सवय

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
24 Dec 2010 - 3:08 pm

णमस्कार्स लोक्स ,

असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्‍याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते. काही जण दुसर्‍यांच्या वस्तु मागण्याच्या सवयीने ग्रस्त असतात. काहींना विसरण्याची सुद्धा सवय असते. मी पाहिलेल्या महाभागांपैकी काहींना तर पैसे मागायची देखील सवय असते. ते असेच १० रुपये आहेत का रे सुट्टे ? म्हणुन पैसे मागायचे. काहींना फुकट खायची सवय असते तर काहींना फुकट प्यायची सवय असते. जसे फुकट पिणारे असतात तसेच काहींना बाजिरावकी ची सवय असते. हे लोक दुसर्‍यांची बिलं भरण्यास फार उत्सुक असतात. काहींना प्रामाणिकपणे वागायची सवय असते (दुर्दैवानं ह्यांच प्रमाण फारंच कमी आहे ). सवयी एक ना अनेक. अगदी 'व्यक्ति तितक्या प्रवृत्ती' आणि 'प्रवृत्ती तितक्या सवयी' म्हंटल्यास वावगं ठरु नये.

हं , तर बहुतेक सवयी अशा असतात की त्या आपण एवढ्या सुलभतेने करुन जातो की समजतही नाही. मला तशी पाय हलवायची सवय . क्रिटीकल केसेस एक्ग्झेक्युट करत असतांना ( इथे क्रिटिकल कामे करत असताना , असं थोडक्यात लिहीणार होतो , पण तुम्हा फॅंटसी प्रेमी लोकांचं काही सांगता येत नाही ) माझा पाय नकळत ऑस्सिलेट होतो , परवाच्या दिवशी तो जरा जास्तंच दुखत होता. ही सवय घालवण्याचा मी बराच प्रयत्न करतो. परंतु त्याने फक्त इरिटेशन येतं.
माझ्या आईचे चुलते ज्यांना आम्ही 'बापु" म्हणत असु , बर्‍याचदा आमच्या घरी येत . त्यांना एक विचित्र सवय होती . ती म्हणजे मोठ्ठ्या आवाजात पादण्याची. आम्ही खुप हसायचो . पण त्यांच्या ही सवय फक्त ध्वनीप्रदुषण करायची. वायुप्रदुषण होत नसल्याने त्यांच्यासवयीचा जास्त त्रास होत नसे. माझे बाबा मात्र त्यांची मस्त फिरकी घ्यायचे. ते येणार आहे असं कळल्याबरोबर आई ला आम्ही कानांच्या सौरक्षणार्थ कापुस मागायचो. बापुंना आपल्या सवयीचं ना वाईट वाटे ना लाज. कोणतेही पाहुणे असोत , कोणतीही वेळ असो , बापु बसल्या जागी एका साईड ने वर करुन मस्तपैकी सिंहगर्जना करायचे. त्यां त्यांच्या त्या ठार्रर्रर्रर्र ठुर्रर्रर्र ने मस्त मनोरंजन होत असायचं :) गमतीने आम्ही त्यांना "इच्छाधारी पादरे" म्हणत असु.
सवय ही फक्त हलचालींचीच नसते. काहींना बोलताना विषिष्ठ शब्द बोलण्याची सवय असते. आमच्या मित्राच्या कॉलेजातले एक महाभाग " म्हंटलं " म्हणन्याचे आदि होते. प्रत्येक वाक्याच्या शेवटी ते "म्हंटलं" चा फुटर जोडत. एकदा त्यांना पिक्चर ची तिकिटे बुक करायला लावली. तिकडून फोन करताना ते म्हणतात , " अरे मंगला ला हाऊसफुल झालंय म्हंटलं ... " ,"रात्रीचाही शो फुल आहे म्हंटलं .. " "आता राहुल ला आलोय म्हंटलं .. " "पण इथेही हाऊस फुल आहे म्हंटलं ... ' शेवटी मित्र वैतागला आणि म्हणाला ... "मग माघारी या म्हंटलं ... " .
आमच्या जिम मधल्या एका कोच ला (कोच कसला ? पिल्लु साला ) दुसर्‍यांच्या गाड्या मागायची घाणेरडी सवय आहे. एक दिवस त्याने अस्मादिकांना गाडीची पृच्छा केली. तेंव्हा मला त्यांची हिस्ट्रि माहित नव्हती .पण मी माझी गाडी कोणालाच देत नाही , तशी त्यालाही दिली नाही. तर त्याचा त्याला राग आला आणि त्याने आमच्याशी बोलनं बंद केलं , त्याचा तो लाड पाहुन त्याला आम्ही सिंगल आउट करायचं ठरवलं , त्याची दुसरी सवय म्हणजे , जिम मधे समोरच्याला सपोर्ट देताना रिपिटेशन मोजण्याची एक स्टाईल असते .. हा सातव्या रिपिटेशन ला नेमका "सेन " (७) म्हणतसे. त्याचा तो "सेन" आम्ही लक्षात ठेवला आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणुन कुठे ही मोठ्याने .. "कमॉन सिक्स .. . अप .. सेन " म्हणुन त्याच्या "सेन" ची फुल वाट लावली. आता तो व्यवस्थित "सेव्हन " म्हणतो असं कानावर येतंय =)) त्याच्या ह्या गाडी मागण्याच्या सवयी मुळे बाकीच्यांनीही त्याला चिडवण्याचे चान्स सोडले नाहीत .कोणी त्याला चार फुटाचा बिल्डर म्हणतो तर कोणी भुरट्या .. असो जो तो आपापल्या सवयींमुळे ट्रिटला जातो नाही का ?
कधी कधी सवयींची लागण व्हायला वेळ लागत नाही. एखाद्याची सवय आपण चिडवण्याच्या हेतु ने कॉपी करतो खरी पण ती चुकुन आपल्यात कधी शिरते कळत नाही. :) हनुमान जिम चे संस्थापक असेच. यांना दर वाक्यात दोनदा तरी ब्यानचोद किंवा ब्यान्डी (भेंडी) म्हणायची जाम सवय . जिमात अ‍ॅडमिशन घेतलेल्या कोणत्याही किडमिड्या पोर्‍याला हे हरभर्‍याच्या झाडावर चढवताना "ब्यानचोद ... ३ म्हैन्यात बॉडी होती ... ब्यान्डी .. १० किलो वजन असं वाढेल .. " पोर्‍याची छाती २ इंच तिथेच वाढे. ह्या जिममालकांचं नावंच कालांतराने ब्यानचोद पडलं .. आणि त्यांची सवय कॉपी करता नकळत स्वभावात शिरली .. घरी एकदा नकळत तो शब्द तोंडातुन निघुन गेला.. तिर्थरुपांच्या कपाळावरच्या अठ्या पाहुन नंतर मोठ्या कष्टाने ही सवय घालवण्यात अस्मादिक यशस्वी ठरले.
एकजण ओळखीचा आहे त्याला बसल्या बसल्या चावायची सवय आहे. काय लोचा आहे ते माहित नाही. पण समोर दिसेल ते चावत बसतो. किचेन असो किंवा कार्ड .. किंवा कोणतीही आजुबाजुला पडलेली वस्तु. हे महाशय अगदी त्यांच्याही नकळत त्या वस्तुला अगदी च्युईंग गम सारखे चावतात. असो , असते एकेकाला आवड.
माझ्या ओळखीतल्या एका मुलाला निलचित्रफिती जमवण्याची भलतीच सवय लागली होती. जुण्या काळी जेंव्हा ४० जीबी च्या हार्ड डिस्क्स सुद्धा लज्गरी समजली जायची , तेंव्हा ह्या महाशयांनी ६० जीबी ची हार्ड डिस्क स्पेयर डिस्क म्हणुन पार खिशाला खार लावुन विकत घेतली. आणि तिच्यातला बाईट न बाईट फक्त ह्याच सवयी साठी उपयोगी आणल्याचे स्मरते. ह्यांना आपल्या ह्या सवयीचा फारंच अभिमान. ही सवय यांच्यात इतकी भिणली होती की ६०जीबी भरल्या नंतर ह्यांनी आपल्या मुख्य हार्ड डिस्क वरचा एकेक डेटा उडवुन त्यावरही निलचित्रफिती भरण्यास सुरुवात केली. नंतर जागा पुरेनात म्हणुन महाशयांनी सिस्टिम फाईल्स सुद्धा उडवल्या होत्या. नंतर रिस्टार्ट केल्यावर कंप्युटर काही सुरुच होईना. तेंव्हा आमच्याकडे आले होते तेंव्हा त्यांचा हा पराक्रम पाहुन आम्ही पोटभर हसुन देखील घेतले होते.
आम्ही कॉलेजचे सुरुवातीचे तिनेक आठवडे श्री टींग्या यांच्या चरणस्पर्षाने पतित पावन झालेल्या कॉलेजात काढले. तिथे एक महाभाग मुलांकडुन रिफिल च्या निमित्ताने चाराणे- आठाणे मागत आणि तिन रुपये जमा झाले की जाऊन वडापाव खात. ही अनोखी सवय आम्ही अजुन कोणातही त्यानंतर पाहिली नाही ( त्यापुर्वी देखील पाहिली नव्हती) .

सवयी फक्त भौतिक जिवनातंच असतात असं नाही. आभासी जगात वावरणार्‍यांनाही सवयींपासुन सुटका नाही. हं आता ह्यावर लिहायला घेतलं तर सर्वर्स ची जागा पुरणार नाही. कारण आम्ही काही मेगाबायटी लिहीणार्‍यांतले नाहीत. :) मोठ्ठाले आणि विषयाचा किस काढनारे प्रतिसाद / किंवा लेख लिहीण्याची सवय काहींना आहे .. त्यांनी ते शिवधनुष्य उचलावं असंच मी म्हणेन. काही जालमानवांना बोजड लिहीण्याची सवय सिद्धी प्राप्त आहे. ते प्रतिसाद लिहीताना जर कात्रज पासुन सुरु करत असतील तर प्रतिसादाचा शेवट होइतो ते चाकण - राजगुरुनगर ला पोचलेले असतात. काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात. ह्या सवयीच्या आयडीज ना आवरणे फार मुश्किलंच नाही तर नामुनकीन असते. अलिकडे यांच्यात भरपुर कॉपिटिशन आहे. आपलं मराठी भाषाज्ञान आनि शब्दसंग्रहं किती अमाप आहे हे झळकवण्याची यांत जणु चढाओढ चालु असते. असे पाणभर प्रतिसाद खरोखर् वाचण्याची किती जणांना सवय आहे ह्या बाबद मात्र मी अनभिज्ञ आहे ;)
काही आयडीज ला अंतराष्ट्रीय राजकारणात आपण किती मुरलेलो आहोत हे दाखवन्याची देखील सवय असते. हो आता अंतरराष्ट्रीय राजकारणात फक्त तिन-चार किंवा भारताला गृहित धरल्यास पाच देश आहेत. अमेरिका , चिन , पाकिस्तान क्वचित प्रसंगी कोरिया किंवा रशीया सोडलं तर अंतरराष्ट्रीय राजकारणात ठेवलंय तरी काय ? पण ह्या सवयीची लोकं राजकिय घडामोडींवर मस्त बारिक लक्ष ठेवुन असतात , ओबामा पादले तरी ह्यांना ओबामांच्या आधी त्याचा वास्/आवाज ( अ‍ॅज पर अ‍ॅप्लिकेबल ) येतो . मुषर्रफांचा हल्ली कोटा खराब आहे, अफगाणिस्तानात रस्त्यावर खाल्लेल्या सिख्-कबाबांमुळे त्यांना ढंडाळ्या लागल्या आहेत आणि त्यासाठी ते आमुक आमुक बाबांचे चुर्ण खात आहेत ह्याची माहीती देखिल सवयीदाखल यांना असते. काहींच्यात मग स्त्रीद्वेष भिणलेला असतो तर काही अवांतर गप्पा हाणण्याच्या सवय असते. काही केवळ विरोधासाठी विरोध करतात तर काहिंना स्त्रीयांची प्रतिमा (जरी खालावली नसली तरी ) उजळवण्याच्या सवयी असतात ( ह्यात ते नक्की काय करतात / साधतात ते देव जाणे ). आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते. काही लोकांना सिस्टिम वर खडे फोडण्याची सवय असते . काही कडव्या हिंदुप्रेमींना कॉंग्रेस वर शरसंधाण करण्याची सवय असते तर काहिंना कॉंग्रेस विरोधकांच्या वक्तव्यातला खोटेपणा / गॅप्स दाखवण्याची सवय असते. सवय सगळीकडे आहे .
ही सवय इतकी महान आहे की रजनिकांतला सुद्धा अशक्य गोष्टी शक्य करण्याची सवय आहे.

काहिंना अलिकडे प्रतिसाद/ लेख देखी सवयीदाखल ऊडवण्याची देखील सवय लागली आहे म्हणे
तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?

नृत्यसंगीतसंस्कृतीनाट्यअभिनंदनआस्वाद

प्रतिक्रिया

"तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?"
भारीच रे...टारिपु

काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात.

हे पण एकच लंबर....

तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?

शक्यता नाकारता येत नाहि.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 3:14 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत समर्थन आहे.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:41 pm | नरेशकुमार

असेच बोल्तो.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 3:47 pm | परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ जबर्‍याच रे टार्‍या.
लेखातील कही काही सवयींवर लवकरच औषध शोधावे लागणार असे दिसतंय.

तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.

दिपक's picture

24 Dec 2010 - 4:11 pm | दिपक

तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.

अगदी
आम्हाला पण टार्‍याचे असे धमाल लेख वाचायची सवय झालीये..

छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख लिहीतोय ? ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच :)
आम्ही तर आतंकवादी .. हिहॉहॉ .. बोला .. कुठे गेम करायचा असेल तर बोला :)
युयुतासुंसारखे आम्ही शुल्क पण घेत नाही .. हॅहॅहॅ .. :)

दिपक's picture

24 Dec 2010 - 4:21 pm | दिपक

काल्म डाऊन टारू..
तो वर बसला आहे ना तो बघतोय सगळे.. उसके घर देर है मगर अधेंर नही. :-)

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:40 pm | नरेशकुमार

उसके घर देर है मगर अधेंर नही.
अन्धेरा कायको नै मालुम क्या तुम्को, वोह लाईट का बील टाईम पे भरता रे बाबा.

ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर विनोद करतोस रे तु ? हसवुन हसवुन मारणार आहात का ? ह्हा ह्हा ह्हा .. बै गं .. हसुन हसुन माझे तर पोटंच दुखले =))

स्वानन्द's picture

24 Dec 2010 - 10:01 pm | स्वानन्द

आई शप्पथ! कहर आहे हा प्रतीसाद म्हणजे! ५ मिनीटं झाली अजून हसतो आहे !!

अवलिया's picture

24 Dec 2010 - 5:46 pm | अवलिया

ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच Smile

हा हा हा अगदी बरोबर.... आणि तेच हल्ली मिपावर कचरा फार झाला असं छात्या (स्वतःच्याच) पिटुन पिटुन तडफट करुन सांगत आहेत... देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

टारझन's picture

24 Dec 2010 - 6:38 pm | टारझन

हौ ना भौ ... सत्तांतरापुर्वीच्या वादळात हे (स्वयंघोषित ) मिपा चे खंबे षिलेदार ढुंगणाला पाय लावुन पळुन गेले होते , अण दुसरीकडुन मिपाच्याच कुटाळक्या करत होते .. तेंव्हा ह्यांचा मिपा बाणा मोठा ताठ होता हो :) आता भरपुर आणि मोघम प्रमाणात पुळका सुटला आहे .. बरं जिकडे गेले तिकडे पण इमानदारीत राहिले नाहीत. तिकडून इकडे आल्यावर तिकडच्यांना शिव्या .. बरं ह्यांचा न्युट्रॅकर बघावा तर अंमळ खुळखुळाट ना रे बाबा :) निसत्या खरडवह्या भरुन आणि (तोंडदेखलं) ग्गोग्गो बोलुन मिपाचं भलं होत नसतं हे कधी कळणार रे ह्या रिकाम्या मडक्यांना !! त्यासाठी आपल्यासारखे दर्जेदार साहित्य प्रसवण्याची धमक मात्र नाही. धमण्यांत पाणी असणार्‍यांनी आमच्या समोर फुकाच्या टेर्‍या बडवु नये.
शांत आहे तोवर शांत आहे ;) काय रे णाणा , बरोबर का ?

(सत्तांतरापुर्वी आणि सत्तांतराणंतरही मिपावरच रमलेला) टारझन गोडबोले

अवलिया's picture

24 Dec 2010 - 6:40 pm | अवलिया

अगदी १००% सहमत आहे...

सुहास..'s picture

24 Dec 2010 - 8:00 pm | सुहास..

१०१% टक्के सहमत ..

योगी९००'s picture

24 Dec 2010 - 3:57 pm | योगी९००

सातवा रिपू सवयच... मस्त लेख..

हॉस्टेलवर असताना एकाला नीलचित्रफिती पहाण्याची खुप सवय होती. रोज रात्री तो जवळच्या नीलचित्रफिती (जरी रिपीट शो असलातरी) पहायचा...त्याला खरोखर त्या व्हिडीओ पार्लरच्या मालकाने स्पेशल सवलतीचा दर ठेवला होता...हाइट म्हणजे एक दोनदातर त्याने दुसरे दिवशी पेपर असून सुद्धा स्वतःची अशी करमणूक करून घेतली होती...

आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो की जरी तो बायकोबरोबर किंवा एखाद्या मुलीबरोबर नाजूक अवस्थेत असला आणि कोणी त्याला सांगितले की जवळच्या पार्लर मध्ये नीलचित्रफित आली आहे..तर तो सगळे सोडून तिकडे जाईल..

स्वानन्द's picture

24 Dec 2010 - 10:04 pm | स्वानन्द

हा हा!! सहीच :)

हा हा हा टारझन भाई मस्त सवयी निवडल्या आहेत.
आमच्या एका पत्रकार दोस्ताला समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगवून त्याच्या शर्टाच्या गुंड्या खोलत जाण्याची सवय होती. त्यांच्यासमोर कुणीच उभा राहून बोलत नसे!

असाच एक रूम पार्टनर काहीही झाले की वाच्छान!!! असे म्हण्॑त असे.. त्याचे नावच शेवटी वाच्छान असे पडले.

अजून एका दोस्ताला निवांत बसल्यावर विचार करीत करीत स्वतःच्याच केसांचा झिटटु वळत जाण्याची सवय आहे.

अजून एका दोस्ताला सिगारेट्चा धूर तोंड सताड उघडे ठेऊन सर्व चेहेर्यावरून वर सोडण्या॑ची सवय आहे.

-करमणुक झाली आठवून.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Dec 2010 - 5:06 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

माझ्या मैत्रिणीच्या मुलीला होती ही सवय..
बाबाच्या कडेवर असेल तर एकेक बटण खोलत बसायची!

पार्टी फिर्टीत नवर्‍याच्या कडेवर बसल्यावर असे करु नये म्हंजे मिळवली. (पंगा शेट, काय मिळवली इचारु नका उगाच पब्लिकमध्ये)

गणेशा's picture

24 Dec 2010 - 4:23 pm | गणेशा

मस्त .... इच्छाधारी तर जबरदस्त

मुलूखावेगळी's picture

24 Dec 2010 - 4:35 pm | मुलूखावेगळी

लेख मस्त..............
तुला सवयीन्ची नोन्द घेण्यची सवय लागली असे दिसतय

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 4:38 pm | नरेशकुमार

आमाला तर कन्चिच इछ्छा नाय राव, आत काय कराव ?
आमि मानुसच हाय नवं ?

शक्यता असेल कदाचित

बरं आत तु इतक बोलतोयेस तर नाहि बाबा उडवनार तुझे प्रतिसाद.
पन असेच लिहीत जा.

प्राजक्ता पवार's picture

24 Dec 2010 - 5:09 pm | प्राजक्ता पवार

मस्तं लेख .

रामदास's picture

24 Dec 2010 - 10:09 pm | रामदास

तन्मय नोजडीगर्स /ऑल टाईम नेल च्युअर्स वगैरे राहीलेच लिहायचे.

टारझन's picture

25 Dec 2010 - 12:49 am | टारझन

हा हा हा ... ऑफिसातल्या एसीच्या गारठ्यात टाईप करायला बोटं अंमळ गारठली होती. बरेच मुद्दे सटकले खरे ;)
पुर्वीच्या कंपणीत असतांना कॉसमॉस बँकेत(क्लायंट) जावं लागत असे. तिथला एक कुलकर्णी म्हणुन महाभाग होता. कायम नाकात बोटं घालुन काहीतरी कोरत असायचा. एकदा त्याने सॉल्लीड मेकुड काढला , दोन क्षण त्याच्याकडे कौतुकाने बघितलं आणि असा इंडेक्स फिंगर वरुन अंगठ्यावर अडकवुन धणुक्षबाणासारखा हवेत भिरकवला =))

शिल्पा ब's picture

25 Dec 2010 - 9:21 am | शिल्पा ब

=)) =)) =)) हसतेय मगाधरुन...लेख मस्तच रे टार्‍या.. =))

राजेश घासकडवी's picture

25 Dec 2010 - 2:25 am | राजेश घासकडवी

बारीक निरीक्षण आणि खुसखुशीत लेखन. अजून येऊ द्यात.

अरुण मनोहर's picture

25 Dec 2010 - 5:56 am | अरुण मनोहर

लेख छान आहे.

>>आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते<<

हुश्श! "नको तिथे" हे माहीत आहे!

-वि नोट.

नगरीनिरंजन's picture

25 Dec 2010 - 6:27 am | नगरीनिरंजन

उत्तम निरीक्षण! वास्तविक आणि आभासी दोन्ही जगातल्या सवयी मस्त टिपल्या आहेत आणि किस्सेपण गमतीदार आहेत. मजा आली वाचून

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2010 - 8:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, सन्माननीय लेखकाचे मराठी संस्थळावर आगमन कधी झाले ?
लेखन पूर्ण वाचले नाही. नुसते वरवर चाळले.

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

25 Dec 2010 - 8:38 am | टारझन

च्यायला , सन्माननिय प्राध्यापक कॉमातुन कधी उठले ?
प्रतिसाद नीट वाचला नाही . नुसता वरवर चाळला.

- दिल्लीत भुरटे

ramjya's picture

25 Dec 2010 - 9:09 am | ramjya

शाळेत असताना वर्गातील खोड्कर (गुन्ड) मुलगा दररोज सरान्च्या शर्टच्या मागे शई (शईच्या पेनाने) टाकायाचा...मुले मजा बघायची आणी सर सुद्धा काही करु शकत नव्हते....मी ऐकले आहे तो मुलगा आज लोकप्रतिनिधि (राजकारणात )आहे..

पिवळा डांबिस's picture

25 Dec 2010 - 10:01 am | पिवळा डांबिस

मला तशी पाय हलवायची सवय .
हे बाकी खरं! मलाही अशीच पाय हलवायची सवय आहे...
एकदा भर मिटींगमध्ये मी असाच माझ्याही नकळत पाय हलवत होतो....
इतक्या फास्ट, की माझ्यासमोर असलेलं टेबलही व्हायब्रेट होत होतं.....
पण मला काही पत्ताच नव्हता...
माझ्याशेजारीच बसलेल्या एका इथल्या को-वर्कर मुलीने ते माझ्या लक्षात आणून दिलं....
मी जरासं ओशाळूनच "सॉरी, सॉरी!" म्हणालो, तर ती अतिशहाणी म्हणते कशी,
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!"
:)
मस्त लेख!!!
:)

नरेशकुमार's picture

25 Dec 2010 - 10:05 am | नरेशकुमार

"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!"
नुस्त मांडीवर बसून काय एन्जॉय होनारे.

पिवळा डांबिस's picture

25 Dec 2010 - 10:17 am | पिवळा डांबिस

ते तुम्हाला काय कळणार है!
:)

"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!"

आरारारारा ... कांटा लगा :)

स्वानन्द's picture

25 Dec 2010 - 12:05 pm | स्वानन्द

वा वा... चांगली आयडीया आहे. ट्राय करून बघतो.... को वर्कर ची प्रतीक्रिया अश्शीच आली तर काय मज्जा :)
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली... ;)

अवलिया's picture

25 Dec 2010 - 12:06 pm | अवलिया

गाजराची पुंगी, वाजली तर वाजली...

नाहीतर थोबाडीत बसली ;)

शक्यता नाकारता येत नाहि.

वेताळ's picture

25 Dec 2010 - 10:58 am | वेताळ

पिडां काका काय हे......
बाकी टारुचा लेख मस्तच आहे.

खी: खी: खी:, मस्त निरीक्षणं. बाकी आंतरजालीय सवयींवर अजून एक लेख येऊ देत! (ही सवय कोणाची ते ओळखा :))

विजुभाऊ's picture

25 Dec 2010 - 11:06 am | विजुभाऊ

सहमत.....
नरेशकुमार डाम्बीस काकाने चॅलेन्ज दिलय.तुम्ही एकदा बसाच डाम्बीसकाकाच्या मांडीवर.
( अन व्ही साचा रीझन मध्ये तेच कारण ल्ह्या ;) )

नरेशकुमार's picture

25 Dec 2010 - 11:08 am | नरेशकुमार

जगुद्या ना सुखाने, का जिव घेता गरिबाचा.

पिवळा डांबिस's picture

25 Dec 2010 - 11:26 am | पिवळा डांबिस

तुम्ही एकदा बसाच डाम्बीसकाकाच्या मांडीवर.
इथे नरेशकुमारांशी सहमत!
विजुभाऊ, का जीव घेताय माझा गरिबाचा!!!
:)