शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
27 Apr 2008 - 12:43 pm

परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा ....

पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून. तिथे अचानक गोळीबार होऊन आर्मीतल्या एका "मेजराचा म्हणजे मेजर राठोड यांचा मॄत्यु" होतो व त्याला मारण्याचा आरोप असतो त्याच्या हाताखालच्या एका अधिकार्‍यावर म्हणजे "कॅप्टन जावेद खान" वर. मग त्याचे कोर्टमार्शल सुरू होते. हा मुस्लीम असल्याने सर्व जण त्याला दहशतवादी ठरवून मोकळे होतात व त्याची शिक्षा सुनावण्यासाठी एका औपचारीक कोर्टमार्शल मिटिंगची वाट पाहतात ...

मग एंट्री होते एका आर्मीत पेशाने वकील असणार्‍या परंतु वॄत्तीने एकंदरीत गूलछबू व ऐशाआरामी तरूणाचा म्हणजे "मेजर सिद्धांत" ची, त्याला हे सर्व म्हणजे एक नसती कटकट वाटत असते. बळजबरीने ही केस त्याच्या गळ्यात मारली जाते व त्याला "कॅप्टन जावेद खान" चा डिफेन्स करण्यासाठी नेमन्यात येते. त्याला स्पष्ट सूचना असते की कही नाही ही केस आधीच सॉल्व झालेली आहे, शिक्षा ठरलेली आहे, तुझी वकीली म्हणजे फक्त एक फॉर्मालिटी आहे आणि त्याने पण ही परिस्थीती कबूल केली असते. आता ही केस मुळात मुस्लीम दहशतवादाशी निगडीत असल्याने सर्वजण त्याला त्याच्या जास्त खोलात न शिरण्याचा सल्ला देतात. पण जेव्हा हा त्याचा अशिलाला भेटतो तेव्हा त्याची मनाला सलणारी शांतता व त्याला दॄढनिश्चयी चेहरा त्याला एका विचारात पाडतो व तो ह्या केसचा मुळापासून तपास करण्याचा निर्णय घेतो. त्यादरम्यान त्याच्याकडून निष्काळजीपणाने एका रिपोर्टरला दिलेल्या एका मुलाखतीचा परिणाम त्याला त्याच्या वरच्या अधिकार्‍याक्डून झाडण्यात होतो. एकंदरीत सर्व वरिष्ठांची मानसीकता व ही केस दाबण्याकडे असलेली वॄत्ती पाहून त्याला नक्कीच कुठे तरी पाणी मुरते आहे याची खात्री पटते व याचा व्यवस्थीत तपास करायल सुरवात करतो ...

या केसशी संबंधीत व्यक्तींचा तपास करताना तो अनेकांची गाठ घेतो व त्यांच्याकडून सत्यपरिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला भेटतात त्या भागाचे सर्वेसर्वा असणारे अधिकारी म्हणजे "ब्रिगेडीयर प्रताप", ह्यांची त्याच्या झालेल्या संभाषनातून व वागणूकीवरून ते अतिषय उद्दाम, निष्ठूर, हेकट व मुस्लीमांविषयी अतिशय पूर्वगॄहधिष्ठीत असलली मानसीकता या गोष्टी समोर येतात. त्यानंतर त्याची भेट होते "मेजर राठोड" यांच्या पत्नीशी, तिच्या बोलण्यातून राठोडांचा असलेला एकसूरी, निष्ठूर व दिलेल्या आज्ञांचा कुठलाही विचार न करता त्याचे पालन करणाच्या स्वभावाची ओळख पटते, स्वता: राठोडाच्या पत्नी याला खूप कटाळलेल्या असतात व त्या एक तडाजोड म्हणून संसार करत असतात. राठोडांच्या मॄत्य नंतर त्यांच्या चेहर्‍यावर आलेली "मुक्तीची भावना" सिद्धांतच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही. सर्वात शेवटी तो भेटतो "कॅप्टन जावेद खानच्या " आईला, तेथे त्यांच्या बोलण्यावरून व एकंदरीत त्यांच्या खानदानाच्या इतिहासावरून व जावेदच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीच्या आलेखावरून त्याच्या राठोडांना मारण्यामागे एक वेगळे कारण असल्याची शंका सिद्धांतला येते व तो दिशेने तपास चालू करतो ...

शेवटी बरेच कोर्ट सिन्स झाल्यावर त्या हत्यकांडाचा खरा शोध लागतो तो असा ....

बर्‍याच वर्षापूर्वी "ब्रिगेडीयर प्रतापचा" अख्ख्या कुटुंबाची एका जातीय दंगलीत त्यांचाच नोकराकडून म्हणजे "जमाल" कडून निर्घूण हत्या होते. त्यानंतर तो जमाल पळून जातो व प्रताप त्याला अजून हूडकत असतो. त्या हत्याकांडाचा गहिरा परिणाम व जमालचे पळून जाणे याचा परिणाम म्हण्जे "ब्रिगेडियर प्रताप" प्रत्येक मुस्लीमामध्ये जमाल ला पाहतात व त्याला शिक्षा करून सूड घेण्याचे सत्र चालू करतात. आपल्याबरोबर आपल्यासारखीच मानसिकता असलेल्या अधिकार्‍यांची फौज ते तयार करतात व सुरू होते मुस्लीमांचे शिरकाण. अनेक भागात चालू असलेली कोंबिंग ऑपरेशन्स हा त्याचाच एक भाग,अशच एका ऑपरेशन मध्ये सामील असतात "मेजर राठोड व कॅप्टन जावेद खान", प्रताप कडून मिळालेल्या आदेशाचे पालन करताना राठोड एका निष्पाप मुस्लीम नागरीकाला ठार मारतात व त्यांचे पुढचे पाऊल पडते ते एका ८-१० वर्षाच्या निष्पाप मुस्लीम मुलीकडे, आत्तापर्यंत हा तमाशा पहात असलेल्या जावेद खानला ही गोष्ट मान्य नसते, तो राठोडांना आडवायचा प्रयत्न करतो पण राठोड त्यालाच दम देऊन गप्प बसवतात, ते आता त्या मुलीला मारणार तेवढय्यात जावेद खान आपली बंदूक काढून राठोडांना मारून टाकतो व त्या मुलीची सुटका करतो ...
आर्मीच्या कोर्टासमोर या सर्व गोष्टी मांडल्यावर योग्य तो न्याय होऊन चित्रपट संपतो ...

तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? आर्मीचे शौर्य जनरली हे रणात गाजवलेल्या पराक्रमाशी निगडीत असते पण इथे तर एक अधिकारी दुसर्‍या अधिकार्‍याची हत्या करतो, हेच का ते शौर्य ? होय, हेच ते, कुठल्याही परिणामाची पर्वा न करता सर्वसामन्य नागरीकांच्या कल्याणासाठी व त्यंच्या सौरक्षणासाठी कसलीही भिती न बाळगता जावेद ने आपल्या अधिकार्‍याला घातली गोळी हे शौर्य, कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करून जावेदची सुटका करणार्‍या व ब्रिगेडीयर प्रतापांना योग्य शिक्षा घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून मेजर सिद्धांअतने दाखवलेले शौर्य, हेच ते शौर्य !!!!

पिक्चरची पटकथा अतिशय उत्तम, मांडणी झकास, घेतलेले कलाकार अतिशय बॅलेन्स्ड ....

शेवटी "शाहरूख खानच्या" शौर्य म्हणजे काय हे स्पष्ट करणार्‍या एका गद्याच्या वाचना हा नितांतसुंदर चित्रपट संपतो ...
"शौर्य क्या है ?
थरथराती हुई धरती को रौंधती फौजींयोंकी पलटन का शोर,
या सेहमेसे आसमान को चिरता हुआ बंदूकोंकी सलामी का शोर,

शौर्य क्या है ?
हरी वर्दीपर चमकते हुए चंद पितल के सितारे,
या सरहद के नाम पर खिची हुई अनदेखी लकीरोंकी नुमाईशे ?

शौर्य क्या है ?
दुर खामोश उडते हुए परिंदे को भुंदनेका अहसास,
या गोलोंकी बरसात से पलभरमे एक शहरको समशान बनानेका अहसास ?

शौर्य !!!
बारूदसे धुंदले इस आसमान मे शौर्य क्या है ?
वादियोंसे गुंजते हुए एस गावमे मातममे शौर्य क्या है ?

शौर्य ,
शायद एक हौसला ,
शायद एक हिंमत,
हमारे बहूत अंदर ,
मजहबसे बनाये इस नारे को तोडकर किसीका हात थामनेकी हिंमत
गोलींयों के इस शोरको अपने खामोशीसे चिरनेकी हिंतत,
मरती-मारती इस दुनीयाने निहत्ते डटे रहने की हिंमत ...

शौर्य,
आने वाले कल खातीर अपने हिस्सेकी कायनात को आज बचा लेने की हिंमत ...

मौजमजाचित्रपटशिफारसआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

नीलकांत's picture

27 Apr 2008 - 1:10 pm | नीलकांत

शौर्य हा खरोखरच खुप छान चित्रपट आहे. मुळात मला राहूल बोस आवडत असल्यामुळे या हा चित्रपट पाहणार हे नक्की होतं. केके मेनन (ब्रिगेडीअर प्रताप) चा अभिनय तर उत्तमच. शेवटी ब्रि. प्रतापची साक्ष घेतानाचा त्याचा एक १० -१२ मिनीटाचा सलग संवाद आहे. एका संतूलित, सर्वं गोष्टी आपल्या पकडी खाली असायला हव्यात आणि आपण म्हणजे मुर्तीमंत शौर्य आहोत असं मानणार्‍या ब्रि. प्रतापचा एका दुखावलेल्या बापात आणि त्याच मुळे मुस्लीमद्वेष्ट्या अधिकारार्‍यात झालेला बदल त्याच्या चेहर्‍यावर दिसतो. ( पैसे वसूल )

एकूनच चित्रपट छान झाला आहे. मनिषा लांबाचा लुक नवा आहे. जावेद जाफरी कसलाही आचरटपणा न करता काम करतो. चित्रपटात दोन तीन आणि तीही समयोचित गाणी आहेत.

शेवटचं शाहरूखच्या आवाजातील शौर्य क्या है तर एकदम झकास.

नीलकांत

इनोबा म्हणे's picture

27 Apr 2008 - 1:35 pm | इनोबा म्हणे

उत्तम परीक्षण...पण कथा उघड झाल्यामुळे प्रत्यक्ष पहाताना तेवढी उत्सुकता राहणार नाही.
केके हा माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे पहायलाच हवा.

तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? ........
हे विश्लेशण आवडले.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

मन's picture

27 Apr 2008 - 4:47 pm | मन

चांगला पिक्चर दिस्तोय्,पण इथे अजुन वितरित झालेला नाहिये.

एकुण ष्टोरि लाइन पाहिली तर आणखी एक "हट के" सिनेमा आठवतो
"एक रुका हुआ फैसला" तिथेहि काही ज्युरि मिळून एका केसच्या फारश्या खोलात न जाता
एका आरोपिला बेधडक फाशीचि शिफारस करणार असतात .पण नेमका एक ज्युरी,डोके
ताळ्यावर ठेउन विचार करतो आणि एक एक घटना उलगडत जाते.

तसचं लष्करातील (जातीय)भेद भावावर आधारीत एक नाटक "सह्याद्रि" चॅनेल वर १५ औगष्ट ला
लागलं होतं २-५ वर्षा पूर्वि.

साठ्यांचे कार्टे.

स्वाती दिनेश's picture

27 Apr 2008 - 4:59 pm | स्वाती दिनेश

आता ह्या सिनेमाची तबकडी मिळेपर्यंत वाट पाहणे आले, नाहीतर बॉलिवूडचा सिनेमा जर्मनमध्ये डब करून दाखवतील त्याची तरी वाट पाहणे आले.
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

27 Apr 2008 - 6:13 pm | प्रभाकर पेठकर

अहो छोटा डॉन साहेब,

समीक्षा चांगली आहे पण सगळी केल उलगडून सांगितल्यामुळे चित्रपटगृहात पैसे खर्च करून आणि घरी सीडी पाहायची म्हंटली तरी वेळ खर्च करून तो पाहण्याची उत्सुकताच तुम्ही संपविलीत. प्लीज, पुढच्या वेळी असे करू नका. रहस्यभेद केल्याशिवाय समीक्षा करून वाचकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याच्या कौशल्याला प्राधान्य द्या. बाकी समीक्षेमागील भावना समजण्यासारखी आहे.

विसोबा खेचर's picture

28 Apr 2008 - 10:28 am | विसोबा खेचर

पेठकरसाहेबांशी सहमत आहे...

तात्या.

शितल's picture

27 Apr 2008 - 7:24 pm | शितल

डॉन साहेबा॑नी जरी त्या पिक्कचरची सर्व स्टोरी उलघडली तरी तो पहायला हवा. आणि राहुल बोस जर त्या चित्रपटात असेल तर खास करुन पहायला हवा.

शितल's picture

27 Apr 2008 - 7:24 pm | शितल

डॉन साहेबा॑नी जरी त्या पिक्कचरची सर्व स्टोरी उलघडली तरी तो पहायला हवा. आणि राहुल बोस जर त्या चित्रपटात असेल तर खास करुन पहायला हवा.

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2008 - 8:09 pm | पिवळा डांबिस

वर दिलेल्या कथेवरून हे "अ फ्यू गुड मेन" या टॉम क्रूझ, जॅक निकल्सनच्या चित्रपटाचं भारतीयीकरण (हिंदू-मुस्लिम,जातीय दंगली वगैरे) वाटतं आहे, पण डॉन्याने रेकमेंड केलाय तर जरूर सीडी बघू....
-डांबिसकाका

पण मला सिनेमाचं नाव आठवत नव्हतं.

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2008 - 8:48 pm | पिवळा डांबिस

"आय वॉन्ट द ट्रूथ!
"यू कान्ट हॅन्डल द ट्रूथ!!"

या संवादाचं हिंदीकरण कसं केलं असेल याची उत्सुकता आहे!!:))

इंग्रजी चित्रपटशौकिन,
डांबिसकाका

चतुरंग's picture

27 Apr 2008 - 8:52 pm | चतुरंग

"मैं सच जानना चाहता हूं"!
"जान लोगे, तो जान दे दोगे!!"

(सलीम - जावेद झालेला)
चतुरंग

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2008 - 9:01 pm | पिवळा डांबिस

क्या बात है!!:)
आपणच आता हिंदी चित्रपट लिहूयात का? मी इंग्रजी कथानकं शोधून काढतो, तुम्ही ती हिंदीत लिहा...
कसा वाटतोय करियर चेंज!!:))

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Apr 2008 - 9:05 pm | डॉ.प्रसाद दाढे

भारतीय सैन्यदलाच्या काहीश्या काळ्याबाजूला उघड करणारा (कि॑वा भारतीय सैन्याधिकार्‍याला खलनायक दाखविणारा) चित्रपट सेन्सॉरने म॑जूर कसा काय केला? शिवाय सैन्याशी निगडित चित्रपट असल्याने निर्मितीत प्रत्यक्ष सैन्याचीसुद्धा मदत (व स॑रक्षण म॑त्रालयाची परवानगी) लागली असणारच..कारण भारत सरकारचे सर्वसाधारण धोरण असेच आहे..मला आठवते आहे 'माचिस' ला पुष्कळ पोलिस अधिकार्‍या॑नी (विशेषतः केपीएस गिल) आक्षेप घेतला होता.
मला असा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण माझ्या (व इतर शेकडो मराठी वाचका॑च्या) अत्य॑त आवडीच्या 'रार॑ग ढा॑ग' काद॑बरीवर आधारित चित्रपटास आर्मीने दिलेला नकार हे होय. मी ती काद॑बरी वाचता॑ना एखादा चित्रपटच पाहतो आहे असे वाटले होते (कारण अर्थात प्रभाकर पे॑ढारकर हे उत्तम दिग्दर्शकही आहेत) व मला ह्या कथानकावर कुणीतरी चित्रपट काढावा असे तीव्रतेने वाटले होते. मी नेमका हाच प्रश्न प्रत्यक्ष लेखका॑ना जे॑व्हा विचारला ते॑व्हा मला त्या॑नी असे सा॑गितले की एका निर्मात्या॑नी हे कथानक (स्क्रिप्ट) स॑रक्षण मुख्यालयात परवानगीसाठी दिले होते पण आर्मी इ॑टलिजन्स विभागाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्यातील एक अधिकारी पुढे लेखका॑स प्रत्यक्ष भेटले ते॑व्हा कथानक त्या॑ना व्यक्तिशः आवडल्याची कबूलीही दिली पण हेही आवर्जून सा॑गितले की 'ही कथा टिपिकल आर्मी मानसिकतेवर प्रहार आहे जो आर्मीला रुचणार नाही, सबब प्रकरण नाम॑जूर'.
मला वाटते ह्याच विषयावर पे॑ढारकर या॑नी २००७ सालच्या कुठल्याश्या दिवाळी अ॑कात लेखही लिहिला आहे.
मला मु॑बई-पुणे द्रुतगती मार्गाचे बा॑धकाम पाहण्याची स॑धी मिळाली होती तेव्हा रार॑ग ढा॑गची खूप आठवण आली. असे वाटून गेले की अनायसे पहाड फोडून रस्ता करण्याचे काम चालूच आहे ते॑व्हा रार॑ग ढा॑गवरील चित्रपटाचे चित्रिकरण का करू नये :)

स्वाती दिनेश's picture

28 Apr 2008 - 11:15 am | स्वाती दिनेश

अरे काय आठवण करून दिलीत तुम्ही डॉक्टर.. खरच ह्या कादंबरीवरचा सिनेमा अफलातून होईल..
धनंजयच्या जुन्या दिवाळी अंकात (२००५) पेंढारकरांनी एअरफोर्स साठी पॅरा ट्रेनिंग वर लघुपट केला होता त्याचे अनुभव लिहिले आहेत,ते पण असेच थ्रिलिंग आहेत..
स्वाती

व्यंकट's picture

27 Apr 2008 - 10:29 pm | व्यंकट

पण नंतर हिंदू-मुस्लीम वळणावर गेल्यावर बोअर झालं... नेहेमी प्रमाणे हिंदूंना वाईट ठरवलं....

व्यंकट

काळूराम's picture

28 Apr 2008 - 4:26 am | काळूराम

के के मेननला अभिनयासाठी शंभरपैकी शंभर. अगदी मनाला भिडणारी संवादफेक. नक्की बघाच.

झंप्या's picture

28 Apr 2008 - 8:11 am | झंप्या

ए डॉन्या, नुसती ष्टोरी लिहुन काय परिक्षण होतं का? फारच बोर मारतोस बाबा तू! (|:
-झंप्या

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 12:14 pm | धमाल मुलगा

मस्तच रे!
आयला, तू आपल्या अभिजीत भाऊच्या पोटावर पाय द्यायच्या विचारात आहेस की काय?
निस्तं परिक्षणांवर परिक्षणं !! ती पण व्यवस्थित...फुटकळ प्रतिक्रियांसारखी नव्हे! छान छान...अशीच प्रगती कर हो :)

बाकी, के के मेनन आपल्याला आवडतोच...राहूल बोसच्या बाबत तर काय बोलायचं?

तू ष्टोरी उलगडवली असलीस तरी हरकत नाही..आपण फक्त के के आणि राहूल बोसचं काम बघायला जाणार!!!

-(फुटकळ प्रतिक्रियेपुरता उरलेला) ध मा ल.

आनंदयात्री's picture

28 Apr 2008 - 5:00 pm | आनंदयात्री

यावेळेस लेखनशैलीतला फरक वाखाणण्या जोगा आहे, अंडरलाईन्स - बोल्ड फेसिंग वापरण्याचा मोह टाळला आहे, त्यामुळे यावेळेसचा लेख अधिकच आवडला. अभिनंदन. कथा सांगुन चुक नाही केलिस पण 'स्पॉईलर अलर्ट' टाकायला हवा होता. पुढचे परिक्षण टाक लवकर.

स्वाती राजेश's picture

13 May 2008 - 2:38 pm | स्वाती राजेश

शौर्य : सुंदर चित्रपट
मी वरील लेख न वाचता, मुव्ही पाहीला..
छोटा डॉन यांनी परीक्षण छान केले आहे, पण शेवटचा परिच्छेद त्यांनी टाळायला हवा होता.....
कारण त्यामुळे सिनेमाचा सस्पेन्स कळतो..:)
सिनेमा पाहताना कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सर्वांची कामे मस्त झाली आहेत, राहुल बोस चे काम छान, कधी नव्हे ते जावेद जाफरी चे काम आवडले.
२ गाणी श्रवणीय आहेत.

बर्‍याच वर्षापूर्वी "ब्रिगेडीयर प्रतापचा" अख्ख्या कुटुंबाची एका जातीय दंगलीत त्यांचाच नोकराकडून म्हणजे "जमाल" कडून निर्घूण हत्या होते
ते नाव जमील आहे.

यशोधरा's picture

19 May 2008 - 9:07 am | यशोधरा

कालच शौर्य पाहिला. अतिशय सुरेख चित्रपट. कुठल्याही दृश्यात भडकपणा, सवंगपणा जाणवत नाही. राहुल बोस, केके मेनन यांनी नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केलाच आहे पण जावेद जाफ्रीनेही आचरटपणा केलेला नाही कुठेही, अर्थात त्याला अशी भूमिका तरी कुठे मिळालीय म्हणा आधी!!

न्यायालयातल्या शेवटच्या दृश्यात केकेने अप्रतिम अभिनय केलाय!! एकदम सही!! त्याच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलणारे भाव म्हणजे, अभिनय कसा करावा याचा उत्तम नमुना म्हणायला हरकत नाही!! मोझर बेअरने या सिनेमाची डीव्हीडी काढली आहे. संग्रही ठेवावा असा चित्रपट आहे.