मुखवटे आणि चेहरे

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
5 Aug 2010 - 11:31 am

काल ऐन संध्याकाळी नेट कनेक्शन डाउन झाले आणि डोक्याला शॉट लागला. शेवटी वैतागुन शटर खाली केले आणि चुकला फकिर मशीदीत ह्या न्यायाने आम्ही चौपाटीची वाट चालायला लागलो. लांबुनच एका आईसक्रीमच्या गाडीला टेकुन बसलेला आमचा नानबा दिसला आणि चौपाटीवर आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नाना एक भली मोठी पेन्सील, कागद , खोडरबर आणि टोकयंत्र घेउन बसला होता.

"नानुssssssssडी काय विडंबन करतोयस का टॅक्स रिटर्न ?" मी आनंदाने साद घातली. मात्र "ये रे भाड्या !" च्या ऐवजी "राम राम" ऐकायला आले आणि आम्ही सावध झालो. नान्याचा मुड आज वेगळाच लागल्याचे लक्षात आले.

"काय नानबा ? विडंबन का विडंबन ??" आम्ही कागदात डोकावत म्हणालो.

"धाग्यांची यादी काढतोय ! हे ४/५ उद्या टाकायचे आणि हे ३/४ परवा" नाना हातातला कागद दाखवत म्हणाला. आम्ही उत्साहाने कागदात डोकावलो. कागदावर १) मुंगी होउन साखर खावी पण हत्ती होउन ओझी का उचलु नयेत ? २) जुलाबावर काही घरगुती उपाय आहेत काय ? ३) बायको साडी नेसणारी करावी का ड्रेस घालणारी ? ४) मुलाच्या डोक्यावरचे केस आता कापण्यालायक झाले आहेत तरी माझ्या लहान मुलास कुठे केस कापायला न्यावे ? ५) पुण्यात सायकलला चांगले स्पोक कुठे लावुन मिळतील ?? अशा काही धाग्यांची एकाखाली एक नावे दिसली.

"हे सगळे एकदम का नाही टाकत ??" मी हलकटपणाने विचारले.

"हे धागे मी टाकणार नाहिये ! लोकांना विषय हवे होते म्हणुन सुचवतोय" नाना थंडपणे म्हणाला.

"लोकांना ? म्हणजे कोणाला बॉ ?" ह्या आमच्या प्रश्नावर नानानी ज्या नजरेने आमच्याकडे बघितले त्यामुळे आमचे शरमेनी सरबत झाले. "हे घे वाच !" नानबाने आता खिशातुन एक चुरगाळलेला कागद काढुन आमच्या हातावर टेकवला. लॉटरीचे तिकिट बघावे त्या उत्साहाने आम्ही तो कागद उलगडून पाहिला. तो कागद म्हणजे एक ग्रुप-चाट ची प्रिंट आउट होती. त्यावर खालील प्रमाणे संभाषण होते :-
..........
सोम्या :- बा*** भां** 'त्या' धाग्यावर येवढा का पेटला आहेस ? पब्लिकला शंका येईल ना भौ.

गोम्या :- घंटा ! माझी खव बघ.. पब्लिक केस उपटायच बाकी राहिलय फक्त.

राम्या :- खी खी खी मायझ* माझ्या कालच्या धाग्यावर अजुन तेल ओतुन या रे कोणीतरी.

गोम्या :- त्या धाग्यावर मी लै शिव्या घालुन आलोय तुला मगाशी. वाचली का माझी प्रतिक्रीया ?

राम्या :- वाचली पण मी आता लॉग-ईन नाहिये, बाहेरुन वाचतोय.

सोम्या :- उद्या कोण टाकणारे धागा ? च्यायला जरा सांभाळून नाहितर परत लाथा मिळायचा.

राम्या :- फाट्यावर मारतो बे आपण सगळ्यांना. चार घुसवुन ठेवलेत. एक उडला तर काय फरक पडतो ?
............

"हम्म्म्म्म... तुला कुठे मिळाले हे नान्या ?

"वैयक्तीक प्रश्न... सो पास !"

हम्म्म्म्म. पण येवढ्या तेवढ्या कारणावरुन तु असा उदास नक्की होणार नाहीस, नक्की काय झालय बॉ तुला ?

"सध्या मिपावर उर्मटपणा वाढत चालला आहे परा."

"आणि आक्रस्ताळेपणा सुद्धा ! झाडं कमी पडायला लागली आहेत नान्या."

"मला फारा वाईट वाटते आहे रे पर्‍या. ज्या मिपावार विजुभौंसारखे व्यसनमुक्तीचे खंदे कार्यकर्ते कार्यरत आहेत त्या मिपावर दारुच्या समर्थनार्थ लेख यावा ? ज्या मिपावर स्वातीतै, जागुतै सारख्या सुगरणी पाहिल्या, तिथेच स्वयंपाक न करता येणार्‍या सदस्या दिसाव्यात ?? नवे रुप नवे रुप म्हणायचे ते हेच का काय ?"

"जाउ दे नाना तु नको डोक्याला शॉट लावुन घेउ."

"च्यायला प्रा. डॉ. च्या मिपाची लेखन 'कोलिती' उतरली रे पार. साल्या तु कसे काय हे सगळे सहन करतो ?"

"असे आहे बघ नानबा, मी सकाळी आल्या आल्या आधी कलंत्री काकांचा एक लेख नाहीतर प्रतिक्रीया वाचतो त्यामुळे पुढे कुठलेही लेखन आले तरी ते वाचायची मला मानसीक ताकद मिळते. आणि जाताना मी सामंत काकांचा एक लेख वाचतो मग दिवसभर जे काही (ही) वाचले ते कसे जीवन सुंदर करणारे होते ह्याचा मला साक्षात्कार होतो."

"धन्या आहेस भाड्या. चल आता जरा पाणवठा गाठु आणि मग घरला निघु. "

तर दोस्तहो अशा रीतीने नाना आणि परा पाणवठ्याकडे गेले. तिकडे रात्री ११ च्या सुमारास दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि इकडे मिपा रंगमंचावर ११.३० वाजता एका नव्या आयडी कडुन गो-ग्गोड भाषेत 'मिपा लेखनाचा दरजा' आणि दुसर्‍या नव्या आयडी कडून 'aajkal samant aani kalantri kaka kuthe asatat ?' असे विचारणारा लेख प्रकाशला.

विनोदसमाजमौजमजाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

5 Aug 2010 - 11:36 am | आनंदयात्री

आयला सामंत काका कुठे आहेत खरं !!

शिल्पा ब's picture

5 Aug 2010 - 11:39 am | शिल्पा ब

सुंदर लेख...
असे प्रेरनादाई, उच्च, जीवनाला दिशा देणारे लेख येत आहे हे पाहून अत्यानंद झाला...
एक शंका - आम्हीच टाकणार होतो त्या लेखांची यादी या नानुडीला कशी काय मिळाली? हि टेलीपथी तर नव्हे?
असो, कोणी का असेना पण "जनाला शहाणे करून सोडणे " महत्त्वाचे... नाही का?

अरुण मनोहर's picture

5 Aug 2010 - 11:47 am | अरुण मनोहर

तळे दिसले की सामंत आठवतात.

परा, नेहमी प्रमाणे हुच्च लेखन. गरजुंना हा लेख दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील.

छोटा डॉन's picture

5 Aug 2010 - 11:51 am | छोटा डॉन

प्रामाणिक प्रतिक्रिया देतो ...
लेख अत्यंत फालतु आणि थर्डक्लास आहे, पण पराच्या लेखांना इथे चांगले म्हणायची पद्धत आहे ह्याची कल्पना असल्याने प्रतिक्रियचे उत्तरार्धात मी त्याला 'चांगले' म्हणेनच.
असो.

तर काय सांगत होतो मी, हां, ह्या लेखाबद्दल.
काय च्या कै लिहले आहे, असले लेख खरेतर मिपावर यावे ह्याची मला आज भयंकर शरम वाटली.
ना इतिहासाचा अभ्यास ना भविष्याचा मागोवा आणि चालले हे गगनभरारी मारायला.
उगाच चारचौघांनी चढवुन ठेवले आहे डोक्यावर म्हणुन चालते, नाहीतर आहे काय तिच्यायला ?

दारुच्या समर्थनार्थ ( नसलेल्या ) लेखाचा रेफ. घेऊन त्याची रेवडी उडवताना नंतर "पाणवठा" वगैरे हा साळसुदापण समजला नाही, असो, आजकाल ते ही चालते म्हणे, काय करणार साहेब, जनरितच आहे ही.
असो, लिहण्यासारखे बरेच आहे पण इथे आमचा एवढा टाईम घालणे "वर्थ इट" वाटत नाही.

उगाच लेख बोंबा मारु नये म्हणुन " वाह वाह, काय उत्तम लेख लिहला आहे. हसुन हसुन मेलो पार, एक से एक निशाणे साधले आहेत. तिरकस कसे लिहायचे ते पराकडुनच शिकावे " असे म्हणतो व माझे ४ शब्द संपवतो.

अवांतर :
आजपासुन माझा मिपावर सन्यास सुरु होत आहे, ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने मी आमचे मित्र परा ह्याची ख्यालीखुशाली विचारुन घेतो.

<<<आजपासुन माझा मिपावर सन्यास सुरु होत आहे

तुम्हीच जर संन्यासी झाले तर आमचे लेख आणि प्रतिक्रिया संपादित झाल्यावर कोणाच्या नावाने खडे फोडायचे?

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2010 - 12:36 pm | llपुण्याचे पेशवेll

लेख अत्यंत फालतु आणि थर्डक्लास आहे, पण पराच्या लेखांना इथे चांगले म्हणायची पद्धत आहे ह्याची कल्पना असल्याने प्रतिक्रियचे उत्तरार्धात मी त्याला 'चांगले' म्हणेनच.

शब्दा शब्दाशी सहमत आहे. मौज मजेखातर लिहीलेल्या लेखांना मनावर घेऊन त्यावर आक्रस्ताळे प्रतिसाद द्यायची पद्धत आहे. आम्ही त्यालाही चांगले वैचारिक वगैरे म्हणतोच.

काय च्या कै लिहले आहे, असले लेख खरेतर मिपावर यावे ह्याची मला आज भयंकर शरम वाटली.
ना इतिहासाचा अभ्यास ना भविष्याचा मागोवा आणि चालले हे गगनभरारी मारायला.

एकूणच इतिहास बघता मिपाला ही गोष्ट नवीन नाही. "ना इतिहासाचा अभ्यास ना भविष्याचा मागोवा आणि चालले हे गगनभरारी मारायला" हे बर्‍याच लेखांच्या बाबतीत दिसतेच. आमचे तेच बरोबर हा सूरही दिसतो. त्यामुळे शरम नाही वाटली उलट मिपा सुरळीत चालू आहे त्याबद्दल आनंद वाटला.
आणि तसले लेख लिहीणं अपुर्‍या माहीतीच्या आधारावर भाष्यं करणं ही जनरितच म्हट्ली पाहीजे. नाहीतरी आपली तो लोकशाही इतरांची ती झुंडशाही ही प्रवृत्तीही काही नवी नव्हे.

आजपासुन माझा मिपावर सन्यास सुरु होत आहे, ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने मी आमचे मित्र परा ह्याची ख्यालीखुशाली विचारुन घेतो.
असो. आम्ही तुम्हाला तुमच्या खवतून, व्यनितून झालंच तर भ्रमणभाषावर ख्यालीखुषाली विचारू. :)

मस्त कलंदर's picture

5 Aug 2010 - 2:36 pm | मस्त कलंदर

अगदी हेच लिहायला आले होते, पण डॉन्या आणि पुप्याने सगळे आधीच लिहून टाकले..

तद्दन फाल्तू आणि भिकार लेख!!!

प्रभो's picture

5 Aug 2010 - 7:47 pm | प्रभो

तद्दन फाल्तू आणि भिकार लेख!!!

वाहत्या गंगेत हात धुण्याचा पर्‍याचा प्रयत्न.... ;)
बाकी लेख कसा लिहावा यासाठी बिकाकडून मार्गदर्शन घे लेका... बर्‍याच जणांना लायनीवर आणलंय त्यानी...

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2010 - 11:55 am | llपुण्याचे पेशवेll

आयला लैच संशयास्पद हालचाली होऊ लागल्या आहेत. असो. चला मी पोळ्या करतो , खातो मग येऊन सविस्तर प्रतिसाद देईन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2010 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्याकडे नेट कनेक्शन आहे आणि आपणही चौपाटीवर जाऊ शकतो दे दाखवण्याचा केलेला आटापिटा ... लेख अतिशय भिकार आणि भंगार!

सहज's picture

5 Aug 2010 - 12:04 pm | सहज

पराशेठ लवकरात लवकर ह्या लेखाला एक उतारा लेख लिहावा!

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Aug 2010 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते

भो* परा, केवळ तुला म्हणून काही सांगितलं तर असा नानाचा सहारा घेऊन गावभर करतोस होय? थांब... आता तुझे दोन आयडी उडवतो शिक्षा म्हणून.

* = हा भो संस्कृतातला आहे.

आमच्या बाब्यांच्या लेखाला का प्रतिक्रीया द्या? उगाच कुणाला काथ्याकुटाला निमित्त!

मराठमोळा's picture

5 Aug 2010 - 12:34 pm | मराठमोळा

परा, णाणा आणी त्यांची चौपाटीवरची आंबट तिखट भेळपुरी..

चालु द्या... :)

(अवांतरः स्माईली कधी येणार? अन मला अक्षररंग सुविधा पण नाही :( )

अवलिया's picture

5 Aug 2010 - 1:08 pm | अवलिया

न्म्स्कार, हा उर्म्त्पना थाम्ब्वावा हि विनन्ति

बेसनलाडू's picture

29 Aug 2010 - 10:32 am | बेसनलाडू

प्रविन भप्करचं काय झालं?
(मास्तर)बेसनलाडू

पुण्यात कुठे सापडली तुला चौपाटी ?

मराठमोळा's picture

5 Aug 2010 - 2:03 pm | मराठमोळा

>>पुण्यात कुठे सापडली तुला चौपाटी ?

होती हो पुण्यात सुद्धा चौपाटी, ब्ल्यु नाईल हाटेलाजवळ, पण आता तिथे नुतनीकरण होऊन मॉल आला आहे न्युक्लीयस नावाचा, चौपाटीवरचे जुने चने-फुटाणे, भेळीच्या स्टॉल चे रुपांतर हायटेक दुकानांनी घेतलीय आणी दुकानदारही नवे आहेत, पण परा, नाना सारख्या मंडळींना अजुनही जुनी चौपाटीच आवडते, तीच आपलीशी वाटते. काही नवे दुकानदार/गिर्‍हाईकं उर्मट आणी हेकेखोर आहेत म्हणे. :)

Pain's picture

5 Aug 2010 - 2:16 pm | Pain

तिकडे ? ब्लू नाइल म्हणजे कँपमधे आल ना ?

मी ऐकले होते की विश्रांतवाडीला जायच्या एका रस्त्यावर एका बागेच्या कडेला, लष्कराची एक चौकी आहे तिथल्या एका भागाला चौपाटी म्हणतात. खात्री नव्हती म्हणून विचारले.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

5 Aug 2010 - 3:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

वा वा छान छान !

पर्‍याच्या लेखांना (कसेही असले तरी) चांगले म्हणायची मिपावर फ्याशन आहे म्हणुन छान.

हसून मेले, मरून पुनर्जन्म झाला तोच परत हसत हसत वारले.

ऋषिकेश's picture

5 Aug 2010 - 4:26 pm | ऋषिकेश

उर्मट-कंपूत स्वागत! :)

ऋषिकेश's picture

5 Aug 2010 - 4:32 pm | ऋषिकेश

उर्मट-कंपूत स्वागत! :)
प्रतिसाद दोनदा का प्रकाशित होत आहेत कोण जाणे? :(

भोचकसम्रांटाचा ईजय असो !!

ह्या निमीत्ताने " ते डॉन्याच्या प्रतिसादापेक्षा लांबलचक सही "असणारे आठवले !!

आपल्याकडे नेट कनेक्शन आहे आणि आपणही चौपाटीवर जाऊ शकतो दे दाखवण्याचा केलेला आटापिटा ... लेख अतिशय भिकार आणि भंगार!


सहमत.
आमच्याकडे न आवडलेल्या लेखांना/लेखकाना अनुल्लेखाने मारायची फॅशन नाही म्हणून हे लिहिले.
अवांतरः कोणी उर्मटपणाचे क्लासेस घेईल का? अंतर्जालीय उर्मटपणा बोनस टॉपीक असायला हवा त्यात.

इंटरनेटस्नेही's picture

29 Aug 2010 - 4:54 am | इंटरनेटस्नेही

चांगला लेख आहे. वाचुन लुफ्त उठवला! :)

राजेश घासकडवी's picture

29 Aug 2010 - 10:42 am | राजेश घासकडवी

हे पण कसं वाचायचं राह्यलं कोण जाणे....पराषेठ तुमच्या लेखणीला तोड नाही. चान चान.