड झाले रान .. सैरावैरा झाले बांध" खुपच जिव्हारी लागते...

सिनेमा संपल्यावर तुम्ही ही कदाचीत थरथरत अस्वथ होउन.. एक अभिजात कलाकृती पाहिल्याचा आनंद घ्यावा की शेतकर्यांचा आपल्या अन्नदात्याच्या संसाराचे भिजलेले चित्रण मनात साठवावे ह्या विचाराने बाहेर येताल..

कृपया हा चित्रपट सर्वांनी पहावाच अशी माझी विनंती आहे.. ( हा चित्रपट उत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट म्हणुन पारितोषिक मिळवेलच हे मी तरी लिहुन देवु शकतो.. कदाचीत ऑस्कर ला पण हा चित्रपट पारितोषिक जिंकेल) .
चित्रपट .. त्यातील जीवंत अभिनय , कथा यांना तोड नाहीच.. उलट विश्वास पाटलांसारख्या दर्जेदार साहित्यिकाची दर्जेदार कलाकृती बघण्यात खरेच खुप छान वाटते आहे.. मनात घर करुन जाणारी माणसे पाहिलीत आज मी असेच वाटुन जाते.

निगेटीव्ह बाजु :
चित्रपटाची जाहीरात अजुन खुप जास्त व्हायला पाहिजे होती.. . समाजातील सर्व स्थरापर्यंत ह्या चित्रपटाबद्दल माहिती हवी होती.. तसे जानवत नाही.. हीच काय उनिव वाटते आहे...

अवांतर : यावेळेस मुंबई ला पाहिला हा सिनेमा, पुढच्या आठवड्यात ही हाच चित्रपट पुन्हा पाहत आहे.. कोणी येताय का बरोबर ?
आणि माझे पुढचे लेखन चित्रपटावर नक्की नसेन .. पण लिखानासाठी एक विषय त्याची प्रेरणा "पांगिरा" ह्या चित्रपटानेच दिलेली आहे.

समाजजीवनमानराहणीचित्रपटमाध्यमवेधप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

चांगलं परीक्षण, बघितला पाहिजे हा चित्रपट.....

नक्की बघेन.....

धन्यवाद!

नगरीनिरंजन's picture

22 May 2011 - 10:22 pm | नगरीनिरंजन

चांगली ओळख करून दिलीस. त्रास होणार हे माहिती असूनही पाहावाच लागेल

पैसा's picture

22 May 2011 - 10:40 pm | पैसा

चित्रपट नक्की बघणार.

आनंदयात्री's picture

23 May 2011 - 12:47 am | आनंदयात्री

सहमत. ओळख छान आहे, चित्रपट पहायला नक्कीच आवडेल.

अवांतरः चित्रपटाची ओळख देतांना त्याची काही चित्रे, ट्रेलर वैगेरेही जोडले असते तर लेख वाचायला अजून मजा आली असती.

शिल्पा ब's picture

23 May 2011 - 4:07 am | शिल्पा ब

ओळख छान आहे पण असं काही आता बघू शकत नाही.

५० फक्त's picture

23 May 2011 - 7:39 am | ५० फक्त

गणेशा, परिक्षण छान आणि धन्यवाद,

पण मला वाटतं मुळ विषय किती ही भीषण असला तरी त्यावर असे एकावर एक चित्रपट येउन काही होणार आहे का, उगा सरकारची करसवलत आणि पुरस्कार डोळ्यासमोर ठेवुन हे चाललेलं दिसतंय. या विषयावर खेड्यात जाउन चित्रपट काढायला जेवढा खर्च झाला तेवढा पैसा असा एखाद्या गावाला दिला असता तर काहितरि झालं असतं ना.

गणेशा's picture

23 May 2011 - 3:25 pm | गणेशा

प्रथमता धन्यवाद..
-------------
अवांतरः

जेवढा खर्च झाला तेवढा पैसा असा एखाद्या गावाला दिला असता तर काहितरि झालं असतं ना.

विचार बरोबर असले तरी फक्त पैश्यात काहीच होत नाही असे माझे मत आहे.
लोकजागरण महत्वाचे वाटते मला.. आणि असे सिनेमे ते काम योग्य पद्धतीने करतात.. फक्त प्रत्येक शेतकर्यांनी हा सिनेमा बघितला तर आपले विचार, आपली उगाच नेत्यांच्या मागे चाललेली फरफट.. जमीनीचा कस.. अभ्यासपुर्ण शेती असे विचार जर त्यांच्यामार्फत पोहचवले गेले आणि उगाच आपल्या आपल्यात भांडल्याने क्षणिक पैश्याच्या अमिषाने कायमची वाट लागते हे कळाल्यास.. बराच फायदा होयील..

जसे बूक्स, शिक्षण काम करतात, तसेच सिनेमे हे सुद्धा प्रबोधनाचे काम करु शकतात.. म्हणुन एका गावाला पैसा दिला तरी तो कीती वर्ष आणि कसा पुरेल असा विचार जर दर आठवद्याला फिरायला जाणार्या लोकांनी.. विनाकारण बरीस्ता.. सी.सी.डी त जाणार्‍यांनी केला तरी फायदा आहेच की.. पण त्यांचा आनंद तोच असतो ..तसाच चित्रपट बनवर्‍यांचा कला हाच प्रांत असतो .. आणि प्रत्येकाने आपापल्या आयुष्यातील आनंद मिळवणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य वाटते.
आणि प्रत्येकाने हे ही लक्षात घेतले पाहिजे की आपला उद्धार बाहेरील लोक प्रथम करणार नाहीच .. स्वतातुन उर्मी घेवुन वाटचाल करा.. रस्ता आपोआप सुकर होत जाईन ..

माझे तर पुर्ण मत आहे.. फक्त पैश्यामध्ये कुठलीच समाजसुधारणा होत नाही.. तय साठी त्यांच्यात मिसळुन त्यांच्यातील एक होउन जागरणच करावे लागते..

नाहीतर अनाथआश्रमांना कीती ही पैसा मिळत असला तरी अनाथअश्रम श्रिमंत होतात पण अनाथ बालके गरीबच असतात तसेच शेतकर्‍यांचे होयील, गावाला पैसा मिळेल पण शेतात फक्त माती ...

गणेशा's picture

23 May 2011 - 3:25 pm | गणेशा

प्रथमता धन्यवाद..
-------------
अवांतरः

जेवढा खर्च झाला तेवढा पैसा असा एखाद्या गावाला दिला असता तर काहितरि झालं असतं ना.

विचार बरोबर असले तरी फक्त पैश्यात काहीच होत नाही असे माझे मत आहे.
लोकजागरण महत्वाचे वाटते मला.. आणि असे सिनेमे ते काम योग्य पद्धतीने करतात.. फक्त प्रत्येक शेतकर्यांनी हा सिनेमा बघितला तर आपले विचार, आपली उगाच नेत्यांच्या मागे चाललेली फरफट.. जमीनीचा कस.. अभ्यासपुर्ण शेती असे विचार जर त्यांच्यामार्फत पोहचवले गेले आणि उगाच आपल्या आपल्यात भांडल्याने क्षणिक पैश्याच्या अमिषाने कायमची वाट लागते हे कळाल्यास.. बराच फायदा होयील..

जसे बूक्स, शिक्षण काम करतात, तसेच सिनेमे हे सुद्धा प्रबोधनाचे काम करु शकतात.. म्हणुन एका गावाला पैसा दिला तरी तो कीती वर्ष आणि कसा पुरेल असा विचार जर दर आठवद्याला फिरायला जाणार्या लोकांनी.. विनाकारण बरीस्ता.. सी.सी.डी त जाणार्‍यांनी केला तरी फायदा आहेच की.. पण त्यांचा आनंद तोच असतो ..तसाच चित्रपट बनवर्‍यांचा कला हाच प्रांत असतो .. आणि प्रत्येकाने आपापल्या आयुष्यातील आनंद मिळवणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य वाटते.
आणि प्रत्येकाने हे ही लक्षात घेतले पाहिजे की आपला उद्धार बाहेरील लोक प्रथम करणार नाहीच .. स्वतातुन उर्मी घेवुन वाटचाल करा.. रस्ता आपोआप सुकर होत जाईन ..

माझे तर पुर्ण मत आहे.. फक्त पैश्यामध्ये कुठलीच समाजसुधारणा होत नाही.. तय साठी त्यांच्यात मिसळुन त्यांच्यातील एक होउन जागरणच करावे लागते..

नाहीतर अनाथआश्रमांना कीती ही पैसा मिळत असला तरी अनाथअश्रम श्रिमंत होतात पण अनाथ बालके गरीबच असतात तसेच शेतकर्‍यांचे होयील, गावाला पैसा मिळेल पण शेतात फक्त माती ...

५० फक्त's picture

24 May 2011 - 6:59 am | ५० फक्त

''लोकजागरण महत्वाचे वाटते मला.. आणि असे सिनेमे ते काम योग्य पद्धतीने करतात.. फक्त प्रत्येक शेतकर्यांनी हा सिनेमा बघितला तर '' - जर असले चित्रपट घरचे पैसे घालुन पाहण्याएवढा पैसा शेतक-याकडे असता तर असले चित्रपट काढायची वेळच आलि नसती.

''उगाच आपल्या आपल्यात भांडल्याने क्षणिक पैश्याच्या अमिषाने कायमची वाट लागते हे कळाल्यास.. बराच फायदा होयील..'' - आज शेतकरी काय किंवा माझ्यासारखे नोकरदार मध्यमवर्गीय क्षणिक सुखांमागे / पैश्यामागे धावतात कारण अंतिम सुख किंवा पैसा मिळेल याचि काहीही शक्यताच दिसत नाहीये. उस कारखान्याला टाकल्यावर पहिला हफ्ता जर ३-४ महिन्यात मिळत असेल तर ह्या वर्षीचे पुर्ण पैसे पुढच्या वर्षी तरी मिळतील का नाहि याची खात्री नाहि, तीच गत माझ्यासारख्यांच्या अ‍ॅपरायझेल बद्दल होते.

''आणि प्रत्येकाने हे ही लक्षात घेतले पाहिजे की आपला उद्धार बाहेरील लोक प्रथम करणार नाहीच .. स्वतातुन उर्मी घेवुन वाटचाल करा.. रस्ता आपोआप सुकर होत जाईन ..'' - अगदी बरोबर, हे त्या शेतक-यांना कळालं पाहिजे, कुणितरि बाहेरच्यनं त्याच्या आयुष्यावर चित्रपट काढुन त्यांचे प्रश्न सुटणार नाहित, ते त्यांनाच सोडवायचे आहेत.

'' फक्त पैश्यामध्ये कुठलीच समाजसुधारणा होत नाही.. तय साठी त्यांच्यात मिसळुन त्यांच्यातील एक होउन जागरणच करावे लागते..'' - हे अर्ध सत्य आहे असं माझं मत आहे, कारण पैशाशिवाय काहिच होउ शकत नाही, सुधारणा नाही किंवा दुसरं ही काहिच नाही. पैसा हे एकच अंतिम सत्य आहे.

अनाथाश्रमाचं उदाहरण गंडलेलं आहे, अनाथाश्रमांना पैसा अनाथश्रम चालवण्याकरिता मिळतो, अनाथ मुला-मलींना श्रिमंत करण्यासाठी नव्हे. आणि तिथं ब-याच मुलांना आपले अधिकार काय आहेत याचि माहितिच नसते किंवा त्याची गरज नसते. पण गावात प्रत्येकाला आपले अधिकार माहित असतात आणि त्याचा कसा वैयक्तिक फायदा कसा घ्यायचा हे देखिल माहित असते, संपुर्ण गावासाठी कोणि हे करत नाही हे बरोबर.

गणेशा's picture

24 May 2011 - 1:12 pm | गणेशा

तुमचे मुद्दे कळले.. पटले नाही.
आणि तरीही या मुद्द्यांमागची बेसिक कल्पना चुकीची वाटते त्यामुळे थांबतो.

प्रचेतस's picture

23 May 2011 - 9:19 am | प्रचेतस

छान परिक्षण रे मित्रा. पांगिरा कादंबरी पूर्वी वाचलेली आहे. त्यात मिता सावरकरसारखे पात्र होते असे आठवत नाही बहुतेक कादंबरीत ते नसेलच. चित्रपटात मात्र गावाकडे तटस्थ नजरेने बघणार्‍या व्यक्तीची गरज म्हणून ते उभे केले असावे.
पुढच्या आठवड्यात जाउ रे बरोबर चित्रपट पाहायला. बहुतेक विशाल इ-स्क्वेअर नाहितर बिग ला जाउ.

बजरबट्टु's picture

23 May 2011 - 10:51 pm | बजरबट्टु

मिता सावरकरसारखे पात्र कांदबरीमध्ये नाही आहे...ते चित्रपटामधील कथेत उभे केले गेले आहे.

शरभ's picture

23 May 2011 - 3:23 pm | शरभ

"गोष्ट छोटी डोंगरा एवढी "ची आठवण झाली....

उदय के'सागर's picture

23 May 2011 - 4:26 pm | उदय के'सागर

मी आपल्याशी सहमत आहे. प्रत्येकाने पहावा असा हा चीत्रपट आहे. विषेशकरुन शहरातल्या लोकांनी तर जरूरच पहावा असा.

मला फक्तं एकच गोश्ट खटकली, सिनेमा थोदा अवरता घेतला आहे शेवटी असं वाटतं, पण मुळात कादंबरी बरीच मोठी असल्यामुळे ती ३ तासाच्या सिनेमात बसवणे तसेही अशक्यच आहे म्हणुन तिच खटकणारी गोश्ट जमेचि बाजु हि म्हणु शकतो.

विषेश सीन : जेंव्हा "स्मिता ताम्बे" हफस्याने पाणि उपसत असते पाणी येत नसतं तरिही ति वेडयासारखि हपसतच असते, चीडुन, वैतागुन, आयुश्याला हरुन .... तिचा तो एकंदरीतच अभीनय मला तरी पिच्कर वसुल वाट्ला.

@गणेशा : शेवटची कविता किशोर कदमांचीच असणार "रांड मुंड झाले रान .. सैरावैरा झाले बांध" खुपच जिव्हारी लागते...
ही कविता किशोर कदमांची नसुन "संजय पाटिल" ह्यांचि आहे, जे ह्या चित्रपटाचे "संवाद लेखक अणि स्क्रिप्ट रायटर आहेत.

काय बोलता ...
मला तर ती कविता म्हणताना सौमित्राचाच आवाज वाटला म्हणुन वाटले, त्यांचीच असेन..
पुर्ण कविता असेन तर देता का ? आणि ते गाणे आहे ना जीव उडला.. पाण्यासाठी.. ते पण देता का असेल तर्(टेक्स्ट).
---
तुम्ही जो विशेष सीन म्हणाला आहे तो खरेच खुप हेलावुन सोडतो, आत्ताच मावशीकडुन आलो ते पण असेच डोंगरातील हापश्यावरुन पाणी आणतात प्यायला.. आनि वापरायला..

मला सर्वात वाईट वाटले की जेंव्हा चिन्मय आपल्याच शेतात पाणी लागले नाही म्हणुन हंबरडा फोडतो तेंव्हा.
चित्रपट आवरता घेतला असे नाही वाटले .. उलट बरेच प्रश्न खुप सांतपणे मांडलेत असे वाटले.
फक्त भुजल पातळी ही बोअरींग अआणि विहरी जास्त पाडल्याने ही कमी होउ शकते अआणि इतर भुजल पातळीबद्दल थोडे कमी सांगितले आहे.

विनायक पाचलग's picture

23 May 2011 - 11:10 pm | विनायक पाचलग

पाहिलेला नाही ..पण , त्यामागची मेहनत आणि संजय पाटील यांनी घेतलेले कष्ट जाणुन आहे ...नक्की पाहा हा चित्रपट ..असे चित्रपट तिकिटबारी वर चालणे गरजेचे आहे ... तर त्यांना खरे प्रोत्साहन मिळेल ..
शेवटची कविता लय डेंजरस आहे ..वाचली आहे ..

उदय के'सागर's picture

24 May 2011 - 11:30 am | उदय के'सागर

कविता सौमित्रने म्हंटलि असेल कदाचीत, पण ति "संजय पाटील" ह्यांनीच लिहीली आहे १००%. मी ह्या सिनेमा च्या टिम चि मुलाखत ही पाहीलि होति "स्टार माझा" चैनल वर, त्यात स्वतः संजय पाटील ह्यांनि तसं स्पष्ट केलं होतं, त्यांनि काहि ओळि म्हंटल्याहि होत्या तेंव्हा.
तुम्हाला संपुर्ण कविता ह्या इथे मिळेल.
http://mukhyamantri.blogspot.com/2011/05/blog-post_1045.html

(माफ करा पण तुम्ही वीचारलेलं दुसरं गाणं ""जीव उडला"" नाहि मिळालं कुठेच)

आणि तुम्हि सांगितलेला सीन हि खरच खुपच हेलावुन सोडतो. खरंच आपण किती वेगळ्याच दुनियेत रहातो, पण त्याचिच चिड येते कि हि एवढी विषमता का?????? हे सगळं बघून आणि हे शहरी जीवन जगतांना खुपच अपराध्यासारखं वाटतं :( ....

@ उदय

ब्लॉगस्पॉट ब्लॉक आहेत येथे. त्यामुळे कविता बघता आली नाही. कविता संजय पाटलांची असेलच तुम्ही म्हणता तसे. ह्या चित्रपटाला जाण्याआधी यात कोण कोण आहे. काय आहे हे सुद्धा मला माहित नव्हते, फक्त विश्वास पाटलांच्या कादंबरीवर या एकाच विश्वासाने मी ठरवले होते चित्रपट पहायचा.. आणि कलाकारांनी ही सोने केले आहे चित्रपटाचे.

जीव उडला.. पाण्यासाठी ह्या गाण्याचे पहिले २ शब्द मला आठवत नाही.. मी खुप प्रयत्न केला होता हा थ्रेड लिहिताना आठवण्याचा पण नाही लक्षात आले कदाचीत त्यामुळे नसेल सापडले. गुगलवर पण नाहि मिळत..

तरी मला वाटते अश्या पद्धतीने आहे ते गाणे ..

घाव पडला .. पाण्यासाठी ( नक्की माहित नाही)
जीव उडला.. पाण्यासाठी.

(गायक आवाजावरुन तरी अजय गोगावले वाटत आहेत).

---
@ विनायक
धन्यवाद

उदय के'सागर's picture

25 May 2011 - 1:39 pm | उदय के'सागर

@गणेशा
ओह! माफ करा. मी विचार केला कि प्रतिक्रिया मधे एवढी मोठी कविता पाठवण्यापेक्षा ब्लॉग चि लिंकच द्यावि, पण असो-हरकत नाहि, हि बघा संपुर्ण कविता:

*ह्य़ा रांडमुंड वस्त्या*
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
शिवारामधल्या शिवीला आणि जात्यामधल्या ओवीला
गोठय़ामधल्या गाईला आणि थानं सुकलेल्या आईला
परकर पोलक्यामधल्या तायडीला नि पाळी चुकलेल्या बायडीला
खांदा नसलेल्या कावडीला नि गळा सुकलेल्या बावडीला
घे स्वप्नांचं पीक नि जागा मिळंल तिथं वीक
विकलं गेलं तरीबी ठीक, नाहीतर जा की मरणं शीक.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
उंबरा तुटलेली दारं, ही चौकटी फुटलेली घरं
वांझ झालाय पापणीचा पूर, विझून गेलाय चुलीमधला धूर
कोरडय़ाठाक आभाळाचं हे मातीमोल गाऱ्हाणं
कपाळपांढऱ्या गर्भामधलं हे हंबरणारं गाणं
जन्मनागव्या पाठीवरचा हा चरचरणारा वळ
दुखपांगळ्या पायांमधलं हे थरथरणारं बळ
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
सेनेगल, सोमालिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, हाइती
चंदीगड, सिमला, तिरुअनंतपुरम, नाशिक, नगरची भावकी
तांबवे खुर्द, म्हसवे बुद्रुक, मौजे कासारवाडा ठावकी
मका लांब पळत गेला, गायब झाली तूर
रान होतं उंबरवासाचं, त्याचा हरपून गेलाय सूर
कांदा-लिंबू, मिरची-कोथिम्बिर, खुडता येत नाही आलं,
मातीमधलं पिवळं सोनं, काळंठिक्कार झालं.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
- संजय कृष्णाजी पाटील

बाकि दुसर्या कवितेचा शोध मि चालु ठेवतोच आणी लवकरच पाठ्वतो. (सध्या घरी गेलं कि वेळ्च मिळत नाहि काहि अवांतर करण्यासाठी.)

-उदय

मोहन's picture

25 May 2011 - 6:56 pm | मोहन

जीव उडाला चे गायक अजय - अतुल फेम अजय गोगावलेच आहेत. संगीत - विजय नारायण , थीम साँग( गरज बरस प्यासी...) आणि बाकी चे पार्श्व् गायन आलाप - आदित्य खांडवे. सगळेच छान जमले आहे आणि अत्यंत परिणामकारक झाले आहे.

मोहन

तिमा's picture

23 May 2011 - 7:57 pm | तिमा

परीक्षणच एवढे अस्वस्थ करुन सोडणारे आहे तर चित्रपटाचा परिणाम किती होत असेल ?

पण धीर एकवटून पहावाच लागेल.