महाराजांना मुजरा

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
19 Feb 2011 - 3:16 pm

आजच्या दिवशी महाराजांच विस्मरण होऊ नये.

त्या जाणत्या राजास मानाचा मुजरा.

संस्कृतीधर्मइतिहाससमाजबातमीमाहिती

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

19 Feb 2011 - 3:19 pm | अमोल केळकर

महाराजांना मानाचा मुजरा !!!

अमोल केळकर

अवलिया's picture

19 Feb 2011 - 3:26 pm | अवलिया

मानाचा मुजरा !!

महाराजांचे स्मरण तारखेनुसारही होऊ नये आणि तिथीनुसारही होऊ नये.

स्मरण करण्याची गरज लागावी असे विस्मरणच होऊ नये.

छत्रपती शिवाजी महाराज की जय!

(माझ्याच घरी जन्मावा अशी इच्छा धरुन नव्या शिवाजीच्या प्रतिक्षेत) प्यारे

कच्ची कैरी's picture

19 Feb 2011 - 6:38 pm | कच्ची कैरी

प्यारेशी पूर्णपणे सहमत .
महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा !

अनामिका's picture

19 Feb 2011 - 7:00 pm | अनामिका

शब्दशः सहमत!

विकास's picture

19 Feb 2011 - 7:26 pm | विकास

महाराजांचे स्मरण तारखेनुसारही होऊ नये आणि तिथीनुसारही होऊ नये. स्मरण करण्याची गरज लागावी असे विस्मरणच होऊ नये.

१००००% सहमत!

जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी

ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे
ती बुद्धी भाबड्या जीवा लाभूदे
ती शक्ती शोणीता माजी वाहू दे
दे मंत्र पुन्हा जो दिले समर्थे तुज ज्या

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2011 - 3:34 pm | नगरीनिरंजन

जय भवानी! जय शिवाजी!

प्रचेतस's picture

19 Feb 2011 - 4:27 pm | प्रचेतस

महाराजांच्या चरणी नतमस्तक...!!!!

चावटमेला's picture

19 Feb 2011 - 6:03 pm | चावटमेला

युगपुरुषाच्या चरणी नतमस्तक..

मुलूखावेगळी's picture

19 Feb 2011 - 6:16 pm | मुलूखावेगळी

थोर पुरुष आणि कुशल प्रशासक अशा महाराजांना माझा पण मुजरा

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 6:24 pm | बिपिन कार्यकर्ते

मुजरा!

आशिष सुर्वे's picture

19 Feb 2011 - 6:25 pm | आशिष सुर्वे

महाराजांना मानाचा मुजरा..
असा जाणता राजा पुन्हा होणे नाही..

-
एक शिलेदार..

तिमा's picture

19 Feb 2011 - 8:56 pm | तिमा

असा जाणता राजा पुन्हा होणे नाही..

महाराजांना मुजरा. वरील वाक्याचा अर्थ हल्लीच्या सो कॉल्ड 'जाणत्या राजांना' कोणीतरी सांगायची जरुर आहे.
-

ramjya's picture

19 Feb 2011 - 6:40 pm | ramjya

मानाचा मुजरा

निवेदिता-ताई's picture

19 Feb 2011 - 6:44 pm | निवेदिता-ताई

.

अनामिका's picture

19 Feb 2011 - 6:57 pm | अनामिका

तव शौर्याचा एक अंश दे !
तव धैर्याचा जरा स्पर्श दे !
तव तेजांतिल एक किरण दे !
जीवनांतला एकच क्षण दे !
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू !
पुसू पानिपत !
पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !!"
राजवंदना"-बाबासाहेब पुरंदरे

महाराजांच्या चरणी सदैव नतमस्तक...!!!

आनंदयात्री's picture

19 Feb 2011 - 7:54 pm | आनंदयात्री

शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||

चिगो's picture

19 Feb 2011 - 7:22 pm | चिगो

महाराजांचे क्षात्रतेज, धर्मतेज आणि कर्मप्राधान्य आमच्या मनातही तेवत राहो, हीच त्यांच्याचरणी प्रार्थना...

शुचि's picture

19 Feb 2011 - 8:43 pm | शुचि

शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||१||
शिवरायांचे कैसे बोलणे |
शिवरायांचे कैसे चालाणे |
शिवरायांची सलगी देणे | कैसी असे ||२||

असे कर्तूत्व पून्हा घडने नाही. जय भवानी! जय शिवाजी!

त्रिवार अभिवादन महाराजांना आणि त्यांच्या पराक्रमाला.

शिवरायांना मानाचा मुजरा

धमाल मुलगा's picture

20 Feb 2011 - 1:44 pm | धमाल मुलगा

राजांच्या चरणी आमचाही त्रिवार मुजरा!

राजं...मुजरा कबुल करुन घ्येवा!

Shivaji Maharaj was never against the Muslims, but Politicians project him as enemy of Muslims and use his name as a symbol for opposing the Muslim identity .

Chhatrapati Shivaji Maharaj is the principle of effulgence or rather he is the divine inspiration. As a matter of fact, Shivaji is popular amongst people, not because he was anti Muslim or worshipper of Cows and Brahmins, but because he went on to reduce the taxation on the poor peasants. Shivaji Maharaj Was NEVER an ANTI MUSLIM.

Shivaji adopted humane policy in aspects of his administration, which did not base itself on the religion. In the recruitment of his soldiers and officers for his army and navy, religion was no criterion and more than one third of his army consisted of Muslims. The supreme command of his navy was with Siddi Sambal, and Muslim Siddis were in navy in large numbers. Interestingly his major battles were fought with the Rajput army lead by Mirza Raja Jaisingh on behalf of King Aurangzeb. When he was detained at Agra fort, one of the two men on whom he relied for his eventual escape was a Muslim called Madari Mehtar. His confidential secretary was Maulana Haider Ali and the chief of his cannon division was Ibrahim Gardi.

His respect for other religions was very clear and he respected the holy seers like ‘Hazarat Baba Yaqut bahut Thorwale’, whom he gave a life pension and also Father Ambrose, whose church was under attack in Gujarat. At his capital Raigad he erected a special mosque for Muslim devotees in front of his palace in the same way that he built the Jagadishwar temple for his own daily worship.

शहाजीराजेंचं नावही एका मुस्लिम सुफी संतांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. शिवाय शिवरायांना नक्की भेटलेले असे त्यांचे एक गुरू म्हणून कोकणातील केळशीचे बाबा याकूत हेही मुस्लिम सुफी संत होते. हे बर्‍याच जणांना माहीत ही नाही.

दुर्दैवाने या महान व्यक्तीच्या नावाची वाट्टेल तशी चिरफ़ाड स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही नेते मंडळी वर्षोनवर्षे करत आली आहेत अन अजूनही करत आहेत

असो, महाराजांना अदबीने सलाम !

हृदय भेदी's picture

20 Feb 2011 - 7:36 pm | हृदय भेदी

मी आजच मिसळ पावचा सभासद झालो. या पूर्वी मी बरेच वेळा या स्थळाला भेट दिलेली आहे. मला हा सगळा प्रकार अत्यंत रसपूर्ण वाटला. म्हणून मी सभासद झालो.

महाराजांना मुजरा म्हणुन बर्‍याच गोष्टी वाचल्या. शिवाजी महाराजांच्या थोरवीबद्दल कोणालाही शंका नाही. पण जेथे स्वराज्याची राजधानी होती त्या रायगडाची काय अवस्था आहे हे आपण जाऊन पहावे.

या बद्दल कोणालाच काहीच करता येणार नाही कां ? का आपल्याला सर्वस्वी सरकार वर अवलंबुन रहावे लागेल ? सरकार काही शे कोटी खर्चुन समुद्रात महाराजांचे स्मारक बांधणार आहे म्हणे. पण त्यातील काही लाख रायगडाच्या साफ सफाई साठी आणि डागडुजीसाठी खर्च करता येणार नाहीत का ?

सरकार काही करीत नसेल तर आपण सर्वांनी ज्यांना गड किल्ल्यांत रस आहे आणि महाराजांनद्दल आदर आहे , अश्या सर्वांनी एकत्र येऊन काही करता येणार नाही का ? यावर आपणा सर्वांनी काहीतरी करण्याची गरज आहे.

----------हृदयभेदी

मालोजीराव's picture

21 Feb 2011 - 4:12 pm | मालोजीराव


सक्र जिमि सैल पर ।अर्क तम-फैल पर ।बिघन की रैल पर ।लंबोदर देखीये ॥

राम दसकंध पर ।भीम जरासंध पर ।भूषण ज्यो सिंधु पर ।कुंभज विसेखिये ॥

हर ज्यो अनंग पर ।गरुड ज्यो भूज़ंग पर ।कौरवके अंग पर ।पारथ ज्यो पेखिये ॥

बाज ज्यो विहंग पर ।सिंह ज्यो मतंग पर ।म्लेंच्छ चतुरंग पर ।सिवराज देखीये ॥

सिवराज देखीये ॥ सिवराज देखीये ॥सिवराज देखीये ॥ सिवराज देखीये ॥

अर्थ :-

ज्या प्रमाणे ईंद्र पर्वताचा, सुर्य अंध:काराचा व विग्नहर्ता गणराज विघ्नसमुदायाचा नाश करतो, (१)किंवा ज्या प्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला, अगस्त्ति ऋषींनी समुद्राचा घोट घेतला, (२)महादेवाने मदनास जाळून भस्म केले, अर्जुनाने कौरवांचा नि:पात केला, (३)किंवा सर्प गरुडास, पक्षी बहिरी ससाण्यास व हत्ती सिंहास बघुन भयभीत होतात, तद्वत इस्लामी चतुरंग सैन्य शिवरायांच्या पराक्रमासमोर भयभीत होते. (४)