एका डॉक्टरच्या कविता-१: ड्यूटी

डॉ अशोक कुलकर्णी's picture
डॉ अशोक कुलकर्णी in जे न देखे रवी...
13 Oct 2010 - 10:08 pm

ड्यूटी

होय मिलोर्ड
त्या दिवशी माझीच ड्यूटी होती
होय, मला चांगल आठवतय ...
संध्याकाळी सहाची वेळ असावी
घरी call आला , मी गेलो
हो ताबडतोब म्हणजे दहा मिनिटातच
पहातो तो तिघ जखमी admit केलेले
नाही, नावं नाही आठवत
पण हो, मी ओळ्खू शकेन त्यांना
ओळ्खायच्या खूणा
त्या लिहिल्यात ना मी
केस पेपर वर , वरच्या डाव्या कोपऱ्यात

हो, घाव शस्त्राचेच
कुर्हाड़ किंवा तलवार असेल
पण, धारदार शस्त्राचेच घाव ते
नक्की म्हणजे काय मिलोर्ड
आठ वर्षांची सर्व्हिस माझी!

नंतर त्या दोघींना आणलं
एक साठीची, दूसरी पंधरा सोळाची
घरात घुसून मारलं त्यांना
ती साठीची,
तिचे थिजलेले डोळे, आणखीच थिजले
मरणा पूर्वीच मेल्या सारखे
घाबरली होती, तरीही
टाके घालतांना बधीर करायचं इंजेक्शन नाही द्यावं लागलं
"कुर्हाडीचे घाव पचवल्यावर
doctor च्या सुइला काय घाबरायचं" म्हणाली !

आणि त्या दुसरीचं, पंधरा सोळा वालीचं विचारताय?
नाही, बलात्कार नव्हता झालेला
हो, तशी खात्री आहे माझी
आता वकीलसाहेब, बलात्कार सोडून मारहाणच कां
ते ह्या समोरच्या श्रःंढ आरोपिनाच विचारा की !

नाही बलात्कार नाही केला
म्हणून नाही श्रःंढ ते
ज्यांचा रक्षण करायच त्यांना मारल
म्हणून श्रःंढ ते!

हो, नंतर आणखी सात आठ आले
ही त्यांची नावं , ही त्यांची यादी
सगळ लिहिपर्यन्त आणखी दहा आले
शेवटी तर मोजणच सोडून दिलं !
नाही मिलोर्ड,
त्या रात्री घरी नाही जाऊ शकलो मी
कारण मिलोर्ड , त्या दिवशी माझीच duty होती
मीच होतो ना duty वर, ऑन call वर
हो, ते सगळ खरं आहे
खर तर त्या दिवशी,
बाहर, दवाखान्या बाहेरच खर काम होत
तलवारीचे, कुर्हाडिचे हात
वरच्या वर धरून, पिरगाळून
छाटून हवं तर
हे सगळ थांबवायला हव होतं
पण मी नाही जावू शकलो तिथं, मिलोर्ड
मिलोर्ड, कारण मी duty वर होतो
होय मिलोर्ड,
मी त्या दिवशी duty वर होतो

-अशोक

करुणकविता

प्रतिक्रिया

निशब्द झालो डॉक्टर ...
शहारा आणती आहे कवितेतील घटना

लिहित रहा .. वाचत आहे

डॉ ,कविता आवडली एवढेच सांगतो.बाकी निशःब्द.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

14 Oct 2010 - 12:38 am | जाई अस्सल कोल्हापुरी

आणि शब्दातुन व्यथा कळते आहे.
मला बर्‍याचदा हा प्रश्न पडायचा की डॉक्टरांच्या समोर इतके इतके प्रसंग येत असतात्...ते कसे नेहमी त्याच वातावर्‍अणात राहु शकतात?
कधीही त्यांना frustration येत नसेल?.... इ.इ.
माझी एक अतिशय आवडती serial होती/....gray's anatomy...त्यामध्ये हे सारं डॉक्टरांच भावविश्व अतिशय सुंदरपणे portrait केलं होतं...
लिहित रहा अजुनि....वाट पाहते आहे.

अथांग's picture

14 Oct 2010 - 6:17 am | अथांग

की गोठून जायला होतं !

........

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 8:47 am | पाषाणभेद

माणूसपण जपणारा डॉक्टर!

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 8:58 am | नगरीनिरंजन

....

चिंतामणी's picture

14 Oct 2010 - 9:03 am | चिंतामणी

:(

डॉ अशोक कुलकर्णी's picture

14 Oct 2010 - 9:13 pm | डॉ अशोक कुलकर्णी

सर्व रसिक वाचक मित्रांचे मना पासून धन्यवाद ! मनापासून लिहिलेल्या आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेल्या कवितेला मनापासून दिलेल्या प्रतिसादा बद्दल मनापासून आभार ...!

धनंजय's picture

15 Oct 2010 - 3:47 am | धनंजय

वेगळीच, कुशल आणि विचार करायला लावणारी.

डॉ अशोक कुलकर्णी's picture

19 Dec 2010 - 11:49 am | डॉ अशोक कुलकर्णी

धन्यवाद, धनंजय !