< मोर्स कोड >

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in जनातलं, मनातलं
17 Feb 2011 - 9:51 pm

.
.
.
प्रेरणा

एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे.

भारतातल्या सॉफ़्टवेअर क्षेत्राला आता फ़ार चांगला काल आला आहे. या पुढच्या काही महिन्यात अनेक कंपन्यांकडून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील.

त्यावेळी तुमची आणि तुमच्या कौशल्यांची माहिती सीव्ही मधून विचारली जाईल आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मुख्य प्रोग्रॅमिंगची भाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये मोर्स कोड न विसरता लिहा.

पूर्ण जरी नाही तरी आजही आपण तो कोड वापरतो. संगणकात वापरली जाणारी मशीन लॆंग्वेज ही १ व ० या दोन चिह्नांनी बनलेली असते तसेच मोर्स कोडही लाँग बीप (dah) आणि शॉर्ट बीप (dit) अशा दोनच चिह्नांनी बनलेली असते.

हा मोर्स कोड जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. एका संकेतस्थळावर “आज घडीला जुनी जाणकार मंडळी वगळता कोणीही मोर्स संकेत शिकण्याच्या मानसिकतेत नाही” असे म्हटले गेले आहे आणि त्यामुळे मोर्स कोड ला आउटडेटेड (कालबाह्य) समजले जावू शकते.
उलटपक्षी सी ++, जावा माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशन्स अगदी ठरवून ह्या भाषांवर बेतली गेली आहेत. मोर्स कोड आउटडेटेड घोषित झाले की त्यावर चालणार्‍या उपकरणांची निगा राखण्यासाठी कुठलाही निधी दिला जाणार नाही आणि मग आपले हे जुने आणि सर्वात पहिले मशीन कोड कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या कोडला जिवंत ठेवू शकतो.

आज मोर्स कोडवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही.

जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा

भाषाविनोदमुक्तकविडंबनतंत्रविरंगुळा

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

17 Feb 2011 - 10:17 pm | क्लिंटन

आवडले.

सुनील's picture

17 Feb 2011 - 10:27 pm | सुनील

--. --- --- -.. --- -. .

विकास's picture

17 Feb 2011 - 10:45 pm | विकास

मस्तच! :-)

मला माहीत नव्हते ज्यांना "मोर्स कोड" वापरायचे असते त्यांना विरोध होतो ते!

बाकी तुमच्या प्रेरणेसंदर्भात मला "हमारा बजाज" आठवले. ;)

पंगा's picture

18 Feb 2011 - 7:28 am | पंगा

विडियोतील सर्व मंडळी 'कडकट्ट कट्टकडकड'(किंवा 'डिडिडिट्डाडाडाडिडिडिट्' - आपल्या आवडीप्रमाणे)मध्ये संभाषण करीत आहेत, अशी कल्पना करून पहावी.

विकास's picture

18 Feb 2011 - 8:38 am | विकास

मला स्वतःला संस्कृत बोलता येत नाही. :( त्यामुळे तुम्ही म्हणता तशी कल्पना करता येऊ शकेल. मात्र असे गाव हे अस्तित्वात आहे. अनेक माणसे जी संस्कृत मध्ये बोलतात ती पाहीलेली आहेत. त्यामुळे त्याचे आश्चर्य वाटले नाही.

एक लहान असताना वर्तमानपत्रात वाचलेला किस्सा: एक जर्मनबाई भांडारकर इन्स्टीट्यूट मधे अभ्यास करायला म्हणून भारतात आली. पुणे तिथे काय उणे असे तीला पण वाटत होते. ;) नवर्‍याला, "सुखरूप पोचले" हे समजावे म्हणून पोस्टात तार करायला गेली आणि संस्कृतमधे तो मेसेज तारमास्तराच्या हातात दिला... :(

मूळ चर्चे संबधात अजून एकः मोर्स कोड शिकणे महत्वाचे नाहीतर परत शिकायला लागणे म्हणजे "रिमोर्स"च की! ;)

सेरेपी's picture

17 Feb 2011 - 10:57 pm | सेरेपी

-. .. -.-. . / - .... --- ..- --. .... - / .- -. -.. / - .... .- -. -.- / -.-- --- ..- / ..-. --- .-. / -- .- -.- .. -. --. / -- . / .-. . .- .-.. .. --.. . / - .... .- - --..-- / .. / .-- .. .-.. .-.. / -.. . ..-. .. -. .. - . .-.. -.-- / .-.. . - / .- .-.. .-.. / -- -.-- / .-. . .-.. .- - .. ...- . ... / .- -. -.. / ..-. .-. .. . -. -.. ... / -.- -. --- .--

गुंडोपंत's picture

18 Feb 2011 - 10:50 am | गुंडोपंत

-.. .-.. / -- -.-- / .-. . .-.. .- - .. ...- . ... / .- -. -.. / ..-. .-. .. . -. -.. ... / -.- -. --- .--

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Feb 2011 - 11:51 am | विश्वनाथ मेहेंदळे

-.-. .... .- -. --. .- .-.. .. / -.-- ..- -.- - .. / -.- .- -.. .... .- .-.. .. - / .- ... . / .-.. .. .... .. -. -.-- .- -.-. .... . . .-.-.- / .- - .- / -- --- -.. .. / ... .... .. -.- .- -.-- .- .-.. .- / -. .- -.- --- .-.-.- / .- ... . -.-. .... / --. .- .--. .--. .- / -- .- .-. ..- -.-- .- .-.-.-

बबलु's picture

18 Feb 2011 - 1:34 pm | बबलु

-.-. .... /..........--..-.--.-.-.-.-.-.-./...--.--.--. /.- -. --. .-
.-.. .. / -- .. / -.- .- -.. .... .- .-.. .. - / .- ... . / .-.. .. .... .. -. -.-- .- -.-.-.
- / .- - .- / -- --- -.. .. / ..
.-- .- .-.. .- / -
.- -.- --- .-.-.- / .- ... . -
.-. .... / --. .- .--. .--. .- / -- .- .-. .

--.-/-.-.---.. (बबलु)

सूर्यपुत्र's picture

18 Feb 2011 - 8:06 pm | सूर्यपुत्र

हे काय आहे? कुणी सांगू शकेल काय?

-सूर्यपुत्र.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Feb 2011 - 12:35 am | विश्वनाथ मेहेंदळे

तो जल्ला मोर्स कोड हाये. इतका शिम्पल तुमा जंटलमन लोकांना कलत नाय ??
(बबलू रावांनी काय लिहिले ते नीट वाचता नाही आले. त्यांनी कुठून तरी चोप्य पस्ते केले असावे आणि ते नीट झाले नसावे असा अंदाज आहे.)

विकास's picture

19 Feb 2011 - 12:57 am | विकास

-- .- .-.. .- -.- .- .-.. .- .-.. . .... --- - . -.- .. .... .- -- --- .-. ... . -.-. --- -.. . .- .- .... . - . .-.-.- .- - .- .- ... . -.-. .... .--. .-. .- - .. ... .- -.. -.. . - --- . -.- . -.- . -.- .- .-.. .- .-.-.-

गणपा's picture

19 Feb 2011 - 6:14 am | गणपा

MALA KALALE HOTE KI HA MORSE CODE AAHE TE. ATA ASECH PRATISAD DETO EK EKE KALA.

.- .- -- .... .- .- .-.. .- .- .... .. ...- .- .- -.-. .... .- - .- .- .- .- .-.. . .... ---
;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Feb 2011 - 12:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे

@विकास, गणपा :- स्पेसेस द्या हो. अख्या वाक्यात स्पेस (ASCII value :- 32) नाही. मोर्स कोड ते इंग्लिश लिपी करायला जमले. पुढचे वाचायला ५ मिनिटे लागली :-)

अवांतर :- मोर्स कोड मध्ये लिहू नये अशी तंबी मिळण्याआधी जितका जमतो तितका गोंधळ घालूया ;-)

नितिन थत्ते's picture

19 Feb 2011 - 1:57 pm | नितिन थत्ते

मोर्स कोडचे भवितव्य अंधःकारमय नसल्याची खात्री पटली.

:)

विकास's picture

19 Feb 2011 - 7:42 pm | विकास

अवांतर :- मोर्स कोड मध्ये लिहू नये अशी तंबी मिळण्याआधी जितका जमतो तितका गोंधळ घालूया

नाहीतर, "मिपाचे मोर्सीकरण होऊ लागले आहे का?" वगैरे चर्चा चालू होऊ शकते. ;) (वाचणार्‍यांनी ह.घ्या.!)

र्स कोड ते इंग्लिश लिपी करायला जमले. पुढचे वाचायला ५ मिनिटे लागली

हॅ हॅ हॅ! ते नुसते मोर्स कोड नाही तर मोर्सकोडचा "विकास" करून झालेले "गणपा कोड" आहे. :-)

>>> बबलू रावांनी काय लिहिले ते नीट वाचता नाही आले. त्यांनी कुठून तरी चोप्य पस्ते केले असावे आणि ते नीट झाले नसावे असा अंदाज आहे.

@मेहेंदळे, वाक्यं साधीसुधीच आहेत पण तुम्हाला बहुधा त्यातला गर्भित अर्थ (शुद्ध मराठीत sarcasm) कळला नसावा. ;)
आणि हो... आम्हास मोर्स कोड चोप्य पस्ते करायची गरज कधीच पडली नाही हे ही जाता जाता नमूद करू इच्छितो.

(आमचे येथे वाजवी दरात मोर्स कोड डिसायफर करून मिळेल) प्रो. प्रा. बबलु

नरेशकुमार's picture

20 Feb 2011 - 10:15 am | नरेशकुमार

गर्भित अर्थ असायला काय कविता वगेरे नाहियेना.

(आमचे येथे वाजवी दरात मोर्स कोड डिसायफर करून मिळेल) प्रो. प्रा. बबलु

याची पाटी कोनत्या चौकात टांगलेली आहे ?

बबलु's picture

20 Feb 2011 - 11:51 am | बबलु

-.-. .... .- -.-- .-.. .- / -- . .... . -. -.. .- .-.. . / - ..- -- .... .. / .--. .- -. / .-.. .- .. / -... .... .- .-. .. / .- .- .... .- - / -... .- .-. .- -.- .- .- .-.-.- / -- --- .-. ... . / -.-. --- -.. . / .--- .- .-. .. / ... - .- -. -.. .- .-. -.. / .- ... .-.. .- / - .- .-. .. / ... .... .- - .-. ..- / -.-. .... .. / -.. .. ... .... .- -... .... --- --- .-.. / -.- .- .-. .- -.-- .-.. .- / -- .. -..- -....- ..- .--. / -.-. --- -.. . / ...- .- .--. .- .-. - .- - / .... . / - ..- -- .... .- .-.. .- / -- .- .... .. - / .- ... . .-.. / .- ... . / ...- .- - .-.. . / .... --- - . .-.-.- / .- ... --- .-.-.-

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Feb 2011 - 11:52 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>.....मोर्स कोड जरी STANDARD असला तरी शत्रू ची दिशाभूल करायला MIX-UP कोड वापरतात....
माताय, जालावर वर मित्र मिळतात असे ऐकून होतो. इथे तुम्ही शत्रुत्त्वाच्या गोष्टी करायला लागलात?? हर हर.......

हँम रेडीओच्या लायसेन्स च्या साठी अजूनही मॉर्स कोड शिकणे कम्पल्सरी आहे.
मॉर्स कोड म्हणे बेसीक आणि सर्वसमावेशक भाषा आहे.

नरेशकुमार's picture

20 Feb 2011 - 10:19 am | नरेशकुमार

हँम रेडीओच्या लायसेन्स च्या साठी अजूनही मॉर्स कोड शिकणे कम्पल्सरी आहे.

नशीब, एफ एम रेडीयो ऐकण्यासाठी मॉर्स कोड शिकणे कम्पल्सरी नाय ते

भडकमकर मास्तर's picture

18 Feb 2011 - 2:01 am | भडकमकर मास्तर

हा धागा लै भारी झाला आहे

नरेशकुमार's picture

20 Feb 2011 - 10:20 am | नरेशकुमार

भारि मंजी जड म्हनायचय का ?

गुंडोपंत's picture

18 Feb 2011 - 4:27 am | गुंडोपंत

जबरी!

विजुभाऊ's picture

18 Feb 2011 - 2:28 pm | विजुभाऊ

जबरी!

गुंडोपंत हल्ली वर्तमानपत्रात जबरी! हा शब्द फक्त सं** यासाठीच वापरतात. नाहीतर बळजबरी असा वापरतात.

नरेशकुमार's picture

20 Feb 2011 - 10:22 am | नरेशकुमार

मग 'जब्रा' शब्द कशासाठी वापरतात ?

राजेश घासकडवी's picture

18 Feb 2011 - 5:23 am | राजेश घासकडवी

टोप्या बंद! (हॅट्स ऑफ!)

पंगा's picture

18 Feb 2011 - 9:13 am | पंगा

स्विचबिच* आहे की काय तुमच्या टोपीला?

(* या नावाच्या सुप्रसिद्ध कथासंग्रहाचा याच्याशी काहीही संबंध नाही.)

नरेशकुमार's picture

20 Feb 2011 - 10:25 am | नरेशकुमार

स्विचबिच* आहे की काय तुमच्या टोपीला ?

टोपीला स्विच काय कामाचे. 'ऐन वेळी'* डीसिजन घेन्यासाठि/बदलन्यासाठि का ?

'ऐन वेळी' -> पंगा सायेब, ही वेळ नक्कि कशी समजवुन सांगु राव,.... . समजुन घ्या राव.

अभिज्ञ's picture

18 Feb 2011 - 5:57 am | अभिज्ञ

लेख आवडला.

मी तर म्हणतो कि मोर्स कोड संस्कृत मधूनच लिहावा.

:)

अभिज्ञ.

अरुण मनोहर's picture

18 Feb 2011 - 6:08 am | अरुण मनोहर

अत्युच्य दर्जाचे विडंबन लिहीण्यासाठी नितिन थत्ते ह्यांचे अभिनंदन.

त्याच वेळेस, संस्कृत ह्या मूलभाषेला जिवंत ठेवण्यासाठी (मग कागदोपत्री का असेना!) कोणी प्रयत्न करीत आहेत त्यांची खिल्ली उडविल्यासाठी निषेध.

सहज's picture

18 Feb 2011 - 8:29 am | सहज

लेख टक टका टक

अवलिया's picture

18 Feb 2011 - 8:36 am | अवलिया

मस्त !

कधी येऊ तुमच्याकडे शिकायला? :)

पंगा's picture

18 Feb 2011 - 9:14 am | पंगा

भावना पोहोचल्या.

मोर्स कोड 'नावाचा काहीतरी प्रकार असतो', याची कल्पना आहे. कधीतरी E (.), I (..), S (...), H (....), T (-), M (--) आणि O (---) इथपर्यंत आद्य मुळाक्षरे शिकून पुढे तो नाद सोडूनही दिला होता. (तेवढी(च) मुळाक्षरे कोणी जर विचारली असती, तर पंक्तीला घडाघडा म्हणूनही दाखवली असती. कोणी विचारली नाही हा आमचा दोष नाही.) त्यामुळे मोर्स कोड 'येते' हा दावा करायला हरकत नसावी, नाही का?

पूर्ण जरी नाही तरी आजही आपण तो कोड वापरतो. संगणकात वापरली जाणारी मशीन लॆंग्वेज ही १ व ० या दोन चिह्नांनी बनलेली असते तसेच मोर्स कोडही लाँग बीप (dah) आणि शॉर्ट बीप (dit) अशा दोनच चिह्नांनी बनलेली असते.

अगदी अगदी! शिवाय मोर्स कोड ही संगणकाकरिता आदर्श भाषा आहे, असेही पाश्चात्यांचे संशोधन आहे.

हा मोर्स कोड जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. एका संकेतस्थळावर “आज घडीला जुनी जाणकार मंडळी वगळता कोणीही मोर्स संकेत शिकण्याच्या मानसिकतेत नाही” असे म्हटले गेले आहे आणि त्यामुळे मोर्स कोड ला आउटडेटेड (कालबाह्य) समजले जावू शकते.
उलटपक्षी सी ++, जावा माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशन्स अगदी ठरवून ह्या भाषांवर बेतली गेली आहेत. मोर्स कोड आउटडेटेड घोषित झाले की त्यावर चालणार्‍या उपकरणांची निगा राखण्यासाठी कुठलाही निधी दिला जाणार नाही आणि मग आपले हे जुने आणि सर्वात पहिले मशीन कोड कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या कोडला जिवंत ठेवू शकतो.

भावना स्तुत्य आहे, पण दुर्दैवाने सहकार्य करू इच्छीत नाही. या भाषेचे पुनरुज्जीवन हा आमचा अग्रक्रम नाही. त्याअगोदर फोर्ट्रान आणि आमची आवडती पास्कल यांचे पुनरुज्जीवन करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो. मोर्स कोड तुमच्यासारख्या अनेकांना निदान ऐकून माहिती तरी आहे. फोर्ट्रान आणि पास्कलचे नावतरी आजकाल कितीजणांना माहीत असते? काळाच्या उदरी गडप झालेल्या या भाषांना आज नामशेषसुद्धा म्हणता येत नाही (कारण त्यांचे आज नामसुद्धा शेष नाही), अशी दुर्दैवी अवस्था या भाषांवर आज ओढवलेली आहे. मोर्स कोडवर चालणार्‍या उपकरणांस निगेसाठी आज निधी तरी मिळत असेल; या भाषांना काय मिळते? var i : integer; i := 0;

तरी संगणककर्मींचा राष्ट्रीय सांस्कृतिक ठेवा असलेल्या या भाषांचे पुनरुज्जीवन करायचे सोडून, दोन चिहांच्या योगायोगाने केवळ बादरायणसंबंधाने संगणकक्षेत्राशी जोडल्या गेलेल्या या कोठल्यातरी भलत्याच उपर्‍या भाषेस हातभार लावण्याची निदान आमची तरी इच्छा नाही. धन्यवाद.

(जमले नाही तिच्यायला. विकेट कधीच उडालेली दिसते आमची.)

रमताराम's picture

18 Feb 2011 - 1:40 pm | रमताराम

त्याअगोदर फोर्ट्रान आणि आमची आवडती पास्कल यांचे पुनरुज्जीवन करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो.
द्या टाळी. जे numerical computation शी संबंधित कोडिंग करतात त्यांच्या दृष्टीने या दोन भाषा उच्च कोटीतील. अ‍ॅक्युरसी आणि प्रिसिजन याबाबत सी आणि तिची भावंडे गचाळ आहेत. सीची रचनाच बहुधा कम्युटेशनसाठीसुद्धा कोड लिहायचा असतो हे ठाऊक नसलेल्याने केली असावी अशी शंका घ्यायला जागा आहे. दुर्दैवाने आता तथाकथित ऑप्टिमायजरचा वापर करता यावा म्हणून फोर्ट्रानचे नवे कंपायलरच आधी तो कोड तात्पुरता सी मधे रुपांतरित करतात नि मग सी चा कंपायलर त्याचे काम करतो असे म्हणतात (आळशी कोडग्यांची आयडिया).

पण या मेल्या नाहीत बर्का. हाय एन्ड कम्पूटिंग मधे निदान युनिवर्सिटिज मधे तरी अल्गोरिदम्सचे कोडिंग या दोन पैकी एका भाषेत होते. अनेकदा रिसर्च पेपर्सचे अपेंडिक्स म्हणून फोर्ट्रान वा पास्कल कोड असतो. फोर्ट्रानसाठी अजूनही किमान पाच सहा डेवलपर किट्स (मायक्रोसॉफ्ट्च्या डेव्-स्टुडिओच्या धर्तीवर) उपलब्ध आहेत. आल इज नाट वेल बट इट इज नाट भेरी ब्याड इदर.

(फोर्ट्रानचा कट्टर समर्थक) रमताराम

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 1:42 pm | आजानुकर्ण

अभ्यासक्रमात देण्यात येणारे कोड हे पास्कलचेच असतात. फोरट्रानशी काय संबंध आला नाय बा.

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Feb 2011 - 9:20 am | ब्रिटिश टिंग्या

भारीच! :)

अन्या दातार's picture

18 Feb 2011 - 10:56 am | अन्या दातार

थत्तेसाहेब, शिकण्याची तयारी आहे, पण उपयोजिता सांगू शकाल का? उगीचच फॅशन म्हणून शिकण्यात काहीच अर्थ नाही.

गवि's picture

18 Feb 2011 - 12:33 pm | गवि

मोर्स कोड..हा वाटतो तसा ऑब्सोलीट नाहीये. तो जरी पूर्वी कळ दाबून लाँग आणि शॉर्ट टोन्समधे संदेश प्रसारित करायला वापरत असले तरी त्याचे अद्याप चालू असलेले अनेक उपयोग आहेत.

हा संदेश फक्त इलेक्ट्रिक वायरच्या थ्रूच जावा असं नाही. एकदा ट्रान्स्मिट करणं आणि रिसीव्ह करणं याची प्रॅक्टिस झाली की मग तो लाईटच्या स्वरुपात (टॉर्चने वगैरे) शिट्टी इ इ मार्गांनीही वापरता येतो.

सिएरा ऑस्कर सिएरा (sos) हे कॉम्बिनेशन लाईफसेव्हिंग मदत मागताना उपयोगी पडतं. थोडे लोक जे ट्रेकिंगला, समुद्रात किंवा तत्सम जागी जातात ते कधी चुकले, अडकले तर बाकीच्या मित्रांशी किंवा रेस्क्यू टीमशी दुतर्फी संवाद साधू शकतात.

काही प्रॅक्टिकल उपयोग.

जेव्हा आवाज पोहोचणे शक्य नसते किंवा आवाज करणे शक्य नसते. (नाईट ट्रेकमधे मी आधी वाट काढून वर पोचतो आणि इतरांना इशारा करतो.) अशा वेळी आपण पोचलो म्हणून नुसतीच हाळी देण्यापेक्षा खिशातून शिट्टी किंवा टॉर्च नेऊन वरून सिग्नल देता येतो आणि त्यात नुसते पोचलो याखेरीज वाक्येही पोहोचवता येतात.

अशी वेळ सामान्य नागरिकावर जास्त येत नसली तरी, सर्व सिस्टीम फेल झालेल्या बुडालेल्या जहाजावर किंवा लाईफबोटीत असलेले/एअरक्रॅशसाईटवर अडकलेले लोक/क्रू वाचवायला आलेल्या हेलिकॉप्टरला/ लाईफबोटीला अतिशय दुरूनही आपलं लाईटयुक्त मोर्स कोड सिग्नलच्या थ्रू म्हणणं स्पष्ट सांगू शकतात आणि उलटही.

प्रत्येक एअरपोर्टचं मोर्स कोडमधे नाव ठेवलेलं असतं आणि ते सतत चोवीस तास नॅव्हिगेशनल उपकरणांवर (व्ही एच एफ ओम्नी रेंज) ट्रान्स्मिट होत राहतं. म्हणजे मुंबईचा कोड BOM किंवा झुरिकचा ZRH (बॅगेज टॅगवर वगैरे बघितले असतीलच..) हेच नाव उदा बी ओ एम (ब्राव्हो _... ऑस्कर ___ माईक __) म्हणजेच

टां टूं टूं टूं
टां टां टां
टां टां

पॉज..

टां टूं टूं टूं
टां टां टां
टां टां

असं सतत त्या फ्रीक्वेन्सीवर ऐकू येतं. त्यावरुन पायलटला कळतं की हा जो ट्यून झालेला आहे तो मुंबई विमानतळाचा व्हीओआर आहे. मग त्याला वापरून तो आपली वाट काढतो.

सेम वे बीकन लाईटच्या चमकण्यातून कुठलं बंदर आहे ते समुद्रातल्या दूरच्या जहाजाला कळत राहतं.

इतरही अनेक उपयोग आहेत..

शिवाय झालस्तर मित्रांमधे गंमत म्हणून तोंडाने शिटी मारूनही मोर्स कोडमधे जे काही म्हणायचं ते म्हणता येतं. ;)

विडंबन मस्तच आहे हां पण..

विजुभाऊ's picture

18 Feb 2011 - 2:33 pm | विजुभाऊ

टां टूं टूं टूं
टां टां टां
टां टां

पॉज..

टां टूं टूं टूं
टां टां टां
टां टां

यावरून आठवले " बीडी जलाईले जिगर से पिया" चे ब्याकग्राउन्ड म्युझीक हे मॉर्स मधे केलेले आहे
डांग डुंग डुडुंग
डांग डुंग डुडुंग
डांग डुंग डुडुंग
डांग डुंग डुडुंग
डांग डुंग डुडुंग
डांग डुंग डुडुंग

वपाडाव's picture

18 Feb 2011 - 4:00 pm | वपाडाव

टां टूं टूं टूं
टां टां टां
टां टां

ह्या सबंध धाग्यात ही एकंच जागा मला लँड होण्याकरता सोयिस्कर वाटली.
यावरुन, मला "कोइ मिल गया" सिनेमाचं ते द्रुष्य आठवलं.

अन्या दातार's picture

18 Feb 2011 - 6:41 pm | अन्या दातार

धन्यवाद गवि.

चिरोटा's picture

18 Feb 2011 - 11:56 am | चिरोटा

सही विडंबन.
श्री.थत्ते यांचे या संदर्भातील विचार मननीय आहेत...व्यावहारिकदृष्ट्या तर जास्तच आहेत. मोर्स कोड शिकून केवळ जास्त पगार मिळेल असे मानणार्‍यांची मानसिकवृत्ती पाहिली तर निखळ दिसून येते की त्याना मोर्स कोड मरायला टेकले आहे की पुढील सप्तसहस्त्र वर्षे ती जिवंत राहून सॉफ्टवेयर परंपरेचा सार्थ साक्षीदार म्हणून काम करणार आहे, याच्याशी किंचितही सोयरसुतक नसते. तसे असते तर पुढे टेस्टिंग करणारे कितीजण मोर्स कोडचे टेस्टिंग करत असतील? इथे युक्तीवाद असा केला जातो की, 'आमचे क्लायेंट मोर्स कोड वापरत नाहीत. पण सॉफ्टवेयरची [इथे मोर्स कोडची....] ओढ, अभिमान, आवड असेल तर मोर्स कोड इंटरनेटवरही शिकता येतोच. इन्फी, विप्रो, टी.सी.एस. या तिन्ही कंपन्यांनी 'दुसरी भाषा जर त्या त्या महाविद्यालयात शिकविण्याची सोय नसेल, तर कर्मचार्‍याने स्वतःच्या जबाबदारीवर त्या भाषेचा विकल्प बायोडेटात भरावा'. बेंगळूरमध्ये कित्येक मुलेमुली माहीत आहेत की त्यानी 'स्वत:च्या' जबाबदारीवर सेकंड लॅन्ग्वेज म्हणून "लिस्प"..."पास्कल"..."स्कॅला" घेतली आहे.....'मोर्स कोडे' घेणारा एकही...अगदी एकही नाही. [हा विदा कंपन्यांमध्ये मिळू शकतो...किंवा कंपन्यांच्याच 'वार्षिक अहवालात' प्रसिद्ध होत असतो.]

हैद्राबादच्या काही कंपन्यांमध्ये (सत्यम्,आय्.टी.सॉफ्ट) 'हॅस्केल' या भाषेची सोय आहे, पण जिथे नसेल तिथले प्रोग्रॅमर्स या दोन कंपन्यांतील 'हॅस्केल' साठी संबंधित मॅनेजरचे मार्गदर्शन घेतात....आजही तिथे Optional Haskell घेणारे प्रोग्रॅमर्स आहेत. तिच गोष्ट 'VC++' ची. हा भाषा तर मेलेलीच आहे. पण एकेकाळी सॅन होजे मध्ये या भाषेलाही प्रोग्रॅमर्स होते. 'पर्ल' आणि 'फॉक्स प्रो' आता फक्त लिहिण्यापुरतेच उरले आहेत.

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 1:25 pm | आजानुकर्ण

'पर्ल' आणि 'फॉक्स प्रो' आता फक्त लिहिण्यापुरतेच उरले आहेत.

लिहिण्यापुरतेच उरणे याचा नेमका अर्थ उमगला नसला तरी पर्ल आणि फॉक्सप्रो हे फक्त लिहिले जातात आणि एक्झिक्युट केले जात नाहीत असा चावट अर्थ न घेता. 'तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता' सारखे पर्ल आणि फॉक्सप्रो हे फक्त उल्लेख करण्यापुरतेच मर्यादित आहेत असे जर चिरोटा यांना म्हणायचे असेल तर पर्लबाबतच्या त्यांच्या विधानावर असहमती दर्शवतो. फॉक्सप्रोबाबत पुरेशी कल्पना नाही. मात्र बहुतेक युनिक्स सिस्टम्सवर फाईल बेस्ड प्रोसेसिंग करण्यासाठी शेल स्क्रिप्टच्या जोडीने सर्वात सोयीस्कर असलेली भाषा ही पर्ल आहे. अनेक युनिक्स इंप्लिमेंटशनवर बॅच जॉब रन करताना पर्लचा अजूनही प्राधान्याने वापर केला जातो.

सातबारा's picture

18 Feb 2011 - 3:55 pm | सातबारा

फॉक्स प्रो आणि तिचा कंपायलर क्लीपर .. आता फक्त आठवणीच राहील्या ...

पंगा's picture

19 Feb 2011 - 5:11 am | पंगा

डीबेस ३ आणि तिचा कंपायलर क्लिपर.

फॉक्सप्रो हा (त्याच धर्तीवरचा, पण) किंचित वेगळा प्रकार होता.

अश्मकालीन युगाच्या सुरुवातिला या चिज वस्तु वापरात होत्या असे मागच्या शतकातील इतिहासाच्या पुस्तकात वाचुन आहे.

थत्ते चाचा जिंदाबाद !! अमर रहे मोर्स कोड !!

अवांतर : कोणाला "मार्स कोड" बद्दल माहित्ये का ? :)

जिंदाबाद आणि अमर रहे ची जागा चुकली का?

>>> जिंदाबाद आणि अमर रहे ची जागा चुकली का?

हा हा हा !!!! या धाग्यावरील सर्वोत्कृष्ट प्रतिसाद.

टारझन's picture

18 Feb 2011 - 1:38 pm | टारझन

बबलु चाचा अमर रहे !! मोर्स कोड झिंदाबाद !!!

- तबलु

वपाडाव's picture

18 Feb 2011 - 4:03 pm | वपाडाव

टारोबा, आपणही या ****कोड्बद्दल अनभिज्ञच ना?

नितिन थत्ते's picture

18 Feb 2011 - 12:32 pm | नितिन थत्ते

पकाकाका घाटपांडे यांना माहिती असेल असे भाकीत करतो.

http://en.wikipedia.org/wiki/Morse_code

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2011 - 11:16 am | प्रकाश घाटपांडे

एक काळ असा होता कि मोर्स कोड मुळे पोलिस बिनतारी विभागाचे महत्व अनन्य साधारण होते. आयटीआय मधुन वायरलेस ऑपरेटरचा कोर्स केला कि त्याची पोलिस बिनतारी विभागात नोकरी पक्की असायची.
बिनतारी त्याला कोण मारी या स्वेच्छानिवृत्तीतील संवादात आम्ही मोर्सकोडविषयी भाष्य केले आहे

बबलु's picture

18 Feb 2011 - 12:48 pm | बबलु

तद्दन फालतु विडंबन.

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 1:40 pm | आजानुकर्ण

णितिण याण्णी केलेले विडंबण आवडले

०११००१११००१०१११०००००१०११०००१००१०१०१०११११११०१०१०००१० ;)

नरेशकुमार's picture

18 Feb 2011 - 5:15 pm | नरेशकुमार

डोस्क फुटायची येळ आलिये..................

धनंजय's picture

20 Feb 2011 - 10:34 am | धनंजय

... --- ...
:-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2011 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थत्तेसेठ फूल फार्मात आहेत. :)

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

20 Feb 2011 - 4:43 pm | धमाल मुलगा

.- .- -.-- .- -.-. .... -.-- .- / --. .- .- ...- .- - .-.-.- .-.-.- .-.. .- .. / -... .... .- .- .-. . . / .... --- / - .... .- - - . / -.-. .... .- -.-. .... -.-. .... .- .-.-.- / -... .... .- .- .-. . . / -.-- ..- --. .- - / --. .... .- .- ...- .- .-.. . . / -.- . . / - ..- -- .... .- .- .-.. .- .- .-.-.- / -.. .... .- .- --. -.-- .- .- -. . / ... .- .- - .... . . / .--. .- .- .-. / -.- . .-.. . . / .... --- .-.-.-

-.. .... .- -- .- .- .-.. / -- ..- .-.. .- --. .- .-
(कॉपीपेष्ट पेशालिष्ट)

रमताराम's picture

22 Feb 2011 - 11:08 am | रमताराम

हल्ली बारकोड वापरतात तो वा त्याची मूळ संकल्पना मोर्स कोडशी संबंधित आहे का यावर जाणकारांनी उजेड पाडावा ही इनंती.