एका डॉक्टरच्या कविता-३: रिटायरमेंट
( थोड़ी प्रस्तावना: फ्यामिली डॉक्टरचा जमाना गेला, स्पेशालिस्टचा ज़माना आला. स्पेशालिस्टला काही संवयी असतात, त्या चिकटल्या की चिकटल्या. अशाच काही सवई आणि त्यांचे हे किस्से, खरे नव्हे, पण खोटे तरी कसे म्हणू ? )
१. Orthopedician
साठाव्या वर्षी
शेवटचं ट्रयाक्शन लावून
ओर्थोपीडीशीअन घरी आला
दारातच पाय घसरून
वोर्डात परत गेला
२. फिजिशियन
फिजिशियन ची साठी आली
हातात काठी आली
अंगात कंप आला
डोळ्यात मोती आला
तरी सुद्धा आपल्या बधीर कानाला
त्यान स्टेथो लावला
आणि स्वत:चाच हार्ट-रेट मोजू लागला!
३. सर्जन
हजार अपेंदीक्स, सातशे हायड्रोसील
आणि पाचशे हर्निया करून
सर्जननं नाईफ खाली ठेवली
नाईफ सुटली
अन वाइफ हंसली !
४. सायकीयाट्रीस्ट
रिटायरमेंट च्या दिवशी
सायकीयाट्रीस्टनं केली घोषणा
"आता माझा एकाच बाणा
आज पर्यंत वेड्यान्ची सेवा
आता करीं समाज सेवा"
मिसेस सायकीयाट्रीस्ट म्हणाल्या :
" यानी कसलं खूळ काढलय
याना नक्कीच वेड लागलय !"
५. Pediatrician
रिटायरामेंट च्या दिवशी
pediatrician रंगात आला
रंगाताच घरी येवून
"Pedaitric ड़ोस" दिला
गोरी-मोरी बायको झाली
लाजून मुरकून ती म्हणाली
"इश्श, हे हो काय
सारखं सारखं
लहान मुला सारखं!"
६ Pathologist
रिटायरमेंट च्या दिवशी
Pathologist सासरा झाला
मुलगा सून दोघं आले
पाय त्याचे धरू लागले
मुलगा म्हणाला
"बाबा, सून तुमची कशी आहे
निवड माझी कशी आहे?"
Pathologist म्हणाला
"काहीच सांगण जमात नाही
Microscope शिवाय काहीच दिसत नाही!"
७ Cardiologist
हार्ट स्पेशालिस्ट रिटायर झाला
त्याच दिवशी प्रेमात पडला
पिकलं पान
हिरवं रान
कसं काय झालं
त्याला विचारलं
तो म्हणाला:
"मैंने उसको नहीं देखा
उसका दिल देखा!"
-अशोक
माझ्या आधीच्या कवितांसाठी लिंक
१. ड्यूटी
http://www.misalpav.com/node/14909
२. एक संवाद
http://www.misalpav.com/node/15130
प्रतिक्रिया
19 Dec 2010 - 4:26 pm | इंटरनेटस्नेही
उत्तम!
प्रा. डॉ. कविता करुदे.
19 Dec 2010 - 8:09 pm | चिंतामणी
डॉक्टरसाहेब, मस्तच.
"फ्यामिली डॉक्टरचा जमाना गेला, स्पेशालिस्टचा ज़माना आला. " हे आपणच म्हणलात हे जास्त चांगले.
21 Dec 2010 - 4:17 pm | गणेशा
छान !
आधीच्या २ कविता ही खुप आवडल्या होत्या..
आणि ह्या ही आवडल्या ...
लिहित रहा डॉ. .. वाचत आहे
22 Dec 2010 - 10:08 pm | डॉ अशोक कुलकर्णी
धन्यवाद
23 Dec 2010 - 2:06 am | प्राजु
मस्तच! :)
23 Dec 2010 - 2:11 am | सुनील
मस्त!
23 Dec 2010 - 4:22 pm | डॉ अशोक कुलकर्णी
प्राजु व सुनील...
धन्यवाद !