निमंत्रण - इंक्रेडीबल फोर्टस ऑफ इंडिया !

मालोजीराव's picture
मालोजीराव in कलादालन
19 Apr 2011 - 12:26 pm

दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी टिपलेल्या देशभरातील दुर्गांच्या छायाचित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरवात होत आहे. येत्या २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील दुर्गम किल्ल्यांच्या छायाचित्रांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यांतील किल्ल्यांची चारशेहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ज्या किल्ल्यांबाबत दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांना विशेष माहिती नाही, अशा किल्ल्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.
तसेच या काळात प्रफुल्ल केशव घाणेकर,आनंद पाळंदे,निनाद बेडेकर,भगवान चिले या इतिहासतज्ञ, दुर्गतज्ञांशी संवाद साधण्याची संधी दुर्गप्रेमींना मिळेल.
सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण !

" ट्रेकिंगच्या माध्यमातून, डोंगर-द-या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद
भटकंती केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा,
सामाजिक स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो "

कलासंस्कृतीप्रवासइतिहासभूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

19 Apr 2011 - 1:24 pm | यशोधरा

अरे वा! नक्कीच पाहणार हे प्रदर्शन! धन्यवाद.

नरेशकुमार's picture

19 Apr 2011 - 1:39 pm | नरेशकुमार

छान छान !

सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण !

जरुर जरुर !

गणेशा's picture

19 Apr 2011 - 3:49 pm | गणेशा

नक्कीच ...

धन्यवाद

ज्ञानेश...'s picture

19 Apr 2011 - 4:03 pm | ज्ञानेश...

माहितीबद्दल आभारी आहे.

वपाडाव's picture

19 Apr 2011 - 5:46 pm | वपाडाव

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
मी तर जाईनच अन सोबत ४ जणांना घेउन जाईन....

मालोजीराव's picture

20 Apr 2011 - 2:42 pm | मालोजीराव

हेला म्हनत्यात खरा मावळा.....नक्की या !

५० फक्त's picture

19 Apr 2011 - 7:52 pm | ५० फक्त

अरे वा, खुप छान माहिती,

मालोजीराव खुप खुप धन्यवाद.

शक्य असेल तर सगळे मिपाकर एकत्र जाउ यात. २३ किंवा २४ संध्याकाळी मला जमेल. अजुन कोण येतं आहे बोला.

मालोजीराव's picture

20 Apr 2011 - 2:47 pm | मालोजीराव

झक्कास सगळे मिपाकर आले तर आनंदच होईल, शनिवार रविवार मी आहे तिथेच, हिंजेवाडीला असून सुद्धा माझा सरुटॉबाने कट्टा चुकला...किमान इथे तरी मिपाकरांशी ओळख होईल !

विनायक बेलापुरे's picture

20 Apr 2011 - 10:31 am | विनायक बेलापुरे

धन्यवाद मालोजी राजे ,
नक्की पाहणार.

अमोल केळकर's picture

20 Apr 2011 - 11:51 am | अमोल केळकर

छान माहिती

अमोल केळकर