एका डॉक्टरच्या कविता: दोन:
एक संवाद.....
थोड़ी मोकळी हवा घ्यावी म्हणून
बाहेर आलो, तो तिथं तू
दबा धरून बसलेला, वाट पाहात
सरकत होतास हळू-हळू
माझ्या पेशंट कड़े!
वैरी कां असेनास
पण आहे पुरातन ओळ्ख आपली
आपल्या लढाईत
अंतिम पराजय,
माझाच! आमचाच!
शुश्रूत, चरक, हिप्पोक्रेटीस, पाश्चर, नाईतिन्गेल
किती म्हणून नाव घ्यायची?
सर्वांच्या नशिबी हेच
आपल्याच समोर
आपल्याच वै-याचा विजय!
तरीही आम्ही लढणारच
कारण आम्ही आहोत आशावादी
नष्ट केलय तुझ्या कैक दोस्तांना
नामोनिशाण नाही आता त्यांचं !
आहेत आता आमच्याही जवळ
धारदार शस्त्र, लाधान्या साठी तुझ्याशी
तुझ्या काही दोस्तांना
बांधलय आम्ही दावणीला
राबताहेत ते छावणीत आमच्या
आमच्यासाठी !
अरे! चाललास कुठे?
माहित नाही तुला?
मी आहे इथं, लढायला तुझ्याशी?
चल, मी येतो बरोबर,
त्याच्या ऐवजी, चालेल?
नको म्हणतोस? Thank You !
पण, माहीत आहे मला
तू येशील परत
उद्या, कदाचित आजच
थोड्याच वेळात
हा विजय आहे क्षणिक
महायुद्ध अजून आहे दूरच
मीही करतो तयारी,
त्या महायुद्धाची तुझ्याशी
नसेन मी तेंव्हा, कदाचित
पण असतील योद्धे,
माझ्या सारखे ,
नसेन मी तेंव्हा, कदाचित
पण असतील योद्धे,
माझ्या सारखे , पण तू नसशील !
मी वाट पाहतोय ,त्या दिवसाची
जो येणार आहे ,कधीतरी,
नक्कीच !
-अशोक
प्रतिक्रिया
26 Oct 2010 - 4:58 pm | स्पंदना
स्तुत्य !!
एका डॉक्टरच्या नजरेतुन दिसणार, प्रामाणिक काव्य.
अशोक राव ही नजर फक्त तुमची ! जोपासत रहा !
26 Oct 2010 - 5:29 pm | llपुण्याचे पेशवेll
छान कविता डॉक्टर.
26 Oct 2010 - 7:46 pm | पैसा
सदैव रोगांच्या आणि रोग्यांच्या गराड्यात राहून तुमच्यातला कवि शिल्लक राहिला हीच फार मोठी गोष्ट आहे!
26 Oct 2010 - 8:25 pm | गणेशा
अतिशय छान डॉ.
तुमची मागील ही कविता खुप छान होती.. प्रत्येक कवितेमध्ये आधीची लिंक पण द्या ना.
जे पहिल्यांदा वाचत असतील त्यांना शोधावी नाही लागणार
असो .. लिहित रहा .. वाचत आहे
26 Oct 2010 - 9:57 pm | प्राजु
चांगली आहे कविता. व्हेरी नाईस!
27 Oct 2010 - 1:17 am | धनंजय
कल्पना आवडली.
"उद्या तू नसशील" या विचाराला "आशा" मानणे मला प्रशस्त वाटत नाही. पण कवितेसाठी ठीक आहे.
27 Oct 2010 - 8:57 am | पाषाणभेद
कविमनाचे डॉक्टर!
27 Oct 2010 - 11:27 pm | तर्री
डॉ.साहेब , आपल्या कवितेमधून "दुर्दम्य" आशावाद दिसतो आहे. कविताचा हा विषय , मांडणी खूप आवडली.
अवांतर " कोलंबसाचे गर्वगीत ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेसारखीच.
28 Oct 2010 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली.
-दिलीप बिरुटे
29 Oct 2010 - 10:02 pm | डॉ अशोक कुलकर्णी
धनंजय....
तुमची प्रतिक्रिया वाचली. कविता एका मूड मधे लिहून संपवली. त्यानंतर तुम्ही म्हणता तो विचार मनात आला हे कबूल करतो. इथे "तू नसशील" यात मृत्यू ऐवजी "रोग" अशी कल्पना करून कविता वाचली तर ...?
तर्री..
ही कविता वाचून कविवर्य कुसूमाग्रजांच्या त्या अजरामर कवितेची आठवण तुम्हाला झाली ... भरून पावलं !
अपरर्णा. पु पे जी, डॉ बिरूटे, पाषाणभेद, प्राजु, गणेशा, पैसा सर्वांचे आभार !
30 Oct 2010 - 7:51 am | नितिन थत्ते
छान कविता आहे.
मी कविता वाचली तेव्हा ती मृत्यूला उद्देशून आहे असे वाटलेच नाही. रोगांना उद्देशून आहे असेच वाटले.
धनंजयसुद्धा रोग नसतील ही आशा फोल आहे असेच म्हणत असावेत.
पन तुमची कविता सध्याच्या कोणत्यातरी रोगाला उद्देशून असेल तर भविष्यात 'तू नसशील' ही आशा वाजवी आहे.
कविता आवडली.
19 Dec 2010 - 11:33 am | डॉ अशोक कुलकर्णी
धन्यवाद !
19 Dec 2010 - 11:47 am | जाई अस्सल कोल्हापुरी
लिहित रहा.
19 Dec 2010 - 4:39 pm | इंटरनेटस्नेही
वा चान चान!
-
प्रा. डॉ. सदा बिझी.