Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 02/17/2011 - 21:51
. . . प्रेरणा एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारतातल्या सॉफ़्टवेअर क्षेत्राला आता फ़ार चांगला काल आला आहे. या पुढच्या काही महिन्यात अनेक कंपन्यांकडून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील. त्यावेळी तुमची आणि तुमच्या कौशल्यांची माहिती सीव्ही मधून विचारली जाईल आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मुख्य प्रोग्रॅमिंगची भाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये मोर्स कोड न विसरता लिहा. पूर्ण जरी नाही तरी आजही आपण तो कोड वापरतो. संगणकात वापरली जाणारी मशीन लॆंग्वेज ही १ व ० या दोन चिह्नांनी बनलेली असते तसेच मोर्स कोडही लाँग बीप (dah) आणि शॉर्ट बीप (dit) अशा दोनच चिह्नांनी बनलेली असते. हा मोर्स कोड जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. एका संकेतस्थळावर “आज घडीला जुनी जाणकार मंडळी वगळता कोणीही मोर्स संकेत शिकण्याच्या मानसिकतेत नाही” असे म्हटले गेले आहे आणि त्यामुळे मोर्स कोड ला आउटडेटेड (कालबाह्य) समजले जावू शकते. उलटपक्षी सी ++, जावा माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशन्स अगदी ठरवून ह्या भाषांवर बेतली गेली आहेत. मोर्स कोड आउटडेटेड घोषित झाले की त्यावर चालणार्‍या उपकरणांची निगा राखण्यासाठी कुठलाही निधी दिला जाणार नाही आणि मग आपले हे जुने आणि सर्वात पहिले मशीन कोड कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या कोडला जिवंत ठेवू शकतो. आज मोर्स कोडवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा
  • Log in or register to post comments
  • 12932 views

प्रतिक्रिया

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 02/17/2011 - 22:17

Permalink

हा हा हा

आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 02/17/2011 - 22:27

Permalink

.... .- .- .... .- .-

--. --- --- -.. --- -. .
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/17/2011 - 22:45

Permalink

............

मस्तच! :-) मला माहीत नव्हते ज्यांना "मोर्स कोड" वापरायचे असते त्यांना विरोध होतो ते! बाकी तुमच्या प्रेरणेसंदर्भात मला "हमारा बजाज" आठवले. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Fri, 02/18/2011 - 07:28

In reply to ............ by विकास

Permalink

हे सर्व लोक...

विडियोतील सर्व मंडळी 'कडकट्ट कट्टकडकड'(किंवा 'डिडिडिट्डाडाडाडिडिडिट्' - आपल्या आवडीप्रमाणे)मध्ये संभाषण करीत आहेत, अशी कल्पना करून पहावी.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 02/18/2011 - 08:38

In reply to हे सर्व लोक... by पंगा

Permalink

खरे आहे...

मला स्वतःला संस्कृत बोलता येत नाही. :( त्यामुळे तुम्ही म्हणता तशी कल्पना करता येऊ शकेल. मात्र असे गाव हे अस्तित्वात आहे. अनेक माणसे जी संस्कृत मध्ये बोलतात ती पाहीलेली आहेत. त्यामुळे त्याचे आश्चर्य वाटले नाही. एक लहान असताना वर्तमानपत्रात वाचलेला किस्सा: एक जर्मनबाई भांडारकर इन्स्टीट्यूट मधे अभ्यास करायला म्हणून भारतात आली. पुणे तिथे काय उणे असे तीला पण वाटत होते. ;) नवर्‍याला, "सुखरूप पोचले" हे समजावे म्हणून पोस्टात तार करायला गेली आणि संस्कृतमधे तो मेसेज तारमास्तराच्या हातात दिला... :( मूळ चर्चे संबधात अजून एकः मोर्स कोड शिकणे महत्वाचे नाहीतर परत शिकायला लागणे म्हणजे "रिमोर्स"च की! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सेरेपी on गुरुवार, 02/17/2011 - 22:57

Permalink

:-)

-. .. -.-. . / - .... --- ..- --. .... - / .- -. -.. / - .... .- -. -.- / -.-- --- ..- / ..-. --- .-. / -- .- -.- .. -. --. / -- . / .-. . .- .-.. .. --.. . / - .... .- - --..-- / .. / .-- .. .-.. .-.. / -.. . ..-. .. -. .. - . .-.. -.-- / .-.. . - / .- .-.. .-.. / -- -.-- / .-. . .-.. .- - .. ...- . ... / .- -. -.. / ..-. .-. .. . -. -.. ... / -.- -. --- .--
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 02/18/2011 - 10:50

In reply to :-) by सेरेपी

Permalink

-.. .-.. /

-.. .-.. / -- -.-- / .-. . .-.. .- - .. ...- . ... / .- -. -.. / ..-. .-. .. . -. -.. ... / -.- -. --- .--
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Fri, 02/18/2011 - 11:51

In reply to -.. .-.. / by गुंडोपंत

Permalink

-.-. .... .- -. --. .- .-..

-.-. .... .- -. --. .- .-.. .. / -.-- ..- -.- - .. / -.- .- -.. .... .- .-.. .. - / .- ... . / .-.. .. .... .. -. -.-- .- -.-. .... . . .-.-.- / .- - .- / -- --- -.. .. / ... .... .. -.- .- -.-- .- .-.. .- / -. .- -.- --- .-.-.- / .- ... . -.-. .... / --. .- .--. .--. .- / -- .- .-. ..- -.-- .- .-.-.-
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Fri, 02/18/2011 - 13:34

In reply to -.-. .... .- -. --. .- .-.. by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

-.-. ....

-.-. .... /..........--..-.--.-.-.-.-.-.-./...--.--.--. /.- -. --. .- .-.. .. / -- .. / -.- .- -.. .... .- .-.. .. - / .- ... . / .-.. .. .... .. -. -.-- .- -.-.-. - / .- - .- / -- --- -.. .. / .. .-- .- .-.. .- / - .- -.- --- .-.-.- / .- ... . - .-. .... / --. .- .--. .--. .- / -- .- .-. . --.-/-.-.---.. (बबलु)
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Fri, 02/18/2011 - 20:06

In reply to -.-. .... by बबलु

Permalink

हे काय आहे?

हे काय आहे? कुणी सांगू शकेल काय? -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 02/19/2011 - 00:35

In reply to हे काय आहे? by सूर्यपुत्र

Permalink

तो जल्ला मोर्स कोड हाये. इतका

तो जल्ला मोर्स कोड हाये. इतका शिम्पल तुमा जंटलमन लोकांना कलत नाय ?? (बबलू रावांनी काय लिहिले ते नीट वाचता नाही आले. त्यांनी कुठून तरी चोप्य पस्ते केले असावे आणि ते नीट झाले नसावे असा अंदाज आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 02/19/2011 - 00:57

In reply to तो जल्ला मोर्स कोड हाये. इतका by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

-- .- .-.. .- -.- .- .-..

-- .- .-.. .- -.- .- .-.. .- .-.. . .... --- - . -.- .. .... .- -- --- .-. ... . -.-. --- -.. . .- .- .... . - . .-.-.- .- - .- .- ... . -.-. .... .--. .-. .- - .. ... .- -.. -.. . - --- . -.- . -.- . -.- .- .-.. .- .-.-.-
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sat, 02/19/2011 - 06:14

In reply to -- .- .-.. .- -.- .- .-.. by विकास

Permalink

;)

MALA KALALE HOTE KI HA MORSE CODE AAHE TE. ATA ASECH PRATISAD DETO EK EKE KALA. .- .- -- .... .- .- .-.. .- .- .... .. ...- .- .- -.-. .... .- - .- .- .- .- .-.. . .... --- ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 02/19/2011 - 12:24

In reply to ;) by गणपा

Permalink

@विकास, गणपा :- स्पेसेस द्या

@विकास, गणपा :- स्पेसेस द्या हो. अख्या वाक्यात स्पेस (ASCII value :- 32) नाही. मोर्स कोड ते इंग्लिश लिपी करायला जमले. पुढचे वाचायला ५ मिनिटे लागली :-) अवांतर :- मोर्स कोड मध्ये लिहू नये अशी तंबी मिळण्याआधी जितका जमतो तितका गोंधळ घालूया ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 02/19/2011 - 13:57

In reply to @विकास, गणपा :- स्पेसेस द्या by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

+

मोर्स कोडचे भवितव्य अंधःकारमय नसल्याची खात्री पटली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 02/19/2011 - 19:42

In reply to @विकास, गणपा :- स्पेसेस द्या by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

सहमत

अवांतर :- मोर्स कोड मध्ये लिहू नये अशी तंबी मिळण्याआधी जितका जमतो तितका गोंधळ घालूया नाहीतर, "मिपाचे मोर्सीकरण होऊ लागले आहे का?" वगैरे चर्चा चालू होऊ शकते. ;) (वाचणार्‍यांनी ह.घ्या.!) र्स कोड ते इंग्लिश लिपी करायला जमले. पुढचे वाचायला ५ मिनिटे लागली हॅ हॅ हॅ! ते नुसते मोर्स कोड नाही तर मोर्सकोडचा "विकास" करून झालेले "गणपा कोड" आहे. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Sun, 02/20/2011 - 09:29

In reply to तो जल्ला मोर्स कोड हाये. इतका by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

>>> बबलू रावांनी काय लिहिले

>>> बबलू रावांनी काय लिहिले ते नीट वाचता नाही आले. त्यांनी कुठून तरी चोप्य पस्ते केले असावे आणि ते नीट झाले नसावे असा अंदाज आहे. @मेहेंदळे, वाक्यं साधीसुधीच आहेत पण तुम्हाला बहुधा त्यातला गर्भित अर्थ (शुद्ध मराठीत sarcasm) कळला नसावा. ;) आणि हो... आम्हास मोर्स कोड चोप्य पस्ते करायची गरज कधीच पडली नाही हे ही जाता जाता नमूद करू इच्छितो. (आमचे येथे वाजवी दरात मोर्स कोड डिसायफर करून मिळेल) प्रो. प्रा. बबलु
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sun, 02/20/2011 - 10:15

In reply to >>> बबलू रावांनी काय लिहिले by बबलु

Permalink

गर्भित अर्थ असायला काय कविता

गर्भित अर्थ असायला काय कविता वगेरे नाहियेना.
(आमचे येथे वाजवी दरात मोर्स कोड डिसायफर करून मिळेल) प्रो. प्रा. बबलु
याची पाटी कोनत्या चौकात टांगलेली आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Sun, 02/20/2011 - 11:51

In reply to तो जल्ला मोर्स कोड हाये. इतका by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

-.-. .... .- -.-- .-.. .- /

-.-. .... .- -.-- .-.. .- / -- . .... . -. -.. .- .-.. . / - ..- -- .... .. / .--. .- -. / .-.. .- .. / -... .... .- .-. .. / .- .- .... .- - / -... .- .-. .- -.- .- .- .-.-.- / -- --- .-. ... . / -.-. --- -.. . / .--- .- .-. .. / ... - .- -. -.. .- .-. -.. / .- ... .-.. .- / - .- .-. .. / ... .... .- - .-. ..- / -.-. .... .. / -.. .. ... .... .- -... .... --- --- .-.. / -.- .- .-. .- -.-- .-.. .- / -- .. -..- -....- ..- .--. / -.-. --- -.. . / ...- .- .--. .- .-. - .- - / .... . / - ..- -- .... .- .-.. .- / -- .- .... .. - / .- ... . .-.. / .- ... . / ...- .- - .-.. . / .... --- - . .-.-.- / .- ... --- .-.-.-
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 02/21/2011 - 11:52

In reply to -.-. .... .- -.-- .-.. .- / by बबलु

Permalink

>>.....मोर्स कोड जरी STANDARD

>>.....मोर्स कोड जरी STANDARD असला तरी शत्रू ची दिशाभूल करायला MIX-UP कोड वापरतात.... माताय, जालावर वर मित्र मिळतात असे ऐकून होतो. इथे तुम्ही शत्रुत्त्वाच्या गोष्टी करायला लागलात?? हर हर.......
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 02/18/2011 - 01:40

Permalink

हँम रेडीओच्या लायसेन्स च्या

हँम रेडीओच्या लायसेन्स च्या साठी अजूनही मॉर्स कोड शिकणे कम्पल्सरी आहे. मॉर्स कोड म्हणे बेसीक आणि सर्वसमावेशक भाषा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sun, 02/20/2011 - 10:19

In reply to हँम रेडीओच्या लायसेन्स च्या by विजुभाऊ

Permalink

हँम रेडीओच्या लायसेन्स च्या

हँम रेडीओच्या लायसेन्स च्या साठी अजूनही मॉर्स कोड शिकणे कम्पल्सरी आहे.
नशीब, एफ एम रेडीयो ऐकण्यासाठी मॉर्स कोड शिकणे कम्पल्सरी नाय ते
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 02/18/2011 - 02:01

Permalink

हा धागा लै भारी झाला आहे

हा धागा लै भारी झाला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sun, 02/20/2011 - 10:20

In reply to हा धागा लै भारी झाला आहे by भडकमकर मास्तर

Permalink

भारि मंजी जड म्हनायचय का ?

भारि मंजी जड म्हनायचय का ?
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 02/18/2011 - 04:27

Permalink

:)

जबरी!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 02/18/2011 - 14:28

In reply to :) by गुंडोपंत

Permalink

जबरी! गुंडोपंत हल्ली

जबरी! गुंडोपंत हल्ली वर्तमानपत्रात जबरी! हा शब्द फक्त सं** यासाठीच वापरतात. नाहीतर बळजबरी असा वापरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sun, 02/20/2011 - 10:22

In reply to जबरी! गुंडोपंत हल्ली by विजुभाऊ

Permalink

मग 'जब्रा' शब्द कशासाठी

मग 'जब्रा' शब्द कशासाठी वापरतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 02/18/2011 - 05:23

Permalink

लय भारी

टोप्या बंद! (हॅट्स ऑफ!)
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Fri, 02/18/2011 - 09:13

In reply to लय भारी by राजेश घासकडवी

Permalink

बंद?

स्विचबिच* आहे की काय तुमच्या टोपीला? (* या नावाच्या सुप्रसिद्ध कथासंग्रहाचा याच्याशी काहीही संबंध नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sun, 02/20/2011 - 10:25

In reply to बंद? by पंगा

Permalink

स्विचबिच* आहे की काय तुमच्या

स्विचबिच* आहे की काय तुमच्या टोपीला ?
टोपीला स्विच काय कामाचे. 'ऐन वेळी'* डीसिजन घेन्यासाठि/बदलन्यासाठि का ? 'ऐन वेळी' -> पंगा सायेब, ही वेळ नक्कि कशी समजवुन सांगु राव,.... . समजुन घ्या राव.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 02/18/2011 - 05:57

Permalink

लेख आवडला. मी तर म्हणतो कि

लेख आवडला. मी तर म्हणतो कि मोर्स कोड संस्कृत मधूनच लिहावा. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Fri, 02/18/2011 - 06:08

Permalink

अभिनंदन आणि निषेध

अत्युच्य दर्जाचे विडंबन लिहीण्यासाठी नितिन थत्ते ह्यांचे अभिनंदन. त्याच वेळेस, संस्कृत ह्या मूलभाषेला जिवंत ठेवण्यासाठी (मग कागदोपत्री का असेना!) कोणी प्रयत्न करीत आहेत त्यांची खिल्ली उडविल्यासाठी निषेध.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 02/18/2011 - 08:29

Permalink

हा हा हा

लेख टक टका टक
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/18/2011 - 08:36

Permalink

मस्त ! कधी येऊ तुमच्याकडे

मस्त ! कधी येऊ तुमच्याकडे शिकायला? :)
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Fri, 02/18/2011 - 09:14

Permalink

भापो, पण...

भावना पोहोचल्या. मोर्स कोड 'नावाचा काहीतरी प्रकार असतो', याची कल्पना आहे. कधीतरी E (.), I (..), S (...), H (....), T (-), M (--) आणि O (---) इथपर्यंत आद्य मुळाक्षरे शिकून पुढे तो नाद सोडूनही दिला होता. (तेवढी(च) मुळाक्षरे कोणी जर विचारली असती, तर पंक्तीला घडाघडा म्हणूनही दाखवली असती. कोणी विचारली नाही हा आमचा दोष नाही.) त्यामुळे मोर्स कोड 'येते' हा दावा करायला हरकत नसावी, नाही का?
पूर्ण जरी नाही तरी आजही आपण तो कोड वापरतो. संगणकात वापरली जाणारी मशीन लॆंग्वेज ही १ व ० या दोन चिह्नांनी बनलेली असते तसेच मोर्स कोडही लाँग बीप (dah) आणि शॉर्ट बीप (dit) अशा दोनच चिह्नांनी बनलेली असते.
अगदी अगदी! शिवाय मोर्स कोड ही संगणकाकरिता आदर्श भाषा आहे, असेही पाश्चात्यांचे संशोधन आहे.
हा मोर्स कोड जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. एका संकेतस्थळावर “आज घडीला जुनी जाणकार मंडळी वगळता कोणीही मोर्स संकेत शिकण्याच्या मानसिकतेत नाही” असे म्हटले गेले आहे आणि त्यामुळे मोर्स कोड ला आउटडेटेड (कालबाह्य) समजले जावू शकते. उलटपक्षी सी ++, जावा माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशन्स अगदी ठरवून ह्या भाषांवर बेतली गेली आहेत. मोर्स कोड आउटडेटेड घोषित झाले की त्यावर चालणार्‍या उपकरणांची निगा राखण्यासाठी कुठलाही निधी दिला जाणार नाही आणि मग आपले हे जुने आणि सर्वात पहिले मशीन कोड कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या कोडला जिवंत ठेवू शकतो.
भावना स्तुत्य आहे, पण दुर्दैवाने सहकार्य करू इच्छीत नाही. या भाषेचे पुनरुज्जीवन हा आमचा अग्रक्रम नाही. त्याअगोदर फोर्ट्रान आणि आमची आवडती पास्कल यांचे पुनरुज्जीवन करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो. मोर्स कोड तुमच्यासारख्या अनेकांना निदान ऐकून माहिती तरी आहे. फोर्ट्रान आणि पास्कलचे नावतरी आजकाल कितीजणांना माहीत असते? काळाच्या उदरी गडप झालेल्या या भाषांना आज नामशेषसुद्धा म्हणता येत नाही (कारण त्यांचे आज नामसुद्धा शेष नाही), अशी दुर्दैवी अवस्था या भाषांवर आज ओढवलेली आहे. मोर्स कोडवर चालणार्‍या उपकरणांस निगेसाठी आज निधी तरी मिळत असेल; या भाषांना काय मिळते? var i : integer; i := 0; तरी संगणककर्मींचा राष्ट्रीय सांस्कृतिक ठेवा असलेल्या या भाषांचे पुनरुज्जीवन करायचे सोडून, दोन चिहांच्या योगायोगाने केवळ बादरायणसंबंधाने संगणकक्षेत्राशी जोडल्या गेलेल्या या कोठल्यातरी भलत्याच उपर्‍या भाषेस हातभार लावण्याची निदान आमची तरी इच्छा नाही. धन्यवाद. (जमले नाही तिच्यायला. विकेट कधीच उडालेली दिसते आमची.)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 02/18/2011 - 13:40

In reply to भापो, पण... by पंगा

Permalink

फोर्ट्रान

त्याअगोदर फोर्ट्रान आणि आमची आवडती पास्कल यांचे पुनरुज्जीवन करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो. द्या टाळी. जे numerical computation शी संबंधित कोडिंग करतात त्यांच्या दृष्टीने या दोन भाषा उच्च कोटीतील. अ‍ॅक्युरसी आणि प्रिसिजन याबाबत सी आणि तिची भावंडे गचाळ आहेत. सीची रचनाच बहुधा कम्युटेशनसाठीसुद्धा कोड लिहायचा असतो हे ठाऊक नसलेल्याने केली असावी अशी शंका घ्यायला जागा आहे. दुर्दैवाने आता तथाकथित ऑप्टिमायजरचा वापर करता यावा म्हणून फोर्ट्रानचे नवे कंपायलरच आधी तो कोड तात्पुरता सी मधे रुपांतरित करतात नि मग सी चा कंपायलर त्याचे काम करतो असे म्हणतात (आळशी कोडग्यांची आयडिया). पण या मेल्या नाहीत बर्का. हाय एन्ड कम्पूटिंग मधे निदान युनिवर्सिटिज मधे तरी अल्गोरिदम्सचे कोडिंग या दोन पैकी एका भाषेत होते. अनेकदा रिसर्च पेपर्सचे अपेंडिक्स म्हणून फोर्ट्रान वा पास्कल कोड असतो. फोर्ट्रानसाठी अजूनही किमान पाच सहा डेवलपर किट्स (मायक्रोसॉफ्ट्च्या डेव्-स्टुडिओच्या धर्तीवर) उपलब्ध आहेत. आल इज नाट वेल बट इट इज नाट भेरी ब्याड इदर. (फोर्ट्रानचा कट्टर समर्थक) रमताराम
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/18/2011 - 13:42

In reply to फोर्ट्रान by रमताराम

Permalink

सहमत

अभ्यासक्रमात देण्यात येणारे कोड हे पास्कलचेच असतात. फोरट्रानशी काय संबंध आला नाय बा.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 02/18/2011 - 09:20

Permalink

हॅ हॅ हॅ

भारीच! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Fri, 02/18/2011 - 10:56

Permalink

तयारी

थत्तेसाहेब, शिकण्याची तयारी आहे, पण उपयोजिता सांगू शकाल का? उगीचच फॅशन म्हणून शिकण्यात काहीच अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 02/18/2011 - 12:33

In reply to तयारी by अन्या दातार

Permalink

मोर्स कोड..

मोर्स कोड..हा वाटतो तसा ऑब्सोलीट नाहीये. तो जरी पूर्वी कळ दाबून लाँग आणि शॉर्ट टोन्समधे संदेश प्रसारित करायला वापरत असले तरी त्याचे अद्याप चालू असलेले अनेक उपयोग आहेत. हा संदेश फक्त इलेक्ट्रिक वायरच्या थ्रूच जावा असं नाही. एकदा ट्रान्स्मिट करणं आणि रिसीव्ह करणं याची प्रॅक्टिस झाली की मग तो लाईटच्या स्वरुपात (टॉर्चने वगैरे) शिट्टी इ इ मार्गांनीही वापरता येतो. सिएरा ऑस्कर सिएरा (sos) हे कॉम्बिनेशन लाईफसेव्हिंग मदत मागताना उपयोगी पडतं. थोडे लोक जे ट्रेकिंगला, समुद्रात किंवा तत्सम जागी जातात ते कधी चुकले, अडकले तर बाकीच्या मित्रांशी किंवा रेस्क्यू टीमशी दुतर्फी संवाद साधू शकतात. काही प्रॅक्टिकल उपयोग. जेव्हा आवाज पोहोचणे शक्य नसते किंवा आवाज करणे शक्य नसते. (नाईट ट्रेकमधे मी आधी वाट काढून वर पोचतो आणि इतरांना इशारा करतो.) अशा वेळी आपण पोचलो म्हणून नुसतीच हाळी देण्यापेक्षा खिशातून शिट्टी किंवा टॉर्च नेऊन वरून सिग्नल देता येतो आणि त्यात नुसते पोचलो याखेरीज वाक्येही पोहोचवता येतात. अशी वेळ सामान्य नागरिकावर जास्त येत नसली तरी, सर्व सिस्टीम फेल झालेल्या बुडालेल्या जहाजावर किंवा लाईफबोटीत असलेले/एअरक्रॅशसाईटवर अडकलेले लोक/क्रू वाचवायला आलेल्या हेलिकॉप्टरला/ लाईफबोटीला अतिशय दुरूनही आपलं लाईटयुक्त मोर्स कोड सिग्नलच्या थ्रू म्हणणं स्पष्ट सांगू शकतात आणि उलटही. प्रत्येक एअरपोर्टचं मोर्स कोडमधे नाव ठेवलेलं असतं आणि ते सतत चोवीस तास नॅव्हिगेशनल उपकरणांवर (व्ही एच एफ ओम्नी रेंज) ट्रान्स्मिट होत राहतं. म्हणजे मुंबईचा कोड BOM किंवा झुरिकचा ZRH (बॅगेज टॅगवर वगैरे बघितले असतीलच..) हेच नाव उदा बी ओ एम (ब्राव्हो _... ऑस्कर ___ माईक __) म्हणजेच टां टूं टूं टूं टां टां टां टां टां पॉज.. टां टूं टूं टूं टां टां टां टां टां असं सतत त्या फ्रीक्वेन्सीवर ऐकू येतं. त्यावरुन पायलटला कळतं की हा जो ट्यून झालेला आहे तो मुंबई विमानतळाचा व्हीओआर आहे. मग त्याला वापरून तो आपली वाट काढतो. सेम वे बीकन लाईटच्या चमकण्यातून कुठलं बंदर आहे ते समुद्रातल्या दूरच्या जहाजाला कळत राहतं. इतरही अनेक उपयोग आहेत.. शिवाय झालस्तर मित्रांमधे गंमत म्हणून तोंडाने शिटी मारूनही मोर्स कोडमधे जे काही म्हणायचं ते म्हणता येतं. ;) विडंबन मस्तच आहे हां पण..
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 02/18/2011 - 14:33

In reply to मोर्स कोड.. by गवि

Permalink

टां टूं टूं टूं टां टां

टां टूं टूं टूं टां टां टां टां टां पॉज.. टां टूं टूं टूं टां टां टां टां टां यावरून आठवले " बीडी जलाईले जिगर से पिया" चे ब्याकग्राउन्ड म्युझीक हे मॉर्स मधे केलेले आहे डांग डुंग डुडुंग डांग डुंग डुडुंग डांग डुंग डुडुंग डांग डुंग डुडुंग डांग डुंग डुडुंग डांग डुंग डुडुंग
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 16:00

In reply to टां टूं टूं टूं टां टां by विजुभाऊ

Permalink

टां टूं टूं टूं टां टां

टां टूं टूं टूं टां टां टां टां टां ह्या सबंध धाग्यात ही एकंच जागा मला लँड होण्याकरता सोयिस्कर वाटली. यावरुन, मला "कोइ मिल गया" सिनेमाचं ते द्रुष्य आठवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Fri, 02/18/2011 - 18:41

In reply to मोर्स कोड.. by गवि

Permalink

धन्यवाद

धन्यवाद गवि.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 02/18/2011 - 11:56

Permalink

सही

सही विडंबन. श्री.थत्ते यांचे या संदर्भातील विचार मननीय आहेत...व्यावहारिकदृष्ट्या तर जास्तच आहेत. मोर्स कोड शिकून केवळ जास्त पगार मिळेल असे मानणार्‍यांची मानसिकवृत्ती पाहिली तर निखळ दिसून येते की त्याना मोर्स कोड मरायला टेकले आहे की पुढील सप्तसहस्त्र वर्षे ती जिवंत राहून सॉफ्टवेयर परंपरेचा सार्थ साक्षीदार म्हणून काम करणार आहे, याच्याशी किंचितही सोयरसुतक नसते. तसे असते तर पुढे टेस्टिंग करणारे कितीजण मोर्स कोडचे टेस्टिंग करत असतील? इथे युक्तीवाद असा केला जातो की, 'आमचे क्लायेंट मोर्स कोड वापरत नाहीत. पण सॉफ्टवेयरची [इथे मोर्स कोडची....] ओढ, अभिमान, आवड असेल तर मोर्स कोड इंटरनेटवरही शिकता येतोच. इन्फी, विप्रो, टी.सी.एस. या तिन्ही कंपन्यांनी 'दुसरी भाषा जर त्या त्या महाविद्यालयात शिकविण्याची सोय नसेल, तर कर्मचार्‍याने स्वतःच्या जबाबदारीवर त्या भाषेचा विकल्प बायोडेटात भरावा'. बेंगळूरमध्ये कित्येक मुलेमुली माहीत आहेत की त्यानी 'स्वत:च्या' जबाबदारीवर सेकंड लॅन्ग्वेज म्हणून "लिस्प"..."पास्कल"..."स्कॅला" घेतली आहे.....'मोर्स कोडे' घेणारा एकही...अगदी एकही नाही. [हा विदा कंपन्यांमध्ये मिळू शकतो...किंवा कंपन्यांच्याच 'वार्षिक अहवालात' प्रसिद्ध होत असतो.] हैद्राबादच्या काही कंपन्यांमध्ये (सत्यम्,आय्.टी.सॉफ्ट) 'हॅस्केल' या भाषेची सोय आहे, पण जिथे नसेल तिथले प्रोग्रॅमर्स या दोन कंपन्यांतील 'हॅस्केल' साठी संबंधित मॅनेजरचे मार्गदर्शन घेतात....आजही तिथे Optional Haskell घेणारे प्रोग्रॅमर्स आहेत. तिच गोष्ट 'VC++' ची. हा भाषा तर मेलेलीच आहे. पण एकेकाळी सॅन होजे मध्ये या भाषेलाही प्रोग्रॅमर्स होते. 'पर्ल' आणि 'फॉक्स प्रो' आता फक्त लिहिण्यापुरतेच उरले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/18/2011 - 13:25

In reply to सही by चिरोटा

Permalink

पर्ल

'पर्ल' आणि 'फॉक्स प्रो' आता फक्त लिहिण्यापुरतेच उरले आहेत.
लिहिण्यापुरतेच उरणे याचा नेमका अर्थ उमगला नसला तरी पर्ल आणि फॉक्सप्रो हे फक्त लिहिले जातात आणि एक्झिक्युट केले जात नाहीत असा चावट अर्थ न घेता. 'तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता' सारखे पर्ल आणि फॉक्सप्रो हे फक्त उल्लेख करण्यापुरतेच मर्यादित आहेत असे जर चिरोटा यांना म्हणायचे असेल तर पर्लबाबतच्या त्यांच्या विधानावर असहमती दर्शवतो. फॉक्सप्रोबाबत पुरेशी कल्पना नाही. मात्र बहुतेक युनिक्स सिस्टम्सवर फाईल बेस्ड प्रोसेसिंग करण्यासाठी शेल स्क्रिप्टच्या जोडीने सर्वात सोयीस्कर असलेली भाषा ही पर्ल आहे. अनेक युनिक्स इंप्लिमेंटशनवर बॅच जॉब रन करताना पर्लचा अजूनही प्राधान्याने वापर केला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by सातबारा on Fri, 02/18/2011 - 15:55

In reply to पर्ल by आजानुकर्ण

Permalink

हाय रे फॉक्स प्रो

फॉक्स प्रो आणि तिचा कंपायलर क्लीपर .. आता फक्त आठवणीच राहील्या ...
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 02/19/2011 - 05:11

In reply to हाय रे फॉक्स प्रो by सातबारा

Permalink

किंचित सुधारणा

डीबेस ३ आणि तिचा कंपायलर क्लिपर. फॉक्सप्रो हा (त्याच धर्तीवरचा, पण) किंचित वेगळा प्रकार होता.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sun, 02/20/2011 - 10:30

In reply to किंचित सुधारणा by पंगा

Permalink

अश्मकालीन युगाच्या सुरुवातिला

अश्मकालीन युगाच्या सुरुवातिला या चिज वस्तु वापरात होत्या असे मागच्या शतकातील इतिहासाच्या पुस्तकात वाचुन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 11:58

Permalink

थत्ते चाचा जिंदाबाद !! अमर

थत्ते चाचा जिंदाबाद !! अमर रहे मोर्स कोड !! अवांतर : कोणाला "मार्स कोड" बद्दल माहित्ये का ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/18/2011 - 12:25

In reply to थत्ते चाचा जिंदाबाद !! अमर by टारझन

Permalink

जिंदाबाद आणि अमर रहे ची जागा

जिंदाबाद आणि अमर रहे ची जागा चुकली का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com