२००६ च्या दिवळीला पहिल्याच पहाटे ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये पंतांचा खास असा 'मी पणशीकर बोलतोय' हा अभिनव कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पंतांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधुन त्यांचा सत्कारही आयोजित केला होता. त्या प्रसंगी मी टिपलेली ही काही क्षणचित्रे
पंतांचा सत्कार
पंत आभारप्रदर्शनाचे भाषण करताना
रसिकांशी मनमोकळ्या गप्पा
'खर काय नी खोटं काय? - प्राचार्य विद्यानंद
अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री राधेश्याम महाराज
आणि बघता बघता पंतांचा औरंगजेब झाला.....
कट्टर संगीतद्वेष्टा औरंगजेब प्रत्यक्ष मैफिलीत!
प्रतिक्रिया
15 Jan 2011 - 2:15 am | वाटाड्या...
साक्षीशेठ..
इतक्या जवळुन पंताना बघायला मिळावं हे नशिबच. शेवटच्या चित्रात मधे रघुनंदन बुवा आहेत काय?
धन्यवाद...
- वाट्या
15 Jan 2011 - 6:20 pm | सर्वसाक्षी
ते गायक रघुनंदन पणशीकरच आहेत.
15 Jan 2011 - 2:51 am | योगी९००
वाटाड्या यांच्याशी सहमत..
पंतांसारख्या नटश्रेष्ठाला इतक्या जवळून पहायला मिळाले ..खुपच नशिबवान आहात..!!!
हे फोटो पण छान आलेत..औरंगजेबाचा फोटोतर खासच..
पंताना श्रद्धांजली...!!!
15 Jan 2011 - 6:43 am | मदनबाण
वा... अनमोल क्षण, अनमोल ठेवा.
15 Jan 2011 - 10:39 am | ५० फक्त
सर्वसाक्षी, आपण खरंच खुप खुप नशीबवान आहात, मला हेवा वाटतो आहे तुमचा.
या फोटोबद्दल अतिशय धन्यवाद. आपली परवानगी असेल तर फोटो डाउनलोड करु शकतो काय ?
हर्षद.
15 Jan 2011 - 11:25 am | गणपा
सर्वसाक्षी नशिबवान आहात. हा खजिना आम्हा सोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
15 Jan 2011 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी हेच म्हणतो :)
धन्यवाद.
15 Jan 2011 - 12:28 pm | स्पा
मि सुद्धा
15 Jan 2011 - 1:03 pm | विसोबा खेचर
मस्त..!
पंतांना दंडवत..!
तात्या.
15 Jan 2011 - 8:02 pm | रामदास
आभारी आहे.
15 Jan 2011 - 10:17 pm | विसोबा खेचर
पंतांचे चिरंजिव, किशोरीताईंची तालीम घेतलेले रघुनंदन पणशीकर हे माझे दोस्त. त्यामुळे पंतही माझ्याशी दोस्तीने वागत. अर्थात, हा पंतांचा मोठेपणा..
" अरे तात्या, मळ रे जरा फक्कडशी तंबाखू...! "
असा हुकूम पंतांकडून अगदी सहज निघायचा अन् मी त्यांची तंबाखू मळायचा..! :)
अगदी ६-८ महिन्यांपूर्वीच पंत पुणे-मुंबई हायवेवरील दत्तस्नॅक्स मध्ये भेटले होते. आम्ही दोघांनी मिसळ आणि साबुदाणा खिचडी खाल्ली होती. तीच त्यांची शेवटची भेट..!
तात्या.
16 Jan 2011 - 3:47 pm | स्वानन्द
धन्यवाद सर्वसाक्षी!
16 Jan 2011 - 6:43 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त क्षणचित्रं...
शेवटच्या चित्रात औरंगजेब अगदी तात्यारावांच्या पायापाशी दिसतो आहे. :)
17 Jan 2011 - 2:36 pm | महेश काळे
धन्यवाद