लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त्य अनेक लेख वाचण्यात आले आणि अनेक गाण्यांचा आस्वादही घेण्यात आला.
१९६४ च्या सूमारास लतादिदींना गीतेच्या अध्यायावर गायन करण्यासाठी एका संगितमंडळीने सांगितले. लतादिदी आपल्या प्रघातानूसार त्यावर चिंतन, मनन आणि वाचनाची तयारी सुरु केली.
उच्चारावर लतादिदींचे खास लक्ष असते. उच्चारात कोणताही दोष असु नये यासाठी त्यांनी गोनिंदा यांना तातडिने येण्यासाठी पत्र पाठविले.
गोनिदा यांच्या देखरेखीखाली लतादिदी यांच्या सरावासाठी सुरवात झाली. लता एकनंतर एक असे अध्याय वाचत आणि गोनिंदा त्यात र्हस्व आणि दिर्घाच्या उच्चारात काही त्रुटी राहत तर नाही ना यावर लक्ष देत. थोडीजरी चूक आढळली तर अध्याय परत वाचावा लागे. गुणवत्तेला कोणतीही तडजोड नव्हती.
शेवटी ध्वनीमुद्रणही पार पडले आणि सर्वांच्या चेहर्यावर समाधान आले.
लतादिदींनी गोनिंदाना वाकुन नमस्कार केला त्यावर नकळतच गोनिंदा बोलले, हे जर गायन पाठ महाराजांनी ऐकले असते तर मी त्यांना तुम्हाला एक जहागीरी द्यावी असे शिफारस केली असती.
त्यावर लतादिदी बोलल्या की मला जहागिरी वगैरे काही नको, फक्त तुमचा आशिर्वाद तो द्या.
गोनिंदा बोलले, " तथास्तु".
अशी नम्रता असणे विरळच असते.
संदर्भ : लोकसत्ताचा रविवारचा अंक. तिथी आठवत नाही.
प्रतिक्रिया
29 Sep 2010 - 1:35 pm | मिसळभोक्ता
हे जर गायन पाठ महाराजांनी ऐकले असते
कुठल्या महाराजांनी ? बडोद्याच्या ?
29 Sep 2010 - 10:18 pm | पिवळा डांबिस
कुठल्या महाराजांनी ?
कुठल्या म्हाराजांनी?
काय पण सवाल करतांय राव!!!!
आवो, आमच्या म्हारास्ट्रात एकच म्हाराज!!!
ते जर नसते तर "सुनत होती तुम्हारी"!!!
आला ना शहारा अंगावर!!!:)
कुठले म्हाराज असा प्रश्न विचारल्याबद्दल सानजोजेच्या झागिरदारांचा कडक णिषेध!!!!!
म्हाराजांचा येकनिष्ठ मावळा,
मी तो डांबिस पिवळा
29 Sep 2010 - 10:28 pm | मिसळभोक्ता
गोनीदा, म्हाराज, लतादीदी, गीतापठण ह्यांचा काहीही ताळमेळ लागेना बघा.
आणि सुनत म्हणाल, तर ती हायजिनीक असते असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. (मुसलमानांमध्ये एड्सचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण हेच आहे म्हणतात.)
29 Sep 2010 - 1:38 pm | अविनाशकुलकर्णी
गायन पाठ महाराजांनी ऐकले असते तर मी त्यांना तुम्हाला एक जहागीरी द्यावी असे शिफारस केली असती.
संभाजी ब्रिगेडला सांगु का??/
29 Sep 2010 - 1:39 pm | प्रचेतस
मिभोकाका, महाराज म्हणजे आपले सगळ्यांचे 'छत्रपती शिवाजी महाराज' हो. जे गोनीदा आणि लतादिदी या दोघांचेही स्फूर्तीस्थान होते.
29 Sep 2010 - 1:42 pm | मिसळभोक्ता
संदर्भाशिवाय स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
29 Sep 2010 - 1:41 pm | नंदन
छान. असाच किस्सा त्यांच्या आसामी गीतांबद्दलही ऐकला आहे (स/ख/ह च्या वेगळ्या उच्चारांबाबात). हिंदीतही 'र'चा उच्चार र आणि ल यांच्यामध्ये कुठेतरी न होता, स्पष्टपणे वेगळा होतो. उदा. - हमने देखी है उन आँखोंकी महकती खुशबू
[लोकसत्तेतील मूळ लेखाचा दुवा येथे.]
29 Sep 2010 - 5:09 pm | वेताळ
पण कलंत्री काका खुपच दिवसानंतर तुम्हाला मिपावर बघत आहे.मध्यंतरी तुमची प्रर्कषाने आठवण आली होती.
29 Sep 2010 - 7:04 pm | शेखर
सहमत...
29 Sep 2010 - 9:58 pm | पाषाणभेद
अजुनही काही आठवणी दिदींच्या असतील तर जरूर सांगा.