असंच एकदा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना एका मैत्रिणीने केव्हा तरी पहाटे हे गाणं म्हटलं...तर त्यावरून एका मैत्रिणीला याच गाण्यासाठी काही ओळी सुचल्या. मग त्यानंतर सगळ्यांनाच हा फीवर चढला...हे माझेही काही प्रयत्न -
ही कडवी चालीत बसत नसली तरीही त्यातील भावार्थ गाण्याला अनुरूप असा आहे
या शांतशा क्षणांनी मागितली साथही कुणाची
ती साथ मागताना ही रात सरून गेली..
शब्द माझे भिजताना सजवून रात्र गेली
हे शब्द वेदनांचे सुचवून रात्र गेली..
बघा तुम्हालाही अजून काही सुचतंय का?
प्रतिक्रिया
29 Aug 2010 - 8:20 pm | अस्मी
वाह...मस्तच!! :)
30 Aug 2010 - 12:36 am | सुहास..
असंच एकदा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना एका मैत्रिणीने केव्हा तरी पहाटे हे गाणं म्हटलं >>
एक नंबर !! कसल झकास गाण आहे ,
सारेगमपत'कार्तीकीने' हे गाण गायल्याचा आठवल .चित्रपट निवडुंग हो निवडुंगच बहुतेक !!
आपल्याला सुचलेल्या ओळीही झकासच !!
30 Aug 2010 - 3:07 am | इंटरनेटस्नेही
सुंदर!