अकलेचे तारे आणि जावईशोध

भाऊ पाटील's picture
भाऊ पाटील in जनातलं, मनातलं
5 Oct 2010 - 6:57 pm

सुमार काँग्रेस्करांनी त्यांच्या आजच्या अग्रलेखात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेवरुन (काहीच्या )काही तारे तोडलेत आणि जावईशोध लावलेत. त्याची उदाहरणे:

१) राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा भरवल्याने रोजगारनिर्मितीतही आपण जी भरारी मारली आहे, ती लक्षात घ्यायला हवी. ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ने या संदर्भात दिलेली आकडेवारी पुष्कळच बोलकी आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन ते एक लाख सतरा हजार कोटी रूपयांवरून एक लाख पंचाहत्तर हजार कोटी रूपयांवर पोहोचणार आहे. ही वाढ चौतीस टक्क्यांच्या घरात आहे.
-- राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा भरवल्याने देशांतर्गत उत्पादनात ३४% वाढ???? आय्ला हे ग्लोबलायझेशन, मुक्त अर्थव्यवस्था वगैरे उगाच करत बसलो मग आपण. सरळ दरवर्षी एक स्पर्धा भरवायची आणि ३०-३५% वाढ.

२) १९८२मध्ये आशियाई क्रीडास्पर्धा भरल्या असताना आपल्याकडे ज्या प्रमाणात सोयीसुविधा होत्या, त्यापेक्षा आता त्या जास्त उपलब्ध असल्याने आणि भारताची जगाला बऱ्यापैकी ओळख झालेली असल्याने आता या देशात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही तुलनेने बरेच वाढले आहे. त्या वेळी इंदिरा-राजीव यांनी रंगीत टीव्ही आणला, हे आता किती लाभदायक ठरते आहे ते आपण पाहतो आहोतच!
-- हा तर कहर आहे. सुमार काँग्रेस्करांची राज्यसभा सीट पक्की!

३) दिल्ली विमानतळ, दिल्लीत असणारी खासगी इस्पितळे यांचेही उत्पन्न मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. इस्पितळांचे उत्पन्न वाढणे ही काही फार समाधानाची बाब नसली तरी परदेशातून भारतात येऊन उपचार करवून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढण्यास इथल्या वैद्यकीय व्यवस्थेवर असणारा विश्वासही कारणीभूत आहे. वैद्यकीय पर्यटन हा एक नवा व्यवसाय बनला आहे. एकटय़ा दिल्लीत या क्षेत्रात पंधरा हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्माण झाला आहे.
--राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा आणि वैद्यकीय पर्यटन यांचा काय संबंध???

४)विमान कंपन्या, विमानतळ यांच्या व्यवस्थेत अडीच लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत किंवा होत आहेत, असे ‘असोचेम’चे म्हणणे आहे.
--असोचेम ने हे पूर्ण देशासाठी म्हटलय. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांशी ह्याचा कितपत संबंध???

असो; हे जोक्स कुणी मिस करु नये ह्यासाठी हा लेखनप्रपंच!

समाजराहणीक्रीडाअर्थकारणराजकारणलेखमाध्यमवेध

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

5 Oct 2010 - 7:17 pm | चिरोटा

हा हा!. सुमारराव कधीतरी असले लिहिणार हे अपेक्षित होतेच.

सुमार काँग्रेस्करांची राज्यसभा सीट पक्की!

ते सुरुवातीपासूनच असे करत आले आहेत्(विनामूल्य!).महेश भट जशी बॉलिवूडची फुकट वकीली करतात त्यातलाच हा प्रकार आहे.कलमाडींनी ९९ का ९८ साली काँग्रेस सोडल्यावर सुमाररावांनी 'सूर्याजी पिसाळ' नावाचा अग्रलेख लिहिला होता.आदल्यादिवशी पर्यंत काँग्रेसमध्ये असणारे कलमाडी त्यांना अचानक भ्रष्टाचारी दिसू लागले होते.कोणाकडे असेल तो अग्रलेख तर त्याचे प्रिंटआउट घेवून ते सुमाररावांनी कोणीतरी पाठवावे.!

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा आणि वैद्यकीय पर्यटन यांचा काय संबंध

दिल्लीत प्रदूषण प्रचंड आहे असे ऐकले आहे. चार दिवस राहिले की पर्यटक पडलेच आजारी.

त्या वेळी इंदिरा-राजीव यांनी रंगीत टीव्ही आणला, हे आता किती लाभदायक ठरते आहे ते आपण पाहतो आहोतच

सुमारराव हे असल्या Feudal mentality चे उत्तम उदाहरण आहे.सरकारी योजनांबद्दल चांगले बोलणे वेगळे आणि काही आवडत्या ठराविक व्यक्तींना डोक्यावर घेवून नाचणे वेगळे.

गांधीवादी's picture

5 Oct 2010 - 7:17 pm | गांधीवादी

>>आपण. सरळ दरवर्षी एक स्पर्धा भरवायची
कोणत्या तोंडाने ?

असो,
हे जुनेच जोक्स आहेत, त्यामुळे मिस केलेले नाहीत.
तरीसुद्धा आभारी आहे.

विकास's picture

5 Oct 2010 - 7:27 pm | विकास

सुमार काँग्रेस्करांनी त्यांच्या आजच्या अग्रलेखात...

नावात सर्वच येते. मात्र स्वामीपेक्षा स्वामीनिष्ठ राहूनही अजून देखील राज्यसभेत नाहीत याबद्दल खेद वाटतो... :(

जे काही आधी झाले त्याला यात हिंदूत्ववादी, भाजपा अथवा रा.स्व. संघ कसा जबाबदार आहे हे दाखवलेले दिसले नाही. त्यामुळे अग्रलेख वाचताना, "गोडी अपूर्णतेची, लावेल वेड जीवा" अशी काहीशी अवस्था झाली. ;)

वाटाड्या...'s picture

5 Oct 2010 - 10:17 pm | वाटाड्या...

+१ विकासरावांशी पुर्णपणे सहमत व "गोडी अपूर्णतेची, लावेल वेड जीवा" १००% मार्क...