एका डॉक्टरच्या कविता-४: व्यथा

डॉ अशोक कुलकर्णी's picture
डॉ अशोक कुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Jan 2011 - 10:04 pm

व्यथा

फिनेल स्पिरिटच्या वासांनी
नाकाला घेराव केले
वेदनेच्या आकान्तांनी
कान सुद्धा बधीर झाले

रो़ज रोज मरण बघून
डोळे सुद्धा कोरडे झाले
मित्रांचं तर जावूच द्या
अश्रू सुद्धा गद्दार झाले!

- अशोक

करुणकविता

प्रतिक्रिया

डॉक्टरकी पेशा अवघड असतो हे खरं आहे.

प्रकाश१११'s picture

13 Jan 2011 - 8:38 am | प्रकाश१११

फिनेल स्पिरिटच्या वासांनी
नाकाला घेराव केले
वेदनेच्या आकान्तांनी
कान सुद्धा बधीर झाले

वास्तववादी चित्रण. मस्त. !!

कविता आवडली ..

लिहित रहा ... वाचत आहे ..

चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !!

मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्‍या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.

डॉ अशोक कुलकर्णी's picture

13 Jan 2011 - 3:45 pm | डॉ अशोक कुलकर्णी

@ टारझन....
भगेंद्र, मुळव्याध इत्यादीवर जाहिरात करून उपचार करतात ते डॉक्टर नव्हेत क्व्याक्स आहेत. त्यांची कां म्हणून कींव करावी?
-अशोक