< मोर्स कोड >
.
.
.
प्रेरणा
एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे.
भारतातल्या सॉफ़्टवेअर क्षेत्राला आता फ़ार चांगला काल आला आहे. या पुढच्या काही महिन्यात अनेक कंपन्यांकडून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील.
त्यावेळी तुमची आणि तुमच्या कौशल्यांची माहिती सीव्ही मधून विचारली जाईल आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मुख्य प्रोग्रॅमिंगची भाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये मोर्स कोड न विसरता लिहा.
पूर्ण जरी नाही तरी आजही आपण तो कोड वापरतो. संगणकात वापरली जाणारी मशीन लॆंग्वेज ही १ व ० या दोन चिह्नांनी बनलेली असते तसेच मोर्स कोडही लाँग बीप (dah) आणि शॉर्ट बीप (dit) अशा दोनच चिह्नांनी बनलेली असते.
हा मोर्स कोड जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. एका संकेतस्थळावर “आज घडीला जुनी जाणकार मंडळी वगळता कोणीही मोर्स संकेत शिकण्याच्या मानसिकतेत नाही” असे म्हटले गेले आहे आणि त्यामुळे मोर्स कोड ला आउटडेटेड (कालबाह्य) समजले जावू शकते.
उलटपक्षी सी ++, जावा माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही कंप्यूटर अॅप्लिकेशन्स अगदी ठरवून ह्या भाषांवर बेतली गेली आहेत. मोर्स कोड आउटडेटेड घोषित झाले की त्यावर चालणार्या उपकरणांची निगा राखण्यासाठी कुठलाही निधी दिला जाणार नाही आणि मग आपले हे जुने आणि सर्वात पहिले मशीन कोड कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या कोडला जिवंत ठेवू शकतो.
आज मोर्स कोडवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही.
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा
प्रतिक्रिया
>>> जिंदाबाद आणि अमर रहे ची
चुक सुधारल्या आहे.
टारोबा, आपणही या
पकाकाका घाटपांडे यांना माहिती
हॅह्ळॅ
तद्दन फालतु विडंबन.
मस्त
०११००१११००१०१११०००००१०११०००१०
डोस्क फुटायची येळ
... --- ...
लै भारी.
वा वा वा!
एक तुच्छ प्रश्न
Pagination