लै समस्या

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
14 Feb 2011 - 3:47 pm

शेतीची मशागत करतांना, ती फुलवताना फळवतांना अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की वाफ्याचा बांध फुटणे. ही एक नेहमी आढळणारी कॉमन समस्या आहे. जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असलं तरी योग्य प्रयत्नांनी आपल्याला आपले अवखळ पाणी थोपवून ठेवणे जमू शकते.
बांध फुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच. पाण्याचा लोड वाढला, पाटातून पाणी बेफाम वाहू लागले किंवा वाफाच जर कमी उंचीचा असेल तर बांध हा फुटणारच. कमालीचा उमाळा येऊन किंवा भुसभुशीत मातीचा संग लाभल्यामुळे पाणी थोपवून धरणे जिकीरीचे बनते. अशा उस्फुर्त प्रसंगी बांध फटाफट फुटणे अपरिहार्य ठरते. तो का फुटला याची चिंता करीत बसण्यापेक्षा तो फुटतो कसा हे लक्षात घेणे आवश्यक ठरेल.
मुळात वाफा व्यवस्थित तयार न झाल्याचा हा परिणाम असतो. वाफ्याची तयारी झाल्याशिवाय पाट सोडू नये, हा साधा नियम. वाफा तयार करण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेतच. त्यांचा अंगीकार केल्यास फायदा संभवतो. वाफा आखीव रेखीव कसा तयार करता येईल याचा प्रथम विचार व्हावा. फावड्याने माती योग्य आकारात चिणून घ्यावी. तिला योग्य आकारात चौपदरी करावी. खोलगट भागाची साफ सफाई करून तिथे पाणी साठू शकेल, थोपू शकेल अशी भुई निर्माण करावी. पाटात पाणी खेळवण्याअगोदर वाफ्याची तयारी असल्याची खात्री करून घ्यावी नंतरच मग पुढील पाऊल उचलावे. बांध फुटू द्यायचा नसेल तर वाफा चहुबाजूंनी योग्य रितीने तयार केला जावा. उगाचच अपुऱ्या, अधुऱ्या, अर्ध्यावर असलेल्या वाफ्यात पाणी घुसडण्याची घाई गडबड करू नये. तसे केल्यास वाफा पुरेपूर न भरताच फुटू लागतो. आणखी एक पाळण्याचे पथ्य म्हणजे वाफा इतक्या उंचीपर्यंत न्यावा की तो पुरेशा पाण्याचे सहजतेने धारण करू शकेल. एकदा का मनाजोगता वाफा तयार झाला की पुढील काम एकदम सोपे होऊन जाते.
आपल्या पाटातून पाणी बेता-बेतानेच वाफ्यात सोडावे लागते. एकदम घिसडघाई केली की पाणी ओव्हरफ्लो झालेच म्हणून समजा. कुठलाही धसमुसळेपणा अशा जितक्या नाजूक तितक्याच कठीण प्रसंगी टाळावाच लागतो. सबुरीनं घेणं महत्वाचं. हळू हळू पाण्याचा जोर वाढविल्यास बांध फुटण्याची शक्यता मावळते. वाफा तुडुंब भरतो, तृप्त तृप्त राहतो. ती ओल, ते खोलवर भिजणं आजमावित वाफा निश्चिंत पहुडलेला दिसू लागतो. आणि हीच तर खरी मशागतीची अंतिम पायरी असते. त्यानंतर कोणतंही बेणं पेरलं तरी उगवणारच याची खात्री बाळगावी.
ही झाली वाफा ओतप्रोत भिजवण्याची क्रिया. पाण्याचा अवखळपणा किंवा खळखळाट काबूत ठेवायचा कसा? तर त्यासाठी पाटाची देखभाल दुरुस्ती महत्वाची ठरते. पाणी पाटानेच कसे जाईल याकडे लक्ष असू द्यावे. पाटही नेहमी उताराचा असावा, म्हणजे वरून खाली असा. वाफा चढावर घेतल्यास पाण्याने भिजणार नाही हे उघडच आहे. पाटाची साईज गरजेप्रमाणे बदलून घ्यावी लागतेच. पुढे मुलायमपणा असेल तर खरबूड पाट बिनदिक्कतपणे चालू शकतो, परंतु पुढे खरखरीत बाजू दिसल्यास स्निग्धतेचे वस्त्र पाटावर चढवावेच लागते...
एकंदर काय तर याही गोष्टीचा जाणूनबुजून विचार केला जावा.
("भिन्नावतरण" मधून...)

जीवनमानतंत्रक्रीडामतसल्लामदतमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

14 Feb 2011 - 3:51 pm | प्रकाश घाटपांडे

वा! दाक्तरांना फारम्युला सापाल्डेला दिस्तोय

अवलिया's picture

14 Feb 2011 - 3:52 pm | अवलिया

हांग आशी !!

आता जरा वाफे तयार करतांनाची अंगुलीमर्दन प्रक्रिया डीट्टेलवार येउ द्या !!

मितभाषी's picture

14 Feb 2011 - 4:03 pm | मितभाषी

अवांतरः आमच्याकडे म्हैस वाफेवर आली असा शब्दप्रयोग आहे. तो ह्या वाफ्यावरुन तर नाही ना आला? ;)

इंटरनेटस्नेही's picture

14 Feb 2011 - 5:15 pm | इंटरनेटस्नेही

जबरदस्त! ह्याला म्हणतात 'क्रिएटीव्हीटी'.. डबल मिनिंग पण साळसुद!

-
शेतकरी, इंट्या मशागतकर.

इंटरनेटस्नेही's picture

14 Feb 2011 - 5:16 pm | इंटरनेटस्नेही

जबरदस्त! ह्याला म्हणतात 'क्रिएटीव्हीटी'.. डबल मिनिंग पण साळसुद!

-
शेतकरी, इंट्या मशागतकर.

नरेशकुमार's picture

14 Feb 2011 - 5:24 pm | नरेशकुमार

परंतु पुढे खरखरीत बाजू दिसल्यास स्निग्धतेचे वस्त्र पाटावर चढवावेच लागते...

या वस्त्रांबद्दल काही डीटेल माहीती द्यावी.
स्निग्धता कीती असायला हवी, जास्त स्निग्ध असुन सुद्धा चालनार नसेल कदाचीत.

अवांतर : काही जण का उगा डबल मीनिंग म्हनु र्‍हायले ते समजत नाही बुवा, मला तर एक आनं एकंच मीनिंग दिसत आहे.

विजुभाऊ's picture

14 Feb 2011 - 5:26 pm | विजुभाऊ

वा वा शेती बद्दल सुरेख लेख.
आता कुळपणी नांगरणी लावणी पेरणे काढणी मशागत खते / कीटकनाशके कशी द्यायची पहिली तोड कधी करायची याबद्दल डीट्टेल म्हैती द्या.
उत्तम शेती : डाक्टरांची शेती

कुंदन's picture

14 Feb 2011 - 5:38 pm | कुंदन

मागे रामदास काका ह्याच सिक्रेट फॉर्मुल्याबद्दल बोलत होते बहुधा. ;-)

राजा's picture

14 Feb 2011 - 5:44 pm | राजा

दाक्तरसाहेब पुढिल येळला जरा बांधावरच गवत कस काढाव त्ये बी जरा सागा म्हणतो म्हणजेच तणनाशकाची पण माहिती द्या

वपाडाव's picture

15 Feb 2011 - 10:42 am | वपाडाव

पुढे मुलायमपणा असेल तर खरबूड पाट बिनदिक्कतपणे चालू शकतो, परंतु पुढे खरखरीत बाजू दिसल्यास स्निग्धतेचे वस्त्र पाटावर चढवावेच लागते...

यासाठी मनुष्यबळ(______) किन्वा ईच्छा'स(_____) यान्चा वापर करावा का?

-मळ्याच्या मळ्यामन्दी पाटाच पाणी जात, गुलाब, जाइ-जुइ, मोगरा (वाफ्यात बहरलेल्या फळान्ची नावे) फुलवित......

टारझन's picture

15 Feb 2011 - 12:09 pm | टारझन

हा ह हा .. उत्तम माहिती .. नवी नसली तरी :)

अलिकडे अधुनिक शेती करण्याचे फॅड आलेले आहे .. मग त्यात नुसत्या मशिनी वापरल्या जातात आणि त्या मातीशी आपलेपणा राहिलेला नाही.. शेवटी आपल्या बैलाने केलेली शेती ह्यात जी मजा आहे ती मशिनरुपी ट्रॅक्टर मधे नाही :)

-(डबल हाडाचा कसलेला शेतकरी) पाट पाडा
"आमची माती आमची माणसं " मधुन साभार